मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जे. एन. यु. एक वेगळा विचार

जानु · · काथ्याकूट
सध्याचा ज्वलंत आणि चघळुन झालेला हा विषय आहे, पण तरीही काही मुद्दे मांडायचा प्रयन्त करतो. या प्रकारात डावे आणि उजवे यांच्यात सरळ लढत झालेली दिसते. यात भाजपाचे काही आडाखे व डाव असतील आणि डावे त्यात अडकले असे वाटते. १० फेब्रु. पासुन या प्रकरणाची सुरुवात झालेली आहे. भाजपाला रोहित प्रकरण आणि दादरी प्रकारात जो धक्का बसला त्याची भरपाई करायची संधी डाव्यांनी दिली. भाजपाला अशी संधी हवीच होती. यामुळे भाजपा विरुध्द डावे + काँग्रेस यांची जुंपली बाकी सगळे गंमत पाहत आहेत. अफजलबाबत दिलेल्या घोषणांची ध्वनीचित्रफीत जशी अभाविप ने जाहीर केली तसे या घटनेतील ताकद आणि जनभावना बदलण्याची क्षमता भाजपाच्या नेत्यांना लगेच लक्षात आली असेल. (कदाचित वरीष्ठांना अगोदरच हे माहित असेल. त्यांनी ध्वनीचित्रफीत पाहिली असेल. नंतर तिला प्रसिध्दी दिली गेली.) त्यातच डाव्या नेत्यांची मुले त्यात पाहुन तर आनंदच झाला असेल. त्यातच पुढे प. बंगालची निवडणुक आहे. असा पत्ता हातचा सोडणे भाजपाला शक्यच नव्हते. हे झाले नेपथ्य. प्रकरण उघड झाल्यावर त्यावर अपेक्षीतपणे डाव्यांनी कडवी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींनी त्याचे मस्त पणे समर्थन केले. काँग्रेसी नेते त्यामागे फरपटत गेले. राहुल गांधींनी जे.एन.यु. ला भेट देउन आगीत तेल ओतले. भाजपाने कन्हैयाला अटक करुन त्यात दुसरी चाल खेळली. खरे तर त्याला अटक केली नसती तरी चौकशी करुन काम भागत होते. (हे माझे मत आहे.) भाजपाने आपल्या ईतर संघटना यात उतरवुन दबाव कायम ठेवला. यात भाजपाला बर्‍यापैकी लाभ झाला आणि ते याचा पुढे बराच वापर करतील. १. भाजपा भारतातील तमाम जनतेला हे दाखविण्यात यशस्वी झाले की जे. एन. यु. मध्ये भारतविरोधी कार्यक्रम होतात. (बर्‍याच लोकांना हे माहित नाही की भारताच्या नितीनिर्धारणात जे.एन.यु. ने किती हातभार लावलाय ते.) २. या कार्यक्रमात डावे पुढाकार घेतात, त्यांना आपल्या फायद्यापुढे देशाचे महत्व नाही हे सिध्द केले. ३. अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुध्द देशभक्ती यात जनतेने नैसर्गिकपणे देशभक्तीला प्राधान्य दिले. ४. कितीही नाही म्हटले तरी सगळ्या प्रकरणात भाजपाला फायदाच झालेला आहे. ५. भविष्यात जे.एन.यु. वा तत्सम संस्थांमध्ये आपले हातपाय पसरायला भाजपाला या प्रकरणाचा पुरेपुर उपयोग होणार. ६. डाव्यांची छुपी सत्ता आणि वर्चस्व तोडणे हा प्रकरणाचा सगळ्यात मोठा फायदा भाजपाला पुढील काळात होणार. मागे एका ठिकाणी म्हटल्यानुसार अश्या साठमार्‍या भाजपा आणि त्यांच्या संघटना पुन्हा पुन्हा करणार. कारण राजकारणात सत्ता नुसती दिसुन चालत नाही तर तिचा भविष्यासाठीसुध्दा वापर करायचा असतो.

वाचने 22872 वाचनखूण प्रतिक्रिया 128

In reply to by तर्राट जोकर

विकास Sat, 02/20/2016 - 19:46
स्वातंत्र्य चळवळ पाहीलेले अजूनही हयात असलेली पिढी असल्याने आणि त्याचा इतिहास ताजा असल्याने आपल्याकडच्या पद्धतीत "देशभक्ती" (patriotism) हा शब्द सहज वापरला जातो असे माझे मत आहे. पण आत्ता जे काही चालले आहे त्याचा संबंध देशभक्तीशी नसून देशद्रोह अथवा संभाव्य देशद्रोहाशी आहे, ज्या संदर्भात कायदे आहेत आणि सर्वत्रच असतात. त्याचा कसा वापर करायचा हा वादाचा मुद्दा कोणीही करू शकतो. पण "देशाचे तुकडे करण्याची भाषा" आणि ती देखील लोकं (तरूण मुले) गोळा करून करणे, जनतेत असंतोष पसरवणे हे कटकारस्थानाचा भाग ठरवता येऊ शकते. हे देशाच्या विरोधातले कृत्य आहे असे म्हणण्यात काही गैर नाही. मग तसली भाषा करणारा देशभक्त असोत अथवा नसोत. सध्या भारतातील सेडीशन लॉ वरून टिका करणे चालू आहे. की हे जुनाट आहेत वगैरे वगैरे... ते असतीलही जुनाट आणि काही बदल करणे देखील आवश्यक असेल. पण ते बदल स्वातंत्र्यानंतर जास्तीत जास्त सत्ता उपभोगून काँग्रेसने देखील केले नाहीत आणि गेल्या दशकात त्यांची सत्ता रहावी म्हणून त्यांना पाठींबा देत अप्रत्यक्ष सत्तेत रहाणार्‍या डाव्यांनी देखील केले नाहीत हे कटू पण वास्तव आहे. त्या व्यतिरीक्त, इतर विकसीत देशात देखील विविध प्रकाराने राष्ट्रद्रोहा विरोधात कायदे आहेत. अमेरीकेत ९/११ नंतर तर तात्काळ patriot act दोन्ही पक्षांच्या पाठींब्याने तयार केला गेला. तो न वापरता देखील काही अमेरीकन नागरीकांना enemy combatant म्हणत देशाचे शत्रू म्हणत पकडले गेले आणि त्यांच्या विरुध्द खटले लढले गेले. थोडक्यात मुद्दा "देशभक्ती" हा शब्द नसावा. पण तो ज्या संदर्भात वापरला जातो, अर्थात, राष्ट्रविघातक कारवाया, आणि तशा कारवायांना खतपाणी घालणारे कारस्थान याचा विचार करावा. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे... तुम्हाला देश ही संकल्पना आणि भारत हा एक देश आहे हे मान्य आहे का? का या संकल्पनेस आणि भारत हे एक राष्ट्र आहे या संकल्पनेसच विरोध आहे? (उत्तर मिळाले नाही तर काय उत्तर आहे ते समजेलच. ;) )

In reply to by विकास

तर्राट जोकर Sat, 02/20/2016 - 21:12
तुम्हाला देश ही संकल्पना आणि भारत हा एक देश आहे हे मान्य आहे का? >> हो. का या संकल्पनेस आणि भारत हे एक राष्ट्र आहे या संकल्पनेसच विरोध आहे? >> नाही.

श्रीगुरुजी Fri, 02/19/2016 - 23:37
जेएनयु मध्ये झालेल्या कारवाईचा अजून एक फायदा आहे. भविष्यात जेएनयुत असे कार्यक्रम होण्याची शक्यता अत्यल्प आहे. जरी असे कार्यक्रम आयोजित केले तरी त्यावर पोलिसांची व प्रसारमाध्यमांची अखंड नजर असेल. एकंदरीत केंद्र सरकारने योग्य ती कडक कारवाई केल्याने भविष्यात असे कार्यक्रम होण्याची शक्यता व त्यातून देशविरोधी घोषणा देण्याची शक्यता खूपच कमी आहे. यानिमित्ताने अजून एक गोष्ट समोर आली. जेएनयुत देशविरोधी घोषणा देण्याचे असे कार्यक्रम कायम होतात हेही पुढे आले. एफटीआयआयच्या संपामुळे तिथे वर्षानुवर्षे तळ ठोकून बसलेल्या विद्यार्थ्यांची मुजोरी समोर येऊन ते पूर्णपणे एक्सपोझ झाले व त्यामुळे अनेक वृत्तपत्रांनी सुद्धा त्यांना कानपिचक्या दिल्या. आता जेएनयुच्या बाबतीत सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशद्रोही घोषणा देण्याचे कार्यक्रम होत असतात हे पुढे आले आहे, तसेच या प्रकरणात काँग्रेस व इतर बरेच विरोधी पक्ष नक्की कोणत्या बाजूने आहेत हेदेखील समोर आले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

माहितगार Sat, 02/20/2016 - 00:53
जे एन युत अद्याप पक्का प्रूफ नाही. कन्हैय्याच्या बाबतीत प्रूव्ह नाही करता आले तर राजकीय दृष्ट्या अधिक उलटू शकते. त्याशिवाय जादवपुर विद्यापिठात विद्यार्थ्यांनी ऑन रेकॉर्ड स्विकारले आहे पण केंद्र सरकारला त्या बाबत अद्यापतरी काही करता आलेले दिसत नाही. काळजि करू नका मी विरुद्ध बाजूवर्ही टिका करणार आहे.

साठमार्‍या
अगदी अगदी स्वातंत्र्यापासुन साठ वर्ष जनतेची जी काही "सेवा" केली गेली किंबहुना अगदी योग्य शब्दात सांगायचं झालं तर मारली गेली त्याला साठमारी हाच्चं शब्द योग्य आहे. बाकी चालु द्या गरळ ओकणं कधीतरी संपेल ओकुन. बाकी राजकारणाचा वीट आला असला तरी सत्तावंचित पक्षाची, त्यांच्या **टार्ड, ***टार्ड समर्धकांची जळजळ वाटुन मौज वाटते. ** च्या जागी एक तमाशा पक्ष आणि *** च्या जागी पांढर्‍या पावलाचा पक्ष घालावा म्हणजे कावळा शिवेल. चालु द्या. धन्यवाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तर्राट जोकर Sat, 02/20/2016 - 00:07
भक्तांचा माज बघूनही अशीच मजा वाटते सेम टू सेम. सत्तावंचित...? ऐसा बोल रहे हो जैसा सबकुच्च खतम हो गया. आरे भावा, विद्यमान सरकारचे हात काँग्रेसला कबरीतून खोदून काढून जीवंत करण्याचे काम रातोदिन करणेमें जुटे है. पुढच्या इलेक्षनचे वांदे करुन ठिवलेत भक्तलोकांनी. हस्तीदंती मनोर्यातल्या चांदीच्या पलंगावरुन मलमलची चादर डोळ्यावर काढून जरा खाली वाकुन बघा. पलंगापर्यंत आग पोचलेली असेल. सुधर जाओ चमनवालो, की आयेंगे दिन मतदानके.

In reply to by तर्राट जोकर

मी भाजपेयी, खांग्रेसी, आपटार्ड ह्यापैकी कुठल्याही क्याटेग्री मधे मोडत नसल्याने काही फरक पडत नाही.
विद्यमान सरकारचे हात काँग्रेसला कबरीतून खोदून काढून जीवंत करण्याचे काम रातोदिन करणेमें जुटे है.
खी खी खी. असु शकेल पण ते काँग्रेसचे छोटे मालक कबर अजुन खोल खणतायत ना देशद्रोह्यांना सपोर्ट करुन. मंजे बीजेपी वाले खांग्रेसला बाहेर काढायचा प्रयत्न करतायत पण हे सर मला अजुन खोल पाहिजे अजुन खोल पाहिजे असं म्हणतायत ना त्याचं काय?
हस्तीदंती मनोर्यातल्या चांदीच्या पलंगावरुन मलमलची चादर डोळ्यावर काढून जरा खाली वाकुन बघा. पलंगापर्यंत आग पोचलेली असेल.
ओह आय सी. लाक्षागृहासारखं कैतरी प्रकरण दिसतय हे. एवढी आग लागली म्हंजे बाहेरच्यांची लैच जळजळ झाली असणार.
सुधर जाओ चमनवालो, की आयेंगे दिन मतदानके.
सत्तेत कोणीही असो. ह्या एका वाक्याला अगदी +८९८८६५४८९६४५६५४६५४६८४६५११६५४९८४९८४६३२१५४९८७८४६५ बाकी चालु द्या. डाव्यांच्या हाती सत्ता जाउ देण्याएवढी जनता मुर्ख नाही.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम Sat, 02/20/2016 - 11:40
तर अतिशय चांगली गोष्ट होईल. देशात दोन प्रबळ राष्ट्रीय पक्ष असणं आणि त्यांच्यातल्या कोणाचीही दीर्घकाळ(सलग ५-१० वर्षांपेक्षा जास्त) सत्ता नसणं ही देशासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय सत्तेत सहभागी झाले की जो खेळखंडोबा होतो तो १९८९ पासून पाहिलेला अाहेच सगळ्यांनी. त्यामुळे जर काँग्रेस आणि भाजप हे प्रबळ राष्ट्रीय पक्ष म्हणून असतील तर काय वाईट आहे त्यात? पण त्यासाठी काँग्रेसला निव्वळ भाजपविरोधापेक्षा ब-याच इतर गोष्टींवर लक्ष द्यायला लागेल. सध्या ते typical विरोधी पक्षासारखे वागत आहेत, जसे भाजपवाले २००९ मध्ये वागत होते. भाजपने स्वतःला जसं २०१३ पासून एक पर्याय म्हणून पुढे आणलं तसं काँग्रेसनेही करायला हवं पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाहीये.

