मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिंग्लीश बालगीते...

मध्यमवर्गीय · · काथ्याकूट
सहज एक विरंगुळा म्हणून ईंग्लीश भाषेतील काही बालगीते मराठित भाषांतरित करविशी वाटली. तुम्हालाहि अशी काहि बालगीते भाषांतरित करता आली तर ईथे जरूर टाका... Johny Johny.... बंड्या बंड्या... काय बाबा? साखर खातोस? नाहि बाबा... खोट बोलतोस? नाहि बाबा... तोंड उघड, आई ग...बघ ना बाबा कसे करतायत....

वाचने 6003 वाचनखूण प्रतिक्रिया 12

मध्यमवर्गीय Tue, 09/23/2008 - 21:38
पम्या अन पमी, डोंगरावर जाती, भर ऊन्हात, पाणी शेंदती, ऊन्हातान्हात, पम्याचा घसरे पाय.. गडाबडा लोळत खाली जाय... पमीचा फुटे बांधा... पम्याशिवाय जगण्याचा वांधा...

पाटलीणबाई Tue, 09/23/2008 - 23:25
गोबरे गाल... सुंदर फार... निळे डोळे... दिसतात भोळे... काळे केस... लांब कुरूळे... बाईंची आवडती तुच आहेस काय...? हो .. हो.. हो... सगळ्यांचीच आवडती पाटलीणबबाई

In reply to by पाटलीणबाई

टग्या Tue, 09/23/2008 - 23:34
> सगळ्यांचीच आवडती > पाटलीणबबाई सगळ्यांचीच आवडती?????? (आणि Chubby chicks नव्हे हो!!!!!! Chubby cheeks!!!!!!)

लिखाळ Wed, 09/24/2008 - 01:16
>>आई ग...बघ ना बाबा कसे करतायत.... हा हा हा.. हा खरा ट्विस्ट.. (खरा पंच आता बाबांना ! ;) ) पुढचा संवाद.. आई : अहो, जरा पंख्यावरची जळमटं काढा.. उगीच रविवार असला की बंड्याच्या मागे लागतात ! -- लिखाळ.

हेरंब गुरुवार, 09/25/2008 - 09:47
थोडे विषयांतर १) दॅट मिल्क इन युवर पॉट इज बेटर व्हाय, आय डोन्ट नो टेस्टस् स्वीटर २) ओ बेबी हाऊ शॅल आय थँक यु आय बीकेम मदर बिकॉज ऑफ यु (म्हणून बघा चालीवर, मीटरमधे बसताय)

In reply to by हेरंब

टग्या Sat, 09/27/2008 - 03:06
१. ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे नकळे २. बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई मीटरमध्ये ओढूनताणून बसतंय.