Skip to main content

शिवस्मारक - गरज की साधनसम्पत्तीचा अपव्यय?

लेखक mayu4u
Published on शनीवार, 24/12/2016
शासन ३६०० कोटी रुपये खर्चून शिवरायान्चे भव्य स्मारक अरबी समुद्रात बान्धणार असल्याची बातमी वाचली. महाराजांचे असामान्य कर्तृत्व वादातीत असल्याने त्यांचे (आणखी एक) स्मारक उभारणे वाईट नाही. मात्र त्यासाठी एवढा निधी (आणि अन्य साधनसम्पत्ती) खर्च करणे योग्य आहे का? विशेषतः राज्यासमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना? हा निधी अन्य उपयुक्त कामांकरिता वापरला गेला असता तर अधिक चांगले झाले असते का? मिपाकरांचे मत काय?

याद्या 26926
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

जितकी स्मारके आणि जितके पुतळे उभारायचेत तितके उभारा. पण शिवरायांचे साडेतीनशे किल्ले आधी दुरुस्त करा. त्यांची पडझड बघवत नाही. :-(

मराठा समाजाला आरक्षण सध्या देणं अवघड आहे,त्यावर उतारा म्हणून शिवस्मारकाचं काम हाती घेतलं आहे.मराठा समाज खुश ,भाजपचीही वोट बँकही पक्की.अजुन काय हवे.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

टफी तुमचे अनुमान योग्य आहे. कशासाठी पोटासाठी या धर्तीवर सर्व काही मतांसाठी. खर्च आज ३६०० कोटी आहे पूर्ण होईपर्यंत ५००० कोटीपर्यंत जाईल. जाऊद्या . कोणाच्या बापाचं काय जातं च्या मायला....

कायच्या काय खर्च करणार आहेत. किल्ले आणि इतर पुराण वस्तू, अवशेष यांचे संवर्धन आधी करा म्हणावे. त्याशिवाय समुद्रात ऑईल फिल्ड आणि संरक्षणाच्या-नेव्हीच्या दृष्टीने कितीसे वाईट आहे याचा विचार झाला का?

जितकी स्मारके आणि जितके पुतळे उभारायचेत तितके उभारा पण त्यांची साफसफाई तर नक्कीच ठेवा..... परत इतर पुतळ्यांसारखे हेसुद्धा चिमण्या कावळ्यांचे विश्रांती स्थळ होऊ देऊ नका.....

अनुक्रमे १ मे १९६० आणि १५ आॅगस्ट १९४७ पासून प्रश्न आहेत. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पैसे खर्च करण्यात काहीही वावगं नाही. हे स्मारक उभारलं नाही तर हे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटणार असं थोडंच आहे? उलट अनेक लोकांना काम मिळेल. पर्यटनाला चालना मिळेल, मुंबईत अजून एक प्रेक्षणीय स्थळ निर्माण होईल. शिवाजी महाराजांऐवजी औरंगजेबाचं स्मारक असतं आणि भाजप ऐवजी काँग्रेसने उभारायचं ठरवलं असतं तर हा धागा काढला असतात का? शिवाजी महाराजांसाठी कुणी काही करतंय तर लोकांना का खुपतं?

In reply to by बोका-ए-आझम

बहुतांशी मुद्द्यांशी सहमत! औरंगजेबाचं माहित नाही पण तेच मत गांधींच्या पुतल्याळाही लागू होऊ शकतं! हे स्मारक आणि एकात्मता पुतळा दोन्हीहि पर्यटनाच्या दृष्टीने बनवले जावेत एवढी मात्र इच्छा आहे! बऱ्याच लोकांना त्यातून व्यवसाय निर्माण केला जावा.

In reply to by बोका-ए-आझम

शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पैसे खर्च करण्यात काहीही वावगं नाही. असं वाटणं ही ज्याची त्याची विचारसरणी असू शकते. 'शिवाजी महाराजांसाठी कुणी काही करतंय तर लोकांना का खुपतं?' या तुमच्या विधानाचा तुम्हीच विचार करा. स्मारक शिवाजी महाराजांसाठी आहे की त्यांच्या नावाने पैसे जमा करणाऱ्यांसाठी (खरं तर खाणार्यांसाठी) आहे....? 'पर्यटनाला चालना मिळेल,' हे अजून एक भोंगळ विधान. हे स्मारक पूर्ण होई पर्यंतचा त्याचा खर्च. आणि या स्मारकामुळे वाढणारे पर्यटक यांचे गणित मांडून बघा. 'शिवाजी महाराजांऐवजी औरंगजेबाचं स्मारक असतं आणि भाजप ऐवजी काँग्रेसने उभारायचं ठरवलं असतं तर हा धागा काढला असतात का?' हे पुन्हा बुद्धिभेद करणारं विधान. मुंबई महापालिकेत MIM ची सत्ता आली तर औरंगजेबाचं स्मारक नक्की होईल.

In reply to by Nitin Palkar

का खुपतं?
स्मारक पूर्ण होई पर्यंतचा त्याचा खर्च. आणि या स्मारकामुळे वाढणारे पर्यटक यांचे गणित मांडून बघा.
ते आत्ता कसं मांडणार? किती पर्यटक स्मारक पूर्ण झाल्यावर येतील हे आत्ता, भूमिपूजन झाल्यावर कसं सांगणार? शिवाय हे स्मारक एखादी खाजगी कंपनी बांधत असती तर नक्कीच नफा हा विचार आला असता. म्हणूनच असले प्रकल्प सरकारलाच हातात घ्यावे लागतात. खाजगी क्षेत्र यात पडत नाही. नशीब CST स्टेशन बांधलं तेव्हा इथल्या शंकासुरांपैकी कोणी नव्हतं नाहीतर - घोडागाडी वापरणाऱ्यांना आगगाडी काय करायचीय? रेल्वे स्टेशनचा आकार आणि तिथले प्रवासी यांचं गणित मांडून बघा, त्यापेक्षा घोड्यांच्या नव्या ट्रामगाड्या चालू करा असले भोंगळ सल्ले मिळाले असते.

अनुक्रमे १ मे १९६० आणि १५ आॅगस्ट १९४७ पासून प्रश्न आहेत. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पैसे खर्च करण्यात काहीही वावगं नाही. हे स्मारक उभारलं नाही तर हे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटणार असं थोडंच आहे? उलट अनेक लोकांना काम मिळेल. पर्यटनाला चालना मिळेल, मुंबईत अजून एक प्रेक्षणीय स्थळ निर्माण होईल. शिवाजी महाराजांऐवजी औरंगजेबाचं स्मारक असतं आणि भाजप ऐवजी काँग्रेसने उभारायचं ठरवलं असतं तर हा धागा काढला असतात का? शिवाजी महाराजांसाठी कुणी काही करतंय तर लोकांना का खुपतं?

In reply to by बोका-ए-आझम

बोकाभौ, स्मारकासाठी तीन-साडेतीन कोटी रु. खर्च करणे योग्य की अयोग्य ही चर्चा होणे लोकशाहीच्या दृष्टीने योग्यच आहे. अयोग्य म्हणणार्‍यांचे देखील काही आक्षेप विचार करण्यायोग्य असू शकतात. सर्वच लोक केवळ कॉंग्रेसचे समर्थक आहेत म्हणून भाजपाच्या प्रकल्पाला विरोध करीत आहेत असा सूर चुकीचा वाटला. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होईल हा आक्षेप किंवा, कोळी लोकांचा रोजगारावर गदा येईल असा आक्षेप हे योग्य आहेत की नाहीत? स्मारके, पुतळे आदी महापुरूषांच्या कार्याचा गौरव म्हणून निर्माण केले असले तरीही वास्तवात ती निरोपयोगी प्रतीकेच ठरतात व प्रत्यक्ष लोकांच्या रोजच्या जीवनात उपयोगी न ठरल्याने काही काळातच विस्मृतीत जातात. आंबेडकरांचे, गांधींचे तसेच इतरही महामानवांचे असंख्य पुतळे भारतात आहेत, मात्र त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा अभ्यास करणार्‍या संस्था नाहीत. त्यामुळे असंख्य पैलू असणार्‍या या महामानवांच्या कार्याचे समग्र आकलन झाले नाही, त्यांचे व्यक्तीत्व संकुचीत झाले. शिवाजी महराजांचे तसे नाही, किल्ल्यांच्या, पोवाड्यांच्या, असंख्य संस्थांच्या रुपाने महाराष्ट्र त्यांच्या स्मॄती जतन करतो. आर्थीक मदतीअभावी यातेल कित्येक संस्था मोडकळीला आलेल्या आहेत, गड किल्ल्यांची दुरवस्था तर बघायलाच नको, अशा वेळी स्मारकाविषयी चर्चा, विचारमंथन होऊन हे सर्वच प्रश्न ऐरणीवर आले तर बरंच आहे.

In reply to by पुंबा

आक्षेप घेणाऱ्यांना आक्षेप घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि जर या सरकारने स्मारक रखडवलं तर आपण सगळ्यांनी त्यावर टीका करायलाच पाहिजे. पण प्रश्न timing चा आहे. माझ्या अल्पमतीनुसार स्मारकाची योजना २००४ मधली आहे. तेव्हा ₹१०० कोटी एवढा खर्च अपेक्षित होता. आता २०१६ मध्ये तोच खर्च ₹३६०० कोटी झालेला आहे. २००४ ते २०१४ या काळात हे स्मारक बांधून पूर्ण झालं असतं. पण ते नाही झालं दरम्यान राज्यात सत्ताबदल झाला. आत्ता जर या सरकारने हे स्मारक अव्यवहार्य म्हणून नाकारलं असतं तर त्यावरून राजकीय गदारोळ झाला असता. इथे पण विरोध करणाऱ्या अनेकांनी तो मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या जातीशी निगडीत करुन ब्रिगेडी/बीग्रेडी विधानं केली असती. आता जेव्हा सत्ताधारी पक्ष हे स्मारक करणार असं म्हणतोय तेव्हा अनावश्यक खर्चाचा मुद्दा रेटला जातोय, ज्याच्याशी आत्ता सत्तेत असलेल्या पक्षाचा संबंध नाही कारण जेव्हा हे स्मारक बनवण्याचं ठरलं तेव्हा ते सत्तेत नव्हते. त्यामुळे हा विरोध राजकीय आहे हे स्पष्ट आहे. आणि ते चुकीचं आहे. मी हाच मुद्दा मांडलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

स्मारकाची योजना २००४ मधली आहे. तेव्हा ₹१०० कोटी एवढा खर्च अपेक्षित होता. आता २०१६ मध्ये तोच खर्च ₹३६०० कोटी झालेला आहे.
बोकाभौ, हे तुम्हाला कितपत योग्य वाटते? खरंच खर्च एवढा वाढला असेल का? की ठेकेदारांची धन करण्याची नवी क्लृप्ती? असो. हे स्मारक जर होणरच असेल तर सरकारने अतीशय काटेकोरपणे एका पैचाही भ्रष्टाचार न होऊ देता हा प्रकल्प तडीस न्यावा, कोळी बांधवांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवावेत. पर्यावरणाची हानी न होऊ देता काम पूर्ण व्हावे. रयतेच्या भाजीच्या देठाचाही अपहार न पाहू शकणार्‍या कल्याणकारी राजाचे स्मारक त्यांच्या कीर्तीला साजेशे व्हावे.

In reply to by बोका-ए-आझम

इथे पण विरोध करणाऱ्या अनेकांनी तो मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या जातीशी निगडीत करुन ब्रिगेडी/बीग्रेडी विधानं केली असती. आता जेव्हा सत्ताधारी पक्ष हे स्मारक करणार असं म्हणतोय तेव्हा अनावश्यक खर्चाचा मुद्दा रेटला जातोय, ज्याच्याशी आत्ता सत्तेत असलेल्या पक्षाचा संबंध नाही कारण जेव्हा हे स्मारक बनवण्याचं ठरलं तेव्हा ते सत्तेत नव्हते. त्यामुळे हा विरोध राजकीय आहे हे स्पष्ट आहे. आणि ते चुकीचं आहे. मी हाच मुद्दा मांडलेला आहे.
ब्रिगेडी विधाने सुरू झालीत. कालच "जलाशयात लघुशंका फेम" असलेले एक मंत्री म्हणाले की आज भाजपला अचानक शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आले आहे. पण याच महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला होता? त्यांचे चुलतेसुद्धा अशीच सूचक विधाने करतात.

In reply to by बोका-ए-आझम

बोका भाऊ पर्यटन स्थळ करायचं आहेत तर ते किल्ल्यावर पण होऊ शकतात कि. त्यासाठी वेगळं स्मारक कशाला. अजून एक राजांनी जलदुर्ग पण बांधले आहेत तिथे सुधाला बांधू शकले असते स्मारक. ते तर उत्तम उदाहरण झालं असतं आणि तुम्ही म्हणता तसे पर्यटनात वाढ होऊन पूर्ण जिथे स्मारक आहे तिथल्या आजूबाजूच्या लोकांना नक्की रोजगार मिळाला असता हे स्मारक बांधल नाही तर सगळे प्रश्न लगेच सुटणार नाही हे मान्य पण काही तर सुटतील ना.

