Skip to main content

जे. एन. यु. एक वेगळा विचार

लेखक जानु यांनी शुक्रवार, 19/02/2016 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याचा ज्वलंत आणि चघळुन झालेला हा विषय आहे, पण तरीही काही मुद्दे मांडायचा प्रयन्त करतो. या प्रकारात डावे आणि उजवे यांच्यात सरळ लढत झालेली दिसते. यात भाजपाचे काही आडाखे व डाव असतील आणि डावे त्यात अडकले असे वाटते. १० फेब्रु. पासुन या प्रकरणाची सुरुवात झालेली आहे. भाजपाला रोहित प्रकरण आणि दादरी प्रकारात जो धक्का बसला त्याची भरपाई करायची संधी डाव्यांनी दिली. भाजपाला अशी संधी हवीच होती. यामुळे भाजपा विरुध्द डावे + काँग्रेस यांची जुंपली बाकी सगळे गंमत पाहत आहेत. अफजलबाबत दिलेल्या घोषणांची ध्वनीचित्रफीत जशी अभाविप ने जाहीर केली तसे या घटनेतील ताकद आणि जनभावना बदलण्याची क्षमता भाजपाच्या नेत्यांना लगेच लक्षात आली असेल. (कदाचित वरीष्ठांना अगोदरच हे माहित असेल. त्यांनी ध्वनीचित्रफीत पाहिली असेल. नंतर तिला प्रसिध्दी दिली गेली.) त्यातच डाव्या नेत्यांची मुले त्यात पाहुन तर आनंदच झाला असेल. त्यातच पुढे प. बंगालची निवडणुक आहे. असा पत्ता हातचा सोडणे भाजपाला शक्यच नव्हते. हे झाले नेपथ्य. प्रकरण उघड झाल्यावर त्यावर अपेक्षीतपणे डाव्यांनी कडवी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींनी त्याचे मस्त पणे समर्थन केले. काँग्रेसी नेते त्यामागे फरपटत गेले. राहुल गांधींनी जे.एन.यु. ला भेट देउन आगीत तेल ओतले. भाजपाने कन्हैयाला अटक करुन त्यात दुसरी चाल खेळली. खरे तर त्याला अटक केली नसती तरी चौकशी करुन काम भागत होते. (हे माझे मत आहे.) भाजपाने आपल्या ईतर संघटना यात उतरवुन दबाव कायम ठेवला. यात भाजपाला बर्‍यापैकी लाभ झाला आणि ते याचा पुढे बराच वापर करतील. १. भाजपा भारतातील तमाम जनतेला हे दाखविण्यात यशस्वी झाले की जे. एन. यु. मध्ये भारतविरोधी कार्यक्रम होतात. (बर्‍याच लोकांना हे माहित नाही की भारताच्या नितीनिर्धारणात जे.एन.यु. ने किती हातभार लावलाय ते.) २. या कार्यक्रमात डावे पुढाकार घेतात, त्यांना आपल्या फायद्यापुढे देशाचे महत्व नाही हे सिध्द केले. ३. अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुध्द देशभक्ती यात जनतेने नैसर्गिकपणे देशभक्तीला प्राधान्य दिले. ४. कितीही नाही म्हटले तरी सगळ्या प्रकरणात भाजपाला फायदाच झालेला आहे. ५. भविष्यात जे.एन.यु. वा तत्सम संस्थांमध्ये आपले हातपाय पसरायला भाजपाला या प्रकरणाचा पुरेपुर उपयोग होणार. ६. डाव्यांची छुपी सत्ता आणि वर्चस्व तोडणे हा प्रकरणाचा सगळ्यात मोठा फायदा भाजपाला पुढील काळात होणार. मागे एका ठिकाणी म्हटल्यानुसार अश्या साठमार्‍या भाजपा आणि त्यांच्या संघटना पुन्हा पुन्हा करणार. कारण राजकारणात सत्ता नुसती दिसुन चालत नाही तर तिचा भविष्यासाठीसुध्दा वापर करायचा असतो.

वाचने 22912
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

In reply to by पिशी अबोली

झुंडशाही आणि जनतेच्या बहुमताच्या नावाखाली काय केले जाऊ शकते ह्याचे उदाहरण म्हणून बडोदा डायनामाईट केस मिळवुन वाचा.

