Skip to main content

तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 19/01/2018 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच दिवस हा धागा काढायचा होताच, पण यनावालांच्या धाग्यावर उठणारी राळ बघून प्रकर्षाने काढावासा वाटला.. तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय? माझ्या दृष्टीने श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट अजून सिद्ध व्हायची आहे, पण तरीही मला वाटते की ते अस्तित्वात आहे, मी एक उदाहरण देतो... डार्विन ने एक सिद्धांत मांडला, त्याचे नाव उत्क्रांतीवाद.. तो बराच काळ असिद्ध होता.. पण तर्काच्या पातळीवर लोकांना पटत होता, त्यामुळे लोक त्यावर श्रद्धा ठेवत होते. काही लोक ही अंधश्रद्धा आहे म्हणून त्यांची हेटाळणी करत होते.. त्यातील काही श्रद्धावान लोकांनी त्या हायपोथीसिस वरून काही प्रयोग केले, आणि अनुभव घेतला, त्यावरून त्यांना ही खात्री झाली की हा हायपोथॅसिस खरा आहे, त्यानंतर निर्माण झाला तो विश्वास.. आईनस्टाईन बोललोय म्हणजे खरेच असणार ही श्रद्धा, आणि प्रयोगाअंती बसलेला तो विश्वास.. अध्यात्मात पण साधारण असेच आहे.. तुम्ही अगोदर श्रद्धा ठेवता, मग प्रयोग करून, प्रयत्न करून अनुभव घेता, आणि मग तुम्ही हळूहळू विश्वास आणि निष्ठा या पायऱ्या चढत जाता. दुर्दैवाने हा अत्यंत वैयक्तिक विषय असल्यामुळे त्याच्या प्रत्ययाची हमी देणे शक्य आहे पण आणि नाही पण, त्यामुळे हा सगळा वाद होतो. व्यावहारिक जीवनात पण तसेच, पण सर्वसामान्यपणे श्रद्धा ही बेसिक चिकित्सा करून ठेवली जाते, जेव्हा बेसिक चिकित्सा पण केली जात नाही तेव्हा ती होते अंधश्रद्धा .. उदाहरणार्थ - माझ्याकडे एक माणूस येतो, तू मला 10लाख दे, मीएक वर्षात 20 लाख करून देतो असे सांगतो आणि मी विश्वास ठेवतो, याला म्हणावे अंधश्रद्धा. अध्यात्मातील अंधश्रद्धामबद्दल बरेच बोलले गेले आहे, त्यामुळे परत बोलत नाही तुम्हाला काय वाटते?

वाचने 56988
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

In reply to by arunjoshi123

३. यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास चर्चनेच स्पाँसर केला होता.
तुम्हाला गेलिलिओचा इतिहास माहिती नाही असे दिसते. :)

In reply to by सतिश गावडे

गावडे सायेब, माझी लिहायची पद्धत सट्टेबाजाची असली तरी मी सत्य तेच्च लिहित असतो. गॅलिलिओला चर्चने दोन्ही प्रकारच्या सूर्याच्या, ग्रहाच्या भ्रमणाची मॉडेल्स अभ्यास करायला सांगीतलेली. दारू पिऊन असंसंबद्ध बोलणार्‍या लोकांप्रमाणे गॅलिलिओ चर्चला "अकारण" शिव्या घातल नव्हता तोपावेतो चर्चला त्याचे खूप मोठे कौतुक होते. हा मेला काहीही सिद्ध न करता फुकट बरळत होता म्हणून त्याला चर्चने शिक्षा केली. ================== संशोधन चूक निघालं तर शिक्षा करू नये हा त्याकाळचा नियम चूक होता हे मान्य, पण फुकट पोपला शिव्याही देऊ नयेत ना? ======================= हा बाबा काहीही सिद्ध न करता मेला आणि एका अर्थानं त्याला दिलेली शिक्षा योग्य होती.

In reply to by मारवा

मुळात धार्मिक सत्ये जी मांडली जातात ती कोणत्या मार्गाने जाऊन सिध्द केलेली असतात ?
पृथ्वी स्थिर आहे हे एक धार्मिक सत्य आहे हा एक वैज्ञानिक जोक आहे. ================ बाय द वे, बायबलच्या वेळी ज्या काही शास्त्रीय मान्यता होत्या त्या तशाच तशा बायबलमधे आहेत. जिजसपूर्वी ३००-४०० वर्षे टोलेमी नावाचे शास्त्रज्ञ तसं म्हणून गेलेले नि तेच तिकडे प्रचलित विचार बायबलमधे आहे. बायबल हे खगोलशास्त्रावरील पुस्तक नव्हे. --------------------- या उपर चर्च नेहमीच खगोलशास्त्राचा अभ्यास करत आलेले आहे. गॅलिलिओअचे हेलिओसेंट्रिक मॉडेल (सूर्य केंद्रात आहे) स्वीकारायला चर्च तयार होते. पण गॅलिलिओअकडे त्याचा कोणताही पुरावा नव्हता. लक्षात घ्या कि गॅलिलिओला शिक्षा व्हायचा काळ हा शास्त्रीय दृश्ट्या हेलिओसेंट्रिक मॉडेल सिद्ध व्हायच्या अगोदरचा आहे. =========================== मारवाजी तुम्हाला प्रश्न विचारायचि सवय आहे तशी मलाही आहे. मुळात धार्मिक सत्ये जी मांडली जातात ती कोणत्या मार्गाने जाऊन सिध्द केलेली असतात हा तुमचा प्रश्न होता. http://www.christianbiblereference.org/faq_ChristianValues.htm हे पेज पहा. यात सर्व मनुश्यांचा आदर करा, विनम्र असा, प्रामाणिक वागा इ इ लिहिले आहे. हे देखिल धार्मिक सत्येच झाली ना? तसे आदेशच झाले पण आपण सत्ये मानू. (कारण प्रूथ्वी स्थिर असल्याची सिद्धता देऊन ते विधान बायबल मधे लिहिलेलं नाही. थेट लिहिलं आहे. आणि त्यावर शास्त्रीय टिका होते. तसेच हे आदेश देखील थेट आहेत. सिद्धता नाही.) हाच प्रश्न आपण ह्या सत्यांना देखील विचारणार का? नितिमत्ता बाळगा , प्रामाणिकपणे वागा हे कोणत्या मार्गानं जाऊन सिद्ध केलं आहे असं विचारणार का? नि त्याच्या उलटं वागणार का? करण बायबल सोडलं तर निती अनिती अपनावण्याची शक्यता ५०:५० उरते. तुमच्या विज्ञानात निती अनितीची व्याख्या आहेच कुठे? विज्ञानाचे पुस्तक तुम्हाला रेप केल्यावर बीजधारणा संभव आहे इ इ सांगेल, रेप करावा कि करू नये हे सांगणार नाही आणि धर्मशास्त्राच्या पुस्तकांप्रमाणे शिक्षा तर अजिबातच देणार नाही. नास्तिक अनितिमान असण्याच्यी शक्यता ५०% असते का?

