मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर

चेक आणि मेट · · काथ्याकूट
नमस्कार मंडळी, (पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.) तर मुद्दा असा कि, डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती. तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!! दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे?? आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो. तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)

वाचने 59573 वाचनखूण प्रतिक्रिया 331

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 13/02/2016 - 20:58
Rahul Gandhi added his voice to the debate saying that while 'anti-India sentiment is unacceptable, debate is part of a democracy. He said: "While Anti-India sentiment is unquestionably unacceptable, the right to dissent & debate is an essential ingredient of democracy.
पप्पू अजून बरेच काही बोलला. त्याची खालील वाक्ये पहा. A youngster expressed himself and the government says he is an anti-national. The most anti-national people are the people who are suppressing the voice of this institution," Gandhi told students. म्हणजे पप्पूच्या मतानुसार "तो कन्हैय्या कुमार किंवा तो खलिद नावाचा विद्यार्थी आपले विचार प्रकट करीत होता व सरकारने त्याबद्दल त्याला देशद्रोही ठरविले आहे. खरे देशद्रोही ते आहेत जे या संस्थेतील विद्यार्थ्यांचा आवाज दडपून टाकत आहेत." याचा सरळ अर्थ असा होतो की ते घोषणा देणारे विद्यार्थी देशद्रोही नसून त्यांना अटक करणारे देशद्रोही आहेत. "They do not understand that by crushing you they are making you stronger," he added. ABVP workers showed black flags and raised slogans against Gandhi when he visited the campus. म्हणजे पप्पूच्या मतानुसार त्यांना दडपून टाकणे हे त्यांना अधिक बळकट करणारे आहेत. काही दिवसांपूर्वी हैद्राबाद विद्यापीठात रोहीत वेमुला व त्याच्या काही मित्रांनी अशी घोषणाबाजी केली होती की "तुम्ही जितके याकूब मेमन माराल, प्रत्येक घरातून याकूब मेमन पैदा होतील." रोहीत वेमुलाची ही वाक्ये आणि पप्पूची वरील वाक्ये एकसारखीचा आहेत. http://timesofindia.indiatimes.com/india/Rahul-Gandhi-visits-JNU-says-those-suppressing-institutions-voice-are-anti-national/articleshow/50976332.cms पप्पूची अजून काही मुक्ताफळे - When we fought the British, we fought them for our land and we fought them for our voice I came here to tell you, there are more than billion people in country who believe what you believe in & standing right behind you. The most important thing we have is the voice of our people." हा तर उघडउघड देशद्रोही विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे. http://www.dnaindia.com/india/report-afzal-guru-row-rahul-gandhi-set-to-visit-jnu-campus-2177409

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 14/02/2016 - 15:01
जरा घटनाक्रम पाहूया. (१) ९ फेब्रुवारीला जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाने आंदोलन व घोषणाबाजी केली. फाशी झालेला अतिरेकी अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. काश्मिरच्या स्वातंत्र्याच्या बाजूने घोषणा देण्यात आल्या. केरळ व बंगालमधील कोणाचीही मागणी नसताना 'केरळ मांगे आझादी', 'बंगाल मांगे आझादी' असल्या घोषणा देण्यात आल्या. अफझल गुरूच्या फाशीचा उल्लेख न्यायव्यवस्थेने केलेला खून असा करण्यात आला. भारताच्या बरबादीच्या घोषणा देण्यात आल्या. यांच्यात उजव्या कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा यांच्या मुलीचाही समावेश होता असे बोलले जाते. केरळ, बंगाल, काश्मिर इ. चा उल्लेख असल्याने हे विद्यार्थी काश्मिरमधील फुटिरतावादी व कम्युनिस्ट यांच्याशी संबंधित असावे. (२) देशद्रोही घोषणा दिल्याबद्दल २-३ दिवसांनी विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. नंतर अजून ७ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. (३) कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीचा अजिबात विरोध वा निषेध न करता त्यांना अटक करण्याचा निषेध केला. विद्याथ्यांऐवजी पोलिसांना व केंद्र सरकारलाच शिव्या घातल्या. (४) केजरीवाल व राहुल यांनी वरील विद्यार्थ्यांचा अगदी गुळमुळीत शब्दात सुद्धा निषेध केला नाही. नंतर गुळमुळीत शब्दात "भारतविरोधी भूमिका चालणार नाही", परंतु वैचारिक वादविवाद हा मूलभूत हक्क आहे" असे म्हणून विद्यार्थ्यांच्या अटकेचा निषेध केला. (५) हे स्पष्ट दिसत आहे की, (अ) केजरीवाल व राहुल यांना विद्यार्थ्यांनी काही चुकीचे केले आहे हे मान्यच नाही. अन्यथा त्यांनी विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीचा निसंदिग्ध शब्दात निषेध व विरोध केला असता. त्याबद्दल त्यांनी मौन पाळले आहे. (ब) देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या अटकेला त्यांच्या विरोध आहे. या विद्यार्थ्यांच्या देशद्रोह त्यांना देशद्रोह न वाटता the right to dissent & debate वाटतोय. या देशद्रोही विद्यार्थ्यांवर कारवाई करणारेच त्यांना देशद्रोही वाटत आहेत. (क) 'अ' व 'ब' वरून स्पष्ट दिसते की देशद्रोह्यांना या दोघांचा पाठिंबा आहे व देशद्रोह्यांविरूद्ध कोणतीही कायदेशीर करण्यास त्यांचा विरोध आहे. कॉंग्रेस हा सुरवातीपासून दहशतवादी, देशद्रोही यांचा भक्कम पाठिराखा आहे. आता त्यात केजरीवालही सामील झाले आहेत. असले नेते भारतात आहेत हेच भारताचं दुर्दैव!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विवेकपटाईत 13/02/2016 - 22:01
प्रत्येक राजनेता आपल्या संपविण्याचा प्रयत्न करतो, त्यात काही गैर नाही. प्रयत्न अयशस्वी झाल्यास गादी हातातून जाते. बाकी इशरत आतंकवादी होती हे १००% सत्य आहे.

In reply to by विवेकपटाईत

भंकस बाबा 14/02/2016 - 09:24
मी काही मोदीभक्त नाही, पण जर राहुल गांधीवर टीका केलि तर त्या व्यक्तीला भाजपाच्या टोळीतील लांडगा मानला जाते,पर्यायाने मोदीभक्त! असतील मोदी फेकू,पण त्यांच्या बोलण्यात कुठेही भारतद्वेष दिसत नाही. पण पप्पुचि भाषणे बघितली की त्याच्या व् कॉंग्रेसवाल्यांच्या अकलेची कीव कराविशि वाटते. पप्पू आज सरळसरळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी जेएनयू मधील देशद्रोहयाचे समर्थन करत आहे. खरोकर हां माणूस जर पन्तप्रधान म्हणुन जर समोर आला तर जगासमोर एक मोठा विनोद म्हणुन भारताची प्रतिमा तयार होईल.

In reply to by भंकस बाबा

नाना स्कॉच 14/02/2016 - 09:36
अजुन एक जोड़तो पुस्ती, हे सगळे करुन म्हणजे जेएनयु मधील विद्यार्थ्यांना (?) पाठिंबा देऊन तो छोटा भीम स्वतःची कबर खोदतोय. त्याला शिव्या दिल्यास लोक भाजपाई समजतात तर समजू दे बापडा! लोकांची लेवलच तितकी!! आपण आपल्या मनात नीरक्षीर (आमच्या बाबतीत नीरस्कॉच) असणे बरे! (स्कॉच भक्त) नाना

प्रदीप साळुंखे 13/02/2016 - 11:31
असो, पण देशात जे राष्ट्रविरोधी वातावरण आहे त्यामुळे लोकांचा उद्रेक बाहेर येऊ नये म्हणजे मिळवलं,लोक रस्त्यावर उतरले तर काय होईल? ISI चे एजंट काय सापडतात आणि ते इसिस चे नेटवर्क चालवाणारे काय सापडतात!! आता फक्त ABVP वाले उतरलेत. आणि लोक जेव्हा रस्त्यावर उतरतील त्यावेळीही मोदीविरोधक मोदींनाच जबाबदार धरतील. नालायकपणाला पण एक लिमिट असतं,मी स्वतः मोदींच्या धोरणांचा कधीकधी विरोध करतो,तोरसेकरांच्या ब्लाॅगखाली प्रतिसाद देतो पण माझे प्रतिसाद ते प्रकाशित करत नाहीत. म्हणून दांभिक सेक्युलरांनी थोडं आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे. या अशा वातावरणामुळे माझ्यासारख्या मोदीभक्त नसणार्यांना मोदीभक्त व्हावे का असे वाटत आहे. आणि यामध्ये मोंदींचा काय संबंध म्हणाल तर संबंध आहे. 282 जागा येवून पूर्ण बहुमत असणे आणि जागतिक राजकारणात त्यांची सुधारलेली प्रतिमा हे अजून काहींना पचत नाहीये. धन्यवाद (नाईलजाने झालेला मोदीभक्त)

अनुप ढेरे 13/02/2016 - 11:55
याविषयावर शेखर गुप्ता यांचा हा लेख वाचनीय आहे. http://www.business-standard.com/article/opinion/shekhar-gupta-the-great-indian-hypocrisy-116021201208_1.html इशरत जहान अतिरेकी होती यात काही संशय नसावा. मुख्य मुद्दा तिला मारण्याचा आहे. त्याला गुप्ता एन्काऊंटर न म्हणता कंट्रोल्ड किलिंग म्हणतात. भारताचं हे धोरण पंजाब, कश्मिरसकट अनेक ठिकाणी खूप वर्षापूर्वीपासून आहे. त्यांचा मुख्य मुद्दा हा की २००४साली, कॉंग्रेसचं सरकार आणि आयबी-चीफ असताना झालेली. ती अनेक वर्षांनंतर का बाहेर आली. याबाबत ते म्हणतात की जेव्हा मोदी हा कॉंग्रेसच्या सत्तेला धोका म्हणून पुढे आले तेव्हा याचं पद्धतशीरपणे राजकारण करण्यात आलं. हेडलीच्या पार्डन बद्दल त्याने सरकारशी केलेलं हे डील आहे असं काही लोक म्हणतायत. त्याला उत्तर ते असं देतात की अमेरिकेच्या कायद्यानुसार त्याने अमेरिकेतली शिक्षा (३५ वर्ष) भोगून झाल्याशिवाय त्याला एक्सट्रडाइट करता येतच नाही. सो भारताने ३५वर्ष थांबून त्याला इथे आणायचं का आत्ता त्याला माफी देऊन त्याच्याकडून २६/११बद्द्ल साक्ष देऊन घ्यायची असे पर्याय होते.

अनुप ढेरे 13/02/2016 - 12:00
अवांतर: एका बाजूला एफ्टीआयाय/सेंसर बोर्ड/बीफ बॅन वगैरे असहिष्णुता आणि दुसर्‍याबाजूला राजकीय फायद्यासाठी अतिरेक्याला हिरो बनवणे, गुप्तहेर यंत्रणेला राजकारणात आणणे, अमाप भ्रष्टाचार, उद्योगप्तींना बोगस लोन्स देऊन सरकारी बँकांची वाट लावणे. माय चॉइस इज क्लीअर.

