Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ६

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ६

Published on 31/10/2016 - 16:43 प्रकाशित
पाचवा भाग २००+ प्रतिसाद झाल्याने नवा भागप्रपंच. दिवाळीबरोबर थंडीचंही आगमन झालंय. तर, गॅस गीजर घ्यायचाय. आमचे ८ जणांचे कुटुंब आहे. कोणता घ्यावा? कोणी मिपाकर घरी वापरताय का? Online घेतला तर installation कोण करून देईल? वापरताना कोणत्या अडचणी/समस्या/बिघाड होऊ शकतात?

याद्या 14660
प्रतिक्रिया 51

मी बजाज कंपनीचा गॅस गिझर ६ वर्षे वापरला आहे. उत्तम आहे . सेल बदलण्याशिवाय काही खर्च नाही. पाईप उत्तम क्वालीटीचा वापरा. आणि पाण्याचे प्रेशर योग्य येते का ते चेक करा.

In reply to by संदीप डांगे

सौर ऊर्जा वापरून पाणी तापावण्याची यंत्रणा खूप खर्चिक असावी असा माझा अंदाज आहे. आठ माणसांना पुरेशी यंत्रणा बसवायला अंदाजे किती खर्च येऊ शकतो? (गॅस गीजर बसवलाय. ४७००किंमत+३००installation+२०००पाईप्स वगैरे असा ७०००मध्ये सगळं झालं)

In reply to by तुषार काळभोर

माझ्या घरी घरमालकांनीच बसवून दिलेली सिस्टीम आहे. तिला बहुतेक १५००० खर्च आलेला, ३५० लिटर ची क्षमता आहे. गेले साडेतीन वर्ष अजून काही दुसरा खर्च नाही. पाणी सतत गरम येते. दुसरी गोष्ट म्हणजे कनविनियन्स. २४ तासात कधीही नळ फिरवला की गरम पाणी. गिजर सारखं आधी सुरु करुन ठेवा इत्यादी प्रकार नाही. तसेच सिलेंडर चा किंवा पाइपगॅसच्या कन्झम्प्शन चा खर्च शून्य. ही सिस्टीम 'किमान' दहा वर्ष विना-मेन्टेनन्स चालेल. दहा वर्षात किती रुपयांचे गॅस कन्झम्पशन होईल तो हिशोब करा. शिवाय पर्यावरणपूरक आहेच. सुर्याशिवाय इतर कोणावरच अवलंबून राहायची गरज नाही. अगदी काळ्याकुट्ट ढगाळ वातावरणातही किमान कोमट पाणी येतंच. एवढ्या वर्षात थंड पाणी येण्याचा प्रसंग एकदाच आलेला जेव्हा सतत तीन दिवस ढग भयंकर दाट होते. त्या सिचुएशनला शेगडीवर पाणी तापवून घेतले, बस. खरं सांगू का? मी सोलार वॉटर हिटर सिस्टीमचा भयानक पंखा आहे आणि प्रत्येकाला ते वापरण्याचा सल्ला देतोच. पर्यावरणपूरक व युजरफ्रेंडली साधने जास्तीत जास्त वापरली जावीत ह्याचा आपण सर्वांनीच प्रचार-प्रसार केला पाहिजे. जसे की खालच्या चित्रात दिलेली बायोगॅस शेगडी. ही मला भारी वाटली पण अजून प्रत्यक्ष अनुभव नाही. स्वतंत्र घर असणार्‍यांसाठी चांगली दिसते. सोसायटी साठीही मॉडिफिकेशन करुन मिळाली तर अजून बरं. 1

In reply to by संदीप डांगे

आमच्या सोसायटीत सोलर सिस्टीम आहे. पण गरम पाणि फार क्वचित मिळते. कधी कधी थोडेसे कोमट मिळते. कमिटीकडे सांगून सांगून थकलो. बिल्डिंगमध्ये अनेकांचा हाच अनुभव. अशा परिस्थितीत कंटाळून गॅस गीजर बसवला (स्वतंत्र सोलर सिस्टीम बसवणे अशक्य). सात हजाराच्या आसपास एकूण खर्च. एक सिलिंडर (दोघांकरिता) किमान पाच महिने पुरतो. बाकी गॅस गीजर सोयीस्कर आहे. चालू करुन ठेवावा नाही लागत. रेग्युलेटर , गीजर आणि पाणी चालू केले की लगेच गरम पाणि मिळू लागते.

