मला बरेच दिवस हा धागा काढायचा होताच, पण यनावालांच्या धाग्यावर उठणारी राळ बघून प्रकर्षाने काढावासा वाटला..
तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?
माझ्या दृष्टीने श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट अजून सिद्ध व्हायची आहे, पण तरीही मला वाटते की ते अस्तित्वात आहे,
मी एक उदाहरण देतो...
डार्विन ने एक सिद्धांत मांडला, त्याचे नाव उत्क्रांतीवाद.. तो बराच काळ असिद्ध होता.. पण तर्काच्या पातळीवर लोकांना पटत होता, त्यामुळे लोक त्यावर श्रद्धा ठेवत होते. काही लोक ही अंधश्रद्धा आहे म्हणून त्यांची हेटाळणी करत होते..
त्यातील काही श्रद्धावान लोकांनी त्या हायपोथीसिस वरून काही प्रयोग केले, आणि अनुभव घेतला, त्यावरून त्यांना ही खात्री झाली की हा हायपोथॅसिस खरा आहे, त्यानंतर निर्माण झाला तो विश्वास..
आईनस्टाईन बोललोय म्हणजे खरेच असणार ही श्रद्धा, आणि प्रयोगाअंती बसलेला तो विश्वास..
अध्यात्मात पण साधारण असेच आहे.. तुम्ही अगोदर श्रद्धा ठेवता, मग प्रयोग करून, प्रयत्न करून अनुभव घेता, आणि मग तुम्ही हळूहळू विश्वास आणि निष्ठा या पायऱ्या चढत जाता. दुर्दैवाने हा अत्यंत वैयक्तिक विषय असल्यामुळे त्याच्या प्रत्ययाची हमी देणे शक्य आहे पण आणि नाही पण, त्यामुळे हा सगळा वाद होतो.
व्यावहारिक जीवनात पण तसेच, पण सर्वसामान्यपणे श्रद्धा ही बेसिक चिकित्सा करून ठेवली जाते, जेव्हा बेसिक चिकित्सा पण केली जात नाही तेव्हा ती होते अंधश्रद्धा ..
उदाहरणार्थ - माझ्याकडे एक माणूस येतो, तू मला 10लाख दे, मीएक वर्षात 20 लाख करून देतो असे सांगतो आणि मी विश्वास ठेवतो, याला म्हणावे अंधश्रद्धा.
अध्यात्मातील अंधश्रद्धामबद्दल बरेच बोलले गेले आहे, त्यामुळे परत बोलत नाही
तुम्हाला काय वाटते?
वर्गीकरण
वाचने
56988
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
३. यांचा खगोलशास्त्राचा
In reply to म्हणजे एक श्रद्धावान ख्रिश्चन by arunjoshi123
गावडे सायेब,
In reply to ३. यांचा खगोलशास्त्राचा by सतिश गावडे
धार्मिक नि वैज्ञानिक सत्यांच्या सिद्धतेचा मार्ग
In reply to धार्मिक व्यक्ती त्यांच्या धार्मिक सत्यांचा by मारवा
श्रद्धा या शब्दाची व्याख्या ठरविणे
श्रद्धेची व्याख्या
सर, तुम्ही अन्य सयंत
In reply to श्रद्धेची व्याख्या by यनावाला
विधान
In reply to श्रद्धेची व्याख्या by यनावाला
व्याख्या सांगता येणार नाही पण...
'मटा'त बातमी छापून आली म्हणजे
In reply to व्याख्या सांगता येणार नाही पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माणसाचे आडनाव वालावलकर असणे
In reply to 'मटा'त बातमी छापून आली म्हणजे by श्रीगुरुजी
१) देव आहे, देव मदत करतो,
In reply to व्याख्या सांगता येणार नाही पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१) देव आहे, देव मदत करतो, वगैरे इत्यादी. अंगात येणे वगैरेदेव आहे आणि देव मदत करतो हा व्यक्तिगत अनुभव आहे. या अनुभवाला/विश्वासाला/श्रद्धेला कोणी अंधश्रद्धा समजत असेल तरी माझी हरकत नाही.यनावाला यांच्या श्रद्धेच्या व्याख्येवर प्रश्न
एक निरीक्षण
.