In reply to by इरसाल

मृत्युन्जय 13/02/2016 - 14:25
ते कॉम्ग्रेसच्या भ्र्ष्टाचाराबद्दल बोलत आहेत. त्याबद्दल संभ्रम असण्याचे काही कारण दिसत नाही. युपीए २ वर खोर्‍याने भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

लिओ 13/02/2016 - 15:39
भाऊ तोरसेकरांचा ब्लोग इशरत जहान अतिरेकी होती तर झालेले एन्काऊंटर हे योग्यच म्हणावे भलेहि बळजबरीने म्हणालो तरी चालेल, कसाबने बिर्याणी खाल्ली, इशरत जहानेपण खाल्ली असती. पण त्यावरुन सध्याचे पन्तप्रधान/गृहमंत्री यशस्वी / भले / निष्कलन्कित व तत्कालिन पन्तप्रधान/गृहमंत्री कलन्कित / बावळट / अयशस्वी असे म्हणणे चुकिचे. मुद्दा थोडा भरकटेल एक गोष्ट नमुद करावीशी वाट्ते. आरुशी तलवार हत्याकान्ड घटनेवर आधारित चित्र्पट "तलवार" पाहिला. एके ठिकानी तलवार यांच्या निकटच्या व्यक्तिने लिहिले कि ज्याना आरुशी तलवार हत्याकान्ड सम्बधीत कागदपत्रे वाचली नाहित त्यानी हा चित्र्पट नक्कि पहावा. "तलवार" चित्र्पट बनवताना या केसची कागदपत्रे संदर्भ पटकथेत वापरला असे वाचले. "तलवार" चित्र्पटात पाहिले स्वत:च्या फायदयासाठी सी बी आय अधिकारी खुनाचे कारण काय यावर पहिल्या अधिकार्याने केलेला तपास गुंडाळुन दुसर्या अधिकार्याने केलेला तपास पुढे रेटला जातो. या चित्र्पटात पाहिले कि अधिकारी स्वत:च्या फायद्यासाठी काय करु शकतात. कसे दुसर्या अधिकारयाला अडकवु शकतात. छ्ळु शकतात. इशरत जहान केसमध्ये तत्कालिन "पन्तप्रधान/गृहमंत्री" यांची भुमिका तपाविशी असे ज्यांना वाटते त्यांनी सांगावे कि तत्कालिन युती "राज्य" सरकारने शस्त्र बाळगणाऱ्या अभिनेत्याला "टाडा" न्यायालयातुन कसा जामीन मिळवुन दिला, हे सांगावे. जर सर्व आरोपी जेलमध्ये सड्त ठेवले असते तर एक चांगले उदाहरण झाले असते. देशविघातक काम तेव्हा झाले आणि आजही झाले आहे. सध्या " न्यायप्रविष्ट " हा शब्द अधिकारी / राजकारणी लोकाना उसन्ती घेण्यासाठी / मुखवटा बदलण्यासाठी केलेले "कवच" आहे. ++++++++++++++++++++++++++++ नेहरु विद्यापीठ "लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का" कार्यक्रम घेतले असते का हे महत्वाचे नाही. नेहरु विद्यापीठात जे झाले त्यावरुन पाकिस्तान्यांची कशी जिरवता येइल असे काही तरी करावे, आयते निमित्त मिळाले आहे

In reply to by लिओ

मोगा 14/02/2016 - 09:34
तो अभिनेता निरागस बाळ होता असा टाहो एका वाघोबाने फोडला होता , म्हणुनच तो निर्दोष सुटला होता.

In reply to by मोगा

भंकस बाबा 14/02/2016 - 12:46
गल्लीतली कुत्री स्वतःला सिंह समजायला लागली आहेत. या जेएनयूच्या गद्दाराना धड़ा शिकवायला वाघोबाच् पाहिजे होते

In reply to by भंकस बाबा

मोगा 14/02/2016 - 16:17
स्वतःच्या स्वर्थासाठी कधी कुणाचे पोट फाडणे , तर कधी संजय निरागस हो ! असे सूर आळवणे ..... तुमच्या इतिहासातील सगळ्याच वाघोबानी हेच केले आहे... ते पोट फाडायला गेले की तुम्हाला ते शूर वाटतात व तह करायला गेले की तुम्हाला ते मुत्सद्दी वाटतात. तुमचे वाघोबा तुम्हाला लखलाभ ! ( लखोबा लाभ ! )

In reply to by मोगा

स्वतःच्या स्वर्थासाठी कधी कुणाचे पोट फाडणे
@मोगा, हा उल्लेख नेमका कुणाबद्दल आहे ? शिवाजी महाराजांबद्दल नसावा अशी अपेक्षा करतो पण त्यांचेच आपल्या रिकाम्या जागेत असेल तर शिवाजी महाराज स्वार्थी कसे होते हे दहा वाक्ये लिहून संदर्भासहीत स्पष्ट करु शकाल ? आपण शिवाजी महाराजांची रयतेप्रती निष्ठा व्यवस्थीत अभ्यासली आहे का ? आपल्या प्रत्येक कृतीतून रयतेप्रति निष्ठा ठेवणार्‍या एका राष्ट्रपुरुषास आपण स्वार्थी नमेके कोणत्या आधारावर ठरवू इच्छिता ?

तर्राट जोकर 14/02/2016 - 15:10
ह्याबद्दल काय? http://www.thehindu.com/news/national/other-states/hindu-group-observes-republic-day-as-black-day/article8154921.ece http://timesofindia.indiatimes.com/city/meerut/Hindu-outfit-observes-Black-Day-on-R-Day-eve/articleshow/50721546.cms

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान 14/02/2016 - 18:30
तजो, गणराज्य दिन म्हणून २६ जानेवारी निवडण्यामागे बराच गोलमाल आहे. २६ जानेवारी १९३० रोजी काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित केला. म्हणून स्वातंत्र्योत्तर काळी २६ जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस म्हणून जाहीर झाला. आता भारतीय प्रजासत्ताकाचा ब्रिटीशांच्या उच्चाटनाशी काहीही संबंध नाही. मग दोहोंची मोळी कशाला बांधायची? ब्रिटीशांनंतर काँग्रेसच्या हातात सत्ता आली म्हणून काँग्रेसच्या तारखेला किती महत्त्व द्यायचं? २६ जानेवारीला विरोध म्हणजे प्रजासत्ताकास विरोध नव्हे. नेमका हाच दिवस ऑस्ट्रेलियामधल्या १७८८ सालच्या ब्रिटीश आगमनाचा दिवस म्हणून ऑस्ट्रेलिया दिन असा साजरा केला जातो. काय भानगड आहे? ब्रिटनच्या दोन्ही वसाहतींचा राष्ट्रीय दिन एकंच कसा काय? हा योगायोग खचितच नाही. यावरून जपान्यांनी ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करल्याचा १५ ऑगस्ट १९४५ हा ब्रिटीशांचा विजयदिन भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून नक्की केला गेल्याची आठवण होणे अपरिहार्य आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर 14/02/2016 - 18:49
Mr. Sharma, who was quite categorical in declaring that he didn't believe in Constitution of India, told The Hindu: "The purpose of my life and that of millions of people like me who are present in this country, is to make this country a Hindu Rashtra. Nobody can stop this country from becoming a Hindu Rashtra". ह्याबद्दल काय?

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान 14/02/2016 - 21:08
तजो, >> ह्याबद्दल काय? ह्यात काय सांगण्यासारखं आहे? ज्यांचा घटनेवर विश्वास नाही त्यांनी घटना सनदशीर मार्गाने बदलण्याचा प्रयत्न चालू ठेवलाय. आ.न., -गा.पै.

In reply to by तर्राट जोकर

चेक आणि मेट 15/02/2016 - 13:33
"भारत कि बर्बादी तक जंग रहेगी" "पाकिस्तान झिंदाबाद" अफजल गुरू हुतात्मा होता वगैरे वगैरे ह्याबद्दल आपले म्हणणे काय सांगा? मग त्यावर बोलू.

In reply to by तर्राट जोकर

चेक आणि मेट 15/02/2016 - 14:28
अडचणीच्या प्रश्नाला बगल देणारा प्रतिसाद
मलाही असचं काही म्हणायचंय! हिंदूराष्ट्र वगैरे कूचकामी मुद्दे आहेत,त्यांची मजल संविधानाच्या/संसदेच्या वर जाणार नाही. पण संसदेवर हल्ला करणार्यांवर प्रेम करणारे आणि देशविरोधी घोषणा देणारे यांच्याबद्दल तुम्ही मत मांडले नाही याचे आश्चर्य वाटले.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर 14/02/2016 - 18:51
Bharat Rajput, district president, Hindu Mahasabha, Meerut, said, "We do not believe in the Constitution of India and have been protesting against it for the past 50 years. Secularism doesn't exist in India and that is why we mourn the Constitution. When India was divided, Pakistan was given the title of Islamic state then why was India not given the title of a Hindu Rashtra? It is this Constitution, which has failed to recognize India as a Hindu state that all of us are against."

In reply to by गामा पैलवान

मोगा 14/02/2016 - 19:08
भारतीय स्वातंत्र्याचा अन संघाचाही संबंध नाही. मग मंत्रीमंडळ त्यांचे लेक्चर ऐकुन का हलते ? काँग्रेसमुक्त लंडनात आता सुखात रहा !

मोगा 14/02/2016 - 16:24
आम्ही भारत पाक युद्ध / देशद्रोह वगैरे काय मानत नै . हस्तिनापुरनं इंद्रप्रस्थाला गिळायचं की यानी त्याना , हे त्यांचं त्यानी ठरवावं. अखंड हिंदुस्तान , अखंड पाकिस्तान , अखंड बुद्धस्थान ..... अखंड रिपब्लिकस्तान इ इ .... सोक्षमोक्ष लावा एकदाचा..... जनतेला त्रास कशापै ? हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे.

In reply to by मोगा

उगा काहितरीच 14/02/2016 - 17:03
हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे.
हे प्रचंड खटकलं हनुमंतप्पा आणी कसाबला एकाच पारड्यात तोलनं . काय चाल्लय काय ? एक व्यक्ती जी की भारतीय सैन्यात जायची अवघड परीक्षा पास करून , त्याहीपेक्षा अवघड ट्रेनिंग घेऊन तुमच्या माझ्यासारख्या लोकांची रक्षा करण्यासाठी इतक्या प्रतिकूल परिस्थितीत तैनातीत होते ती व्यक्ती . अन् ज्या व्यक्तीने दुसऱ्या देशात जाऊन शेकडो निरपराध लोकांना काहीही कारण नसताना मारून टाकलं ज्याची ती व्यक्ती दुसरीकडे . अहो काय तुलना तरी होऊ शकते काय ? एका व्यक्तीचे निधन झाले. त्या व्यक्तीला मेल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात अन् एका व्यक्तीला शिस्तबद्ध रीतीने खटला चालवून फाशी दिली जाते , त्या व्यक्तीचा मृतदेह पण त्या देशाची सरकार घेत नाही . अशा दोन व्यक्तींची तुलना कशी काय करू शकता तुम्ही ? खरंच आता सांगणार तरी काय ? मोगासाहेब, तुम्हाला नेमकं अपेक्षित तरी काय आहे? भारतातच रहात असता का आपण ? जाऊद्या सभ्यतेच्या पडद्याआडून यापेक्षा जास्त नाही लिहीता येणार मला ! भारतात असे पण लोक आपले विचार पण मांडू शकतात यातच भारत किती सहिष्णु आहे ते दिसून येतेय.

In reply to by उगा काहितरीच

बेकार तरुण 15/02/2016 - 08:12
मोगाजी, तुम्ही हा प्रतिसाद देताना रागाचीच पातळी गाठलीत ते पण मोदी विरोध करायचा हे ठरवुन पुढच सगळ बोलतात (जे बोलतात ते बरोबर का चूक हे ही भान नसते, भान असते ते फक्त आपण बोलत आहोत ते मोदी विरोधी आहे का नाही याचे) तसाच निर्बुद्ध आणी अतिशय विकृत प्रतिसाद आहे हा तुम्ही कोणाचीही बाजु घ्या, कितीहि विचार करा पण निरागस लोकांवर क्रुरपणे गोळ्या चालवणारा आणी तुमच्या आमच्या सारख्या लोकांची सुरक्षेसाठी आणि देशासाठी अशक्य अवघड परिस्थीतीत लढणार्‍या जवानाची तुलना करणेहि अतिशय कोत्या मनोवृत्तीचे द्योतक आहे. भयंकर वाईट वाटले आपला प्रतिसाद वाचुन. तुम्हास तुमचे मत आहे, त्याचा आदरहि आहे, पण म्हणुन ईतरांचा विषेशतः जवानांच्या बलिदानाचा अनादर करु नये हि विनंती.

In reply to by मोगा

डॉ सुहास म्हात्रे 14/02/2016 - 18:35
हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे. या एका वाक्यातच विचारसरणीची प्रत कळून येते ! "पहिल्या शूर वीराने तुमच्या-आमच्या संरक्षणाचे काम करताना आपले बलिदान दिले आणि इतर दोन्हीं भेकडांच्या कारवायांत कर्मधर्मसंयोगाने तेथे हजर असतो तर तुम्ही-आम्ही कोणीही बळी पडू शकलो असतो"... इतकेही भान (सु?)शिक्षित म्हणवणार्‍याने ठेवले नाही तर अवस्था शोचनिय आहे आणि शुभेच्छांची नक्कीच गरज आहे ! :(

In reply to by मोगा

मोगा 14/02/2016 - 19:05
अफगाण ते शीलंका सर्व लोक एकाच प्रदेशाचेच आहेत. कुणीही युद्धात मरु नये. कोणच्ञाच देशाचा. आनंदात सर्व १०० वर्षे जगोत.

