Skip to main content

सातवे पे कमीशन

Published on गुरुवार, 30/06/2016
केद्रींय कर्मचाऱ्यांना अच्छे दिन...23 % पगारवाढ.. माहे आँगष्टपासुन सातवे पे कमीशन लागु मिनिमम वेतन----२३०००.०० मॅक्सिमम वेतन---साडे तीन लाख. पगार खर्च..७५% व्याज २०% विकासासाठी ५%...बसा बोंबलत... स्टुला वर बसुन डुलक्या घेत हिकडची फाईल तिकडे करणा-या शिपायाला २३०००.०० वेतन... वस्तु निर्माण करणा-या कामगाराला १२ तास काम करुन १०-१२ हजार..... ......

वाचन संख्या 18348
प्रतिक्रिया 122

प्रतिक्रिया

चुकीच्या बातम्या देऊ नका अकु काका किमान पगार ₹ ₹ १८,०००/महिना अन कमाल ₹ २,५०,००० (कॅबिनेट सेक्रेटरी गट) असा आहे, स्वातंत्रोत्तर काळातील सर्वात कमी वेतनवाढ असलेला हा वेतनआयोग आहे, ७५% पैसा पगारात हे ही चूक आहेच, पूर्ण वेतनआयोग जसाच्या तसा इम्पलेमेंट केल्यास सुद्धा सकल घरगुती उत्पादन उर्फ जीडीपीच्या ०.७% होतोय फक्त, त्यातही आयोगाने ने ५२ भत्ते रद्दबादल करून उर्वरित ३६ सम्मिलित केले आहेत, त्यामुळे तो ही खर्च कमी, जानेवारी २०१६ पासून मिळणाऱ्या पगाराच्या अरियर मध्ये सुद्धा अरियर बेसिक वेतनावर मिळणार आहे भत्ते प्रकारावर नाही, तेव्हा उगाच उबळ काढायला म्हणून चुकीचे आकडे देऊ नयेत ही नम्र विनंती

In reply to by अविनाशकुलकर्णी

तुम्हीच वाचा! प्रश्नचिन्ह अन 'शक्यता' ह्या शब्दांचा अर्थ आपणाला कळत नसल्यास भाग वेगळा आहे, लेखनसीमा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

>>>>>७५% पैसा पगारात हे ही चूक आहेच, पूर्ण वेतनआयोग जसाच्या तसा इम्पलेमेंट केल्यास सुद्धा सकल घरगुती उत्पादन उर्फ जीडीपीच्या ०.७% होतोय फक्त पगारापोटी होणार्‍या खर्चाचे प्रमाण हे सरकारच्या उत्पन्नाशी संबंधित आहे, तुम्ही जीडीपीशी चुकीचा संबंध जोडताय. जीडीपीतून पगार वजा जाऊन उरलेली रक्कम सरकारकडे येत नसते विकासकामे करायला.

In reply to by महासंग्राम

आपल्याला योग आहे पण आयोग नाही असे दिसते.. अविवाहीत असल्यास आपल्याला या शब्दानंतर यंदा हा शब्द टाकणे. खुलाशी खलाशी नाखु

या वेतन वाढीमूळे महागाई वाढणार आणि सर्वसामान्याचे जीवन अजूनही दुष्कर होणार असा अंदाज आहे. १ लाख कोटीचा बोजा म्हणजे करदेणारे अजूनही कर भरणार. याचा परिणाम राज्यशासन, इतर कर्मचार्‍यांच्या पगारवाढीवर होणार.

१८,००० व २,५०,००० हे दोन्ही आकडे मूळ पगाराचे आहेत. एकूण पगाराचे नाही त्यामुळे दहावी पास झालेल्या व्यक्तीचा २५ ते ३० हजार पगार झाला आहे आणि फ्रेशर अभियंताचा ८० हजार . सरकारी कार्यक्षमते बद्दल विचारला तर जसे सर्वच मुस्लिम हे दहशतवादी नसतात तसेच सर्व सरकारी नोकरदार हे कामचुकार नसतात असे म्हणावे लागेल

मी सरकारी नोकरी करत नाही. त्यामुळे खालील प्रतिसादाचा गैर समज करु नये. खाजगी नोकरी वाले गलेलठ्ठ पगार कमवतातच! मग सरकारी नोकरी वाल्यांनी तशी अपेक्षा करण्यात काय वावगे?

In reply to by शान्तिप्रिय

संभावित प्रतिसाद :- आम्ही आमच्या मेहनतीने इथवर पोचलो आहे कोणी गॉडफादर होता म्हणून नाही (जसे काही सरकारी नोकऱ्या उदा IAS, IPS, SSC, CDS, NDA, वगैरे कोणी थाळीत सजवून उमेदवारांना देऊन जाते), सगळे सरकारी नोकर हरामखोर असतात, त्यांना कश्याला हवाय पैसा! बोलणारे बोलत राहणार हो! दिल्ली सारख्या शहरात मात्र आमचे पटाईत काका मरमर करून रिटायर होतात! असो!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

दिल्ली सारख्या शहरात मात्र आमचे पटाईत काका मरमर करून रिटायर होतात!
मिपावरच्या भाषा आक्षेपांना उत्तरे देण्यातही त्यांना शक्ती खर्च करावी लागते ते वायलेच बाप्पुराव.. चांगले/प्रामाणीक /कष्टाळू/कष्ट टाळू (ही) सरकारी कर्मचारी पाहिलेला नाखु

In reply to by नाखु

मला तसंही एक कळत नाही की एकंदरीत मध्यमवर्गीय सूर हा सरकारी कर्मचारी खासकरून महसूल अन पायाभूत सुविधा देणाऱ्या विभागांविरुद्ध तीक्ष्ण असतो, ते जर तितके लिथरजीक असले तर ह्या देशात कामे कशी होत आहेत बुआ!? आजकाल म्हणजे 2000 नंतर प्रत्येक सरकार रिपोर्ट कार्ड्स देते कि बुआ अमुक हजार किमी रस्ते झाले तमुक झाले इकडे वीज नेली तिकडे पाणी नेले ते सगळे कसे होत असेल बरे?? नाही म्हणजे सरकारी नोकर अगदीच ऐदी नाहीका ? मग विमानतळ कोण प्रफुल पटेल जाऊन बांधत असे का आज रेल्वे रूळ अन महामार्ग अनुक्रमे प्रभू अन गडकरी स्वतः बांधतात? त्यांचे नेतृत्व कौशल्य वादातीत आहेच हो पण ते निर्णय घेणे त्यांचे ड्रॅफ्टींग ते निर्णय नेमक्या विभागात पोचते करणे हे कोण करते? आमचे असंख्य पटाईत काकाच न?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चिक्की तयार करणे..गटारे साफ करणे शिक्षण..रस्ते/घरे बांधणे व अन्य कामे कंत्राट दार करतात.. यांचे काम टेंडरे काढणे व टक्केवारी घेणे

In reply to by शान्तिप्रिय

अपेक्षा जरूर ठेवावी पण कामाचे रिझल्ट्स पण तसेच द्यावे अपेक्षेकडे भावनिक रित्या पाहणारा सर्वसामान्य कॉमन म्यान

मला वाटते कि वेतन आयोग लागू झाला म्हणून लोकांचा विरोध नसेल तर सरकारी कार्यालयात ज्या पद्धतीने जनतेची कामे होतात, त्यांना जी वागणूक मिळते याला आहे. बाकी सविस्तर सांगायची गरज नसावी.

