Skip to main content

नास्तिक चळवळ : काळाची गरज ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 08/04/2018 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अ‍ॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात. मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्‍या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्‍या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्‍या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात. नास्तिक चळवळ मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे. (मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )

वाचने 133863
प्रतिक्रिया 336

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

श्री. रा. रा. प्रचेतस यांच्या प्रतिसादाला संपूर्ण अनुमोदन. डीबीसर. नंतर सेटलमेंट करायला बसूयात.

नास्तिक चळवळीला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा..!! ============ गेले ४० वर्षे आमच्या घरी श्रीमद भागवत अखंड हरिनाम सप्ताह अविरतपणे चालू आहे. अकोटचे (जि. अकोला) भागवताचार्य यांच्याकडे व्यासपीठ आहे. ते वेद पुराण, श्रुती, भगवत गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, संत कबीर आणि इतर वारकरी संतांचे साहित्य/वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत. असे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नामांकित कीर्तनकारचे मत असायचे. ते जाहीर कीर्तनात (आणि खासगीत देखील) त्यांचे कौतुक करायचे. एवढेच नाहीतर त्यांनी भूत पिशाच्च , काला जादू, तंत्र मंत्र विद्या, जारण तारण ग्रंथांचा पण विशेष अभ्यास केला आहे असे ते सांगत. मी या महाराजांना लहापानापासून आदर्श मानले आहे. त्यांच्या काही सल्ल्याना देखील आत्मसात केले आहे. असो. त्यांना मी २-३ वर्षांपूर्वी एक बाळसुबोध प्रश्न विचारला होता, " महाराज, मेल्यानंतर नक्की काय असते? खरंच आपल्या पाप पुण्यामुळे स्वर्ग नरक मिळतो का ? ८४ लक्ष योनी आणि पुनर्जन्म खरंच असतो का?" महाराजांचे उत्तर कोणते ही आढेवेढे न घेता थेट होते "असे काही नसते. मेले कि संपलं. त्यामुळे पाप पुण्याचे स्वर्ग नरकाचे पुनर्जन्माचे जास्त विचार करणे सोडून चांगले आयुष्य जाण्याचा प्रयत्न कर." मी म्हंटले, " तुम्ही तर कीर्तनात लोकांना हेच सांगत असता तुकाराम महाराजांच्या अभंगाचे दाखले देत." ते: " तुकाराम महारांजांकडे येणारे साधक पुराणातील प्रश्न घेऊन येत. तुकाराम महाराज त्याची उत्तरे पौराणिक वाङ्मयाचे दाखले देऊन अभंगाच्या स्वरूपात देत असत. ते दाखले तुकाराम महाराजांना पटलेलीच होती असे होते नाही. त्यात तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा बराच भाग इंद्रायणीत बुडालेला आहे. आम्ही जे समाजाला सांगत असतो ते यासाठी की लोकांना थोडी तरी भीती असावी जेणे करून ते समाजात वावरताना नीट वागतील." त्या दिवसापासून माझी पूजा अर्चा खूप कमी पडत गेली. आता तर जवळपास ना च्या बरोबर आहे पण त्याने काही माझे विशेष वाटोळे झालेले दिसले नाही. (इनफॅक्ट व्यावहारिक बऱ्याच गोष्टीत मला चांगला फायदा झाला आहे) आमच्या वयक्तिक मंदिरातील पांडुरंगाची मूर्ती मला खूप आवडते. रोज जाता जाता बाहेरूनच पाया पडत असतो. प्रसन्न वाटते. कीर्तनातील "रामकृष्ण हरी " चालू होतानाचे मृदंगाची थाप ऐकली की झिंग चढते, ती नेमकी काय आहे हे माहित नाही. माझ्यासाठी तरी तोच देव आहे. देवाला (माझ्या मते मंदिरातील मूर्तीला) काही मागायचे नाही ही वारकरी संप्रदायाची आणि आमच्या घराण्याची रीत आहे त्यामुळे तर इतर कर्मकांड करण्याच्या जास्त कोणी फंदात पडत नाही. याने परिस्थितीच्या चढउतारा व्यतिरिक्त विशेष काही वाटोळे झालेले मलातरी अद्याप निदर्शनात आले नाही. .

In reply to by विशुमित

विशुमितजी आचार्य व तुम्ही, यान्चा एका विशिष्ठ धर्म आल्याने तुम्ही असं बोलू शकता, , तुम्ही जर दुसऱ्या विशिष्ठ धर्मातुन असते तर तुम्ही गपगुमान बसला असता... - फ्रीभुर्जी

In reply to by पगला गजोधर

याचा एक किस्सा सांगतो... माझी एक चुलत बहीण आणि भाऊजी सनातनचे आद्य साधक आहेत. संपूर्ण कुटुंबच म्हणा. मध्यंतरी पंढरपूर मधील बडवे -उत्पात पुजार्यांचे अधिकार कमी करून परीक्षा घेऊन जातविरहित नवीन पुजाऱ्यांच्या निवडी झाल्या आणि त्यानुसार पांडुरंगाची पूजा अर्चा चालू झाली. माझ्या भाउजीनी त्यावर आक्षेप घेत हे म्हंटले होते की पांडुरंगाची पूजा ब्राह्मणाकरवीच झाली पाहिजे. इतर जातीतील लोकांनी पूजा केल्याने मूर्तीचे पावित्र्य नष्ट होईल. मंत्रोउच्चर चे एक कारण सांगितले गेले. मी याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या काकू काका आणि बहनीने मला डोळे दाखवले. बहिणीला त्रास नको म्हणून, तुम्ही म्हणता तसे मी गपगुमान ऐकून घेतले. ==== वरच्या लेवल ला सनातनचे विचार उच्च प्रतीचे असू शकतात पण ते खाली पर्यंत झिरपताना वेगळेच काहीतरी घेऊन येतात. आणि कथित पुरोगाम्यांना सगळेच बिथरले हिंदुत्व दिसते. म्हणून स्वधर्माची विशेष काळजी वाटते.

In reply to by विशुमित

आणि कथित पुरोगाम्यांना सगळेच बिथरले हिंदुत्व दिसते.
याच्याशी लै वेळा सहमत! एका धाग्यावर हेच सांगायचं प्रयत्न चालला होता. ठराविक स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांच्या पलीकडे कायतर आहे हे समजून घ्यायचा साधा प्रयत्न पण दिसत नाही. म्हणौन खेदाने म्हणावेसे वाटते, कि पूर्वग्रहाने धर्माला बडवण्याचे काम करणारे नक्कीच दांभिक असतात.

In reply to by बिटाकाका

खेदाने म्हणावेसे वाटते, कि पूर्वग्रहाने धर्माला बडवण्याचे काम करणारे नक्कीच दांभिक असतात.
. फक्त "कुठल्या-धर्माला " बडवायचे, यावरून दांभिकतेच्या व्याख्या बदलतात.

In reply to by बिटाकाका

तेच तर म्हणतोय , "अमुक धर्माला बडवले तर ते असते राष्ट्रप्रेम " तर तमुक धर्माला बडवले तर ते असते राष्ट्रद्वेष

In reply to by पगला गजोधर

अरे क्या दिन आया है. प्रा. दिलिपजींनी चक्क विशुमित, गजोधर नि बिटाकाका यांचेत सहमती घडवून आणली. आता मंगूच उरलाय शिक्कामोर्तब करायचा.

In reply to by बिटाकाका

मज्जाच आहे. कळतंय पण वळत नाही.
कदाचित, "बिथरल्यामुळे" असें होत असावें त्यांना (ज्यांना असं होतंय त्यांना)...

In reply to by पगला गजोधर

आता बघा - "अमुक धर्माला बडवले तर ते असते धर्मनिरपेक्षता " तर तमुक धर्माला बडवले तर ते असते धर्मांधता" पडतो काही फरक? म्हणून म्हणालो - कळतंय पण वळत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

डोक्यातली *ष्ठा अशी चांदण्यात का टाकता? लैच वैयक्तिक *गायला लागलात गुरुजी. तुम्ही तरी लेव्हल सोडू नकात.

In reply to by राही

जातीय तेढ निर्माण करणारे विखारी प्रतिसाद चालतात का?

In reply to by अभ्या..

फक्त मला बोलण्याऐवजी, सुरूवात कोणी केली आणि त्यावर टाळ्या कोणी पिटल्या ते आधी पहा. एकतर्फी दोषारोप करू नका.

In reply to by बिटाकाका

वरच्या लेवल वाले खरेच अशे उच्च विचार राखून आहेत का हा संशोधनाचा भाग आहे. खाली पर्यंत काय झिरपून द्यायचे याचे गेमप्लॅन पण समजणे अवघड आहे. ठराविक स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांच्या कारवायांकडे सपशेल दुर्लक्ष तर केले जात नाही ना? त्यांना आवरायला लगेच कोणी पुढे येताना दिसत नाही. खूप गाजावाजा झाल्यावर वन लायनर उल्लेख केला जातो. पूर्वग्रहाने कोणी धर्माला बडवत नाहीत, त्याला बदनाम करणाऱ्याला बडवत असतात.

