हा बाजार बंद करा
जर हा बाजार बंद करायचा असेल तर या देवस्थानांना रांगा लावणे बंद करा आणि आपला देव आपल्या मनात पूजा.पहिल्यांदा सगळी देवळे बंद करा. देवाला एकदा रस्त्यावर आणले की तो राहण्यासाठी आपोआप सर्वांच्या मनात घरे शोधू लागेल असे वाटते. थंडीपावसाच्या दिवसात देवालाही उघड्यावर राहणे जमणार नाही. ;) आपला, (अज्ञेयवादी) आजानुकर्ण
In reply to हेच म्हणतो by आजानुकर्ण
In reply to साक्षिदेवा, by विसोबा खेचर
In reply to पटले by भास्कर केन्डे
In reply to लालबागचा राजा.... by प्रभाकर पेठकर
In reply to लालबागचा राजा.... by प्रभाकर पेठकर
In reply to लालबागचा राजा.... by प्रभाकर पेठकर
In reply to लालबागचा राजा.... by प्रभाकर पेठकर
In reply to लालबागचा राजा.... by प्रभाकर पेठकर
In reply to त्यामुळे by विसोबा खेचर
In reply to शीर्षक by प्रभाकर पेठकर
In reply to हे वाक्य by विसोबा खेचर
In reply to भ्रष्टाचार... by प्रभाकर पेठकर
In reply to त्यामुळे by विसोबा खेचर
In reply to लालबागचा राजा.... by प्रभाकर पेठकर
जर हा बाजार बंद करायचा असेल तर या देवस्थानांना रांगा लावणे बंद करा आणि आपला देव आपल्या मनात पूजा.:) +++++++++++१
In reply to समाज प्रबोधनाची आवश्यकता by सुनील
In reply to आज by विसोबा खेचर
In reply to नेटकी वेबसाईट by ऋषिकेश
In reply to विषयांतर by मिसंदीप
In reply to हा बाजार बंद करा... by संजय अभ्यंकर
In reply to भक्ति, उत्सव आणि बाजार. by सर्वसाक्षी
In reply to भक्ति, उत्सव आणि बाजार. by सर्वसाक्षी
In reply to व्यवहार आणि समाजवाद by सुनील
In reply to फरक by सर्वसाक्षी
In reply to ज्या by विसोबा खेचर
In reply to हे कसे? by सर्वसाक्षी
ज्या बाजारात ग्राहक आणि विक्रेते दोघेही स्वखुशीने भाग घेतात, असा कुठलाही बाजार बंद करू नये, असे मला वाटते> मग शिधावाटप केंद्रां ऐवजी खाजगी व्यापार्यांना धान्य विकणे हे कायदेशीर ठरावे का? आणि गुन्हा ठरू नये का? वेश्याव्यवसायाला लावण्यासाठी मुली पळवुन आणणे व दलालाने त्या कुंटणखान्यात विकणे हे ही कायदेशीर ठरावे का? आणि गुन्हा ठरू नये का? दोन्ही उदाहरणात ग्राहक आणि विक्रेते मोठ्या खुशीने सौदा करीत आहेत.मुळीच कळले नाही. खाजगी लोक किराणा कायदेशीरपणे विकताना खूपदा बघितले आहे. आता येथे जर शिधावाटपखात्याच्या मालकीचे धान्य खाजगी विक्रेता विकत असला तर गुन्हा आहे. पण गणपती मंडळ त्या विशिष्ट मूर्तीचे दर्शन विकते आहे. तुमच्या भावात भरलेला देव विकत नाहीत - तुमच्या मनातला देव विकत असते तर चोरी झाली असती, वगैरे. मुलींना पळवून आणणे वगैरेबद्दल मी एक लेख मागे लिहिला होता - मुली आपखुशीने विकत नसतात हीच त्या बाजाराची माझ्या मते अनैतिकता आहे. पण मुली पळवल्याच्या उपमेसारखे या देवदर्शनाच्या बाजारात काय पळवत आहेत? त्या विशिष्ट मूर्तीचे दर्शन कोणाच्या मालकीचे आहे, आणि मंडळ ते पळवून विकते आहे - हे कळले नाही.