In reply to by सत्याचे प्रयोग

मध्यंतरी टाटा नॅनो एकदम पेटायचा प्रॉब्लेम झाला होता, आपल्या पाहण्यात किती लोकं डिझाईन टीम अन प्रॉडक्शन टीमच्या पगारावर घसरले आहेत/होते?? तेव्हा तर आपण म्हणताना 'टाटाने बोगस प्रॉडक्ट बनवले' म्हणतो, सेम नियम सरकारला का नसावा?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आपल्या पाहण्यात किती लोकं डिझाईन टीम अन प्रॉडक्शन टीमच्या पगारावर घसरले आहेत/होते?
टाटा मोटर्सचे माहित नाही पण आयटी मधे असे डीझाईन प्रोब्लेम झाले की ज्यांच्यामुळे हे झाले त्या सर्वांच्या वेतनवाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अशी कित्येक उदाहरणे बघितली आहेत की एकाच वेळी सारख्याच पगारावर आलेले लोक कामाच्या गुणवत्तेनुसार २-४ वर्षात १५-२५% मागे-पुढे गेले आहेत. सरकार वर धोरणांवरुन टीका करणे ठिक आहे. पण आपण जेव्हा सरकारी कर्मचार्‍याकडुन एखादी सर्विस घेतो आणि ती नीट मिळाली नाही तर सरकारवर टीका करण्यात काय हशील आहे?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्याच काय आहे की टाटा मोटर्सच्या कर्मचार्‍यांचा पगार करदात्यांच्या पैशातून जात नाही. कंपनीच्या नफ्यातून जातो. म्हणून इतरांना आक्षेप असायचे काही कारण नाही. शिवाय कामगिरी घसरली की खाजगी नोकरी जाते. मग ती कंपनी 'कर्मचारी काळजीवाहू टाटा मोटर्स' असो किंवा 'कर्मचारी कर्दनकाळ' सिनेक्रोन असो. टाटा मोटर्सने डिझाईन टीमच्या किती लोकांना सॅक केले हे बाहेर कळण्याची शक्यता आहे का ? एकदा इंटरव्यू क्रॅक केला, आता आयुष्यभर आम्हाला पोसा, काम न करता ठरलेली (फ्लॅटन्ड) वेतनवाढ द्या, काम करत नसताना ऐतखाऊ पेन्शन द्या अशी अपेक्षा खाजगी कर्मचारी ठेवत नाहीत. जर ठेवली तरी त्यांना कोणी विचारत नाही अन तेच योग्य आहे. खाजगी कर्मचार्‍यांना करदात्याच्या पैशातून पेन्शन मिळत नाही, त्यामुळे अनुत्पादक खर्च आणि वित्तीय तूट वाढत नाही. सरकारी नोकरांना कामगिरीच्या निकषांवर वेतनवाढ मिळावी, चांगले काम करणार्‍यांना २३ का १०० टक्केही द्यावी, काम न करणार्‍यांना हाकलून द्यावे, अनुत्पादक खर्च बंद करावेत अशी सर्वसाधारण अपेक्षा असते.

In reply to by अप्पा जोगळेकर

अग्री टू डीसग्री बरंका आप्पा =)) रच्याकने तुम्ही सरसकटीकरण वगैरे करत नसाल अशी अपेक्षा ठेवावी काय? =))

In reply to by अप्पा जोगळेकर

तेवढं ते सरसकटीकरणाचं काही सांगितलं असतं तर बरे झाले असते अप्पा, म्हणजे ही नम्र विनंती आहे बरंका मैत्रीखात्यातली :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही ते टाटा मोटर्स वाल्या प्रतिसादाच बघा की जरा. आणि मुद्दा नसेल तेंव्हा थेट आग्री टु डिसआग्री लिहून टाकायचे. हाकानाका.

In reply to by अप्पा जोगळेकर

होय हो! तुम्हीच शिकवलेत की ते अग्री टू डीसग्री म्हणायला म्हणले गुरुलाच मात्रा द्यावी! बाकी टाटा मोटर्सचं काय म्हणणार म्हणायला भरपूर आहे फक्त तुम्ही ते पटवून घेणार नाही तस्मात असोच, तुम्ही सरसकटीकरण करताय काय? ह्या प्रश्नाला मात्र तुम्ही सोईस्कर बगल दिलीत मित्रवर्य

In reply to by अप्पा जोगळेकर

२००४ ला जॉइन केले ते २०४४ ला रिटायर होणार. मुद्द्याची गोष्ट ही आहे की आणखीन ३० ते ४० वर्षे ही मढी देशाला वाहावी लागणार. ह्यात कामगिरीविषयी काही दिसले नाही ते अप्पा? की अध्याहृत का कायसं आहे म्हणता? बाकी मढी वगैरे शब्दरत्ने अफाट आहेत त्यावर काय बोलणार म्हणा,

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापूसाहेब प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यायला बसु नका हो. सगळे तुम्हाला जे म्हणायचय ते समजुन घेतीलच अस नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

सरकारी नोकरांना कामगिरीच्या निकषांवर वेतनवाढ मिळावी, चांगले काम करणार्‍यांना २३ का १०० टक्केही द्यावी, काम न करणार्‍यांना हाकलून द्यावे, अनुत्पादक खर्च बंद करावेत अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. एकदम सहमत. पगारवाढ देतांना मोदी सरकार सरकारी नोकरांची ’ अकाउन्टेबिलीटी ’ (म्हणजे बहुतेक उत्तरदायित्व) पक्की करेल आणि उत्पादनक्षमतेशी ( प्रॉडक्टीव्हीटी) निगडीत करेल अशी अपेक्षा होती. पण ते काही जमलेले दिसत नाही. सरकारी काम आणि काही महिने थांब ही जी जनमानसात धारणा आहे ती बदलण्याची तीव्र गरज आहे. पण अजुनही आम्ही आशा सोडलेली नाही. बघु या पुढे काय होते ते. निदान सामान्य नागरिक कामासाठी सरकारी कार्यालयात गेल्यावर त्याला मिळणारी क्षुद्र कीटकासारखी वागणुक बंद व्हायला पाहिजे. किमान एवढी अपेक्षा बाळगायला हरकत नसावी.

सरकारी कर्मचार्‍यांना वेतनवाढ आणि पदोन्नती गुणवत्तेनुसार मिळावी एवढीच अपेक्षा. मग ती नियमाप्रमाणे कधीही आणि कितीही मिळो.

स्टुला वर बसुन डुलक्या घेत हिकडची फाईल तिकडे करणा-या शिपायाला २३०००.०० वेतन... वस्तु निर्माण करणा-या कामगाराला १२ तास काम करुन १०-१२ हजार..... हेच का अच्छे दिन?