In reply to by महासंग्राम

पण मग मुंबईजवळच्या समुद्रात का नाही? शिवाय मुद्दा जर खर्चाचा आहे तर किल्ल्यांवर स्मारक बांधायलाही खर्च येणारच आहे की. ते फुकटात थोडंच होणार आहे? म्हणजे अनावश्यक खर्चाचा मुद्दा तिथेही येतोच. शिवाय मुंबई स्वराज्यात असावी अशी स्वतः महाराजांची इच्छा होती, जी दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही. मुंबई आणि सुरत यांच्यासारख्या बंदरांमुळे आणि आरमारामुळे ब्रिटिश भारतात बलिष्ठ होऊ शकतात हा विचार करूनच त्यांनी आपलं अारमार उभारलं ना. याला ऐतिहासिक आधार काय असं कुणी म्हणेल. ठीक आहे. महाराज जर महाराष्ट्राचं दैवत आहेत तर महाराष्ट्राच्या राजधानीत त्यांचं स्मारक असणं यात काय चुकीचं आहे? तिसरा मुद्दा. मुंबईला दरवर्षी अनेक देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. जर या स्मारकाचा खर्च पर्यटनातून भरून काढायचा असेल तर ते मुंबईमध्ये आणि जायला सोपं असलं पाहिजे. किल्ले चढून किती पर्यटक जातील? मुंबईपासून दूर असलेल्या जलदुर्गांवर किती पर्यटक जातील? शिवप्रेमी महाराजांच्या नावाने कुठेही जातील पण प्रत्येकजण तसा असेल असं नाही ना? उलट या स्मारकामधून मिळणारा पैसा सरकारने या किल्ल्यांच्या जीर्णोद्धारासाठी वापरला पाहिजे. त्यामुळे ते मुंबईत असणं हे योग्य आहे. त्याचा खर्च वाढण्याचं कारण त्याला झालेला उशीर आहे. पण तसा उशीर आपल्या देशात अनेक गोष्टींना झालाय. मग आत्ताच असं काय झालंय की त्याला विरोध व्हावा?

In reply to by बोका-ए-आझम

मालक माझा पहिला मुद्दा आहे कि मुळात स्मारकच नको. त्या पैशातून बाकीचा विकास करावा. पण स्मारक होणार आहे हे नक्कीच तर ते योग्य ठिकाणी असावं विशेषतः एखाद्या किल्ल्याजवळ (किल्ल्यावर नाही ) जेणेकरून स्मारक पाहायला येणारे पर्यटक महाराष्ट्रात आले तर पूर महाराष्ट्राच्या इतर पर्यटनाला चालना मिळाली असती कि.

In reply to by महासंग्राम

हे स्मारक बांधल नाही तर सगळे प्रश्न लगेच सुटणार नाही हे मान्य पण काही तर सुटतील ना. हे अगदी खरं आहे.

In reply to by बोका-ए-आझम

बोक्याभाऊ, सहमत. आता कळेलच उठता बसता महाराजांचा नाव घेणारे किती जण स्मारकाला विरोध करतात ते. माझा मत असं, जर अमेरिकेत स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आहे, रिओ मध्ये हि आहे, पॅरिस मध्ये इफेल टॉवर आहे. मग शिवसागरात शिवस्मारक का नको? हा देशाच्या अस्मितेचा, सांस्कृतिक ओळखीचा प्रश्न आहे. बरं जर स्मारकावर पैसे खर्च होतात, हाच जर विषय असेल, तर किती पुतळे आहेत हो देशभर पुढाऱ्यांचे? सरकारी खर्चाने बांधलेले? दिल्लीत जा, हे एकरोगणती जागेत इंदिरा गांधींचे स्मारक. नवीन बांधायला खर्च नसेल आला, पण त्याचा वापर सरकारी कामकाजासाठी पूर्णपणे थांबलाच ना? या चुकीच्या पायंड्यामुळे आता कोणीही उठतो आणि स्मारकासाठी जागा मागतो. हा वायफळ खर्च नाही? माझ्या राजाचे पुतळे देशभर आहेत, आणि बहुतेक लोकांनी लोकसहभागांतून उभारलेले आहेत. लोकांच्या मनातली प्रतिमा हे त्यांचं स्मारक आहे. असं असताना स्मारकाला विरोध केला जाऊ नये हि माफक अपेक्षा.

In reply to by बोलबोलेरो

हा वायफळ खर्चच आहे. म्हणुनच तर लोकंनी त्यांना हाकल्ले ना. अहो ३ वर्शे लागली पुणे मेट्रोचे भुमिपुजन होता होता. ज्या राजाला तुम्ही मालकी हक्काने दावणीला बांधु पाह्ताय त्याच्याजवळ पैसे नव्हते का महाल उभारायला? त्यांनी पैसा राज्यासाठी खर्च केला म्हणुन आज त्यांच नाव काढ्तोय आपण. शाहजहान : पत्नीचे स्मारक म्हणुन ताजमहाल बांधला. बाबर, हुमायुन, अकबर, जहांगीर, सगळ्यांची स्मारके आहेत, काहींनी तर स्वतःचीच जागा ठरवुन बांधुन घेतलेली. हीच गत काँग्रेसी पुढार्यांची. प्रत्येकाने शेकडो एकर जमिनींवर आपला पसारा मांडुन ठेवला आहे. पण शिवाजी महाराजः राजगड आणि रायगड बांधले. अवाढव्य स्मारके बांधत नाही बसले. ना बायकोचे, ना वडिलांचे, ना आणखी कुणाचे. सोन्याचा फाळ लावला, सोन्याची कौले नाही. आपण कुणाची परंपरा चालवायची, मोगलांची, काँग्रेसची का शिवाजी महाराजांची?

शिवस्मारक करून ते पाहण्यासाठी भक्कम तिकिट आकारले तर एक नवीन पर्यटनस्थळ निर्माण होऊन भरपूर कमाई होऊ शकेल. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा बघण्यासाठी एका छोट्या जहाजातून जावे लागते. संपूर्ण फेरीसाठी व पुतळा बघण्यासाठी खूप भारी किंमतीचे तिकीट विकत घ्यावे लागते. त्याच धर्तीवर शिवस्मारक केल्यास काही वर्षांनी खर्च वसूल होऊन उत्पन्न मिळू लागेल. त्यानिमित्ताने काही छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.

In reply to by श्रीगुरुजी

शिवस्मारक केल्यास काही वर्षांनी खर्च वसूल होऊन उत्पन्न मिळू लागेल.
तुम्ही गणिताचे शिक्षक आहात ना? जरा गणित करुन सांगाल काय अंदाजे किती वर्षांनी किती उत्पन्न मिळून खर्च वसूल होईल....

In reply to by बोका-ए-आझम

असा नाद इथे बरेच जणांना माझ्याबाबतीत लागलेला आहे त्यामुळे तुम्हाला तसे वाटत असावे... अर्थात तुम्हाला काय वाटावे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न. त्यात मी काही बोलणे योग्य नाही. :-)

In reply to by संदीप डांगे

यु मीन, इफ अ ड्वाग बाईट्स यु , ठुमी पण ड्वाग ला बाईट बॅक करनार! ओ माय माय! धिस इज नॉट डन मिस्टर्स, बोथ ऑफ एम इंव्हॉल्वड इन धिस सूप

In reply to by फेदरवेट साहेब

आय नेवर सेड आय्याम बाइटींन बॅक एन्न्यी बडी हिआर्... =)) डोन्चू पुट येन्निथिंग इन मा माउथ!

In reply to by संदीप डांगे

नक्कीच सांगता येईल. Projection/Estimation म्हणजे Rocket Science नाही. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती (एकूण खर्च, वेळापत्रक, संभाव्य समस्या, संभाव्य जोखीम इ.) मिळाली तर नक्कीच संभाव्य पर्यटक संख्या, संभाव्य प्रवेश फी इ. निश्चित करून जवळपास अचूक आकडा काढता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

अचूक नव्हे हो, अंदाजे आकडा हवाय. आता तुम्ही खर्च वसूल होईल म्हणालात तर एक उत्सुकता आहे की कसा व किती होईल. नुसतं व्हेग विधान असेल तर ठिक आहे माझा प्रश्न मागे घेतो.

In reply to by संदीप डांगे

अंदाजे आकडा देता येईल. जवळपास अचूक असणारा आकडा सुद्धा देता येईल. Estimation/Projection/Forecast करणे फार अवघड काम नाही. अगदी छोट्या गोष्टींचा सुद्धा आपण अंदाज करून त्याप्रमाणे खर्चाची तजवीज करीत असतो. कोठेही प्रवासाला जाणार असलो किंवा त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे घरात एखादे लग्नकार्य असले की मंडळी आधी खर्च, वेळ, माणसे इ. चा अंदाज काढूनच पुढील योजना बनवितात. संगणक क्षेत्रात अंदाजासाठी (वेळ, खर्च, माणूसबळ इ.) २-३ वेगवेगळ्या प्रकारची प्रारूपे उपलब्ध आहेत. ही प्रारूपे वापरताना संभाव्य विलंबाची कारणे, संभाव्य जोखमी, संभाव्य समस्या, भूतकाळातील समानधर्मी प्रकल्पांची प्रत्यक्ष आकडेवारी अशा अनेक गोष्टींचा वापर करून प्रकल्पाची योजना बनविली जाते. प्रकल्पारंभाची तारीख, प्रकल्पांताची संभाव्य तारीख, प्रकल्पाला लागणारे एकूण माणूसबळ, एकूण प्रकल्पखर्च, संभाव्य करपूर्व व करपश्चात नफा, प्रकल्पापासून मिळणारे संभाव्य उत्पन्न, किती प्रमाणात हे अंदाज चुकु शकतील याची आकडेवारी, अंदाज चुकल्यामुळे होणारे नकारात्मक परीणाम टाळण्यासाठी प्रकल्प योजनेत ठेवले जाणारे बफर अशा अनेक गोष्टींचा विचार करून अंतिम प्रकल्प योजना तयार केली जाते. प्रकल्पाची जितकी जास्त माहिती उपलब्ध असते तितक्या जास्त प्रमाणात अंदाजाची अचूकता असते. प्रकल्प योजना संपूर्ण करून प्रकल्प सुरू केला तरी मूळ अंदाजानुसार प्रकल्प किती बाजूला जात आहे यावर सातत्याने लक्ष ठेवले जाते व त्यासाठी नियमित काळाने प्रकल्पाची समीक्षा करून त्यानुसार सुधारीत अंदाज काढला जातो किंवा त्यानुसार अधिक मनुष्यबळ लावून किंवा अधिक काम करून मूळ योजनेप्रमाणे प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. शिवस्मारक हा प्रचंड प्रकल्प आहे. या प्रकल्पाला प्रचंड खर्च, प्रचंड वेळ, प्रचंड मनुष्यबळ लागणार आहे. त्याचबरोबरीने या प्रकल्पात असंख्य ज्ञात अज्ञात अडचणी, धोके येऊ शकतात. प्रकल्प अर्धवट झाल्यावर काही नैसर्गिक मर्यादा येणे, स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतल्यास विलंब होणे, प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल व साहित्य वेळेवर न मिळणे, या मालाची भविष्यातील संभाव्य किंमत वाढणे, देशावर एखादे परचक्र आल्यास प्रकल्पाचे काम बंद पडणे अशा असंख्य गोष्टींचा विचार करावा लागेल. भूतकाळात अशी स्मारके झाली असतील त्या प्रकल्पांच्या आकडेवारीचा अभ्यास करून, नवीन कामाचा सखोल अभ्यास करून, सर्व घटकांची जास्तीत जास्त माहिती मिळवून प्रकल्प वेगवेगळ्या ट्प्प्यात विभागून प्रत्येक टप्प्याच्या खर्चाचे, वेळेचे, मनुष्यबळाचे अंदाज काढता येतील. सर्व टप्प्यांच्या अंदाजाचे एकत्रीकरण करून प्रकल्प पूर्ण होण्याची संभाव्य तारीख, संभाव्य खर्चे, संभाव्य मनुष्यबळ काढून त्यानुसार संभाव्य पर्यटक संख्येचा अंदाज काढून व पुढील काळातील देखभालीच्या खर्चाचा संभाव्य अंदाज काढून शिवस्मारक पाहण्यासाठी किती प्रवेशशुल्क ठेवावे लागेल, तिथे अजून कोणकोणत्या सशुल्क सुविधा देता येतील हे ठरविता येईल. हे सर्व काम अर्थातच प्रचंड काम आहे. यासाठी अनेक तज्ज्ञांच्या ३-४ वेगवेगळ्या टीम्स बनवून सर्व संभाव्य खर्चाचा अंदाज व संपूर्ण प्रकल्पाची योजना तयार करता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

एवढं लिहित बसलात, गरज नव्हती कारण मी विचारलेल्या प्रश्नाच्या दृष्टीने काहीही उपयोगाचं नाही राव एव्ढ्या मेगाबायटीत. तुम्ही लिहिलं खर्च वसूल होईल, तर तो कसा याचा ढोबळ अंदाज द्या. स्मारकावर खर्च होणारा आकडा ३६०० कोटीच फक्त धरुयात, किती वर्षात कसा वसूल होईल याचा काहीतरी अंदाज तुम्ही विधान करतेवेळी केलाच असेल की नाही? व्हेग विधान असल्यास तसं सांगा. सद्यस्थितीत आपण बघूयात. २०१०-२०११ च्या आर्थिक वर्षात केंद्रिय सरकारच्या अखत्यारित असलेल्या देशभरातल्या ११६ पर्यटनस्थळांची कमाई ८७ कोटी रुपये होती. ज्यातले वीसेक कोटी रुपये एकट्या ताजमहालच्या फीतून आलेत. एकट्या आग्रा परिक्षेत्रात असलेल्या आठ स्थळांपासून सुमारे ३८ कोटी मिळालेत. ताजमहाल हे देशात सर्वात जास्त महसूल गोळा करणारे पर्यटनस्थळ म्हणून कायम एक नंबरवर आहे. तर २०१५ मध्ये ह्याच ताजमहालची कमाई २२ कोटींच्या जवळपास आहे. चार वर्षात दोन कोटींची (१०%) वाढ. दिल्ली, औरंगाबाद, सांची इत्यादींची कमाई खालील बातमीत विस्ताराने मिळेल. http://timesofindia.indiatimes.com/india/At-Rs-20-crore-Taj-Mahal-remains-a-top-draw/articleshow/9402634.cms http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Taj-Agra-Fort-top-earning-monuments/articleshow/39850514.cms http://www.toursnfoods.com/top-revenue-generating-tourist-spot/ शेकडो वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या व पर्यटनविभाग मार्केटींगची पराकाष्ठा करत असतांना सदर महसूल सुमारे १०० कोटींच्या आसपास आहे, तोही सर्व देशातल्या ११६ स्थळांचा. ताजमहालच्या तोडीस्तोड शिवस्मारकाला २० कोटींचा रेवेन्यू मिळेल असा अगदी व्हेग, अगदी कैच्याकै अंदाज लावला तरी खर्च वसूल व्हायला अंदाजे १८० वर्षे लागतील. मुंबईत येणारे एकूण पर्यटक, त्यातले देशी, विदेशी, त्यांच्यापासून मिळणारा महसूल, अप्रत्यक्ष रोजगार-निर्मिती, अप्रत्यक्ष कमाई अशी सर्व आकडेवारी उपलब्ध आहे जालावर. शिवस्मारकाच्या पर्यटनातून होणारी संभाव्य वसूलीचा आकडा काढणे वाटते तितके कठिण नाही. फक्त तो आकडा स्मारकाची भलामण करणार्‍यांना रुचणार नाही इतकेच. शिवस्मारकापासून पर्यटनमाध्यमातून खर्च वसूल होईल असे म्हणणे एक व्हेग विधान आहे, ज्याला काहीही आधार नाही. एक नवीन पर्यटनस्थळ बांधून त्यापासून कमाईचा विचार करणे हास्यास्पद आहे. विनाकारण केल्या जाणार्‍या खर्चाकडे बोट दाखवणार्‍यांना खोडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणता येईल फारतर. त्यामुळे यापुढे कोणी "खर्च वसूल करता येईल" हे विधान करणे योग्य राहणार नाही असे समजण्यास हरकत नाही.

