रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य ?
रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य? किती कार्यक्षम?
एखाद्या ठिकाणचे पर्जन्यमान/ पाऊस मिलिमिटर्स अथवा सेंटिमिटर्स यांमध्ये मोजतात. रोजचा पाऊस किती झाला हे मिलिमिटर्समध्ये सांगणे सोयीचे असले तरी एखाद्या भागातला वर्षभरांत एकूण पाऊस किती हे सेंटिमिटर्स मापात सांगितल्यास तुलना करणे सोपे जाते.
उदाहरणार्थ -
ठिकाण - पाऊस - माप
जैसलमेर - २० सेंटिमिटर्स
पुणे - ४० सेंटिमिटर्स
बंगळुरू - ८० सेंटिमिटर्स
चेन्नई - १०० सेंटिमिटर्स
कोलकाता - १५० सेंटिमिटर्स
तिरुवनंथपुरम १६० सेंटिमिटर्स
मुंबई - २०० सेंटिमिटर्स
गोवा - २०० सेंटिमिटर्स
कोची - ३५० सेंटिमिटर्स
((महाबळेश्वर - ८०० सेंटिमिटर्स
मेघालय - १२०० सेंटिमिटर्स))
एक सेंमि पाऊस म्हणजे १२.५ मिलिलिटरस पाणी १२.५ चौ सेंमि (square cms area) क्षेत्रफळावर जमा होते.
एका प्लॉटवर एक छोटे घर
एक फुट बाइ एक फुट जागेवर साधारण नउशेतीस मिलिलिटर्स पाणी गोळा होईल.
घरची गच्ची ५०० चौ फुट असेल तर एक सेंमि पावसाने ४५० लिटर्स पाणी मिळेल. वर्षभराच्या ४० सेंमि पाऊस होणाऱ्या पावसाचे सर्व पाणी गोळा केल्यास १८००० लिटर्स पाणी मिळेल.
वापर
एका कुटुंबात चार जण धरून रोजचा पाण्याचा खप ५०० लिटर्स धरुया. हे १८००० लिटर्स पाणी त्या कुटुंबास ३६ दिवस पुरेल. म्हणजे वर्षभराच्या वापराच्या दहा टक्के पाणी रेन हार्वेस्टिंगने मिळाले. हे एक मध्यम पावसाच्या ठिकाणाचे उदाहरण झाले. जिथे यापेक्षाही कमी पाऊस पडतो तिथेच खरी गरज आहे. पण तेवढा पाऊस पडत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे रोजचा वापर २५० लिटर्सही केला जाईल तर तर दोन महिने पुरेल.
साठवण
८ फुट बाइ ८ फुट लांब रुंद आणि ६ फुट खोल टाकी बांधल्यास त्यात ९ ते १० हजार लिटर्स पाणी साठवता येईल. अशा दोन टाक्या लागतील.
प्लॉट जमिनीचा आकार
७५ फुट बाइ ६० फुट प्लॉटमध्ये १०/१०/१०/१५ फुट जागा सोडून २५ बाइ २०फुटी घर (५०० चौ फुट) ही एक आदर्श स्थिती झाली. त्यात कडेला या दोन टाक्या व एक संडासची टाकी बांधावी लागेल.
मोठ्या इमारती , हौझिंग सोसायटीतील गरज
तळ मजला अधिक त्यावर तीन मजले आहेत असे धरल्यास गच्चीवरच्या प्रत्येक पाचशे चौ फुट भागातील गोळा झालेले पाणी खालच्या चार रहिवाशांत वाटायचे आहे. वरच्या उदाहरणातील पाणी अर्थातच एका ब्लॉकला आठ दिवस पुरेल. अधिक मजले असतील तर आणखी वाटप कमी होईल. बाकी त्या टाक्या बांधणार कुठे हा एक प्रश्नच ठरतो. टाक्या बांधण्याचा खर्चही आहेच. केवळ टाक्या बांधणे, पाऊसपाणी साठवणे बंधनकारक केले म्हणून नागरीक ते करतीलच.
गावागावांत जी पाणी अडवा जिरवा/ साठवा मोहिम अमलात आणत आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे कारण ते सर्वच उघड्या जमिनीवरचे पावसाचे पाणी गोळा करून साठवतात. तसे सोसायटीच्या/इमारतीच्या आवारातील गोळा केले जाईल असे नाही वाटत.
तुमचे अंदाज आणि सूचना मांडा.
वाचन
45680
प्रतिक्रिया
0