जळजळ होण्याची/चिडचिड होण्याची कारण़ं अनेक आहेत. १. जॉब सिक्युरिटी: वाईट परफॉर्मन्स किंवा कंपनीची वाईट स्थिती याने नोकरी जाण्याची भीती किती सरकारी लोकांना असते? २. पेंशनः सध्याच्या बहुतांश लोकांना पेंशन मिळते. मेल्यावर स्पाउसला पण. हे किती खासगी लोकांना मिळतं? ( NPS आहे आता सांगू नये. त्यातपण आर्धा भाग सरकार भरते.) ३. निवृत्तीपश्चात वैद्यकीय सेवा: चूक असेल तर सांगा पण माझ्या समजुतीप्रमाणे सरकारी नोकरांना, निवृत्त असले तरी ही सेवा फुकट/ अत्यंत कमी दरात मिळते. सरकारी नोकर असं काय विशेष करतात की त्यांना या सवलती मिळाव्यात?

In reply to by मोदक

माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे जे सरकारी कर्मचारी इ.स. २००० नंतर सेवेत रुजु झाले आहेत त्यांना पेन्शन नाही

In reply to by मोदक

२००४ ला जॉइन केले ते २०४४ ला रिटायर होणार. मुद्द्याची गोष्ट ही आहे की आणखीन ३० ते ४० वर्षे ही मढी देशाला वाहावी लागणार.

In reply to by अनुप ढेरे

सरकारी नोकर असं काय विशेष करतात की त्यांना या सवलती मिळाव्यात? प्रॉब्लेम तोच आहे न ढेरे साहेब! वाईट तितके दिसते चांगले झाले की फीत कापून निवडणूक जाहिरनाम्यात 'करून दाखवले' वाले दादा भाऊ असतातच, बाकी executive ब्रँच आहेच शिव्या खायला बसलेली! तुम्ही अन फक्त तुम्ही आहात म्हणून सांगतो, की मी मुलकी अधिकारी नाही, पण अक्षरशः रक्ताचं पाणी करून IAS IPS करून किंवा अगदी तलाठी म्हणून सुद्धा लोकांची कामे गप गुमान करणारे शेकडो मी ओळखतो त्यांची तरी मी अशी मानहानी करणार नाही

अन्याय आहे हा , २००० नंतरच्या लोकांना का म्हणून नाही पेन्शन ? त्यांनाहि मी अजून कष्ट करेन , ट्याक्स भरेन पण त्यांना पेन्शन मिळायलाच हवे

टॅक्स तुम्हीच एकटे भारत नाहीत सर्वच जण भरतात राहिला प्रश्न पेन्शनचा निवृत्ती नंतर पोसणे हे सरकारचे काम नाही त्यासाठीच NPS चा जन्म झाला आहे जे खाजगी नोकरीत पण तुम्ही स्वीकारू शकता

In reply to by विद्युत् बालक

आता कोण आणी म्हणे त्या सरकारी का कुठल्या पेन्शन स्कीम ची माहिती घेणार! आपण आपल्या शिव्या देत राहायच्या अन उपकार केल्याचे सांगायचे कर्मचाऱ्यांवर! गंमत म्हणजे असली शिव्या देणारी मंडळी MPSC/UPSC सोडाच, साधी जिल्हा परिषद एकीकृत कर्मचारी भर्ती परीक्षा सुद्धा दिलेले नसतात!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

MPSC/UPSC सोडाच, साधी जिल्हा परिषद एकीकृत कर्मचारी भर्ती परीक्षा सुद्धा दिलेले नसतात!
बर मग ? हि परीक्षा दिली कि भरून पावले का?

In reply to by स्पा

नाही हो परीक्षा आयुष्यापेक्षा मोठ्या नसतात स्पा कधीच! फक्त कसंय न एखादी गोष्ट नीट समजवून घेऊन शिव्या देणे बरे असते, त्याला अरे तिरसट प्रतिप्रश्न करून भागणार नाही, परीक्षा दिली(च)(चुकूनमाकुन एखादी) अन नाहीच पास झालो तरी शिव्या देताना कोणाला अन कश्या द्याव्या इतकी अक्कल नक्कीच येते, पण असो!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुम्चक अहितरी गैरसमज होतोय शिव्या या सरसंकटीकरणाला आहेत, जे खरच मन लावून करतायेत त्यांना द्या कि सातवा आठवा नववा आयोग , पण जे रिकामटेकडे वर्षानुवर्षे माज करतात त्यांनाही हे बेनिफिट का? त्यांना कामावरून काढून टाकायची तरदूत का नाही ?? इतकी लाच / भ्रष्टाचार होतोय त्याचे काय , सामान्य माणसाला का भीती वाटते सरकारी काम करायची याचा विचार झालाय का ?

In reply to by स्पा

ओके स्पा साहेब, मग बहुदा आपले एकमत असावे! गरसमज दूर केल्याबद्दल आभार अन उणे अधिक माफी मागतो :)

In reply to by स्पा

चिल रॉजर्स. एक एलपी मार पाहू. आणि अ‍ॅक्शनवाल्या मारामार्‍या कर. तुला जास्त पगार पाहिजे ना. मग नोकरी.कॉम वर रेझ्युम टाक. कसं?

In reply to by स्पा

जे खरच मन लावून करतायेत त्यांना द्या कि सातवा आठवा
हे म्हणायला सोप्पे आहे हो. पण प्रत्यक्षात अमलात कसे आणणार. कोण कीती आणि कसे काम करतो हे ठरवणे खाजगी कंपनीत पण अवघड असते. खाजगी कंपनीत सुद्धा अ‍ॅप्रेझल ला कोणी फेअर मानत नाही. सरकारी कामात तर हे शक्यच नाही. नोकरी मिळवण्यात भ्रष्टा-चार होऊ शकतो तर हे असे अ‍ॅप्रेझल केले तर कीती होइल. आणि कॉन्फीडेशियल रीपोर्ट नावाचा प्रकार असतो बरंका, पण दुर्दैवानी त्याचा उपयोग नीट होत नाही. अ‍ॅप्रेझल वगैरे चालु केले तर दुरुपयोगच जास्त होइल.

In reply to by विद्युत् बालक

अंकल, सरकारी नोकरांच्या NPSचा अर्धा भाग सरकार भरतं. सामान्या लोकांना हे नाही.

In reply to by प्रीत-मोहर

आणि हो Nps corporate sector ला ही लागू होते ना? तिथेही कंपन्यांना प्रोफिट ऍंड लोस अकाउंट मधून एम्प्लोयर्स कोंट्रीब्युशन भरावे लागते.असे ऎकुन आहे. Nsdl website बघावी लागतेय

In reply to by प्रीत-मोहर

प्रायवेटमध्ये अर्धा भाग जो एम्प्लोयर भरतो तो CTC मध्येच पकडला जाईल. PF पण साठी असच करतात. तो तुमच्याच पगारातला काही भागाला एम्प्लॉयर काँत्रिब्युशन म्हणतात.