असाच उद्देश आहे असे समजून प्रतिसाद देत आहे. काही जण राळ उडविण्यासाठी अजून एक धागा अशा समजुतीत आहे तरी धाग्याचा उद्देश प्रामाणिक आहे अशा श्रद्धेतून प्रतिसाद देत आहे. श्रद्धा आणि विश्वास हे साधारणपणे समानार्थी असावेत. कदाचित विश्वास हा 'धूर येतोय म्हणजे जळत असणार' अशा काहीतरी पायावर आधारित असू शकतो. पण जेंव्हा ध्येयपूर्तीसाठी आपण निग्रह पणाला लावतो तेव्हा जी काही स्फूर्ती असते ती श्रद्धा असावी. अर्थात जो पर्यंत तुमच्या श्रद्धेचा कुणाला त्रास होत नाही तो पर्यंत आपण त्याची दखलही घेत नाही. त्या अर्थाने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काही फरक करण्याची गरज नाही. परंतु, गुप्तधन, वश करणे, जाण्या येण्याच्या वाटेवर उतारा ठेऊन दहशत निर्माण करणे याचा त्रास होऊ शकतो. त्या अर्थाने श्रद्धेला कोणी अंधश्रद्धा म्हणत असेल तर त्याचा प्रतियुक्तीवाद करणे हे काही फार शहाणपणाचे म्हणता येणार नाही. सद्य परिस्थितीत याच तारतम्याला सुरुंग लावला जात आहे. विहिरीत कासऱ्याला बांधून मूल आत सोडणे वाईट तर मोहरमच्या वेळेस चालणार प्रकार कसा चांगला अशा पातळीवर जेंव्हा चर्चा पोहोचतात तेंव्हा हताश होण्यापलीकडे आपल्या हातात काही राहत नाही.

@गॅरी ट्रुमन् ..व्याख्येत ज्या पाच अटी आहेत त्यांतील किमान एक अट गृहीतकाला (दिलेल्या विधानाला) लागू पडली तर ते विधान सत्य मानता येईल. ज्याची सत्यता ठरवायची आहे ते विधान तुमच्या उदाहरणात कुठे आहे ? ते न देताच तुम्ही त्या अटी कशाला लावत आहात ? कृपया प्रथम व्याख्या समजून घ्यावी. ......यनावाला

In reply to by यनावाला

सर, तुम्ही अन्य सयंत प्रतिक्रिया देणारांशी संबाद करत आहात तेव्हा मी माझी बरीचशी ऑब्जेक्शन्स मागे घेत आहे.

In reply to by यनावाला

ज्याची सत्यता ठरवायची आहे ते विधान तुमच्या उदाहरणात कुठे आहे ?
अरे. मला वाटले रिडिंग बिटविन द लाईन्स वरून नक्की विधान कुठले हे लक्षात आले असेल. समजा तसे लक्षात आले नसेल तर सांगतो. एडिसनने लाईट बल्बचा शोध लावला . त्याचे प्रात्यक्षिक सर्वांसमोर येण्यापूर्वी लाईट बल्ब हा प्रकार केवळ त्याच्या कल्पनेत होता. जर अनेक वेळा अपयश येत असूनही तो परत परत प्रयत्न करत राहिला तर 'सध्या केवळ माझ्या कल्पनेत असलेली गोष्ट (म्हणजेच पंचेद्रियांनी अनुभवता न येणारी किंवा सिध्द करता न येणारी) मी प्रत्यक्षात आणेन' असे त्याने प्रत्यक्षात म्हटले जरी नसले तरी त्याला तसे वाटले असणार हे नक्कीच. अन्यथा इतक्या वेळा अपयश येऊनही परत परत प्रयत्न तो का करत राहिला याची कारणमिमांसा देता येणार नाही. या उदाहरणात एडिसनच्या जागी दुसरा क्षयज्ञ शास्त्रज्ञ ठेवला आणि लाईट बल्बच्या जागी त्याने लावलेला कुठला शोध लिहिला तरी मुद्दा बदलणार नाही. मागे दिलेल्या एका लिंकेत ग्रेगर मेंडेल ने जीनची कल्पना मांडली त्यावेळीही त्याला वेड्यात काढले गेले होते असे दिले आहे. त्याचा पेपरही प्रथितयश जर्नलने नाकारला होता. म्हणजे एका अर्थी मेंडेलचे काम 'up-to the mark' नाही (म्हणजे एका अर्थी मेंडेल अज्ञानी आहे हे सौम्य शब्दात सांगणे) असे त्या जर्नलच्या संपादकांना वाटत होते असा अर्थ होत नाही का?आणि अशा प्रथितयश जर्नलमध्ये त्या क्षेत्रातील आघाडीचीच मंडळी संपादक म्हणून असतात. तरीही जीन असे काही असते यावर त्याने विश्वास ठेवलाच की नाही?