In reply to by विशुमित

वरच्या लेवल वाले खरेच अशे उच्च विचार राखून आहेत का हा संशोधनाचा भाग आहे.
हा संशय येतो याच्यातच बऱ्याच गोष्टी सामावलेल्या असतात. ********************************** हरदासाची कथा मूळ पदावर असे नको व्हायला. एका विशिष्ट धर्माला सरसकट झोडपाण्यापासून चर्चेची सुरुवात झाली होती याची आठवण करून देतो.

In reply to by पगला गजोधर

१२:१४ pm ला आलेल्या या प्रतिसादात अजूनपर्यंत कोणाला काहीही वावगे वाटलेले नाही. परंतु ३:०० pm ला दिलेल्या माझ्या प्रतिसादाविरोधात लगेच सूर उमटले. सिलेक्टिव्ह साधनशुचिता?????

In reply to by श्रीगुरुजी

असल्या विदंबनासाठी बोका ए आझम ban झाला होता. तुम्ही पण मागणी करा. हाकाना का. नाई ऐकले तर प्रत्येक ठिकाणी ट्रॉल अलर्ट लिहीत चला.

यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालातरी द्यावित, (म्हणजे) काहीतरी नक्की होईल.

In reply to by सुबोध खरे

अवांतर बद्दल क्षमस्व. *उत्तरदायित्वास नकार लागू. घटं भिंद्यात पटं छिन्द्यात, कुर्यात रासभ रोहणं| येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो S भवेत|

In reply to by विशुमित

मला वाटले शाळेत ८ वी का ९ वी ला संस्कृतच्या पुस्तकात होता तेव्हा बहुतेकांना माहीत असेल. पण असो, सांगते. (जवळची) मडकी फोडा, कपडे फाडा, गाढवावर स्वार व्हा. या त्या कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध माणूस व्हावे हे महत्त्वाचे. या धाग्यावर तुमचे प्रतिसाद आवडले आहेत हे इथेच सांगते.

In reply to by विशुमित

स्कोअरिंग म्हणून घ्यायला कोणी सुचवले नाही का! संस्कृत अगदी सोपी भाषा आहे. बरेच शब्द कानावरून गेलेले असतात.

In reply to by पैसा

कोटा थोडा होता आणि शिक्षकांच्या पोरांनी त्यावर डल्ला मारला होता. त्यात हिंदीचे शिक्षक माझे फेव्हरेट होते. हिंदी-संस्कृत वाल्यांपेक्षा पुयुअर हिंदी मध्ये मला जास्त मार्क्स होते. असो..

या मूर्खांनी प्लॅकार्ड्स पण शास्त्रीय भाषेत लिहिले नाहीत. सगळेच नाशिककर नास्तिक आहेत असं काहीतर सूचित होत आहे.

In reply to by दीपक११७७

ह्यांच्यापैकी कोणाला काही घंटा शोध लागलेला नाही. =========================== सत्याचं दर्शन असोच, "कोणतंही एक" सत्य विधान कोणाही नास्तिकाला लिहिता, बोलता येत नाही. बाकी जगत्कारण लैच पुढची गोष्ट आहे.

नास्तिकांनी आपल्या विचारप्रक्रियेला अधिकाधिक निर्दोष बनवण्यासाठी, विचारमंथन करून विधायक काम उभे करण्यासाठी एकत्र येण्याला समर्थन व शुभेच्छा. मात्र, या चळवळीचा पंथ होऊ देऊ नये व नास्तिकांची निराळी कर्मकांडे तयार होऊ देऊ नयेत यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे असे सुचवावेसे वाटते. अज्ञेयांनीदेखिल अश्या चळवळी सुरू कराव्यात. मी आणि माझे ३-४ मित्र यासंदर्भात चर्चा करत असतो, मात्र अज्ञेयवादी विचारांना वाहिलेले बृहद व्यासपिठ असेल तर सहभागी व्हायला आवडेल. बाकी, प्लेटो, सॉक्रेटिस, अ‍ॅरिस्टोटल तिघेही नास्तिक नव्हते. आस्तिकच होते. विवेकवादी मात्र निश्चित होते असे म्हणावे लागते.

In reply to by पुंबा

>>>नास्तिकांनी आपल्या विचारप्रक्रियेला अधिकाधिक निर्दोष बनवण्यासाठी, विचारमंथन करून विधायक काम उभे करण्यासाठी एकत्र येण्याला समर्थन व शुभेच्छा. मात्र, या चळवळीचा पंथ होऊ देऊ नये व नास्तिकांची निराळी कर्मकांडे तयार होऊ देऊ नयेत यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे असे सुचवावेसे वाटते. मूळ विषयावर प्रतिसाद असल्याने प्रतिसादातील विचार नोंद घेण्यासारखा आहे, धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by पुंबा

नास्तिकांनी आपल्या विचारप्रक्रियेला अधिकाधिक निर्दोष बनवण्यासाठी, विचारमंथन करून विधायक काम उभे करण्यासाठी एकत्र येण्याला समर्थन व शुभेच्छा. मात्र, या चळवळीचा पंथ होऊ देऊ नये व नास्तिकांची निराळी कर्मकांडे तयार होऊ देऊ नयेत यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे असे सुचवावेसे वाटते.
कर्मकांडाची सुरवात ही सुव्यवस्थेसाठी निर्माण झालेले प्रोटोकॉल अशी होते.नंतर त्यातील समयोचितता नाहीशी झाली तरी गतानुगतिकता म्हणून चालू राहून त्याचे कर्मकांड होते. अस्तिक व नास्तिक यात एक मोठा स्पेक्ट्रम आहे. सर्व नास्तिकांना ही एका वर्गात टाकता येणार नाही व अस्तिकांनाही. नास्तिकांनाही प्रतिक लागतात. लोगो,फोटो,घोषवाक्ये यातून ते व्यक्त होताना दिसतात.अमूर्त गोष्टीला मूर्त करण्यासाठी काही प्रतिके लागतात. हम होंगे कामयाब हे पुरोगामी कार्यक्रमात म्हटले जाणारे स्फ्रूतीगान हे भाबडा का होईना आशावाद व्यक्त करतो. या किंवा अशा संपुर्ण धाग्यात मानवी मन या गोष्टीचा वैज्ञानिक दृष्टीने केलेला विचार हा मुद्दा आलेला नाही. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला काही गोष्टींचे नव्याने आकलन होत असते. ही अनएंडिंग प्रोसेस आहे.

