डॉ. पायल तडवी या तरूण डॉक्टरच्या आत्महत्या (कि संशयास्पद मृत्यू ) चे दुखःद वृत्त माध्यमात चर्चिले जाते आहे. सर्वसाधारणपणे काही क्षेत्रे सोडली तर सर्वसाधारणपणे जातीवरून हिनत्व वागणूक दिल्या जाण्याचा किमान सार्वजनिक जीवनातून बर्यापैकी लोप होत आहे असे आपण गृहीत धरून चालतो. किमानपक्षी मुंबईसारख्या जुन्या मेट्रॉपॉलीटन शहरातून उच्च शिक्षीत वरीष्ठ डॉक्टरांबद्दल अशी साशंकता असलेले वृत्त आश्चर्याचा धक्का आणि खरेच तसे झाले असल्यास -प्रथम दर्शनी तरी वृत्ते तशीच येत आहेत- निश्चितच काळजी आणि चिंतेची गोष्ट म्हणावी लागेल.
ज्या टोपीवाला महाविद्यालय (नायर रुग्णालय) येथे डॉ.पायल स्त्री वैद्यकशास्त्रातील पदव्यूत्तर शिक्षण घेत होत्या त्या वेबसाईटवर
https://www.tnmcnair.com/ भेट दिली असता कदाचित वेबसाईट कदाचित अद्ययावत नसल्यामुळे असेल ज्या वरीष्ठ डॉक्टरांवर जातीय छळाचा आरोप केला जातोय त्यांची नावे प्राध्यापक यादीत दिसली नाहीत. मुंबईतील सदर महाविद्यालय जवळपास १०० वर्षे जुने आहे किमान वेबसाईटवर दिसत असलेल्या प्राध्यापकांची आडनावे मुंबईतील बहुसांस्कृतिकतेला साजेशी अनेक जाती धर्मातून दिसताहेत.
अगदी ज्या युनिट हेडकडे प्राध्यापिकांबद्दल तक्रार केली गेली तिचे नाव Y.I. Ching Ling असे दिसते आहे - त्यांनी जाहीरपणे कोणते निवेदन केलेले माझ्या वाचनात तरी आलेले नाही . सहसा वरीष्ठ डॉक्टर्स नौकरीवर एवढेही अवलंबून नसावेत की अशा तक्रारींबाबत कुणाच्या छोट्या दबावाखाली येतील. एखाद्या एमबीबीएस पूर्ण केलेल्या स्त्रीला स्ट्रेस मॅनेजमेंट आणि मानसशास्त्राचे प्राथमिक ज्ञानही नसेल असे समजणे धाडसाचे वाटते
ज्या प्राध्यापिकांबद्दल जातीयता विषयक तक्रार आहे त्यांच्या हाताखालून इतरही आरक्षीत जातीतील डॉक्टर शिकुन गेले असणार आहेत त्यांच्याकडेही या प्राध्यापिकांच्या वर्तनाच्य इतिहासाची सुयोग्य चौकशी करण्यास हरकत नसावी असे वाटते.
सर्वात महत्वाचे आरक्षण असावे किंवा नसावे हा तात्विक वादाचा विषय प्रत्यक्षात काम करताना बाजूला ठेवला पाहीजे आणि पटो अथवा न पटो आरक्षण मिळालेल्या व्यक्तींना सुद्धा समान आणि आदराची वागणूक मिळाली पाहीजे. या घटनेची चौकशी होईल आणि सुयोग्य कारवाई केली जाईल आणि जातीय वीषमतेची वागणूक कुणाला सहन करावी लागणर नाही अशी अपेक्षा करूया.