In reply to by तर्राट जोकर

तुम्हीच एक धागा काढा ना त्या प्रकरणाबद्दल. त्याआधी झुंडशाही आणि जनतेच्या बहुमताच्या नावाखाली अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कसा फिरविण्यात आला व त्यानंतर आणिबाणी कशी लादण्यात आली तेही लिहा. त्याचप्रमाणे झुंडशाही आणि जनतेच्या बहुमताच्या नावाखाली शहाबानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवून मुस्लिम धर्ममार्तंडांसमोर साष्टांग लोटांगण घालून मुस्लिम महिलांची गळचेपी कशी करण्यात आली तेही लिहा.

In reply to by तर्राट जोकर

आपल्या आधीच्या कॉमेंटचा आणि बडोदा डायनामाईट केसचा काहीतरी संबंध आहे का? झुंडशाही व पाशवी बहुमत यांचा व बडोदा डायनामाईट केसचा काहीतरी संबंध आहे का? बहुमताचा वापर करून आणिबाणी आणली गेली, शहाबानो खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरविला गेला ... काँग्रेसने बहुमताचा वापर अशा अनेक देशविघातक गोष्टींसाठी केला. म्हणून तर मी तुम्हाला बडोदा डायनामाईट केसविषयी धागा काढून सविस्तर लिहायला सांगितले. बघूतरी झुंडशाही व पाशवी बहुमत यांचा व बडोदा डायनामाईट केसचा काही संबंध आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

तसेच बडोदा डायनामाईट केसबद्दल म्हटलंय. गुजरात दंगलीबद्द्ल नाहीये ते. काविळ झाली की निष्पक्ष विधानही कसे वाचल्या जाते याचे उत्तम उदाहरण दिलंय.

In reply to by तर्राट जोकर

बरोबर आहे तजो एका चुकीमुळे दुसर्‍या चुकीचे समर्थन होत नाही, वकीलांनी केलेल्या झुंडशाहीचेही होत नाही, ते बडोदा डायनामाइटचेही होत नाही, डाव्यांच्या कामगारचलवळींच्या नावाखालच्या इतर झुंडशाहीचेही होत नाही, संसदेवर अतिरेकी हल्ल्ला हि सशस्त्र झुंडशाही असते म्हणून त्या सशस्त्र झुंडशाहीचेही समर्थन होत नाही. म्हणून संसदेवर अतिरेकी हल्ल्ला केलेल्या अतिरेक्यांना सहानुभूती दाखवले जाण्याचेही समर्थन होत नाही. त्यातल्या त्यात फरक करावयाचा असेल तर -मानवाधिकारांचे होता होईतो हनन टाळून, समतेचे न्याय्य तत्वांचे रक्षणकरून- देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता जपणारी हिंसा पवित्र आहे आणि देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता डावावर लावणारी हिंसा -कोणत्याही सबबीने- अपवित्र आहे.

In reply to by माहितगार

आणि देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता डावावर लावणारी हिंसा अथवा अशा हिंसेचे अथवा देश विभाजनाचे समर्थन -कोणत्याही सबबीने- अपवित्र आहे.

In reply to by तर्राट जोकर

आता इथे गुजरात दंगल कोठून आली? कावीळबिवीळ कोणाला झाली नाहिय्ये हो. काही दिवसांपूर्वी एका सदस्याला मला नीट प्रतिसाद देता येत नव्हते. म्हणून त्यांनी लगेच मला मूळव्याध झाली आहे असा प्रतिसाद दिला. आता तुम्ही म्हणता कावीळ झालीये. झुंडशाही व पाशवी बहुमत यांचा व बडोदा डायनामाईट केसचा काही संबंध आहे का ते जरा सांगता का.

In reply to by श्रीगुरुजी

बडोदा डायनामाईट केसः Baroda dynamite case is the term used for the criminal case launched by the Indira Gandhi government in India during the Indian Emergency (1975 - 77) against the opposition leader George Fernandes and 24 others. The CBI charged George and others on false and made-up charges of smuggling dynamite to blow up government establishments and railway tracks in protest against state of emergency. They were also charged with waging war against the state to overawe and overthrow the government. The accused were arrested in June 1976 and imprisoned in Tihar Jail, Delhi. गुरुजी, इम्पल्सिव व सिलेक्टीव रिडिंग सोडा आता तरी.