विक्रीस ठेवलेली वस्तू आपल्याला नको असेल, किंवा त्याहून अधिक दर्जेदार वस्तू आपल्यापाशी असेल (म्हणजे धनदांडगी नसलेली श्रद्धा) . > तेच तर म्हणतोय. रांगा लावु नका, आपल्या मनीचा देव मनीच पूजा. बाकी देव ही विक्रीची वस्तू आहे का?इथे बहुधा आपली सहमती दिसते आहे. मग एवढा जोरदार रागावलेला प्रतिसाद का दिलात ते समजले नाही. देव विकता येत नसेल, कारण देव ही अनंत कल्पना आहे. एखाद्या विशिष्ट मूर्तीचे दर्शन मात्र सीमित वस्तू आहे - दहा दिवसांत अमुक एक लाखच लोक दर्शन घेऊ शकतात. त्याची सोय करायला पैसे लागतात. हे दर्शन विकणे, म्हणजे देव विकणे, असे तुम्ही म्हणत आहात काय - म्हणून आदल्या सहमतीत असहमतीचा सूर आला काय? पण दर्शन विकत घेणार्या लोकांचे काय मत आहे? ते विशिष्ट मूर्तीचे दर्शन विकत घेत आहेत, की देव विकत घेत आहेत? त्यांचे मन याबाबतीत स्पष्ट असले तर पुरे. तुम्हाला मला दर्शन विकत घ्यायचे नसले, तर आपण त्या बाजारात जाऊ नये. ज्यांना दर्शन विकत घ्यायचे असेल ते लोक त्या बाजारात जातील.
तर वेगळे मंडळ स्थापावे. समविचारी लोक तिथे जमतील. बाजार बंद न करताही जमती> प्रबोधन करता येत नाही असे स्विकारून ही पळवाट का पकडावी? रस्त्यात दगड आहे, लोक ठेचकाळत आहेत. तो उचलायचा व दूर करायचा प्रयत्न करायचा, मदतीसाठी पांथस्थांना हाक द्यायची की 'मला काय करायचे आहे' असे म्हणुन वळसा घालुन निघुन जायचे?येथे प्रबोधनाचा कुठला विषय आहे, आणि कुठून वळसा घालून निघायचे हे कळत नाही. ज्यांना लालबागच्या गणपतीलाच जायचे आहे, त्यांना "तिथे जाऊ नका - मनातल्या देवाला पूजा" असे प्रबोधन करायचे आहे का? जरूर करा. पण हे रस्त्यातल्या धोंड्यासारखे नाही. योग्य उपमा गजबजलेल्या रस्त्याची आहे - "अमुक रस्त्यावर ट्राफिक जॅम आहे, तिथून न जाता तमुक रस्त्याने सहज जाता येईल" हे प्रबोधन झाले. पण तो गजबजलेला, ट्राफिक जाम झालेला रस्ता बंद पाडा, असे म्हणणे योग्य वाटत नाही.
तुमची श्रद्धा-पद्धती खरी आणि ट्रस्ट बसवणार्यांची श्रद्धापद्धती खोटी याबद्दल तुम्हाला खात्री आहे का? तसे असल्यास ट्रस्टीमंडळींना बदला. प्रयत्न करूनही तसे जमत नसेल, तर तुमची श्रद्धा-पद्धती ही लोकांना पटत नाही, असे सिद्ध होते. मग त्यांना न पटता त्यांची पद्धती (बाजार म्हणून) बंद करण्याचा आग्रह करणे म्हणजे मुजोरी होईल.> अरे वा! एकही मंत्री भ्रष्टाचारात सापडत नाही, तुरुंगात जात नाही म्हणजे भ्रष्टाचार नाहीच असे मान्य करायचे की सर्वत्र भ्रष्टाचार सर्वत्र होत आहे आणि आपल्याला पटत नाही तेव्हा तो बंद कराची मुजोरी न करता आपणही त्यात सहभागी व्हायचे?येथे भ्रष्टाचाराचा काय संबंध आहे हे कळले नाही. मंडळ हिशोब चोख ठेवत असेल तर ठीक आहे. "आपणही त्यात सहभागी व्हायचे" हा प्रश्न माझ्या "आपण वेगळे मंडळ काढावे" वाक्याच्या नेमके उलट जातो. हा प्रश्न तुम्ही का विचारलात, हे समजले नाही.
असो. ज्याची त्याचे विचारसरणी.कायदेशीर गोष्टींबाबत मान्य. मुलींचे अपहरण करणे, चोरून अन्न विकणे आणि मंत्र्याने जनतेचे पैसे चोरणे, याबाबत सर्वच विचारसरणींमध्ये "असे व्हायला नको". कायदेशीर बाजार चालू देणे [माझे मत] = चोरी/अपहरण करणे [तुमच्या प्रतिसादावरून माझ्या मताच्या समान], असे तुम्ही कसे म्हणत आहात ते कळले नाही.
In reply to समजले नाही by धनंजय
In reply to सुसंगत आहे by सर्वसाक्षी
In reply to सुसंगत आहे by सर्वसाक्षी
In reply to सुसंगत आहे by सर्वसाक्षी
In reply to अत्यंत वाईट प्रकार by धोंडोपंत
In reply to विरोध by सर्वसाक्षी
हेच म्हणतो