वैज्ञानिक गोष्टी, शास्त्रीय गोष्टी सोडून, कोणत्याही आधाराशिवाय, पडताळणीशिवाय काही लोकांच्या अविवेकीपणावर , आंधळेपणाने कोणत्याही तर्काच्या पलिकडील गोष्टी करणे, त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा म्हटली पाहिजे. (व्याख्यात कमी जास्त शब्द घालण्याचे वगळण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत. धन्यवाद.) अंधश्रद्धेची काही उदाहरणे : १) देव आहे, देव मदत करतो, वगैरे इत्यादी. अंगात येणे वगैरे इ. २) आजारी माणसांना दवाखान्यात नेऊन योग्य ते उपचार करण्याऐवजी भोंदूबाबा, साधु, जादू -टोने, वगैरे करणार्‍यांवर विश्वास ठेवणे. अजून भर घालतो. बाकी हे अंध्रश्रद्धेवाले खूप भयानक असतात एवढे बोलून थांबतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'मटा'त बातमी छापून आली म्हणजे ती सत्यच असली पाहिजे ही अंधश्रद्धा आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

माणसाचे आडनाव वालावलकर असणे ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. माणसाचे आडनाव असणे ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. माणसाचे असणे ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. असणे ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१) देव आहे, देव मदत करतो, वगैरे इत्यादी. अंगात येणे वगैरे देव आहे आणि देव मदत करतो हा व्यक्तिगत अनुभव आहे. या अनुभवाला/विश्वासाला/श्रद्धेला कोणी अंधश्रद्धा समजत असेल तरी माझी हरकत नाही.

यनावाला, तुमची श्रद्धेची व्याख्या वाचली. माझा प्रश्न सांगतो. मानवी मन खरं मानावं की खोटं? मनाचं अस्तित्व वरीलपैकी कोणत्याही अटींत बसंत नाही. मानवी मनाच्या उदाहरणाने समाधान झालं नसेल तर स्वप्न खरं की खोटं ते ठरवून पहा. मला पडलेलं स्वप्न वरीलपैकी कोणत्याही चाचणीने सत्य वा असत्य ठेरवता येत नाही. मग मला काल रात्री स्वप्न पडलं आणि आज सकाळी ते लख्खं आठवतं ही श्रद्धा मानावी की अंधश्रद्धा? हाच प्रश्न पूर्वी इथे विचारला आहे. आ.न., -गा.पै.

एकूणच या विज्ञानवादी/ अतीविज्ञानवादी मंडळींच्या वर्तणुकीत एक गोष्ट बहुतांश वेळा बघायला मिळते. स्वतः नरेंद्र दाभोळकर आपला मुद्दा अत्यंत संयतपणे, आपला तोल ढळू न देता आणि उगीचच इतरांना नावे न ठेवता मुद्द्यांवर आधारीत चर्चा करत मांडत असत. पण हे विज्ञानवादी लोक पदोपदी दाभोळकरांच्या नावाचा जप करत असतात पण दाभोळकरांच्या विवेकापैकी ५% विवेकही त्यांच्यामध्ये नसतो. अन्यथा आपल्या मतापेक्षा वेगळे मत असलेल्यांना मूर्ख, बिनडोक वगैरे शब्द त्यांनी वापरले नसते. या लोकांकडे बघून 'ओ माय गॉड' चित्रपटातील त्या स्वामीचीच आठवण येते. एकीकडे भगवद्गीता वगैरे घोषा लावायचा आणि दुसरीकडे इतरांनी जरा काही प्रश्न विचारले तर संतापून जायचे. चित्रपटातील--- "मूर्ख, उसे पत्थर नही शिवलिंग केहते है" वाला सीन आठवा. या स्युडो विज्ञानवादी लोकांची वर्तणूक त्यापेक्षा फार वेगळी नसते. आपल्या अशा आक्रस्ताळ्या वर्तनातून जो विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे त्याच उद्देशाला आपण धोका पोहोचवत आहोत हे कसे लक्षात येत नाही यांच्या कोणास ठाऊक. scientific enquiry मध्ये कोणतीही गोष्ट गृहित न धरता प्रत्येक पायरीवर प्रश्न विचारणे आणि मग त्या प्रश्नांची अधिक मूलभूत तत्वांवरून उत्तरे शोधणे अपेक्षित असते. म्हणजे त्यात मुद्द्यांवर आधारीत चर्चा करणे अपेक्षित असते. असा scientific enquiry चा आऊटलुक समाजामध्ये यावा अशी यांची इच्छा असेल तर ज्यांच्यामध्ये तो नाही असे लोक त्या मार्गावर आपण होऊन कसे जातील या दृष्टीने प्रयत्न करायला नकोत का? इतरांच्या अकला काढून कसे चालेल? एक उत्तम शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला प्रश्नांची उत्तरे आपली आपण शोधून काढता येतील असा प्रयत्न करतो. पण 'तू मूर्ख आहेस' असे म्हणत नाही. कारण तसे म्हणणे हे विद्यार्थी शिकायच्या प्रक्रीयेलाच हानीकारक होईल एवढे त्याला समजते. विज्ञानवाद्यांशी जेवढे बोललो आहे त्यावरून आलेला अनुभव फार उत्साहवर्धक नाही. अशांपैकी बहुसंख्य मंडळी इतरांना 'तू मूर्ख आहेस' वगैरे बोलणार्‍यापैकीच असतात किंवा इतरांना मूर्ख म्हणणार्‍यांना अनुमोदन देणारी तरी असतात. घाटपांडे काकांसारखे अपवाद थोडेच.

कित्ती चर्चा करतात लोक! फळ मिळाले तर श्रद्धा खरी देव खरा, फळ नाही मिळालं तर अंधश्रद्धा, आणि देव दगडाचा!