माझ्या मते, श्रद्धा आणि
पुंबा अगदी हेच लिहायला आलो
In reply to माझ्या मते, श्रद्धा आणि by पुंबा
व्यवस्थीत चिकित्सा केल्यानंतर
In reply to माझ्या मते, श्रद्धा आणि by पुंबा
व्यवस्थीत चिकित्सा केल्यानंतर बुद्धीला पटते त्या गोष्टीवर असतो तो विश्वास आणि चिकित्सा न करता विशिष्ट गोष्ट पटणे ही म्हणजे श्रद्धा अशी व्याख्या समजली तर कोणतीही श्रद्धा अंधच होते. मग ती देवावर असो कि एखाद्या भोंदू बाबावर.कोणत्याही गोष्टीची अगदी थोड्या मर्यादेपर्यंत चिकित्सा करता येते. त्यानंतर येते ती फक्त श्रद्धा. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात चिकित्सेला अत्यल्प स्थान आहे. जगाचे बहुसंख्य व्यवहार श्रद्धेवरच चालतात. श्रद्धा ही फक्त धर्माशी किंवा देवाशी निगडीत आहे हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे. श्रद्धा कशावरही असू शकते. श्रद्धा देवावर असू शकते, माणसांवर असू शकते किंवा 'मटा'सारख्या वृत्तपत्रात फक्त सत्य बातमीच छापून येते अशीही श्रद्धा असू शकते.अर्थात निरूपद्रवी श्रद्धा आणि हानीकारक श्रद्धा यांच्यात फरक करणे सतत चालू राहिले पाहिजे. समाजात याविषयीचे चर्वीतचर्वण होणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच यनावालांना ज्या ज्या श्रद्धा हानीकारक वाटतात त्यांच्याविषयी लिहिण्याचा त्यांचा आग्रह मला पटतो.निरूपद्रवी आणि हानीकारक या सापेक्ष संज्ञा आहेत. मंदीरात जाऊन देवदर्शन करणे हे साधारणपणे निरूपद्रवी मानले जाईल, परंतु काही जणांना ते हानीकारक वाटते व असे देवदर्शन करणारे बुद्धीला गंज चढलेले, बिनडोक, स्वबुद्धी न वापरणारे इ. वाटतात.आपणही सतत ज्या ज्या श्रद्धा आपणाला समाजाला, देशाला हानीकारक वाटतात त्याच्याविषयी लिहित राहायला पाहिजे म्हणजे अधिकाधिक उहापोह होऊन खल श्रद्धांचे निर्दालन करता येईल. शेवटी आपण समाजाचे, देशाचे काही देणे लागतो अशी चांगली श्रद्धा आपणा सर्वांचीच आहे. नाही का?निश्चितच. मला स्वतःला उपासतापास, मृत्युनंतरचे विधी, सत्यनारायण पूजा, लग्नातील विधी इ. निरूपद्रवी श्रद्धा वाटतात. देवीला, अल्लाला प्राण्यांचा बळी देणे, देवीला मुले सोडणे या श्रद्धा हानीकारक वाटतात. नामस्मरण, देवदर्शन इ. श्रद्धा सकारात्मक वाटतात. मला ज्या श्रद्धा हानीकारक वाटतात, अशा श्रद्धांचा मी नेहमीच विरोध केलेला आहे. परंतु तथाकथित विज्ञानवादी स्वतः व्यवहारात अनेक गोष्टींवर डोळे झाकून चिकित्सा न करता श्रद्धापूर्वक विश्वास ठेवतात आणि इतरांच्या निरूपद्रवी श्रद्धांवर प्रहार करून आपण विज्ञानवादी असल्याचा अहंकार व टेंभा मिरवितात. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण आपले कोरडे पाषाण' असलेल्या अशा भोंदूंना मी नेहमीच विरोध करतो.खर तर अंध शब्दाला काळी छटा
In reply to व्यवस्थीत चिकित्सा केल्यानंतर by श्रीगुरुजी
विज्ञानवादी लोक
गॅरीजी उदाहरण पटले नाही कारण
मर्यादा
In reply to गॅरीजी उदाहरण पटले नाही कारण by मारवा
म्हणजे ईश्वरीय श्रद्धा किंवा ईश्वर ही जर एक
चलन ही एक जड व्यावहारिक गोष्ट
In reply to म्हणजे ईश्वरीय श्रद्धा किंवा ईश्वर ही जर एक by मारवा
ईश्वर नावाची व्यवस्था
मान्य आहे. पण आंतरिक म्हणल की
In reply to ईश्वर नावाची व्यवस्था by गामा पैलवान
कुछ हजम नाही हुआ.. ती
In reply to ईश्वर नावाची व्यवस्था by गामा पैलवान
बरोबरे
In reply to कुछ हजम नाही हुआ.. ती by आनन्दा
साधं सोपं आहे
झालं केलत ना स्वतःचं नुकसान !
In reply to साधं सोपं आहे by नाखु
बाकी जन्मदिन,नवं वर्ष शुभेच्छा दैताना त्या शतप्रतिशत खर्या ठरतीलच असे नाही हे माहीत असूनही मिपा सुधारक त्या का देतात हेच कळत नाही.झालं, केलंत ना स्वतःचं नुकसान ! आता यापुढे मिपासुधारकांची तुमच्याशी कट्टी... आतापासून नो शुभेच्छा, ओन्ली कुत्सित टिका ! ;) =)) =)) =))डॉ
In reply to झालं केलत ना स्वतःचं नुकसान ! by डॉ सुहास म्हात्रे
अंनिस मधे शुभेच्छा ला सदिच्छा
In reply to झालं केलत ना स्वतःचं नुकसान ! by डॉ सुहास म्हात्रे
असं आहे काय?