सरकारने अत्यावश्यक सेवा जसे सैन्य, परराष्ट्र खाते, गुप्तचर खाते इत्यादी सोडून अन्य सेवा आउटसोर्स कराव्यात. पिचकार्‍या मारणारे तहसीलदार आणि निर्ढावलेले जिल्हाधिकारी पाहून वैताग आलाय. दरवर्षी आयपीएस अन आएएस पास झालेल्या होतकरु लुटारुंची नावे अन फोटो पेपरात छापतात. ते पाहून अगदी निराश वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

सगळे काही outsource करायचे वगैरे सरसकटीकरण 5 मिनिटे बाजूला ठेवा (बघा जमतंय का) जमल्यास हे एक छोटेसे तर्कट वाचा ह्यात किनई पब्लिक सेक्टर अंडरटेकिंक नामक सरकारी कंपन्यांचे काही आकडे आहेत, उदाहरण म्हणजे ONGC, GAIL, NTPC, PGCIL, वगैरे, हे म्हणे सकल घरगुती उत्पादनाच्या 20-20% वगैरे contribute करायचे अनर्थ करतात अर्थव्यवस्थेत (सरकारी कंपन्या असून) तेव्हा ह्या पण कंपन्या बंद कराव्या म्हणता का? केल्यास हरकत नाही फक्त मग ह्याच्यावर आधारित (व्हेंडर्स वगैरे वगैरे लघु अन मध्यम उद्योजक) मंडळीला सहकुटुंब मसणात जायला लाकडाचे अनुदान द्यायला लागेल बघा! त्यावर तोफ डागाल परत! बघा बुआ काय मत पडते ते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सरकारी कंपनी आणि सरकारी नोकर यात तफावत आहे ना साहेब. उपरोल्लेखित सगळ्याच कंपन्या भागधारकांना उत्तरदायी असतात. कोल इंडिया किंवा ओएनजीसी या नफा/तोट्याचा लेखाजोखा द्याव्या लागणार्‍या कंपन्या आहेत. त्यांना एजीएम का काय ते घेउन रिपोर्ट द्यावा लागतो. सरकारी नोकरांना कोण विचारतय कामगिरी चांगली झाली की वाईट ? पगार फिक्स. बाकी तुम्ही वेतनवाढीचा आनंद घेण्याऐवजी कशाला सरकारी नोकरांची बाजू लढवताय ? सैनिकांना खडतर काम करावेच लागते आणि त्या तुलनेत त्यांचे वेतन कमीच असते हे जनता जाणते. कागदावर सैनिक जरी सरकारी नोकर असला तरी लोकांच्या मनात सैनिक आणि सरकारी नोकर यांच्याबद्दल स्पष्ट सेग्रिगेशन असते. आणि हां आग्री टु डिसाग्री वगैरे वगैरे.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाजू लढवायचे काही नाही हो, फक्त सरसकटीकरण नाही तितकेसे पटत :), मग ते सैनिक महानच असतात असे केले तरी मी त्याला डीसग्री करेल :) सरकारी नोकर काम करत नाहीत हे ही खरे आहेच अप्पा मी त्याला नाही म्हणत नाही फक्त कुठलाच कर्मचारी काम करत नाही हे अतिशयोक्त अन आकसपूर्ण वाटते म्हणून लिहितोय , स्वतःचा बाप आयसीयू मध्ये असताना गुढगाभर चिखलातून सुद्धा शेतकरी विधवेला तिचा चेक द्यायला जाणार तलाठी मित्र आहे माझा एक एकदम येतो डोळ्या समोर :(

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे. वैयक्तिक अनुभवांच्या आधारे पडताळणी होउ नये. कामगिरी मोजण्याची प्रोसेस असावी असे वाटते इतकेच. बाकी तेच तेच मुद्दे लिहून कंटाळा आला आहे. समाप्ती.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आपण जे काही मसणासाठी लाकडाचे अनुदान म्हणताय ते एकदाच द्यावे लागेल. दर महिन्याला नाही. हे सरकरी नोकर किती काम करतात आणि किती पगार घेतात याचे काहीतरी मोज्माप व्हायला नको का ? खुद्द मोदी जेंव्हा आपण काय काम केले याचा जमाखर्च देतात तर सरकारी नोकरांची उत्पादन क्षमता बघायला नको ? काहीच काम केलं नसतं तर जे काही दिसतंय ते दिसलं नसतं या म्हणण्याला काही अर्थ नाही. आज काय दिसायला पाहिजे होतं त्याचा विचार करा ना !

In reply to by अप्पा जोगळेकर

२३% पगारवाढ मिळून हि पगार वाढ अपुरी असल्याचे कारण देवून हे सगळे कर्मचारी ११ जुलै पासून संपावर जाणार आहेत म्हणे..निर्लज्ज आहेत एवढेच म्हणतो... ३८००० हजार पगार असलेल्या माणसाला ४८००० पगार होणार आहे...

जल्ला सगळ्या प्रायव्हेट वाल्यांची जळजळ हिथे निगणार आता, इनो चा खप वाढला. पॉपकॉर्न घेऊन तयारीत असलेला (प्रायव्हेट ) कॉमनमॅन

In reply to by महासंग्राम

गाववाले, तुम्ही एकट्या आमच्या मित्रवर्य अप्पासाहेबांवरून सरसकटीकरण नका करू बुआ! अप्पा आहेत जरा तिखट पण बरे आहेत तसे! असतात आता एकेकाला गैरसमज! आम्हालाही तुम्हालाही अन अप्पासाहेबांना सुद्धा! घ्यायचे एकमेकांस सांभाळून

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाप्पु - सरकारी नोकरीत, अगदी खालच्या लेव्हल ला कामाची खरंच बोंम्ब असते. खालची लेव्हल म्हणजे चपरासी, ड्रायव्हर, बीएसएनएल चे लाइनमन वगैरे. जसे जसे वर जाऊ तसे तसे काम एक्स्पोनेंशियली वाढते. खरे तर वरच्या लेव्हलचे पगार अजुन वाढवले पाहिजेत. वर बर्‍याच सरकारी नोकरांना थेट लोकांशी ( आणि गावगुंड राजकारण्यांशी ) डील करावे लागते आणि ते कीती अवघड आहे ते खाजगी नोकरीतल्या लोकांना कळणार नाही.

In reply to by गंम्बा

या दोघांशी लढावे लागते हो खाजगी अास्थापनात. बरं सरकारी कर्मचारी म्हटलं की इतर खात्यात पण कामं होतात यांची

In reply to by महासंग्राम

देवा, असे काहीतरी बोलू नका मी साधा माणूस आहे काम क्रोध मोह माया मत्सर माझ्याही ठाई आहेत, तुमहो मित्रमंडळी आहात म्हणून बापू बापू आहे हे सत्य आहे

रच्याकने, करदात्यांच्या पैशातून(च) सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातात, हा गोड गैरसमज लोकांच्या मनातून निघेल तो दिवस सोन्याचा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इन्कम टॅक्स मध्ये लाखातले तीस हजार मागच्या दाराने कसे हातोहात जातात, हे खाजगीवाल्यांना कुणीतरी सांगावे म्हंजे इनोची क्वांटिटी नक्कीच कमी होईल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तसं नसेल तर पगार देण्यासाठी लागणारा पैसा कुठून येतो? हा प्रामाणिक प्रश्न आहे.