In reply to by संदीप डांगे

हे तुम्ही मान्य करताय तर. पुढचे मुद्दे बघा. १.ताज जेव्हापासून बांधून पूर्ण झाला तेव्हापासून त्यासाठी तिकिट होतं का? त्याला किमान ४०० वर्षे (जास्तच) झाली असतील. त्यातली किती वर्षे त्याला तिकिट होतं? २.ताज बघायला पर्यटक वर्षाचे बाराही महिने येत नाहीत. उन्हाळ्यात तर तिथे असह्य उकाडा असतो. मुंबईत बाराही महिने पर्यटक येतात. आग्र्यापेक्षा नक्कीच जास्त काळ. ३. या प्रकल्पाचं नक्त सद्य मूल्य हे धन आहे. इंग्लिशमध्ये सांगायचं तर - Net Present Value is positive. (NPV = Difference between the cash flows from the project for its life and its cost i.e. Rs.३६०० crores) ४. जर हे स्मारक आहे (ताज हेही स्मारकच आहे) तर त्याचं आयुष्य नक्कीच १००-२०० वर्षांहून जास्त धरायला पाहिजे. ५.शिवाय तिकिटांचा दर, चलनवाढीचा दर वगैरे गोष्टी तुम्ही धरलेल्याच नाहीत. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे - नकारात्मकतेपुढे काहीही उत्तर नाही.

In reply to by बोका-ए-आझम

सगळं राजीखुशीत चालवूनच घ्यायचं असेल तर हिशोब तरी का करावा, हौसेला मोल नसतं असं म्हणावं आणि सोडून द्यावं. मात्र रोजगार निर्मिती, पर्यटनातून खर्चवसूली असली गाजरे दाखवू नयेत. अनेक सरकारी प्रकल्प हे रेव्हेन्यू जनरेशन नाही तर जनतेला त्यांच्या राहणीमानात दृष्यमान, मोजता येण्यासारखी सुधारणा करता यावी यास्तव राबवले जातात. अशा प्रकल्पांचे टॅन्जीबल+इन्टॅन्जिबल बेनिफिट्स दिसून येतात, मोजता येतात. शिवस्मारकापासून असे काही होत असेल तर मांडा. रेव्हेन्यू जनरेशन: ३६०० रुपयाच्या गुंतवणूकीतून पुढील २०० वर्षे दरवर्षी २० रुपये मिळतील अशी योजना कोणाही बॅन्कमॅनेजरसमोर मांडा आणी त्याची रिअ‍ॅक्शन बघा मग रेव्हेन्यूचा अर्थ सांगा. चलनवाढीचा दर होणार्‍या खर्चालाही (बांधकाम+देखभाल+पगार) लागेल की नाही? आधीच तयार असलेल्या, सद्यसरकारला निर्मितीसाठी कोणताही खर्च न करायला लागलेल्या स्मारकापासूनचे उत्प्पन हा निव्वळ नफा आहे. एखादा फ्लॅट तुम्हाला वडिलांनी दिला आणि तुम्ही त्यात भाडेकरी ठेवून भाडे कमवत असाल तर फायदेका सौदा. तुम्हीच स्वतःच्या खिशातून ३६ लाख खर्च करुन फ्लॅट घ्यायचा आणि त्यावर वर्षाला वीस हजार रुपये भाडं घेत आहात, तो फ्लॅट विकण्याचा प्रश्नच नाही त्यामुळे ३६ लाख ही डेड इन्वेस्टमेंट झाली. तसेच ते ३६ लाख वसूल करायचे तर २०० वर्षे तो फ्लॅट जसाच्या तसा ठेवण्याचा खर्च वेगळा. तर ह्या फ्लॅटमधून तुम्ही तो खर्च वसूल करुन नफ्यात कधी आणू शकाल याचे गणित मांडा. नसेल मांडता येत तर तो फ्लॅट मी फक्त दिखावा करायला विकत घेतला असं सांगा आणि मोकळे व्हा. उगाच रेव्हेन्यू च्या पोकळ बाता कशाला? नैका? ताजमहालच्या किंवा कोणत्याच राष्ट्रीय स्मारकाच्या बाबतीत देशाला हा बांधकामाचा खर्च करावा लागलेला नाही. पूर्वजांच्या स्मारकांना टिकिट लावून दाखवतोय. ताजमहाल आणि शिवस्मारकात मूलभूत फरक आहे. ताजचे उदाहरण फक्त 'पर्यटनातून किती कमाई होऊ शकते' ह्याची खरी वस्तुस्थिती दाखवण्यासाठी आहे. चलनवाढीचा दर, टिकिटाचा दर इत्यादी गोष्टी (ज्या इतर स्थळांच्या उदाहरणांवरुन उपलब्ध आहेत) अभ्यासकांनी मांडून माझे मत खोडून दाखवावे. फक्त व्हेग विधाने करु नये. काही आधार तरी असावा. असे दावे खोडण्याला तुम्ही निगेटीविटी म्हणत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. कुणाला प्रॅक्टिकल प्रतिवाद करायचा असल्यास खालील सर्वेतील माहिती उपयोगात येईल.. http://tourism.gov.in/sites/default/files/Other/Maharashtra_0.pdf

In reply to by संदीप डांगे

३६०० रुपयाच्या गुंतवणूकीतून पुढील २०० वर्षे दरवर्षी २० रुपये मिळतील अशी योजना कोणाही बॅन्कमॅनेजरसमोर मांडा आणी त्याची रिअ‍ॅक्शन बघा
म्हणूनच असले प्रकल्प सरकारलाच राबवावे लागतात. खाजगी क्षेत्र एवढा लांबचा विचार करणारच नाही. त्यामुळे इथे तुम्ही काही वेगळा मुद्दा सांगितला नाहीये. बाकीचे जे मुद्दे आहेत त्यांचा संबंध समजला नाही. उदाहरणार्थ
आधीच तयार असलेल्या, सद्यसरकारला निर्मितीसाठी कोणताही खर्च न करायला लागलेल्या स्मारकापासूनचे उत्प्पन हा निव्वळ नफा आहे.
हा या सरकारचा दोष आहे?ही योजना आधीच्या सरकारांनी हात न लावता ठेवून दिली त्याला हे सरकार कसं काय जबाबदार आहे? बरं, निव्वळ नफा कसा काय? या सरकारला काहीच खर्च स्मारक बांधण्यासाठी करावा लागणार नाहीये असं तुमचं म्हणणं आहे का? स्मारकाची जमीन तशीच ठेवली असती तर ती डेड इनव्हेस्टमेंट ठरली असती. स्मारक उभारायचंच नाही असं ठरवलं असतं तर शिवाजीमहाराजांच्या स्वघोषित भक्तांनी त्यावरही आवाज केला असता.
तसेच ते ३६ लाख वसूल करायचे तर २०० वर्षे तो फ्लॅट जसाच्या तसा ठेवण्याचा खर्च वेगळा.
यातून नफा कमावण्याचा सरकारचा उद्देश आहे असं त्यांनी कुठे म्हटलंय? उत्पन्न कमवण्याचा आहे, नफा नाही. तुमचा उत्पन्न आणि नफ्यात गोंधळ होतोय. एक काम करा. आधी आपल्याला नक्की कशाचा राग आलाय ते शांतपणे ठरवा. या स्मारकाकडे हे सरकार इतर कोणत्याही प्रकल्पाप्रमाणे बघतंय त्याचा राग आलाय की नक्की कशावर टीका करायची हे समजत नसल्याचा राग आलाय? कारण फ्लॅट, बँकर वगैरे उदाहरणं पूर्णपणे गैरलागू आहेत. इतकं मोठं स्मारक (झालं तर) हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. शिवाय हे स्मारक आत्ता भूमिपूजन झालेल्या अवस्थेत आहे. ते पूर्ण होईल तेव्हा बघू ना. तेव्हा जर तो पांढरा हत्ती ठरला तर धागा काढूच आपण.

In reply to by बोका-ए-आझम

बोका शेट हा प्रकल्प अगोदरच्या सरकारने मंजूर केला आहे त्याबद्दल त्यांनी "काहीच केले नाही". आपण म्हणता तसे या सरकारला हा प्रकल्प पूर्ण करणे हि राजकीय अपरिहार्यता आहे. हा प्रकल्प "करणार नाही" हे म्हणणे कुणालाच राजकीय दृष्ट्या शक्य नाही.पण त्यातून आताच्या सरकारला त्याचा राजकीय फायदा होणार आहे याचा हा पोटशूळ आहे. प्रकल्पाला विरोध करणे हि राजकीय आत्महत्या आहे हे सर्वाना माहिती आहे त्यामुळे तो मुद्दा बाद ठरतो उद्या प्रकल्प झाल्याने जनमत या सरकारच्या बाजूने झाले तर तेलही गेलं तूप हि गेलं हि स्थिती होते आहे म्हणून काँग्रेस किंवा राष्ट्रवादी लोक याच्या खर्चाचा मुद्दा उगाळत आहेत. मूळ प्रकल्पाचा खर्च अवाढव्यच होता( महागाई गृहीत धरली तर खर्च तेंव्हा होता तितकाच खर्चिक होता/आहे). अस्मितेचा प्रश्न आला कि बाकी सर्व मुद्दे मागे पडतात. बाकी सुश्री मायावती यांनी ४०००० कोटी रूपये स्वतःच्या हत्तीच्या आणि डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यावर खर्च केले http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-mayawati-s-parks-elephants-and-a-rs-40000-crore-scam/20120516.htm त्यावर मिपा वर चर्चा किंवा घमासान झाल्याचे आठवत नाही. कदाचित तसे करणे म्हणजे प्रतिगामी ठरण्याची भीती असावी.

In reply to by बोका-ए-आझम

असले प्रकल्प सरकारलाच राबवावे लागतात. खाजगी क्षेत्र एवढा लांबचा विचार करणारच नाही. त्यामुळे इथे तुम्ही काही वेगळा मुद्दा सांगितला नाहीये. >> तुम्हाला नक्की कसले प्रकल्प शिवस्मारकाशी साधर्म्य दाखवणारे आहेत ते सांगितलं तर स्पष्ट होईल. प्रकल्पांचे उद्दिष्टही स्पष्ट असते. आली लहर केला कहर असे सरकारी प्रकल्पाचे नसते.
हा या सरकारचा दोष आहे?ही योजना आधीच्या सरकारांनी हात न लावता ठेवून दिली त्याला हे सरकार कसं काय जबाबदार आहे? बरं, निव्वळ नफा कसा काय? या सरकारला काहीच खर्च स्मारक बांधण्यासाठी करावा लागणार नाहीये असं तुमचं म्हणणं आहे का? स्मारकाची जमीन तशीच ठेवली असती तर ती डेड इनव्हेस्टमेंट ठरली असती. स्मारक उभारायचंच नाही असं ठरवलं असतं तर शिवाजीमहाराजांच्या स्वघोषित भक्तांनी त्यावरही आवाज केला असता.
बंधो, तुम्ही काय बोलताय? मी कधी म्हटले ह्यात कोण्या ढवळ्यापवळ्या सरकारचा दोष आहे ते? त्यामुळे कोनत्या पक्षाचे सरकार, किंवा हे सरकार की मागच्या टर्मचे सरकार हा मुद्दाच गैरलागू आहे. उगाच भलतीकडे नेऊ नका माझा मुद्दा. मला काय म्हनायचं आहे ते वर स्पष्ट लिहिलंय. त्यातून भलते अर्थ काढण्याची काहीही गरज नाही. तेच तेच परत लिहिणं योग्य वाटत नाही. ह्या सरकारला स्मारक बांधण्यासाठी ३६०० कोटी खर्च करायचेत. त्यालाच तर विरोध आहे. मी कधी म्हटले की सरकारला खर्च करावा लागणार नाही? कैच्याकै? स्मारकाची जमीन नै आहे. भराव टाकून नवीन जमीन तयार करनार आहेत. भराव टाकण्याचा खर्च आहेच. चला तुम्ही एक मान्य केलेत की स्मारकाला समर्थन करनारे महाराजांचे स्वयंघोषित भक्त आहेत. हेही नसे थोडके! =)) मुळात खर्‍या-खोट्या भक्तांच्या आवाजाचा प्रश्न आहे असे कुठून शोध लागलेत? प्रश्च औचित्याचा आहे.
यातून नफा कमावण्याचा सरकारचा उद्देश आहे असं त्यांनी कुठे म्हटलंय? उत्पन्न कमवण्याचा आहे, नफा नाही. तुमचा उत्पन्न आणि नफ्यात गोंधळ होतोय.
मी सरकारला कुठे प्रश्न विचारलाय, ज्यांनी प्रकल्पाचा खर्च पर्यटनातून वसूल होईल असे म्हटलंय त्यांना विचारत आहे. 'खर्च वसूल होणे' ह्याला काय म्हणायचे मग? बरं उत्पन्न हा सरकारचा हेतू असेल तर त्यासाठी अनेक प्रकल्प धूळ खात पडलेत नीधीची वाट बघत.
आधी आपल्याला नक्की कशाचा राग आलाय ते शांतपणे ठरवा. या स्मारकाकडे हे सरकार इतर कोणत्याही प्रकल्पाप्रमाणे बघतंय त्याचा राग आलाय की नक्की कशावर टीका करायची हे समजत नसल्याचा राग आलाय? कारण फ्लॅट, बँकर वगैरे उदाहरणं पूर्णपणे गैरलागू आहेत. इतकं मोठं स्मारक (झालं तर) हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. शिवाय हे स्मारक आत्ता भूमिपूजन झालेल्या अवस्थेत आहे. ते पूर्ण होईल तेव्हा बघू ना. तेव्हा जर तो पांढरा हत्ती ठरला तर धागा काढूच आपण.
मी नक्की कशावर टिका करतोय हे मलाही नीट माहित आहे, तुम्हालाही. उगाच नसते वैयक्तिक रोखाचे (राग आलाय, कशावर टिका करायची हे समजत नाही) प्रश्न कशाला? 'उत्पनातून खर्च वसूल' कसा व कधी होईल हे नीटपणे कोणीही सांगावं. नसेल सांगता येत तर ह्याला काही आधार नाही असे म्हणावे, सोप्पंय. समुद्रात असलेल्या स्मारकाचं 'भूमिपूजन' झालंय ते निवडणुकींत शिवसेनेवर कुरघोडी करायला. बाकी सब आपको पता है. =)) ह्या धाग्यावरचा हा शेवटचा प्रतिसाद. जे लिहायचं ते सविस्तर लिहून झालंय. यापुढे ह्या धाग्यावर वाचनमात्र.