In reply to by बोका-ए-आझम

नाना स्कॉच Sat, 02/20/2016 - 13:10
दंडवत घ्या प्लीज आमचा! भांगेत तुळस टाइप समतोल प्रतिसाद प्रचंड आवडलेला आहे ______________/\_____________

In reply to by बोका-ए-आझम

चौकटराजा Sat, 02/20/2016 - 15:38
भाजपा व कोन्ग्रेस पर्यायी ... ऐला राम और शाम पिच्चर हाये का एक गरीब दुसरा द्वाड .....दोघेही उजवे पण मजबुरीने काहीसे डावे . दोघातही सार्वजनिक नेत्रुत्व नाही. दोघेही लोकसभा बंद पाडण्यात पटाइत दुसर्या पक्षातील गुन्डाना पवित्र करून घेण्यात वाकबगार आणख्गी बरंच काही सांगता येईल . बाकी खोल खड्डा आणखी खोल हवा याचा आग्रह राजकुमार घेताहेत हे वाचून मजा आली.

माहितगार Sat, 02/20/2016 - 00:56
घटनेतील ताकद आणि जनभावना बदलण्याची क्षमता भाजपाच्या नेत्यांना लगेच लक्षात आली असेल.
भाजपाला तुम्ही म्हणता तेवढे कौशल्य असते तर भाजपा एव्हाना कुठल्या कुठे राहिली असती नाही का रावजी :)

तर्राट जोकर Sat, 02/20/2016 - 01:13
१. भाजपा भारतातील तमाम जनतेला हे दाखविण्यात यशस्वी झाले की जे. एन. यु. मध्ये भारतविरोधी कार्यक्रम होतात. >> फार काळ हे नाटक चालणार नाही. भाजपा उघडे पडेल. डाव्यांना इतके तकलादू समजु नये. २. या कार्यक्रमात डावे पुढाकार घेतात, त्यांना आपल्या फायद्यापुढे देशाचे महत्व नाही हे सिध्द केले. >> आपला मुद्दा पटवुन देण्यात डावे जास्त उजवे आहेत. डाव्यांची विचारधारा (चांगली-वाइट) जनतेच्या रोजच्या जगण्याच्या मुद्द्यांशी ते झटकन जोडू शकतात. पहा कन्हयाचे भाषण. गरिबी, जातीवाद, तत्सम. ३. अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुध्द देशभक्ती यात जनतेने नैसर्गिकपणे देशभक्तीला प्राधान्य दिले. >> जनतेला देशभक्ती म्हणजे नो-अभिव्यक्ती हे नाही हे लवकरच लक्षात येईल. ४. कितीही नाही म्हटले तरी सगळ्या प्रकरणात भाजपाला फायदाच झालेला आहे. >> डाव्यांच्या बिळात हात घालून डंख करुन घेतला आहे.जो फायदा दिसतोय तो डंखाने हुळहुळल्याची प्राथमिक भावना आहे. ५. भविष्यात जे.एन.यु. वा तत्सम संस्थांमध्ये आपले हातपाय पसरायला भाजपाला या प्रकरणाचा पुरेपुर उपयोग होणार. >> विद्यार्थ्यांना इतके फाल्तू समजू नये. हे प्रकरण उलटणार आहे. जर भाजपाचे समर्थक जेएनयु किंवा तत्सम संस्थांमधे विद्यार्थी अभ्यासाला शिकायाला जातात की राजकारण करायला असा सवाल करतायत तर त्यांच्या हातापायांना इकडे पसरायचे काय कारण? ६. डाव्यांची छुपी सत्ता आणि वर्चस्व तोडणे हा प्रकरणाचा सगळ्यात मोठा फायदा भाजपाला पुढील काळात होणार. >> डाव्यांची सत्ता व वर्चस्व तोडण्याचा दडपशाही हा मार्ग नाही हे भाजपाला जेव्हा व जितक्या लवकर कळेल तेव्हढा मोठा फायदा भाजपाला होईल. तुर्तास भाजपात कोणीही एवढा हुशार नाही की डाव्यांची वैचारिक मुस्कटदाबी करु शकेल. ह्याला कारण भाजपाची संस्कृती आणि विचारसरणी.

In reply to by तर्राट जोकर

अर्धवटराव Sat, 02/20/2016 - 01:37
भाजपने जर डाव्यांना डायरेक्ट अंगावर घ्यायची सुरुवात म्हणुन जे.एन.यु. प्रकरण असेल तर त्यात भाजपा हमखास यशस्वी होईल. कारण डाव्यांविरुद्धच्या लढाईत भाजपला गमवण्यासारखं काहिच नाहि. या संघर्षात डावे जर काँग्रेसकडे झुकले तर ममताबाई अंतर राखुन असतील. केजरीवाल वगैरे मंडळी सामील झाली तर त्यांचा काँग्रेसशी जवळीक साधण्यावर बोंब ठोकता येईल.
डाव्यांना इतके तकलादू समजु नये.
उलट या संघर्षात भाजपा डाव्यांचं महत्व वाढवतय. काँग्रेस, ममताबाईंना अप्रत्यक्ष्य चेक देण्याचा प्रकार असु शकतो या मागे.
आपला मुद्दा पटवुन देण्यात डावे जास्त उजवे आहेत. डाव्यांची विचारधारा (चांगली-वाइट) जनतेच्या रोजच्या जगण्याच्या मुद्द्यांशी ते झटकन जोडू शकतात. पहा कन्हयाचे भाषण. गरिबी, जातीवाद, तत्सम.
वैचारीक पातळीवर डावे फार काळ संघर्ष करु शकत नाहि. ते चटकन मुठी आवळतात. त्यामुळे त्यांच्याकरता सहानुभुती तयार होणं सध्यातरी अवघड आहे.
जनतेला देशभक्ती म्हणजे नो-अभिव्यक्ती हे नाही हे लवकरच लक्षात येईल.
त्या दिशेने हा प्रॉब्लेम जाणारच नाहि मुळी.
डाव्यांच्या बिळात हात घालून डंख करुन घेतला आहे.जो फायदा दिसतोय तो डंखाने हुळहुळल्याची प्राथमिक भावना आहे.
आज ना उद्या भाजपला हे करावच लागणार होतं. काँग्रेसविरुद्ध डावे काहि मदत करत नाहि म्हटल्यावर भाजपा डाव्यांशी डायरेक्ट पंगा घेणार हे उघड होतं.
विद्यार्थ्यांना इतके फाल्तू समजू नये. हे प्रकरण उलटणार आहे.
सध्यातरी हे प्रकरण तापणं सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. भाजपाला थोडा जास्त फायदा आहे असं दिसतय.
डाव्यांची सत्ता व वर्चस्व तोडण्याचा दडपशाही हा मार्ग नाही हे भाजपाला जेव्हा व जितक्या लवकर कळेल तेव्हढा मोठा फायदा भाजपाला होईल. तुर्तास भाजपात कोणीही एवढा हुशार नाही की डाव्यांची वैचारिक मुस्कटदाबी करु शकेल. ह्याला कारण भाजपाची संस्कृती आणि विचारसरणी.
डाव्यांची सत्ता आणि वर्चस्व मोडण तसंही भाजपाचं काम नाहि. डाव्यांचे एक्झिस्टींग शत्रु त्याला पुरेसे आहेत. आणि डाव्यांची वैचारीक मुस्कटदाबी करण्याची देखील गरज नाहि. त्यांचे विचारच त्यांचा घात करायला पुरेसे आहेत. सनातनी धर्माकडे झुकणारी भाजपेयी वैचारीकता ज्या लवचीकपणे बनीयागिरीवर उतरली तेव्हढं शहाणपण डाव्यांना कधिच जमणार नाहि. असो. मुद्दा हा, कि डाव्यांशी उभारलेल्या संघर्षात नुकसान कोणाचच होणार नाहिए... फायदाच होईल सगळ्यांचा. भाजपचा थोडा जास्त फायदा होणार.

. भाजपा भारतातील तमाम जनतेला हे दाखविण्यात यशस्वी झाले की जे. एन. यु. मध्ये भारतविरोधी कार्यक्रम होतात. (बर्‍याच लोकांना हे माहित नाही की भारताच्या नितीनिर्धारणात जे.एन.यु. ने किती हातभार लावलाय ते.) बर्याच लोकांना जे एन यु हे नाव व ती नावाजलेली संस्था आहे हे माहिती होते मात्र तेथे देश विरोधी कार्यक्रम होतात हे थोड्या लोकांना माहिती होते ते आता बहुतेकांना कळले आहे. डावे स्वताला विचारवंत समजतात पण सापळ्यात अडकत जाणे व हरणे हे १९८९ पासून चालू झाले. अजून एक महत्वाचा मुद्दा विसरला हैद्राबाद मध्ये रोहित ने कसला कार्यक्रम केला असेल त्याची झलक उमर च्या कार्यक्रमामुळे दिसली , किंबहुना रोहित व उमर एकाच पातळीवर आणल्या गेले ह्याचा अतीव आनंद झाला तुम्ही येथे एक घटनाक्रम दिला पण स्वामींचे वक्तव्य व पांचजन्य मधील लेख आधीच सांगत होता जे एन यु दहशतवाद्यांचे केंद्र झाले आहे ह्याचा भाजपला व देशाला सुद्धा खूप फायदा होणार ह्यापुढे जे एन यु मध्ये ज्यू राष्ट्राचे विचारवंत येऊ शकतील डावे त्यांना पूर्वी सारखा विरोध नाही करू शकणार मागच्या वेळी त्यांच्या राजदूताला कार्यक्रम करू दिला नाही उजव्या गटांना सुद्धा ह्या विद्यापीठात म्हणणे मांडायची संधी मिळेल भारताच्या नितीनिर्धारणात जे.एन.यु. ने किती हातभार लावलाय ते सरकारी काम दहा वर्ष थांब किंवा पंच वाशीक योजना ह्या संकल्पनेचा विनोद म्हणून रोजच्या जीवनात केलेला वापर किंवा सडलेली किडलेली सिस्टम असे म्हटले जाते त्याचा उगम इथून होतो तर .

In reply to by निनाद मुक्काम …

माहितगार Sat, 02/20/2016 - 08:24
मागच्या वेळी त्यांच्या राजदूताला कार्यक्रम करू दिला नाही
हे काय आहे ? तटस्थ संदर्भ आहे का ? त्यात तथ्य असेल तर अभिव्यक्ति स्वातंत्र्यातील निष्पक्षता प्रश्नांकीत होते.