नास्तिकतेच्या सर्वसाधारणपणे दोन पायर्‍या, अवस्था, विधा आहेत. १. तांत्रिक नास्तिकता: म्हणजे ईश्वर नसण्याच्या भौतिक सत्याचे ज्ञान असणे. ईश्वर नसल्याचे ज्ञान कोणास असेल तर तो ईश्वरप्रणित, धर्मसंस्थाप्रणित जितकी काही अमंगल, अर्थहिन, अन्यायी आहे त्याच्यापासून दूर असेल. नास्तिकांनी कोणत्याही बाबीच्या अनस्तित्वाच्या सिद्धतेची पद्धती शोधली पाहिजे वा पुढे आणली पाहिजे आणि आपला अनुयायीवर्ग वाढवला पाहिजे. परिपक्व अज्ञेय लोकांना चर्चांचा जज/ मेडिएटर बनवून त्यांनी अस्तिकांच्या सर्व प्रकारच्या तांत्रिक अस्तित्वाच्या मुद्द्यांचे खंडन केले पाहिजे. याशिवाय ईश्वराच्या अस्तित्वाच्या मुद्द्याचे खंडन म्हणजे केवळ रामाचे, अल्लाचे, गणपतीचे, इ चे खंडन नसते. ईश्वराच्या सर्व प्रकारच्या कल्पना ज्या विविध मानवसमूहांत आहेत त्या सर्वांचे खंडन केले पाहिजे. २. सामाजिक नास्तिकता: आपल्या सर्व मानवी संस्कृतींत काही मानवी मूल्यांचा विकास झाला आहे. या मूल्यांस ईश्वरप्रणित वा धार्मिक आधार सोडला तर अन्य कोणताही आधार नाही. उदा. कोणी पत्नीशी एकनिष्ठ राहायची (वा तिने राहायची) अजिबात गरज नाही. एखाद्याने सत्यच बोलावे असे काही नाही. पचेल तितके फायद्याचे खोटेच बोलावे असे देखील तत्त्व पाळता येते. ही सर्व अनावश्यक अनाधार मूल्ये पाळण्याचे एक तर्कहिन कारण म्हणून आस्तिक लोक ईश्वरास पुढे करतात. विश्वाची रचना, मनुष्याची रचना, मनुष्याची अंतःप्रेरणा या सर्वाचे दाखले देत लोकांना सांस्कृतिक मूल्ये पाळायला लावतात. नास्तिकांना अर्थातच आरंभापासूनच विश्व नास्तिक असते तर आपली मूल्ये काय राहीली असती आणि का हे सांगीतले पाहिजे. समाजात, अध्यात्म, धर्म, अर्थ, कुटूंब, देश, व्यवसाय, कला, देहसेवा, इ इ अनेक प्रकारचे मूल्यस्तर आहेत. यातला कोणताही एक स्तर काढला तर समस्या येईल. उदा. अर्थ स्तर काढला तर व्यवहार कसे करावेत हे कळणार नाही. त्याच प्रमाणे धर्म हा स्तर काढला तर माणसाची व्यक्तिगत, अन्यव्यक्तिगत आणि सामाजिक मूल्ये काय असावीत हा प्रश्न उभा राहतो. तसा ईश्वराचा आणि मूल्यांचा अजिबात संबंध नसेल, पण तसं मानलं जातं. सध्यातरी मानलं जातं. मग धर्म नावाची गोष्ट नसताना लोकांनी कोणती मूल्ये बाळगली पाहिजेत आणि याचा आधार काय हे नास्तिकांनी सप्रमाण लिहून ठेवले पाहिजे. एक सर्वस्पर्शी फ्रेमवर्क बनवून ठेवले पाहिजे. आजघडीला तरी भारतीय घटना मला खरे बोल कि खोटे हे सांगत नाही. १२ वर्षे विज्ञान शिकलो असलो तरी कुठे चांगल्या वागण्याचा वा खरे बोलण्याचा नियम आढळला नाही. मी अस्तिक असलो, धार्मिक असलो आणि ईश्वरवादी असलो तरी धर्माच्या मूल्यांचे जोखड मला असह्य वाटते नि ते मी बरेचदा तोडत असतो. आणि मला पूर्ण खात्री आहे कि ज्यावेळी मला देव, धर्म आणि मूल्ये फुकाचीच आहेत असा अविष्कार होईल तेव्हा मी बेबंदपणे पण सुरक्षितपणे स्वार्थ साधत राहीन. तेच मला एक साधार नास्तिकी फ्रेमवर्क मिळालं तर आज जसा आर्बिट्ररी देव मानतो तसं ते फ्रेमवर्क मानेल. ---------------------------- आजची विधीपालिका आणि न्यायपालिका हेच सामाजिक फ्रेमवर्क ठरवताना धर्माचा आधार घेत नाहीत. हा एक नास्तिकी प्रयोगच आहे. या प्रयोगात विविध भूमिका मांडणारांच्या भूमिका या "न्यायसंगत" म्हणून मांडल्या जाताना दिसतच नाही. सर्वत्र स्वार्थगटांचा कोलाहल दिसतो. परवा विवाहांतर्गत बलात्कारांवर एक चर्चा ऐकत होतो. एक गट म्हणत होता हा गुन्हा आहे इतकं तरी मान्य करा. दुसरा कि समजा मान्य केलं तरी सिद्ध कसं करणार? तिसरा - सिद्ध कसं करायचं ते असो, पण अगोदर त्याला गुन्हा तरी म्हणा. चौथा - याचा दुरुपयोग केला तर? कसं ओळखणार कि संमती होती कि जबरदस्ती? पाचवा - दुरुपयोग होणार म्हणून काय अन्याय निवारणाचे कायदेच करायचे नाहीत? सहावा - पण याने स्त्रीयांना ब्लॅकमेलींगची पावर मिळेल जी ती पिळवणू़कीसाठी वापरतील. सातवा - या कायद्याने पुरुषांवर अन्याय व्हायला चालू होणार. एकजण - कायदा तुमच्या बेडरूममधे कुठपर्यंत घुसणार? ही मंडळी विवेकवादावर आधारित योग्यायोग्यातेचा पुनराविष्कार करत आहेत. हे थोडं कठीण आहे. नास्तिकांनी अशा सर्व समस्यांत एक सर्वांस समाधान देईल अशी भूमिका घ्यायला हवी. ती लोकांस आवडू लागेल, तसतसा नास्तिकवादाचा अनुयय वाढेल.

नास्तिक चळवळ- काही हरकत नाही. समविचारी लोकांनी एकत्र जमून आपल्या विचारांना समर्थन मिळवण्यात काही गैर नाही. फक्त ती 'काळाची गरज' वगैरे मला शहाजोगपणा वाटतो. जिथे कमी तिथे आम्ही हा अप्रोच ठेवून काम केलं कि भविष्यात मागे बघताना कळेल ती गरज होती कि नाही ते. बाकी 'चळवळ' हि कशाच्यातरी विरोधात होते हे गृहीत धरलं कि उद्देश नेमका काय आहे यावर प्रश्न येऊ शकतात. अंतिम उद्देश लोककल्याण हा असेल तर त्यांनाच विरोध करून काय साध्य होणार? संवाद साधण्याआधीच मी बरोबर आहे आणि तुला शहाणा करून सोडायला आलोय असा आवेश असेल तर वाद होईल, मनोरंजन होईल. बाकी शून्य.

मला एक समजलं नाही. फार पूर्वीच आस्तिकांचा पराभव झालेला असून नास्तिकांचा विजय झालेला आहे. असे असताना नास्तिकांची आस्तिकांविरूद्ध चळवळ करण्याची काय गरज आहे आणि निर्विवाद विजय झालेला असून सुद्धा वारंवार नास्तिकतेचा प्रचार का करावा लागतो?

बांधव म्हणजे ज्यांच्याशी आपला अनुबंध असतो ते. या देशांतील सर्वांची जात भारतीय आहे असे मी मानतो. त्यामुळे सर्व भारतीय, आबालवृद्ध स्त्री-पुरुष, तृतीयपंथी माझे ज्ञातिबांधव आहेत. शालेय पुस्तकातील शपथेत असेच अभिप्रेत आहे. सर्व सज्ञान व्यक्तींना हे ठाऊक असावे अशी अपेक्षा होती. बांधव म्हणजे केवळ भाऊ समजणे हे अज्ञानदर्शक आहे.

In reply to by यनावाला

बांधव म्हणजे केवळ भाऊ समजणे हे अज्ञानदर्शक आहे.
याच न्यायानं ईश्वर म्हणजे केवळ मेंदू कीडवणारा हे देखील फार ज्ञानदर्शक नाही.

In reply to by arunjoshi123

याच न्यायानं ईश्वर म्हणजे केवळ मेंदू कीडवणारा हे देखील फार ज्ञानदर्शक नाही.
सहमत, ईश्वर नावाचा चित्रपट ही आहे ( अनिल कपूरचा बहुतेक)

In reply to by पगला गजोधर

तुम्ही नास्तिकंय ना? तुमचे विचार लै कोते असणार. ईश्वराला मनुष्याचे मनोरंजनच करायलाच काय मनुष्याच्या बृहदांत्रातील एक हायड्रोजन सल्फाइड बनवणारा बॅक्टेरिया म्हणून देखील वास करायला (मंजे राहायला) तितक्याच निष्ठेने आवडत असते. प्रतिष्ठेचे रोल घ्यायची उंदीरस्पर्धा त्याच्याकडे नसते.

In reply to by यनावाला

यनावालाजी म्हणजे तुम्ही जे प्रतिज्ञे त आहे म्हणून हा माझा अधिकार आहे वगैरे म्हणतात त्याला काही हरकत नाहीये पण प्रतिज्ञा उद्या कोणा दुसर्‍या सरकारने एडिट केली , मूळात राष्ट्रवाद एक भंपक म्हणजे अमुक अमुक इतका भौगोलिक भाग, त्याला मी माझी श्रद्धा वाहतो, मग त्यामागुन परंपरांचा मी पाईक राहील हे सर्व शाळकरी चाइल्डीश च नाही का ? म्हणजे मी स्वतः प्रत्येक परंपरेचे क्रिटीकल इन्वेस्टीगेशन करेल विश्लेषण करेल कट एडिट करुन जे काय शेवटी उरेल ते स्वीकारेल हे अधिक वैज्ञानिक मार्गाने सत्यान्वेषी मार्गाने जाणे आहे यात अल्टीमेट ह्युमन फ्रिडम चा मुद्दा आहे भारत वा टिम्बकटु वा घाना देशाच्या कुठल्या सरकारच्या कोणीतरी लिहुन दिलेल्या प्रतिज्ञे प्रमाणे मी चालेल , कुठल्या तरी परंपरांचा ब्लाइंड फॉलोअर बनेल पाईक वगैरे होण्याचा प्रयत्न करेल यात काही अर्थ दिसत नाही. म्हणजे मुळ परंपरा किंवा एखादा विचार किते श्रेष्ठ कनिष्ठ आहे त्याची या वरील सर्व बाबींशी काहीही संबंध नाही की तो कोण्या गर्व्हमेंट ने स्वीकारलेला आहे. उदा. सौदी अरेबिया च्या सरकारने काही स्त्री संदर्भात परंपरा पाळलेल्या आहेत व एखादा सौदी माणुस असे समर्थने करेल ब्लाइंड तर ते जसे चुकीचे ठरेल तसे मुळात राष्ट्रवादही तुम्ही विदाउट क्रिटीकल इन्वेस्टीगेशन केल्याशिवाय स्वीकारणे .... असो