In reply to by तर्राट जोकर

आता माझ्या प्रतिसादात इम्पल्सिव व सिलेक्टीव रिडिंग कोठे आहे? आणि बडोदा डायनामाईट केस बद्दल फक्त एवढंच? वरील २ छोट्या परिच्छेदात इतकंच लिहिलंय की इंदिरा गांधींनी आणिबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस व इतर २४ जणांविरूद्ध हा खटला दाखल केला होता. आणिबाणीच्या काळात हजारो नागरिक कोणताही आरोप नसताना २० महिने विनाजामीन तुरूंगात डांबले गेले होते. जे जे इंदिरा गांधींचे राजकीय विरोधक होते त्या सर्वांना तुरूंगात डांबले होते. जॉर्ज फर्नांडिस हे इंदिरा गांधींचे विरोधक असल्याने त्यांनाही तुरूंगात डांबले व त्यासाठी वरील प्रकरण दाखविले गेले. त्यामुळे हा खटला हा आपल्या राजकीय विरोधकांवर केवळ राजकीय सूड घेण्याचाच प्रकार होता. त्यात काहीही तथ्य नव्हते. पाशवी बहुमतामुळे आणिबाणी लादली गेली आणि आणिबाणीत केंद्र सरकारच्या हातात अनिर्बंध अधिकार येत असल्याने त्याचा उपयोग विरोधकांवर सूड घेण्यासाठी करण्यात आला हेच यातून दिसून येते..

In reply to by श्रीगुरुजी

पाशवी बहुमतामुळे आणिबाणी लादली गेली आणि आणिबाणीत केंद्र सरकारच्या हातात अनिर्बंध अधिकार येत असल्याने त्याचा उपयोग विरोधकांवर सूड घेण्यासाठी करण्यात आला हेच यातून दिसून येते.. >> मी काय वेगळे बोलतोय...?

In reply to by तर्राट जोकर

आधीच्या प्रतिसादात आणिबाणीचा उल्लेख नव्हता. पण ते बडोदा डायनामाईट बद्दल धागा काढणार ना?

In reply to by श्रीगुरुजी

बडोदा डायनामाईट ही केसच आणीबाणीचा परमोच्च गैरवापर सांगणारी आहे, त्यात तुमच्या लाडक्या काँग्रेसचा स्पष्ट उल्लेख नाही म्हणून खटकले का? म्हणून मिळवून वाचा म्हटले होते प्रतिसादात. पण काँग्रेसचे गुन्हेच तेवढे सगळे ठळक अक्षरात स्पष्ट पाहिजे असे दिसते. ते नसले तर तळमळ होते. तसेच त्यावर धागा कशासाठी काढायचा, मी तसे काही म्हटले होते काय? धागा तर भाजपच्या धार्मिक राजकारणावर काढायचा ठरलंय ना?

In reply to by तर्राट जोकर

आणिबाणी संदर्भात काँग्रेसचा स्पष्ट उल्लेख हवा होता कारण पाशवी बहुमताचा गैरवापर करून आणिबाणी लादून दडपशाही करणारा भारताच्या इतिहासातील तो एकमेव पक्ष आहे. धागा कोणत्याही विषयावर काढा. भाजपच्या तथाकथित धार्मिक राजकारणावर काढा किंवा इतर कोणत्याही विषयावर काढा.

आता तर सगळे जे.एन.यु. बसले आहेत. त्यांनी ठरवले ते देशद्रोही नाहीत. व्यवस्थित भाषणे देत आहेत. काँग्रेस आणि सगळे माना डोलावतायेत. पोलीस विनंती करतायेत. मला तर भजन आठवले. दर्शन देरे ....साला मी जर एखाद्याला धमकी दिली तर दिवसभर स्टेशनला बसवतील आणि काय काय करतील नेम नाही. मला तर असे वाटतय की साला सगळाच घोटाळा झालाय अन मी चु....सारखा कळफलक बडवतोय. उमर तेथे देशप्रेमाचे धडे देत होता. मी त्यावर आरोप घेतला कुठे फेडेन हे पाप????