In reply to by माहितगार

अगदी बरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पेटंट फक्त डाव्यांच्या कडे आहे. २००८ ची घटना पहा हा लेख वाचा. माझ्या मते सेक्युलर असो नाहीतर सेडिशन चा कायदा ह्या परकीय संकल्पना आहे त्या काळानुसार अपग्रेड करावा. परदेशात देशविरोधी सोशल मिडीयावर लेखन किंवा भाषणे केली तर कायद्याद्वारे अटक होते त्यांच्याकडे एरवी मानवी हक्कांची अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची हमी देतात रशिया व चीन मध्ये तर आपण विचार करू शकत नाही

In reply to by निनाद मुक्काम …

रामदेव बाबांचा जे एन यु मध्ये येण्याबाबत विद्यार्थी संघटने ने लिखित विरोध कळवला पुढे त्यांनी येणे टाळले ह्याउलट उमरचा इवेंट हा विद्यार्थी संघटनेने लिखित स्वरुपात प्रशासनाला कळवला. त्यांनी तो कार्यक्रम रद्द करवला. तरीही त्यांचा निर्णय धाब्यावर बसवून उमर ने हैदोस घातला त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर उर बडवून रडणाऱ्या लोकांना ह क्लीप पहावी आंतराष्ट्रीय राजकारण व अर्थकारण शिकणाऱ्या ह्या विद्यापीठात अमेरिकन व इजराइल राज्तुद्तांना हुल्लडबाजी करून येऊ देले जात नाही कारण भांडवलशाही विचारांना त्यांचा विरोध आहे , म्हणून त्या विचारांना ह्या विद्यापीठात थारा नाही ये होती हे विचारांची स्वतंत्रता भारत भांडवलशाही देशांची व्यापार वाढवत आहे त्यातून देशात मध्यमवर्ग वाढत आहे. अश्यावेळी अश्या विचारांना विद्यापीठात प्रवेश न देणे किती संयुक्तिक आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

माहितगार Sun, 02/21/2016 - 08:47
हम्म.. JNU मध्ये ज्ञान, माहिती, विचारांच्या सर्व छटांना अकॅडेमिक स्फीअर मध्ये समान संधी दिली जात नसावी दशकानु दशके डाव्यांची मोनोपॉली करून डाव्यांची मदरसा झाली आहे विद्यापिठ राहीले आहे का हा प्रश्न आहे पण डाव्यांनी काँग्रेसच्या नाकाखाली बसून हि मोनोपॉली कशी तयार केली आणि राखली याचे कोडे नीटसे उलगडले नाही आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

गॅरी ट्रुमन Sat, 02/20/2016 - 11:23
डावे स्वताला विचारवंत समजतात पण सापळ्यात अडकत जाणे व हरणे हे १९८९ पासून चालू झाले.
खरं तर डावे आणि समाजवादी दोन्ही (आणि सध्या त्यात आआपची भर पडली आहे) देशाची धर्मनिरपेक्षता वाचविणे, भ्रष्टाचार हटविणे इत्यादी इत्यादी कामे आपल्याशिवाय कोणी करूच शकत नाही असे समजतात. किंबहुना सर्व प्रकारच्या नैतिकतेचे ठेकेदार हेच आहेच असा यांचा आविर्भाव असतो.या मंडळींनी १९८९ च्या आधीपासूनच अनेक चुका केल्या त्या त्यांना चांगल्याच भोवल्या आहेत. १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत मध्याच्या उजवीकडे असलेले जनसंघ आणि त्याहूनही उजवीकडे असलेला स्वतंत्र पक्ष यांना विरोधी पक्षात फार स्थान नव्हते.१९६२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनसंघाला १४ जागा आणि ६.४४% मते तर स्वतंत्र पक्षाला १८ जागा आणि ७.८९% मते मिळाली होती. त्याउलट भारतीय कम्युनिस्ट पक्षाला २९ जागा आणि ९.९४% मते, प्रजा समाजवादी पक्षाला १२ जागा आणि ६.८१% मते, तर समाजवादी पक्षाला ६ जागा आणि २.६९% मते मिळाली होती. याचाच अर्थ विरोधी पक्षात मध्याच्या डावीकडे असलेल्या पक्षांचे प्राबल्य होते.आपण नेहरूंना समाजवादी विचारांचे समजतो पण नेहरूही पुरेसे समाजवादी नाहीत अशी टिका त्यांच्यावर होतच होती. १९६७ मध्ये नेहरूंच्या निधनानंतरच्या परिस्थितीत काँग्रेस कमकुवत झाली होती.१९६२ आणि १९६५ ची युध्दे आणि दुष्काळ यामुळे महागाई वाढली होती.आणि इंदिरा गांधींचे सिंडिकेटशी पटत नाही ही गोष्टही लपून राहिली नव्हती. अशा परिस्थितीत काँग्रेसविरूध्द सर्व विरोधी पक्षांची मोट राममनोहर लोहियांनी बांधायचा प्रयत्न केला.त्यात कम्युनिस्टांबरोबरच जनसंघालाही आणले आणि जनसंघाचा उंट आपल्या तंबूत घेतला.यातून झाले असे की विरोधी पक्षांच्या जागेमध्ये जनसंघाला अधिक हातपाय रोवायला पाठबळ मिळाले.१९६७ मध्ये अनेक राज्यांमध्ये ही संयुक्त विधायक दलाची सरकारे आली.या सरकारांमध्ये समाजवादी विचारांच्या पक्षांचे प्राबल्य होते आणि जनसंघालाही मंत्रीमंडळात स्थान होते.समाजवादी मंडळींची एकमेकांशी भांडायची परंपरा जुनी आहे.त्यातून ही राज्य सरकारे पडली.त्यातून जनतेपुढे असे चित्र उभे राहिले की समाजवादी मंडळी एकोप्याने राहू शकत नाहीत तर त्याउलट जनसंघ मात्र एकोप्याने राहतो.म्हणजे काँग्रेसविरोधी मतदारांसाठी समाजवादी पक्षांपेक्षा जनसंघ हा अधिक चांगला पर्याय आहे असे चित्र काही प्रमाणात उभे राहायला सुरवात झाली त्या काळातच.आपापसात भांडून समाजवादी पक्षांनी विरोधी पक्षातील जागा आपण होऊन जनसंघासाठी मोकळी केली. पुढे जयप्रकाश नारायणांनी इंदिरा गांधींविरोधी आंदोलनात जनसंघालाही आणले."जर जनसंघ फॅसिस्ट असेल तर मी पण फॅसिस्ट आहे" हे जयप्रकाश नारायणांचे सुप्रसिध्द विधान होतेच.१९७७ मध्ये जनता पक्षाने २९८ जागा जिंकल्या त्यापैकी सर्वात मोठा गट होता जनसंघाचाच--९३ जागांचा.नंतर नेहमीप्रमाणे जनता पक्ष दुभंगला पण उजव्या गटाचे (पूर्वाश्रमीचे जनसंघाचे) लोक एकत्रच राहिले. १९८४ मध्ये भाजप या नव्या नावाने निवडणुक लढवणार्‍या पूर्वाश्रमीच्या जनसंघाचा पूर्ण धुव्वा उडाला.तरीही त्यांनी ऐक्य कायम ठेवले.त्याउलट समाजवादी विचारांच्या पक्षांच्या अनेक चिरफाळ्या उडत गेल्या. १९८८ मध्ये हे सगळे समाजवादी विचारांचे पक्ष जनता दलाच्या झेंड्याखाली एकत्र आले.पण त्यांचे बहुसंख्य मोठे नेते काँग्रेसमधूनच आयात केलेले होते (व्हि.पी.सिंग, चंद्रशेखर, देवीलाल, रामकृष्ण हेगडे).त्याउलट वाजपेयी आणि अडवाणी सारख्या पहिल्यापासून जनसंघ-भाजपमध्ये असलेल्या नेत्यांचा आणि समाजवादी पक्षांच्या ०.०१% ही भांडणे न झालेला भाजप हा मतदारांना अधिक आकर्षक वाटला असेल तर त्यात नवल नाही. तरीही १९८० च्या दशकाच्या शेवटपर्यंत स्वातंत्र्यलढ्यातील समाजवाद वगैरे मूल्यांचा प्रभाव काही प्रमाणात तरी टिकून होताच.नंतरच्या काळात तो कमी झाल्यावर समाजवादी विचारांच्या पक्षांची अजून घसरगुंडी उडाली. या सगळ्या भानगडीत कम्युनिस्टांनी मात्र आपले स्थान तितक्या प्रमाणावर गमावले नाही.अगदी १९७० च्या दशकाच्या शेवटपर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्ष काँग्रेसबरोबर असूनही. पुढे ती पण परिस्थिती पालटली हे लिहितोच. १९९६ मध्ये त्रिशंकू लोकसभा आल्यानंतर १४० जागा घेऊन काँग्रेस हा बिगर-भाजप पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष होता.तर जनता दल ४५ जागा घेऊन बराच मागे होता.तरीही जनता दल, कम्युनिस्ट यांनी पुढाकार घेऊन सर्व बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करायची खेळी खेळली.ही मोट फार काळ टिकणार नव्हतीच.अशावेळी सरकार पडल्यावर सरकार ज्या पक्षाचे असते त्या पक्षाला नाराजीचा अधिक फटका बसतो. झालेही तसेच.मुळात काँग्रेस हा बिगर भाजप पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष होता आणि भाजपला सत्तेबाहेरच ठेवायचे होते तर नरसिंहरावांना बाहेरून पाठिंबा देऊन या पक्षांना बिगर भाजप सरकार सत्तेत आणता आलेच असते. पण झाले असे की धर्मनिरपेक्षता वाचवायची जबाबदारी आपलीच, आम्हीच काय ते नैतिकतेचे रक्षणकर्ते अशा स्वरूपाच्या वेडगळ कल्पना बाळगून सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेऊन आपल्याच पायावर या पक्षांनी धोंडा मारून घेतला. दरम्यान/ नंतरच्या काळात काही समाजवादी मंडळींनी (जॉर्ज फर्नांडिस वगैरे) भाजपशीच हातमिळवणी केली तर लालू/मुलायम यांच्यासारख्यांनी एकतर काँग्रेसशी हातमिळवणी केली किंवा स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राज्यांमध्ये राखले. आतापर्यंत समाजवादी विचारांचे पक्ष राष्ट्रीय पातळीवर मार्जिनलाईझ झालेच होते.त्यानंतर वेळ होती डाव्या कम्युनिस्टांची.१९९८-९९ मध्ये वाजपेयी सरकार जयललितांच्या धमक्यांमुळे अस्थिर असताना आम्ही काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देऊ असे डाव्या मंडळींनी शेकडो वेळा जाहिरपणे म्हटले. २००४ मध्येही भाजपला रोखायला काँग्रेसला बाहेरून पाठिंबा डाव्यांनीच दिला आणि इतके वर्ष आपला काँग्रेसविरोधी अजेंडा होता त्यालाच एका अर्थाने नख लावले.त्याचा परिणाम लगेच नाही तरी २००९ मध्ये जाणवलाच आणि कम्युनिस्टांनी स्वतःच्या हक्काच्या बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा उंट तंबूत घेतला. आता तर त्या ममता बॅनर्जी या उंटाला बाहेर ढकलायला परत काँग्रेसबरोबरच हातमिळवणी करायची गोष्ट सुरू झाली आहे. एकूणच काय तर समाजवादी आणि डाव्या मंडळींनी सुरवातीला काँग्रेसविरोध या मुद्द्यावर जनसंघ-भाजपशी हातमिळवणी केली तर नंतर भाजपविरोध या मुद्द्यावर काँग्रेसशी हातमिळवणी केली. सुरवातीला काँग्रेसला आणि नंतर भाजपला रोखणे ही जणू काही नियतीने आपल्यावरच टाकलेली जबाबदारी आहे अशा स्वरूपाची त्यांची वर्तणूक होती.आणि हे सगळे स्वतः तत्वनिष्ठ असल्याचा दावा करत!! जनता इतकीही बावळट नाही.त्यामुळे या मंडळींना मतदारांनी त्यांच्या कृत्याची शिक्षा दिलीच. असो कैच्याकै अवांतर झाले.पण सांगायचा मुद्दा हा की या समाजवादी आणि डाव्या लोकांच्या या चुका १९८९ च्याही पूर्वीपासून चालू झाल्या होत्या आणि आजही त्याच चालू आहेत.

In reply to by गॅरी ट्रुमन

माहितगार Sat, 02/20/2016 - 11:31
डावे असणे तसे केवळ अर्थशास्त्रीय गोष्टी पर्यंत मर्यादीत असावयास हवे, पण डावे केवळ आपणच रॅशनल विचार करू शकतो इतर सर्व इर्रॅशनल असतात या अहंकारात असतातच पण कदाचित त्या अहंकारामुळे अर्थशास्त्राशी संबंधीत नसलेल्या गोष्टीत सुद्धा डोके खुपसतात आणि स्वतःच्या एकतर्फी चष्म्यांच्या भूमिकाही केवळ सवतःचीच बाजू रॅशनल केवळ म्हणत नाहीत तर लादण्याच्या प्रयत्नात असतात आणि अनावश्यक ठिकाणी इरॅशनल नाक खुपसल्याने केव्हा न केव्हा बॅकक्लॅश सहाजिक पणे येत असेल का ?