In reply to by मराठी कथालेखक

एवढ्यात नारायणगावात राहत असतांना सोसायटी च्या संदर्भात सोलरचा अनुभव असाच आहे. किंबहुना ही थुकपट्टी आहे, समस्येवरचा नीट विचार करुन केलेला उपाय नाही असे वाटते. सोसायटी व स्वतंत्र घरे यांच्या वेगळ्या समस्या असतात, त्याला सरसकट एकच उपाय लागू पडत नाही. अमुक शे लिटर पाणी तापवायला अमुक एक स्क्वेअर फीट सोलर-किट लागतं, त्यामुळे तितकी जागा सोसायटीत उपलब्ध होत नाही. अगदी सगळी टेरेस वापरली तरी त्याखाली राहणार्‍या कुटुंबांची गरज भागणार नाही. सोसायटी संदर्भात हे मॉडेल कुचकामी आहे.

In reply to by मराठी कथालेखक

मुंबई सारख्या ठिकाणी सोलर सिस्टिम काही कामाची नाही. कांदीवली येथील जवळच्या नातेवाईकाकडे सोलर सिस्टिम आहे पावसाळ्यात बरेचदा ३-४ दिवस ढगाळ वातावरण असते तेव्हा अजिबात गरम पाणी मिळत नाही. थंडीच्या दिवसात घरातील शेवटच्या मेंबरला कोमट पाणी मिळण्याची शक्यता असते,कारण आदल्या दिवशी गरम झालेले पाणी वापरताना थंड पाणी टाकीत पडत असते त्यामुळे टाकीतील गरम पाणी कोमट होते. अर्थात नवी सोलर सिस्टिमम्ध्ये घरातून टाकीचा इन्लेट व आउट्लेट चालू बंद करून शेवटपर्यंत गरम पाणी मिळ्वू शकतो, परंतू हे काम मॅन्युअली असल्यामूळे आठवणीने कॉक चालू बंद करावा लागतो. सध्या बाजारात ३५-४० हजारापर्यंत ३५० लि. क्षमतेची सोलर सिस्टिम मिळते. गॅस गिझर उन्हाळ्यात ५ जणांच्या कुटुंबाला ३ महीने व हिवाळ्यात २ ते २.५ महीने जाऊ शकतो. जोपर्यंत घरात १ भरलेला जादा सिलिंडर व १.५ व्हो. चे दोन मोट्या बॅटरी असल्या तर केव्हाही गरम पाणी मिळू शकते. गॅस गीझर २५०० हजारापासून ७००० पर्यंत मिळतात. सोलर सिस्टिमचे वाचलेल्या पैशाची बँक एफडी करा.

In reply to by संदीप डांगे

"पाणी तापव्या" गेली चौदा (१४)वर्षे वापरत आहे. जशी गाडीवर धूळ बसल्यावर धुतो तितकीच साफ सफाई करावी लागते १२५ लिटरचा ४ माणसाच्या कुटुंबासाठी पुरेसा होतो.(त्यातील गरम पाणी रात्री वापरण्याचा अपशकून करू नये,सकाळी कोमट+गार पाण्याने तुम्च्या नावाने शंख करीत आंघोळ होईल)

डांगेसरांनी चित्रात दाखविलेले बायोगॅस संयत्र वाजवी किमतीत असेल तर मलाही हवे आहे. केरळातील एक आहे पण खूप महाग आहे आणि आणण्याचा वाहतूक खर्च (अंगापेक्षा बोंगा मोठा) आहे.

गेली चार वर्षे महाराष्ट्रात कुठे मिळेल का ते शोधत आहे. गावठी यंत्रात करण्याचा प्रयोग अयशस्वी झाला (गॅस गळती व इतर कारणांनी) मदतीची अपेक्षा असलेला नाखु

In reply to by नाखु

नाखुजी, ह्या बाबतीत काही माहिती देऊ शकाल का ? माझ्या कडे भरपूर ऊन येते आणि एक छोटी गॅलरी पण आहे (ओपन टेरेस) त्याचा ह्या बाबतीत काही उपयोग होतो का ते बघायचे होते... ह्या बाबतीत कुठे चौकशी करता येईल ? मी कळवा- ठाणे येथे राहतो. भरपूर सूर्यप्रकाश मिळतो तो वापरून घ्यायची इच्छा आहे. सरकार स्वच्छ ऊर्जेबाबत काही सवलत देते का? काही सबसिडी वगैरे ? ४ जणांच्या कुटुंबाला अंघोळी पुरते गरम पाणी मिळाले तरी पुष्कळ आहे.