बँकेच्या लोकांना सरकारने ते २०% वाढ मागत असताना, रडत रडत १५% च्याही खाली वाढ दिली. मग हा दुजाभाव का ? केंद्र सरकारच्या नोकरदारांना २३% का ? सरकारी खात्यांच्या तुलनेने सरकारी बँकांत खूपच कमी भ्रष्टाचार असतो. तिथल्या अधिकार्‍यांना सरकारच(किंवा नेते) कर्ज द्यायला लावते आणि ते बुडले की निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी त्यांचे टर्मिनल बेनिफिटस अडवले जातात. बँकेत अधिकारी असलेल्या कुणाशीही बोलून पहा म्हणजे यातले किती सत्य, ते तुम्हाला कळेल.

एका बाजूने - पगारवाढ मिळालेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे अभिनन्दन आणि दुसऱ्या बाजूने- सामान्य माणसांवर अन्याय करणाऱ्या या निर्णयाचा निषेध! (दोन्ही प्रतिसाद ठेवलेले आहेत. काय ते आपापलं करुन घ्या)

In reply to by धनंजय माने

माने, दुकानदाराने दिली का पगार्वाढ? दुकानात एचआरए नसतो. विश्वास सरपोतदारांना भाड द्यायच तेवढ लक्षात असूदे.

In reply to by अप्पा जोगळेकर

धनंजय मान्यानी दुकानदारीणीशी लग्न केले ना ?

मी ५ वर्षे केंद्र सरकारी व २३ वर्षे खाजगी कंपनीत नोकरी केली. काही अनुभव असे १. खाजगी नोकरीतही कामचुकार लोक असतात व सरकारी नोकर म्हणजे कामचुकार असणार हा ग्रह चुकीचा. २.खाजगी नोकरीत दर ३ वर्षानी करार होतो त्यामुले वेगाने वेतन वाढत जाते असे सरसकट विधान चुकीचे. ज्या कंपन्या विशिष्ट समाजातील व्यक्तिच्या मालकीच्या असतील तिथे तुलनात्मक कमी पगार वाढ झालेली दिसते. हा समाज कोणता हे जगजाहीर आहे. चम्डी जाय लेकिन दमडी ना जाय हे इथले ब्रीदवाक्य असते. ३.सरकारी नोकरीतील माणूस हा १९७० च्या दशकात लग्नाच्या बाजारात वाळीत टाकण्यात आला होता. त्यावेळी मार्केट ब्यान्कवाल्यांचे होते. नंतर खाजगी कंपन्या व आता हर कुत्तेके दिन या न्यायाने सरकारी नोकराना डिमांड आहे.कारण आता पगार व स्थिरता दोन्ही आहे व बदली तर आता खाजगी मधे ही वारंवार होतेच की. ४. तरीही पेन्शन हे सरकारी नोकरीचे आकर्षण बंद होणार आहे. बारकाईने पाहिल्यास फंडाचे ही काही मस्त फायदे आहेतच. ५. सरकारी पगार वाढल्याने चलनवाढ होणार महागाई होणार हे नक्की मग व्याजदर वाढणार . नोटा छापा खर्च वाढवा म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पुन्हा आयकराची स्लॅब तीच ठेवा मग पैसे परत तिजोरीत येतात. जे खर्च होतात त्यातून निरनिराळ्या प्रकारे मुद्राकर, जी एस टी इइ इइ रूपाने पैसा परत सरकारी तिजोरीत येतो.ज्याना व्यवसायाच्या रूपाने कमाई करायची आहे त्याना पगारवाढ ही संधी असते कारण अशा वाढीने क्रयशक्ती काही प्रमाणात का होईना वाढतेच.

In reply to by चौकटराजा

सरकारी पगार वाढल्याने चलनवाढ होणार महागाई होणार हे नक्की मग व्याजदर वाढणार . नोटा छापा खर्च वाढवा म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पुन्हा आयकराची स्लॅब तीच ठेवा मग पैसे परत तिजोरीत येतात. जे खर्च होतात त्यातून निरनिराळ्या प्रकारे मुद्राकर, जी एस टी इइ इइ रूपाने पैसा परत सरकारी तिजोरीत येतो.ज्याना व्यवसायाच्या रूपाने कमाई करायची आहे त्याना पगारवाढ ही संधी असते कारण अशा वाढीने क्रयशक्ती काही प्रमाणात का होईना वाढतेच. हा खाशा न्याय आहे खरा. लोकसंख्येच्या १ टक्का लोकांचे वेतन वाढवून अर्थव्यवस्थेला चालना द्यायची. न पेक्षा आउट्सोर्सिंगच बरे.

In reply to by अप्पा जोगळेकर

अहो या पाठोपाठ सर्व कॉर्पोरेशन, राज्यकर्मचारी, वीज कर्मचारी ,ब्यान्कवाले, शिक्क्षक ई चे ही वेतन वाढते. खाजगी शाळा फी वाढवतात व तेथीलही शिक्षकांचे वेतन वाढते. खर्च वाढवा अर्थव्यवस्था वाढवा अशी एक थेरी नरेंद्र जाधव मनमोहन सिंग ई कंपनीने मांडलेली होती असे पुसटसे आठवतेय. या डेफिसिट पडू नये म्हणून कर वाढवा ही थेरी वापरली जाते.हळू हळू आयकर विभाग जागा होत आहे हे त्याचेच द्योतक .

सरकारी कर्मचार्यांना आता पेन्शन नस्ते ,२००५ पासून पुढच्या उमेदवारांना पेन्शन नाही,त्यामुळे यांचा भार भविष्यात सरकारी तिजोरीवर पडणार नाही,त्यामुळे त्यांची निवृत्तीनंतर सोय व्हावी यासाठी त्यांना वाढीव पगार दिल्यास कुणाच्या पोटात दुखायचे काम नाही.

खास लोकाग्रहास्तव भारत सरकारचा विशेष निर्णय आठवा वेतन आयोग २०४३ साली लागू करणेत येईल ;)

Sonya bapu replying surprisingly not to the point and unnecessarily sarcastic! #FeelingAsakasazalabuva Appa, as usual very precise. Not evey govt employee is corrupt. Not every private employee is hard worker. There should a system to measure performance of every govt employee too. So that those who are not up to the mark, can be warned. Salaries can be given accordingly. I do not see any generalization in this point. Anyways.. Happy for govt employees like teachers in my family who do much more than teaching (elections, counting for below poverty line, census etc. )

In reply to by पिलीयन रायडर

Well what more can I say to this, everyone has his pov, to each his own, even I am surprsied that u found logic in Appa (honestly not so surprised, kinda expected it) #Asatarhonarachhotabua :) Still would ask u to reconsider and go through the replies patiently, if thats not much to ask :) Respects and regards to u Piratai Irrationaly Mipa fan -Bapusaheb

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

Oh... So u "expected" that I will agree with Appa. Why so? Seems that you have some presumptions about me. I am sorry, I can not discuss further if that is the case. Generally your points are well put, so was very surprised. Never mind! Tumcha pagar vadhala aslyas Abhinandan! Dhanyaawad! Shubhechcha!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

Aaple observation correct ch aahet ASA manashi tharvla ki zala! Aso.. :)

खाजगीमध्ये इंटर्व्ह्युच्या वेळी बोललेली अपेक्षित कामे अन सरकारीत इमानदारीत करायची कामे न करता पगार खाणारे सारे जण हरामखोर आहेत.