In reply to by गॅरी ट्रुमन

१९८९ चा उल्लेख एवढ्यासाठी कि ह्यांचा पितृक देश विखारल्या गेला तेव्हा पासून जगभरात

ही तथाकथित डावी विचारधारा देशाचं काहीही भलं करू शकत नाही.खुस्पटं काढत बसणे हाच यांचा धंदा. आंदोलने,मोर्चे काढून धिंगाणा घालण्यापलिकढे यांची बुद्धी चालत नाही. स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी उच्चवर्णीयांच्या नावाने खडे फोडणे इतकेच यांचे काम. (वरील वाक्ये कोणत्याही परिस्थीत मागे घेतली जाणार नाहीत)

जानु Sun, 02/21/2016 - 13:29
आजच्या लोकसत्तामध्ये याच म्हणजे देशद्रोह यावर वेगवेगळी मते आहेत. पण ती फारशी पटण्यासारखी नाहीत. विश्वंभर चौधरींच्या मते तर भारत हा एक देश म्हणुन १९४७ नंतर दिसला मग राष्ट्रवाद म्हणजे काय? तसे म्हटले तर मग बोलणेच खुंटले. मग भारत हे नाव कशाचे? दुसरे म्हणजे समजा आता आपण एक देश म्हणुन आहोत तर मग याच्या देश म्हणुन संकल्पना, प्रतिके असतील तर त्यांच्या बद्दल काय मते ठेवावी? ती या देशातील लोकांच्या बहुमताने ठरणार की ज्यांची विचारसरणीही बाहेरुन आयात आहे त्यांच्या मताने?

In reply to by जानु

तर्राट जोकर Sun, 02/21/2016 - 13:38
देश म्हणुन संकल्पना, प्रतिके असतील तर त्यांच्या बद्दल काय मते ठेवावी? >> ही मते जनतेच्या बहुमतानेच ठरावीत. जनतेला स्वतंत्र विचार करण्याची मुभा असावी. जनतेची मते खोट्या बातम्यांनी, जोरजबरदस्ती, दंडुकेबाजीने, दडपशाहीने, झुंडशाहीने बदलणे नसावे. भारताचा तालिबान होऊ नये.

In reply to by तर्राट जोकर

बा़की इतर काहीही असले तरी किमान... (अ) "देशाचे तुकडे करण्याची भाषा करणे" आणि (आ) "देशाच्या संसदेवर (जिच्यात देशातील सगळ्या रंगांचे लोकप्रतिनिधी होते) हल्ला करणार्‍यांचे उदात्तीकरण करणे" या गोष्टी "कोणत्याही देशाच्या, कोणत्याही देशाभिमानी नागरीकाला" क्षम्य वाटणार नाहीत, याबाबत मतभेद असू नयेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर्राट जोकर Sun, 02/21/2016 - 14:34
त्या बाबतीत मतभेद असावेत असे कुठेही माझा प्रतिसाद सुतोवाच करत नाही. खोट्या बातम्यांनी जनमत प्रक्षोभित करुन देशात आणीबाणीसदृष्य वातावरण तयार करणे हेही "कोणत्याही देशाच्या, कोणत्याही देशाभिमानी नागरीकाला" क्षम्य वाटणार नाही, याबाबत मतभेद असू नयेत.

In reply to by तर्राट जोकर

म्हणजे (अ) आणि (आ) मधल्या मुद्द्यांसंबंधात जेएनयु आणि जादवपूर युनिव्हर्सिटीतल्या आलेल्या बातम्या आणि त्यातले टिव्हीवर दाखवले जाणारे व्हिडिओ खोटे आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर्राट जोकर Sun, 02/21/2016 - 20:37
कन्हयाकुमारचे खोटे विडियो तयार करुन त्याची मिडिया ट्रायल करुन त्यास थेट टीवीवरच अर्नब गोस्वामी सारख्या टिनपाट अ‍ॅन्करने देशद्रोही घोषित करणे आपल्याला मान्य आहे का? त्याने तसे केल्यावर सोशल मिडियामधे उसळलेला भाजपासमर्थकांमधला उन्माद आपल्याला मान्य आहे का? त्याचाच परिणाम म्हणून वकिलांनी छातीठोकपणे त्याला कोर्टाच्या आवारात केलेली मारहाण आपल्याला मान्य आहे का? बाकी, देशविरोधी घोषणा आणि त्याची पार्श्वभूमी काहीही असली तरी त्या मान्य करण्यासारख्या नाहीत हे सांगण्याची गरज परत परत का पडावी?

In reply to by तर्राट जोकर

विकास Mon, 02/22/2016 - 01:01
माझा मुद्दा: मी काही अर्णबच्या कार्यक्रमाचा पंखा नाही... पण तसेच राजदीप सरदेसाई, बरखा दत्त वगैरेंनी ज्यापद्धति ने गेल्या दशकात माध्यमांचा वापर केला त्याला देखील आपला विरोध आहे का? जे एन यु मधे भाषण स्वातंत्र्य असावे असे म्हणणारे इतरांच्या बोलण्याला विरोध करतात, वेळ आल्यास स्वतःच्या विरोधकांना फासिस्ट पासून वाट्टेल ते म्हणतात. जे एन यु मधे बाबा रामदेव यांचा ठरलेला कार्यक्रम बंद पाडतात... हे सगळे तुम्हाला बरोबर वाटते का? व्यक्तीस्वातंत्र्याचि गळचेपी म्हणून त्याचा निषेध तुम्ही करता आहात का?

In reply to by विकास

तर्राट जोकर Mon, 02/22/2016 - 01:42
राजदीप सरदेसाई, बरखा दत्त वगैरेंनी ज्यापद्धति ने गेल्या दशकात माध्यमांचा वापर केला त्याला देखील आपला विरोध आहे का? >> आहेच आणि कायम राहणार. विशिष्ट अजेंडा राबवणार्‍या कुठल्याही पत्रकाराला विरोध केलाच पाहिजे. भले तो तुमच्या आवडीच्या पक्षाच्या वतीने बोलत असला तरी. पत्रकाराने निष्पक्ष राहणे अपेक्षित आहे. जे एन यु मधे भाषण स्वातंत्र्य असावे असे म्हणणारे इतरांच्या बोलण्याला विरोध करतात, वेळ आल्यास स्वतःच्या विरोधकांना फासिस्ट पासून वाट्टेल ते म्हणतात. जे एन यु मधे बाबा रामदेव यांचा ठरलेला कार्यक्रम बंद पाडतात... हे सगळे तुम्हाला बरोबर वाटते का? व्यक्तीस्वातंत्र्याचि गळचेपी म्हणून त्याचा निषेध तुम्ही करता आहात का? >> कुणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्याचे गळचेपी मान्य नाहीच. पण त्यांनी तसे केले म्हणून सरकारला त्यांना सरळ उचलून कट कारस्थान करुन तुरुंगात टाकायची मुभा मिळाली का? रामदेव यांचा कार्यक्रमास विरोध केला तेव्हा त्याच पद्धतीने विरोध करण्यास कुणाचे हात बांधले होते काय? कि फासिस्ट म्हटले म्हणून, संघविरोधी घोषणा देतायत म्हणून खोट्या आरोपांखाली खटला चालवणे, तुरुंगात डांबणे, गुंडाकरवी मारहाण घडवून आणणे आपणास मान्य आहे? उद्या काँग्रेसचे सरकार आले आणि त्यांनी राहुल गांधीपासून सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांना सतत वाट्टेल ते बोलणार्‍या सर्व भाजप-समर्थकांना विनाचौकशी तुरुंगात डांबले तर ते आपल्याला मान्य असेल काय? तिथेही हेच लॉजिक वापरायला आपली काही हरकत नसावी. इथे आपण स्पष्ट्पणे कबूल करताय का की भाजप, संघ, एबीवीपी यांना विरोधकांची बोचरी टिका सहन होत नाही, त्यांना विरोधक अस्तित्वातच नकोत, जेएन्युतल्या विद्यार्थ्यांशी वैचारिकरित्या भांडू शकत नाही म्हणुन कपटकारस्थानांचे उपाय अवलंबल्या जात आहेत? संघ, भाजपमध्ये विरोधकांबद्दल बदल्याचीच भावना असते व ती कपट, मारहाण करुनच व्यक्त करता येते हा आपल्या प्रतिसादाचा अर्थ समजावा काय?

In reply to by तर्राट जोकर

धडपड्या Mon, 02/22/2016 - 08:54
अच्छा.. "भारत की बरबादी तक, जंग रहेगी", "तुम कितने अफजल मारोगे, घर घर से अफजल निकलेगा", "छिन के लेंगे आजादी" या घोषणा भाजप, संघ वा एबिवीपी विरोधी आहेत का? जर ते व्हिडिओ डॅाक्टर्ड होते, तर कोणत्याच संघटनेने तक्रार का नोंदवली नाही, जशी एबिवीपी वाल्यांनी नोंदवली? एका बातमीत असे दाखवले, की, उमर खलिदच्या फोन रेकॅार्डस् वरुन असे स्पष्ट झाले, की तो सतत काश्मीर, बांग्लादेश व पाकिस्तानातील काही व्यक्तिंच्या सतत संपर्कात होता.. याच प्राण्याने घेतलेल्या कार्यक्रमाचे समर्थन कन्हैया अगदी तावातावाने करत होता..

In reply to by तर्राट जोकर

विकास Mon, 02/22/2016 - 10:10
तुमच्या प्रतिसादातून नक्की दिशाभूल करने चालू आहे का ब्रेनवॉशिंग झाल्याने जे नाही ते आहे असे वाटत आहे? :) पण त्यांनी तसे केले म्हणून सरकारला त्यांना सरळ उचलून कट कारस्थान करुन तुरुंगात टाकायची मुभा मिळाली का? भारताचे तुकडे करण्याची भाषा केल्याने आणि त्याचे व्हिडीओ पुरावे सादर केल्याने, "सकृत दर्शनी राष्ट्रविरोधी कारवायांमुळे" भारतिय sedition च्या कायद्यानुसार अटक झालेली आहे. आता हा कायदा बरोबर आहे का चूक हा वेगळा मुद्दा आहे. पण जो पर्यंत अस्तित्वात आहे तो पर्यंत पोलिस / सरकार वापरू शकते हे देखील वास्तव आहे. आता बहुतांशी वेळेस न्यायालयात सरकारचे दावे टिकलेले नाहीत. त्यात डॉ. बिनायक सेन, अरुंधती रॉय, खलिस्तानि सिमरजीत सिंग मान आहेत आणि प्रविण तोगाडीया देखिल आहेत. सर्वांवर तत्कालीन सरकारने गुन्हा दाखल केला खरा पण तो न्यायाल्यात टिकू शकला नाही. (आणि हो, हे सर्व सहिष्णुतावादी़ काँग्रेसच्या राज्यात झाले आहे बरं का!) या बाबतीत काय होइल ते लवकरच कळेल. पण जो पर्यंत कायदा आहे आणि सकृतदर्शनी पुरावा आहे तो पर्यंत सरकारला/पोलिसांना, अशा कथित गुन्हेगारांना तुरुंगातटाकायची मुभा आहे. हे कडवे सत्य आहे. कि फासिस्ट म्हटले म्हणून, संघविरोधी घोषणा देतायत म्हणून खोट्या आरोपांखाली खटला चालवणे, तुरुंगात डांबणे, गुंडाकरवी मारहाण घडवून आणणे आपणास मान्य आहे? असे झालेआहे ? अहो जे एन यु चे प्रकरण चालू असताना केरळात एका तरुण संघ स्वयंसेवकाला त्याच्या वृद्ध आई-वडीलांसमोर जिवे मारले. संघाने चालवलेल्या एका सेवाकेंद्रावर केरळ मधेच १६ का१ ७ फेब्रुवारीस गावठी बाँब फेकण्यात आले. या बातम्या वाचल्यात का? त्यामुळे कुणाला अटक झाली आहे? आणि कोण असहिष्णुता म्हणत गळा काढत आहे? उद्या काँग्रेसचे सरकार आले आणि त्यांनी राहुल गांधीपासून सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांना सतत वाट्टेल ते बोलणार्‍या सर्व भाजप-समर्थकांना विनाचौकशी तुरुंगात डांबले तर ते आपल्याला मान्य असेल काय? आत्ता कुणालाअसे डांबले आहे का? ते केजरीवालतर मोदींना coward, psychopath म्हणाले आहेत. त्यांना काही झाले आहे का? उगाच आपले गोड गैरसमज करून घेण्याचे कारण नाही.

In reply to by विकास

तर्राट जोकर Mon, 02/22/2016 - 12:24
भारताचे तुकडे करण्याची भाषा केल्याने आणि त्याचे व्हिडीओ पुरावे सादर केल्याने, "सकृत दर्शनी राष्ट्रविरोधी कारवायांमुळे" भारतिय sedition च्या कायद्यानुसार अटक झालेली आहे. >> अशा कुठल्याही विडियोत कन्हया असल्याचे दिसत असेल तर तो विडियो इथे डकवावा.

In reply to by तर्राट जोकर

न्युजअवरवरचे संबंधित कार्यक्रम तुम्ही पाहिले नाहीत असे तुमच्या लिखाणावरून वाटते. मी ते स्वतः पाहिले आहेत. १. तुम्ही जो "कन्हयाकुमारचे खोटे विडियो" असे म्हणत आहात तो व्हिडिओ अर्णबने नाही तर न्युजअवरमध्ये भाग घेणार्‍या भाजपच्या प्रतिनिधीने (बहुतेक संभित पात्रा याने) स्वतःच्या पॅडवर दाखविला होता व अर्णबने "त्या व्हिडिओची स्वतंत्रपणे खात्री केल्याशिवाय त्याच्या सत्यतेची खात्री देता येणार नाही" असे स्पष्ट म्हटले होते... बहुदा कर्मधर्मसंयोगाने हे तुमच्याच नाही तर इतर अनेक चॅन्ल्सच्या नजरेतून सुटले/दुर्लक्षिले गेले आहे. जर तो व्हिडिओ डॉक्टर्ड आहे असे सिद्ध झाले तर त्या भाजपच्या प्रतिनिधीवरही कारवाई होऊ शकते/करावी/व्हावी... पण तशी कायदेशीर पावले उचलण्याऐवजी केवळ चिखलफेकीतच सर्व संबंधिताना जास्त रस दिसतो आहे ! २. कन्हय्या कुमार आणि उमर खालीद हे दोघेही ज्या न्युजअवर कार्यक्रमात होते, त्यात त्या दोघांनीही जेएनयुमध्ये जी भारतविरोधी भाषणे केली गेली आणि भारताचे तुकडे व बरबादी करण्याच्या घोषणा दिल्या गेल्या याबाबत एकदाही निषेध अथवा नकार नोंदवला नव्हता. उलट दोघांनीही त्या सगळ्या प्रकाराचे समर्थनच केले होते. उमर खालीद तर चक्क हसत हसत समर्थन करत होता. म्हणजे, कन्हय्या कुमार त्यात सामील नव्हता किंवा त्याचा या सगळ्याला पाठींबा नव्हता ही आता पश्चातबुद्धीने केलेली सारवासारवी आहे. उमर खालीद सभासद/पदाधिकारी असणार्‍या संघटनेला तर काँग्रेसनेच त्यांच्या शासनकालात देशविघातक जाहीर करून तिच्यावर बंदी घातली आहे... आता काँग्रेसचाच दोन क्रमांकाचा नेता देशविरोधी घोषणा देणार्‍या उमर खालीदसह इतर सर्वांची तरफदारी करतो आहे, यावरून राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे याची कल्पना यावी. कन्हय्या कुमार आणि उमर खालीद हजर असलेला न्युजअवर इपिसोड खाली पाहता येईल... वकिलांनी छातीठोकपणे त्याला कोर्टाच्या आवारात केलेली मारहाण आपल्याला मान्य आहे का? त्या वकिलांचे वागणे नक्कीच निषेधार्ह आणि लाजिरवाणे आहे आणि त्यांना त्यांच्या कृतीची योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. किंबहुना, त्यांच्या बेजबाबदार वागण्याने देशविघातक कारवाया करणार्‍यांचे समर्थन करणार्‍या संधिसाधूंच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. मात्र, इतर कोणी (पक्षी, इथे : वकील) चुकीचे वागले म्हणून देशाचे तुकडे/बरबादी करण्याच्या घोषणा करणार्‍यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही, हे नक्की. त्या दोघांनाही त्यांच्या गुन्ह्याप्रमाणे कायद्याने योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. या दोन चुका एकमेकांचे निवारण करू तर शकत नाहीतच, पण कोणतेही कारण देशविघातक कारवाईचे कधीच समर्थन करू शकत नाही, हे नक्की.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर्राट जोकर Mon, 02/22/2016 - 02:44
मी इथे कुठल्याही विशिष्ट चॅनेलचे नाव घेतलेले नाही, कारण हा कुठल्या एका चॅनेलमुळे झालेला प्रकार नाही. मिडियाट्रायलचा मी नेहमीच निषेध करतो. चिखलफेक ही निषेधार्ह आहेच. पण त्याआधी खरे गुन्हेगार शोधणे व घटनेचे सत्य समोर यावे यासाठी जो चौकशीचा आग्रह व्हायला पाहिजे तो दिसत नाही हे देशाचे दुर्दैव आहे. मात्र, इतर कोणी (पक्षी, इथे : वकील) चुकीचे वागले म्हणून देशाचे तुकडे/बरबादी करण्याच्या घोषणा करणार्‍यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही, हे नक्की. त्या दोघांनाही त्यांच्या गुन्ह्याप्रमाणे कायद्याने योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. >> तीव्र सहमत. एकमेकांचे अवगुण-चुका वापरुन राजकारणी कंड शमवले जात असतील पण त्यामुळे देशाला वैचारिक फाळणीची खरूज सुटते हे जास्त चिंताजनक आहे. दोन्ही बाजूंच्या चिखलफेकीत वेळ निघुन जात आहे. परिस्थिती चिघळत जात आहे. अधिकारी व्यक्ती हे वादळ शमवण्यासाठी पुढाकार घेत नाहीत हे दुर्दैव आहे. इथे मला ह्या दोन्ही पेक्षा एक वेगळीच चिंता सतावते आहे. ती सामाजिक, धार्मिक धृवीकरणाची व त्यामुळे होणार्‍या संभावित परिणामांची. मागे ह्या विषयावर बरीच चर्चा झाली होती ज्यात आपण व डॉ. खरे सोशल मिडियावरच्या जनमानसावरील प्रभावाचे खंडन करत होतात. ह्या जेएनयु प्रकरणावरुन सोशल मिडियातून ज्या पद्धतीने काही घाणेरडे चेहरे समोर आलेत, काही रस्त्यावर आलेत, काही ठिकाणी प्रत्यक्ष त्याचे पडसाद उमटलेत ते एक सामान्य नागरिक म्हणून मला जास्त चिंताग्रस्त करतात. असो. ताज्या बातमीनुसार उमर खालिद आणि त्याचे साथिदार परत कॅम्पसमधे आले आहेत. पुढच्या घटनांवरुन काय हाती येते ते बघणे इष्ट.

In reply to by तर्राट जोकर

मी इथे कुठल्याही विशिष्ट चॅनेलचे नाव घेतलेले नाही, कारण हा कुठल्या एका चॅनेलमुळे झालेला प्रकार नाही. मिडियाट्रायलचा मी नेहमीच निषेध करतो. नक्की ??? मग... माझ्या या प्रतिसादावर तुमची आयडी वापरून लिहिलेल्या या प्रतिसादात... कन्हयाकुमारचे खोटे विडियो तयार करुन त्याची मिडिया ट्रायल करुन त्यास थेट टीवीवरच अर्नब गोस्वामी सारख्या टिनपाट अ‍ॅन्करने देशद्रोही घोषित करणे आपल्याला मान्य आहे का? (तडक समजूतीसाठी मूळ प्रतिसादातले दोन शब्द हायलाईट केलेले आहे) हा प्रश्न कोणी विचारला होता असा प्रश्न मला पडलाय ?! :) ;) असो. मला जे काही सांगायचे आहे ते स्पष्टपणे सांगून झाले आहे. त्यातल्या मुख्य मुद्द्यांवर तुम्ही सहमती दर्शविलेली आहे. तेव्हा काही नवीन मुद्दा नजरेस येईपर्यंत मी फक्त वाचनाची मजा घेईन म्हणतो ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर्राट जोकर Mon, 02/22/2016 - 21:03
कन्हयाकुमारचे खोटे विडियो तयार करुन, त्याची मिडिया ट्रायल करुन त्यास थेट टीवीवरच अर्नब गोस्वामी सारख्या टिनपाट अ‍ॅन्करने देशद्रोही घोषित करणे आपल्याला मान्य आहे का? >> दोन वेगळी वाक्ये व त्यांचे अन्वयार्थ एकाच वाक्यात आल्याने गैरसमज झाला असावा. कोणीतरी खोटे विडियो तयार केले(झी ने केले हे आता पुढे आलेच आहे), तर अर्नब ने त्या दोघांना तुम्ही देशद्रोही आहात असे थेट तोंडावर म्हटले. ह्यात मी चुकीचं काही बोललोय असं वाटत नाही. खोट्या बातम्या बनवणार्‍यांमधे अर्नब नाही हे तुम्ही म्हटलंय. ते अर्धसत्य झाले. खोटे विडियो नक्की कोणी बनवले हे अजूनही स्पष्ट नाही, त्यामुळे कोणाही चॅनेलवर दोषारोप करणे चुकीचे आहे. पण अर्नबने ज्या पद्धतीने मिडियाट्रायल घेऊन एकतर्फी न्यायदान केल्याचा प्रकार केला म्हणुन त्याचे नाव घेतले. विडियो त्यानेच तयार केले असे मी म्हटलं नाही. आता येत असलेल्या राजिनाम्यांच्या बातम्यांवरुन झीने ह्या विडियोंमधे छेडछाड केल्याचे सूचित होत आहे. तेच खरे आहे हे ही मी म्हणत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एका गोष्टीसाठी बागाईतकरांचे कौतुक घडलेला घटनाक्रम जसाच्या तसा त्यांनी सांगितला. मात्र त्यांचे विश्लेषण करतांना ह्या कार्यक्रमात पात्रा ह्यांच्याकडे जो विडीयो होता त्यात कोण काय बोलत आहे हे नीट कळत नव्हते पण त्याच वेळी तेथे उपस्थित असणाऱ्या स्वरा भास्कर ह्या अभिनेत्रीने हे भाषण मला ठाऊक आहे ते त्याने सामंतवाद मनुवाद ह्यांच्या विरोध्त दिले असे तेव्हा स्पष्ट केले त्यावर अर्णव ने आक्षेप घेतला नाही आता स्वरा भास्कर ला ह्या भाषणाविषयी एवढे कसे माहिती हे तिने उमर ला लिहिलेल्या ओपन लेटर मधून कळते. मोदी विरोधकांना एवढे निमित्त पुरले बोंबा मारायला मूळ मुद्दा असा आहे कि देशविरोधी नारे उमर ने स्वतः केमेर्या समोर दिले नाही. त्यावेळी तो मुलीशी हसत खेळत गप्पा मारतांना दिसला म्हणूनच तो ह्या प्रकरणात निर्दोष आहे का आयोजक म्हणून तो दोषी आहेतच पण त्याच्या ह्या देशविरोधी कार्यक्रमाल साथ देण्यास आपल्या फौज फाट्यासह येणाऱ्या कनैह्या ने उमरच्या कार्यक्रमाला प्रशासनाने दिलेली मान्यता रद्द केली म्हणून जाब विचारला कार्यक्रमाच्या पोस्टर वरून ह्यात अतिरेक्याला शहीद बनवण्र्या आणि काश्मीर वेगेळे करण्याच्या कार्यक्रम का रद्द केला ह्याच जाब कम्युनिस्टांना विचारावा वाटला ही शरमेची गोष्ट आहे पुढे केवळ अभाविप च्या तक्रारीमुळे हे झाले म्हणूनच त्यांना विरोध म्हणून उमरच्या देशविघातक कार्यक्रमाला ह्याने पाठिबा द्यावा ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यात त्याने जुना साम्यवादी राग आळवत गरिबी ते भ्रष्टाचार ते मनुवाद संघ साग्ल्यानापासून आझादी मागितली त्याने व उमर ने देश्वोरीधी नारे दिले नाही म्हणून त्यांचा अपराध कमी होत नाही , न्यायालयात त्यांच्यावर कोणती कलमे लागाव्याची हे दिल्ली पोलिसांचे काम व त्या कोर्टाचा निर्णय सर्वमान्य डावे एवढे घाईकुतीला आले आहेत की मोदी विरोध्साठी नक्षलवादी व विस्तारवादी लोकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत

In reply to by निनाद मुक्काम …

श्रीगुरुजी Tue, 02/23/2016 - 14:31
डावे एवढे घाईकुतीला आले आहेत की मोदी विरोध्साठी नक्षलवादी व विस्तारवादी लोकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत
निव्वळ डावेच नाही तर खांग्रेसी सुद्धा घाईकुतीला आले आहेत. त्यामुळेच जिथे जिथे मोदींविरोधी काही होते तिथे तिथे पप्पू लगेच धाव घेतो आणि त्यांच्या सुरात सुर मिसळून मोदींना विरोध करतो. मोदीविरोधाऐवजी देशविरोध दिसत असला तरी घाईकुतीला आल्यामुळे त्यातला देशविरोध त्याला दिसतच नाही.

In reply to by कपिलमुनी

विकास Wed, 02/24/2016 - 00:46
प्रश्न काय विचारला आहे, त्याला थोडक्यात उत्तर देयचे असते. नाहीतर उद्या कोणी बे दुणे किती विचारल्यास, बे दुणे चार आणि तीन दुणे सहा असले काहीतरी म्हणले म्हणून जास्त मार्क मिळणार नाहीत. असो.