In reply to by मारवा

शाळेतील प्रतिज्ञेतील २-३ वाक्यात आपल्याला सोयिस्कर असे काहीतरी लिहिले आहे म्हणून मी नास्तिकतावादाचा प्रचार करतो ही अत्यंत बालिश भूमिका आहे. त्या प्रतिज्ञेत इतर अनेक गोष्टी आहेत. त्याकडे मात्र सोयिस्कर दुर्लक्ष केले आहे. कोणत्यातरी वृत्तपत्रात काहीतरी छापून आल्यावर, वृत्तपत्रात छापले गेले म्हणजे ते खरेच असले पाहिजे अशी बाळबोध भूमिका घेणे, शालेय जीवनातील प्रतिज्ञेचा संपूर्ण अर्थ समजून न घेता स्वतःला सोयिस्कर अशी १-२ वाक्ये उचलणे, जीवनात ९९.९९% प्रसंगात स्वतः अंधश्रद्ध असताना इतरांच्या श्रद्धेवर कोरडे ओढणे असल्या दांभिक भूमिकेमुळेच या तथाकथित नास्तिक/बुद्धीप्रामाण्यवादी/विज्ञानवादी मंडळींचे ढोंग कायमच उघडे पडत गेले आहे.

तेलगू सिनेमा स्वाती मुथ्यमचा रिमेक होता तो. कमल हसनच्या अभिनयासाठी तरी तो सिनेमा पहाच. आवडेल तुम्हाला.

धर्माच्या अतिरेकी बाजारावर नास्तिकतेचा तो़डगा, या अर्थाने नास्तिकता ही काळाची गरज आहेच. एकेकाळी मी भाविक होते. आता माझ्या विचारांचा प्रवास विचारी भाविकतेकडून नास्तिकतेकडे चाललेला आहे. या प्रवासातलं एक वळण म्हणून कुतूहलापोटी मी मुंबईतल्या नास्तिक परिषदेला गेले. प्रमुख वक्ते होते, अजित अभ्यकंर आणि राजीव साने. नास्तिकता ही स्वत:च्या कृत्याला स्वत: जबाबदार रहायला शिकवते. जगातला ’कोणताही’ धर्म संपूर्ण मानवजातीचा विचार न करता ठराविक म्हणजे धर्माच्या आज्ञा पाळणार्‍या (एकेश्वरवादी धर्मांनुसार) वा कर्मफलाने ईश्वरच्या जवळच्याचा विचार करतो, हे अजित अभ्यकंर यांच्या मांडणीचं सूत्र होतं. जैन आणि बुद्ध धर्म हे नास्तिकतावादी धर्म आहेत असं म्हटलं जातं. पण कर्मसिद्धांत हा या दोन्ही धर्मात मानला जात असल्याने ते धर्मही खर्‍या अर्थाने नास्तिकतेचा पुरस्कार करणारे आहेत अस म्हणता येणार नाहीत. धर्म ही अफूची गोळी आहे म्हणजे धर्म हे पेनकिलर आहेत. त्यामुळे धर्माचरणाने प्रश्न बोथट करण्यापेक्षा प्रश्नांना उत्तरं शोधण्याची गरज आहे आणि राहिल. राजीव साने यांनी नेहमीच्या पद्धतीने, चटकदार वाक्य, उदाहरणं यांची सरमिसळ करत काही मुद्दे मांडले. विषय होता, धार्मिकतेतून इहवादाकडे. यामध्ये त्यांनी भाविक आणि धर्मसत्ता यांच्या मध्ये फरक करणं आवश्यक असल्याचं सांगीतलं. भाविक हा धर्मसत्तेला बळकट करत असतो. त्याच्या मानसिक, सामाजिक गरजा राहतीलच तसे धर्म राहतील . मग मुख्य आवश्यकता आहे ती त्यांचं धर्मावरचं मानसिक अवलंबित्व कमी करण्याची. त्यासाठी मानसोपचार हा एक घटक आहे, त्यावर ते बोलले. एक त्यांनी मांडलेला मुद्द्दा, जो मला अतिशय आवडला तो म्हणजे मिथकांचं मिथ्यापण दाखवताना मिथकांना थेट नाकारण्यापेक्षा त्यांची मूल्यचिकित्सा करण्याचा. "निरपेक्ष आनंद, वासनारहित सौदर्य, सुकून(ब्लिस), धन्यवाद देण्याची गरज, सन्मार्गच घेतला याचा धन्यभाव, आश्चर्य-कौतुक, शुचिता-पावित्र्य, आदर-जोडलेपणा, साक्षीभाव मोकळेपणा, रितेपण नव्हे तर भरलेपण, म्यूच्युअलटीतून येणारी इंटिमसी, आत्ताच्या वास्तवाचा काच सोडून येणारी क्रियेटिव्हिटी याही गोष्टी हव्या आहेत. नैतिकता ही फक्त कर्तव्यांपर्यंत पोहोचते. पण कर्तव्यातीत सद्गुण म्हणजेच औदार्य, करुणा, मुदिता, क्षमा, अनसूया हे जोपासायला मनोवस्था आत्मीयतेची लागते. ती ठरवून आणता येत नसली तरी तिला येऊ देणे ‘लेट’ याकरता स्वागतशील असावे लागते. मानसोपचार हा फक्त विकारग्रस्तता घालवण्यापुरता पुरेसा नसून आंतरिक उन्नतीसाठी पुढे नेला पाहिजे.", हा त्यांचा मला आवडलेला अजून एक विचार. मिपावरील प्रा. य. ना वालावलकर यांना या परिषदेत चार्वाक २०१८ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवताना विद्यार्थ्यांच्या मनातले अनेक गैरसमज कळायला लागले त्यातून विवेकवादी विचार मांडण्याकडे ते वळले अ़सं त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगीतलं. यातूनच आपलं लिखाण सुरू झालं असलं तरी आपण म्हणावं असं काहिही कार्य केलं नसताना हा पुरस्कार बहुदा आपल्या वयाच्या जेष्ठत्वाकडे पाहून दिला असावा असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं. इथे कितीही राळ उडवली गेली तरी संयमाने आणि जिद्दीने ते आपले विचार मांडत राहतात. तिथेही त्यांचा नम्रपणा उठून दिसत होता. येत्या काळात जगातील नास्तिकांची संख्या वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दाभोळकरांच्या हत्त्येनंतर विचारांनी नास्तिक असलेल्यांना एकत्र येण्याची गरज भासू लागली. त्यातून हे मेळावे सुरू झाले. त्यामागे नास्तिक हा पंथ निर्माण करावा असा काहिही उद्देश नाही, असं या परिषदेच्या सदस्यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केलं होतंच. खरंतर नास्तिक हे एकांडे शिलेदार असतात. ते बरेचदा ज्या सडेतोडपणे विचार मांडतात त्यामुळे ते उद्धट वाटतात. म्हणून आपल्या विचारांना साथ मिळावी त्यातून विचार अधिक सुस्पष्ट होत जावेत असे उद्देश असे मेळावे/ परिषदा घेण्यामागे असतात. राजीव साने यांनी "धार्मिक बाबतीत मूल्यचिकित्सा आणि त्यातून इहवादाकडे वळवण्यासाठी नास्तिकांनी प्रयत्न करण्याची गरज" अधोरेखीत केली होती त्याबाबतही, अश्या तर्‍हेने कोणाची मतं बदलण्यासाठी प्रयत्न करणं हे माझ्या पद्धतीत बसत नसल्याचंही सहस्त्रबुद्धे या अजून एका संस्थापक सदस्यांनी आभारप्रदर्शनात सांगीतलं. भारतीय तत्वज्ञान आणि नऊ दर्शनं यांनी नास्तिकता आणि निरीश्वरवादाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे आस्तिकता नको म्हणताना ही दर्शने आणि तत्वज्ञान हे स्वाकारार्ह असल्याचही दोन्ही वक्त्यांनी सांगीतलं. धार्मिक जसे कंठशोष करून, कर्णे लावून आपापल्या दैवतांचे गुण ऐकायची, किंवा प्रार्थनेला चलण्याची (अजान) सक्ती करतात त्याप्रमाणे इथले कोणीही नास्तिकता लोकांच्या गळी उतरवण्यासाठी आसुसलेले नव्हते. अतिभाविकता तुमच्या अडचणी गालिच्याखाली सारत उत्तमतेचा आभास निर्माण करते, या गोष्टीला बहुसंख्य नास्तिकांचा विरोध असतो. भावनेवर आधारीत राजकारण करणारे, किंवा धार्मिकतेच्या बाजाराचा फायदा घेणारे यांचा भर धार्मिकता ही अतिभाविकतेकडे घेऊन जाण्यावर असतो. नास्तिकता ही कोणत्याच धर्माच्या विरोधात नाही. खरं तर नास्तिकांतले अर्धेजण तरी आपापल्या धर्माच्या अवडंबराला, (कोणताही) धर्म रस्त्यावर आणल्याने होत असलेल्या सक्तीच्या गैरसोईला कंटाळलेले असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर नास्तिक आपले नास्तैक्य आपल्या मनात बाळगतील. कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं. म्हणून नास्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा आस्तिकांनी आपापल्या धर्मातील अवडंबरं, धार्मिक विधी (किमान त्यात सहभागी नसणार्‍यांना तरी) कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हळव्या भावनांची आपणच वास्तववादी चिकित्सा केली तर अश्या मेळाव्यांची गरज उरणार नाही.