जाता जाता आनखी एक विषय महाविद्यालयाचे डयरेक्टर कि डिन पद मागचे डायरेक्टर कुणि डॉ.सुपे म्हणून निवृत्त झाल्या नंतर कायम स्वरूपी भरण्याबाबतची कार्यवाही मुंबई महापालिकेकडून सावकाशपणे चालली असावी असे एशियन एज च्या एका वृत्तातून दिसते. त्यात हॉस्पीटलच्या जाती आधारीत कर्मचारी युनियनचा जातीय राजकारणामुळे पद भरण्यात दिरंगाईचा आरोप दिसतो आहे. आणि निवडणूक आचारसंहितेचे कारण प्रशासनाकडून दिले जाताना दिसते आहे. प्रबोधनकार ठाकरे यांची पार्श्वभूमी असलेली शिवसेना वरीष्ठ पदासाठी कट्टर जातीय रंग ठेवेल अशी शक्यता कमी वाटते.. शिवसेना नेतृत्व आणि फडणवीस सरकार सुयोग्य पावले उचलतील अशी अपेक्षा करूया
*** घटना क्रमाची नोंद घेण्याचा प्रयत्न
२२ मे २०१९ ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी नंतरही दोन चार दिवस सर्वांचे लक्ष मुख्यत्वे निवडणूंकांच्या बातम्यां कडे असावे त्यामुळे घटना क्रम नीटसा ध्यानात घेण्यास अवघड जाते. माझेही बातमी कडे लक्ष उशीराच गेले. त्यामुळे घटनाक्रम समजून घेणे योग्य असेल असे वाटून मला बातम्यांमध्ये दिसलेला घटना क्रम काही त्रुटी दिसल्यास खाली प्रतिसादातून नोंदवणे
* मयत डॉक्टर स्त्रीचे नाव पायल तडवी वयः २२ पती डॉ. सलमान तडवी
* शिक्षण एमबीबीएस पूर्ण गायनॉकॉलॉजी पदव्यूत्तर शिक्षण वर्ष दुसरे चालू होते. नायर हॉस्पीटल जॉईनींग १ मे २०१८
*** संदर्भ आणि घटनाक्रम वृत्ते***
* मिड डे १
* मिड डे २
* https://www.asianage.com/metros/mumbai/170519/director-for-medical-education-post-lies-vacant.html
https://indianexpress.com/article/india/mumbai-doctor-suicide-payal-tadvi-dalit-harassed-5753556/
*** चौकशी वृत्ते ***
१) महिला आयोग आणि आदिवासींसाठी असलेले अयोग यात लक्ष घालू शकतील महिला आयोगाने रिपोर्ट मागवल्याची बातमी वाचली होती
२) रॅगिंग विषयक संस्था स्तरीय प्रथम स्तरीय चौकशी होऊन द्वितीय स्तरीय चौकशी चालू असावी वृत्त
https://www.hindustantimes.com/mumbai-news/nair-hospital-suicide-case-state-appointed-panel-to-conduct-second-round-of-probe/story-FC7f0nzYSF45Qt5cJoRaUP.html
३) पोलीसांकडून चालू असलेली चौकशी क्राईम ब्रँचकडे वर्ग केलेली वृत्त वाचनात आहे.
४) युनिट हेड डॉ. Y.I. Ching Ling यांच्या बाजू बद्दलचे इंडियन एक्सप्रेस वृत्त
५) विभाग प्रमुखांची स्टेटमेंट्स
***अनुषंगिक ***
* नायर रुग्णालय गायनाकॉलॉजी विभाग प्राध्यापक नाव यादी कितपत अद्ययावत आहे कल्पना नाही. विभाग प्राध्यापक यादीत डॉ. यि चिंगलींग व्यतरीक्त बाकी आडनावे बहुधा मराठीच पण सर्व जातीय सरमिसळ दिसते आहे.
*https://www.tnmcnair.com/home/about.html नायर रुग्णालय वेबसाईट
* वैद्यकीय क्षेत्रातील जातीय वीषमता विषयक दावा करणारा ऑनलाईन वायर वरील लेख दुवा
* In light of Dr Payal Tadvi’s case, Nair Hospital holds discussion on workplace harassment
मिसळपाव
ज्या प्राध्यापिकांबद्दल
दुर्दैवी
In reply to दुर्दैवी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर मी २०१४ च्या गांधी
In reply to सर मी २०१४ च्या गांधी by माहितगार
सहमत...!!