In reply to by अभ्या..

असं बोला की राव! सरसकटीकरण करत 2014 मध्ये भर्ती झालेल्यांची मढी वाहायला लागतील म्हणणे म्हणजे....

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापूसाब, बापूसाब. मी अभ्या.. आप्पा नाही हो. ;) . (आणि काही विषयावर आपली बरीच मते तीव्र असली तरी आपण ती बसून सॉल्व्ह करायची ठरले आहे ना? ;) )

In reply to by अभ्या..

अबे येडा झाला का अभ्या लगा!! 'असं बोला की राव' म्हणून उदाहरण देतोय लगा तुझं !! जे काम करत नाहीत मग ती खुळी सरकारी असो वा प्रायव्हेट हलकट म्हणा की बिनधास्त , लगा तुम्हाला नसल तितका त्रास आम्हाला होतो रे मुलकी अधिकाऱ्यांचा पण म्हणून मी सगळ्यांना हरामखोर म्हणले तर नाय न भागणार! तूर्तास इतके पुरे (बाकी क्वार्टर कट्टा करिता राखीव)

In reply to by सचु कुळकर्णी

(जरी कोरडे ठाक असलो तरी ) न बोलावता कट्टा केल्यास....... बाकी आपल्या कल्पनाशक्तीवर. डांबरट अभ्याचा महाडांबरट मैतर नाखु

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

7 वर्षे मुरलेला साधू. ;) बाकी सर्वाना पगारवाढ मिळो, त्यांनी भरपूर खर्च करावा म्हणून दुकानंदारांकडून मजबूत जाहिराबाजी होवो, त्यातला थोडा वाटा आम्हाला पण मिळो हीच पेकमिशनचरणी प्रार्थना. म्हणजे आमच्या हापिसात आम्ही पण पगारवाढ करू ;)

अम्हाला एक इन्क्रिमेंट दिले एकच महिना. मग. मोदीजीनी पी एफ कंपल्सरी केला असे बोलुन ते कट करुन पी एफात घालवले. पी एफ असणे गुड की ब्याड ?

बापूसाहेब सर्व सामान्य माणसाला सरकारी कार्यालयात जसा अनुभव येतो त्याप्रमाणे त्याची विचारसरणी बनते. आज तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयात जा तेथील चपराशी किती काम करतो आणि किती दांड्या मारतो हे सर्वाना दिसते. गणवेशातील सेवा हा याला बऱ्यापैकी अपवाद आहे. कारण कायदा जितक्या शिस्तीने तेथे राबवला जातो तितका इतर कोणत्याही सरकारी कार्यालयात नाही. त्यातून तृतीय/ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अरे ला कारे करायची सोय नाही. युनियन बाजी आणि अरेरावीमुळे त्यांचे वरिष्ठही काही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रचलित कायद्यात वर्ष वर्ष गैरहजर असलेल्या सरकारी नोकराला सेवामुक्त करणे अशक्य आहे. ठाण्याच्या कामगार न्यायालयातील न्यायाधीशाने त्याचे कार्यालय गळत होते म्हणून एक वर्षात एकही निर्णय दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सीरियाक जोसेफ यांनी दिल्ली उच्चं न्यायालयात न्यायाधीश १०५ खटल्यांचा निर्णय राखीव ठेवला आणि निर्णय न देताच ते निवृत्त झाले. लोकांचे कोट्यवधी रुपये वकिलांवर खर्च झाले असताना परत त्याच केसेस दुसऱ्या न्यायाधीशांसमोर चालवून निकाल घ्यावा लागला. https://www.saddahaq.com/justice-cyriac-joseph-illustrates-how-bad-collegium-selections-are याच महाशयांनी आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या साडे तीन वर्षाच्या कालावधीत फक्त "७" निकाल लिहिले होते. http://thewire.in/3843/he-gave-only-7-judgments-in-3-years-so-how-did-cyriac-joseph-make-it-to-the-nhrc/यांच्या वर काय कारवाई झाली तर त्यांना राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्य नेमले गेले. यांचे उत्तर दायित्व( ACCOUNTABILITY) काय आहे? जनता खड्ड्यात गेली असाच यांचा अविर्भाव असतो. आज लोकांना सरकारी लोकांच्या काम करण्याबद्दल आक्षेप आहे असे नाही तर उत्तरदायीत्वाबद्दल आहे. तुम्ही काम करा अथवा करू नका कोणीही तुमच्या केसाला धक्का लावू शकत नाही. या संरक्षणातून एक तर्हेचा माज सरकारी नोकरांमध्ये दिसून येतो. लोकांचे याबद्दल आक्षेप आहेत. तुम्ही काम करा पगारवाढ घ्या आणि काम केले नाहीत तर त्याची जबाबदारी तुमच्यावर असली पाहिजे इतकी साधी अपेक्षा जनतेची आहे आणि ती पूर्ण होताना दिसत नाही. यामुळे हा संताप आहे. जाता जाता -- आय ए एस अधिकाऱ्याला "गुवाहाटीच्या" कार्यालयात काम करण्यासाठी भत्ता( हार्ड प्लेस अलाउन्स) मिळतो तो त्याच्याच समकक्ष असणाऱ्या पण तावांग या अतिउंचीवर (८७०० फूट उंचीवर) गुवाहाटी पासून ५०० किमी (१३-१४ तास प्रवास) तैनात असणाऱ्या लष्करी अधिकाऱयांच्या दीडपट आहे. तळे राखील तो पाणी चाखील याचे उत्तम उदाहरण दुसरे नसावे.

In reply to by सुबोध खरे

Yes.. About that one point.. I have heard that govt employee can not be terminated for ३ years even if he/she does not come on duty. Such case I have seen in one school. Is it really the case?