In reply to by संदीप डांगे

डांगेजी, हे वाचनमात्र वगैरे पटत नाही. काही मुद्दे मांडले आहेत ते तडीस जावेत. पुरेशी माहिती उपलब्ध नसताना या प्रकल्पातून काहीच उत्पन्न मिळू शकणार नाही असा निष्कर्ष का? मी खाली एका प्रतिसादात एक अंदाज मांडलाय, तशी काही शक्यता आहे का? बाकी हे सरकार हे कशासाठी करतंय (निवडणुकांसाठी, मराठा मोर्चान्ना उत्तर, शिवसेनेवर कुरघोडी) वगैरे मुद्दे आपण "राजकारण" आणि "तळे राखील तो पाणी चाखील" या सदरात टाकून थोडावेळ बाजूला ठेवू आणि खालील मुद्द्यांवर बोलू - १. शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि कर्तृत्व याला शोभेल असे स्मारक नको का? २. हे स्मारक भव्य असू नये का? आणि असावे तर मग खर्च तसाच मोठा असणार नाही का? ३. हे मुंबईला असणे हे एकूणच फायदेशीर नाही का? (पर्यटन, आंतरराष्ट्रीय ख्याती वगैरेसाठी) ४. गड किल्ल्यांवर स्मारक करणे हे ह्या भव्यदिव्य स्मारकाइतके परिणामकारक ठरेल का? ५. पैसे परत मिळावेत ह्या उद्देशाने सरकार किंवा अजून कोणी यात गुंतवणूक करावी का? ६. पैसे परत मिळूच शकनार नाहीत का?

In reply to by संदीप डांगे

समुद्रात असलेल्या स्मारकाचं 'भूमिपूजन' झालंय ते निवडणुकींत शिवसेनेवर कुरघोडी करायला. बाकी सब आपको पता है. =))
हे जर पहिल्या प्रतिसादातच लिहिलं असतं तर गुरुजींचे, तुमचे, माझे असे सगळ्यांचे कष्ट वाचले असते. तुम्हाला नक्की कशाचा राग आलाय तेही समजलं असतं. माणसाने स्पष्ट बोलावं. बरं, तुम्हाला राग आलाय असं बाकीच्यांनी सांगणं हे वैयक्तिक कधीपासून व्हायला लागलं? का तुमचा विरोध करायचाच नसतो कुणीही? अरे हो. तुम्ही वाचनमात्र आहात, नाही का. खरडवहीवर सांगितलं तरी चालेल.

In reply to by संदीप डांगे

एक प्रश्न : तुमचा स्मारकाला विरोध आहे कि पाठिंबा? मुळात पैशाचा हिशेब घालत बसण्याची हि गोष्टच नाही. असेच असेल तर मग एकूणच पर्यटन, वन्यपशूसंवर्धन, क्रीडा वगैरेसाठी योजलेले पैसेही वायाच आहेत ना? बाकी, पैशाचे गणित (गुंतवणूक + परतावा) कुठलीही माहिती हातात नसताना करणे योग्य नाही. माझ्याकडे कुठलीही ठोस माहिती नाहीये पण एक अंदाज. एक संगमरवरी ऐतिहासिक रचना आणि थोडेसे फोटो काढण्याचं ठिकाण यापलीकडे काहीएक नसलेल्या ताजमहालचे उत्पन्न २० कोटीच्या आसपास आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांपैकी साधारणपणे २०% लोकच ताज महाल ला भेट देतात. हि संख्या साधारणपणे दरवर्षी ८ लाख आहे. शिवस्मारकासाठी हाच अंदाज ४०% धरायला हरकत नाही (कारण सरळ आहे मुंबईला लागून). म्हणजे अंदाजे १५ लाख परदेशी लोक. साधारणपणे १०० रु. जरी प्रवेश फी असेल तरी १५ कोटी रु. तितकेच किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त भारतीय भेट देण्याची शक्यताही तितकीच. म्हणजे साधारणपणे ३० कोटी रु. हे झाले फक्त प्रवेश फीचे. याव्यतिरिक्त या स्मारकामध्ये २ ऑडिटोरिअम (५००, २००० क्षमतेचे), म्यूजियम, प्रदर्शन दालन, मत्स्यालय, वाचनालय, हेलिपॅड इ. गोष्टीतून मिळणारे उत्पन्न (याचा अंदाज मला लावता येत नाहीये पण याचे उत्पन्न कदाचित प्रवेश फी उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही). त्यामुळे उत्पन्नाचा मुद्दा आत्ताच खोडून काढण्यात काहीच अर्थ नाही असे मला वाटते.

In reply to by संदीप डांगे

चांगला प्रतिसाद. पण राज्यात भाजपची मते सुरक्षित राहिल्यास / वाढल्यास खर्च कामी आला असे (त्यांना) म्हणता येईल :)

In reply to by संदीप डांगे

तुम्ही लिहिलं खर्च वसूल होईल, तर तो कसा याचा ढोबळ अंदाज द्या. स्मारकावर खर्च होणारा आकडा ३६०० कोटीच फक्त धरुयात, किती वर्षात कसा वसूल होईल याचा काहीतरी अंदाज तुम्ही विधान करतेवेळी केलाच असेल की नाही? व्हेग विधान असल्यास तसं सांगा.
३६०० कोटी रूपये खर्च होतील या फक्त एका विधानावरून पुढील कोणतेही अंदाज काढणे अशक्य आहे. तुमची तशी अपेक्षा असेल तर कोपरापासून नमस्कार.
शिवस्मारकापासून पर्यटनमाध्यमातून खर्च वसूल होईल असे म्हणणे एक व्हेग विधान आहे, ज्याला काहीही आधार नाही. एक नवीन पर्यटनस्थळ बांधून त्यापासून कमाईचा विचार करणे हास्यास्पद आहे. विनाकारण केल्या जाणार्‍या खर्चाकडे बोट दाखवणार्‍यांना खोडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणता येईल फारतर. त्यामुळे यापुढे कोणी "खर्च वसूल करता येईल" हे विधान करणे योग्य राहणार नाही असे समजण्यास हरकत नाही.
"खर्च वसूल करता येईल" हे विधान तुम्हाला अयोग्य वाटत असेल तर तसे समजा. मी इथे तुमचे समाधान व्हावे यासाठी लिहित नाही. मुख्य म्हणजे माझ्या विधानामुळे जनतेत संभ्रम निर्माण होईल असे म्हणणे म्हणजे मुंगीच्या किंकाळीने धरणीकंप होईल असे म्हणण्यासारखे आहे.

In reply to by संदीप डांगे

Express way वर जवळपास 2400 कोटी रुपये खर्च झाला, आणि 15 वर्षात अंदाजे 5400 कोटी रुपये वसुली झाली . 2017 साल पर्यंत म्हणजे जवळपास 13 वर्षातच सर्वच्या सर्व खर्च सव्याज वसूल झाला . शिवस्मारक तर जागतिक दर्जाचे स्मारक असल्याने 10 वर्ष किंवा त्याहीपेक्षा कमी काळात खर्च वसूल होईल ह्यात शंका नाही . Welcome to capitalism. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

त्यासाठी एक्स्प्रेस वे वरुन जेवढी वाहने (४५,०००+) रोज जातात तेवढी पब्लिक रोज शिवस्मारकावर जायला हवी. १ कोटी ६४ लाख अंदाजे. क्रमांक एकचे पर्यटनस्थळ असलेल्या ताजमहालला भेट देणार्‍यांची संख्या चाळीस लाख आहे वर्षाला.

In reply to by संदीप डांगे

डांगे, जर उद्या कम्युनिस्टांचे राज्य आले आणि त्यात त्यांनी खालच्या मजल्यावर कॅसिनो चालू केला तर मात्र खर्च वसूल होईल १० वर्षात.. काय राव... आयफेल टॉवरही विकायला काढला होता की... पर्यटक पैसे देत नाहीत म्हणून.... ही असली कामे विवेकानंद स्मारकासारखी लोकवर्गणीतूनच करावी या मताचा मी आहे... आता कम्युनिस्टांचे राज्य का हे मी सांगायला नको... :-) :-)

In reply to by संदीप डांगे

क्रमांक एकचे पर्यटनस्थळ असलेल्या ताजमहालला भेट देणार्‍यांची संख्या चाळीस लाख आहे वर्षाला.
ओके. काही अंदाज पंचे कॅल्क्युलेशन्स : लेट्स अ‍ॅझुम की सेम ४,०००,००० लोकांनी स्मारकाला भेट दिली त्यातील ३,०००,००० लोक भारतीय आणि १,०००,००० फॉरेनर भारतीयांना फी १०० रु अन फॉरेनर ना ५०० रुपये फक्त पर्यटकांकडुन टोटल कलेक्शन ८,०००,००० प्रति वर्ष टोटल खर्च ३६,०००,०००,००० भागिले ८,०००,००० = ४५ वर्ष ! म्हणजे फक्त पर्यटकांवर अवलंबुन राहिले तरी फक्त ४५ वर्षत सर्वच्या सर्व खर्च वसुल होईल ! पण तिथे शॉपिंग मॉल्स उघडतील बोटींच्या फेरी सुरु होतील त्या सर्वांच्या टेंडर मधुन येणारे उत्पन्न पकडले तर खचितच ह्याही पेक्षा किति तरी कमी काळात खर्च वसुल होईल ह्यात शंका नाही ! अवांतर : वरील सर्व अंदाज आहे , तुम्हाला पटत नसतील तर तुम्ही तुमची अ‍ॅझम्शन्स आणि तुमचे अंदाज द्यावेत अशी विनंती आहे .

अनुक्रमे १ मे १९६० आणि १५ आॅगस्ट १९४७ पासून प्रश्न आहेत. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पैसे खर्च करण्यात काहीही वावगं नाही. हे स्मारक उभारलं नाही तर हे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटणार असं थोडंच आहे? उलट अनेक लोकांना काम मिळेल. पर्यटनाला चालना मिळेल, मुंबईत अजून एक प्रेक्षणीय स्थळ निर्माण होईल.
+१ दुसरी गोष्ट म्हणजे शिवस्मारक आणि किल्ले संवर्धन या दोन इशूजची सरमिसळ होतेय असे मला वाटतं. धिस ऑर दॅट चा प्रश्नच नको पडायला. दोन्हीही गोष्टी व्हायला हव्यात.

संसदेचं अधिवेशन वाया गेल्यामुळे किती पैसे वाया गेले ते सोयीस्कररीत्या विसरतात आणि शिवाजीमहाराजांच्या स्मारकाचा खर्च काढतात तेव्हा मजा वाटते.

In reply to by बोका-ए-आझम

साला, आय होप टुमच्या ह्या कळवळ्या मंदी, भाजप न वेस्ट केलेला पार्लमेंट टाईम सुद्धा इन्कल्युड असल.

In reply to by बोका-ए-आझम

णुसठा उल्लेख केल्याने बायस डिस्टो? गॉड ब्लेस यू माय सन. णुसठा उल्लेख केल्याबरोबर जर ठुमी बायस शोधत असाल तर इन अ वे, ठुमी भाजपला खिती sacrosanct आय मीन परमफवितर करून ठेवलंय हा विचार करा सन. णुसठे नाव घेटले तर बायस, हाऊ ज्युवेनाईल , असो. भाजप ने 'आधी' वेळ घालवला ह्याचा अर्थ काँग्रेस 'आत्ता' तीच चूकी करत हाय, असाही काढता आला असता हो, but then it would had left no scope to brand anyone as a biased one, about whom u don't know a dime, and satisfy a personal perversion of being a fence sitter.

In reply to by फेदरवेट साहेब

मी असं म्हटलं होतं -
संसदेचं अधिवेशन वाया गेल्यामुळे किती पैसे वाया गेले ते सोयीस्कररीत्या विसरतात आणि शिवाजीमहाराजांच्या स्मारकाचा खर्च काढतात तेव्हा मजा वाटते.
यात कुठल्या पक्षाचा उल्लेख आहे? भाजपने वाया घालवलेला वेळ पण त्यात धरलाय का असं तुम्हीच विचारलंत पहिल्यांदा. त्यावरून तुमचा बायस दिसतोच. असो. तुमचा हा आयडी काही फार दिवस राहणार नाहीये. त्यामुळे वाद घालत नाही. आहात तितके दिवस enjoy करा. ;)

In reply to by बोका-ए-आझम

ओके, पॉईंट नोटेड, बाय ड वे, हु गेव यु डी पावर टू दिसाईड अ फेट ऑफ एनी आयडी?, मला काय माहिती नाय हु आर यु मिस्टेकिंग मी फॉर, बट आय एडव्हाईस यु अदरवैज, इफ यु आर नॉट एन अपॉइंटेड लॉ इन्फोर्समेंट केरटेकर ऑफ द वेबसाईट बाय द ओनर. स्टॉप गेटिंग पर्सनल ऑन पेटी इश्यूज.