माझ्या मते, श्रद्धा आणि अंधश्रद्धा असा भेद करता येऊ शकत नाही. व्यवस्थीत चिकित्सा केल्यानंतर बुद्धीला पटते त्या गोष्टीवर असतो तो विश्वास आणि चिकित्सा न करता विशिष्ट गोष्ट पटणे ही म्हणजे श्रद्धा अशी व्याख्या समजली तर कोणतीही श्रद्धा अंधच होते. मग ती देवावर असो कि एखाद्या भोंदू बाबावर. पण म्हणून सार्‍याच श्रद्धा सारख्याच चांगल्या किंवा वाईट असे मी तरी म्हणत नाही. सार्‍याच श्रद्धा दुरीत असू शकत नाहीत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे विभाजन न करता चांगल्या(निरूपद्रवी) श्रद्धा आणि हानीकारक श्रद्धा असे विभाजन करने योग्य ठरेल. कित्येकदा चिकित्सा केल्याविना आपल्यालादेखिल काही गोष्टी स्विकाराव्या लागतात, कधी कधी चिकित्सेसाठी लागणारी माहिती उपलब्ध नसल्याने चिकित्सा पूर्णपणे अशक्य होते. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक असमानतेमुळे चिकित्सा करण्याची पात्रता समाजात प्रत्येकाच्याच अंगी समान असेल असे नसते. तेव्हा चिकित्सा करण्याची वृत्ती बाणवणे जसे गरजेचे आहे तसेच करूणा, सहवेदना या भावनांची जोपासना कशी होईल हे पाहणेदेखिल आवश्यक आहे. केवळ वैज्ञानिक दृष्टीकोन आला की प्रश्न सुटतील असे वाटत नाही. ज्या श्रद्धेच्या आहारी गेलेल्या मनुष्याकडून त्याचे स्वत:चे किंवा इतर कुणाचे तरी नुकसान होईल, ज्या व्यक्तीवर, संस्थेवर श्रद्धा आहे ती व्यक्ती किंवा स्वत:च समाजविघातक कामात लिप्त असेल तर अशा श्रद्धेला वाईट श्रद्धा मानले जावे. ज्या श्रद्धेपासून कुणाचे नुकसान होत नाही त्या श्रद्धेवरसुद्धा(ती अवैज्ञानिक आहे अशा कारणामुळे) आक्षेप असण्याचा अधिकार ठीक आहे मात्र मला स्वत:ला ते गैरवाजवी वाटते. अर्थात निरूपद्रवी श्रद्धा आणि हानीकारक श्रद्धा यांच्यात फरक करणे सतत चालू राहिले पाहिजे. समाजात याविषयीचे चर्वीतचर्वण होणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच यनावालांना ज्या ज्या श्रद्धा हानीकारक वाटतात त्यांच्याविषयी लिहिण्याचा त्यांचा आग्रह मला पटतो. मात्र त्यांनी इतरांच्या आक्षेपांना उत्तरे द्यायला हवीत असे वाटते. म्हात्रेकाका, अजो, आनंदा, ट्रेड मार्क यांनी विचारलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हानीकारक श्रद्धांच्या विरोधात जागृती होऊ शकेल असे मला वाटत नाही. मंथन व्हावे असे वाटत असेल तर विरोधी विचारात देखिल दखल घेण्यायोग्य काही तरी असू शकते हे मान्य करावेच लागेल. यनावालांच्या स्वत:च्या विचाराची चिकित्सा कुणी दुसरा करत असेल तर ती चिकित्सा समजावून देखिल न घेता यनावाला मुद्दा पुढे रेटत असतील तर मला वाटते तीदेखिल यनांची श्रद्धाच ठरते. कारण केवळ मी माझी केली तीच चिकित्सा, इतर कुणी चिकित्सा करायला जाऊ नये हा अवैज्ञानिक बाणा झाला. आपणही सतत ज्या ज्या श्रद्धा आपणाला समाजाला, देशाला हानीकारक वाटतात त्याच्याविषयी लिहित राहायला पाहिजे म्हणजे अधिकाधिक उहापोह होऊन खल श्रद्धांचे निर्दालन करता येईल. शेवटी आपण समाजाचे, देशाचे काही देणे लागतो अशी चांगली श्रद्धा आपणा सर्वांचीच आहे. नाही का?

In reply to by पुंबा

पुंबा अगदी हेच लिहायला आलो होतो. टेलीपथीने आपण ते जाणुन टंकन केल्याबद्दल महाधन्यवाद. :)

In reply to by पुंबा

व्यवस्थीत चिकित्सा केल्यानंतर बुद्धीला पटते त्या गोष्टीवर असतो तो विश्वास आणि चिकित्सा न करता विशिष्ट गोष्ट पटणे ही म्हणजे श्रद्धा अशी व्याख्या समजली तर कोणतीही श्रद्धा अंधच होते. मग ती देवावर असो कि एखाद्या भोंदू बाबावर. कोणत्याही गोष्टीची अगदी थोड्या मर्यादेपर्यंत चिकित्सा करता येते. त्यानंतर येते ती फक्त श्रद्धा. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात चिकित्सेला अत्यल्प स्थान आहे. जगाचे बहुसंख्य व्यवहार श्रद्धेवरच चालतात. श्रद्धा ही फक्त धर्माशी किंवा देवाशी निगडीत आहे हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे. श्रद्धा कशावरही असू शकते. श्रद्धा देवावर असू शकते, माणसांवर असू शकते किंवा 'मटा'सारख्या वृत्तपत्रात फक्त सत्य बातमीच छापून येते अशीही श्रद्धा असू शकते. अर्थात निरूपद्रवी श्रद्धा आणि हानीकारक श्रद्धा यांच्यात फरक करणे सतत चालू राहिले पाहिजे. समाजात याविषयीचे चर्वीतचर्वण होणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच यनावालांना ज्या ज्या श्रद्धा हानीकारक वाटतात त्यांच्याविषयी लिहिण्याचा त्यांचा आग्रह मला पटतो. निरूपद्रवी आणि हानीकारक या सापेक्ष संज्ञा आहेत. मंदीरात जाऊन देवदर्शन करणे हे साधारणपणे निरूपद्रवी मानले जाईल, परंतु काही जणांना ते हानीकारक वाटते व असे देवदर्शन करणारे बुद्धीला गंज चढलेले, बिनडोक, स्वबुद्धी न वापरणारे इ. वाटतात. आपणही सतत ज्या ज्या श्रद्धा आपणाला समाजाला, देशाला हानीकारक वाटतात त्याच्याविषयी लिहित राहायला पाहिजे म्हणजे अधिकाधिक उहापोह होऊन खल श्रद्धांचे निर्दालन करता येईल. शेवटी आपण समाजाचे, देशाचे काही देणे लागतो अशी चांगली श्रद्धा आपणा सर्वांचीच आहे. नाही का? निश्चितच. मला स्वतःला उपासतापास, मृत्युनंतरचे विधी, सत्यनारायण पूजा, लग्नातील विधी इ. निरूपद्रवी श्रद्धा वाटतात. देवीला, अल्लाला प्राण्यांचा बळी देणे, देवीला मुले सोडणे या श्रद्धा हानीकारक वाटतात. नामस्मरण, देवदर्शन इ. श्रद्धा सकारात्मक वाटतात. मला ज्या श्रद्धा हानीकारक वाटतात, अशा श्रद्धांचा मी नेहमीच विरोध केलेला आहे. परंतु तथाकथित विज्ञानवादी स्वतः व्यवहारात अनेक गोष्टींवर डोळे झाकून चिकित्सा न करता श्रद्धापूर्वक विश्वास ठेवतात आणि इतरांच्या निरूपद्रवी श्रद्धांवर प्रहार करून आपण विज्ञानवादी असल्याचा अहंकार व टेंभा मिरवितात. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण आपले कोरडे पाषाण' असलेल्या अशा भोंदूंना मी नेहमीच विरोध करतो.

