ठाण्यातले भोजनालय
अन्नाला नावं ठेऊ नये हा हाडीमाशी रुळलेला संस्कार आणि अतिशय भावलेले मूल्य ...एखाद्या अनुभवावरून एखाद्या नवीन उत्साही उद्योगाला नाउमेद करणे हा सुद्धा उद्देश नाही पण तरीही उपहारगृहातले अनुभव लिहिल्याशिवाय राहवत नाही
तर ठाण्यात अलीकडेच सुरु झालेले नवीन पेंडसे भोजनालय, नामांकित शेफ चे नाव जोडून गाजावाजा करून अतिशय जोरदार जाहिरात करून सुरु झालेले. एकंदरीत खास ब्राम्हणी पदार्थांचा आस्वाद घ्यायचे अजून एक नवीन ठिकाण म्हणून मोठ्या अपेक्षेने आणि मोठ्या उत्साहाने आज गेलो आणि एकूण सेटप बघताच एक्स्टेंडेड पोळीभाजी केंद्राचा फील आला ...
जेवणाचा मोजका मेनू कसलेही ऑप्शन्स नाहीत ....पण पानात आलेले पदार्थ खालीलप्रमाणे
-घडीची चपाती (पोळी का म्हटले नाही कुणास ठौक)....अत्यंत जाड पोळी ..आधीच करून ठेवलेली समोर तव्यावर 'गरम' करून घडी करून वाढली (घडी हि कणकेची घालतात जेणे करून पोळी ४ पदरी होऊन सुद्धा लुशलुशीत होते)
-तोंडली बटाटा भाजी : कुकर मधी अति शिजवलेली तोंडली (पांढरी दिसणारी)...कमालीची तिखट
-चवळीची उसळ : उकडलेली चवळी, कांदा, मसाले स्वतंत्र शिजवून एकत्र केल्यासारखे ..हि वरच्या भाजीसार्खीच तिखट ..मिरच्या वेचून बाहेर काढाव्या लागल्या
-अळूची पातळ भाजी : कसलीच स्पेसिफिक चव नाही ...
-आमटी : त्यातल्या त्यात बरी ...
-मक्याची कोशिंबीर : उकडलेले मक्याचे दाणे वर थोडेसेच लिंबू कोथिंबिरीचे १०-१५ अणू
मोजून २ भजी, नैवद्याच्या एका वाटीत दही व दुसऱ्या वाटीत शेवयाची खीर (ठीक ठीक)
ह्या सगळ्याचे वट्ट २०० रुपये मोजून ...बाहेर
कुणी आवर्जून काही वेगळे अनुभव घेतलेले थेट सांगत नाही तोवर .....येथे पुन्हा जाणे होईलसे वाटत नाही
प्रतिक्रिया
कट्टो प्लान कर मरे!! ;)
दोन दीवस उपाशी र्हावन
राजस्थानी भोजनालय का?
बहूतेक
पुरोहीत भोजनालय आहे ते.
पुढल्या भेटीत गोखलेऐवजी इथे
वोक्के मालक.
मला पण सांगा ....
हजर असेन तर मीही येइन
असं ठरवून नाय हो भेटत आम्ही,
थाळीच खायची असेल तर डोंबोलीत
ठाण्यात स्वाद.
कौपिनेश्वर भोजनालय
गोगा सोल्लिड होत
//ह्या सगळ्याचे वट्ट २००
Pagination