In reply to by अंतरा आनंद

धर्माच्या अतिरेकी बाजारावर नास्तिकतेचा तो़डगा, या अर्थाने नास्तिकता ही काळाची गरज आहेच. अजिबात गरज नाही. धर्माचा बाजार, धर्मात घुसडलेल्या वाईट गोष्टींचे उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी नास्तिकतेची अजिबात गरज नाही. धर्म ही अफूची गोळी आहे म्हणजे धर्म हे पेनकिलर आहेत. नास्तिकता ही तर हेरॉईनपेक्षाही जास्त अंमली आहे आणि ती पेनगिव्हर आहे. मग मुख्य आवश्यकता आहे ती त्यांचं धर्मावरचं मानसिक अवलंबित्व कमी करण्याची. त्यासाठी मानसोपचार हा एक घटक आहे, त्यावर ते बोलले. बापरे, म्हणजे राजीव सानेंच्या मते भाविक हे मनोरूग्ण आहेत तर. नास्तिकवाद्यांचा हाच उर्मटपणा डोक्यात जातो. मानसोपचारांची खरी गरज नास्तिकवाद्यांनाच आहे. इथे कितीही राळ उडवली गेली तरी संयमाने आणि जिद्दीने ते आपले विचार मांडत राहतात. हिट अ‍ॅण्ड रन असे अनेकांचे यशस्वी धोरण असते. खरंतर नास्तिक हे एकांडे शिलेदार असतात. ते बरेचदा ज्या सडेतोडपणे विचार मांडतात त्यामुळे ते उद्धट वाटतात. नास्तिक त्यांच्या सडेतोडपणामुळे उद्धट वाटत नसून त्यांच्या अहं ब्रह्मास्मि दंभामुळे व आस्तिकांना मूर्ख व तुच्छ लेखण्याच्या दर्पामुळे उद्धट वाटतात. खरं तर ते नुसते उद्धट वाटत नसून ते उद्धट आहेतच. नास्तिकांनी लिहिलेले कोणतेही लेख वाचा. बहुसंख्य लेखात आस्तिकांचा अंधश्रद्ध, मूर्ख, मेंदूला गंज चढलेले अशा शब्दात उपहास केलेला असतो. असा उपहास करणारे आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील ९९.९९% प्रसंगात अंधश्रद्ध असतात व त्याची त्यांना जराही खंत वाटत नाही. धार्मिक जसे कंठशोष करून, कर्णे लावून आपापल्या दैवतांचे गुण ऐकायची, किंवा प्रार्थनेला चलण्याची (अजान) सक्ती करतात त्याप्रमाणे इथले कोणीही नास्तिकता लोकांच्या गळी उतरवण्यासाठी आसुसलेले नव्हते. कमाल आहे. साधं मिपाचं उदाहरण घेतलं तर आस्तिकता/नास्तिकता या विषयावर किती आस्तिकांनी व किती नास्तिकांनी लेख पाडलेत याचा जरा शोध घ्या. नास्तिकतावादी सातत्याने लेख पाडत असतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी अंनिसचे फलक लावून नदीकाठावर गर्दी करणारे आस्तिक असतात का? जसे आस्तिक कर्णे वगैरे लावतात तसेच नास्तिकही वेगळ्या पद्धतीने आपले विचार इतरांच्या गळी उतरविण्यासाठी आसुसलेले असतात. अतिभाविकता तुमच्या अडचणी गालिच्याखाली सारत उत्तमतेचा आभास निर्माण करते, या गोष्टीला बहुसंख्य नास्तिकांचा विरोध असतो. भावनेवर आधारीत राजकारण करणारे, किंवा धार्मिकतेच्या बाजाराचा फायदा घेणारे यांचा भर धार्मिकता ही अतिभाविकतेकडे घेऊन जाण्यावर असतो. तुमच्या सर्व अडचणींसाठी आस्तिकताच कारणीभूत आहे व त्यावर नास्तिकता हाच एकमेव उपाय आहे असा आभास अतिनास्तिकता निर्माण करते. नास्तिकता ही कोणत्याच धर्माच्या विरोधात नाही. LLRC खरं तर नास्तिकांतले अर्धेजण तरी आपापल्या धर्माच्या अवडंबराला, (कोणताही) धर्म रस्त्यावर आणल्याने होत असलेल्या सक्तीच्या गैरसोईला कंटाळलेले असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर नास्तिक आपले नास्तैक्य आपल्या मनात बाळगतील. रस्त्यावर धर्म आणण्यावर बंदी आणण्यासाठी धर्मावरच बंदी आणणे म्हणजे डोक्यात उवा झाल्यावर मुंडके उडविण्यासारखे आहे. कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं. तसं असेल तर तुम्ही तुमची नास्तिकता पाळा आणि आस्तिकांना त्यांची आस्तिकता पाळू दे. सातत्याने लेख पाडून नास्तिकतेचा प्रचार आणि आस्तिकतेवर आघात कशासाठी? म्हणून नास्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा आस्तिकांनी आपापल्या धर्मातील अवडंबरं, धार्मिक विधी (किमान त्यात सहभागी नसणार्‍यांना तरी) कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हळव्या भावनांची आपणच वास्तववादी चिकित्सा केली तर अश्या मेळाव्यांची गरज उरणार नाही. आस्तिकांवर झोड उठविण्याऐवजी नास्तिकांनी स्वयंचिकित्सा करून आपला अहंभाव, दांभिकता व वैचारिक ढोंग बंद केले तर नास्तिकांना उत्तर देण्याची आस्तिकांना गरजच पडणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

वाहह गुरुजी आवडला मुद्देसूद प्रतिसाद. नास्तिकता हा शुद्ध कांगावा वाटावा इतका केविलवाणा झालाय. त्याने नास्तिकांचा त्रागा अधिक वाढलाय.