In reply to by मोगा

उगा काहितरीच 14/02/2016 - 19:32
तुम्ही म्हणताल हो , "हे विश्वची माझे घर " वगैरे . आम्ही नाहीत ना तेवढे थोर. "आमच्या" (मानत असले तरच "आपल्या") देशात येऊन शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या व्यक्तीची तुलना आमच्या देशातल्या शहिदासोबत तुलना नाही चालत ना आम्हाला . हवे तर म्हणा आम्हाला संकुचित !

In reply to by मोगा

भंकस बाबा 14/02/2016 - 23:35
पाजी माणूस आहात. ज्याला शहीद आणि अतिरेकी यातील फरक कळत नसेल तर थू त्याच्या जिंदगानिवर, आयडिला पंख लागले तरी चालेल पण या माणसाचा निषेध करताना मी यापुढे तारतम्य बाळगणार नाही.

In reply to by भंकस बाबा

होबासराव 15/02/2016 - 14:38
आम्हि एक दोन वेळा तसा प्रयत्न केला आहे पण्..असो...इग्नोर मारो..घाणित दगड माराल तर ति आपल्यावरच उडते.

In reply to by होबासराव

सुबोध खरे 15/02/2016 - 14:47
एक इंग्रजीत म्हण आहे डूकराबरोबर चिखलात कुस्ती खेळू नये. थोड्या वेळाने आपल्या लक्षात येते कि आपले कपडे घाण होतात आणि डुकराला तर मजा येते

In reply to by मोगा

नाना स्कॉच 15/02/2016 - 14:54
पोकळ बांबुचे वगैरे वगैरे वगैरे ! लै काय काय डोक्यात आले होते पण ह्यांची तितकीही लायकी नाही

In reply to by मोगा

सुबोध खरे 15/02/2016 - 15:14
हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे. मोगा जी १८००० फुटावर -५० से तापमानाला "दोन" तास राहून पहा. आणि मग अशी मुक्ता फळे उधळायचा विचार करा.

In reply to by मोगा

माहितगार 16/02/2016 - 00:00
आम्ही भारत पाक युद्ध / देशद्रोह वगैरे काय मानत नै ....जनतेला त्रास कशापै ?...आमची सर्वानाच सहानुभूती आहे.
@ मोगा, राजकारण कदाचित विरोधीपक्षावर टिकाही करावी, तुम्हाला मोदी किंवा भाजपा आवडत नसेल तर तुम्ही त्यांच्यावर टिका करण्यास स्वतंत्र आहात. जनतेला होणार्‍या त्रासाची आपल्याला खरेच चिंता असेल तर आपण जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ इच्छित देश या संकल्पनेच्या विरोधी असणार नाही. वसुधैव कुटूंबम सर्वांनाच हवे आहे, समानतेच्या तत्वावर सगळे विश्व एकत्र येण्यास तयार असेल, भारतीयांच्या लेजिटीमेट हितांची न्याय्य काळजी घेतली जाणार याची व्यवस्थित खात्री झाल्यास भारतीय नक्कीच एक पाऊल इतरांच्या पुढे टाकतील पण जो पर्यंत तशी खात्रि नाही तो पर्यंत भारतीयांच्या हिताची काळजी घेण्यास देश हि संकल्पना महत्वाची राहते, भारतीयांच्या लेजिटीमेट न्याय्य हिताची काळजी घेण्याच्या मध्ये जे अडथळे असतील ते देश विरोधी असू शकतील, त्यामुळे जनतेला त्रास देशविरोधी गतीविधींमधून होतो. २६/११ ला आपण व्हिटी स्टेशन वर कसाबच्या समोर असता तर ? आपण आपल्या विचारांचे असे प्रदर्शन करू शकला असता काय ? किंवा २६/११ला तुमच्या कुटुंबातील एखादी प्रिय व्यक्ती कसाबच्या गोळीचा शिकार झाली असती तरीही तुम्हि हेच लिहिले असते का ? या प्रश्नांचे उत्तर इथे कुणालाही आजीबात देऊ नका उत्तरे देण्याच्या फंदात पडू नका हे प्रश्न स्वतःच्या मनाला शांतपणे विचारा तेवढे पुरेसे असेल. देशवासीयांना सुखाची झोप मिळावी म्हणून देशाच्या सिमेवर स्वतःचा प्राण लावणारा हनुमंतप्पा आणि बाकी भारतीय सैनिक आणि कसाब यांची आपण केलेली तुलना अत्यंत बेजबाबदारपणाची नाही का हे एकदा स्वतःच्या विचारांमधील द्वेषभावना बाजूला ठेऊन रिव्हिजीट करावे.

आरोह 14/02/2016 - 19:28
अशा फुटकळ आणि फालतू प्रतिसादांना प्रतिवाद करून काय उपयोग. नसता शक्तिपात.. पप्पू च्या बौद्धिक दिवाळखोरी बद्दल नवीन काय बोलणार... आणि डावे ..त्यांचे तर सगळे तत्वज्ञानच वेगळे... आपल्या देशात लोकशाहीचा डोस जरा जास्तच झालाय असे खेदाने म्हणावेसे वाटते. आणि उरलेली कसर मीडिया भरून काढते.

ओल्ड मोन्क 15/02/2016 - 10:55
या सर्व प्रकरणाची अजून एक बाजू आजच्या लोकसत्ता तील अग्रलेखात मांडली आहे. त्यातील खालील मुद्दा महत्वाचा वाटतो … http://www.loksatta.com/aghralekh-news/police-arrest-jnu-students-union-president-kanhaiya-kumar-3-1202472/ भारतविरोधी घोषणा दिल्या म्हणून या सर्व विद्यार्थ्यांवर सरकारने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. परंतु त्यातून केंद्रीय गृहमंत्र्यांचे अज्ञानच प्रगट झाले. याचे कारण १९६२ साली सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निकालात राष्ट्रद्रोह म्हणजे राष्ट्रविरोधी कृती, केवळ शब्द नव्हेत असे नि:संदिग्धपणे स्पष्ट केले आहे. याचा अर्थ एखाद्याने देशाविरोधात भाषण केले, घोषणा दिल्या वा सरकारवर टोकाची टीका केली तर तो राष्ट्रद्रोह होत नाही. असे करणाऱ्याची कृतीदेखील तशी असावी लागते. पुढे २०११ साली एप्रिल महिन्यात विनायक सेन प्रकरणात ही बाब सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा स्पष्ट केली. नक्षलवादी तत्त्वज्ञान आणि नक्षलवादी यांच्याविषयी सहानुभूती बाळगली म्हणून सेन यांच्यावर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तो सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही आणि सेन यांना मुक्त करावे लागले. ‘आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो. सेन हे नक्षलवादी तत्त्वज्ञानाचे समर्थक असतीलही, परंतु म्हणून ते देशद्रोही ठरत नाहीत’, असे सर्वोच्च न्यायालयाने त्या वेळी सरकारला सुनावले. त्याचमुळे याही वेळी विधिज्ञांनी सरकारला धोक्याचा इशारा दिला असून जेएनयूतील विद्यार्थ्यांची कृती देशद्रोह ठरत नाही, असे स्पष्ट केले आहे. सरकारने त्यांचे तरी ऐकावे.

In reply to by ओल्ड मोन्क

गामा पैलवान 15/02/2016 - 12:56
ओल्ड मोन्क, भारतविरोधी घोषणा देणे हे प्रक्षोभक भाषण करण्यासम आहे. त्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावता येत नसला तरी प्रक्षोभक भाषणासाठी अटक करता येईल. किंबहुना तशीच झालेली दिसतेय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नाना स्कॉच 16/02/2016 - 08:22
कलम १५३-A लागले आहे की नाही ते कन्फर्म करायला लागेल पण मुख्य कलम बहुतांशी कलम १२४-A आहे असे प्रथमदर्शनी वाटते

नाना स्कॉच 15/02/2016 - 13:45
मित्रपक्ष पीडीपीचे म्हणणे एकंदरित असे आहे ह्या बाबतीत तेव्हा अफज़ल गुरुची फाशी म्हणजे विडंबना (travesty) आहे असे मानणाऱ्या पक्षा सोबत सरकार ने राहु नये असे एक भारतीय म्हणून मला वाटते, अन असेच झाले तर बीजेपी च्या जम्मू मधील हक्काच्या सीट्स सुद्धा जातील हे नमूद करावे वाटते. शिवाय आजचा गिरीश कुबेर ह्यांचा अग्रलेख वाचता, पीडीपी ला एक न्याय अन जेएनयु च्या पोरांना एक न्याय जर सरकार लावणार असेल तर ह्या कुबेरी हलकट वृत्तीला जाब विचारायचा नैतिक अधिकार मी गमावून बसेल ही भीती वाटते असो!

In reply to by नाना स्कॉच

चेक आणि मेट 15/02/2016 - 14:01
स्वतःला भारताचा भाग न माणणारे तथाकथित काश्मिरवासीयांना/पक्षांना अफजल गुरूची फाशी ही विडंबना आहे हे वाटणे स्वाभिवकच आहे. आणि राहिला प्रश्न अशा पक्षाबरोबर सरकारने राहण्याचा,तर तो काश्मिरमध्ये पाय पसरण्याचा भाजपचा कूटनितीक डाव आहे.
पीडीपी ला एक न्याय अन जेएनयु च्या पोरांना एक न्याय जर सरकार लावणार असेल तर ह्या कुबेरी हलकट वृत्तीला जाब विचारायचा नैतिक अधिकार मी गमावून बसेल ही भीती वाटते
कलम 370 बद्दल आपले काय म्हणणे आहे? ते उठवण्याचा प्रयत्न याच सरकारने केला.पण तो होऊ दिला नाही.कोणी होऊ दिला नाही बरे??

In reply to by चेक आणि मेट

कपिलमुनी 15/02/2016 - 14:16
इतरांची ती शय्यासोबत आणि भाजपची कूटनिती ! पीडीपीचे धोरण आणि अफझलला सपोर्ट सर्वांना माहिती आहे. त्याबद्दल चकार शब्द न काढता इकडे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे दुटप्पी आहे. या विद्यार्थांना अटक झाली हे योग्य ! आणि शिक्षाही व्हायलाच हवी. फक्त भाजपाने नैतिकतेचे ढोंग बंद करावे .

In reply to by कपिलमुनी

चेक आणि मेट 15/02/2016 - 14:52
या विद्यार्थांना अटक झाली हे योग्य ! आणि शिक्षाही व्हायलाच हवी.
याबद्दल धन्यवाद.
इतरांची ती शय्यासोबत आणि भाजपची कूटनिती ! फक्त भाजपाने नैतिकतेचे ढोंग बंद करावे .
सहमत.
त्याबद्दल चकार शब्द न काढता इकडे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे दुटप्पी आहे.
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही. त्यासाठी काश्मिरच्या मुद्द्याचा अभ्यास हवा.तो पूर्ण विषय संवेदनशील आहे.नकाशामध्ये दाखवण्यापुरताच काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे.

In reply to by चेक आणि मेट

तर्राट जोकर 15/02/2016 - 15:00
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही >> ज्या घोषणा पीडीपी काश्मिरात करते त्याच काश्मिरी पोरांनी जेएनयुत येऊन केल्यात... सोच वोही, जगह नई. त्यासाठी काश्मिरच्या मुद्द्याचा अभ्यास हवा.तो पूर्ण विषय संवेदनशील आहे. >> दाखवा अभ्यास. चांगली संधी आहे. नकाशामध्ये दाखवण्यापुरताच काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे. >> नवीन माहिती बद्दल धन्यवाद.

In reply to by तर्राट जोकर

चेक आणि मेट 15/02/2016 - 15:08
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही >> ज्या घोषणा पीडीपी काश्मिरात करते त्याच काश्मिरी पोरांनी जेएनयुत येऊन केल्यात... सोच वोही, जगह नई. त्यासाठी काश्मिरच्या मुद्द्याचा अभ्यास हवा.तो पूर्ण विषय संवेदनशील आहे. >> दाखवा अभ्यास. चांगली संधी आहे. नकाशामध्ये दाखवण्यापुरताच काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे. >> नवीन माहिती बद्दल धन्यवाद.
फाट्यावर बाकि देशविरोधी घोषणाबाजी याबद्दल अजूनही तुम्ही तुमचे मत मांडले नाही,यातच सगळे आले. सोच वही आयडी दुसरा

In reply to by चेक आणि मेट

तर्राट जोकर 15/02/2016 - 15:20
फाट्यावर >> चर्चेचा उत्कृष्ट दर्जा दाखवताय. बाकि देशविरोधी घोषणाबाजी याबद्दल अजूनही तुम्ही तुमचे मत मांडले नाही,यातच सगळे आले. >> देशभक्तीचे सर्टीफिकेट वाटायची जिम्मेदारी अंगावर घेऊ नये. सोच वही आयडी दुसरा >> तुमच्याबद्दलच्या नविन माहितीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

चेक आणि मेट 15/02/2016 - 15:24
बाकि देशविरोधी घोषणाबाजी याबद्दल अजूनही तुम्ही तुमचे मत मांडले नाही

In reply to by चेक आणि मेट

तर्राट जोकर 15/02/2016 - 15:30
आमचे मत फार सरळ आहे हो. देशविरोधी, घटनाविरोधी कार्यवाह्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी. कुठलाही भेदभाव असु नये. काडीसाठी तळमळताय? हे घ्या काड्या | | | | | | | | | | | ह्याप्पी?