In reply to by तेजस आठवले

ओपन टेरेस.. म्हणजे बाथरुमपेक्षा जास्त उंचीवर पॅनेल वा टँक बनवता येण्याची शक्यता कमी. किंवा असला तरी उंचीत फारसा फरक नसेल म्हणजे पुन्हा मोटर वापरणे येईल. मोटर वापरण्यात वीजेचा खर्च फार नसेलही पण एकूणातच कटकटीचे काम होईल. शिवाय टेरेसवरची मोठी जाग व्यापली जाईल. त्यापेक्षा गॅस गीजर परवडेल.

In reply to by मराठी कथालेखक

सौर बंब एक्दम वरच्या टेरेसवरही लावता येईल (आणि सोसायटी त्याच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही नव्या तरतुदीनुसार).राहिला प्रश्न तुमच्या वयक्तीक छज्जा (गॅलरीचा० ) तिथे तुम्ही सौर कुकर वापरू शकता आधिक माहीती इथ खास मुंबईतील . मी स्वतः वापरीत आहे एक तप :अगदी वरण भातही करता येतो,बटाटे उकडता येतात्,शाकाहारी असल्याने इतर अजमावले नाही पण तेही शिजवता येते असे ऐकले आहे. सध्या घरच्यांना पुरेसा वेळ नसल्याने (स्वयंपाक सोडून) :रवा भाजणे,शेंगदाणे भाजणे,भाजणी भाजणे इत्यादी साठी जोरदार वापर आहे. उन्हाखालचा नाखु

Usha Janome Dream Stitch Sewing Machine घ्यायची आहे. कोणी घरी वापरून पहिली आहे का? असेल तर काही माहिती देता येईल का?

In reply to by संदीप डांगे

नाही कळालं.. काही झालं तरी नवीन प्रतिसाद (८) हे एकूण प्रतिसादांपेक्षा (७) जास्त कसे ?

१) कॅलिंन्डर अॅप:- निरनिराळ्या तारखांना नोंदी केल्यावर नंतर "व्ह्यु ओल" केल्यास सर्व नोंदी दिसणारी अॅप्स कमी आहेत॥ २)नोट्स अॅप : निरनिराळे लेखन ओफलाइन करत जाऊन/वाढवत जाऊन नंतर कधीतरी सगळे एकदम कॅापी पेस्ट ( कॅापी ओल सोय) असलेले शोधतोय. स्क्रोल करत जाऊन सिलेक्ट आणि कॅापी हा पर्याय पाच दहा हजार शब्दांसाठी उपयोगाचा नाही. तशी सोय असलेले नोट अॅप हवेय.बय्राच नोट्समध्ये एक हजारच्यावर शब्दही मावत नाहीत.

In reply to by कंजूस

२)नोट्स अॅप
गुगल कीप (keep) पाहिले का ? यात आत सुमारे २३०० शब्द पेस्ट केलेत (word1 word2 word3 ...word2343) यातल्या नोट्स तुम्ही android मोबाईल तसेच संगणकावर बघू /लिहू शकता

In reply to by मराठी कथालेखक

माझ्या विंडोज मोबाइलवर पंचवीसेक नोट अॅप घेऊन पाहिली। त्यात फक्त "Nimbus Note Web" अती पावरफुल आहे . विंडोजच्याच नेटिव "ONENOTE" आणि officeमधल्या "WORD "( docx file)पेक्षाही दहापट फास्ट आहे. १२ हजार शब्दही त्यात पेस्ट होतात झटकन.परंतू या तिन्हींमधून नंतर कॅापी करायचे झाले तर copy-allसोय नाही. "सिलेक्ट-कॅापी" करायला फार वेळ जातो. मध्येच टच गेला तर पुन्हा सुरुवात करावी लागते.तर तसं काही androidवर आहे का? सध्या दोन लेख लिहिताना याची फार गरज भासली.लेखन शोधसाठी एकेक लेख भरत गेलो नोटमध्ये. शेवटी इकडे आणण्यासाठी बराच वेळ गेला.

नोटबंदीच्या काळात फ्लिपकार्ट आणी अ‍ॅमेझॉनची काय खबरबात आहे ? दिवाळीच्या अगोदर दर दोन चार दिवसांत अमुक फोन अमुक सेकंदात विकला गेला अशा बातम्या यायच्या त्या येत नाहिये म्हणून विचारतो आहे.