In reply to by तर्राट जोकर

पिशी अबोली Sun, 02/21/2016 - 13:59
मग आत्ता जनतेचा जो जेएनयूविरोधात रोष आहे, तो जस्टिफाइड वाटतो ना तुम्हाला? जनतेच्या मोठ्या बहुमताने निवडून आलेले मोदी सरकार पहिल्या क्षणापासून वाईट नव्हते ना? झुंडशाही आणि जनतेचे बहुमत यातल्या तुमच्या मते सीमा काय आहेत ते एकदा समजावून सांगा.

In reply to by पिशी अबोली

तर्राट जोकर Sun, 02/21/2016 - 14:49
खोट्या बातम्या हा शब्द आपण गाळलात की वाचलाच नाही? जनतेला जेएनयु ही राष्ट्रविरोधी कारवायांचा अड्डा आहे हे सर्वात आधी कुणी सांगायला सुरुवात केली ते शोधून घ्या. रोषाची बिजपेरणी कशी होते ते लक्षात येईल. मोदी सरकार आता वाईट झाले आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मोठ्या बहुमताच्या जोरावर झालेल्या शाहबानो सारख्या घटना आपणास पसंत आहेत का? गुजरातमधल्या मुसलमानांच्या कत्तली आपणास झुंडशाही वाटत नाही का? आझाद मैदानावरील हिंसक मोर्चा हा झुंडशाही नाही का? मालदा-हरयाणासारख्या घटना ह्या झुंडशाही नाहीतर अजून काय आहे? खुल्या वातावरणात सर्व प्रकारच्या विचारांचे आदानप्रदान होऊन एक सामायिक, स्वस्थ विचार पुढे येणे त्याद्वारे देशाचा कारभार चालणे ह्याला मी जनतेचे बहुमत समजतो. २०१६ साली जनतेने ज्या मुद्द्यांवर मोदी सरकार निवडून आणले तो हा विकासाच्या मुद्द्याचा सामायिक स्वस्थ विचार होता. पण सत्ता हातात आल्यावर जे सरड्यासार्खे रंग बदलले त्याला जनतेचे बहुमत समर्थक आहे असे समजू नये. आपल्या छुप्या अजेंड्याला राबवण्यासाठी खोट्या बातम्या तयार करुन जनमत भडकवने म्हणजे जनतेचे झुंडशाहीत रुपांतरण करणे होय. देशभक्तीचे लेबल लावले की आपली कुठलीही हिंसक, अवमानकारक, घटनाविरोधी कृती योग्यच आहे हा विचार झपाट्याने पसरत जात आहे. हे देशातल्या सामान्य जनतेसाठी घातक आहे. सामान्य म्हणजे ह्यात सर्व जातीधर्माचे, व्यवसायाचे, वर्गांचे लोक आहेत.

In reply to by तर्राट जोकर

माहितगार Sun, 02/21/2016 - 17:49
अहो तजो, पिअतै तुमच्याच वैचारीक दृष्टीच्या जवळ असाव्यात बहुतेक, काही गैरसमज झालाय का तुमचा पिअतैंच्या प्रश्नांबद्दल ?

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान Mon, 02/22/2016 - 03:14
तजो,
>> आपल्या छुप्या अजेंड्याला राबवण्यासाठी खोट्या बातम्या तयार करुन जनमत भडकवने म्हणजे जनतेचे >> झुंडशाहीत रुपांतरण करणे होय.
हिंदूंचं हित प्रथम हा संघाचा (पर्यायाने भाजपचा) अजेंडा आहे. आणि तो छुपा नाही. याच्याच बरोब्बर विरुद्ध पवित्रा ओवैश्याचा आहे. त्याच्या अजेंड्यात मुस्लिम प्रथम आहेत. आणि तोही छुपा नसून उघड आहे. तस्मात झुंडशाहीतून छुप्या अजेंड्यास वगळावे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर Mon, 02/22/2016 - 03:26
हिंदूंचं हित प्रथम हा संघाचा (पर्यायाने भाजपचा) अजेंडा आहे. आणि तो छुपा नाही >> मला वाटलं समस्त भारतीयांचं हित प्रथम हा भाजपचा खुला अजेंडा आहे की काय? खैर, कोई बात नही.

In reply to by तर्राट जोकर

धनावडे Wed, 02/24/2016 - 00:56
एक छोटासा प्रश्न जर तुम्हाला कोणी आई बहिणीवरुन शिव्या दिल्यातर अभिव्यक्ती स्वंतत्र म्हणून ऐकून घ्याल कि बोलणाऱ्याचे दात घशात घालाल?

In reply to by धनावडे

तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 11:41
तुमच्या प्रतिसादावरुन माझे जर असे मत झाले की तुम्हाला माझ्या आईबहिणींना कचकचून शिव्या द्यायच्या आहेत तर मी तुमचे मुस्काट फोडले तर चालेल का?

In reply to by तर्राट जोकर

धनावडे Wed, 02/24/2016 - 17:16
माझ्या प्रश्नाचे हे उत्तर नाही तरी सुध्दा जर कोण शिव्या देत असेल तल थोबाड फोडायलाच पाहिजे

In reply to by धनावडे

तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 17:21
तुम्हाला माझा प्रतिसाद समजलाच नाही. अर्थ असा होता की तुमच्या प्रतिसादावरुन मला असा संशय आहे की तुम्हाला माझ्या आईबहिणींना शिव्या द्यायच्या आहेत. मला असं वाटलं म्हणुन मी तुमचं थोबाड फोडलं तर चालेल का? असो. सोप्या भाषेत, थोबाड त्याचंच फोडाल ना ज्याने शिव्या दिल्यात की संशयावरुन जो दिसेल त्याला मारत सुटाल?

In reply to by तर्राट जोकर

विकास गुरुवार, 02/25/2016 - 00:07
खून करतो (संघात नसलेला) नथूराम. बंदी आणतात संघावर आणि गांधीहत्येच्या वेळेस जन्माला देखील न आलेल्या आजच्या संघस्वयंसेवकांना देखील आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्यासारखे वागवले जाते....

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी गुरुवार, 02/25/2016 - 14:34
घोषणा एकाच्या, अडकवले दुसर्‍याला. बदनाम पुरी युनिवर्सिटी.
म्हणजे सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले कन्हैयाकुमार, उमर खलिद, अर्नबान आणि अजून विद्यापीठात दडून बसलेले त्यांचे ३ सहकारी यापैकी कोणीही घोषणा दिलेल्या नसून त्यांना पोलिसांना अडकावले आहे असा वरील वाक्याचा अर्थ आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 14:54
आता प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. पूर्ण चौकशी, न्यायालयाचा निर्णय झाल्यावरच सत्य कळेल. न्यायालयाचा निर्णय सर्वथा मान्य असेल .

In reply to by तर्राट जोकर

विकास गुरुवार, 02/25/2016 - 22:40
न्यायालयाचा निर्णय सर्वथा मान्य असेल. तुम्हाला असेल कदाचीत... पण या स्वयंघोषित लिबरल्स आणि बाप्या मुलांना (पक्षी: जे एन यु च्या विद्यार्थ्यांना, ज्यांना बरखाताई किड्स म्हणतात) न्यायालयाने परत परत तपासणी करून दिलेला निर्णय मान्य नाही ना! आज एकीकडे कन्हैय्याला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे तर दुसरीकडे पोलीसांना उमर आणि इतरांच्या आवाजाचे नमुने घेण्यास नकार दिला आहे... म्हणलं तर न्यायालये स्वतंत्रच राहात आहेत. पण उद्या जर का चुकून सौम्य पण देशद्रोह ठरवत काही शिक्षा केली तर हे सगळे तमासगीर* काय करतील ते बघा! * कला म्हणून आणि पोटापाण्यासाठी कला वापरणार्‍या खर्‍या तमासगिरांची क्षमा मागून... :)

In reply to by पिशी अबोली

तर्राट जोकर Sun, 02/21/2016 - 14:52
झुंडशाही आणि जनतेच्या बहुमताच्या नावाखाली काय केले जाऊ शकते ह्याचे उदाहरण म्हणून बडोदा डायनामाईट केस मिळवुन वाचा.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Mon, 02/22/2016 - 12:47
तुम्हीच एक धागा काढा ना त्या प्रकरणाबद्दल. त्याआधी झुंडशाही आणि जनतेच्या बहुमताच्या नावाखाली अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कसा फिरविण्यात आला व त्यानंतर आणिबाणी कशी लादण्यात आली तेही लिहा. त्याचप्रमाणे झुंडशाही आणि जनतेच्या बहुमताच्या नावाखाली शहाबानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवून मुस्लिम धर्ममार्तंडांसमोर साष्टांग लोटांगण घालून मुस्लिम महिलांची गळचेपी कशी करण्यात आली तेही लिहा.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Mon, 02/22/2016 - 20:23
आपल्या आधीच्या कॉमेंटचा आणि बडोदा डायनामाईट केसचा काहीतरी संबंध आहे का? झुंडशाही व पाशवी बहुमत यांचा व बडोदा डायनामाईट केसचा काहीतरी संबंध आहे का? बहुमताचा वापर करून आणिबाणी आणली गेली, शहाबानो खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरविला गेला ... काँग्रेसने बहुमताचा वापर अशा अनेक देशविघातक गोष्टींसाठी केला. म्हणून तर मी तुम्हाला बडोदा डायनामाईट केसविषयी धागा काढून सविस्तर लिहायला सांगितले. बघूतरी झुंडशाही व पाशवी बहुमत यांचा व बडोदा डायनामाईट केसचा काही संबंध आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Mon, 02/22/2016 - 13:45
तसेच बडोदा डायनामाईट केसबद्दल म्हटलंय. गुजरात दंगलीबद्द्ल नाहीये ते. काविळ झाली की निष्पक्ष विधानही कसे वाचल्या जाते याचे उत्तम उदाहरण दिलंय.

In reply to by तर्राट जोकर

माहितगार Mon, 02/22/2016 - 13:59
बरोबर आहे तजो एका चुकीमुळे दुसर्‍या चुकीचे समर्थन होत नाही, वकीलांनी केलेल्या झुंडशाहीचेही होत नाही, ते बडोदा डायनामाइटचेही होत नाही, डाव्यांच्या कामगारचलवळींच्या नावाखालच्या इतर झुंडशाहीचेही होत नाही, संसदेवर अतिरेकी हल्ल्ला हि सशस्त्र झुंडशाही असते म्हणून त्या सशस्त्र झुंडशाहीचेही समर्थन होत नाही. म्हणून संसदेवर अतिरेकी हल्ल्ला केलेल्या अतिरेक्यांना सहानुभूती दाखवले जाण्याचेही समर्थन होत नाही. त्यातल्या त्यात फरक करावयाचा असेल तर -मानवाधिकारांचे होता होईतो हनन टाळून, समतेचे न्याय्य तत्वांचे रक्षणकरून- देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता जपणारी हिंसा पवित्र आहे आणि देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता डावावर लावणारी हिंसा -कोणत्याही सबबीने- अपवित्र आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Mon, 02/22/2016 - 14:06
आणि देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता डावावर लावणारी हिंसा अथवा अशा हिंसेचे अथवा देश विभाजनाचे समर्थन -कोणत्याही सबबीने- अपवित्र आहे.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Mon, 02/22/2016 - 20:27
आता इथे गुजरात दंगल कोठून आली? कावीळबिवीळ कोणाला झाली नाहिय्ये हो. काही दिवसांपूर्वी एका सदस्याला मला नीट प्रतिसाद देता येत नव्हते. म्हणून त्यांनी लगेच मला मूळव्याध झाली आहे असा प्रतिसाद दिला. आता तुम्ही म्हणता कावीळ झालीये. झुंडशाही व पाशवी बहुमत यांचा व बडोदा डायनामाईट केसचा काही संबंध आहे का ते जरा सांगता का.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Mon, 02/22/2016 - 13:47
बडोदा डायनामाईट केसः Baroda dynamite case is the term used for the criminal case launched by the Indira Gandhi government in India during the Indian Emergency (1975 - 77) against the opposition leader George Fernandes and 24 others. The CBI charged George and others on false and made-up charges of smuggling dynamite to blow up government establishments and railway tracks in protest against state of emergency. They were also charged with waging war against the state to overawe and overthrow the government. The accused were arrested in June 1976 and imprisoned in Tihar Jail, Delhi. गुरुजी, इम्पल्सिव व सिलेक्टीव रिडिंग सोडा आता तरी.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Mon, 02/22/2016 - 20:33
आता माझ्या प्रतिसादात इम्पल्सिव व सिलेक्टीव रिडिंग कोठे आहे? आणि बडोदा डायनामाईट केस बद्दल फक्त एवढंच? वरील २ छोट्या परिच्छेदात इतकंच लिहिलंय की इंदिरा गांधींनी आणिबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस व इतर २४ जणांविरूद्ध हा खटला दाखल केला होता. आणिबाणीच्या काळात हजारो नागरिक कोणताही आरोप नसताना २० महिने विनाजामीन तुरूंगात डांबले गेले होते. जे जे इंदिरा गांधींचे राजकीय विरोधक होते त्या सर्वांना तुरूंगात डांबले होते. जॉर्ज फर्नांडिस हे इंदिरा गांधींचे विरोधक असल्याने त्यांनाही तुरूंगात डांबले व त्यासाठी वरील प्रकरण दाखविले गेले. त्यामुळे हा खटला हा आपल्या राजकीय विरोधकांवर केवळ राजकीय सूड घेण्याचाच प्रकार होता. त्यात काहीही तथ्य नव्हते. पाशवी बहुमतामुळे आणिबाणी लादली गेली आणि आणिबाणीत केंद्र सरकारच्या हातात अनिर्बंध अधिकार येत असल्याने त्याचा उपयोग विरोधकांवर सूड घेण्यासाठी करण्यात आला हेच यातून दिसून येते..