In reply to by तर्राट जोकर

चेक आणि मेट 15/02/2016 - 15:35

आमचे मत फार सरळ आहे हो. देशविरोधी, घटनाविरोधी कार्यवाह्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी. कुठलाही भेदभाव असु नये.

धन्यवाद

In reply to by चेक आणि मेट

तर्राट जोकर 15/02/2016 - 15:42

काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही

उत्तराची वाट बघतो. तुम्ही पलायन करणार नाही अशी आशा आहे.

In reply to by तर्राट जोकर

होबासराव 15/02/2016 - 15:53
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा :- तजो साहेब भारताचा जो पहिलेपासुन काश्मिर विषयि दृष्टिकोन आहे तो आपल्याला पटत नाहि का ? जेएनउ:- भारत तेरे तुकडे होंगे...इन्शाअल्लाह्...इन्शाअल्लाह ह्या घोषणेबद्द्ल काय वाटत. मला हे विचारावेसे वाटले. मि कुठल्याहि पक्षाचा बांधिल नाहि, पण मुद्दा नंबर १ ल्या ला मला भारत सरकार (शब्दशः) चे जे धोरण आहे ते योग्य वाटतेय, स्वप्न तर हे हि बघतो गिलगिट , बाल्टिस्तान सुद्धा पुन्हा आपले व्हावे. मुद्दा नंबर दोन ह्या घोषणा ज्यांनि दिल्या त्यांना योग्य ते शासन व्हावे.

In reply to by होबासराव

तर्राट जोकर 15/02/2016 - 16:03
भारत सरकारचा दॄष्टिकोन योग्यच आहे. तो विषय नाही. भारताचे तुकडे करण्याच्या घोषणेबद्दल जेवढी चीड आहे तेवढीच त्या घोषणेला पाठिंबा देणार्‍या पीडीपीसोबत पाट लावणार्‍यांना समर्थन दिले जाते ह्याबद्दलही आहे.

In reply to by तर्राट जोकर

मृत्युन्जय 16/02/2016 - 18:07
स्वतंत्र काश्मीरची मागणी सर्वप्रथम करणारे शेख अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्स चे संस्थापक. राजा हरिसिंग काश्मीर वाचवा म्हणुन दाती तृण धरुन आलेले असताना केवळ शेख अब्दुल्लांची भारताबरोबर विलीनकरणाची तयारी नाही म्हणुन नेहरुंनी काश्मीर च्या विलीनकरणावर निर्णय घ्यायला उशीर केला. शेवटी शेख अब्दुल्लह नी नेहरुंवर उपकार केल्यासारखे एका चिटोर्‍यावर सशर्त सहमती दर्शवल्यावरच विलीनकरण मान्य झाले आणि काश्मीरला सैन्य गेले. या प्रकारात एक तृतीयांश काश्मीर कायमचा हातुन गेला. या नॅशनल कॉन्फरन्स बरोबर युती करावी का मग? दुसरी गोष्ट म्हणजे काश्मीर मध्ये पीडीपी किंवा एनसी यांना वगळुन सरकारच बनवता येत नसेल तर इतर सर्व पक्षांनी मूग गिळुन गप्प बसावे का ? भाजपा च कशाला, कॉम्ग्रेसने देखील त्यांना हाताशी धरलेले नाही का? एक अपरिहार्यता म्हणुन दुर्दैवाने त्या दोन पक्षांना हाताशी धरावे लागत असेल तर तसे करण्यामुळे ते त्यांच्या विचारांना समर्थन देण्यासारखे होत नाही. आज काश्मीरचे दुर्दैव असे की फुटीरतावाद्यांना चुचकारायला लागत आहे. हे लोण इतर देशामध्ये पोचण्याआधी आणि इतर सर्व देशात हीच परिस्थिती उद्भवण्याअधी इतरत्र असल्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जे करणे गरजेच आहे ते सर्व करावे. अन्यथा काश्मीरसारखे भारत विरोधी आणि पाकिस्तानसमर्थक झेंडे सगळ्या देशात दिसु लागतील. जे काश्मीरमध्ये करता येत नाही ते देशात इतरत्र पण करु नये असे म्हणण्यात काहिच हशील नाही (तुम्ही असे म्हणत आहात असे मी म्हणत नाही आहे)

In reply to by मृत्युन्जय

होबासराव 16/02/2016 - 18:41
एक अपरिहार्यता म्हणुन दुर्दैवाने त्या दोन पक्षांना हाताशी धरावे लागत असेल तर तसे करण्यामुळे ते त्यांच्या विचारांना समर्थन देण्यासारखे होत नाही.

In reply to by मृत्युन्जय

तर्राट जोकर 18/02/2016 - 01:35
एक अपरिहार्यता म्हणुन दुर्दैवाने त्या दोन पक्षांना हाताशी धरावे लागत असेल तर तसे करण्यामुळे ते त्यांच्या विचारांना समर्थन देण्यासारखे होत नाही. कोणती अपरिहार्यता? जे देशात करु शकतो ते कश्मिरमधे का नाही हाच सवाल आहे. अब्दुल्ला, चाचा जाऊन जमाना झाला. कुठवर त्यांची मढी काढकाढून आपल्या नाकर्तेपणावर पांघरून घालणार आहोत आपण? कश्मिरी पंडितांना पळवले ना त्यांनी, मग त्यांना पळवा, जमिनित गाडा, भिरकावुन द्या आकाशात. करा संपुर्ण स्वच्छता अभियान. आधीच्यांच्या बोटचेपे धोरणाला कंटाळून आम्ही भाजपाला निवडुन आणलं, यांनीही तेच केलं तर मग पार्टी विथ डिफरंस व एक के बदले दस सर चं काय झालं?

In reply to by तर्राट जोकर

मृत्युन्जय 18/02/2016 - 11:41
अपरिहार्यता ती हीच की काश्मिरात विष खोलवर पसरले आहे. जर शरीरात विष पसरायची सुरुवात असेल तर एखादे बोट कापुन समजा काम होणार असेल तर काश्मीर मध्ये ते विष नसानसात भिनते आहे. किती जणांना आत टाकणार? तिकडे ही कारवाई करायची हे एवढे सरळ काम असले असते तर मोदी सरकारने एव्हाना केले असते. दुसरी गोष्ट म्हणजे मला नाही वाटत की काश्मीर मध्ये केंद्र सरकार आणीबाणी लागू करु शकते. आणीबाणीसदृश्य परिस्थिती तर तिथे १९९० पासुन आहेच. अब्दुल्ला, चाचा जाऊन जमाना झाला खरे पण त्यांची पापे अजुनही फेडायला लागत आहेत. कलम ३७० रद्द करायची इच्छा भाजपाला नक्की आहे पण सध्याच्या सामाजिक परिस्थितीत एका सकाळी उठले आणि कलम ३७० रद्द केले इतकी सोप्पे गोष्ट नाही ती. हळु हळु करतीलच. ते केले जरी तरी लोकांच्या मनातील विष असे सहजासहजी नाही काढुन टाकता येणार. कश्मिरी पंडितांना पळवले ना त्यांनी, मग त्यांना पळवा, जमिनित गाडा, भिरकावुन द्या आकाशात. करा संपुर्ण स्वच्छता अभियान. याला थोडीशी जेनोसाइड ची झाक येते आहे का? कारण इतका घाऊक संहार केला तर त्याला वांशिक संहाराचे लेबल लावण्यात येइल. जितक्य्या शांतपणे हा घाऊक ब्रेन वॉश झाला आहे तितक्याच शांतपणे मतपरिवर्तन करावे लागेल. थोडाफार बडगा उगारता येइल पण अचानकपणे अशी घाऊक कारवाई करण्याची तिथली परिस्थिती नाही. एक के बदले दस सर चं काय झालं? हे धोरण तर ठेवावेच. पण एक के बदले दस सर करताना आपण चुकुन निरपराधांचा बळी घेत नाही ना हे देखील बघायला हवे. त्यामुळेच काश्मीरमध्ये हे सरसकट करता येत नाही. तसेही भारताची राज्यघटना नागरिकांचे शिरकाण करायाला परवानगी देत नाही. कायद्याची चौकट पाळावी लागते जशी ती जे एन यु च्या केस मध्ये देखील पाळावी कागेल, लागते आहे आणि पाळली जात आहे. कोणती अपरिहार्यता? सगळ्या पक्षांच्या खासदारांच्या संख्या बघा तिथे. कुठले पर्म्युटेशन काँबिनेशन चालु शकेल सांगा ब्रे. आता कं क्रवे ब्रे?

In reply to by मृत्युन्जय

नाना स्कॉच 18/02/2016 - 11:52
हीच खरी ज्ञानबाची मेख आहे आमच्या मते, साधारण एक वर्ष अगोदर पर्यटनासाठी कश्मीर फिरणे झाले आहे तिथे आमची खेचरे वळणारा पोऱ्या हा चक्क सिम्बायोसिस मधुन व्यवस्थापन स्नातकोत्तर पदविका घेतलेला होता! त्याला खेचरे वळण्या संबंधी विचारता म्हणाला 'यहाँ स्पेशल रह सकते है जनाब कौन रॅट रेस में शामिल होगा' सामान्य कश्मीरीची मानसिकता दर्शवणारे वाक्य आहे ते! लवकरात लवकर रद्द व्हावे अन ते पहायला आम्ही जिवंत असावे अशी एक आस आहे मनात

In reply to by मृत्युन्जय

तर्राट जोकर 18/02/2016 - 13:12
कायद्याची चौकट पाळावी लागते जशी ती जे एन यु च्या केस मध्ये देखील पाळावी कागेल, लागते आहे आणि पाळली जात आहे. >> वकिलांच्या वेषातले भाजपचे गुंड कोर्टाच्या आवारात कायद्याची चौकट पाळतांना बघत आहोत. सगळ्या पक्षांच्या खासदारांच्या संख्या बघा तिथे. कुठले पर्म्युटेशन काँबिनेशन चालु शकेल सांगा ब्रे. >> गुड. मग इतरांच्या कोअलिशनला शय्यासोबत म्हणण्याचा अधिकार उरत नाही.

In reply to by तर्राट जोकर

मृत्युन्जय 18/02/2016 - 13:40
वकिलांच्या वेषातले भाजपचे गुंड कोर्टाच्या आवारात कायद्याची चौकट पाळतांना बघत आहोत. असा कुठलाही पुरावा समोर आलेला नसताना असे म्ह्णणणे म्हणजे निव्वळ खोटारडेपणा झाला. देशातले सगळे अतिरेकी डाव्यांनी पोसलेले गुंड आहेत किंवा सगळे मुसलमान अत्तिरेकी आहेत या वाक्यांना जितका अर्थ आहे त्याहुन कमी अर्थ आहे तुमच्या बोलण्याला. त्यामुळे त्याची फारतर गंमत वाटु शकते. त्याहुन या प्रतिसादाला फार किंमत नाही. गुड. मग इतरांच्या कोअलिशनला शय्यासोबत म्हणण्याचा अधिकार उरत नाही. डिपेंड्स. परिस्थितीवर अवलंबुन आहे ते. भाजपाच्या राष्ट्रवादीच्या संबंधांना आम्ही शय्यासोबतच म्हणतो. काय आहे ना आम्ही आंधळा द्वेष किंवा आंधळी भक्ती जोपासु शकत नाही. लालू - नितीश - रागा ही एक अशीच (त्याहुन घाणेरडी) शैय्यासोबत आहे.

In reply to by मृत्युन्जय

तर्राट जोकर 19/02/2016 - 13:24
वकिलांच्या वेषातले भाजपचे गुंड कोर्टाच्या आवारात कायद्याची चौकट पाळतांना बघत आहोत. असा कुठलाही पुरावा समोर आलेला नसताना असे म्ह्णणणे म्हणजे निव्वळ खोटारडेपणा झाला. >> मृत्यूंजय सर. आपल्या विधानाचा अर्थ काय घ्यावा? शब्दफोड करुन सांगा. नेमक्या कुठल्या शब्दाबद्दल आपण खोटारडेपणाचा आरोप केला आहे? आपण बातम्या बघतच असाल.