In reply to by फेदरवेट साहेब

मला जर तेवढी पाॅवर असती तर तुम्ही राहिला असतात का हा प्रश्न स्वतःला विचारा. Demonetization सारखं Defeatherweightization झालं असतं केव्हाच. बाकी तुम्ही कोण आहात ते ओळखायला फार काही करावं लागत नाही. बाकी तुमचा threshold of tolerance एवढा कमी आहे हे ऐकून बरं वाटलं. माणसाने असंच लिमिटमध्ये राहावं. ;)

किंबहुना बऱ्याच वर्षांपासून मुंबईला आंतरराष्ट्रीय स्मारक किंवा काही गोष्टींची गरज होती. विदेशातून आलेली लोक दरवेळी रायगडावर नाही जाऊ शकत,इतिहास कळण्यासाठी हे महत्वाचंआहे त्यामुळे त्या खर्चाची तुलना अस्थानी आहे . आता वेळेत काम होणं गरजेचं आहे आश्वासन काँग्रेस ने हि दिला होतं आता भाजप पण देत आहे काम झालं ३-४ वर्षात तर ओक्के . असो अजून टेंडर पण नाही निघाले आहेत कामाचे. अवांतर _ मुंबई मध्ये कॅसिनो सेंटर असावेत गेट वे ऑफ इंडिया ला जिथे फक्त परदेशी लोकांना प्रवेश असेल जेणेकरून परकीय चलन अजून वाढवता येईल असा प्रस्तावही शरद पवारांनी मांडलेला . त्यावेळी तो काही कारणास्तव रद्द झाला. आता परत त्यासाठी पण निर्णय घेणार आहेत .

यानिमित्त मी न्यू यॉर्क शहरातील स्वातंत्रदेवीच्या पुतळ्यासंदर्भात लिहिलेली काही माहीती आठवली. त्यातली इथे चपखलपणे लागू होणारी वाक्ये सहजसंदर्भासाठी ठळक केली आहेत... निओक्लासिकल शैलीतला हा जगप्रसिद्ध पुतळा ४६ मीटर उंचीचा आहे. जमिनीपासून (चौथर्‍यासकट) मशालीच्या टोकापर्यंत त्याची उंची ९३ मीटर आहे. या २४०,१०० किलो वजनाच्या या पुतळ्याच्या चपलांचा नंबर अमेरिकन परिमाणाप्रमाणे ८७९ आहे !

या लिबर्टास नावाच्या रोमन देवतेच्या पुतळ्याच्या उंचावलेल्या एका हातात मशाल व दुसर्‍या हातात ४ जुलै १७७६ ही अमेरिकन स्वातंत्र्यदिनाची तारीख कोरलेली पाटी (tabula ansata) आहे. हा पुतळा फ्रेंच जनतेकडून अमेरिकेला मिळालेली भेट आहे. तो ४ जुलै १८८४ ला पॅरिसमध्ये अमेरिकेला अर्पण केला गेला. मात्र त्याचा अमेरिकेतला पायथा बांधून पुरा झालेला नसल्याने तो जानेवारी १८८५ पर्यंत फ्रान्समध्येच होता. इतका मोठा पुतळा सलग वाहून नेणे शक्य नसल्याने वाहतुकीच्या सोयीसाठी त्याचे अनेक भाग केले गेले व ते २१४ खोक्यांत भरून बोटीने अमेरिकेला पाठविण्याची तयारी केली गेली. पैश्यांच्या समस्येमुळे वाहतूकीचे काम रखडलेल. तो खर्च फ्रेंच सरकारने उचलला आणि १८८५ च्या जूनमध्ये पुतळ्याचे सर्व भाग अमेरिकेत पोचले.

इकडे अमेरिकेत चालू असलेल्या आर्थिक मंदीमुळे, फ्रान्सवरून येणार्‍या या भेटीसाठी लागणारा पायथा बनविण्यासाठी अमेरिकने पैसे खर्च करण्याला लोकांचा विरोध झाला. पैसे उभे करण्यासाठी केलेल्या अनेक कार्यक्रमांनंतरही पुतळ्याचे काम करणार्‍या समितीच्या बँकेच्या खात्यात १८८२ साली केवळ $३००० होते. त्यात भर म्हणून, पायथ्यासाठी लागणारे $१० लाख देण्याला सरकारने नकार दिला ! त्यानंतर, १८८४ साली या कामासाठी $५०,००० देण्याच्या मसुद्याला न्यू यॉर्कच्या मेयरने व्हेटो वापरून विरोध केला. ही अवस्था पाहून केवळ न्यू यॉर्क शहरच नव्हे तर बोस्टन, फिलाडेल्फिया व इतर शहरांतील अनेक नागरिक संघटनांनी पुढे येऊन हा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. शेवटी त्यांच्या मदतीने २८ ऑक्टोबर १८८६ या दिवशी पूर्व न्यू यॉर्क गव्हर्नर व त्या काळचे अमेरिकन राष्ट्रपती ग्रोव्हर क्लिव्हलँड यांच्या हस्ते पुतळा अमेरिकन जनतेला अर्पण करून भेटीला खुला केला गेला.

तेव्हापासून हा पुतळा बोटीने एलिस बेटावर पोचणार्‍या स्थलांतरितांचे १९५४ पर्यंत स्वागत करत उभा राहिला. त्यानंतर, विमानवाहतूक सुरू झाल्याने स्थलांतरीत बोटीने येणे बंद झाले. त्यामुळे, ते पूर्वीचे महत्व आता इतिहासजमा झाले असले तरी जगप्रसिद्ध पर्यटक आकर्षणांच्या यादीतले या पुतळ्याचे स्थान आजही अबाधित आहे.

एकंदरीत, आपण समजत असतो की, हा पुतळा फ्रेंच आणि अमेरिकन सरकारांचा प्रेमाचा संयुक्त प्रयत्न असेल. पण, फ्रेंच सरकारने केलेला वाहतूक खर्च सोडला तर इतर बाबतीत, विशेषतः अमेरिकेत, या प्रकल्पाला विरोधच झाला होता ! तेव्हा खरी वस्तुस्थिती अशी आहे की हा प्रकल्प मुख्यतः फ्रेंच व अमेरिकन जनतेच्या खाजगी प्रयत्नातून आणि सरकारी विरोधाला न जुमानता, झालेला आहे !
"बर्‍याचदा, वस्तूस्थिती काल्पनिक लेखनापेक्षा जास्त विचित्र असते" असे म्हणतात ते काही उगाच नाही ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सर, टुमची मेंबरशिप पेड हाय काय? ?? जेन्युइनली इचारथोय, बिकॉज, आय थिंक मी फ्री मेम्बर हाय हेन्स मला माझे पोस्ट संपादित करायचा ऑप्शन नाहीये, इफ यु मे प्लिज, आमाला थोडा गाईड करून पेड मेम्बरशीप खशी मिळवायची थे सांगाल काय? , इट वुड बी अ ह्युज हेल्प सर. थँक्स इन ऍडव्हान्स.

In reply to by फेदरवेट साहेब

ग्रामर खिंवा स्पेलिम्गच्या मिष्टेक टुमी संपादकांना हियर अँड नाऊ रिक्वेष्ट करून डुरुस्ट खरून घ्येवू शख्ता. परंतु, मुद्दाम खेलेल्या मिष्टेक्स डुरुस्त खरून मिळ्तीलच याची घॅरंटी नाय, त्या ईनोदात गणल्या जाऊ शख्तात ! ;) :) =))

In reply to by बोका-ए-आझम

ओ माय, इठे फण पॅक हंटिंग वूल्फ पॅक दिस्टो हाय, खुणाला येक जेन्युइन प्रश्न ईचारले असता डुस्रा येऊन लिव्ड पर्सनल कॉमेंट कश्यासाठी खरतोय?

In reply to by बोका-ए-आझम

मेंदूत असलेल्या मिष्टेक्स कोण सुधारतो तेही सांगा की त्यांना ;) म्हनुन सिरीयस घेतला मिस्टर बोका, आय एम ब्लेस्ड टू बी नॉट दॅट important . चिंता नसावी. BeSIDES टॉक ऑन पॉइंट्स इफ यु हॅव द गट्स, आयडी, खरे खोटे, महत्वाचे बिनम्हत्वाचे वगैरे चक्कलस सोडा , शोभत नाही तुम्हाला.

In reply to by फेदरवेट साहेब

त्याचा अर्थ तुमच्या मेंदूत मिष्टेक्स आहेत असा थोडाच होतो? एक्काकाकांना मी असं सुचवलं असं तुम्हाला वाटतंय. त्याला काही करु शकत नाही. बाकी ३ महिने जुन्या आयडीला मला काय शोभतं आणि काय नाही हे माहित असल्याचं पाहून मजा वाटली आणि खात्री पटली. ;)

In reply to by बोका-ए-आझम

बरोबर हाय, णथीतुण तीर मारायला अक्कल लागत नाहीच. सो बालिश ऍप्रोच, काय सुचले नाय की आयडीच्या वयावर घसरण्याची खोड काय टुमची मेल्या शिवाय जाणार न्हाय, देरफोर फाट्यावर. :)

In reply to by फेदरवेट साहेब

तुमचा आयडी मेल्याशिवाय माझी ही खोड जाणार नाहीच आहे काका! आतातर खात्रीच पटलेली आहे. रच्याकने तुम्ही आमची फक्त मतं फाट्यावर मारता. आम्ही तुम्हालाच फाट्यावर मारतो. तुमचा जन्मच आमच्याकडून फाट्यावर मारुन घेण्यासाठी झालेला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.

In reply to by बोका-ए-आझम

उगी उगी, टुमाला मुड्डे शुचले नाय का ठुमी वैयक्तिकच होणार, टुमची लायकी टिटकीच हाय, एन्जॉय, गुड डेज वोन्ट लास्ट फॉरएव्हर. ;)

In reply to by फेदरवेट साहेब

तुम्ही असणं हेच चांगले दिवस. ते राहणार नाहीत असं तुम्हीच म्हणताय. आपला आयडी उडणार याबद्दल एवढा दुर्दम्य आत्मविश्वास! जबरदस्त!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

श्रीरंग जोशींचा मिनेसोटा स्टेट कॅपिटॉल हा लेख त्यावर मी दिलेली एक प्रतिक्रिया :
अवांतरः उगाच तुलना पैलवान - Sun, 14/06/2015 - 09:33 आपल्याकडे जर अशी इमारत प्रचंड खर्च करून बांधली वा त्यात अशी पेंटिंग्ज लावली तर पहिली टीका होईल, देशात करोडो लोकांना २ वेळ पुरेसे खायला मिळत नाही, हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत, लाखो मुले कुपोषित आहेत अन् हे स्वतःसाठी 'असलं' विधानभवन बांधताहेत. अशी टीका राष्ट्रपती भवनावर, परदेशी प्रतिनिधींना दिल्या जाणार्‍या मेजवान्यांवर आणि चंद्र-मंगळयानावरसुद्धा होते.

स्वातंत्र्यदेवतेप्रमाणेच शिवस्मारकही असेच खाजगी प्रयत्नातून व स्मारक हवं असलेल्या लोकांच्य खिशातून पैसे वसूल करुन झाले असते तर खूप आनंद वाटला असता. हे ३६०० कोटी, शिवस्मारक हवं असलेल्या लोकांच्या खिशातून वसुल व्हावे अशी इच्छा आहे. ३६०० रुपये प्रत्येकी असे एक कोटी लोकांनी स्वेच्छेने दिलेत तर होऊन जाईल निधी गोळा, राज्याच्या तिजोरीवर (जिच्यात खडखडाट आहे असे कोणतेही चालू सरकार मागच्या सरकारवर आरोप करत असते) भार येणार नाही. 'सरकारकडे आपल्या कल्पना पोचवा, सरकार अ‍ॅक्शन घेतं' म्हणणार्‍यांनी माझी ही विनंती स्वतःची कल्पना म्हणून सरकारकडे पोचवावी. बघूयात कारवाई होते की नाही... ;) शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या सबसिड्या, गरिबांना दिली जाणार्‍या सुविधा ह्यांच्यावर उठसूठ तोंडसुख घेणारे व ते घेण्याचा अधिकार केवळ आपण कर भरतोय म्हणून आहे असे म्हणणारे काही सोकॉल्ड प्रामाणिक करदाते यांनी आता तंतोतंत उलटी भूमिका घेतल्याचे पाहून आश्चर्य वाटत आहे. सरकारकडून केले जाणारे मतपेटीचे राजकारण ह्यावर पांघरुण घालायला रोजगारनिर्मिती, पर्यटनविकास इत्यादी कारणे देऊन धूळफेकही मस्त होत आहे. कॉन्ग्रेसने ही टूम काढली तेव्हाही ते मतपेटीचेच राजकारण होते, आजही आहे.

In reply to by संदीप डांगे

तर काही करु शकत नाही. बाकी, लोकशाही असल्यामुळे मतपेटीचं राजकारण सगळेच करतात. विकास आणि पर्यटन वगैरे मुद्द्यांवरुन राजकारण करणं हे धर्म आणि जात यावरून राजकारण करण्यापेक्षा चांगलं की वाईट हे तु्म्हीच सांगा.

In reply to by बोका-ए-आझम

शिवस्मारक हे धर्म व जातीचं राजकारण नाही असं तुम्हाला वाटत असेल तर असो बापडे! :-)

In reply to by संदीप डांगे

असं माझं मत आहे. त्यांच्या स्मारकाबद्दल कोणी जाती-धर्माचं राजकारण करु पाहात असेल तर ते चुकीचं आहे. आता चष्माच पिवळा लावल्यानंतर सगळं जग पिवळं दिसायला लागतं. त्याला काही करु शकत नाही. रच्याकने ही कल्पना सगळ्याच राजकीय पक्षांनी मान्य केलेली होती. ती २००४ मध्येच मांडण्यात आली होती.तेव्हा त्याचा खर्च ₹१०० कोटी एवढा अपेक्षित होता. पण त्याचं साधं भूमिपूजनही झालं नाही. का नाही झालं, नक्की कोणते हितसंबंध आड आले ते माहित नाही पण तेव्हा महाराष्ट्रात कुणाचं सरकार होतं ते सगळ्यांना माहित आहे.आणि आता होणारा हा आरडाओरडा कोण करतंय तेही माहीत आहे. ते जर तुम्हाला समजत नसेल किंवा समजून घ्यायचंच नाही असा तु्म्ही चंग बांधला असेल तर अाम्ही बापडे काय करणार?