दोन्हीकडचे प्रतिसाद वाचले. सरसकटीकरण चुकीचे आहेच, वडील सरकारी नोकर होते त्यामुळे थोडेफार फर्स्टह्यांड नॉलेज आहे. सरकारी काम म्हणजे सात-आठ चकरा मारल्याशिवाय होणारच नाही किंवा एजंट हवाच अशी मोस्ट ऑफ जनरल पब्लिकची धारणा असते. पण बर्याच वेळा मला अगदी पॉसिटिव अनुभव आलेला आहे. एकाच खेपेत, न लाच देता, एजंट शिवाय कामं झालेली आहेत. पण त्याच बरोबर एखादी चुक किंवा एखादे काम होण्यास झालेला उशिर याच मोजमाप करण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही हेही खरच. वडीलांच डेथ सर्टिफिकेट काढताना याचा पुरेपुर अनुभव आला. मी भरलेला अर्ज त्यासोबत जोडलेल्या ओरिजिनल कागद्पत्रांसहित हरवला. यात जोडलेले कागद गावी जाउन अर्जंट काढुन आणले होते. अर्ज देउन पुढल्या खेपेस जेव्हा मी गेलो तेव्हा त्या कर्मचार्याच्या आसपासच्या फायलींच्या ढिगार्यात पाउन तास शोधण्याचा व्यर्थ खटाटोप केल्यानंतर कोर्या चेहर्याने मला सांगितले सापडत नाही. बर यात गंमत अस्शी की पहिल्यांदा मी जेव्हा अर्ज द्यायला गेलो होतो तेव्हा माझा एक मित्र मला तिथे भेटला होता. त्याला विचारलं कशाला आलाय तेव्हा तो म्हणे दोन आठवड्यापुर्वी त्याने सबमिट केलेली घरच्या कागदप्त्रांची फाईल त्या कर्मचार्याने हरवली आहे आणी तो ती परत नव्याने सब्मिट करावयास आला आहे. त्या मित्राला तर सांगण्यात आले होते की फाईल सापडत नाहीये, इकडे ह्या कपाटांमधे बघा तुम्हाला सापडतेय का ते. मित्राने अर्धा दिवस तिथली चार कपाट पिंजुन काढली आणी शेवटी वैतागुन नवीन फाईल सबमिट करायचा निर्णय घेतला.. आता या केस मधे त्या कर्म्चार्याच्या गलथान्पणाचं मोजमाप करण्याची काहीही पद्धत आपल्याकडे नाही! मला झालेल्या मनस्तापामुळे त्याच्या नोकरीवर किंवा त्याच्या पगारवाढीवर काहीही फरक पडणार नाहीये! हेच खाजगी ठिकाणी झाल्यास एखादे वेळी सोडुन दिले जाईल, पण परत परत अशी चुक केल्यास नोकरी नाही गेली तरी पगार्वाढ होणार नाही हे निश्चित. :-)

In reply to by अंतु बर्वा

बाकी यावरून आठवले, आमच्या शेजार्‍यांची कर्जाची फाईल फायनल अ‍ॅप्रूव्हलसाठी गेल्यावर त्यातल्या सगळ्या कागदपत्रांसहित आयडीबीआय बँकेने गहाळ केली होती. वर तुम्ही ती दिलीच नाहीत म्हणून कानावर हात देखील ठेवले होते (आणि गंमत म्हणजे तो मॅनेजर त्यांच्या घरोब्याचा होता). नशीबाने हा सगळा व्यवहार सी सी टी व्ही मध्ये रेकोर्ड झाला होता त्यामुळे त्यांचे दात त्यांच्या घश्यात घालता आले, नाहीतर कठीण होते. आणि परत त्यांना सगळी डुप्लिकेट गोळा करून दुसर्‍या बँ़एत कर्ज मिळवण्यासाठी जो मनस्ताप झाला तो वेगळाच. दुसर्‍या बँकेने कर्ज मंजूर केल्यावर २ महिन्यांनी त्यांना फाईल सापडली म्हणे.

In reply to by आनन्दा

मायला हे फायल्या हरवायचा आय्टेम लई कॉमन दिसतोय... सरकारी हापिसांमधे छान कॅबिनेट असलेली, प्रॉपर टॅगिंग केलेली आणि सर्वात महत्वाचं धुळ नसलेली कपाटं कधी बघायला मिळणार राम जाने! एक बदल मात्र जाणवला, काही बाबतीत ही हापिसं हायटेक व्हायला लागलीत. जशी हजेरी मस्टर काढुन त्याजागी फेस किंवा फिंगरप्रिंट टाईम पंचिंग वगैरे :-)

आज नाही होऊ शकत....... तुम्ही उद्या या........ साहेब सुट्टी वर आहेत....... असे बोलणाऱ्यांच्या पगारात २४% नी वाढ व्हाॅट्सअप वर फिरणारा मेसेज.

बाकी काही असूदे...ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वर्षी पगारवाढ मिळणार म्हणजे मिळणारच...काम नाही झाले तरी वरचा बॉस जास्तीत जास्त बडबड करेल...नोकरी जायची चिंता नाही...हे लाड कशाला?

"सातव्या वेतन आयोगात भरघोस पगार वाढूनही सरकारी खाबू-बाबू नाराज." - एक कमिटी नेमुन दहा वेळा वर्ष-वर्ष मुदतवाढ द्या. तोपर्य॔त वेतन आयोग स्थगित ठेवुन अंमलबजावणी करुच नका.

सरकारी नोकरांची पगारवाढ: सरसकटीकरण करु नये असे काहींचे म्हणणे आहे. मुद्दा सरसकटीकरणाचा नसून बहुसंख्य अनुभवांती तयार झालेल्या प्रतिमेचा आहे-असतो. अल्पसंख्य अनुभवांना प्रमाण मानून वा बहुसंख्य हेच सर्व सत्य मानून विचार करणे चुकीचेच. सरकारी नोकरांच्या काम न करता पगार खाण्याच्या मुद्द्यावर कोणी बोलले तर त्याविरुद्ध किती काम करावे लागते ह्याची उदाहरणे दिली जातात. मग ही 'काम न करता पगार खाणारी, सामान्य जनतेला वेठीस धरुन अंडरटेबल खाणारी' जमात अस्तित्वातच नाही का? हा तमाम जनतेचा फक्त भ्रम आहे का? मान्य की अशी प्रतिमा मनात ठेवून विचार करु नये. सरसकटीकरण होते. पण 'बहुसंख्य' जनतेचे अनुभव खोटे नाहीत. बापुसाहेबांनी तलाठी मित्राचे जे उदाहरण दिले ते 'आउट ऑफ द वे' जाऊन मदत करण्याचे (आपले विहित काम करण्याचेही म्हणूया), किमान साठ टक्के जनतेला तरी असे अनुभव येतात का? भ्रष्टाचार अगदी सामान्य असल्यासारखा करणारे सरकारी नोकर अपवाद आहेत की प्रसंगी पदरचे पैसे खर्चून जनतेची सेवा करणारे सरकारी नोकर अपवाद आहेत? त्यामुळे सरकारी नोकरांच्या पगारवाढीवर करवादणार्‍यांना भावनात्मक मुद्द्यांनी खोडण्याआधी वास्तवाचे भान ठेवणे आवश्यक असे माझे मत. जर इथे सरसकटीकरणाच्या विरुद्ध बोलायचे असेल तर ते सर्वांच्या बाबतीत नेहमीच बोलले जात नाही असे निरिक्षण आहे. विशेषतः ज्यांची सामाजिक प्रतिमा वाईट आहे. उदा: राजकिय नेते, पोलिस, गुंड, इ. महत्त्वाचा मुद्दा (काही प्रश्न) : १. जनतेच्या खिशातून जेवढा पैसा नोकरांवर खर्च होतो तो त्या प्रमाणात वसूल होतो का? २. मोबदल्याच्या प्रमाणात त्या दर्जाची सेवा मिळते का? ३. दर्जेदार सेवा मिळत नसेल तर त्याची कारणे काय आहेत? ४. जनतेप्रती नोकरांची वागणूक कोणत्या दर्जाची सामान्यतः असते? त्याची कारणे काय? ५. पगारवाढ ही सर्व कर्मचार्‍यांना न्याय देणारी आहे की काहींवर अन्याय करणारी तर काहींना उगाच कुरवाळणारी आहे? ६. सर्वात महत्त्वाचे, सरकारी कर्मचारी नक्की कोणाला उत्तरदायी आहेत्/असतात? भ्रष्टाचारः सरकारी आस्थापने वा खाजगी, भ्रष्टाचार सर्वव्यापी आहे. खाजगीतल्यांनी स्वतःला धुतल्या तांदळाचे समजणे फन्नी आहे. ज्याप्रमाणे एखादे टेंडर पास करायला, पेमेंट काढायला सर्कारी बाबू अंडरटेबल घेतात आगदी तस्सेच खाजगीवालेही करतात ह्याचा चांगलाच फर्स्ट ह्यांड अनुभव आहे. दोन्ही ठिकाणी कोणाचा तरी पैसा (क्लायंटचा किंवा वेंडरचा) आपला नैतिक, कायदेशीर हक्क नसतांना ओरपला जातोच. ह्याचा अर्थ असाही नव्हे की या न्यायाने सरकारी बाबूंनी भ्रष्ट असणे चुकीचे नाही. माझे मतः पगारवाढ ही अतिशय चांगली गोष्ट आहे. व्हायलाच हवी वेळोवेळी. फक्त त्या मोबदल्यात उत्तरदायीत्वही निश्चित व्हावे. खाजगीत जसे केआरए असते त्याप्रमाणे. नुसते कागदी घोडे नाचवू नये किंवा घोषणाबाजीही नको, पैसे खणखण करत अकाउंटला पडतात ना दर महिन्याला, तसे पर्फॉर्मन्सही खणखणीत, ताबडतोब दिसायाला हवेत. मग पगारवाढीबद्दल कोणाच्याही पोटात दुखायचे कारण नाही. बापुंनी प्रशासकिय परिक्षांचे उदाहरण दिले. मला कायम कुतूहल वाटत आले आहे की एकाच प्रकारची परिक्षा पास करुन गेलेल्या, एकाच प्रकारचे ट्रेनिंग घेतलेल्या, निवडून नेमणूक केलेल्या एकाच पदावरल्या लोकांच्या कार्यक्षमता वेगवेगळ्या का असतात?(कार्यकुशलतेच्या क्षमतेबद्दल बोलत आहे) जनतेच्या भल्यासाठी यंत्रणा राबवणारा कुशल प्रशासक, त्याला क्ष पगार. तेवढेच पैसे देवून जनतेला कामचुकार जिल्हाधिकारी, प्रशासक मिळत असेल तर पोटात दुखणारच.