In reply to by तर्राट जोकर

मृत्युन्जय 20/02/2016 - 12:38
वकीलांनी हल्ला केला ही बातमी आणि ते भाजपाचे गुंड होते ही थापेबाजी. आता या थापेबाजीबद्दल कं क्रवे ब्रे?

In reply to by मृत्युन्जय

तर्राट जोकर 22/02/2016 - 23:05
अजूनही कळले नाही तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे. खालील कुठले वाक्य तुम्हाला खोटारडेपणा वाटते. १. वकिलांनी कन्हयाकुमारला कोर्टाच्या आवारात मारपीट केली. २. मारपीट करणारे हे वकिल भाजपचे कार्यकर्ते आहेत. ३. कायदा हातात घेणार्‍यांना गुंड म्हटले जाते. असो. त्याच वकिलांचा कबुलीजबाबही बघून घ्या. ते स्वतःचा थापा मारत आहेत असे म्हणू नका म्हणजे झाले. आपल्या आवडत्या पक्षाला कुठपर्यंत सांभाळाल, सर? http://aajtak.intoday.in/story/sting-operation-patiala-house-accused-lawyers-exposed-how-they-planned-to-beat-kanhaiya-1-855926.html

In reply to by तर्राट जोकर

मृत्युन्जय 24/02/2016 - 19:12
वकीलांनी हल्ला केला ही बातमी आणि ते भाजपाचे गुंड होते ही थापेबाजी. आता या थापेबाजीबद्दल कं क्रवे ब्रे?

In reply to by तर्राट जोकर

मृत्युन्जय 24/02/2016 - 19:22
तुम्ही सग्ळे म्हणजे कोण? साचा म्हणजे काय? तुम्ही सगळे एकाच साच्यातून काढलेले असता काय" हा वैयक्तिक प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटत नाही काय? नाही कारण काही दिवसांपुर्वी "काही मतिमंद आयडी" असे जनरल विधान केलेले असताना (आणी ते कुणालाही स्पेसिफिक उद्देशुन लिहिलेले नसताना) ते तुम्हाला वैयक्तिक आणि सकलमिपाकरापमानकारक वाटले होते म्हणुन विचारतो.

In reply to by मृत्युन्जय

तर्राट जोकर 24/02/2016 - 19:47
ज्या पद्धतीने उत्तर आलं आहे त्याला म्हणलो. मिपावर आपल्या आवडत्या पक्षाची खिंड लढवणारे सगळेच. तुम्ही नसाल तर ते विधान तुम्हाला लागू नाही. वैयक्तिक तर अजिबात नाही. तसे वाटत असल्यास गैरसमज करुन घेऊ नये.

In reply to by तर्राट जोकर

मृत्युन्जय 26/02/2016 - 10:54
तुम्ही नसाल तर ते विधान तुम्हाला लागू नाही. वैयक्तिक तर अजिबात नाही. तसे वाटत असल्यास गैरसमज करुन घेऊ नये. तुम्ही सग्ळे असेच काड्यासारु आणि बेजाबदार ट्रोल्स आहात काय?

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 25/02/2016 - 14:38
श्रीगुरुजी मोड? तुम्ही सगळे एकाच साच्यातून काढलेले असता काय?
आता हे काय नवीन? म्हणजे मला मूळव्याध झाली आहे, मला कावीळ झाली आहे असे आतापर्यंत इतरांना शोध लागले. पण माझ्या नावाचा एक मोड आहे हे आजच कळले.

In reply to by तर्राट जोकर

चेक आणि मेट 15/02/2016 - 15:54
काश्मिरात "पाकिस्तान झिंदाबाद"च्या घोषणा किंवा आयसिसचे झेंडे बघून/ऐकून सवय आहे.JNU दिल्लीत आहे,आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो,दिल्ली भारताची राजधानी आहे,ज्या संसदेवर अफजलने हल्ला केला होता तीच संसद दिल्लीत आहे. आणि दिल्लीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा म्हणजे संपलं कि राव कि सगळं!! म्हणून दिल्ली आणि काश्मिर ही तुलना योग्य नाही.

In reply to by होबासराव

सुबोध खरे 18/02/2016 - 19:25
काश्मीरचे तीन भाग आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाख. यापैकी काश्मीर खोर्यातून हिंदू लोकांचे पद्धतशीर शिरकाण करून किंवा त्यांना धमकावून तेथून हाकलून दिले गेलेले आहे. यात सवतासुभा ठेवण्याच्या नादात काश्मिरी पंडितांनी पण आपले विशेष अधिकार सोडून देण्यास नकार दिला होता हे लक्षात घेतले पाहिजे. पण आता त्यांना काश्मीर खोर्यातून हाकलले गेल्यावर त्यांचे डोळे उघडले असले तरीही आपले विशेष अधिकार सोडून देण्यास ते आजही तयार नाहीत. काश्मीर मध्ये "आपले"सरकार असणे का आवश्यक आहे हे मी विशद करतो आहे. आपले म्हणजे भारतीय "राष्ट्रवादी" पाकधार्जिणे नव्हे. मग ते कॉंग्रेस चे असो किंवा भाजप चे. पक्षीय दृष्टीकोनातून याचा विचार होऊ नये. (१९८४ ते १९८९ मध्ये श्री जगमोहन हे राज्यपाल कॉंग्रेस सरकारनेच नेमलेले होते ज्यांनी तेथे भरीव कार्य केले होते.) पी डी पी किंवा नैशनल कॉन्फरन्सचि सरकारे हि दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असलेली असतात हि गोष्ट लपून राहिलेली नाही. जर आपले सरकार( युती असली तरीही) असेल विशेषतः त्यात गृह खाते हातात असेल तर गुप्त बातम्या, दहशतवादी लोकांच्या कारवाया याबद्दलची बित्तंबातमी तुमच्या कडे असू शकते आणि मग त्यामाहितीचा उपयोग केंद्र सरकार बरोबर चर्चा करून दहशतवादी कारवायाना आळा घालण्यासाठी उपयोग होतो. सरकार "त्यांचे" (पाक धार्जिणे) असेल तर पकडलेल्या दहशतवाद्याना न्यायालयात उभे करताना ढिसाळ चौकशी पुरावे देऊन ते सुटतील अशी "व्यवस्था करता येते/ केली जाते. काही वेळेस पोलिस किंवा इतर सरकारी खात्यातील लोक त्यांना धार्जिणे झाले तर त्यांची उचलबांगडी करावी लागते.आणि आपली "विश्वासू" माणसे अशा महत्त्वाच्या जागी असणे आवश्यक असते. म्हणून सरकार मध्ये सहभाग असेल तर त्याचा उपयोग होतो. यासाठी जरी तह करावा लागला तरीही हरकत नाही. साधनशुचिता आणि राष्ट्र कार्य यात काय महत्त्वाचे ते आपण ठरवणे आवश्यक असते. विषय फार मोठा गहन आहे आणि माझी त्याबद्दलची समज फारच तोकडी आहे म्हणून येथे थांबतो

In reply to by सुबोध खरे

अ‍ॅटलिस्ट मला तरी असे नाहि वाटत. कारण आपण मुद्दे अगदि योग्य तर्‍हेने मांडलेयत.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 18/02/2016 - 20:25
डॉ. खरे, उत्तम प्रतिसाद! परंतु खालील वाक्याविषयी पूर्ण सहमत नाही.
काश्मीर मध्ये "आपले"सरकार असणे का आवश्यक आहे हे मी विशद करतो आहे. आपले म्हणजे भारतीय "राष्ट्रवादी" पाकधार्जिणे नव्हे. मग ते कॉंग्रेस चे असो किंवा भाजप चे.
कॉंग्रेस तेथील सरकारमध्ये असेल तर तुम्ही ठेवता तशी अपेक्षा दहशतवाद्यांवरील कारवाईच्या बाबतीत ठेवता येत नाही. यापूर्वी २००२-२००८ या काळात काँग्रेस+पीडीपी या युतीचे सरकार होते व नंतर २००८-२०१४ या काळात काँग्रेसच्या पाठिंब्याने नॅकॉचे सरकार होते. या काळात दहशतवाद्यावरील कारवाईबाबत काँग्रेसचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता. २००५-२००८ या ३ वर्षात काँग्रेसचे गुलाम नबी आझाद मुख्यमंत्री असूनदेखील दहशतवाद्यांविषयी फारशी कठोर कारवाई नव्हती. परंतु फेब्रुवारी २०१५ पासून भाजप+पीडीपी चे संयुक्त सरकार आहे. त्यात सभापतीपद व उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे. भाजपच्या सहभागामुळे पीडीपी पक्ष कसा नियंत्रणात राहिला याचे खालील लेखात वर्णन आले आहे. भाजपऐवजी कॉंग्रेस पक्ष सत्तेत असता तर पीडीपीवर कोणतेच नियंत्रण राहिले नसते व काँग्रेसने पीडीपीच्या कोणत्याच कृतींना विरोध केला नसता. भाजप व पीडीपीचे संयुक्त सरकार स्थापन झाल्यावर सर्वांना प्रचंड धक्का बसला. दोन पूर्णपणे विरोधी विचारसरणी असलेले पक्ष केवळ स्वार्थासाठी एकत्र आले अशी टीका होऊ लागली. पीडीपी हा काहीसा पाकिस्तानकडे झुकलेला, भारतविरोधी, दहशतवाद्यांविषयी सहानुभूती असलेला पक्ष तर भाजपची भूमिका याच्या बरोबर उलटी. परंतु जम्मू-काश्मिर राज्यातील सरकारमध्ये भाजप असणे हे पीडीपीवर म्हणजे पर्यायाने विभाजक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे भाजपच्या लक्षात आले होते. त्यामुळेच स्वतःच्या अटींवरच भाजप सरकारमध्ये सामील झाला. या लेखातील काही परिच्छेद - ________________________________________________________________ This time, Mufti started on the same lines and ordered the release of separatist leader Masarat Alam. Within a month, not only was the government forced to rearrest Alam, there was a stricter watch on separatists with the Public Safety Act invoked against more and more separatists and even minor protesters. _________________________________________________________________ The agenda of alliance said the partners would not rake up controversial issues — such as Article 370, and a separate state flag for Jammu and Kashmir. BJP leader Farooq Khan, in fact, challenged a J&K High Court decision that all constitutional authorities must respect and hoist the state flag. After the Mufti government issued a circular asking constitutional authorities to hoist the state flag on official cars and buildings, it had to retract within 24 hours. __________________________________________________________________ After the Muftis formed the PDP in 1999, Mehbooba was key to the rise that took the party to power within three years of its inception. She used a clever mix of mainstream and separatist politics, turning up among mourners for slain militants wearing a green abbaya, voicing her concern on human rights violations and seeking a resolution to the Kashmir issue through dialogue. The party advocated self-rule. Over the past nine months, Mehbooba was watching the results of 17 years of hard work slipping away. ____________________________________________________________________ जम्मू-काश्मिरमध्ये भाजप सत्तेत असणे का आवश्यक होते हे लेख वाचल्यावर लक्षात येइल. http://indianexpress.com/article/india/india-news-india/mehbooba-mufti-mufti-jk-bjp-pdp-bjp-pdp-mufti-mohammad-sayeed-to-bjp-or-not-to-bjp-the-ifs-and-buts/

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 19/02/2016 - 10:33
श्रीगुरुजी आपण जरी म्हणालात कि कॉंग्रेस चे धोरण नरमाईचे होते तरिहि तेथे असलेले सनदी नोकर हे त्या ( काश्मिरी) सरकारचीच नव्हे तर केंद्र सरकारची पण मदत करीत होते. यामुळे आतील बातम्या केंद्र सरकार आणि लष्करी मुख्यालयाकडे येत असत. कितीही लष्कर एखाद्या भागात ठेवा आतील माहिती हि तेथील स्थानिक जनता आणि स्थानिक पोलिस / सरकारी नोकर/ शिक्षक यांना जास्त असते आणि आपत्कालीन स्थितीत हीच माहिती फार मोलाची ठरते. दुर्दैवाने UPA २ च्या काळात निर्णयशून्यता आल्याने परिस्थिती थोडी बिघडली हे खरे आहे. यास्तव जर लोकशाही सरकार असले तर "आपले" लोक तेथे सरकार मध्ये किंवा सनदी सेवेत असणे आवश्यक असते.