In reply to by बोका-ए-आझम

शिवाजी महाराज हे स्वतः जातीधर्मांच्या पलिकडे होते व त्यांचं स्मारक हे काही त्यांची स्वतःची इच्छा नाही. =)) शिवाजीमहाराजांचा वापर राजकारण्यांकडून कशासाठी केला आजवर? स्मारक बांधणारे, तीची आयडिया काढणारे सगळे राजकारणी शिवाजीमहाराजांसारखेच जातीधर्मांच्या पलिकडे आहेत अशी तुमचा विश्वास असेल तर असो बापडा.

In reply to by संदीप डांगे

माझी ही विनंती स्वतःची कल्पना म्हणून सरकारकडे पोचवावी. इतकी चांगली कल्पना दुसर्‍याने कशाला सरकारकडे पोचवायला पाहिजे ! तुम्हीच एक इमेल पाठवून, फार श्रम न पडता, ते श्रेय घ्यावे असे सुचवतो. मी अनुमोदन देईन याची खात्री बाळगा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तसं नाहीये हो. मी पोचवली आणि काही झालं नाही तर ते फक्त मलाच कळेल, मी कळवलं इथे तर लोक्स परत मलाच दूषणं देतील काहीतरी थातूरमातूर कारणं देऊन. सरकारबद्दल दुर्दम्य विश्वास असलेल्यांना हे चॅलेन्ज करत आहे मी स्पष्ट शब्दात. मी म्हणतोय तसं झालं तर सगळ्यांचीच विन-विन सिच्युएशन होइल की... तसंही काही चांगलं झालं तर त्याचं श्रेय घ्यायला पुढेपुढे करायला मी काही राजकारणी नेता नव्हे! कोणाच्याही केल्याने तांबडं फुटू देत... :-)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मोर्चा, बंद, रस्तारोको, इत्यादी नकारात्मक कारणांसाठी रस्तावर येणारे लोक माध्यमांत नेहमी दिसतात. तेव्हा काही सरकारची मदत मागितली जात नाही. उलट ते बहुदा सरकारला विरोध करण्यासाठीच केले जाते. तेव्हा, ज्यांचे नाव आपण प्रातःस्मरणीय समजतो अश्या शिवरायांच्या स्मारकासारख्या काही सकारात्मक कारणांसाठी, सरकारची मदत न घेता, जनता स्वयंस्फूर्तीने आणि स्वबळावर (पदराला खार लावून) एकजूट दाखवू लागली, तर त्या घटना भारताच्या इतिहासाला वेगळी उत्तुंग दिशा मिळवून देतील. महत्वाचे : स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याची निर्मिती आणि स्थापना सरकारच्या मदतीने झालेली नसून, सरकारचा विरोध पत्करून, बहुतांश खर्च जनतेने करून, केली गेली आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेच म्हणायचे आहे. तुमच्या प्रतिसादात व्यक्त झालेला आशय जनतेत पसरो व तसे प्रयत्न होवो अशीच मनापासून इच्छा आहे.

In reply to by संदीप डांगे

आपली जनता तेवढी सुजाण व्हायला जरा वेळ आहे. त्यामुळे, तोपर्यंत, कोणाच्या का हाताने, केवळ कागदी योजनांची पाने जनतेच्या तोंडाला न पुसता, खरोखरच असे भव्य स्मारक खरोखरच जमिनीवर उभे राहिले तर चांगलेच होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता. तेवढे तरी ॠण फेडावे महाराजांचे महाराष्ट्राने.

In reply to by संदीप डांगे

हे ३६०० कोटी, शिवस्मारक हवं असलेल्या लोकांच्या खिशातून वसुल व्हावे अशी इच्छा आहे
हे तुम्ही विनोदाने म्हणत असाल तर ठीक आहे...नाहीतर... काहींच्या काही! बाकी राजकारणाचं म्हणाल तर भाजप ह्या राजकीय पक्षाकडून राजकारण नाही तर काय अपेक्षित असावं? जोपर्यंत जनता ह्या गोष्टींवर आधारित मतदान करत राहणार तोपर्यंत हे चालणारच! फक्त यातून जातीय वातावरण खराब न करण्याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी!

तत्व आणि मूल्य याना किंमत होती. आज इतके पैसे जनतेमधून कसे उभारणार ?कोणाच्या विश्वासावर ? काम कोणाला देणार ह्याची उत्तरे आहेत का?? अवांतर - राममंदिर साठी विटा जमा केलेल्या , वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासाठी लोखंड जमा केलेले त्याचे काय झाले:) भाजप असो व काँग्रेस मतपेटीच्या राजकारणापासून बाहेर जाणार नाही. त्यामुळे एकटा स्मारक व्हावा मुंबईमध्ये इतकीच आमची इच्छा आहे .

Ithe jorachi laagli tar vyavasthit shauchalaye naahit aani hi mandali putlyanche raajkaran kartayat. Mukhya samasyekade durlaksha vhav hech tar yana havay.

प्रत्येक गोष्टीला विरोध करायचं एक नवीन fadच आलंय हल्ली. प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या-वाईट बाजू असणारंच. पण गरे फेकून द्यायचे आणि बिया चघळत बसायच्या हे हल्लीचं सूत्र आहे. एखाद्या किल्ल्याला नव्याने योग्य ती डागडुजी करून, त्याला त्याचं गत-वैभव प्राप्त करून देणं हेच महाराजांसाठी उचित स्मारक झालं असतं. पण सरकार वेगळा मार्ग निवडून atleast काहीतरी करतंय तर थोडा support आपणही द्यायला हवा ना. महाराष्ट्रात गरिबी आहे, कुपोषण आहे, लोकांना खायला अन्न नाहीये या सबबीखाली स्मारकाला विरोध करणारी चेपू वरील "कॅन्डल मार्च" पब्लिक आता ३१ डिसेंबरला गरिबी, कुपोषण सोयीस्कररीत्या विसरून दारूवर हजारो रुपये उडवत अन्न वाया घालवतील. मुळात स्मारकांचा उद्देश काय असतो याचाच विसर पडलाय आपल्याला. हरितात्यांचं वर्णन करताना पुलं म्हणतात "हरीतात्यांनी आम्हाला प्रचंड अभिमान दिला. चिमुकल्या मनगटात कसल्यातरी जोमाच्या मनगट्या घातल्या. त्या वेळी दिसल्या नाहीत त्याच्या अदृश्य वळ्या. पण आज एखाद्या आघाताच्या क्षणी दिसायला लागतात. दुर्दैवाने दर वेळी मुठी वळाव्यात तश्या वळतातंच असं नाही. पण वेळप्रसंगी वळू शकतील हा आत्मविश्वास कुठे तरी दिला." शिव-स्मारकाचं कार्य देखील हेच आहे. !!!

In reply to by वाह्यात कार्ट

अगदी योग्य आणि समर्पक शब्दांत मांडलेलं आहे. कार्टं वाह्यात असलं तरी हुशार आहे. (ह.घ्या.)!

In reply to by वाह्यात कार्ट

सरकार वेगळा मार्ग निवडून atleast काहीतरी करतंय तर थोडा support आपणही द्यायला हवा ना. >> सरकारला सपोर्टची गरज नै हो. कुणी निंदा कुणी वंदा, सरकार आपलं राजकारण करणारच. "सरकार काहीतरी करतंय तर आपण सपोर्ट द्यायला हवा" ह्याचीही हल्ली टूम निघालीय. फक्त सरकार कोणाचं आहे ते बघून असले विचार प्रसवतात हे एक निरिक्षण. ते 'काहीतरी' करुन नक्की काय होणार ते ह्या अंधसमर्थकांपैकी कोणालाच माहित नसतं ते एक वेगळं. महाराष्ट्रात गरिबी आहे, कुपोषण आहे, लोकांना खायला अन्न नाहीये या सबबीखाली स्मारकाला विरोध करणारी चेपू वरील "कॅन्डल मार्च" पब्लिक आता ३१ डिसेंबरला गरिबी, कुपोषण सोयीस्कररीत्या विसरून दारूवर हजारो रुपये उडवत अन्न वाया घालवतील. >> तुमचा कॉन्फिडन्सला सलाम. जे विरोध करत आहेत ते दारूवर पैसे उडवतील व अन्न वाया घालतील हा केवढा विश्वास! ह्या स्मारकाला विरोध करणार्‍यांमधे ३१ डिसेंबरला विविध गडकिल्ल्यांवर जाऊन साफसफाई करणारे खरे गिरीप्रेमी, शिवप्रेमी आहेत ह्याचा आपणाला अंदाज नसावा. असो, शिव-स्मारकाचं कार्य देखील हेच आहे. !!! >> शिवाजी महाराजांच्य नुसत्या नावाने ज्यांच्या मुठी वळत नाहीत त्यांना अशी तोंडदेखली, घातल्या पाण्याच्या गंगेची गरज असावी. महाराजांवर मनापासून प्रेम करणार्‍या प्रत्येक भारतीयाच्या मनात महाराजांचे स्मारक कायमचे कोरलेले आहे. त्यास अशा बाह्य अवडंबराची अजिबात गरज नाही. ती फक्त मतपेटीचे राजकारण करणार्‍यांना आहे.

शिवरायांचे कर्तृत्त्व वादातीत आहे ..खरंच ???? काहीतरी चुकलंय असा वाटत नाही का ? वादातीत या शब्दाचा अर्थ बहुतेक लेखक महाशयांना समजला नसेल कदाचित

गरज आहे कारण विदेशातील सोडा पण भारतातल्या बाहेरच्या राज्यातील लोकांना सुद्धा गड किल्ले पाहता येतात का .. तितका वेळ असतो का??तितकी परिवहन सुविधा उपलब्ध आहे का?? कसं समजणार लोकांना ? त्यामुळे मुठी वळतात वैग्रे असो पण लोकांना कळणार कसं ? ह्यात परकीय चलन पर्यटन विकास हा मुद्दा अजून सांगायचंय तूर्तास इतकंच. अवांतर -किती किल्ल्यांवर साफसफाई होते आणि स्मारक ह्याचा काही संबंध लागला नाही .

In reply to by वरुण मोहिते

राजस्थानातल्या किल्ल्यांकडे राजवाड्यांकडे बघितलं तर वरचे चार प्रश्न पडत नाहीत. ३६०० कोटींमधे परिवहनसुविधा, मार्केटींग होऊ शकतं. नेमकं उद्दिष्ट स्पष्ट असेल तर मार्ग सुचतील. राजकारण हेच उद्दिष्ट असेल तर काय बोलायचे? परकिय चलन पर्यटन विकास हा मुद्दा वरच्या एका प्रतिसादात मी खोडलाय तो बघून घ्यावा. महाराष्ट्रात खास पाहायला म्हणून परकिय पर्यटक औरंगाबादला जातात. तिकडचे एकून उत्पन्न (परदेशी+देशीपर्यटक) तीनेक कोटी आहे वर्षाला. अवांतरः स्मारकविरोधक हे "३१ डिसेंबरला दारुवर पैसे उडवतात व अन्न वाया घालवतात" असा दावा करत आहेत काही समर्थक इथे.

In reply to by संदीप डांगे

राजवाडे बऱ्यापैकी मेंटेन होते . त्यात अर्धी अधिक हॉटेल्स झाली. ती परिस्तिथी महाराष्ट्रात लागू नाही आहे कारण इथे किल्ले दुर्गम भागात आहेत . जयपूर उदयपूर म्हणजे राजस्थान न्हवे तसेच किल्ला म्हणजे रायगड आणि प्रतापगड हे पण न्हवे . त्यामुळे गरज होती मुंबई मध्ये काही आंतरराष्ट्रीय दर्जाची . आता ते कधी होईल कसं होईल तो वेगळा मुद्दा आहे . अवांतर - कुठल्यातरी काळात औरंगाबाद च्या लेण्या पण खर्च करून बांधल्या ना ??का लोकापर्ण सोहळा होता तो पण ? आपला खर्चाचा मुद्दा बरोबर असेलही पण त्यामुळे पर्यटन किंवा विकासाला चालना देणं हे चुकीच नाही आहे

इथले काही सदस्यांचे प्रतिसाद वाचून ते सूर्याजी पिसाळचे वंशज असावेत असे वाटते. त्यांना कैद करुन त्यांना शिवकालीन शिक्षा करायला हवी. जय भवानी जय शिवाजी !!!

आहा लय भारी प्रतिसाद आहेत. स्मारकाचे समर्थन करणरे शिवाजींचे मावळे, साथीदार आणि विरोध करणारे सूर्याजी पिसाळ आणि जावळीचे मोरे. सगळे शिवकालीन लोक किंवा त्यांचे वशंज इथ सापडणार बहुतेक. अवांतर>>>शिवबाचा जीवा असल्याचा क्लेम कुणी करू नये तो मान देवेन्द्र फडणवीस यांचा =))

या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होईल हा आक्षेप किंवा, कोळी लोकांचा रोजगारावर गदा येईल असा आक्षेप हे योग्य आहेत की नाहीत?
लोकहो, शिवस्मारक विरोधकांचे सर्व आक्षेप दूर करावेत अशी अपेक्षा योग्य आहे का?