In reply to by जानु

कायद्यानुसार फिर्यादीला पुरावे सादर करुन आरोप सिद्ध करावे लागतात. बस्सीसाहेब म्हणताय्त, त्या मुलांनी पुढे येऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करावे. ह्याचा अर्थ पोलिसांकडे निश्चित पुरावे नाहीत असा घ्यायचा का?

बस्सीसाहेब म्हणताय्त, त्या मुलांनी पुढे येऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करावे. ह्याचा अर्थ पोलिसांकडे निश्चित पुरावे नाहीत असा घ्यायचा का? तजो साहेब एक अगदि साधा आणि सहज प्रश्न विचारु का? आपल्याला काय वाटत कि हे विद्यार्थि निर्दोष आहेत आणि भारत सरकार उगाच ह्यांना फ्रेम करतेय ?

In reply to by होबासराव

प्रश्न मला काय वाटतं तो नाही. सत्य काय आहे हा आहे? तुम्हाला काय वाटतं, स्पष्ट पुराव्यांअभावी ह्याच विद्यार्थ्यांना फासावर लटकवावे, खरे घोषणा देणारे कोण आहेत त्याचा तपास न होताच?

In reply to by तर्राट जोकर

प्रश्न मला काय वाटतं तो नाही. सत्य काय आहे हा आहे? तुम्हाला काय वाटतं, स्पष्ट पुराव्यांअभावी ह्याच विद्यार्थ्यांना फासावर लटकवावे, खरे घोषणा देणारे कोण आहेत त्याचा तपास न होताच?
त्यासाठी न्यायव्यवस्था आहेच.

In reply to by तर्राट जोकर

आणि त्या "विद्यार्थी" लोकांनी न्यायव्यवस्थेबद्दल त्यांना किती आदर आहे, ते दाखवून दिलेच आहे...

जेएनयुमध्ये राष्ट्रविरोधी घोषणाबाजी झाली आहे,हे तर त्रिवार सत्य आहे,आता ती कोणी केली हा दुसरा विषय झाला. पण असे झाले असताना तेथे जाऊन राजकारण करणे म्हणजे मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणे. हे रागां,येचुरींना कोण सांगणार!! आणि याचा फायदा भाजपलाच होईल असे वाटत आहे.

In reply to by याॅर्कर

ज्या अर्थी मणीशंकर अय्यर, बरखा दत्त यांना अचानक अटल बिहारी वाजपेयींचा आदर्श आठवू लागला तेंव्हापासूनच असे वाटत आहे की ह्या तथाकथीत धर्मनिरपेक्ष आणि स्वतःच लेबल लावलेले असल्याने (अय्यर सारखे) "इंटलेक्च्युअल्स" असलेल्यांना कुठेतरी गडबड केली अशी धाकधूक वाटू लागली आहे असे वाटते. गंमत म्हणजे हे लोकं पुढार्‍यांची पण पक्षिय वाटणी करतात. गांधीजीच्या नावाने पण त्यांचा फोटो असलेल्या नोटांनी जशी प्रॉपर्टी तयार केली तशीच काहीशी प्रॉपर्टी वाटते. पण कधी त्यांच्या नावाने ते स्वतःची प्रॉपर्टी आहे असे भासवणार्‍यांना कोणी उपदेश केल्याचे किमान नजिकच्या भूत-वर्तमानात तरी आढळलेले नाही!

देशद्रोहाची व्याख्या, फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन वगैरे जंजाळात हि केस गुंतवली गेली आहेच. पण या सेंटीमेण्ट्स भोवती हे प्रकरण सुरु झालेच नाहि मुळी. एकुणच राष्ट्रव्यवस्थेशी, पर्यायाने केंद्र सरकारशी काडी करणं ओतकं स्वच्छ प्रकरण आहे हे. त्याचा यथायोग्य समाचार घेतला जावा, मुळासकट काहि इलाज करता आला तर बघावा हि इच्छा आहे. यु.पी.ए. सरकारबाबत आमच्या बर्‍याच तक्रारी होत्या. पण बाबा रामदेवने जे आंदोलन केलं व ज्या पद्धतीने ते उधळण्यात आलं ते बघुन आम्हाला फार बरं वाटलं होतं. सरकारशी उगीच चेष्टा करु नये. शेवटी सरकार देखील जनतेची अस्मीता असते. तिची पायमल्ली होता कामा नये.