In reply to अंनिस मधे शुभेच्छा ला सदिच्छा by प्रकाश घाटपांडे
मी त्यामुळे एका शुभांगी
In reply to अंनिस मधे शुभेच्छा ला सदिच्छा by प्रकाश घाटपांडे
मी त्यामुळे एका शुभांगी नावाच्या मैत्रिणीला सदांगी म्हणतो. :)=)) =)) =)) थोडक्यात काय, इकडून तिकडून एकेरी "फॅड"च करायचे आणि आमचेच्च फॅड अंतिम सत्य आहे अशी दवंडी पिटत रहायचे ! :) ;)माणसातल्या घातक रुढी, परंपरा,
In reply to मी त्यामुळे एका शुभांगी by डॉ सुहास म्हात्रे
+ १
In reply to माणसातल्या घातक रुढी, परंपरा, by डॉ सुहास म्हात्रे
नाखुजी
In reply to साधं सोपं आहे by नाखु
बाकी जन्मदिन,नवं वर्ष शुभेच्छा दैताना त्या शतप्रतिशत खर्या ठरतीलच असे नाही हे माहीत असूनही मिपा सुधारक त्या का देतात हेच कळत नाही.मिपासुधारक या उपहासात्मक संबोधनातुन तुम्हाला जे विज्ञानवादी विचारसरणीचे लोक असतात ते अशा शुभेच्छा का देतात असा कदाचित प्रश्न पडला असावा असे गृहीद धरुन उत्तर देतो. एखादा विज्ञानवादी व्यक्ती जेव्हा त्याच्या मित्राला शुभेच्छा देतो की "तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार " तेव्हा त्याला हे निश्च्चीत माहीत असते की / त्याने हे गृहीतच धरलेले असते की आपली इच्छा पुर्ण होऊ ही शकते किंवा होणार नाही म्हणजे त्याची त्याचा मित्र १००० वर्षे जगावा ही इच्छा १- त्याचा मित्र १००० वर्षे जगु शकत नाही. ( अनेकोनेक संभाव्य कारणांनी तो मरु शकतो ) २- त्याच मित्र १००० वर्षे जगु ही शकतो. ( फार कमी कारणे कदाचित असु शकतील तितकी शरीरशास्त्रात मेडीकल मध्ये प्रगती वगैरे होऊन दिर्घायुष्य लाभु शकते ) पण इन एनी केस तो वरील दोन ही गृहीतके वरील दोन ही पर्याय शक्य आहेत हे जाणुन वरील शुभेच्छा देत असतो. यात ही शुभ इच्छा म्हणजे डिझायर आहे हा दावा किंवा क्लेम नाही. एक दावा आणी एक इच्छा यात खुप मोठा फरक आहे. असे वाटणे असे व्हावे असे झाल्यास आनंद होईल हे तो यातुन व्यक्त करत असतो असे होइलच क्र, १ चा च पर्याय निश्चीत आहे वा क्र २ चा च निश्चीत आहे अशा ठाम निष्कर्षावर जर तो पोहोचला तर शुभ इच्छा देण्याचा प्रश्न च उरणार नाही. मग तो दावा करेल उदाहरणार्थ एखादा बाबा जेव्हा त्याच्याकडे एखाद्या गंभीर आजारी व्यक्तीला नेण्यात येते तेव्हा तो जी भाषा करतो विधान करतो त्याचे स्वरुप दाव्याचे असते. "जा बच्चा तु ठीक हो जायेगा " ( हाताची वरद हस्त पोझिशन वगैरे करुन ) यात हा दावा आहे की तु बरा होणारच. यात इच्छा नाही ( द मोमेंट इच्छा विधानात येताच अनिश्चितता येते बरा होइल किंवा होणार नाही जो पर्यंत दावा आहे तो पर्यंत इच्छेला प्रवेशच नाही ) बाबा विधानांत दावा असतो इच्छा नसते विज्ञानवादी केवळ प्रेम प्रेरीत होऊन मित्राच्या दिर्घायुष्याची इच्छा मात्र करतो दावा नाही. विज्ञानवादी ने असे करणे त्याची सत्याप्रतीची नम्रता व्यक्त करते ज्या सत्याच्या निष्कर्षा पर्यंत तो प्रयोगाने आलेला नाही त्या संदर्भात तो उद्धट दावा करत नाही मात्र त्याचे प्रेम त्याला आशा व्यक्त करण्यास जरुर प्रेरीत करते. याउलट उद्धट बाबा जा तु अच्छा हो जायेगा असे म्हणतो तेव्हा तो मला माहीतच आहे की तु चांगला होशीलच असा दावा करतो. आता बाबा ने दावा करण्यात व वैज्ञानिकाने दावा करण्यात काय फरक असतो हे आपण जाणताच. माझ्या वरील प्रतिसादातुन जे मला म्हणावयाचे आहे ते तुम्हास समजावे अशी "इच्छा" मी व्यक्त करतो. ते तुम्हाला समजणारच नाही किंवा ते तुम्हाला समजेलच असा माझा कुठल्याही प्रकारे " दावा " नाही आहे ती केवळ "इच्छा" की तुम्हाला माझे म्हणणे समजावे. असो.मारवाजी
In reply to नाखुजी by मारवा
बाबाने तीव्र सदिच्छा व्यक्त
In reply to नाखुजी by मारवा