१. एखादा शासकीय प्रकल्प किंमत वाढली आहे इतक्याच कारणाने सोडून देता येत नाही. २. ३६०० कोटी म्हणजे किती? तर अंदाजे २०० -२५० किमी चार लेनच्या रस्ता बांधणीचे पैसे. यात जमिनीच्या अधिग्रहणाचे पैसे जोडले फक्त १५० किमी रोड बांधायचे पैसे. किंवा जे एन पी टी सारख्या बंदरात अजून एक टर्मिनल लागायचे पैसे. ३. ३६०० कोटी खर्च आहे, पण प्रकलप चालू झाल्यावर तो (सरकारसाठी तरी) नफा कमवणारा असेल. त्यामुळे याला वायफळ खर्च असे म्हणू नये. सुदुर काळात हा प्रकल्प फायनान्शियली पॉझिटीव रिटर्न देणारा असेल. ४. पर्यटन हा एक सिरियक्ष बिझनेस आहे. ५. मेट्रोच्या प्रकल्पातून निघणारी माती अन्यत्र टाकायला येणारा खर्च यातून वजा करायला हवा. ६. भाजप मराठी लोकांच्या शिवप्रेमाचे राजकारण करत असेल तर ते योग्य आहे. राजकारण हा मूळात एक चांगला अर्थ आसलेला शब्द आहे. ७. या प्रकल्पामधे सुधारणा करायला आजतरी बराच वाव असावा. ८. आपल्या देशाची लेजंड्स कोण म्हणले तर नको त्या लोकांची नावे अति झाली आहेत. योग्य त्या लोकांना (तशा प्रेरणांना) न्याय मिळणे आवश्यक आहे. ९.मनमोहन सिंगाच्या काळात १७६००० कोटीचे प्रकल्प ३-३ वर्शे रखडून होते. लक्षात घ्या त्यांच्या किमती देखिल अशाच वाढल्या आहेत. मात्र पैशाबाबत इतकी लोकजागॄती तेव्हा का दिसली नसेल. प्रकल्प रखडण्याचा वास्तविक परिणाम (किंमत) खूपच जास्त आहे. पण ११% व्याजाने (डब्ल्य ए सी सी असू द्द्या, अर्थव्यवस्थेवरचा परिणाम असू द्या) हेच पैसे १७,६००*३ कोटी इतके नाही का झाले? मोदींना पण हे पैसे वाचवावे असं फारसं सिरीयसली वाटत नाही. १०. ज्यांचा फोकस पैसे हा आहे त्यांनी फक्त उतरत्या क्रमाने देशाच्या पैस्यांच्या समस्यांबद्दलच बोलावे. राष्ट्रीय अस्मिता आणि पैसे चिल्लर खर्चाकरिता मिक्स करू नयेत.

मी नुकताच राजस्थानाच्या ट्रीप ला जाऊन आलो. अनेक रिक्षावाल्यांशी बोललो. शिवाजी राजा यांच्याविषयी काया माहिती आहे याचे जवळ जवळ उत्तर " नाम सुना है " इतकेच होते. शिवाजी महारांजाचे चरित्र अनोखे आहे. श्रीकृष्णा सारखे ! पण महाराज पूर्ण भारतभर माहिती असलेली विभूति आहे का ? याचा अभ्यास व्हावा ! पूर्ण भारतभर माहिती असलेल्या कृष्णाच्या नावानेही त्याच्या कर्मभूमीत एखादा विमानतळ वा रेल्वे जंकशन आहे का ? याचा माझ्या दृष्टीने एकच अर्थ आहे. तो राजकीय ! आपले महाराष्ट्र देशाचे दुर्दैव असे की आयुष्यात एकही लढाई न हरलेल्या थोरले बाजीराव यांच्या नावाने विमानतळ पुण्याला का उभारला जात नाही.. ? कारण.... मी न सांगणेच बरे ! तेंव्हा हा अस्मितेचा प्रश्नच नाही केवळ राजकीय आहे हा ! गणपतीत कितीही जनजीवन विस्कळीत झाले तरीही त्याला सांस्क्रुतिक उत्सवाची फोडणी देऊन राजकीय फायदा उठविला जातोच तसे शिवाजी राजांचे नावाने स्मारकांची माळ लावून फक्त कुणाची तरी समजूत घातली जात आहे. कारण कोर्टाचा वा राज्यघटनेचा स्मारकाला विरोध असण्याचे काहीच कारण दिसत नाही. जाता जाता - यातून काही पर्यटन साधणार नाही. याची तुलना स्वातंत्र्य देवीच्या पुतळ्याशी होऊच शकत नाही. कारण शिवाजी राजांच्या टोपात शिरून मुंबईचे दर्शन घेण्याची कल्पना भावूक शिवभक्त कधीही मान्य करणार नाहीत.

In reply to by चौकटराजा

भरत राजाचा नाव आहे का? चाणक्य सिकंदर यांची नावं आहेत का कुठे ? त्यामुळे कृष्णाला वैग्रे मध्ये आणू नका हि विनंती .

Many are cribbing about the cost of the Shivaji statue What they do not know is this statue is a masterstroke by our PM Modiwhich will pay for itself many times over. The statue is made of Amorphous Silicon, Cadmium Telluride & Copper Indium Gallium Selenide. This is exactly the same material used to make solar cells. Our government consulted with Dr. Immonen Kirsi, Senior Solar Scientist at VTT Research, Finland to develop technology to mould these materials into a statue form. This research took 2.5 years & on December 3rd, Dr. Kirsi sent a email to Modi Sir that it's now ready for mainstream use. The statue has capability to generate enough electricity to power all government offices in Mumbai. The statue also has Radial Uniform Projection And Ranging(RUPAR) technology to track boats in the Arabian Sea to prevent a repeat of the 2008 Mumbai attack where the terrorists entered India through the sea. RUPAR is the next generation of SONAR technology and has been developed at the Indian Institute of Science.

In reply to by बोका-ए-आझम

मग मुजरा पाठीमागे...... हा हा .. मागे एकदा एका लेखकाने पुस्तक परत घेतले होते त्या चालीवर .....

In reply to by चौकटराजा

पटेलांचं अचाट स्मारक उभं करणार्‍याला एकदम इतकी कशी सुचली याचं आश्चर्य होतंच !

In reply to by संजय क्षीरसागर

=)) =)) =)) =)) =)) २००० च्या नोटांमधे चिप बसवल्यानंतर पुढचं लॉजिकल पाऊल आहे ते. =)) =)) =)) जरा थांबा! थोड्या दिवसांनी पाकिस्तानच्या अध्यक्षाच्या ताटाना चिप बसवणार आहेत. त्यांच्या आणि दाऊद इब्राहिमसाठी एकेक उपग्रह सोडणार आहेत. मग त्यानी बिर्याणी खाल्ली का रोटी ते आपल्या घरोघरी टीव्हीवर दिसणार आहे. =)) =)) =))

शिवस्मारकाचा उद्देश महाराजांची थोरवी जगाला कळावी हा आहे मात्र काही लोक "आपल्या" सरकारचे समर्थन करण्याच्या नादात खुपच वाहवत गेले आहेत. लोकांच्या "सरकार अनाठायी खर्च करत आहे" या आक्षेपाला उत्तर देताना हे समर्थक या स्मारकामुळे कसा रोजगार मिळेल, सरकारी तिजोरीत कसा महसूल जमा होईल हे अगदी हिरीरीने लिहीत आहेत. जणू काही सरकार नवीन एमआयडीसी किंवा सेझ प्रकल्प आणत आहे रोजगार निर्मितीसाठी.

In reply to by सतिश गावडे

कसला आलाय रोजगार ? नुसता पैसा फिरेल पण फायनल प्रॉडक्ट जर निव्वळ शोभेची वस्तू असेल तर तो अपव्ययंच.

In reply to by सतिश गावडे

सगासर, ते तसं हिरिरीने जे कोणी जिथे कुठे लिहीत असतील तिथे फटकन उत्तर देऊन टाकलं ना म्हणजे असे मुद्दे पुढे सरकत नाहीत. बाकी सरसकटीकरण नको. त्यातून कसला परतावा मिळेल, कसला रोजगार निर्माण होईल यावर यथायोग्य मुद्देसूद चर्चा झाली तर चांगलंच आहे ना!

In reply to by सतिश गावडे

सगा , तुम्ही दोन वर्षे अमेरिकेत होता. तुम्हाला जॉर्ज वॉशिग्टन किंवा अब्राहम लिन्कन यांचे पुतळे पाहून त्यांची थोरवी कळली काय ? मी रिओ ला गेलो नाही पण ख्रिस्ताची थोरवी मला त्याचा रिडीमरचा पुतळा माहीत नसताना ही दुसरीच्या क्रमिक पुस्तकातून समजली. शिवाजी राजांची थोरवी ब मो पुरंदरे नावाच्या जिवंत माणसाकडून कळली हो ! पुतळे स्फूर्ती देतात ही थेअरीच चुकीची आहे. त्यासाठी चरित्रच समजून घ्यावे लागते. कन्याकुमारीच्या सफरीमुळे विवेकानंद समजतील काय ... ?

In reply to by चौकटराजा

तुमचं म्हणणं बरोबर आहे काका. मी या स्मारकाच्या निर्मितीमागचे जे कारण माझ्या वाचनात आले त्याबद्दल म्हटलं. मात्र इथे तर त्यावरही वरताण प्रतिसाद वाचायला मिळाले. काय तर म्हणे रोजगार आणि महसूल निर्माण होईल.

In reply to by बोका-ए-आझम

काहीशे लोकांसाठी रोजगार नक्कीच निर्माण होइल. उदा. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी लागणारी बोट सेवा. त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग. बेटावर असणारे संग्रहालय व त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग. बेटावर खानपान सेवा असेल तर त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग. सफाइ कर्मचारी. अन्य तंत्रज्ञ. सुरक्षा रक्षक... कोणतेही नवीन पर्यटनस्थळ बनते तेव्हा रोजगारनिर्मिती होतेच. आता एवढी रोजगार निर्मिती करण्यासाठी एवढा खर्च अपेक्षीत आहे का वगैरे याचा उहापोह वर होतोच आहे. गडकील्ल्यांसाठी खर्च व्ह्यायलाच हवा त्यात काही दुमत नाही. पण नवीन पर्यटनस्थळे होउच नयेत हे बरोबर नाही. राहता राहीला प्रश्न करदात्यांचा पैसा यासाठी वापरायला हवा की नको हा. खाजगी संस्था यात परताव्याची हमी नसल्यामुळे उतरणे कठीण आहे. सरकार काही प्रॉफीट मेकींग ऑर्गनायझेशन नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वगैरे आहेत पण त्या विषयाला धरुन कोणतेच शोभेचे प्रोजेक्ट, कार्यक्रम व्हायला नकोत असे म्हणावे लागेल. दर महीन्याला शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात म्हणून मग आपण नेहमीच दुखवटा पाळायला हवा.

In reply to by खटपट्या

काही नाही हो. याचं श्रेय यांच्या नावडत्या पक्षाला मिळेल म्हणून ही पोटदुखी आहे. पूर्वीचं सरकार यांना करदात्यांचे पैसे कसे खर्च केले याचा हिशोबच द्यायचं ना दरवर्षी. एवढं जर असेल तर हे स्मारक झाल्यावर याला विरोध करणाऱ्यांनी तिथे जाऊ नका. हाकानाका.

In reply to by बोका-ए-आझम

आधीच्या पक्षांनी जनतेची घोर निराशा केली त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. तेव्हा आता आधीच्या सरकारांचे दाखले देण्याला काय अर्थ आहे? त्यांचं सरकार करत नसे मग या सरकारकडून का अपेक्षा करता असं म्हणायचे आहे का तुम्हाला?

In reply to by सतिश गावडे

या सरकारला जाब विचारणा-यांनी पूर्वीच्या सरकारांनाही असाच जाब विचारला होता का? जर उत्तर हो असेल तर काही म्हणायचं नाही, पण जर नाही असेल तर तो राजकीय bias आहे. तसा bias दाखवायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण मी दाखवतो तेव्हा तो विचारांना पाठिंबा आणि बाकीचे दाखवतात तेव्हा भक्त, भाट वगैरे शेलकी विशेषणं वापरणे (हे व्यक्तिगत घेऊ नये) हे चुकीचं आहे. Biased आहात तर आहात असं सांगावं. उगाचच ₹३६०० कोटींमध्ये काय काय झालं असतं असं म्हणून जनतेचा खोटा कळवळा दाखवू नये, जसा इथे याला विरोध करणारे काही जण दाखवत आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

अगदी बरोबर बोलत आहात. हा जो काय स्मारक विरोधाचा पोटशूळ उठला आहे तो कोणत्या पक्ष्याने त्याचे श्रेय घेतले यावरूनच आहे, हे स्फटिकाप्रमाणे शुभ्र आहे. पण या पक्षाचा आवेग सुद्धा उतावळ्या नवऱ्या प्रमाणे होता, हे प्रकर्षाने दिसून आले. त्यात १७ का १८ कोटींच्या स्वपक्षाच्या जाहिराती, विविध ठिकाणच्या मृदा आणि नद्यांचे पाणी आणण्याच्या संकल्पना ज्याने सुचवली त्यानेच अर्ध्या वाटेतून माघार जाणे, वाघाची झूल पांघरलेल्या शेळपटण्याचे मानापमानाची नाटकं, पक्षीय विरोधकांना जाणून बुजून भूमी पूजनापासून दूर ठेवणे, ज्या राज्याच्या पाठ्यपुस्तकातून महाराजांना लुटेरा म्हणून इतिहास शिकवलं गेला त्या गुजराती माणसाच्या हस्ते भूमिपूजन झाले अशी धारणा असणारे, भट ब्राह्माणाचा पक्ष अशी विरोधकांकडून हेटाळणी (पण या पक्षात मराठेच जास्त आहेत), स्मारक कसे पैसे कमावण्याचे साधन आहे याची भलामण करणाऱ्या व्यवहार पंडितांचे ज्ञानामृत, शेतकरी आत्महत्या आणि इतर समस्ये शी सांगड घालण्याचा प्रयत्न या आणि इतर बाबी मुळे खऱ्या खुऱ्या जाणत्या राज्याच्या या भव्य दिव्य शिव स्मारकाच्या भूमिपूजनाला गालबोट लागले आहे. ज्यांच्या मुळे या लोक राजाला "जाणता राजा" ही बिरुद मिरवायला मिळाले त्या रयतेला या महाराजांच्या जीवावर जगणाऱ्या बांडगुळांनी खिजगिणतीत ही ठेवले नाही.