अवांतर : तर्राट जोकर,
>> मला वाटलं समस्त भारतीयांचं हित प्रथम हा भाजपचा खुला अजेंडा आहे की काय? खैर, कोई बात नही.
तुमचा वरील प्रतिसाद वाचला. मी भारतीय या शब्दाऐवजी मुद्दाम हिंदू म्हणतोय. माझी अपेक्षा होतीच की कोणीतरी यावर टिप्पणी करेल. ते तुम्ही निघालात. :-) त्याचं काय आहे की भारताच्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासून तुटले. तिथल्या उर्वरित अहिंदूंची अवस्था फारशी चांगली नाहीच, शिवाय हिंदूंची अवस्था तर अति दयनीय झाली आहे. त्यामुळे इतर कोणापेक्षाही हिंदूंचं हित सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा परत कधी हिंदू की भारतीय हा मुद्दा उपस्थित करू नका. आ.न., -गा.पै.

In reply to by तर्राट जोकर

तजो, एक सत्य अनेक रूपं या सिद्धांताचा कृतीतून आदर राखणारा कोणीही मनुष्य हिंदू आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by तर्राट जोकर

हो. नक्की. शंभर टक्के. खुंटा हलवून बळकट करताय वाट्टे? -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नाही हो. भाजप्/संघ अशा विचारांच्या कृतींचा अवलंब करणार्‍यांचा नाही. त्यांच्यासाठी तेच एक सत्य आहेत, म्हणून म्हटले आपले. कृतींची यादी काढू का?

In reply to by तर्राट जोकर

तजो, संघ आणि भाजप इतके राक्षसी आहेत, हे माहित नव्हतं. बरं पाकिस्तानात आहेत का ते? असो. तुमची यादी वाचायला आवडेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संघ आणि भाजप इतके राक्षसी आहेत, हे माहित नव्हतं >> मी कधी म्हटलं की ते राक्षसी आहेत? काही हां गा.पै. बाकी सतत पाकिस्तान, आयसिस, अरब देश, अफगाणिस्तान करुन काय मिळतं हो? स्वच्छ मुस्लिमांविरूद्ध आहोत असा अर्थ निघतो त्यातून. मुस्लिमांविरुद्ध आहोत म्हणजेच हिंदूंसाठी काम करतोय असं समजायचं काय?

In reply to by तर्राट जोकर

तजो, तुमचा हा प्रश्न अत्यंत समर्पक आहे. >> सतत पाकिस्तान, आयसिस, अरब देश, अफगाणिस्तान करुन काय मिळतं हो? >> स्वच्छ मुस्लिमांविरूद्ध आहोत असा अर्थ निघतो त्यातून. फक्त तो पाकिस्तान, सीरिया, इराक, अरब देश, अफगाणिस्तान इथल्या जनतेला विचारायला हवाय. इस्लामकडून यांना काय मिळालं? आणि भारतीय मुस्लिमांनाही तेच मिळवायचंय का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आपला मुद्दा काय आपण बोलतो काय. इथे लोक म्हणतात मी हायजॅक करतो धागा. त्याचं काय आहे की भारताच्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासून तुटले. तिथल्या उर्वरित अहिंदूंची अवस्था फारशी चांगली नाहीच, शिवाय हिंदूंची अवस्था तर अति दयनीय झाली आहे. त्यामुळे इतर कोणापेक्षाही हिंदूंचं हित सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा परत कधी हिंदू की भारतीय हा मुद्दा उपस्थित करू नका. हे तुमचे विधान ह्यात मुस्लिमांन काय पाहिजे हे कुठुन आले? भाजप व संघाचा अजेंडा काय एवढाच प्रश्न होता. तुम्हीच तो मुस्लिमावर नेताय. भाजप संघ भारतीयांसाठी नाही तर फक्त हिंदूंच्या भल्यासाठी काम करतात असे तुम्हीच म्हणलेत, आता ह्यात मुस्लिम कुठुन आले?

In reply to by तर्राट जोकर

मि कधि संघात गेलो नाहि त्यामुळे तिथे काय होत हे माहित नाहि पण भारतात जिथे कुठे नैसर्गिक आपत्ति येते, रेल्वे अ‍ॅक्सिडंट होतात तिथे प्रथम मदत करायला पोचणार्‍यांमध्ये तरि संघाचे लोक असतात हे बघितले आहे. त्यामुळे अशा ठिकाणि मदत करतांना माणुस जात / धर्म तरि पाह्त नाहि एव्हढे म्हणावेसे वाटते.