In reply to by श्रीगुरुजी

खर तर अंध शब्दाला काळी छटा असल्याने आपल्याला तो शब्द खटकतो. श्रद्धा म्हणल की जरा बरं वाटत. खर तर तो शब्दछल आहे किंवा बौद्धिक कसरत आहे. भावना आल्या कि श्रद्धा आल्याच. कडवे सश्रद्ध व कडवे अश्रद्ध ही टोके राहणारच आहेत. त्यातील ताणामुळे इक्विलिब्रियम शिफ्ट होत राहतो. मतभिन्नता असून देखील संवाद होउ शकतो. कारण आपण माणस आहोत. आयुष्याचा पुर्वांधात नास्तिक/अस्तिक असलेली माणसे उत्तरार्धात अस्तिक/नास्तिक बनू शकतात. मेंदु मधे होणार्‍या रासायनिक बदलामुळे हे शक्य आहे असे मला वाटते. श्रद्धा अश्रद्धा या मनाच्या अवस्था आहेत.

विज्ञानवादी लोक दुसर्‍याकडून रोखीत पैसे स्विकारताना एका महत्वाच्या गोष्टीची व्यवस्थित चिकित्सा करूनच पैसे स्विकारतात का? ती महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे कागदाचे कपटे दुसर्‍याकडून घेतो त्याच कपट्यांचा वापर करून आपल्याला पाहिजे त्या वस्तू/सेवा आपण तिसर्‍या माणसाकडून विकत घेऊ शकतो. म्हणजे तो तिसरा माणूस हा पण त्या कागदाच्या कपट्यांच्या बदल्यात आपल्याला पाहिजे ती वस्तू/सेवा विकायला तयार असेल तरच या कपट्यांना महत्व. नाहीतर त्यांची किंमत रद्दीच्या कागदांइतकीच. हे विज्ञानवादी लोक दुसर्‍याकडून रोखीत पैसे स्विकारताना इतर सगळे लोकही या कागदाच्या कपट्यांचा चलन म्हणून वापर करतील याची व्यवस्थित चिकित्सा करतात का? की आतापर्यंत कोणी त्या कपट्यांना नाकारलेले नाही म्हणून यापुढेही नाकारणार नाही अशी 'गतानुगतिकता' सगळ्यांची असेल या विश्वासावार/ श्रध्देवर विसंबून राहतात?

१- नोटांचे चलन ही सर्वांनी ठरवुन मान्य केलली चिन्ह व्यवस्था आहे. जी केवळ एका सोयीसाठी आहे. कूठलाही अतीसामान्य माणुस हे पुर्णपणे जाणतो की नोटाच्या कागदाला तसे मुलभुत इन्ट्रीन्सीक स्वतःचे फारसे मुल्य नाही. आपण विनिमयासाठी वापरलेली ती एक व्यवस्था मात्र आहे. २- देशागणिक चलने वेगळी आहेत काही १००० ची बंद काही २०० ची नव्याने सुरु होतात. यात कोणी कुठल्याही भ्रमात असण्यासारखे काही नाही. पुर्वीच्या काळी काही वेगळ्या स्वरुपात चलन होते चामडे/ विटा (चुकभुल देणे घेणे ) संस्क्रुती काळ वाइज वेगवेगळी. ३- तसेच समजा व्हॅलेंटाइन डे ला आपण एक पिवळा गुलाब मैत्री लाल गुलाब प्रेमासाठी इ. रीतीने मान्य करुन चालत असतो. पण वरील बाबी मध्ये कुठेही कुठलाही भ्रम नसुन वा श्रद्धा नसुन केवळ एक समाजाने स्वतःच्या व्यावहारीक सोयीसाठी " निर्माण " केलेली मान्य व्यवस्था आहे इतकेच. याचा ईश्वरीय श्रद्धा जी सर्वस्वी वेगळी बाब आहे त्याच्याशी कसा काय संबंध येऊ शकतो ? हे पटत नाही. म्हणजे एकीकडे एक मानवनिर्मीत सोयीसाठी स्वतःहुन निर्माण केलेली व्यवस्था जी देश काल सापेक्ष असते ज्यात बदल होत असतात ज्यात संबंधितांना माहीत आहे की आपण एका सर्वसाधारण मान्य चिन्ह व्यवस्धेचा वापर करतोय. ज्यात एक व्यावहारीक व्यवस्था इतकेच स्वरुप आहे. दुसरीकडे ईश्वरीय श्रद्धा ही सर्वस्वी वेगळीच बाब आहे