In reply to by विशुमित

काय करता? लोकशाही जरी सर्वात चांगली राज्यपद्धती असली तरी त्यात जेव्हा निवडणूक, राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमं वगैरे प्रकार येतात तेव्हा असल्या गोष्टी होतात. Nothing is free. Definitely not democracy.

In reply to by बोका-ए-आझम

रोजगार आणि महसूल निर्मिती हा स्मारकाच्या निर्मितीचा उद्देश आहे का? स्मारकाच्या निर्मितीमागचा हेतू वेगळा आहे मात्र अवाढव्य खर्च जस्टीफाय करता येत नसल्याने हा रोजगार आणि महसूल निर्मितीचा मुद्दा रेटला जात आहे.

In reply to by सतिश गावडे

वरचाच प्रतिसाद डकवतो.. सगासर, ते तसं हिरिरीने जे कोणी जिथे कुठे लिहीत असतील, जिथे कुठे मुद्दे रेटत असतील तिथे फटकन उत्तर देऊन टाकलं ना म्हणजे असे मुद्दे पुढे सरकत नाहीत. बाकी सरसकटीकरण नको. त्यातून कसला परतावा मिळेल, कसला रोजगार निर्माण होईल यावर यथायोग्य मुद्देसूद चर्चा झाली तर चांगलंच आहे ना! भाजप राजकारण करतंयच, आणि करत राहणार! जोपर्यंत या गोष्टींवर आधारित मतदान होणार तोपर्यंत अशा गोष्टी सर्व राजकीय पक्ष करणार, भाजप त्याला अपवाद असण्याचा काहीच कारण नाही. पण या स्मरकातून काय वाईट होईल आणि काय चांगले यावर चर्चा नको का व्हायला? हि गोष्ट भाजप करतंय म्हणून विरोध आणि विरोध जस्टीफाय करायला मुद्दे नाहीत म्हणून खर्चाचा मुद्दा पुढे, असे म्हणणे योग्य ठरेल काय? खर्च जस्टीफाय करायचा झाला तर सरकारचे बरेचसे प्रकल्प अशाच प्रकारात मोडतील.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सगासर, ते तसं हिरिरीने जे कोणी जिथे कुठे लिहीत असतील, जिथे कुठे मुद्दे रेटत असतील तिथे फटकन उत्तर देऊन टाकलं ना म्हणजे असे मुद्दे पुढे सरकत नाहीत.
असे उत्तर देणे बहुतेक वेळा व्यक्तिगत होते हा माझा मिपावरील नऊ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे आपलं म्हणणे स्वतंत्रपणे मांड्णे योग्य वाटते मला.
बाकी सरसकटीकरण नको. त्यातून कसला परतावा मिळेल, कसला रोजगार निर्माण होईल यावर यथायोग्य मुद्देसूद चर्चा झाली तर चांगलंच आहे ना!
रोजगाराचा मुद्दा स्मारकनिर्मितीमागील कारण असेल असे वाटत नाही. तसा उल्लेख दुरदर्शन किंवा वृत्तपत्रांमधील जाहीरातींमध्येही नव्हता. निदान माझ्या तरी असे कुठे पाहण्यात अथवा वाचण्यात आलं नाही. काही लोक सरकाराच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी हा मुद्दा ओढून ताणून चर्चेत आणत आहेत.
भाजप राजकारण करतंयच, आणि करत राहणार! जोपर्यंत या गोष्टींवर आधारित मतदान होणार तोपर्यंत अशा गोष्टी सर्व राजकीय पक्ष करणार, भाजप त्याला अपवाद असण्याचा काहीच कारण नाही.
सहमत.
पण या स्मरकातून काय वाईट होईल आणि काय चांगले यावर चर्चा नको का व्हायला?
व्हायला हवीच मात्र जो मूळ हेतूच नाही तो समर्थन करण्यासाठी इथे ओढून ताणून तयार केला जातोय त्याचं काय?
हि गोष्ट भाजप करतंय म्हणून विरोध आणि विरोध जस्टीफाय करायला मुद्दे नाहीत म्हणून खर्चाचा मुद्दा पुढे, असे म्हणणे योग्य ठरेल काय? खर्च जस्टीफाय करायचा झाला तर सरकारचे बरेचसे प्रकल्प अशाच प्रकारात मोडतील.
विरोध "कोण करतंय" याला नसून "काय केलं जातंय" याला आहे. ज्यांना प्रतिकांमध्ये अस्मिता दिसते त्यांना हा निर्णय आवडेल मात्र ज्यांना प्रतिकांपेक्षा विचारांचे आचरण जास्त महत्वाचे वाटते त्यांना स्मारकावरील एव्हढा अवाढव्य खर्च अनाठायी वाटणं साहजिक आहे.

In reply to by सतिश गावडे

असे उत्तर देणे बहुतेक वेळा व्यक्तिगत होते हा माझा मिपावरील नऊ वर्षांचा अनुभव आहे
हे पटले नाही. वैयक्तिक उत्तराबद्दल नाही तर मुद्द्याला उत्तराबद्दल (मुद्दा खोडून काढण्याबद्दल) म्हणालो मी.
रोजगाराचा मुद्दा स्मारकनिर्मितीमागील कारण असेल असे वाटत नाही.
नाहीच आहे तो मुद्दा! मला वाटते खर्च वगैरे मुद्दे काढून विरोध केल्यावर त्याला उत्तर म्हणून रोजगार, पर्यटनातून उत्पन्नाचा मुद्दा आला असावा. मुळात या योजनेच्या खर्चाच्या तरतुदीबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नसताना त्याच्यावर उहापोह करणे कितपत योग्य आहे? उद्या सरकारने सीएसआर मधून पैसा उभा केला तरी विरोध करणारे मागे हटणार नाहीत. काही लोक सरकाराच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी हा खर्चाचा मुद्दा ओढून ताणून चर्चेत आणत आहेत.
ज्यांना प्रतिकांमध्ये अस्मिता दिसते त्यांना हा निर्णय आवडेल मात्र ज्यांना प्रतिकांपेक्षा विचारांचे आचरण जास्त महत्वाचे वाटते त्यांना स्मारकावरील एव्हढा अवाढव्य खर्च अनाठायी वाटणं साहजिक आहे.
हे परत सरसकटीकरण! थोडक्यात या स्मारकाला समर्थन असणारे महाराजांच्या विचारांचे आचरण करत नाहीत आणि विरोधक ते नक्की करतात असे आहे तर! आणि हो, तो खर्च अनाठायी कसा आहे यावरच तर चर्चा व्हायला हवी आहे.

In reply to by सतिश गावडे

रोजगार आणि महसूल निर्मिती हा निर्मितीचा उद्देश नाहीच. पण जे लोक्स फायदा तोट्याचा विषय काढून स्मारकाला विरोध करत आहेत त्यांचासाठी म्हणालो की काहीशे लोकांना रोजगार मिळेलच मिळेल. अवाढव्य खर्च जस्टीफाय करायचा म्ह्टला तर गेल्या सरकारने सींचनावर केलेला अवाढव्य खर्च कसा काय जस्टीफाय करता येइल? कीत्येक धरणे फक्त आणि फक्त काँट्रॅक्टर लोकांची (आणि पर्यायाने स्वतःची) सोय पहाण्यासाठी बांधली गेली. कोकणात माझ्या आजोळी बांधलेले अवाढव्य धरण कवडीमोलाचे ठरले आहे. कारण साठलेल्या पाण्याचे वितरण करण्याची योजनाच नाही. परीणामी धरण तुडंब भरुन वाहते आणि पाणी समुद्राला जाउन मिळते. थोड्याफार प्रमाणात वीहीरीतील पाण्याची पातळी वाढली. भूजल पातळीही वाढली असेल. पण त्यासाठी जलयुक्त शिवार सारख्या योजना राबवत्या आल्या असत्या. अवांतराबद्दल क्षमस्व पण सरकारचे डब्यात गेलेले प्रोजेक्ट शोधणे कठीण नाही. त्यामुळे मुळात फायदा ग्रुहीत न धरता सुरु केलेल्या या प्रोजेक्टला व्यवहारीतेच्या नावाखाली विरोध करणे उचीत नाही.

शिवस्मारक करून ते पाहण्यासाठी भक्कम तिकिट आकारले तर एक नवीन पर्यटनस्थळ निर्माण होऊन भरपूर कमाई होऊ शकेल.
नंतर शिवस्मरकाला जाण्यासाठी खुप खर्च येतो म्हणून ओरडा होइल. सरकार सबसिडि चालू करेल. फेरी साठी लागणारे खर्च पण सरकार उचलेल. महानगरपालिका ला पैसे देइल. आणि राजकारण ढॅण ढॅण ढॅण चालू होइल. असो.

शिवस्मारक ही अस्मितेची गरज आहे. अस्मिता ही प्राथमिक गरज नव्हे (मॅसलॉच्या रचनेनुसार ३ की ४थ्या क्रमांकावरची). अस्मितेची गरज ही वेगवेगळ्या लोकांत वेगवेगळी असते. सरकारने शक्यतो प्राथमिक गरजांवर लक्ष केंद्रीत करावं जी संपूर्ण जनतेची गरज आहे. बाकी गोष्टी व्हाव्यात पण सरकारी कोषातून शक्यतो टाळाव्यात. जर खरच जनतेची अस्मिता प्रखर असेल तर पैसाही गोळा होइल त्यासाठी. त्यातून होणारे कामही जास्त चांगल्या प्रतीचे होइल.. त्याची निगराणीही तितकीच चांगली होउ शकेल. हौसेला मोल नसतं पण एकासाठी हौस ही दुसर्‍याला पैसा उधळणे वाटणारच. पण हे सरकारी पैशातून नसेल तर इतका नक्कीच आक्षेप नसेल.

शिवरायांच्या "विचार" व "प्रेरणा" किंवा इतिहासाच "भान" याच गोष्टी महत्व्याच्या असतील. म्हणजे या स्मारकामागे असा उद्देश असेल तर शिवरायांचा "विचार" प्रसार करण्याचे अनेक क्रिएटीव्ह मार्ग कमी या इतक्या खार्चिक प्रोजेक्ट पेक्षा कमी पैशात होऊ शकतात. किंवा इतके पैसे खर्चुन याहुन उत्तम विचार प्रसार करता येइल. उदा.असे करता येइल ( मी महापालिकेच्या उंदीर मारण्याच्याच विभागात काम करतो याची पुर्ण जाणीव ठेऊन ही सुचवणी ) १- सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरेंची ( वादग्रस्त भाग एडिट करुन बाकी सर्वमान्य ) आणि गजानन मेहेंदळें या सारख्या दिग्गजांची शिवाजीवरील पुस्तके शासनाने भरपुर सबसिडी लावुन. प्रति विकत घेऊन शाळा व महाविद्यालयीन तरुणांना मोफत वा कमी किमतीत उपलब्ध करुन द्यावीत. २-आवडेल तो किल्ला बघा. एस टी महामंडळाकडुन किल्ला दर्शन योजना राबविता येइल. ज्या विद्यार्थ्यांना वरील पुस्तके वाचुन कॅसेट ऐकुन शिवरायांचे गड किल्ले बघण्याची इच्छा होइल व अनेक ग्रामीण तरुणांना खर्च परवडणारा नसेल किंवा अशा विद्यार्थ्यांना. किल्ला पास योजना राबवावी. वेगवेगळे पॅकेज बनवावे. दक्षिणेतले किल्ली काही मिळुन एक संच असा. व कुठलाही संच कुणालाही कधीही घेता येइल असा ठेवावा. त्यात किल्यावर रजीस्टर एंट्री घेऊन परतीचे तिकीट वगैरे बाबी दुरुपयोग टाळण्यास इ. करता येतील. ३- अ‍ॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट सर्व साडेतीनशे किल्ल्यांसाठी शिवाय परमनंट स्वच्छता दुतांची नियुक्ती.इ, करुन किल्ले संवर्धन इ. करता येइल. प्रत्येक ठिकाणी उच्च प्रशिक्षीत गाईड ची नेमणुक करावी जो आलेल्या प्रवाश्यांना अचुक इतिहास सांगेल माहीती देईल. ४- काही शिबीर डिझाइन करता येतील बेसीक इंटरमिजीएट अ‍ॅडव्हान्स अशा श्रेणी ठेऊन ज्याचे स्ट्डी मटेरीयल व्हीजीट प्रोग्राम तज्ञांकडुन बनवुन घेता येइल. व तो सर्वत्र उपलब्ध करुन देता येइल. ५- आंतरराष्ट्रीय पातळीवर मुख्य जागतिक इतिहासाच्या प्रवाहात जिथे जिथे संशोधन होते तिथे शिवाजी त्या काळातील सर्वच संबंधित बाबींवरील संशोधनाला सरकारकडुन प्रोत्साहन देता येइल. ६- पुरंदरे सारख्या व्यक्तीकडुन आयडीयाज घ्याव्यात जसे त्यांची एक आयडीया होती डिस्नेलॅन्ड च्या धर्तीवर शिवसृष्टी इ. म्हणजे सांगायचे असे आहे की एकदम इतका मोठा खार्चिक प्रोजेक्ट घेण्यापेक्षा टप्प्या टप्प्यात ग्राउंडलेव्हल ला काम करत शिवरायांच्या "विचारा" चा प्रसार प्रचार करता येइल. प्रेरणा अधिक सकारात्मकतेने संक्रमित करता येइल. अर्थात या प्रकारात भडक भव्यपणाचा सोस नसेल यात राजकीय पक्षाला इन्स्टंट प्रसिद्धी मिळणार नाही. म्हणजे अजुन विचार करता येइल अनेक सकारात्मक पर्याय शोधता येतील. आणि एक जनसहभागाने जर काही झाल तर तेच अधिक उत्तम आणि त्याने होत नसेल तर मग एक अर्थ जनतेची इच्छाही नसेल सहमतीही नसेल कदाचित.

थे दिल्लीतली एकाआड डॉन घाटांची जमीन विकून पैका इन का? कायप्पा म्हणे 9 हजार करोड ची जमीन हाय थे?