In reply to by होबासराव

अशा अनेक संघटना आहेत, असतात, असाव्यात. पण चर्चेचा विषय तो नाही.

In reply to by तर्राट जोकर

तजो, मूळ प्रश्न हिंदू कोणास म्हणावे असा तुम्ही विचारलेला होता. एकसत्यवचनावर विश्वास असलेला कोणीही हिंदू धरायला (माझी) हरकत नाही. तर पाकिस्तानात या वाचनावर विश्वास ठेवून चालणारी माणसं नाहीत. म्हणून त्याची दुर्दशा झाली आहे. याउलट भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त वैविध्य असूनही दुर्दशा झालेली दिसंत नाही. याचा अर्थ हिंदू एकसत्यवचन मानतात. तुम्ही म्हणता की भाजप/संघ एकसत्यवचनानुरूप कृती करणारे नाहीत. तर त्यांची उदाहरणे द्यावीत ही विनंती. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्याचं काय आहे की भारताच्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासून तुटले. तिथल्या उर्वरित अहिंदूंची अवस्था फारशी चांगली नाहीच, शिवाय हिंदूंची अवस्था तर अति दयनीय झाली आहे. त्यामुळे इतर कोणापेक्षाही हिंदूंचं हित सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा परत कधी हिंदू की भारतीय हा मुद्दा उपस्थित करू नका. >> हे आधी निस्तरा ना भाऊ. तुम्ही भाजप, संघाचे प्रवक्ते म्हणून इथे उत्तरे देणार का ते सांगा आधी. काय आहे की नंतर लोक कोपरे शोधतात लपण्यासाठी.

In reply to by तर्राट जोकर

त्याचं काय आहे की भारताच्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासून तुटले. तिथल्या उर्वरित अहिंदूंची अवस्था फारशी चांगली नाहीच, शिवाय हिंदूंची अवस्था तर अति दयनीय झाली आहे. त्यामुळे इतर कोणापेक्षाही हिंदूंचं हित सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा परत कधी हिंदू की भारतीय हा मुद्दा उपस्थित करू नका.
गापैंच्या या मुद्द्याशी पूर्ण सहमत.

एन्डी टीव्ही ( मी बरखा आणि वासु जैन या दोघांचे आठवडाभर कार्यक्र्म बघतेय) जेएनयु च्या आरोपी विद्यार्थ्यांचा उल्लेख कायम 'किड्स' असा का करतेय कोणास ठाउक. हसायला येतं. बाकीच्यांच माहित नाही पण कन्हैया २८ वर्षांचा आहे म्हणे

In reply to by पुष्करिणी

जेएनयु च्या आरोपी विद्यार्थ्यांचा उल्लेख कायम 'किड्स' असा का करतेय कोणास ठाउक. किड हा शब्द इंग्रजीत का मराठीत? ;) गंमतीचा भाग सोडून द्या. सतत किड्स म्हणल्याने, दर्शकांच्या डोक्यात, हे बापे नसून, लहान मुले आहेत असे कुठेतरी बिंबवले जाते. मग नकळत सगळेच चाईल्ड अ‍ॅब्यूज वाटू लागते.... जेएनयुचे विद्यार्थी - किड्स स्मृती इराणी - actress turned politician नरेंद्र मोदी - नमन २००२ पासून चालू करणे सोनिया गांधी - काँग्रेस प्रेसिडंट मोदींना लिहीलेल्या पत्रात : नुसतेच, "...a man whose name you love invoking - Atal Bihari Vajpayee" असो. :)

विद्यार्थ्यांचा उल्लेख कायम 'किड्स' असा का करतेय कोणास ठाउक. हसायला येतं. बाकीच्यांच माहित नाही पण कन्हैया २८ वर्षांचा आहे म्हणे बरखा दत्त साठि कन्हैय्या खरच बच्चा आहे. ज्या तर्‍हेचे लॉबिंग बिझिनेस बरखा मॅडम पत्रकारितेच्या आड करायच्या / करतात ते बघता कन्हैय्या त्यांच्या साठि नर्सरीतच आहे.

