राम राम मंडळी,
कुठल्याही जिवंत भाषेची आपल्याला सर्वसाधारणपणे खालील लक्षणे सांगता येतील..
१) व्यवहारात तिचा नित्यनियमित वापर.
२) बोलीभाषेतील तिचे स्वरूप. जसे मराठीबाबत सांगायचे तर कोकणी, मालवणी, आगरी, खास कोल्हापुरी ढंगाची, माणदेशी इत्यादी.
३) त्या भाषेत होणारी नवनिर्मिती. जसे कथा, कांदंबर्या, कविता, नाटके, चित्रपट, इत्यादी..
या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला संस्कृत भाषा मला कुठेच दिसत नाही... या बाबतीत वरील मुद्द्यांचा खालीलप्रमाणे उहापोह करता येईल..
१) आज व्यवहारात संस्कृत भाषेचा मला कुठेच वापर होतांना दिसत नाही.. संस्कृत ही भारतीय भाषा आहे. परंतु भारतातल्या मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लखनऊ, हैद्राबाद, जयपूर, कोल्हापूर, इत्यादी अनेक शहरातून मी वावरलो आहे परंतु आजतागायत मला यापैकी कुठल्याही ठिकाणी संस्कृत भाषेचा रोजच्या दैनंदिन व्यवहारात उपयोग होतांना आढळला नाही. असे का बरे?
२) बोलीभाषा हे माझ्या मते कुठल्याही भाषेचे एक वेगळेच सौंदर्य आहे. तिचा स्वत:चा असा एक खास ढंग आहे, गोडवा आहे. सर्वसाधारण, सामान्य माणसाला भाषेचा बोलीभाषा हा प्रकार वापरायला खूप बरा पडतो. कारण तिथे भाषेचे नियम, व्याकरणाचे नियम आपोआपच थोडे शिथिल झालेले असतात. जसा प्रान्त असतो तशी बोलीभाषा असते. एवढेच नव्हे, तर मुख्य भाषेप्रमाणेच बोलीभाषेतही खूप चांगली निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळेल! जसे एखाद्या चित्रपटातले बोलीभाषेतील गावरान संवाद, गं साजणी..कुन्न्या गावाची.. या सारखी काही फक्कड गाणी इत्यादी..
संस्कृतमध्ये बोलीभाषा हा प्रकार आहे का? असल्यास सर्रास आहे का? नसल्यास बोलीभाषा या भाषेचे सौंदर्य वाढवणार्या प्रकाराला संस्कृत भाषा पारखी कशी राहिली? काय कारणे असावीत?
३) आपल्या मायमराठीचे उदाहरण घ्यायचे झाले तर अगदी आजच्या घडीलाही मराठीमध्ये उत्तमोत्तम साहित्य निर्मिती होत आहे. मराठी भाषेत, किंवा हिंदी भाषेत अनेक मंडळी उत्तमोत्तम कथा, कादंबर्या, काव्य, गाणी, नाटके, चित्रपट इत्यादींची निर्मिती करत आहेत. आजच्या घडीला संस्कृत भाषेत मला एकही चित्रपट अथवा नाटक पाहायला मिळत नाही. 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या..' सारखे एखादे तरल गाणे आजतागायत मला संस्कृत भाषेत ऐकायला मिळाले नाही..
का बरे असे?
आजच्या घडीला मला मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, गुजराथी, तेलूगू, कन्नड, उर्दू, इत्यादी वर्तमानपत्रे अगदी सर्रास पाहायला मिळतात, जी समाजाचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आरसा समजली जातात. अगदी सामान्यातला सामान्य माणूस ही वर्तमानपत्रे वाचत असतो व त्याद्वारे तो स्वत:ला जगाशी जोडून ठेवतो. परंतु एखादे बर्यापैकी खप असलेले संस्कृत वृत्तपत्र आहे आणि जे समाजात वाचले जात आहे असे चित्र मला तरी आजतागायत कुठेही दिसले नाही! का बरे असे?
आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर संस्कृत ही आजच्या घडीला केवळ एक मृतभाषा आहे असे म्हटले तर ते माझ्या मते वावगे ठरू नये! आपले मत काय? वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांची कुणी मुद्देसूद कारणमिमांसा करेल का?
बहोत बहोत मेहेरबानी..
कळावे,
आपला,
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
26686
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
जी भाषा
त्या
In reply to जी भाषा by विजुभाऊ
.
In reply to त्या by विसोबा खेचर
मृत भाषा
सहमत
तिच्या
In reply to सहमत by वैशाली हसमनीस
तात्यानु, व
In reply to तिच्या by विसोबा खेचर
अहो पण
In reply to तात्यानु, व by घाटावरचे भट
तिला तुही आवडला नसशील!
In reply to अहो पण by विसोबा खेचर
तिला वाचवायला आधी आम्हाला ती समजायला नको का?
In reply to तिच्या by विसोबा खेचर
उदा -
In reply to तिला वाचवायला आधी आम्हाला ती समजायला नको का? by महेश हतोळकर
डोक्यावरून----
In reply to तिच्या by विसोबा खेचर
मृत नाही अर्धमेली
भलेही
In reply to मृत नाही अर्धमेली by अभिरत भिरभि-या
मुक्तसंगः
मला
In reply to मुक्तसंगः by वारकरि रशियात
धन्यवाद
In reply to मुक्तसंगः by वारकरि रशियात
सरल सुबोधा विश्वमनोद्या नैव क्लिष्टा न च कठिणा !
वावॅ ! जबरा
In reply to सरल सुबोधा विश्वमनोद्या नैव क्लिष्टा न च कठिणा ! by उर्मिला००
अनुवाद
In reply to वावॅ ! जबरा by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
सुंदर
In reply to अनुवाद by उर्मिला००
चॉली
In reply to सरल सुबोधा विश्वमनोद्या नैव क्लिष्टा न च कठिणा ! by उर्मिला००
सुंदर प्रतीसाद
In reply to सरल सुबोधा विश्वमनोद्या नैव क्लिष्टा न च कठिणा ! by उर्मिला००
प्रामाणीक
In reply to सरल सुबोधा विश्वमनोद्या नैव क्लिष्टा न च कठिणा ! by उर्मिला००
सुंदर प्रतिसाद...
In reply to सरल सुबोधा विश्वमनोद्या नैव क्लिष्टा न च कठिणा ! by उर्मिला००
चांगला विषय :)
कितीही
In reply to चांगला विषय :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजूनही शक्य आहे.
सहमत
In reply to अजूनही शक्य आहे. by कलंत्री
सुंदर प्रतिसाद
In reply to सहमत by मुक्तसुनीत
आउटडेटेड
In reply to सहमत by मुक्तसुनीत
मदत
देव मंड्ळी
In reply to मदत by विनायक प्रभू
मला संस्कृत थोडेफार येते.
धन्यवाद
In reply to मला संस्कृत थोडेफार येते. by प्रमोद देव
"भडवा" हा
In reply to मला संस्कृत थोडेफार येते. by प्रमोद देव
सहमत पण भाकड प्रश्न
बहुतेक होत
In reply to सहमत पण भाकड प्रश्न by धनंजय
सर्रास म्हणजे किती?
In reply to बहुतेक होत by विसोबा खेचर
सर्रास
In reply to सर्रास म्हणजे किती? by धनंजय
कारणमीमांसा - वेगळा चर्चाप्रस्ताव
In reply to सर्रास by विसोबा खेचर
मृत नक्कीच नाही . . .
आयला..
नक्की काय चालले आहे?
तात्या हा
In reply to नक्की काय चालले आहे? by रामपुरी
सुरुवात
तात्यांनी
तात्या खरं
असेच म्हणतो :)
In reply to तात्या खरं by भाग्यश्री
तात्या खरं