In reply to by मारवा

तोच तर मुद्दा आहे: तुम्ही वर म्हटले आहे: कूठलाही अतीसामान्य माणुस हे पुर्णपणे जाणतो की नोटाच्या कागदाला तसे मुलभुत इन्ट्रीन्सीक स्वतःचे फारसे मुल्य नाही. तरीही इतर लोक त्या चलनाच्या माध्यमातून व्यवहार होऊ शकतील हा विश्वास ठेवतात म्हणून तुम्हीही ठेवता बरोबर? शास्त्रीय दृष्टीकोनात स्वतः कन्व्हिन्स झाल्याशिवाय असा विश्वास ठेवायचा नसतो (इतर लोक काही का करेनात) आणि स्वतःला कन्व्हिन्स कसे करायचे? तर मूलभूत तत्वे वापरून (फंडामेन्टल प्रिन्सिपल्स). या मूलभूत तत्वांच्या कसोटीवर ते कागदाचे कपटे उतरणे शक्य नाही हे माहित असूनही त्यावर केवळ इतर लोक विश्वास ठेवतात म्हणून विश्वास ठेवणे कोणत्या शास्त्रीय दृष्टीकोनात बसते? समजा इतर चार लोक देवावर विश्वास ठेवत असतील तेव्हा हे सगळे प्रश्न विचारायला सुचतात पण मग इथे का नाही? सांगायचा मुद्दा हा की अती विज्ञानवादी लोक प्रत्येक ठिकाणी चिकित्सा करा असा आग्रह धरतात तो चुकीचा आहे. कारण प्रत्येक ठिकाणी चिकित्सा करायला गेले तर जगाचे व्यवहार ठप्प पडतील. बर्‍याच गोष्टी परस्परविश्वासातून साध्य होत असतात. आणि अशा विश्वासाला काही ठोस कारण, शास्त्रीय पुरावा नसतो. चलन हे त्याचे एक उदाहरण माझ्या आवडीच्या विषयातले म्हणून लगेच सुचले. इतर उदाहरणेही असतीलच. दुसरे म्हणजे अती चिकित्सा करायला गेले तर 'पॅरॅलिसिस ऑफ अ‍ॅनॅलिसिस' होऊन कोणतेही भव्य काम होणे शक्य नाही. उदाहरणार्थ 'अगेन्स्ट ऑल ऑड्स' जेव्हा कोणीही कुठलेही काम करतो तेव्हा अनेकदा यश यायची शक्यता शंभरात (किंवा अगदी हजारात/लाखात) एक इतकी कमी असते. आता लाखात एक एवढी शक्यता असेल तर बरेचसे 'पॅरॅलिसिस ऑफ अ‍ॅनॅलिसिस' वाले 'गलपाटतील' आणि ती जोखीम पत्करणार नाहीत. पण नक्की यश यायची शक्यता किती असल्या आकडेमोडींचा विचार न करता केवळ 'आपण नक्कीच यशस्वी होणार' या कन्व्हिक्शनने जे लोक झोकून देतात तेच काहीतरी भव्यदिव्य काम करतात. आणि 'आपण नक्कीच यशस्वी होणार' या भावनेला श्रध्दा म्हटले तर काय चुकले? आणि ती भावना निर्माण करण्यात दगडापुढे हात जोडायच्या प्रक्रीयेचा काही वाटा असेल (म्हणजे देव आपल्या पाठीशी आहे) तर त्यात काय चुकीचे आहे? पण असले काही दिसले की विज्ञानवादी लोक अंगावर पाल पडल्यासारखे करतात. एखादी गोष्ट करणे अशक्य आहे आणि ते कसे अशक्य आहे हे अतीविज्ञानवादी लोकांना माहित व्हायची शक्यता सर्वात जास्त. कारण ते समोर असलेल्या ज्ञानाच्या बेसचा विचार करतात. पण एखादी गोष्ट अशक्य आहे हेच कोणाला माहित नसेल तर तो माणूस मात्र अशक्यप्राय वाटणारी गोष्ट साध्य करून दाखवतो. शास्त्रीय दृष्टीकोनाची ही मर्यादा आहे. पण अती विज्ञानवादी लोकांना मुळातच हे मान्य नसते. आणि इतरांना मूर्ख, आडाणी, बिनडोक वगैरे म्हणण्यात मात्र हे लोक सगळ्यांच्या पुढे असतात.

एक प्रकारे मानव निर्मित सोयीसाठी वापरलेली चिन्ह व्यवस्था असेल तर तो एक वेगळाच मुद्दा ठरत नाही का ? पण आपण जसे चलनाच्या बाबतीत म्हणतो की आता यात अमुक अमुक बदल करु या तसे ईश्वरीय श्रद्धेच्या बाबतीत तर विचार ही करु शकत नाही म्हणजे आस्तिक व्यक्ती तर असे मानत नाही की ईश्वर हा आपण सर्वानी मिळुन मान्य केलेला "रीसायकल बिन " आहे ज्यात आपण आपल्याला नको असलेले न समजणारे न पेलणारे वा आपल्या आळसा ने भीती ने प्रेरीत होऊन फेकलेले प्रश्न टाकण्यासाठी आहे. नाही जसे चलना विषयी आपण विचार करतो जसे चलना ला आपण कसोटी लावतो बदलवतो सुधरवतो तसे ईश्वराबाबत म्हणु शकतो का ? नाही असे मला वाटते. चलना संदर्भात आपण फारच स्पष्ट आहोत ईश्वरा संदर्भात ?

In reply to by मारवा

चलन ही एक जड व्यावहारिक गोष्ट आहे तर ईश्वर ही एक सूक्ष्मातील गोष्ट आहे. जड गोष्टींचा व्यावहारिक इंद्रियांच्या सहाय्याने अनुभव येऊ शकतो. ईश्वर या सूक्ष्म कल्पनेच्या अनुभवासाठी "मन" या अस्तित्वात असणार्‍या परंतु डोळ्यांनी पाहता न येणार्‍या, कानांनी ऐकू न येणार्‍या, त्वचेने स्पर्श न करता येणार्‍या, घ्राणेंद्रियाच्या सहाय्याने गंध न घेता येणार्‍या व जिव्हेच्या सहाय्याने रसास्वाद न घेता येणार्‍या इंद्रियाची गरज असते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची तुलना होऊ शकत नाही.


In reply to by गामा पैलवान

मान्य आहे. पण आंतरिक म्हणल की त्यात व्यक्तिसापेक्षता आली. यनावाला सुद्धा हे मान्य करतील. आता एकाची सोय ही दुसर्‍याची गैरसोय असू शकते.

In reply to by गामा पैलवान

कुछ हजम नाही हुआ.. ती व्यवस्था नसून अवस्था आहे असे मला वाटते.. बाकी NDE, भावातीत ध्यान आणि Rebirth यावर बरेच संशोधन चालू आहे.. त्यावर काही लोकांची श्रद्धा असल्यामुळे..