In reply to by असंका

चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे, सिनेमासाठी 20-25 टक्के मसाला घातलाय, https://en.m.wikipedia.org/wiki/Unstoppable_(2010_film)#Inspiration आपला alltime फेवरीट सिनेमा!

वॉरंटी कशी क्लेम करावी? साध बल्ब बदलायला जर काही किमी जाऊन (मोबाईलसाठी असते तशी) वॉरंटी क्लेमची पद्धत असेल तर नाही जमणार. कोणाला अनुभव आहे का?

In reply to by संदीप डांगे

ते बल्ब कसे असतात? त्यांच्या वॉरंटीची काय पद्धत आहे? जवळच्या मंडळाच्या हापिसात मिळत असेल तर तो बेस्ट पर्याय असेल.

In reply to by तुषार काळभोर

मंडळाच्या हापिसात मिळत नसून, हापिसाच्या बाहेर ते ते कंपनीवाले हे बल्ब विकतात. प्रामाणिक सल्ला : एमेसिबीतून घेण्यापेक्षा डी-मार्टमध्ये CG चे मिळतात, ते घ्या.

In reply to by सस्नेह

प्रश्न पुन्हा तोच आहे... वॉरंटीचं काय? ईलेक्ट्रिकलच्या दुकानातनं घेतला तर वॉरंटी रिप्लेसमेंट त्याच दुकानात मिळते. डिमार्ट्/ऑनलाईन/महावितरण कडून घेतलेल्या एलईडी बल्बच्या वॉरंटी रिप्लेसमेंटसाठी काय करावे लागते? कुठे जावे लागते?

In reply to by तुषार काळभोर

D Mart मध्ये warranty replacement साठी जाता येईल. बिलाची प्रत काढून ठेवावी. बाकी eveready उत्तम असं माझं मत.

गार्सीया मार्क्वेझ ने फिडेल कॅस्ट्रो वर लिहीलेला एक रोचक लेख काही ठिकाणी अतिशयोक्ती वाटते... मात्र व्हेरी इंटरेस्टींग त्याच्या The Autumn of the Patriarch या महान कादंबरीत रेखाटलेले अद्वितीय असे हुकुमशहा चे मध्यवर्ती पात्र हे इतर अनेक लॅटीन अमेरीकन हुकुमशहां व्यतिरीक्त फिडेल कॅस्ट्रो पासुनही प्रेरीत होते असे दावे करण्यात येतात. त्याच्या व फिडेल कॅस्ट्रो च्या वादग्रस्त मैत्री वर ही अनेक मतेमतांतरे आहेत. https://m.facebook.com/notes/gabriel-garc%C3%ADa-m%C3%A1rquez/the-fidel-... http://www.cubanet.org/htdocs/CNews/y02/may02/16e5.htm

अलिबागला तीन दिवसांच्या लाँग वीकएंड साठी हॉटेल /रिसॉर्ट सुचवा (फक्त दोन मोठे - लहान मुले नाहीत) जास्त भटकायचे नाहीये. फक्त निसर्गाचा आनंद घेणे, सकाळ सायंकाळ समुद्रकिनारी भटकणे ईतकाच कार्यक्रम आहे. हॉटेलमध्येच उत्तम शाकाहारी जेवण आणि मद्य मिळत असल्यास चांगले (किंवा बाहेरुन आणलेले मद्य पिण्याची मुभा असावी).

स्कॉचच्या बाटल्या दीर्घ काळ (अनेक महिने) आडव्या साठवून ठेवल्यास स्कॉचच्या प्रतीवर, चवीवर काही विपरीत परिणाम होवू शकतो काय ?

In reply to by मराठी कथालेखक

कॉर्क असलेल्या सगळ्या बाटल्या उभ्याऐवजी आडव्याच ठेवाव्यात, अशी प्रथा आहे. उभ्या ठेवल्या तर कॉर्क कोरडे पडू शकते. ते किंचित ओलसर रहाण्यासाठी ह्या बाटल्या आडव्या ठेवतात.

In reply to by मराठी कथालेखक

उभ्या आडव्या कशाही ठेवा, फक्त फुटून/ लूज झाकणामुळे गळती होणार नाही इतकं बघा म्हणजे झालं.

मी internet banking वापरुन SBI चे नवीन debit card मागवत आहे , Rupay card मिळण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय निवडावा ? sbi

अस्मादिकांना venus thrambiosis नावाचा आजार आहे https://en.wikipedia.org/wiki/Venous_थ्रोम्बोसिस सरकारी नोकरी खास करून mpsc मध्ये काही फायदा होऊ शकेल ?