तडफदार पत्रकार गोपीकृष्णन, शालिनी आणि प्रवीण जैन , एकाकी योद्धे स्वामी ह्यांनी अथक प्रयत्नांनी आणि स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता २g घोटाळा उघडकीस आणला होता. नेहमी प्रमाणे भाजप आणि मोदींच्या गलथान कारभाराने त्याच्या कष्टावर पाणी पडले आहे. आधीच मोदींनी स्वामींना वगैरे दूर ठेवले त्यानंतर २०१४ मध्ये मुकुल रोहतगी ह्यांना AG म्हणून ठेवले (जे सध्या बचावपक्षाचे वकील आहेत).
सुप्रीम कोर्टने CBI चे तळी उचलून धरत १२२ परवाने रद्द सुद्धा केले होते. परवाने रद्द केले तर आता घोटाळा नाही असे कोर्ट कसे म्हणू शकते ? ज्यांचे परवाने रद्द झाले त्यांना आता नुकसान भरपाई द्यायला नको का ?
महत्वाचा मुद्दा : कोर्टाने आरोपीना पुराव्याच्या अभावी निर्दोष ठरवले आहे. IPC प्रमाणे आरोपीनी लांच घेतली हे CBI सिद्ध करू शकली नाही. त्यामुळे सिब्बल आणि इतर काँग्रेसी मंडळी scam झालेच नाही असा धिंगाणा घालत आहेत ती निव्वळ धूळफेक आहे. scam झाले पण नक्की कुणी केले ठाऊक नाही हा प्रकार आधी बोफोर्स, अगस्टा, चारा घोटाळा इत्यादी गोष्टींत झाला होता तोच इथे घडला आहे.
भ्रष्ट नेत्यांना कोठडीत टाकण्याची मोदी ह्यांना अभूतपूर्व संधी होती. ती संधी त्यांनी आपल्या आणि आपल्या मंत्र्यांच्या निष्क्रियते मुळे गमावली आहे. २G ह्या सर्व प्रकरणात भाजपने कमालीची apathy दाखवली होती. कदाचित अरुण जेटली सारखे घरभेदी भाजपात घर करून आहेत आणि त्याची किंमत मोदींना चुकवावी लागेल असेच चित्र आहे.
इतिहास :
१. २G प्रकरणाला सर्वप्रथम पायोनीर चे गोपीकृष्णन ह्यांनी वाचा फोडली.
२. सुनील जैन आणि शालिनी ह्यांनी त्यानंतर प्रकरण वाढवले. (business standard)
https://realitycheck.wordpress.com/2009/10/26/sunil-jain-on-the-spectru…
३. हा विषय सर्वप्रथम संसदेत कुणी मांडला तर कर्नाटकचे अपक्ष खासदार राजीव चंद्रशेखर ह्यांनी
https://twitter.com/rajeev_mp/status/943694266940907520
४. मुकुल रोहतगी ह्यांना मोदी ह्यांनी २०१४ साली AG म्हणून नेमले ह्याला स्वामी आणि इतर लोकांनी कडाडून विरोध केला होता
https://twitter.com/timesofindia/status/943785744597786625
हा पराभव मोदी ह्यांना थोडे आत्मचिंतन करायला भाग पाडेल अशी आशा आपण करू शकतो.
वर्गीकरण
वाचने
18723
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाऊ तोरसेकरांचा लेख
नीट काही कळले नाही वरचे वाक्य
In reply to भाऊ तोरसेकरांचा लेख by गॅरी ट्रुमन
समजत नाही
In reply to नीट काही कळले नाही वरचे वाक्य by हतोळकरांचा प्रसाद
अल्पमतातील सरकार चालवण्यासाठी
In reply to समजत नाही by गॅरी ट्रुमन
माझ्या मते मोदी हे "टास्क
In reply to समजत नाही by गॅरी ट्रुमन
काही अंशी सहमत!
In reply to माझ्या मते मोदी हे "टास्क by साहना
@गॅरी ट्रुमन पण पुरवणी
In reply to भाऊ तोरसेकरांचा लेख by गॅरी ट्रुमन
सहमत आहे
In reply to @गॅरी ट्रुमन पण पुरवणी by सुबोध खरे
ट्रुमनजी सहमत आहे, एकूणच
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
थोडासा अहो रूपं अहो ध्वनी सारखा प्रकार आहे का?
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन