एक सहकारी चालू मीटिंगमधे तोंडावर हाथ ठेऊन हसु लागला.
"काय झाले? का हसताय?" मी विचारले.
त्यावर तो "काही नाही" म्हणत खाली मान घालुन परत हसु लागला.
"ख़रच काही कारण नाही का?" मी परत विचारले.
त्याने माणेनेच 'नाही' असे सुचवले.
"मग एखाद्या चांगल्या दवाखान्यात दाखवा" माझा 'विनोद' फिट्ट् बसला आणि सर्वांनी हसुन दाद दिली. पण त्याच्या जिव्हारी लागला.
मला हे अचानक सुचतं. प्रत्येकवेळी समोरच्याला अपमाणित करण्याचा माझा हेतु नसतो पण कुणाचा तरी बकरा होतोच.
हा टोचुन बोलान्यातला प्रकार नाही. मी प्रत्येकवेळी वातावरण हलकं करन्यासाठीच बोलतो, तसे होते ही पण कधी कधी कहर होतो.
अश्याच आमच्या एक महिला सहकारी आहेत. त्यांना कायम 'दोनच मिनिटांत', 'अगदी पाचच मिनिटांत' किंवा 'अगदी शून्य मिनिटांत' असे शब्दसमुह विनाकारण वापरायची सवय आहे. उदाहरणार्थ "दोनच मिनिटांत आले" म्हणनार आणि प्रत्येक्षात अर्धा तास लावणार, एखादा रिपोर्ट "पाचच मिनिटांत तयार करते" म्हणनार आणि दिड दोन तास त्यातच खेळत बसणार.
तर एकदा बोलता बोलता, चार चौघात मी त्यांना म्हटले;
"मॅडम, तुम्ही जर एखादी टेलिकॉम कंपनी चालु केली तर तुमचे पहिले सीम कार्ड मीच विकत घेणार कारण तुमचा एक मिनिट चांगला अर्ध्या- पाऊन तासाचा असतो"
सगळे ख्या ख्या करुन हसले पण बाई उठून गेल्या आणि पुढचे दोनचार दिवस फुगुण बसल्या.
इथे मांडण्याचे तात्पर्य एवढेच की विनोदाची आवड आहे आणि सुचतात ही खुप सारे पण ते कानाखाली बसू नयेत म्हणुन काय उपाय करावेत या विषयी काही मार्गदर्शन मीपाकरांच्या सुपीक डोक्यातुन मिळावे.
कानाखालचे विनोद
वाचने
6762
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोठ्याने सांगू नका. कानात
मोठ्याने सांगू नका. कानात सांगा जोक. :)
विनोद
In reply to मोठ्याने सांगू नका. कानात by रातराणी
मी विनोद करताना जवळ जाने टाळतो.
(अर्थात स्वसंवरक्षणार्थ)
जाणुनबुजुन अशुद्ध लिहीणे टाळा
जाणुनबुजुन अशुद्ध लिहीणे टाळा. शुद्ध लिहिल्याने विनोद निर्मिती होत नाही हा गैरसमज दुर करा.
आणि बाई उठून गेल्या आणि पुढचे
In reply to जाणुनबुजुन अशुद्ध लिहीणे टाळा by कविता१९७८
आणि बाई उठून गेल्या आणि पुढचे दोनचार दिवस फुगुण बसल्यामाझा 'विनोद' फिट्ट् बसला. सर्वांनी हसुन दाद द्या.
नाय
In reply to आणि बाई उठून गेल्या आणि पुढचे by जव्हेरगंज
नाय समजला तुमचा विनोद.
कानाखालचा तर नाही ना?
खि खि खि,
In reply to नाय by आनंद कांबीकर
खि खि खि,
तुम्च्यसथि नव्ह्त !
पन येथुन पुधे अशुध लिहितन कल्जि घ्य एवध्च सन्गयच होत.
तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का
तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का हो ?
.
हघ्या हेवेसांनलगे ;-)
तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का
In reply to तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का by उगा काहितरीच
हेच विचारणार होतो
विजुभौ
In reply to तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का by विजुभाऊ
वृश्चिक वाल्यांच काय ते ?
वृश्चिक राशीचे लोक असे फटकन
In reply to विजुभौ by इरसाल
वृश्चिक राशीचे लोक असे फटकन अन् दुखावणारे बोलतात म्हणे ! शिवाय यांची शिंक ही खूप मोठ्याने असते. खखोदेजा... (एक नातेवाईक आहे वृश्चिक राशीचे ते फार मोठ्याने शिंकतात व दुसऱ्याला लागेल असंच बोलतात.)
सर्दी झाल्यावर
In reply to वृश्चिक राशीचे लोक असे फटकन by उगा काहितरीच
सर्दी झाल्यावर पण शिंक येत नाही ओ मला
आतल्या आत येत असतील! ;)
In reply to सर्दी झाल्यावर by आनंद कांबीकर
आतल्या आत येत असतील! ;)
.
.
.
.
.
.
.
मग तुम्ही नस (तपकीर) का नाही
In reply to सर्दी झाल्यावर by आनंद कांबीकर
मग तुम्ही नस (तपकीर) का नाही ओढत ? शिंका येण्याची गॕरंटी मी देतो. हाकानाका!
का? नाशी कशाला पाह्यजे.
In reply to मग तुम्ही नस (तपकीर) का नाही by उगा काहितरीच
का? नाशी कशाला पाह्यजे. घरातल्या सतरंज्या कमी पडल्या का?
सौजन्य : आप्पा भिंगार्डे.
इ बबो
In reply to वृश्चिक राशीचे लोक असे फटकन by उगा काहितरीच
आयाम ऑल्सो वृश्चिक हं. पण मी नाही कोणाला अस बोलत, शिंकेबाबत सहमत ;)
हि
In reply to तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का by उगा काहितरीच
ही 'वृश्चिक' ची काय भानगड़ आहे?
कुणी सांगेल का?
कानाखाली बसू नयेत म्हणुन काय उपाय करावेत ?
कमरेखाली विनोद करा
मग
In reply to कानाखाली बसू नयेत म्हणुन काय उपाय करावेत ? by भाऊंचे भाऊ
मग "कमरेखाली बसू नये म्हणून काय उपाय करावेत?" असा लेख पाडता येईल.
"डोक्यावरून जाणारे" विनोद करा
"डोक्यावरून जाणारे" विनोद करा, ते कोणाला समजणार नाहीत आणि लेख पाडण्याची पण गरजच उरणार नाही.
बरका आनंदराव , आमचे पण अगदी तसेच होते
बरका आनंदराव , आमचे पण अगदी तसेच होते. लोकांना विनोद कळतो पण हलके घेत यात नाही. मग नंतर राग शांत करता करता नाकी नऊ येते.
वृश्चिक आहेच मी. शंकाच नाही . पण त्रास देण्याकरता नाही करत . ते शब्द प्रेम आहे .
आणी खरे सांगू , वृश्चीकाला पण मन असते . जगाने जाणलेच नाही .
तर सांगायचा मुद्दा असा की, मताची पिंक भक्कम भिंत पाहूनच टाकत जा. नाही तर उगाचच धुनी धूत बसावे लगते.
कॉर्पोरेट जगतात असे विनोद
कॉर्पोरेट जगतात असे विनोद करावेच कशाला म्हणतो मी !!
उगा कोणी खंप्लेंट केली तर केवड्याला पडेल वो ते?
त्यापेक्षा शालजोडीतले मारा !!
कानाखालचा नेमका झोन निश्चित
कानाखालचा नेमका झोन निश्चित करा. योग्य मिपा आयडीकडे कन्स्लटेशन साठी रेकमेंड केले जाईल.
चान चान जिलबी
चान चान जिलबी
@स्पा - Wed, 23/03/2016 - 07
In reply to चान चान जिलबी by स्पा
@
>>
पांडूनी केलं एलबी! 
मौनव्रत ट्राय करा (बोलण्याचे
मौनव्रत ट्राय करा (बोलण्याचे अन टंकण मौण सुद्धा) फायदा होईल!!