In reply to दुर्दैवी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२
वस्तुस्थिती माहिती नसताना
In reply to वस्तुस्थिती माहिती नसताना by सुबोध खरे
+१ खरंय !
In reply to वस्तुस्थिती माहिती नसताना by सुबोध खरे
मला तरी वाटते की मी चर्चा
In reply to वस्तुस्थिती माहिती नसताना by सुबोध खरे
+1
In reply to वस्तुस्थिती माहिती नसताना by सुबोध खरे
वस्तुस्थिती
हि घटना वरवर पाहता आरक्षणावर
पोलिस तपासात काय निष्कर्ष निघतोय त्याची वाट बघा
ही निश्चितच दु:खद घटना आहे.
ही निश्चितच दु:खद घटना आहे.
पोलिस तपासात काय निष्कर्ष निघतोय त्याची वाट बघा
प्रकरणातील
In reply to प्रकरणातील by धर्मराजमुटके
कुठल्याही
जे दोषी असतील त्यांच्यावर
जातीच्या जाणिवा पुसट न होता
सत्य विपरीत निघावे अशी
In reply to सत्य विपरीत निघावे अशी by सुबोध खरे
अवघड आहे
In reply to सत्य विपरीत निघावे अशी by सुबोध खरे
भारत मूळ स्वभाव प्रगट करत आहे
In reply to सत्य विपरीत निघावे अशी by सुबोध खरे
यातून शिक्षण राहिले बाजूला,
In reply to सत्य विपरीत निघावे अशी by सुबोध खरे
कठीण आहे खरंच!
या प्रकरणाला जातीय रंग तर
In reply to या प्रकरणाला जातीय रंग तर by आनन्दा
आणि मराठी अमराठी असाही रंग
जिथे जास्त व्यक्ती काम करतात
पायालबाईंची लेखी तक्रार नव्हती
In reply to पायालबाईंची लेखी तक्रार नव्हती by गामा पैलवान
केस अद्यापतरी गुंतागुंतीची
In reply to केस अद्यापतरी गुंतागुंतीची by माहितगार
जेथे दिवसाचे १६ तास काम करून
In reply to जेथे दिवसाचे १६ तास काम करून by सुबोध खरे
माझे मत
In reply to पायालबाईंची लेखी तक्रार नव्हती by गामा पैलवान
बातमी मागची बातमी
घटनाक्रम वृत्त
खालील सोशल मिडिया वृत्तांकन
या धाग्यावर नेमका काय काथ्या कुटावा
डोक्याचा जरा आणखी भूगा
In reply to डोक्याचा जरा आणखी भूगा by माहितगार
घटनाक्रम वृत्त
आरोपीतांच्या अडचणीत बर्यापैकी भर पडण्याची शक्यता ?
सर्वांनी च
दिरंगाई, ढिसाळता, गलथानपणा की चातुर्याचा अभाव?
१) हि केस मुस्लिम समाजातील
In reply to १) हि केस मुस्लिम समाजातील by सुबोध खरे
५) माझ्या व्यक्तिगत मतानुसार
In reply to ५) माझ्या व्यक्तिगत मतानुसार by माहितगार
कायद्याचे मूलभूत तत्व आहे कि
In reply to कायद्याचे मूलभूत तत्व आहे कि by सुबोध खरे
“a fundamental postulate of
In reply to कायद्याचे मूलभूत तत्व आहे कि by सुबोध खरे
जामीन दिला जाण्याबाबत सहमत
सुबोध खरे sir
पकडलेल्या व्यक्ती गुनेहगर वृत्तीच्या अस्त्या
एकूण प्रकरणात
पोलीसांचे आरोपपत्र
एक जुना धागा शोधताना हा धागा
अंती सत्याचा जय होतो (जय