मि १ सेकंद सुद्धा माझ्या टि.व्हि. स्क्रिन वर नाहि राहु देत. एक सामान्य माणुस म्हणुन मि एव्हढाच निषेध करु शकतो.

In reply to by होबासराव

तीव्र सहमती. राजदिप, बरखा ह्यांच्यासारख्या लोकांना पत्रकार म्हणवुन घेण्याचा अधिकार नाही.

In reply to by होबासराव

असणारच. ह्या येडपटांच्या चौथ्या वाक्याला २००२ गुजरात नसेल तर पुढच्या श्वासाला हृदय बंद पडेल असा शाप देवाने दिलाय का काय असा संशय येतो.

कमीत कमी न्यायालयाने तरी त्यांना सरळ सांगीतले की पोलिसांकडे जा आणि शरण या नाहीतर त्यांनी आपल्याला काय शिक्षा द्यायची ते सुध्दा न्यायालयाला विद्यापीठातुनच सांगितले असते.

In reply to by जानु

पोलीसांना एकदाचे शरण गेले आहेत. अंदाजः रितसर आरोप होईल. पोलिसांच्या बाजूने या वेळेस एक वेगळे चित्र रंगवता येऊ शकेल, ते म्हणजे या विद्यार्थ्यांनी देशाविरुद्ध चिथावणी देऊन इतर विद्यापिठातील (जादवपूर) मुलांना पण चिथावणी दिली. पक्षि: राष्ट्रविघातक कारवायीचा कट चालू होता... आता ते न्यायालयास मान्य होऊ शकेल का न्यायालय म्हणेल इतके पुरेसे नाही आणि सोडून देतील, हे पहावे लागेल.

आजच स्मृती ईराणींचे संसदेतील भाषण पाहिले. त्यांनी दिलेली उत्तरे आणि सादर केलेले पुरावे हे त्या सगळ्यांना आरोपी म्हणुन सिध्द करण्यास पुरेसे ठरतील असे दिसते. आज एन.डी.टी.व्ही. ने नवीन ध्वनीचित्रफित दाखवली त्यात उमर स्पष्ट दिसतो आणि त्यात बाहेरील बहुतेक काश्मिरी भारतविरोधी घोषणा देतांना दिसतात. एकंदरीत भाजपाने आज बाजी उलटवली असे म्हणावे. एन.डी.टी.व्ही. वर सुध्दा वार्ताहर यात देशद्रोही घोषणा आहेत हे सांगत होता हे विशेष. पण जेव्हा त्या आरोपींपैकी काहींची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी अफजल गुरु वर आणि भारतावर दिलेल्या घोषणांचे समर्थनच केले. आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अफजलच्या निवाड्यावर स्पष्ट विरोध दाखविला आणि ३७७ वर ज्याप्रमाणे आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय दिल्यावरही चर्चा होते त्याचा दाखला दिला. मुळात ही तुलना चुकीची आहे.

In reply to by जानु

स्वराज मॅडमला युवराजांनी डिचवलं आणि आपलं हसु करुन घेतलं. स्मृतीबाई तर तशाही 'एक्ट्रेस टर्न्ड पॉलिटिशियन' आहेत. त्यांच्याशी वादविवाद करायला चांगले मुरलेले दिवटे हवेत.

In reply to by जानु

स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण अत्यंत प्रभावी व परिणामकारक होते. त्यांच्या मुद्द्यांमुळे आपली पंचाईत होणार हे ओळखून खांग्रेसी सदस्यांनी भाषण सुरू होतानाच संसदेतून पलायन केले. जेएनयुच्या देशद्रोही विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊन राहुलने फार मोठी चूक केली आहे हे आता खांग्रेसींच्या लक्षात आले असेल. या मुद्द्यावर राहुलचे समर्थन करताना काँग्रेस प्रवक्त्यांची पंचाईत होत आहे. हा मुद्दा देशद्रोही घोषणांना पाठिंबा अथवा विरोध असा न करता संघ वि. विद्यार्थी असा करण्याचा खांग्रेस आटोकाट प्रयत्न करीत आहे. काही ठराविक डावे निधर्मांध वगळता विद्यार्थ्यांच्या बाजूने कोणीच बोलत नाही. वाहिन्यांवर मुद्दाम लष्करातील माजी अधिकार्‍यांना चर्चेत बोलावून त्यांचे मत विचारले जात आहे व ते सर्वजण विद्यार्थ्याना सपाटून शिव्या देत आहेत. जेएनयु प्रकरणात अडचण झाल्याने काल पुन्हा एकदा रोहित वेमुलाचा मुद्दा उकरून काढण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात फारसे यश आले नाही. स्मृती इराणींचे कालचे भाषण बघून काही महिन्यांपूर्वी सुषमा स्वराज यांनी संसदेत ललित मोदी प्रकरणावरून केलेल्या अत्यंत आक्रमक आणि घणाघाती भाषणाची आठवण झाली.