नाही
In reply to मौनव्रत ट्राय करा (बोलण्याचे by नाना स्कॉच
नाही जमत हो.
जीभ आणि हात दोन्ही वळवळ करतात!
टवाळा आवडे विनोद !
ज्यांना विनोदाचे वावडे आहे त्यांची दुसरीकडे बदली करा. आणि टवाळखोर कर्मचारी भरा. मिपावर बरेच आहेत. :-)
कृ. ह. घे.
जीभ आणि हात दोन्ही वळवळ करतात
जीभ आणि हात दोन्ही वळवळ करतात!>>>>>>> जीभेच चालू द्या ,पण हाताची वळवळ थांबवा ,नको तिथे हात लागला तर विनयभंगाची केस पडेल.
प्रतिसाद वाचून असे वाटते की
In reply to जीभ आणि हात दोन्ही वळवळ करतात by गरिब चिमणा
प्रतिसाद वाचून असे वाटते की तुम्ही गरीब पण नाही आणि चिमणे पण नाही. खाली मुंडी पाताळ धुंडी प्रकार दिसतोय.
एक मेरा भी !
मी पानिपतला असताना तिथला एक डॉक्टर कलिग मला रोज चिडवत होता..'आप दो बच्चोवाली मां से शादी करना...; ( माझी तिशी ओलांडली होती, तरी लग्न झाले नव्हते, तिकडे लोक लग्न फार लवकर करतात.. म्हणून हा चिडवण्याचा विषय झाला होता.)
बरेच दिवस हा प्रकार सुरु होता.
एकदा सगळ्या स्टाफसमोर त्याने पुन्हा ते वाक्य म्हटले... सगळे हसले , मीही हसलो आणि त्याला एकच प्रश्न विचारला,'तुम्हे कितने बच्चे है?'
तोही बिनडोक, बथ्थड.. . सरळ सांगून मोकळा झाला.. मुझे एक बच्चा है..
'तो जब तुम्हे दूसरा बच्चा हो जायेगा तो मुझे फोन करना, तेरी तमन्ना पूरी कर दूंगा..' मी म्हणालो आणि मग ती चेष्टा कायमची बंद पडली.
जामोप्या ब्याक
In reply to एक मेरा भी ! by hmangeshrao
जामोप्या ब्याक
इथे मांडण्याचे तात्पर्य एवढेच
इथे मांडण्याचे तात्पर्य एवढेच की विनोदाची आवड आहे आणि सुचतात ही खुप सारे पण ते कानाखाली बसू नयेत म्हणुन काय उपाय करावेत या विषयी काही मार्गदर्शन मीपाकरांच्या सुपीक डोक्यातुन मिळावे.
कांबिकर सर अतिउत्तम लेख.
काना खालि जाळ कसा काढतात ह्याविषयि तुम्हाला मि किंवा बरेच मिपा सदस्य मार्गदर्शन करु शकतो. कानाखालच्या विनोदा करता आपला पास.
नेमके
In reply to इथे मांडण्याचे तात्पर्य एवढेच by होबासराव
होबासराव आपण धागाकर्त्याला नेमके काय हवे आहे ते नेमके सांगून चर्चा नेमक्या मुद्द्यावर आणलीत.धन्यवाद.
झाकण
एका चित्रपट गृहात लहान मुलाना न्यायला बंदी होती.
तिथे एक जोडपे एका तान्ह्या मुलाला घेऊन गेले.
पण कळू नये, म्हणून एका बास्केटमधे लपवून नेले.
डोअरकीपरने विचारले- "बास्केट मध्ये काय आहे?"
बाई म्हणाली- "काही नाही, जेवणाचा डब्बा आहे."
डोअरकीपरने बास्केट उघडून पाहिली........
.......
आणि लगेच कानाखाली वाजवली-
"बाई, डब्बा झाकून ठेवा, नाहीतर बूच लावा, पिठलं सांडलं आहे!"
कांब
विनोद करण्यापूर्वीच, समोरच्या लोकांना एकेक लोखंडी कांब देऊन ठेवा. तुमची कानाखालचे विनोद करण्याची उबळ, लगेच कमी होईल.