यना यांचे धाग्यावर जे अहो रुपम अहो ध्वनी ते सर्व मूढ जन करतील ती विनासंशय अंधश्रद्धा आहे बाकी जन्मदिन,नवं वर्ष शुभेच्छा दैताना त्या शतप्रतिशत खर्या ठरतीलच असे नाही हे माहीत असूनही मिपा सुधारक त्या का देतात हेच कळत नाही. "ज्याने हे सर्व चराचर व्यापिले आहे, त्यांच्यापासून कर्माची प्रवृत्ती, त्या ईश्वराची पूजा आपली कर्मे निष्ठेने करून साजरी होते! तेणे गुणेच मानवास सिद्धी मिळते,ती त्यागून जेंव्हा मनुष्य अभिषेकास धावतो, तेंव्हा देव पाठमोरा होतो. संदर्भ : दास डोंगरी राहतो पृष्ठ १७४ ओळ १८ अज्ञ बालक नाखु पांढरपेशा

In reply to by नाखु

बाकी जन्मदिन,नवं वर्ष शुभेच्छा दैताना त्या शतप्रतिशत खर्या ठरतीलच असे नाही हे माहीत असूनही मिपा सुधारक त्या का देतात हेच कळत नाही. झालं, केलंत ना स्वतःचं नुकसान ! आता यापुढे मिपासुधारकांची तुमच्याशी कट्टी... आतापासून नो शुभेच्छा, ओन्ली कुत्सित टिका ! ;) =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुमचं मत रास्त आहे, पण काय करणार अगोदरच दोन-तीन शिक्के बसले आहेतच​, (एक पक्का भाजपाचा, दुसरा फडणवीस यांचा अंध भक्त) आणखी एखादा बसला तर बसला!!! "अरे हाय काय अन् नाय काय" पंथीय कोरडा पाषाण नाखु

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अंनिस मधे शुभेच्छा ला सदिच्छा म्हणतात. अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकाला वार्षिक विशेषांक म्हणतात. व्यास पीठाला विचारपीठ म्हणतात. श्रद्धांजलीला आदरांजली म्हणतात. वार्तापत्रात तुम्ही शुभेच्छा जाहिरात दिली तर ती मजकुरात सदिच्छा जाहिरात होते. मी त्यामुळे एका शुभांगी नावाच्या मैत्रिणीला सदांगी म्हणतो. :)

In reply to by प्रकाश घाटपांडे

अंनिस मधे शुभेच्छा ला सदिच्छा म्हणतात.
असं आहे काय? मग आता हटकून शुभेच्छाच म्हणायला हवे :)

In reply to by प्रकाश घाटपांडे

मी त्यामुळे एका शुभांगी नावाच्या मैत्रिणीला सदांगी म्हणतो. :) =)) =)) =)) थोडक्यात काय, इकडून तिकडून एकेरी "फॅड"च करायचे आणि आमचेच्च फॅड अंतिम सत्य आहे अशी दवंडी पिटत रहायचे ! :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माणसातल्या घातक रुढी, परंपरा, विचार आणि इतर कृती यांना विरोध करून त्यांचा बिमोड करणे हे योग्यच आहे आणि ते करावेच, यात वाद नाही. कारण तसे करणे वैयक्तिक व सामाजिक सुखाचे होते. त्याचबरोबर, हे पण ध्यानात घेतले पहिजे की, हे जग अनेकाविध भौतिक आणि मानसिक/वैचारिक गुणधर्म असलेल्या माणसांनी भरलेले आहे. किंबहुना, कोणत्याच दोन माणसांचे भौतिक व मानसिक गुणधर्म १००% एकसारखे नसतात हे शास्त्रिय सत्य आहे. आणि यामुळेच हे जग इतके आकर्षक आणि रंजक आहे. त्याला एकेरी बनविण्याचा प्रयत्न करणे अत्यंत अनैसर्गिक आणि क्रूरपणाचे होईल. "माझ्या विचारशैलीत बसत नाही" या एकाच कारणाने (इतरांना उपद्रव न देणार्‍या विचारांना आणि कृतींना) वैचारिक विरोध असणेही वाईट नाही. मात्र, अश्या गोष्टींवर विश्वास ठेवल्याबद्दल इतरांना सतत दुषणे देत राहणे आणि अपशब्द किंवा कृतीने ताडत राहणे हे विचारस्वातंत्र्यामध्ये बसत नाही... ही साधी गोष्ट, सतत विचारस्वातंत्र्याचा धोशा लावणार्‍या, तथाकथित पुरोगाम्यांच्या ध्यानात येत नाही... सहाजिकच त्यांची वागणूक कम्युनिस्ट आणि धार्मिक अतिरेक्यांच्या विचारसरणीशी आणि कृतीशी मिळतीजुळती बनते किंवा ते त्या गटांचे भाग असतात. "माणूस केवळ भौतिक नियमाप्रमाणे चालणारा रोबो नाही तर, त्याला भौतिकशास्त्राचे सगळे नियम लागू होत नसणारे मनही असते", या शास्त्रिय सत्याचा (खरोखर / सोईस्कर) विसर पडला की मग माणूस 'स्वतःच स्वतःच्या फसवणूकीचा' आणि 'मानसिक अस्वस्थतेचा' बळी होतो ! या मार्गावर एक ठराविक टप्पा गाठल्यानंतर आपली चूक ध्यानात आली तरी अहंकारी हट्टामुळे (आणि/किंवा आपल्या हट्टांमुळे मिळत असलेल्या हितसंबंधी फायद्यांमुळे) मन मोठे करून आपली चूक मान्य करून सत्य स्विकारणे फार कठीण बनते... मग मागे फिरणे नाही. त्या ऐवजी आपल्याभोवती कपोलकल्पित अतार्किक विचारांच्या अधिकाधिक ऊंच भिंती उभ्या करून त्यात स्वमनरंजनाचे महाल उभे करत राहणे जास्त "सोईचे" बनते. यात पुढची आणि अंतिम पायरी म्हणजे, इतरांना आपल्या विचार/बोलणे/लेखनातल्या विसंगती सहज ध्यानात येत आहेत हे कळण्याइतकी बुद्धी असूनही, त्या विसंगतीकडे बनेलपणाने/अगतिकतेने दुर्लक्ष करत राहणे/रहावे लागणे (पक्षी : लबाड राजकारणी व्यवहार करणे) हा सहजभाव बनतो. यानंतर, परतीचा मार्ग खुंटलेला असतो. "निसर्गनियमांविरुद्ध जाणार्‍या कपोलकल्पित" मानसिकतेचे लोक कधीच यशस्वी होत नाहीत... परिणामी, ते स्वतः सुखी होऊ शकत नाहीत आणि दुसर्‍यांनाही सुखी होऊ देत नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

+ १ हे तथाकथित पुरोगामी प्रत्यक्षात अत्यंत कर्मठ आणि प्रतिगामी असतात. 'जमात-ए-इस्लामी' आणि 'जमात-ए-पुरोगामी' सारखेच आहेत.

In reply to by नाखु

बाकी जन्मदिन,नवं वर्ष शुभेच्छा दैताना त्या शतप्रतिशत खर्या ठरतीलच असे नाही हे माहीत असूनही मिपा सुधारक त्या का देतात हेच कळत नाही. मिपासुधारक या उपहासात्मक संबोधनातुन तुम्हाला जे विज्ञानवादी विचारसरणीचे लोक असतात ते अशा शुभेच्छा का देतात असा कदाचित प्रश्न पडला असावा असे गृहीद धरुन उत्तर देतो. एखादा विज्ञानवादी व्यक्ती जेव्हा त्याच्या मित्राला शुभेच्छा देतो की "तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार " तेव्हा त्याला हे निश्च्चीत माहीत असते की / त्याने हे गृहीतच धरलेले असते की आपली इच्छा पुर्ण होऊ ही शकते किंवा होणार नाही म्हणजे त्याची त्याचा मित्र १००० वर्षे जगावा ही इच्छा १- त्याचा मित्र १००० वर्षे जगु शकत नाही. ( अनेकोनेक संभाव्य कारणांनी तो मरु शकतो ) २- त्याच मित्र १००० वर्षे जगु ही शकतो. ( फार कमी कारणे कदाचित असु शकतील तितकी शरीरशास्त्रात मेडीकल मध्ये प्रगती वगैरे होऊन दिर्घायुष्य लाभु शकते ) पण इन एनी केस तो वरील दोन ही गृहीतके वरील दोन ही पर्याय शक्य आहेत हे जाणुन वरील शुभेच्छा देत असतो. यात ही शुभ इच्छा म्हणजे डिझायर आहे हा दावा किंवा क्लेम नाही. एक दावा आणी एक इच्छा यात खुप मोठा फरक आहे. असे वाटणे असे व्हावे असे झाल्यास आनंद होईल हे तो यातुन व्यक्त करत असतो असे होइलच क्र, १ चा च पर्याय निश्चीत आहे वा क्र २ चा च निश्चीत आहे अशा ठाम निष्कर्षावर जर तो पोहोचला तर शुभ इच्छा देण्याचा प्रश्न च उरणार नाही. मग तो दावा करेल उदाहरणार्थ एखादा बाबा जेव्हा त्याच्याकडे एखाद्या गंभीर आजारी व्यक्तीला नेण्यात येते तेव्हा तो जी भाषा करतो विधान करतो त्याचे स्वरुप दाव्याचे असते. "जा बच्चा तु ठीक हो जायेगा " ( हाताची वरद हस्त पोझिशन वगैरे करुन ) यात हा दावा आहे की तु बरा होणारच. यात इच्छा नाही ( द मोमेंट इच्छा विधानात येताच अनिश्चितता येते बरा होइल किंवा होणार नाही जो पर्यंत दावा आहे तो पर्यंत इच्छेला प्रवेशच नाही ) बाबा विधानांत दावा असतो इच्छा नसते विज्ञानवादी केवळ प्रेम प्रेरीत होऊन मित्राच्या दिर्घायुष्याची इच्छा मात्र करतो दावा नाही. विज्ञानवादी ने असे करणे त्याची सत्याप्रतीची नम्रता व्यक्त करते ज्या सत्याच्या निष्कर्षा पर्यंत तो प्रयोगाने आलेला नाही त्या संदर्भात तो उद्धट दावा करत नाही मात्र त्याचे प्रेम त्याला आशा व्यक्त करण्यास जरुर प्रेरीत करते. याउलट उद्धट बाबा जा तु अच्छा हो जायेगा असे म्हणतो तेव्हा तो मला माहीतच आहे की तु चांगला होशीलच असा दावा करतो. आता बाबा ने दावा करण्यात व वैज्ञानिकाने दावा करण्यात काय फरक असतो हे आपण जाणताच. माझ्या वरील प्रतिसादातुन जे मला म्हणावयाचे आहे ते तुम्हास समजावे अशी "इच्छा" मी व्यक्त करतो. ते तुम्हाला समजणारच नाही किंवा ते तुम्हाला समजेलच असा माझा कुठल्याही प्रकारे " दावा " नाही आहे ती केवळ "इच्छा" की तुम्हाला माझे म्हणणे समजावे. असो.

In reply to by मारवा

धन्यवाद, मला किमानपक्षी दखलपात्र घेतल्याबद्दल. तुम्ही जे गृहितक मांडले त्याच अनुषंगाने परीक्षार्थी/प्रापंचिक असे लाखो लोक देवाची प्रार्थना करतात आणि माझ्या प्रयत्नांना यश येऊ दे अशी विनंती करतात. त्यात सर्वस्वी देवावर हवाला ठेऊन निष्क्रिय राहणारे आहेत तसेच प्रयत्नशील आहेत. दोघांनाही एकाच तराजूत ढकलण्यात काय हशील. वरील उदाहरणात त्या बाबांकडे जायचा निर्णय त्या व्यक्तीचा आणि परिणाम ही त्याचाच.बाबांच्या कच्छपी लागा असे मी कुठेही आणि कधीही म्हटलं नाही तो प्रतिसाद मन अस्तित्वात नाहीच या सुधारक विचारवंत यांच्या विचार मौक्तीकाला होता सुस्पष्ट उघड्या डोळ्यांनी बघणारा अडाणी नाखु

In reply to by मारवा

बाबाने तीव्र सदिच्छा व्यक्त केली की तो दावा व विज्ञानवादी मित्राने केली तर ती सदिच्छा. असा अर्थ आपल्या विवेचनात ध्वनीत होतो. " काही काळजी करु नको सर्व ठीक होईल" " डोंट वरी यार तू नक्की पास होशील" यांना काय म्हणायच दावे की सदिच्छा? आम्ही केली तर ती स्ट्रॅटिजी तुम्ही केलीत तर ती लबाडी? मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन हे गीत बर्‍याच पुरोगामी चळवळींच्या व्यासपीठावर म्हटले जाते. इथे विश्वास च्या जागी इच्छा का नाहि म्हटल. दाभोलकर शब्दोच्छाला बद्दल आम्हाला सांगायचे की मी भीतीने गर्भगळीत झालो असे म्हणताना आपण म्हणतो का तू तर पुरुष तुला कसला आलाय गर्भ? काही गोष्टी तारतम्याने आपण घेतो. या ज्योतिषाच काय करायचे? मधे मी शुक्रतारा मंदवाराचे उदाहरण दिले आहे.