In reply to by श्रीगुरुजी

अजिबात गरज नाही. धर्माचा बाजार, धर्मात घुसडलेल्या वाईट गोष्टींचे उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी नास्तिकतेची अजिबात गरज नाही.>>> ==>> हे उच्चाटन कसे करणार? बघा आमच्याकडे लग्न झाल्यावर सोळाव्याची पूजा झाल्यानंतर जागरण गोंधळ करावे लगते. काहींचे गॉड असते काहींचे तिखट. आता आमचे कुटुंब जवळपास माळकरी पण आमच्या परंपपरेनुसार जागरण तिखट लागते. मानतेनुसार गॉड केले तर कुलदेवतेला रुजू होत नाही. गुरुजींनी (काका) सांगितले की काही नाही कणकेचा बोकड मंत्रउपचार करून बळी दिला तर चालू शकतो. पण देव आहे (सगुण-निर्गुण म्हणा) या संकल्पनेमुळे मन (आणि सगे सोयरे) मानायला तयार नसते ना. अशा वेळेस काय करावे? ======= नास्तिकता ही तर हेरॉईनपेक्षाही जास्त अंमली आहे आणि ती पेनगिव्हर आहे.>>> ==>> पेनगिव्हर पेक्षा भीतीदायक आहे असे वाटते. ========= भाविक हे मनोरूग्ण आहेत तर. नास्तिकवाद्यांचा हाच उर्मटपणा डोक्यात जातो. मानसोपचारांची खरी गरज नास्तिकवाद्यांनाच आहे.>>> ==>> भाविक मनोरुग्ण नसले तरी नास्तिकांपेक्षा पोससेसिव्ह असतात. तुम्ही माझ्या मते शहरात राहता म्हणून सहसा कोणी आस्तिक दुसर्यांना उपदेश करायला जात नाही पण गावाकडे माळकरी झालेले बिगरमाळकरीला इतके उपदेश देत असतात की तो पकुण जातो. माळकरी लोकांना विशेष सन्मान/आदर/विश्वास असतो, भले ते अस्सल जीवनात कसे ही वागोत. कोणी कीर्तनकार जेव्हा बिगर माळकरी सगळे बावळट अशी अवहेलना करतो तेव्हा ते सुद्धा खूप डोक्यात जातात. बाकी सासू सुनेच्या कथा एकदमच मणघडत आणि सुरस असतात. आता यात कीर्तनकारांचा दोष असे जरी म्हंटले तरी वरून खाली त्यांच्या पर्यंत तेच झिरपले असते. लोक कीर्तनकारांना धर्माचे एक पाईक आणि प्रचारक म्हणून विश्वास ठेवत असतात. इतर बाबा बुवा आचार्य, काका गुरुजी हे देखील कमी अधिक प्रमाणात हेच सांगत असतात. याला कंट्रोल कोण करणार? ======== नास्तिक त्यांच्या सडेतोडपणामुळे उद्धट वाटत नसून त्यांच्या अहं ब्रह्मास्मि दंभामुळे व आस्तिकांना मूर्ख व तुच्छ लेखण्याच्या दर्पामुळे उद्धट वाटतात. खरं तर ते नुसते उद्धट वाटत नसून ते उद्धट आहेतच. नास्तिकांनी लिहिलेले कोणतेही लेख वाचा. बहुसंख्य लेखात आस्तिकांचा अंधश्रद्ध, मूर्ख, मेंदूला गंज चढलेले अशा शब्दात उपहास केलेला असतो. असा उपहास करणारे आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील ९९.९९% प्रसंगात अंधश्रद्ध असतात व त्याची त्यांना जराही खंत वाटत नाही.>>> ==>> माझ्या पाहण्यात ही सर्व लक्षणे आस्तिक लोकांत जास्त प्रमाणात आढळतात. ======= तुमच्या सर्व अडचणींसाठी आस्तिकताच कारणीभूत आहे व त्यावर नास्तिकता हाच एकमेव उपाय आहे असा आभास अतिनास्तिकता निर्माण करते.>> ==>> माझ्या मते "तुमच्या सर्व अडचणींसाठी नास्तिकताच कारणीभूत आहे व त्यावर आस्तिकता हाच एकमेव उपाय आहे असा आभास अतिआसस्तिकता निर्माण करते. घरात, देवळात, समाज्यात, प्रवचन कीर्तनात हेच ऐकायला मिळते आहे. ====== रस्त्यावर धर्म आणण्यावर बंदी आणण्यासाठी धर्मावरच बंदी आणणे म्हणजे डोक्यात उवा झाल्यावर मुंडके उडविण्यासारखे आहे.>>> ==>> मी जर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून पाहिले तरी मला फक्त एकच प्रश्न पडतो "मी कोण आहे". जाती धर्म वगैरे मग सगळे गौण वाटायला लागते. या प्रश्नाचे कोणाला उत्तर विचारायला जावे तरी जवळपास सगळेच धार्मिक ग्रंथातील दाखले देऊन थातुरमाथुर उत्तरे देताना दिसतात. मला वाटते सामन्याला परवडेल असे जिथे खरे अध्यात्म शिकवले जाईल असे अभ्यास वर्ग असले पाहिजेत मग. तुमच्या माहितीत असेल तर कृपया सुचवा. घरदार सोडायला लावू नका फक्त. ===== तसं असेल तर तुम्ही तुमची नास्तिकता पाळा आणि आस्तिकांना त्यांची आस्तिकता पाळू दे. सातत्याने लेख पाडून नास्तिकतेचा प्रचार आणि आस्तिकतेवर आघात कशासाठी?>>> ==>> अस्तिकतेचा प्रचार करण्यासाठी गावोगावी सप्ताहाचे अवडंबर माजले आहे. सनातन, हरे कृष्णा वाले लोक वेगवेगळ्या यात्रा जत्रेत त्यांचे पोस्टर/पुस्तक घेऊन उभे असतात. दत्त स्थान असणारे पौर्णिमेला वाऱ्या घालायला फरक पडतोय असा प्रचार करत असतात. नास्तिकते वाले आताशी कुठे शहरातील कुठल्या कोपऱ्यात वर्षातून एखाद दुसरा संमेलन करताना आढळतात. त्यात त्यांना पुरस्कार वगैरे देण्यासाठी तुम्हा आम्हा आस्तिक लोकांच्या मतानुसार योग्य पैलवान सुद्धा मिळत नाही. मला वाटते आस्तिक लोकांकडे वैचारिक quality आणि quantity असताना घाबरायचे काही कारण नसावे. ===== आस्तिकांवर झोड उठविण्याऐवजी नास्तिकांनी स्वयंचिकित्सा करून आपला अहंभाव, दांभिकता व वैचारिक ढोंग बंद केले तर नास्तिकांना उत्तर देण्याची आस्तिकांना गरजच पडणार नाही.>>> ==>> vice versa पण हवे होते. असो...

In reply to by विशुमित

माझ्या पाहण्यात ही सर्व लक्षणे आस्तिक लोकांत जास्त प्रमाणात आढळतात.
इथे तुमच्या म्हणण्याची किंवा विचारांची फिकीर आहे कोणाला ? आम्ही जरी विष गरळ युक्त शब्द वापरले तरी ते तुम्ही अमृतासमान वाटून घ्यायला हवेत. ही गल्ली आमच्या पिताश्रीनी आम्हाला लग्नात आंदण म्हणून दिल्याने, या गल्लीत आम्ही म्हणू तीच पूर्व. तुम्हास नाही अर्थच कैसा ? आम्ही लावू अर्थ तैसा ।। शारीरिक वय नका विचारू .. बाळलीला आमच्या पूज्य जैसा --- स्त्रीमर्जी आणि हो आमची नवी स्वाक्षरी करतो ट्रोल अलर्ट

In reply to by विशुमित

हे उच्चाटन कसे करणार? बघा आमच्याकडे लग्न झाल्यावर सोळाव्याची पूजा झाल्यानंतर जागरण गोंधळ करावे लगते. काहींचे गॉड असते काहींचे तिखट. आता आमचे कुटुंब जवळपास माळकरी पण आमच्या परंपपरेनुसार जागरण तिखट लागते. मानतेनुसार गॉड केले तर कुलदेवतेला रुजू होत नाही. गुरुजींनी (काका) सांगितले की काही नाही कणकेचा बोकड मंत्रउपचार करून बळी दिला तर चालू शकतो. पण देव आहे (सगुण-निर्गुण म्हणा) या संकल्पनेमुळे मन (आणि सगे सोयरे) मानायला तयार नसते ना. अशा वेळेस काय करावे? कोणत्या तरी पिढीतून कोणी तरी सुरूवात करावी लागते. त्याशिवाय उच्चाटन होऊ शकणार नाही. भाविक मनोरुग्ण नसले तरी नास्तिकांपेक्षा पोससेसिव्ह असतात. तुम्ही माझ्या मते शहरात राहता म्हणून सहसा कोणी आस्तिक दुसर्यांना उपदेश करायला जात नाही पण गावाकडे माळकरी झालेले बिगरमाळकरीला इतके उपदेश देत असतात की तो पकुण जातो. माळकरी लोकांना विशेष सन्मान/आदर/विश्वास असतो, भले ते अस्सल जीवनात कसे ही वागोत. कोणी कीर्तनकार जेव्हा बिगर माळकरी सगळे बावळट अशी अवहेलना करतो तेव्हा ते सुद्धा खूप डोक्यात जातात. बाकी सासू सुनेच्या कथा एकदमच मणघडत आणि सुरस असतात. आता यात कीर्तनकारांचा दोष असे जरी म्हंटले तरी वरून खाली त्यांच्या पर्यंत तेच झिरपले असते. लोक कीर्तनकारांना धर्माचे एक पाईक आणि प्रचारक म्हणून विश्वास ठेवत असतात. इतर बाबा बुवा आचार्य, काका गुरुजी हे देखील कमी अधिक प्रमाणात हेच सांगत असतात. याला कंट्रोल कोण करणार? गावाकडे तसेही दुसर्‍यांच्या वैयक्तिक जीवनात लक्ष घालणारे बरेच जण आढळतात. शहरात याचे प्रमाण कमी आहे. शहरात बर्‍याच ठिकाणी शेजारी काय करतात यात फारसे कोणी लक्ष घालत नाही. गावाकडे मात्र चौकशा खूप असतात. या मानसिकतेतूनच माळकर्‍यांचे उपदेश होत असावेत. माझ्या पाहण्यात ही सर्व लक्षणे आस्तिक लोकांत जास्त प्रमाणात आढळतात. माझ्या पाहण्यात अशी उदाहरणे नाहीत. नास्तिकांनाच आपल्या नास्तिकतेचा उदोउदो करायचा असतो. त्यामुळेच नास्तिकता परीषद, पुरस्कार, नास्तिकतेवर परीसंवाद, माध्यमातून लेख पाडणे असले प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतात. अगदी मिपाचंच उदाहरण घेतलं तर इथे नास्तिकतेचा उदोउदो करणारे, श्रद्धावानांवर कोरडे ओढणारे किती लेख आहेत आणि आस्तिकता, आध्यात्मिकता इ. चा उदोउदो करणारे किती लेख आहेत याचे प्रमाण पाहिले तर याचे प्रत्यंतर येईल. माझ्या मते "तुमच्या सर्व अडचणींसाठी नास्तिकताच कारणीभूत आहे व त्यावर आस्तिकता हाच एकमेव उपाय आहे असा आभास अतिआसस्तिकता निर्माण करते. घरात, देवळात, समाज्यात, प्रवचन कीर्तनात हेच ऐकायला मिळते आहे. सर्व अडचणींसाठी नास्तिकताच कारणीभूत आहे व आस्तिकता हाच सर्व अडचणींवर उपाय आहे असे सांगणारे चुकीचे सांगत आहेत. मला वाटते सामन्याला परवडेल असे जिथे खरे अध्यात्म शिकवले जाईल असे अभ्यास वर्ग असले पाहिजेत मग. तुमच्या माहितीत असेल तर कृपया सुचवा. घरदार सोडायला लावू नका फक्त. असे वर्ग कोठे चालतात याची मला कल्पना नाही. अस्तिकतेचा प्रचार करण्यासाठी गावोगावी सप्ताहाचे अवडंबर माजले आहे. सनातन, हरे कृष्णा वाले लोक वेगवेगळ्या यात्रा जत्रेत त्यांचे पोस्टर/पुस्तक घेऊन उभे असतात. दत्त स्थान असणारे पौर्णिमेला वाऱ्या घालायला फरक पडतोय असा प्रचार करत असतात. नास्तिकते वाले आताशी कुठे शहरातील कुठल्या कोपऱ्यात वर्षातून एखाद दुसरा संमेलन करताना आढळतात. त्यात त्यांना पुरस्कार वगैरे देण्यासाठी तुम्हा आम्हा आस्तिक लोकांच्या मतानुसार योग्य पैलवान सुद्धा मिळत नाही. मला वाटते आस्तिक लोकांकडे वैचारिक quality आणि quantity असताना घाबरायचे काही कारण नसावे. सप्ताह, उत्सव, काकडआरती, वारी इ. गोष्टी अनेक शतकांपासून सुरू आहेत. सनातन, हरे कृष्णावाले इ. तिथे जमलेल्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी येतात. ज्याप्रमाणे जत्रेच्या ठिकाणी अनेक तात्पुरती दुकाने लागतात, तसेच हे सुद्धा तिथे आपली पुस्तके वगैरे खपविण्यासाठी येतात. vice versa पण हवे होते. असो... निश्चितच