वरचं सगळं वाचून मजा येतीए. आता एक उदाहरण देतो एक सरकारी कर्मचारी नायाब तहसिलदार/ SI/कनिष्ठ अभियंता पातळीचा त्याची वेतनश्रेणी असते 4200/- + 9300/- म्हणजे बेसिक पे आहे 13,500 /- या बेसिक च्या अंदाजे 140% पगार त्याला पडतो. वार्षिक वेतन वाढ बेसिकच्या 3% असते. म्हणजे वर्षाकाठीने बेसिक मधे 405 /- वाढ. म्हणजे 140% च्या हिशोबाने 962/- वार्षिक पगारवाढ (माझे गणित कच्चे आहे आकड्यांत फरक होऊ शकतो. आणी ते भत्त्यांचे 140% ऐवजी 180% पकडले तरी वार्षिक वेतन वाढीत फारसा फरक पडत नाही) आता माझा प्रश्न खाजगी क्षेत्रात पण एवढीच वेतनवाढ (अप्रेझल) असते का 962/- फक्त. (मि कार्यालयीन कामचोरीचे समर्थन करीत नाही. वैयक्तिक मला त्याचा जास्त तिटकारा आहे कारण मि ही त्याचा बळी ठरलोय स्वत: सरकारी कर्मचारी असुनही. )

आपल्या देशात सर्वात मोठा employer सरकार आहे. केंद्र, राज्य, स्थानिक - सर्व पातळ्या मिळून. यातल्या काही ठिकाणी लोक कार्यक्षम आहेत - उदाहरणार्थ सैन्यदलं. काही ठिकाणी खाजगी क्षेत्राशी स्पर्धेमुळे कार्यक्षमता वाढवावी लागली आहे. आयुर्विमा महामंडळ हे चांगलं उदाहरण आहे. मग कुठल्या ठिकाणी कामचुकारपणा, अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार हे सर्वात जास्त आहेत? जिथे सरकारी कर्मचाऱ्यांना पर्याय नाही आणि स्पर्धा नाही तिथे. RTO, पोलिस, महसूल, अप्रत्यक्ष कर, न्यायदान ही याची उदाहरणं आहेत. जेव्हा तुम्ही जे काम करता ते दुस-या कुणाकडूनही होऊ शकत नाही, जेव्हा लोकांना त्या कामासाठी तुमच्याकडेच यावं लागतं, जेव्हा तुमचं काम हे खाजगी क्षेत्राकडे देता येत नाही तेव्हा तिथे भ्रष्टाचार आणि कामचुकारपणा सुरु होतात. हा मनुष्यस्वभाव आहे. त्याच्यासाठी अर्थशास्त्रात एक सिद्धांत आहे - Backward Bending Supply Curve of Labor. मनुष्य हा मुळात आळशी आहे. काम न करता जर एक रक्कम मला मिळत असेल तर मी ते काम करणार नाही. बरं, आपला देश हा या क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचार असलेला एकमेव देश आहे का? मुळीच नाही. प्रगत देशांमध्येही या क्षेत्रांत भ्रष्टाचार आहेच. याच्यावर उपाय? स्पर्धा हा एक उपाय असू शकतो. खाजगी क्षेत्राकडून आलेल्या स्पर्धेमुळे परिस्थिती बदलू शकते. टेलिकाॅम क्षेत्र त्याचं चांगलं उदाहरण आहे. पण हा पर्याय सगळीकडे अवलंबता येणार नाही. पोलिसांचं काम खाजगी क्षेत्राकडे कसं सोपवणार? शिवाय अनेक सरकारी सेवा या कमी दरात आणि subsidized दरांनी दिल्या जातात, उदाहरणार्थ शिक्षण, वैद्यकीय सेवा, इ. आपल्या देशात त्याची गरजही आहे कारण बहुसंख्य जनता बाजारभावाने या सेवा किंवा वस्तू खरेदी करु शकत नाही. सरकारी अधिका-यांचा भ्रष्टाचार, कामचुकारपणा आणि त्यांना दर दहा वर्षांनी वेतन आयोगाच्या रुपाने मिळणारी पगारवाढ याबद्दल बोलताना त्यामागील कारणांचाही विचार व्हायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे, कारण त्याशिवाय उपाययोजना होणार नाही.आणि ज्या देशात लोकशाही असते, लोकांना निदान भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचं स्वातंत्र्य असतं, तिथे होणारा भ्रष्टाचार हा कधीही हुकूमशाहीत होणाऱ्या भ्रष्टाचारापेक्षा सुसह्य असतो. जे आपल्या देशाची चीनशी तुलना करतात त्यांना कदाचित तिथला दडपशाहीवजा भ्रष्टाचार माहित नसावा.