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Mon, 02/22/2016 - 20:36
पाशवी बहुमतामुळे आणिबाणी लादली गेली आणि आणिबाणीत केंद्र सरकारच्या हातात अनिर्बंध अधिकार येत असल्याने त्याचा उपयोग विरोधकांवर सूड घेण्यासाठी करण्यात आला हेच यातून दिसून येते.. >> मी काय वेगळे बोलतोय...?

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Mon, 02/22/2016 - 20:44
आधीच्या प्रतिसादात आणिबाणीचा उल्लेख नव्हता. पण ते बडोदा डायनामाईट बद्दल धागा काढणार ना?

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Mon, 02/22/2016 - 21:30
बडोदा डायनामाईट ही केसच आणीबाणीचा परमोच्च गैरवापर सांगणारी आहे, त्यात तुमच्या लाडक्या काँग्रेसचा स्पष्ट उल्लेख नाही म्हणून खटकले का? म्हणून मिळवून वाचा म्हटले होते प्रतिसादात. पण काँग्रेसचे गुन्हेच तेवढे सगळे ठळक अक्षरात स्पष्ट पाहिजे असे दिसते. ते नसले तर तळमळ होते. तसेच त्यावर धागा कशासाठी काढायचा, मी तसे काही म्हटले होते काय? धागा तर भाजपच्या धार्मिक राजकारणावर काढायचा ठरलंय ना?

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Tue, 02/23/2016 - 14:34
आणिबाणी संदर्भात काँग्रेसचा स्पष्ट उल्लेख हवा होता कारण पाशवी बहुमताचा गैरवापर करून आणिबाणी लादून दडपशाही करणारा भारताच्या इतिहासातील तो एकमेव पक्ष आहे. धागा कोणत्याही विषयावर काढा. भाजपच्या तथाकथित धार्मिक राजकारणावर काढा किंवा इतर कोणत्याही विषयावर काढा.

जानु Mon, 02/22/2016 - 19:48
आता तर सगळे जे.एन.यु. बसले आहेत. त्यांनी ठरवले ते देशद्रोही नाहीत. व्यवस्थित भाषणे देत आहेत. काँग्रेस आणि सगळे माना डोलावतायेत. पोलीस विनंती करतायेत. मला तर भजन आठवले. दर्शन देरे ....साला मी जर एखाद्याला धमकी दिली तर दिवसभर स्टेशनला बसवतील आणि काय काय करतील नेम नाही. मला तर असे वाटतय की साला सगळाच घोटाळा झालाय अन मी चु....सारखा कळफलक बडवतोय. उमर तेथे देशप्रेमाचे धडे देत होता. मी त्यावर आरोप घेतला कुठे फेडेन हे पाप????

In reply to by जानु

तर्राट जोकर Mon, 02/22/2016 - 20:38
कायद्यानुसार फिर्यादीला पुरावे सादर करुन आरोप सिद्ध करावे लागतात. बस्सीसाहेब म्हणताय्त, त्या मुलांनी पुढे येऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करावे. ह्याचा अर्थ पोलिसांकडे निश्चित पुरावे नाहीत असा घ्यायचा का?

होबासराव Mon, 02/22/2016 - 21:03
बस्सीसाहेब म्हणताय्त, त्या मुलांनी पुढे येऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करावे. ह्याचा अर्थ पोलिसांकडे निश्चित पुरावे नाहीत असा घ्यायचा का? तजो साहेब एक अगदि साधा आणि सहज प्रश्न विचारु का? आपल्याला काय वाटत कि हे विद्यार्थि निर्दोष आहेत आणि भारत सरकार उगाच ह्यांना फ्रेम करतेय ?

In reply to by होबासराव

तर्राट जोकर Mon, 02/22/2016 - 21:34
प्रश्न मला काय वाटतं तो नाही. सत्य काय आहे हा आहे? तुम्हाला काय वाटतं, स्पष्ट पुराव्यांअभावी ह्याच विद्यार्थ्यांना फासावर लटकवावे, खरे घोषणा देणारे कोण आहेत त्याचा तपास न होताच?

In reply to by तर्राट जोकर

चेक आणि मेट Tue, 02/23/2016 - 00:47
प्रश्न मला काय वाटतं तो नाही. सत्य काय आहे हा आहे? तुम्हाला काय वाटतं, स्पष्ट पुराव्यांअभावी ह्याच विद्यार्थ्यांना फासावर लटकवावे, खरे घोषणा देणारे कोण आहेत त्याचा तपास न होताच?
त्यासाठी न्यायव्यवस्था आहेच.

याॅर्कर Tue, 02/23/2016 - 00:14
जेएनयुमध्ये राष्ट्रविरोधी घोषणाबाजी झाली आहे,हे तर त्रिवार सत्य आहे,आता ती कोणी केली हा दुसरा विषय झाला. पण असे झाले असताना तेथे जाऊन राजकारण करणे म्हणजे मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणे. हे रागां,येचुरींना कोण सांगणार!! आणि याचा फायदा भाजपलाच होईल असे वाटत आहे.

In reply to by याॅर्कर

विकास Tue, 02/23/2016 - 00:25
ज्या अर्थी मणीशंकर अय्यर, बरखा दत्त यांना अचानक अटल बिहारी वाजपेयींचा आदर्श आठवू लागला तेंव्हापासूनच असे वाटत आहे की ह्या तथाकथीत धर्मनिरपेक्ष आणि स्वतःच लेबल लावलेले असल्याने (अय्यर सारखे) "इंटलेक्च्युअल्स" असलेल्यांना कुठेतरी गडबड केली अशी धाकधूक वाटू लागली आहे असे वाटते. गंमत म्हणजे हे लोकं पुढार्‍यांची पण पक्षिय वाटणी करतात. गांधीजीच्या नावाने पण त्यांचा फोटो असलेल्या नोटांनी जशी प्रॉपर्टी तयार केली तशीच काहीशी प्रॉपर्टी वाटते. पण कधी त्यांच्या नावाने ते स्वतःची प्रॉपर्टी आहे असे भासवणार्‍यांना कोणी उपदेश केल्याचे किमान नजिकच्या भूत-वर्तमानात तरी आढळलेले नाही!

अर्धवटराव Tue, 02/23/2016 - 00:46
देशद्रोहाची व्याख्या, फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन वगैरे जंजाळात हि केस गुंतवली गेली आहेच. पण या सेंटीमेण्ट्स भोवती हे प्रकरण सुरु झालेच नाहि मुळी. एकुणच राष्ट्रव्यवस्थेशी, पर्यायाने केंद्र सरकारशी काडी करणं ओतकं स्वच्छ प्रकरण आहे हे. त्याचा यथायोग्य समाचार घेतला जावा, मुळासकट काहि इलाज करता आला तर बघावा हि इच्छा आहे. यु.पी.ए. सरकारबाबत आमच्या बर्‍याच तक्रारी होत्या. पण बाबा रामदेवने जे आंदोलन केलं व ज्या पद्धतीने ते उधळण्यात आलं ते बघुन आम्हाला फार बरं वाटलं होतं. सरकारशी उगीच चेष्टा करु नये. शेवटी सरकार देखील जनतेची अस्मीता असते. तिची पायमल्ली होता कामा नये.

गामा पैलवान Tue, 02/23/2016 - 01:19
अवांतर : तर्राट जोकर,
>> मला वाटलं समस्त भारतीयांचं हित प्रथम हा भाजपचा खुला अजेंडा आहे की काय? खैर, कोई बात नही.
तुमचा वरील प्रतिसाद वाचला. मी भारतीय या शब्दाऐवजी मुद्दाम हिंदू म्हणतोय. माझी अपेक्षा होतीच की कोणीतरी यावर टिप्पणी करेल. ते तुम्ही निघालात. :-) त्याचं काय आहे की भारताच्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासून तुटले. तिथल्या उर्वरित अहिंदूंची अवस्था फारशी चांगली नाहीच, शिवाय हिंदूंची अवस्था तर अति दयनीय झाली आहे. त्यामुळे इतर कोणापेक्षाही हिंदूंचं हित सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा परत कधी हिंदू की भारतीय हा मुद्दा उपस्थित करू नका. आ.न., -गा.पै.

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान Tue, 02/23/2016 - 18:49
तजो, एक सत्य अनेक रूपं या सिद्धांताचा कृतीतून आदर राखणारा कोणीही मनुष्य हिंदू आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 11:37
नाही हो. भाजप्/संघ अशा विचारांच्या कृतींचा अवलंब करणार्‍यांचा नाही. त्यांच्यासाठी तेच एक सत्य आहेत, म्हणून म्हटले आपले. कृतींची यादी काढू का?

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान Wed, 02/24/2016 - 13:51
तजो, संघ आणि भाजप इतके राक्षसी आहेत, हे माहित नव्हतं. बरं पाकिस्तानात आहेत का ते? असो. तुमची यादी वाचायला आवडेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 14:17
संघ आणि भाजप इतके राक्षसी आहेत, हे माहित नव्हतं >> मी कधी म्हटलं की ते राक्षसी आहेत? काही हां गा.पै. बाकी सतत पाकिस्तान, आयसिस, अरब देश, अफगाणिस्तान करुन काय मिळतं हो? स्वच्छ मुस्लिमांविरूद्ध आहोत असा अर्थ निघतो त्यातून. मुस्लिमांविरुद्ध आहोत म्हणजेच हिंदूंसाठी काम करतोय असं समजायचं काय?

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान Wed, 02/24/2016 - 20:07
तजो, तुमचा हा प्रश्न अत्यंत समर्पक आहे. >> सतत पाकिस्तान, आयसिस, अरब देश, अफगाणिस्तान करुन काय मिळतं हो? >> स्वच्छ मुस्लिमांविरूद्ध आहोत असा अर्थ निघतो त्यातून. फक्त तो पाकिस्तान, सीरिया, इराक, अरब देश, अफगाणिस्तान इथल्या जनतेला विचारायला हवाय. इस्लामकडून यांना काय मिळालं? आणि भारतीय मुस्लिमांनाही तेच मिळवायचंय का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 20:38
आपला मुद्दा काय आपण बोलतो काय. इथे लोक म्हणतात मी हायजॅक करतो धागा. त्याचं काय आहे की भारताच्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासून तुटले. तिथल्या उर्वरित अहिंदूंची अवस्था फारशी चांगली नाहीच, शिवाय हिंदूंची अवस्था तर अति दयनीय झाली आहे. त्यामुळे इतर कोणापेक्षाही हिंदूंचं हित सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा परत कधी हिंदू की भारतीय हा मुद्दा उपस्थित करू नका. हे तुमचे विधान ह्यात मुस्लिमांन काय पाहिजे हे कुठुन आले? भाजप व संघाचा अजेंडा काय एवढाच प्रश्न होता. तुम्हीच तो मुस्लिमावर नेताय. भाजप संघ भारतीयांसाठी नाही तर फक्त हिंदूंच्या भल्यासाठी काम करतात असे तुम्हीच म्हणलेत, आता ह्यात मुस्लिम कुठुन आले?

In reply to by तर्राट जोकर

होबासराव Wed, 02/24/2016 - 20:46
मि कधि संघात गेलो नाहि त्यामुळे तिथे काय होत हे माहित नाहि पण भारतात जिथे कुठे नैसर्गिक आपत्ति येते, रेल्वे अ‍ॅक्सिडंट होतात तिथे प्रथम मदत करायला पोचणार्‍यांमध्ये तरि संघाचे लोक असतात हे बघितले आहे. त्यामुळे अशा ठिकाणि मदत करतांना माणुस जात / धर्म तरि पाह्त नाहि एव्हढे म्हणावेसे वाटते.

In reply to by होबासराव

तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 20:53
अशा अनेक संघटना आहेत, असतात, असाव्यात. पण चर्चेचा विषय तो नाही.