In reply to by श्रीगुरुजी

मला वाटते सामन्याला परवडेल असे जिथे खरे अध्यात्म शिकवले जाईल असे अभ्यास वर्ग असले पाहिजेत मग. तुमच्या माहितीत असेल तर कृपया सुचवा. घरदार सोडायला लावू नका फक्त.
जीवनविद्या मिशन असे क्लासेस घेते. पुस्तके पण चांगली आहेत. मी कधी क्लासला गेलो नाही. पण सगळी पुस्तके वाचून झाली. अंदाजे ३० असावीत. अध्यात्म शिकायचे म्हणजे नक्की काय करायचे याचा पाया खूप चांगला तयार होतो. पुस्तकांना आणखीन एक पर्याय आहे. त्यांचा २६ व्हीडिओंचाही एक संच आहे. एक तासाचा एक याप्रमाणे फक्त २६ तासात जवळजवळ सर्व पुस्तकांचा सारांश आपल्याला कळून याचा अभ्यास आणखीन करायचा की नाही वगैरे निर्णय आपण घेऊ शकतो. मात्र मी या मिशनशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसल्याने जास्त माहिती साठी प्रत्यक्ष संपर्क करणेच योग्य होईल. फक्त मी जे केले त्या अनुभवाच्या आधारावर वरील सुचवणी करत आहे.

In reply to by शाम भागवत

हे ते वामनराव पै बी.ए. ( ही पदवी इतक्या कौतुकाने लावलेली फार क्वचितच पाहायला मिळते आणी ती श्री श्री या प्रीफ्रिक्स सारख बी.ए. हे सफीक्स गमतीदार आहे. ) आणी त्यांची पंचलाइन पण भारीये " तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " गुरुजी सरकारी नोकरीत होते अशी जुजबी माहीती आहे. त्यांच्या व्याख्यानात एक गमतीचा भाग असा होता की जीवनवीद्या असे म्हणते जीवनवीद्या तसे म्हणते म्हणजे लेखन निर्मिती सर्व यांचीच पण मी म्हणतो ऐवजी जीवनविद्या काय म्हणते बघा अशी शैली छान आहे

In reply to by विशुमित

प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आवडला. आस्तिक लोक (येथे देवधर्म- कर्मकांड मानणारे इतकाच सीमित अर्थ आहे) इतरांवर देव मानण्याची आणि कर्मकांडाची सक्ती करीत असतात. धाक दाखवत असतात. अमुक कुलाचार केला नाही म्हणून अमुक वाईट गोष्ट घडली असे टुमणे लावून ब्कॅकमेल करत असतात. एक गरोदर मोलकरीण सांगत होती की तिच्या सासूने मंगळवारी गणपतीची उपासना आणि उपास करायला सांगितले. मुलगा होण्यासाठी! सामान्य जनांत अंधश्रद्धा आणि आस्तिकता हातात हात घालून वावरतात. अलीकडे अनेक प्रकारची कर्मकांडे, उपासतापास , पदयात्रा यांचे महत्त्व वाढवले गेले आहे. सतत पालख्या, पदयात्रा निघत असतात. शंभर रुपयात शिर्डीला जेवणचहापाण्यासकट नेऊन आणणारी अनेक मंडळे निघाली आहेत. एका वेळेस वीसबावीस बसेसचा तांडा निघतो. अनेकदा अपघात होतात. लोकांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा राजमार्ग झाला आहे. सणउत्सवांचे बाजारीकरण आणि राजकारण होते आहे. या सर्वात वेद, धर्मशास्त्रे, दर्शने, उपनिषदे यांचे काहीच काम नसते. या ग्रंथांत काहीही सांगितलेले असो किवा नसो, सर्वसामान्यांशी त्याचा संबंध नसतो. हे जे त्यांचे आचरण आहे, तोच खरा धर्म अथवा आराधना अशी त्यांची पक्की समजूत असते. ओळखीतले एक कुटुंब आहे. मुलगा प्राथमिक स्थितीतला जडबुद्धी (कमी बुद्ध्यांक असलेला) आहे. त्यांनी एका सुप्रसिद्ध बापूंकडे त्याला सेवेस लावले. त्याला काम मिळाले. कोणते तर येणाऱ्या शेकडो भक्तांची पादत्राणे सांभाळण्याचें. त्या मुलाला मंदमतींच्या खास शाळेत घालावे असे सांगून झाले होते. पण अनेक व्रतेवैकल्ये, दर पंधरवड्याला सत्यनारायणपूजा यातच ते कुटुंब गुंतून राहिले. असो. अशी अनेक उदाहरणे प्रत्यही अनेकांना दिसत असतील. आस्तिकता आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा अगदी पुसट असते. या बाबतीत समाजप्रबोधन व्हायला हवे असे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by राही

थोडक्यात काय आस्तिक आईबापांच्या पोटी जन्माला आलेल्या मतिमंदांच्या शाळेत जाणाऱ्या जडबुद्दी मुलांची संख्या शून्य आहे. ------------------------------------------ थोडक्यात काय अंधश्रद्धा आणि आस्तिकता यातील अगदी पुसटशी सीमारेषा हि फक्त नास्तिकांना दिसते. ------------------------------------------ असो.