In reply to by चेक आणि मेट

नाना स्कॉच 15/02/2016 - 14:32
तुम्ही प्रत्येक माणूस आपल्या विरोधात असल्याच्या थाटातच प्रतिसाद देता का हो महाराज? आपण अधोरेखित केलेली माझीच वाक्यं परत एकदा वाचाल का श्रीमान. मला सरकार ला विरोध करायचा नाहीये तर त्यांचा पक्ष उचलून धरताना अंगी नैतिक बळ असावे म्हणून आलेली ही उस्फुर्त कळकळ आहे. काथ्या भांडणाच्या आवेशात नका कुटु मालक. अन समोरचा काय म्हणतो आहे ते एकदा नीट लक्षात घ्या, मी मला हव्या असलेल्या नैतिक बळाबद्दल बोलतोय राजे. बाकी प्रश्नाला प्रतिप्रश्न वगैरे म्हणून ठीक आहे पण तीनशे सत्तर बद्दल विचारलेच आहेत म्हणून सांगतो की मला तीनशे सत्तर एक फुक्कट लाड वाटतो, तो लवकरात लवकर नल एंड वॉइड व्हावा असेही वाटते. पण सद्द्यस्थितीत त्या दिशेने काहीच दिसत नाहीये , काँग्रेस ते करणे अशक्यच होती कारण हरामखोरी अन काँग्रेसी असणे हा समानार्थी शब्द आहे फ़क्त बीजेपी ने त्या वाटेने जाऊ नये असे वाटते, नाहीतर सेना काय वाईट होती राव आमची! एकच बुलंद आवाज होता थोरल्या साहेबांचा! असो!.

In reply to by चेक आणि मेट

नाव आडनाव 15/02/2016 - 15:51
काश्मिरमध्ये पाय पसरण्याचा भाजपचा कूटनितीक डाव आहे. असाच "पाय" काँग्रेस, आप किंवा अजून एखाद्या पक्षाने पसरण्यासाठी अफजल गुरू ज्यांना जवळचा वाटतो अश्या पक्षाबरोबर युती केली तर चालेल का? उत्तर "नाही" असेल तर हे म्हणजे "हम करे तो प्यार, तुम करो तो बलात्कार" असं होइल.

In reply to by नाव आडनाव

चेक आणि मेट 15/02/2016 - 15:59
हो चालेल.आणि यापुर्वी चालवूनही घेतले आहे. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. फक्त बाकिच्यांनी JNU बाबत राजकारण करू नये हीच इच्छा आहे.

विटेकर 15/02/2016 - 14:26
मोगा नावाच्या पाजी माणसाला तातडीने हाकलून द्यावे अशी मा संपादक मंडळला विनंती ! कुठे हुतात्मा आणि कुठे अतिरेकी .. अक्कल आहे का जागेवर ? धागा तातडीने संपादित करुन अशलाघ्य प्रतिसाद संपादित करावेत.
भाजपाने नैतिकतेचे ढोंग बंद करावे आणि बाकि विरोधि पक्षानीं सिक्-ल्युरिझमचे. भारत तेरे तुकडे होंगे...इन्शाअल्लाह्...इन्शाअल्लाह हि घोषणा तेहि दिल्लि मध्ये...काय समजायचे

इरसाल 15/02/2016 - 15:29
तिकडे मोगा कधीच हद्दपार झालाय, नवा ना सिर (ना पैर) बनुन आलाय. इथे पण तेच होणार.

In reply to by इरसाल

नाखु 15/02/2016 - 15:36
इथे त्यांनी कधीच "हद्द" पार केली आहे !! एखादा अअ‍ॅण्टी व्हायरस प्रोग्राम मिळेल का अश्या आय्डींसाठी ????? संगणक आज्ञावली वाल्यांसाठी आव्हान आणि आवाहनही !!!!!

मोगा 15/02/2016 - 16:37
मी नथुराम ..... नाटक कायमचे बंद होणार ..... आजचा मटा.

कपिलमुनी 15/02/2016 - 18:16
भाजपा आमदाराची कोर्टाच्या आवारात मारहाण ! पत्रकार, विद्यार्थी , विरोधी नेते अशा सर्व देशद्रोह्यांना धडा शिकवला आहे. कायद्यावर विश्वास नसल्याने स्वतःच कोर्टाच्या आवारात जाउन न्यायदान केले आहे ! जय हो !

सुनिल जोग 15/02/2016 - 20:30
हेडली चा सारा जबाब जेव्हा अमेरिकेत साक्श दिलि तेव्हा वेब्साईट वर उप्लब्ध होता.ंमी तो वाचला आहे. त्यात त्याने इत्यंभुत माहिती दिलि होति - मुम्बईत रेकि कशि केलि, कुथे रुम्/ हॉटेल घेतलि वगैरे. आता आपन फक्त पोस्ट्मार्तेम करतोय जुन्या मढ्याचे . गिधाडाना ताजे मास चालत नसते. त्याना शिळेच आवडते कारन तेच पचते. असो तेव्ह्ढाच मेडियाचा टिआर्पी तर वाधेल. आणि निकम साहेबाना पुधच्यावर्शी एक पद्मश्री पक्कि. हा हा हा

प्रदीप साळुंखे 15/02/2016 - 23:08
"अफजलगुरू"जी म्हणे!!! . . काँग्रेस प्रवक्त्यांचं मुक्ताफळ! . देशद्रोह्यांना श्री,जी,साहब,अशी विशेषणे लावण्याचे काम काँग्रेसने घेतले आहे.

In reply to by प्रदीप साळुंखे

श्रीगुरुजी 15/02/2016 - 23:14
- ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर दिग्विजय सिंगांनी त्याचा उल्लेख 'ओसामाजी' असा आदरपूर्वक करून ज्या पद्धतीने अमेरिकेने समुद्रात त्याच्या मृतदेहाची वासलात लावली त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. - सुशीलकुमार शिंदे यांनी संसदेत हाफिज सईदचा उल्लेख श्री. हाफिज सईद व हाफिज सईद साब असा आदरपूर्वक केला होता. - रणदीप सुरजेवालाने अफझल गुरूचा उल्लेख अफझल गुरूजी असा आदरपूर्वक केला. देशद्रोही व दहशतवादी हे नेहमीच काँग्रेस नेत्यांसाठी वंदनीय व आदरणीय राहिलेले आहेत.

तर्राट जोकर 16/02/2016 - 02:34
कन्हैय्या कुमार (देशद्रोही) याचे संपूर्ण भाषण अटक होण्याअगोदर. अटकेचे कारण हे भाषण असेल तर भारतात अघोषित आणीबाणी लागु झाली आहे असे समजायचे का>

In reply to by तर्राट जोकर

चेक आणि मेट 16/02/2016 - 08:37
अटकेचे कारण हे भाषण असेल तर भारतात अघोषित आणीबाणी लागु झाली आहे असे समजायचे का>
तुम्हाला कोणी सांगितलं अटकेचं कारण हे भाषण आहे म्हणून? हा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आंदोलन करताना देशविरोधी घोषणाबाजी झाली,त्यामुळे नैतिक जबाबदारी अध्यक्षाचीच येते,एवढं कारण पुरेसं आहे ताब्यात घ्यायला.

In reply to by चेक आणि मेट

तर्राट जोकर 16/02/2016 - 13:01
डांगे....?????? बरे आहात ना चेकमेट? स्वतः डुआयडी असल्याने सगळेच डु आयडी आहेत असं वाटायला लागलंय काय? विशेषतः एकाच (विशिष्ट) विचारसरणीचे लोक? मुद्दे नसतात तेव्हा असल्या गप्पा सुचतात लोकांना, नवीन नाही ते. मिपा अ‍ॅडमिन-संपादक. कृपया ह्या आयडीला समज द्यावी.

In reply to by तर्राट जोकर

चेक आणि मेट 16/02/2016 - 13:25
मुद्दे नसतात तेव्हा असल्या गप्पा सुचतात लोकांना, नवीन नाही ते.
Good Joke
काय? विशेषतः एकाच (विशिष्ट) विचारसरणीचे लोक?
Better joke
मिपा अ‍ॅडमिन-संपादक. कृपया ह्या आयडीला समज द्यावी.
Best joke उलटा चोर कोतवाल को डाटे

In reply to by चेक आणि मेट

तर्राट जोकर 16/02/2016 - 13:28
yes. I am a joker. and you are crafted nuisance.

In reply to by चेक आणि मेट

तर्राट जोकर 18/02/2016 - 01:27
@चेकमेट, तुमचे वाक्य बदलून घेतो, लॉजिक समजायला सोपे जाईल. हा माणुस राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि दंगे घडतांना निरपराधांची कत्तल झाली,त्यामुळे नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच येते,एवढं कारण पुरेसं आहे ताब्यात घ्यायला. पण मुख्यमंत्र्याला चौकशी समित्या बसवून आपली बाजू मांडण्याची संधी दिल्या गेली, कन्हैयाला मात्र कोर्टात जायच्या आत फटके बसले.

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान 18/02/2016 - 13:21
तजो, कोणालाही ताब्यात घेण्यासाठी गुन्ह्यात प्रथमदर्शनी सहभाग असणे हे महत्त्वाचे असते. या निकषावर नमो आणि ककु यांची बरोबरी होऊ शकत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by चेक आणि मेट

निनाद मुक्काम … 05/03/2016 - 03:16
अहो अजून कोर्टात कनैह्या विरूध चार्ट शिट दाखल व्हायची आहे तेव्हा कोणत्या आधारावर दिल्ली पोलिसांनी त्याला आत टाकले आणि त्यांच्याकडे त्याच्या विरोधात काय पुरावे आहेत ह्या बाबत काहीही माहिती कुणालच नसतांना काही लोक सोयीस्कररीत्या फक्त विडीयो च्या आधारावर त्याची अटक झाली असा निष्कर्ष काढून मोकळी झाली . असो

In reply to by तर्राट जोकर

विटेकर 16/02/2016 - 14:28
अटकेचे कारण हे भाषण असेल तर भारतात अघोषित आणीबाणी लागु झाली आहे असे समजायचे का>
खिक्क ! समजा हो , खुषाल समजा ! केन्द्रात सत्ताबदल झाल्याने अनेकांचा बाजार उठला आहे , नुसत्या आणिबाणी चे काय घेऊन बसलात ? होऊन जाऊ दे , काढा एक नवीन धागा -
देशात आणिबाणी सुरु झाली आहे का ?
शुभेच्छा !!!

In reply to by विटेकर

तर्राट जोकर 18/02/2016 - 01:47
तुम्ही आता हसणारच. हेच इंदिराबाईंनी केले तेव्हा छाती पिटत होते लोक. जे लोक संघविरोधी आहेत त्यांना विनाकारण जेलमधे टाका, जे खरे देशद्रोही आहेत त्यांच्याशी सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसा. अशा वातावरणात जगायचे तर शुभेच्छांची गरज आहेच.

In reply to by तर्राट जोकर

रॉजरमूर 19/02/2016 - 03:33
हा भिकारचोट कान्ह्याया महिला आरक्षण खाजगी क्षेत्रातील आरक्षण याविषयी बोलताना संघाला दोष देतोय याला मुलायमसिंग लालूप्रसाद दिसले नाही काय ज्यांनी ते बिल रखडवले .मुलायम आणि लालू तर महिलांना आरक्षण देण्याच्या विरोधातच आहे भाषा तर मायावतीची बोलतोय मनुवादी मनुवादी बोंबलतोय . ६० वर्षात कॉंग्रेस चे पाप नाही दिसले . जणू १ वर्षात या सरकारनेच व्यवस्था बदलली . जातीयवाद तर याच्यातच ठासून भरलेला आहे ब्राह्मणद्वेष सावरकरांबद्दल द्वेष तर भलताच दिसतोय या हल्कटला . १२४ (अ) हे संपूर्णपणे लागू होतेय याला त्याने उघड उघड आव्हानच दिलेय सरकारला भाषणामध्ये . वर अजून कसाब ला आणि अफजल ला स्पष्टपणे जस्टीफाय करतोय तो . कसला लाल सलामाची भाषा करत आहे . काय आहे ते रक्तरंजित क्रांती आणायचीय ? असे असेल तर सोराबजी पण तोंडघशी पडेल मग . शेवटी त्याने अंतस्थ हेतू उघड केलाच पुढच्या वर्षी निवडणुका आहेत विद्यापीठाच्या या गोष्टीचे भांडवल करून तोफांड करून त्याला प्रसिद्धी मिळवायचीय . नेतागिरी करण्यासाठीचा खटाटोप ,जो या बिहारी यु पी वाल्यांचा आवडता उद्योग आहे . दुर्दैव हे की असल्या हरामखोरांचे समर्थन इथले काही आय डी निर्लज्जपणे करत आहेत .

