Skip to main content

कानाखालचे विनोद

Published on मंगळवार, 22/03/2016
एक सहकारी चालू मीटिंगमधे तोंडावर हाथ ठेऊन हसु लागला. "काय झाले? का हसताय?" मी विचारले. त्यावर तो "काही नाही" म्हणत खाली मान घालुन परत हसु लागला. "ख़रच काही कारण नाही का?" मी परत विचारले. त्याने माणेनेच 'नाही' असे सुचवले. "मग एखाद्या चांगल्या दवाखान्यात दाखवा" माझा 'विनोद' फिट्ट् बसला आणि सर्वांनी हसुन दाद दिली. पण त्याच्या जिव्हारी लागला. मला हे अचानक सुचतं. प्रत्येकवेळी समोरच्याला अपमाणित करण्याचा माझा हेतु नसतो पण कुणाचा तरी बकरा होतोच. हा टोचुन बोलान्यातला प्रकार नाही. मी प्रत्येकवेळी वातावरण हलकं करन्यासाठीच बोलतो, तसे होते ही पण कधी कधी कहर होतो. अश्याच आमच्या एक महिला सहकारी आहेत. त्यांना कायम 'दोनच मिनिटांत', 'अगदी पाचच मिनिटांत' किंवा 'अगदी शून्य मिनिटांत' असे शब्दसमुह विनाकारण वापरायची सवय आहे. उदाहरणार्थ "दोनच मिनिटांत आले" म्हणनार आणि प्रत्येक्षात अर्धा तास लावणार, एखादा रिपोर्ट "पाचच मिनिटांत तयार करते" म्हणनार आणि दिड दोन तास त्यातच खेळत बसणार. तर एकदा बोलता बोलता, चार चौघात मी त्यांना म्हटले; "मॅडम, तुम्ही जर एखादी टेलिकॉम कंपनी चालु केली तर तुमचे पहिले सीम कार्ड मीच विकत घेणार कारण तुमचा एक मिनिट चांगला अर्ध्या- पाऊन तासाचा असतो" सगळे ख्या ख्या करुन हसले पण बाई उठून गेल्या आणि पुढचे दोनचार दिवस फुगुण बसल्या. इथे मांडण्याचे तात्पर्य एवढेच की विनोदाची आवड आहे आणि सुचतात ही खुप सारे पण ते कानाखाली बसू नयेत म्हणुन काय उपाय करावेत या विषयी काही मार्गदर्शन मीपाकरांच्या सुपीक डोक्यातुन मिळावे.

वाचन संख्या 6669
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

In reply to by कविता१९७८

आणि बाई उठून गेल्या आणि पुढचे दोनचार दिवस फुगुण बसल्या माझा 'विनोद' फिट्ट् बसला. सर्वांनी हसुन दाद द्या.

In reply to by आनंद कांबीकर

खि खि खि, तुम्च्यसथि नव्ह्त ! पन येथुन पुधे अशुध लिहितन कल्जि घ्य एवध्च सन्गयच होत.

In reply to by इरसाल

वृश्चिक राशीचे लोक असे फटकन अन् दुखावणारे बोलतात म्हणे ! शिवाय यांची शिंक ही खूप मोठ्याने असते. खखोदेजा... (एक नातेवाईक आहे वृश्चिक राशीचे ते फार मोठ्याने शिंकतात व दुसऱ्याला लागेल असंच बोलतात.)

बरका आनंदराव , आमचे पण अगदी तसेच होते. लोकांना विनोद कळतो पण हलके घेत यात नाही. मग नंतर राग शांत करता करता नाकी नऊ येते. वृश्चिक आहेच मी. शंकाच नाही . पण त्रास देण्याकरता नाही करत . ते शब्द प्रेम आहे . आणी खरे सांगू , वृश्चीकाला पण मन असते . जगाने जाणलेच नाही . तर सांगायचा मुद्दा असा की, मताची पिंक भक्कम भिंत पाहूनच टाकत जा. नाही तर उगाचच धुनी धूत बसावे लगते.

कॉर्पोरेट जगतात असे विनोद करावेच कशाला म्हणतो मी !! उगा कोणी खंप्लेंट केली तर केवड्याला पडेल वो ते? त्यापेक्षा शालजोडीतले मारा !!

ज्यांना विनोदाचे वावडे आहे त्यांची दुसरीकडे बदली करा. आणि टवाळखोर कर्मचारी भरा. मिपावर बरेच आहेत. :-) कृ. ह. घे.

जीभ आणि हात दोन्ही वळवळ करतात!>>>>>>> जीभेच चालू द्या ,पण हाताची वळवळ थांबवा ,नको तिथे हात लागला तर विनयभंगाची केस पडेल.

In reply to by गरिब चिमणा

प्रतिसाद वाचून असे वाटते की तुम्ही गरीब पण नाही आणि चिमणे पण नाही. खाली मुंडी पाताळ धुंडी प्रकार दिसतोय.

मी पानिपतला असताना तिथला एक डॉक्टर कलिग मला रोज चिडवत होता..'आप दो बच्चोवाली मां से शादी करना...; ( माझी तिशी ओलांडली होती, तरी लग्न झाले नव्हते, तिकडे लोक लग्न फार लवकर करतात.. म्हणून हा चिडवण्याचा विषय झाला होता.) बरेच दिवस हा प्रकार सुरु होता. एकदा सगळ्या स्टाफसमोर त्याने पुन्हा ते वाक्य म्हटले... सगळे हसले , मीही हसलो आणि त्याला एकच प्रश्न विचारला,'तुम्हे कितने बच्चे है?' तोही बिनडोक, बथ्थड..  . सरळ सांगून मोकळा झाला.. मुझे एक बच्चा है.. 'तो जब तुम्हे दूसरा बच्चा हो जायेगा तो मुझे फोन करना, तेरी तमन्ना पूरी कर दूंगा..' मी म्हणालो आणि मग ती चेष्टा कायमची बंद पडली.

इथे मांडण्याचे तात्पर्य एवढेच की विनोदाची आवड आहे आणि सुचतात ही खुप सारे पण ते कानाखाली बसू नयेत म्हणुन काय उपाय करावेत या विषयी काही मार्गदर्शन मीपाकरांच्या सुपीक डोक्यातुन मिळावे. कांबिकर सर अतिउत्तम लेख. काना खालि जाळ कसा काढतात ह्याविषयि तुम्हाला मि किंवा बरेच मिपा सदस्य मार्गदर्शन करु शकतो. कानाखालच्या विनोदा करता आपला पास.

एका चित्रपट गृहात लहान मुलाना न्यायला बंदी होती. तिथे एक जोडपे एका तान्ह्या मुलाला घेऊन गेले. पण कळू नये, म्हणून एका बास्केटमधे लपवून नेले. डोअरकीपरने विचारले- "बास्केट मध्ये काय आहे?" बाई म्हणाली- "काही नाही, जेवणाचा डब्बा आहे." डोअरकीपरने बास्केट उघडून पाहिली........ ....... आणि लगेच कानाखाली वाजवली- "बाई, डब्बा झाकून ठेवा, नाहीतर बूच लावा, पिठलं सांडलं आहे!"

विनोद करण्यापूर्वीच, समोरच्या लोकांना एकेक लोखंडी कांब देऊन ठेवा. तुमची कानाखालचे विनोद करण्याची उबळ, लगेच कमी होईल.