In reply to by राही

हे जे त्यांचे आचरण आहे, तोच खरा धर्म अथवा आराधना अशी त्यांची पक्की समजूत असते. ओळखीतले एक कुटुंब आहे. मुलगा प्राथमिक स्थितीतला जडबुद्धी (कमी बुद्ध्यांक असलेला) आहे. त्यांनी एका सुप्रसिद्ध बापूंकडे त्याला सेवेस लावले. त्याला काम मिळाले. कोणते तर येणाऱ्या शेकडो भक्तांची पादत्राणे सांभाळण्याचें. तुमच्या दिलेल्या उदाहरणातील मुलगा बिचारा मंदबुद्धी आहे. त्याचा विषय एकवेळ बाजुला ठेवा. हे पादत्राणे सांभाळण्याच काम जे आश्रमांमध्ये दिल जात. घेतल जात हा सर्वच प्रकार फारच रोचक आहे. त्याच्या काही शेड्स अशा असतात १- बघा बघा आमच्या आश्रमात तो इतका मोठा माणुस इतका श्रीमंत इतका ग्रेट पण इथे त्याला काय काम दिलय बघा तर देनेवालेके बाजुसे आम्ही त्याल्ल तुमच्या मटेरीयलीझम ला तुमच्या अचीव्हर ला किती वाकवला हा दृष्टीकोण आमच्या कडे अहंकार ठेचुन मिळतो. आमच्याकडे अहंकार वितळवुन देण्याची १००$ गॅरंटी २- दुसरीकडुन घेणारा डबल मॅसोचिस्टीकली ( नम्रतेतला टोकाचा अहंकार ज्या नम्रतेपेक्षा अहंकार परवडला ) ते तेज चेहर्‍यावर ठेवुन जोडे सांभाळतांना दिसतो. त्यातही हा "सीन" च असतो तो केवळ ठराविक वेळेसाठीच असतो. त्यात त्यांचा " बघा लेको मी किती नम्र आहे क्या तुमने देखी ऐसी नम्रता " असे वाजवुन ठणकावुन दाखवुन देतो. ३ - या नुसत्या दोन्ही बाजुनी विन विन सिच्युएशन नाहीत थर्ड डायमेन्शन ने आउटसायडर्स आकर्षित होतच असतात. नही साला नेने नही कही पर यहीपेच जस्टीस मिलेगा रे बाबा देख सब गधे घोडे बराबर है बापु के दरबार मे बाहेरच्या जगातला अन्याय बाहेरचा ताप सर्व सर्व झटक्यात संपुन एक न्यायशीर कम्युन ची तुरंत स्थापना ज्यात काही काळ तुम्ही गुंगत गुंगीत फिरा मग तुम्ही रीचार्ज झाल्यावर " जा आता पुन्हा "बाहेर" जगुन ये बेटा/ ४ आश्रमांमध्ये टाइम सेन्स जबरदस्त असतो. आश्रम आश्रम अध्यात्म अध्यात्म खेळत असलेल्या सर्व रंगकर्मींचे "बाहेर च्या " जगाचे भान जबरा असते. विकएन्ड ला ड्रेस चेंज , खाना चेंज , रुटिन चेंज मात्र बाहेरच्या लाइफ ला "जपुन " च बर का. मग पुन्हा नॉर्मल पुन्हा वीकएकंड होत काय की गुंगीत मजेत जगत लाइफ पास होउन जाते. मध्येच कधी तरी हे सर्व चुकवत चुकवत राहेले तरी क्रुर जींदगी एखाद्या बेसावध क्षणी आपला क्रुर चेहरा दाखवुन विकट हास्य करतेच तेव्हा त्या क्षणाला एक संधी असते भ्रमाचा त्याग करण्याची पण म्हणतात ना माय है भइ माया महाठगिनी ४-

In reply to by मारवा

आपण म्हणता तशी खरोखरच ' विन विन' सिट्युएशन असते. मी वर दिलेल्या low I.Q.वाल्या मुलाच्या बाबतीत जोडे सांभाळण्यासाठी त्याला प्रत्येक चप्पलजोडामागे एक रुपया आकारण्याची परवानगी दिली गेली होती आणि काही दिवस प्रत्येक प्रवचनात त्याची बख्खळ कमाई झाली. आईवडील खूश. त्या जोरावर त्याचे लग्नही करून दिले गेले. नंतर प्रवचनेही कमी झाली आणि गर्दीही. बायकोनेही घटस्फोट मागितला. आस्तिकता आणि गुरू- बाबा वरील श्रद्धा कोणत्या थराला जाऊ शकते हे दाखवण्यासाठीच एव्हढे तपशीलवार लिहिले.

In reply to by राही

आस्तिकता आणि गुरू- बाबा वरील श्रद्धा कोणत्या थराला जाऊ शकते हे दाखवण्यासाठीच एव्हढे तपशीलवार लिहिले.
कोणतीही गोष्ट कोणत्याही स्तराला जाऊ शकते. अशा प्रत्येक प्रकारच्या अतिरेकाची अनेक उदाहरणे देता येतात.

In reply to by राही

अगदी सहमत आहे. समाजप्रबोधन हा लांवचा पण परिणामकारक मार्ग आहे. पण तो क्रांतीकारी म्हणून नव्हे तर उत्क्रांती कारी म्हणून वापरला गेला पाहिजे. माझ्यामते श्रद्धा व अंधश्रद्धा यात काही फरक नाही. यनावालांच्याच भाषेत सांगायच झाल तर एक दोन अक्षरी व दुसरा चार अक्षरी शब्द आहे एवढाच फरक. अंधश्रद्धांची प्रतवारी व वर्गवारी केली पाहिजे. आमचे मित्र राजीव साने म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलन या शब्दापेक्षा अंधश्रद्धा निवारण हा शब्द योग्य आहे. निर्मूलन हे समूळ उच्चाटन असते. अंधश्रद्धा या केवळ अगतिकता अज्ञान संस्कार यातून येत नाही. ती तर कारणे आहेतच पण त्या टिकून राहण्यामागे जैविक कारण देखील आहे हे विसरता कामा नये. अनेक वेळा देत असलेला दुवा पुन्हा एकदा देतो. मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्य पुस्तकातील अंधश्रद्ध व मेंदुविज्ञान हे प्रकरण

In reply to by अंतरा आनंद

लोल ! आता मात्र मजा यायला लागली ह्या धाग्यावर =)))) ह्या लोकांना खरेच स्वतःचा मुद्दा नक्की काय आहे हे स्वतःला तरी ठावुक आहे की नाही देव जाणे . एक जण म्हणतोय की नास्तिकस्ता म्हणजे देव नाकारणे , एक म्हणातोय देव नाकारा पण तत्त्वज्ञान स्विकारा , एक म्हणतोय की नास्तिकता धर्माविरुध्द नाही ! काय चेष्टा लावलीये ....लोल !!
नास्तिकता ही कोणत्याच धर्माच्या विरोधात नाही. खरं तर नास्तिकांतले अर्धेजण तरी आपापल्या धर्माच्या अवडंबराला, (कोणताही) धर्म रस्त्यावर आणल्याने होत असलेल्या सक्तीच्या गैरसोईला कंटाळलेले असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर नास्तिक आपले नास्तैक्य आपल्या मनात बाळगतील. कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं. म्हणून नास्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा आस्तिकांनी आपापल्या धर्मातील अवडंबरं, धार्मिक विधी (किमान त्यात सहभागी नसणार्‍यांना तरी) कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हळव्या भावनांची आपणच वास्तववादी चिकित्सा केली तर अश्या मेळाव्यांची गरज उरणार नाही.
हा पॅरा म्हणाजे स्वमतांधतेचे क्लासिक उदाहरण आहे , ह्यात थोडेसे बदल करुन लिहिलेला खालील पॅरा वाचा =)))) आस्तिकता ही कोणत्याच विचारसरणीच्या विरोधात नाही. खरं तर आस्तिकांतले जवळपास सर्वच्यासर्व जण आपापल्या धर्माच्या श्रध्देच्या उपासनेच्या आनंदात मग्न असतात , पण नास्तिक लोक उगाचच जिथेतिथे माझीच लाल , अन बाकीचे अज्ञानमुलक असमंजस अन मीच काय तो शहाणा असे अवडंबर माजवत असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर आस्तिक आपले आस्तैक्य आपल्या मनात बाळगतील अन संविधानिक मर्यादेत स्वतःचे धर्मस्वातंत्र्य उपभोगतील. एकदा नास्तिकांचे फुटकळ लेख मिपावर यायचे बन्द झाल्यावर कोण आस्तिक कशाला अन कुठे प्रतिसाद द्यायला येईल. कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं. म्हणून आस्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा नास्तिकांनी आपापल्या तील किडे सोशलमिडीवर सोडायचे बंदकरुन आस्तिकांना डिवचण्याचे प्रकास कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हुच्च सर्वज्ञ स्वमतांधतेचे लाल रंगाचे डबे स्वतःपुरते मर्यादित ठेवले कि अश्या काथ्याकुटांची गरज उरणार नाही. !!! मी आधीच म्हणल्याप्रमाणे कोणत्याच आस्तिकाने अमुक व्रत करा अन तमुक पुजा करा असले लेख मिपावर पाडल्याचे कैकवर्षात दिसले नाहीये , (फार पुर्वी कोणेतरी कोकिळाव्रत म्हणुन काहीतरी लिहिले होते त्याची पार कोकिळा करण्यात आली होती त्या धाग्यावर =))) , उलट नास्तिक लोकच अर्धवट वाचनातुन बनवलेल्या अर्धवट ज्ञानावरुन खुस्पट काढणारे अन वातावरण गढुळ करणारे लेख सतत अन वारंवार पाडत आहे ! वरुन पुरोगामित्वाचे लाल डबे फ्री फ्री फ्री !! नास्तिकलोकांमध्ये " मीच एक शहाणा , मीच म्हणतो ते खरे , ते न मानणारे काफीर" ही असली अब्राहमिक वृत्ती आली आहे जी की संपुर्ण कलहाचे कारण आहे ! तीच फक्त "इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न |यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥७॥" अशी अर्थात स्वतःच्या ज्ञानालाही scope for doubt and improvement झाली तर हा कलह थांबेल असा आमचा एक अंदाज आहे !! =================================== ए बारक्या , एक प्लेट सेव फरसाण अन पाव जोडी घे रे !!