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान गुरुवार, 02/25/2016 - 02:59
तजो, मूळ प्रश्न हिंदू कोणास म्हणावे असा तुम्ही विचारलेला होता. एकसत्यवचनावर विश्वास असलेला कोणीही हिंदू धरायला (माझी) हरकत नाही. तर पाकिस्तानात या वाचनावर विश्वास ठेवून चालणारी माणसं नाहीत. म्हणून त्याची दुर्दशा झाली आहे. याउलट भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त वैविध्य असूनही दुर्दशा झालेली दिसंत नाही. याचा अर्थ हिंदू एकसत्यवचन मानतात. तुम्ही म्हणता की भाजप/संघ एकसत्यवचनानुरूप कृती करणारे नाहीत. तर त्यांची उदाहरणे द्यावीत ही विनंती. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 03:20
त्याचं काय आहे की भारताच्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासून तुटले. तिथल्या उर्वरित अहिंदूंची अवस्था फारशी चांगली नाहीच, शिवाय हिंदूंची अवस्था तर अति दयनीय झाली आहे. त्यामुळे इतर कोणापेक्षाही हिंदूंचं हित सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा परत कधी हिंदू की भारतीय हा मुद्दा उपस्थित करू नका. >> हे आधी निस्तरा ना भाऊ. तुम्ही भाजप, संघाचे प्रवक्ते म्हणून इथे उत्तरे देणार का ते सांगा आधी. काय आहे की नंतर लोक कोपरे शोधतात लपण्यासाठी.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी गुरुवार, 02/25/2016 - 11:26
त्याचं काय आहे की भारताच्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासून तुटले. तिथल्या उर्वरित अहिंदूंची अवस्था फारशी चांगली नाहीच, शिवाय हिंदूंची अवस्था तर अति दयनीय झाली आहे. त्यामुळे इतर कोणापेक्षाही हिंदूंचं हित सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा परत कधी हिंदू की भारतीय हा मुद्दा उपस्थित करू नका.
गापैंच्या या मुद्द्याशी पूर्ण सहमत.

पुष्करिणी Tue, 02/23/2016 - 18:51
एन्डी टीव्ही ( मी बरखा आणि वासु जैन या दोघांचे आठवडाभर कार्यक्र्म बघतेय) जेएनयु च्या आरोपी विद्यार्थ्यांचा उल्लेख कायम 'किड्स' असा का करतेय कोणास ठाउक. हसायला येतं. बाकीच्यांच माहित नाही पण कन्हैया २८ वर्षांचा आहे म्हणे

In reply to by पुष्करिणी

विकास Tue, 02/23/2016 - 20:11
जेएनयु च्या आरोपी विद्यार्थ्यांचा उल्लेख कायम 'किड्स' असा का करतेय कोणास ठाउक. किड हा शब्द इंग्रजीत का मराठीत? ;) गंमतीचा भाग सोडून द्या. सतत किड्स म्हणल्याने, दर्शकांच्या डोक्यात, हे बापे नसून, लहान मुले आहेत असे कुठेतरी बिंबवले जाते. मग नकळत सगळेच चाईल्ड अ‍ॅब्यूज वाटू लागते.... जेएनयुचे विद्यार्थी - किड्स स्मृती इराणी - actress turned politician नरेंद्र मोदी - नमन २००२ पासून चालू करणे सोनिया गांधी - काँग्रेस प्रेसिडंट मोदींना लिहीलेल्या पत्रात : नुसतेच, "...a man whose name you love invoking - Atal Bihari Vajpayee" असो. :)

होबासराव Tue, 02/23/2016 - 19:07
विद्यार्थ्यांचा उल्लेख कायम 'किड्स' असा का करतेय कोणास ठाउक. हसायला येतं. बाकीच्यांच माहित नाही पण कन्हैया २८ वर्षांचा आहे म्हणे बरखा दत्त साठि कन्हैय्या खरच बच्चा आहे. ज्या तर्‍हेचे लॉबिंग बिझिनेस बरखा मॅडम पत्रकारितेच्या आड करायच्या / करतात ते बघता कन्हैय्या त्यांच्या साठि नर्सरीतच आहे.

In reply to by होबासराव

तर्राट जोकर Tue, 02/23/2016 - 19:21
तीव्र सहमती. राजदिप, बरखा ह्यांच्यासारख्या लोकांना पत्रकार म्हणवुन घेण्याचा अधिकार नाही.

In reply to by होबासराव

तर्राट जोकर Tue, 02/23/2016 - 20:15
असणारच. ह्या येडपटांच्या चौथ्या वाक्याला २००२ गुजरात नसेल तर पुढच्या श्वासाला हृदय बंद पडेल असा शाप देवाने दिलाय का काय असा संशय येतो.

जानु Tue, 02/23/2016 - 22:38
कमीत कमी न्यायालयाने तरी त्यांना सरळ सांगीतले की पोलिसांकडे जा आणि शरण या नाहीतर त्यांनी आपल्याला काय शिक्षा द्यायची ते सुध्दा न्यायालयाला विद्यापीठातुनच सांगितले असते.

In reply to by जानु

विकास Wed, 02/24/2016 - 00:13
पोलीसांना एकदाचे शरण गेले आहेत. अंदाजः रितसर आरोप होईल. पोलिसांच्या बाजूने या वेळेस एक वेगळे चित्र रंगवता येऊ शकेल, ते म्हणजे या विद्यार्थ्यांनी देशाविरुद्ध चिथावणी देऊन इतर विद्यापिठातील (जादवपूर) मुलांना पण चिथावणी दिली. पक्षि: राष्ट्रविघातक कारवायीचा कट चालू होता... आता ते न्यायालयास मान्य होऊ शकेल का न्यायालय म्हणेल इतके पुरेसे नाही आणि सोडून देतील, हे पहावे लागेल.

जानु Wed, 02/24/2016 - 21:57
आजच स्मृती ईराणींचे संसदेतील भाषण पाहिले. त्यांनी दिलेली उत्तरे आणि सादर केलेले पुरावे हे त्या सगळ्यांना आरोपी म्हणुन सिध्द करण्यास पुरेसे ठरतील असे दिसते. आज एन.डी.टी.व्ही. ने नवीन ध्वनीचित्रफित दाखवली त्यात उमर स्पष्ट दिसतो आणि त्यात बाहेरील बहुतेक काश्मिरी भारतविरोधी घोषणा देतांना दिसतात. एकंदरीत भाजपाने आज बाजी उलटवली असे म्हणावे. एन.डी.टी.व्ही. वर सुध्दा वार्ताहर यात देशद्रोही घोषणा आहेत हे सांगत होता हे विशेष. पण जेव्हा त्या आरोपींपैकी काहींची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी अफजल गुरु वर आणि भारतावर दिलेल्या घोषणांचे समर्थनच केले. आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अफजलच्या निवाड्यावर स्पष्ट विरोध दाखविला आणि ३७७ वर ज्याप्रमाणे आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय दिल्यावरही चर्चा होते त्याचा दाखला दिला. मुळात ही तुलना चुकीची आहे.

In reply to by जानु

अर्धवटराव Wed, 02/24/2016 - 23:54
स्वराज मॅडमला युवराजांनी डिचवलं आणि आपलं हसु करुन घेतलं. स्मृतीबाई तर तशाही 'एक्ट्रेस टर्न्ड पॉलिटिशियन' आहेत. त्यांच्याशी वादविवाद करायला चांगले मुरलेले दिवटे हवेत.

In reply to by जानु

श्रीगुरुजी गुरुवार, 02/25/2016 - 11:36
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण अत्यंत प्रभावी व परिणामकारक होते. त्यांच्या मुद्द्यांमुळे आपली पंचाईत होणार हे ओळखून खांग्रेसी सदस्यांनी भाषण सुरू होतानाच संसदेतून पलायन केले. जेएनयुच्या देशद्रोही विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊन राहुलने फार मोठी चूक केली आहे हे आता खांग्रेसींच्या लक्षात आले असेल. या मुद्द्यावर राहुलचे समर्थन करताना काँग्रेस प्रवक्त्यांची पंचाईत होत आहे. हा मुद्दा देशद्रोही घोषणांना पाठिंबा अथवा विरोध असा न करता संघ वि. विद्यार्थी असा करण्याचा खांग्रेस आटोकाट प्रयत्न करीत आहे. काही ठराविक डावे निधर्मांध वगळता विद्यार्थ्यांच्या बाजूने कोणीच बोलत नाही. वाहिन्यांवर मुद्दाम लष्करातील माजी अधिकार्‍यांना चर्चेत बोलावून त्यांचे मत विचारले जात आहे व ते सर्वजण विद्यार्थ्याना सपाटून शिव्या देत आहेत. जेएनयु प्रकरणात अडचण झाल्याने काल पुन्हा एकदा रोहित वेमुलाचा मुद्दा उकरून काढण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात फारसे यश आले नाही. स्मृती इराणींचे कालचे भाषण बघून काही महिन्यांपूर्वी सुषमा स्वराज यांनी संसदेत ललित मोदी प्रकरणावरून केलेल्या अत्यंत आक्रमक आणि घणाघाती भाषणाची आठवण झाली.

झेन Wed, 02/24/2016 - 22:51
सासू सून मालिकांमधे रस नसल्या मुळे त्यांचा टी व्ही वरचा परफॉर्मन्स माहीत नाही, पण आजचे भाषण मूद्देसूत, पारिणामकारक वाटले. कॅमेऱ्यासमोर एखाद्या कलावंताचा वकीलाच्या भूमीकेतला अभिनय असल्या सारखा पण उत्स्फुर्त .

गामा पैलवान गुरुवार, 02/25/2016 - 12:40
तर्राट जोकर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. >> तुम्ही भाजप, संघाचे प्रवक्ते म्हणून इथे उत्तरे देणार का ते सांगा आधी. >> काय आहे की नंतर लोक कोपरे शोधतात लपण्यासाठी. आता काय सांगायचं राव ! भाजप्/संघ यांचं नाव तुम्ही घेतलंय. त्यामुळे लपायचे कोपरे शोधायची वेळ माझ्यावर येणार नाही हे नक्की. हिंदूंची प्रवक्तेगिरी करायची असं मी माझ्यापुरतं ठरवलंय. संघ/भाजप जोवर हिंदूहिताची भाषा करताहेत तोवर मी त्यांच्या पाठीशी उभा असेन. आ.न., -गा.पै.

ट्रेड मार्क गुरुवार, 02/25/2016 - 21:48
देशाचे पूर्व गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री पी. चिदंबरम यांच्या मते "अफझल गुरूचा संसदेवरील हल्ल्यात सहभाग असावा की नाही या बद्दल शंका आहे. या केसमध्ये चुकीचा निर्णय दिला गेला. त्यावेळेला ते स्वतः सरकारमध्ये मंत्री असल्याने त्यांना या गोष्टीचा विरोद करता आला नाही कारण सरकारनेच ही केस टाकली होती." हे आता स्वतःच भाग असलेल्या सरकारविरुद्ध बोलत नाहीयेत तर देशाच्या सुप्रीम कोर्टाविरुद्ध पण बोलत आहेत. तारतम्य तर सुटलेच आहे पण एकूणच सगळे काँग्रेसी भंजाळले आहेत बहुतेक. बातमीचा दुवा

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 22:26
राजकिय फायदा उपटण्यासाठी कोणी किती नीच थराला जाऊ शकतं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस नेत्यांचं हे वर्तन. अश्लाघ्य, नीतीमत्ताहिन.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Fri, 02/26/2016 - 12:41
+१ २०१४ मध्ये केंद्रातील व नंतर अनेक राज्यातील सत्ता हातातून गेल्यापासून खांग्रेसी अतिशय बिथरले आहेत. मोदींच्या प्रत्येक गोष्टीला विरोधासाठी विरोध करण्यासाठी आता त्यांनी न्यायालयात गुन्हा सिद्ध झालेल्या अतिरेक्यांच्या पाठीशी उभे रहायचे ठरविले आहे. एकीकडे चिदंबरम अफझल गुरूला झालेल्या शिक्षेबद्दल संशय व्यक्त करीत आहेत, तर दुसरीकडे युवराज देशद्रोही घोषणा देणार्‍यांच्या पाठीशी उभे रहात आहेत तर तिसरीकडे मणीशंकर अय्यर, खुर्शिद यांच्यासारखे खांग्रेसी पाकिस्तानमध्ये जाऊन मोदींना घालवा असे माध्यमांना सांगत आहेत. खांग्रेसी एक भयंकर खेळ खेळत आहेत. मोदींना विरोध करण्यासाठी पाकिस्तान, अतिरेकी, देशद्रोही इ. बरोबर साटंलोटं करणे देशाला महागात पडणार आहेत.