In reply to by तर्राट जोकर

निनाद मुक्काम … 23/02/2016 - 06:31
हीच गंमत आहे सोयीनुसार सगळ्यांनी अटकेसाठी हे भाषण आहे असे स्वताचे स्वताच वाटून घ्यायचे तसे असते तर मोदींना अभद्र शब्द बोलणारा केजू तुरुंगात असता.

In reply to by निनाद मुक्काम …

तर्राट जोकर 23/02/2016 - 10:35
हा हा. सोयीनुसार विचार करण्याची हिच गम्मत आहे. केजरीला हात लावू नाही शकत, लहान मुलांना दमदाटी करु शकतो.

नाना स्कॉच 16/02/2016 - 15:18
आम्ही स्वतः मोदींचे तुफान फॅन आहोत!!. नोकरशाही कडून काम करवुन घेणारा तो द्रष्टा नेता आहे एक. ती तड़फ तो वेग सर्वोत्तम आहे! फ़क्त हल्ली भक्तमंडळी डोक्यात जाते खुप. त्यांची चाय से केटली गरम वृत्तीच मोदींपुढला खरा धोका असल्याचे वाटते. बरेच दिवस अगोदर मोदींनी स्वतः भक्तांना "सोशल मीडिया वर बोलताना तारतम्य बाळगा, तोल ढळू देऊ नका" असे सांगितले होते. पण उन्मादी भक्त ते ही ऐकेना झालेत. काँग्रेसची शष्प औकात नाहीये आता उभी रहायची पण टंगड्या ओढायला आता गिरिराज सिंह अन आदित्यनाथ सारखी अंतस्थ माणसे अन बाहेर उन्मादी भक्त सज्ज आहेत! विरोधक तो मोदी खुद ख़त्म कर देंगे बस प्रभु उन्हें अपने कुछ सांसद और भक्तोंसे बचाएं! असो!.

In reply to by नाना स्कॉच

होबासराव 16/02/2016 - 15:27
नाना तुमच्या सगळ्या प्रतिसादाशि सहमत फक्त विरोधक तो मोदी खुद ख़त्म कर देंगे हे सोडुन. एक मजबुत विरोधि पक्ष तर लागतोच अंकुश ठेवायला.

In reply to by होबासराव

नाना स्कॉच 16/02/2016 - 16:35
खरे आहे तुमचे! पण असा विरोधीपक्ष कोण असणार?? माणसाचे मन बेटे फारच बेक्कार असते होबासरावजी, सत्ता सद्धया मोदी सोडुन दूसरे काहीच ऑप्शन नाहीये, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ सत्य आहे. फ़क्त ऑप्शन नाही हे त्यांना कळाल्यावर जर त्यांचे डोके फिरले (शक्यता शुन्य. एक अब्ज शुन्य एक इतकी धरता) तर देशाचे होत्याचे नव्हते होईल. सुदृढ़ जनतंत्र चालवायचे तर चेक्स एंड बॅलन्स चा तराजु हवाच, तुर्तास मात्र एक कर भरणार नागरिक ह्या रूपाने मला मात्र मोदी मोदी अन फ़क्त मोदी इष्ट वाटत आहेत हे खरे. अन त्या करा ची शपथ सांगतो, हा फेब्रुअरी महीना आहे बॉस, बजेट सत्र येते आहे, ते जेएनयु हेडली वगैरे सगळे कॅन वेट प्रथम पुर्ण लक्ष बजेट वर हवे, सामान्य माणुस आहे मी, अन घामाचा पैका कसा जाणार किंवा बचत होणार ह्याची निती जास्त महत्वाची आहे मला. बाकी सगळे चालत राहणार , हा फेब्रुअरी आहे अन बजेट महत्वाचे आहे. असो!

विनायक पन्त 19/02/2016 - 11:01
मी कधी कधी विचार करतो कि आपले सीमेवरचे जवान किती सहनशील आणि थंड डोक्याचे आहेत कि हे सर्व जे देशात चाललेय ते बघून त्यांना आपल्या बंदुका आतल्या दिशेने वळवाव्या वाटत नाहीत! असा विचार ते करत नाहीत कि या अशा लोकांच्या संरक्षणार्थ आपण इथे जीवाची बाजी लावून उभे आहोत! Shame on these ba****ds!!!

In reply to by विनायक पन्त

सुबोध खरे 19/02/2016 - 11:15
पंत साहेब असे विचार अनेक वेळेस माझ्या मनात आले होते. एक उदाहरण देत आहे. मी विक्रांत वर असताना जहाजाच्या मागच्या भागात श्री देवीलाल उप पंतप्रधान म्हणून आले होते. त्यांनी विक्रांतच्या हँगर मध्ये ठेवलेले विमाने ओढण्याचे tractor पाहिले आणी विचारले इथे शेती होत नाही तर या tractor वर खर्च कशाला. त्यांना नम्रपणे त्याचे कारण सांगितले गेले . नंतर त्यांच्या सन्मानार्थ जहाजाच्या क्वार्टर डेक वर मेजवानी ठेवली होती.हा भाग जहाजाच्या सर्वात मागे आणि फ्लाईट डेक च्याखाली असतो आणि तीन बाजूना समुद्र असतो.नौसैनिकांनी अर्धा दिवस खपून तो भाग स्वछ करून रंगरंगोटी करून सजवला होता. याच्या मध्यभागी एक फ्लाईट डेक च्या आधारासाठी लोखंडी खांब असतो. या खांबाला सजावट म्हणून निळे आणि पांढरे सुंदर कापड गुंडाळले होते. श्री देवीलाल यांनी पान खाऊन त्या सुंदर कापडावर "कोपरा" म्हणून आपली थुंकी टाकून त्याची माती केली. तीन बाजूना उघडा समुद्र होता आणि सर्व कोपर्यात कचर्याच्या कुंड्या ठेवलेल्या असतानाहि यांना अशी बुद्धी झाली.ते पाहून मला त्या मेजवानीतून निघून जावे असेच वाटले. दुर्दैवाने जहाजाचा मी एकटाच डॉक्टर होतो त्यामुळे तसे करणे मला नियमांमुळे शक्य नव्हते. यावर अनेक नौ सैनिकांनी त्याबद्दल आपली नाराजगी खाजगीत बोलून दाखविली. हि घाण नौसैनिकांना नंतर स्वतः साफ करावी लागली. स्वच्छतेचे किमान धडे सुद्धा यांनी गिरवलेले नसावेत याचे आश्चर्य वाटले.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 19/02/2016 - 12:36
डॉक्टर साहेब, श्री. देवीलाल यांच्या नवलकथा वाचून मन कसं प्रसन्न झालं. अशी माणसे ही आपल्या लोकशाहीची अमूल्य देणगी आहे. याचा आपणांस अजिबात विसर पडता कामा नये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नाखु 19/02/2016 - 14:11
प्रत्येकाला व्यक्त (त्याला हवे त्या प्रकारे) होण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. ती अभिव्यक्ती (अगदी उप पंतप्रधानांना )प्रगट न करू देणे किंवा तीला दिशा देणे ही असहिष्णुता झाली. स्वातंत्र्य मिळालेल्या भारतातला स्व तंत्र नागरीक नाखु

In reply to by नाखु

माहितगार 19/02/2016 - 14:41
प्रत्येकाला व्यक्त (त्याला हवे त्या प्रकारे) होण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. ती अभिव्यक्ती (अगदी उप पंतप्रधानांना )प्रगट न करू देणे किंवा तीला दिशा देणे ही असहिष्णुता झाली.
;)

विकास 03/03/2016 - 21:44
शिंद्यांची मुलाखत... तत्कालीन गृहमंत्री म्हणतात की एन आय ए काय करत होते ते मला माहीत नव्हते (हेडलीची चौकशी केली जात होती).

In reply to by विकास

श्रीगुरुजी 04/03/2016 - 20:30
आता ते काखा वर करणारच. २००५-०६ मध्ये ते आंध्रप्रदेशचे राज्यपाल असताना खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका कॉंग्रेस कार्यकर्त्याची त्यांनी आपला अधिकारात मुक्तता केली होती. त्याविरूद्ध खून झालेल्या व्यक्तिचे कुटुंबीय न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने शिंद्यांवर ताशेरे ओढून त्याची मुक्तता रद्द करून त्याला परत तुरूंगात पाठविले होते. त्यावर पत्रकारांनी विचारल्यावर, "न्यायालयाच्या निर्णयावर मला काही बोलायचे नाही" असे विधान करून त्यांनी काखा वर केल्या होत्या. २००१-२००२ च्या सुमारास सोलापूरमधील काही मुस्लिम कुटुंबांच्या घरात सुमारे दीडशे गावठी बॉम्बचा साठा सापडल्यावर त्यांना पोटा/रासुका खाली अटक करण्यात आली होती. २००३ मध्ये शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी लगेच त्यांच्यावरील पोटा/रासुकाचे आरोप मागे घेऊन सौम्य आरोप ठेवण्यात आले व त्यामुळे त्यांना लगेच जामीन मिळाला होता. २०१०-२०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सनातन वर बंदी घालावी असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहखात्याला पाठविला होता. केंद्रीय गृहखात्याने बंदीसाठी पुरेशी सबळ कारणे नसल्याचे सांगून तो फेटाळला असे काही वृत्तपत्रात आले होते. पानसरेंच्या खुनानंतर एका सनातनच्या कार्यकर्त्याला संशयावरून अटक केल्यावर पुन्हा एकदा बंदीची चर्चा सुरू झाली. तेव्हा आपण केंद्रीय गृहमंत्री असताना असा कोणताच प्रस्ताव माझ्याकडे आला नाही असे सांगून शिंद्यांनी काखा वर केल्या होत्या. हा इतिहास लक्षात घेता वरील चित्रफितीत ते जे सांगताहेत ते अपेक्षितच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

नाव आडनाव 05/03/2016 - 17:09
तुम्ही जसं दुसर्‍या परिच्छेदात लिहिलंय तसं साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित आणि त्यांच्या बरोबर अटक झालेल्या लोकांना सोडवता येणार नाही का? केंद्रात आणि राज्यात (जिथे मालेगावात स्फोट झाले) दोन्हीकडे भाजपा सरकार आहे आणि भाजपने या लोकांना कायमंच निर्दोष मानलेलं आहे. आणि जर तसं करता येत नसेल तर २००३ साली त्या वेळच्या विरोधी पक्षाने जामीन न मिळण्यासाठी / त्याच्या विरोधात काही केलं होतं का?

In reply to by नाव आडनाव

मृत्युन्जय 05/03/2016 - 17:14
लोकांना पकडणे आणि सोडवणे सरकारच्या हाती नसते. ते कॉर्टाचे काम काहिवेळा सूडबुद्धीने लोकांना अडकवले मात्र जाते.

In reply to by मृत्युन्जय

तर्राट जोकर 05/03/2016 - 17:22
लोकांना पकडणे आणि सोडवणे सरकारच्या हाती नसते. ते कॉर्टाचे काम >> तुम्ही श्रीगुरुजी जे म्हणतायत त्याला खोडताय का? काहिवेळा सूडबुद्धीने लोकांना अडकवले मात्र जाते.>> जसे कन्हय्याकुमार?

In reply to by तर्राट जोकर

मृत्युन्जय 05/03/2016 - 17:50
तुम्ही श्रीगुरुजी जे म्हणतायत त्याला खोडताय का? श्री गुर्जी काय म्हणाले ते मला माहिती नाही. वरील प्रतिसादावर मी माझे मत नोंदवले. जर त्यामुळे श्रीगुर्जींचे एखादे मत खोडले गेले असेल तर मला माहिती नाही. जसे कन्हय्याकुमार? कन्हय्याकुम्मार बद्दल असे काही वाटात नाही ब्वॉ. तो स्वतः च्या कर्मानेच अडकला आहे. पण इशरत जहा नावा च्या अतिरेक्याच्या एनकाउंटर मध्ये अनेक निर्दोष लोकांना या मार्गे अडकवायचा प्रयत्न झाला होता असे सध्या तरी निदर्शनास येते आहे.