सासू सून मालिकांमधे रस नसल्या मुळे त्यांचा टी व्ही वरचा परफॉर्मन्स माहीत नाही, पण आजचे भाषण मूद्देसूत, पारिणामकारक वाटले. कॅमेऱ्यासमोर एखाद्या कलावंताचा वकीलाच्या भूमीकेतला अभिनय असल्या सारखा पण उत्स्फुर्त .

तर्राट जोकर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. >> तुम्ही भाजप, संघाचे प्रवक्ते म्हणून इथे उत्तरे देणार का ते सांगा आधी. >> काय आहे की नंतर लोक कोपरे शोधतात लपण्यासाठी. आता काय सांगायचं राव ! भाजप्/संघ यांचं नाव तुम्ही घेतलंय. त्यामुळे लपायचे कोपरे शोधायची वेळ माझ्यावर येणार नाही हे नक्की. हिंदूंची प्रवक्तेगिरी करायची असं मी माझ्यापुरतं ठरवलंय. संघ/भाजप जोवर हिंदूहिताची भाषा करताहेत तोवर मी त्यांच्या पाठीशी उभा असेन. आ.न., -गा.पै.

देशाचे पूर्व गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री पी. चिदंबरम यांच्या मते "अफझल गुरूचा संसदेवरील हल्ल्यात सहभाग असावा की नाही या बद्दल शंका आहे. या केसमध्ये चुकीचा निर्णय दिला गेला. त्यावेळेला ते स्वतः सरकारमध्ये मंत्री असल्याने त्यांना या गोष्टीचा विरोद करता आला नाही कारण सरकारनेच ही केस टाकली होती." हे आता स्वतःच भाग असलेल्या सरकारविरुद्ध बोलत नाहीयेत तर देशाच्या सुप्रीम कोर्टाविरुद्ध पण बोलत आहेत. तारतम्य तर सुटलेच आहे पण एकूणच सगळे काँग्रेसी भंजाळले आहेत बहुतेक. बातमीचा दुवा

In reply to by ट्रेड मार्क

राजकिय फायदा उपटण्यासाठी कोणी किती नीच थराला जाऊ शकतं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस नेत्यांचं हे वर्तन. अश्लाघ्य, नीतीमत्ताहिन.

In reply to by तर्राट जोकर

+१ २०१४ मध्ये केंद्रातील व नंतर अनेक राज्यातील सत्ता हातातून गेल्यापासून खांग्रेसी अतिशय बिथरले आहेत. मोदींच्या प्रत्येक गोष्टीला विरोधासाठी विरोध करण्यासाठी आता त्यांनी न्यायालयात गुन्हा सिद्ध झालेल्या अतिरेक्यांच्या पाठीशी उभे रहायचे ठरविले आहे. एकीकडे चिदंबरम अफझल गुरूला झालेल्या शिक्षेबद्दल संशय व्यक्त करीत आहेत, तर दुसरीकडे युवराज देशद्रोही घोषणा देणार्‍यांच्या पाठीशी उभे रहात आहेत तर तिसरीकडे मणीशंकर अय्यर, खुर्शिद यांच्यासारखे खांग्रेसी पाकिस्तानमध्ये जाऊन मोदींना घालवा असे माध्यमांना सांगत आहेत. खांग्रेसी एक भयंकर खेळ खेळत आहेत. मोदींना विरोध करण्यासाठी पाकिस्तान, अतिरेकी, देशद्रोही इ. बरोबर साटंलोटं करणे देशाला महागात पडणार आहेत.