In reply to by मृत्युन्जय

तर्राट जोकर 05/03/2016 - 17:59
श्री गुर्जी काय म्हणाले ते मला माहिती नाही. वरील प्रतिसादावर मी माझे मत नोंदवले. >> वरिल प्रतिसाद कशासंदर्भात आहे ते तुम्हाला माहित नाही? वॉव. ज्यांची सत्ता असते ते कुणालाही अडकवु शकतात, सोडवू शकतात ह्यावर आपले मत काय>

In reply to by नाव आडनाव

श्रीगुरुजी 05/03/2016 - 23:41
तुम्ही जसं दुसर्‍या परिच्छेदात लिहिलंय तसं साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित आणि त्यांच्या बरोबर अटक झालेल्या लोकांना सोडवता येणार नाही का? केंद्रात आणि राज्यात (जिथे मालेगावात स्फोट झाले) दोन्हीकडे भाजपा सरकार आहे आणि भाजपने या लोकांना कायमंच निर्दोष मानलेलं आहे. आणि जर तसं करता येत नसेल तर २००३ साली त्या वेळच्या विरोधी पक्षाने जामीन न मिळण्यासाठी / त्याच्या विरोधात काही केलं होतं का?
(१) त्यांना २००३ मध्ये पकडले नव्हते. त्यांना ऑक्टोबर २००८ मध्ये पकडले आणि तेव्हापासून ते आजतगायत विनाजामीन तुरूंगात आहेत. (२) त्यांच्यावरील गुन्ह्याची नोंद कागदोपत्री दाखल केली असल्याने आता त्यांच्यावरील खटला काढून टाकता येणे शक्य नाही. न्यायालयात खटला चालल्यानंतरच निकाल लागेल. (३) त्यांच्यावर मकोका लावल्याने व मकोकाखालील गुन्हे अजामीनपात्र असल्याने त्यांना जामीन मिळू शकत नाही. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला असा निर्णय दिला आहे की मकोकाचा विचार न करता त्यांना जामीन मिळू शकतो का यावर निर्णय द्या. याचा निर्णय नजीकच्या भविष्यकाळात लागेल. (४) सद्यपरिस्थितीत त्यांच्यावर खटला चालून मगच निर्णय लागणे योग्य आहे. त्यांच्यावरील आरोप रद्द करून खटला रद्दबातल करून त्यांना मुक्त केले तर भाजपने तथाकथित "हिंदू अतिरेक्यांना" वाचविले अशी टीकेची झोड उठेल व भाजप तथाकथित "हिंदू अतिरेक्यांना" पाठीशी घालत आहे अशी भावना निर्माण होईल. तसेच या निर्णयाविरूद्ध अनेक कायदेपंडीत न्यायालयात दाद मागतील व न्यायालय सरकारचा निर्णय रद्द करू शकेल. त्यातून अजून गुंतागुंत निर्माण होईल. त्याऐवजी खटला चालणेच योग्य ठरेल. ते निर्दोष असतील तर सुटतील. जर गुन्हे सिद्ध झाले तर दहशतविरोधी कायद्यानुसार शिक्षा मिळायला हवी. (५) २००८ साली त्यांना मुद्दाम अडकविण्यात आले असे माझे मत आहे. २००९ च्या निवडणुकीवर डोळा ठेवून भाजप/संघ परिवाराला बॅकफूटवर नेण्यासाठी मुद्दाम जाणूनबुजून हिंदूंना यात अडकविण्यात आले. सुरवातीला महाराष्ट्र एटीएस तपास करीत होते. नंतर एक एसआयटी नेमण्यात आली. काही महिन्यांनतर तपास सीबीआय कडे देण्यात आला. नंतर पुन्हा एक एसआयटी नेमण्यात आली. काही काळाने एनआयए कडे तपास देण्यात आला. प्रत्येकवेळी एका नवीन तपासयंत्रणेकडे तपास देऊन त्यांना नवीन धागेदोरे मिळाले आहेत असे न्यायालयात सांगून त्यांच्यावर आरोपपत्र ठेवण्याचे टाळले गेले. आतापर्यंत काय पुरावे मिळाले आहेत याची कोठेही वाच्यता केलेली नाही. सुरवातीच्या काळात कर्नल प्रसाद पुरोहितांबद्दल बरेच खोटे पसरविले गेले. बॉम्बस्फोटात आरडीएक्स वापरले नव्हते असा सुरवातीचा अहवाल होता. काही महिन्यांनी त्यात आरडीएक्स होते असा नवीन अहवाल दिला गेला. नंतर पत्रकार परीषदेत असे सांगितले गेले की लष्कराने काश्मिरला पोहोचविण्यासाठी दिलेले ६०० किलो आरडीएक्स पुरोहितांनी बाँबसाठी वापरले. या आरोपानंतर दुसर्‍या दिवशी तातडीने लष्कराने या खोट्या आरोपांना उत्तर दिले. पुरोहितांना लष्कराने कणभरही आरडीएक्स दिले नव्हते. लष्करात प्रत्येक गोळीचा देखील हिशेब ठेवला जातो. ६०० किलो आरडीएक्स बेपत्ता झाले असते तर लष्कराने आकाशपाताळ एक करून ते शोधले असते असे सांगितल्यावर तपास यंत्रणांनी तो आरोप मागे घेतला. काही काळाने स्वामी असीमानंदांनी कबुलीजबाब दिला अशी अफवा पसरविण्यात आली. त्यांना म्हणे तुरूंगात सेवेसाठी एक मुस्लिम कैदी ठेवला होता ज्याला याच बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली पकडले होते. त्याच्या सेवेमुळे म्हणे असीमानंदांना पश्चाताप झाला व त्यांनी या बॉम्बस्फोटातील आपल्या सहभागाची कबुली दिली असे पसरविण्यात आले. हे प्रसिद्ध झाल्यावर आपण अशी कोणतीही कबुली दिलेली नाही असे असीमानंदांनी सांगितले. तसेच एका कैद्याच्या सेवेसाठी कधीही दुसर्‍या कैद्याला ठेवले जात नाही असे तुरूंगाधिकार्‍यांनी देखील सांगितल्यावर तपास यंत्रणांचा खोटेपणा उघडकीला आला. यातील सर्व आरोपींची प्रत्येकी ४ वेळा नार्को चाचणी करूनसुद्धा आरोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने काहीच माहिती मिळाली नाही. यातील एक आरोपी दयानंद पांडे एका नार्को चाचणीनंतर तब्बल १२ तास बेशुद्ध होता तेव्हा तो जातो की काय या भीतिने तपास यंत्रणा घाबरल्या होत्या. यातील साध्वी प्रज्ञासिंग हिचा कबुलीसाठी खूप छळ केला गेला. तिला जेवणात मांसाहार देणे, अश्लील साहित्य देणे, तिच्या वडीलांच्या मृत्युनंतर अंतिम दर्शनासाठी सुद्धा जामीन न देणे, तिला कर्करोग झाल्यावर उपचाराकरिता जामीन न देणे अशा अनेक प्रकारे तिला त्रास दिला गेला. २०१४ मध्ये सत्तापालट झाल्यावर या प्रकरणाला वेग यायला सुरूवात झाली. काही महिन्यांपूर्वी आरोपपत्र दाखल झाले आहे. आता लवकरच निकाल लागू शकेल. या आरोपींना जामीन मिळू नये यासाठी त्यांचा तब्बल १९ बॉम्बस्फोटात सहभाग आहे असे आरोप करण्यात आले आहेत. यातील समझोता एक्सप्रेसमधील बॉम्बस्फोट आपणच केला अशी कबुली सिमीच्या अतिरेक्यांनी देऊन व पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेऊन सुद्धा आमच्याच हिंदू लोकांनी तो बाँबस्फोट केला अशी मूर्खपणाची विधाने युपीएचे सरकार करीत राहिले. Narco analysis tests conducted on three key activists of the banned Students Islamic Movement of India (SIMI), including Safdar Nagori, have revealed that its activists had helped carry out the Mumbai train bombings of July 11, 2006 and the Samjhauta Express blasts of January 2007, http://indiatoday.intoday.in/story/EXCLUSIVE:+Pak+hand+in+Mumbai+train+blasts,+Samjhauta+Express+blasts,+says+Nagori/1/15655.html भाजप/संघ परिवाराला बॅकफूट्वर नेण्यासाठी युपीएने घेतलेल्या या अत्यंत चुकीच्या भूमिकेमुळे भारताची दहशतवादविरोधी भूमिका लंगडी झाली. जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानला दहशतवादाबद्दल दोषी ठरवितो तेव्हा तेव्हा पाकिस्तान समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाचा उल्लेख करून भारताने अजून "हिंदू अतिरेक्यांना" शिक्षा दिली नसल्याचे सांगून भारताला बॅकफूटवर नेतो. काँग्रेसचे दिग्विजयसिंग, अंतुले इ. नालायक नेते तर २६/११ प्रकरण संघाने घडवून आणले असे जाहीररित्या सांगून भारताच्या तपासयंत्रणेबद्दल संशय निर्माण करीत होते. युपीएच्या या देशद्रोही भूमिकेमुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले आहे. युपीएने विशेषतः काँग्रेसने भारताचे अनेक क्षेत्रात प्रचंड नुकसान केले आहे. परंतु राजकीय स्वार्थासाठी दहशतवाद्यांना पाठीशी घातल्याने होणारे नुकसान सर्वाधिक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 05/03/2016 - 23:54
समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटातील पाकिस्तानच्या सहभागचा हा सविस्तर अहवाल. https://www.quora.com/What-is-the-current-status-of-the-perpetrators-of-Samjhota-Express-incident-Why-did-India-put-a-blame-on-Pakistan-even-though-it-was-done-by-its-own-people
In 2009, the United States Treasury and United Nations Security Council placed sanctions on Lashkar-e-Toiba, and named Arif Qasmani as having played a role in the bombing. “Qasmani Arif [..]chief coordinator of the relations of the [LeT] with other organisations [..] has worked with Lashkar-e-Tayyiba to facilitate terrorist attacks including [..] the bombing of February 2007 in the Samjhauta Express in Panipat (India).” — This is what resolution [No 1267] of the Committee on Sanctions of the United Nations Security Council dated 29.06.2009 declares. Adding that Qasmani was funded by Dawood Ibrahim and he did the fundraising for the LeT and the al-Qaida, the UNSC said, “In exchange for their support, al-Qaida provided support staff for the February 2007 bombing of the Samjhauta Express in Panipat.”
समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटावर हा एक अजून शोध अहवाल आहे. http://www.newindianexpress.com/nation/Samjhauta-Blast-Case-Counter-Investigation-To-NIA-Investigation/2013/01/23/article1432735.ece परंतु भारतातले निधर्मांध अजूनही हा बॉम्बस्फोट तथाकथित "हिंदू अतिरेक्यांनी" केला असे छाती पिटत सांगत आहेत.

In reply to by नाना स्कॉच

lakhu risbud 04/03/2016 - 11:10
कन्हैया ज्या प्रकारे भाषनात मोदि सरकारच्या काला धन,सबका साथ सबका विकास या घोषणाबद्दल टीका करत होता, ते पाहून हा पुढचा केजरीवाल इन making असणार असा विचार येतोय. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत आआप /काँग्रेस कडून नक्की उमेदवार असणार !

In reply to by lakhu risbud

श्रीगुरुजी 04/03/2016 - 13:03
सहमत. बहुतेक तो आआपकडूनच उभा असेल. अर्थात २०१९ मध्ये तो २०१६ प्रमाणेच जेएनयु मध्ये शिकतच असेल. जसे एफटीआयआय मध्ये बरेच लाईफ मेंबर्स आहेत, तसेच जेएनयुमध्येही असावेत. बाकी इतर गोष्टी क्षणभर बाजूला ठेवल्या तरी ज्याचे आईवडील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहेत, वडील बेडरिडन आहेत व जो २८ वर्षांचा असून अजूनही "विद्यार्थी"च आहे, त्याच्या कुटुंबियाचा चरितार्थ, याचे शिक्षण, दिल्लीत राहण्याचा-जेवणाचा खर्च कसा चालत असेल याविषयी कुतूहल आहे. एफटीआयआयच्या तिशी पार केलेल्या "विद्यार्थ्यां"बद्दल हेच कुतुहूल होते.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 04/03/2016 - 13:14
जळतबिळत काही नाही हो. जळण्यासारखं काहीच नाहीय्ये. सुरवातीलाच लिहिलंय ना की कुतूहल वाटतंय म्हणून. का ते सुद्धा वाटू नये? आणि मला कुतूहल वाटलं म्हणून तुम्हाला का त्रास होतोय?

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 04/03/2016 - 14:03
साधारणतः पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्याचं वय काय असावं तुमच्या मते? कोणी तुमच्या ओळखीत नातेसंबंधात पीएचडी झालेले असतील तर विचारुन पहा. विद्यार्थी न होता पीएचडी मिळते का ते.