हा बाजार बंद करा
आज संध्याकाळपासून सातत्याने अनेक वाहिन्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिलेला तिथल्या 'कार्यकर्त्या'ने अक्षरश: ढकलुन, अवमानित करून हाकलले त्याचे प्रक्षेपण करीत आहेत. संपर्क साधला असता उत्सवाचे प्रमुख उपलब्ध नाहीत वा कॅमेर्यासमोर येत नाहीत असे काही वाहिन्या सांगत आहेत तर एका वाहिनीवर लालबाग राजा चे श्री. सुनिल जोशी यांनी 'ती महिला चपला घालुन व विशेष महत्वाच्या व्यक्तिंकरीता असलेल्या रांगेत जात होती व तिने सांगुन न ऐकल्यामुळे नाइलाजाने कार्यकर्त्यांना असे वागावे लागले' अशी मल्लिनाथी केली. हे कुणाला पटलेले दिसत नव्हते. अनेक भक्तांनी वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना इथले कार्यकर्ते फार अरेरावीने वागत असल्याची व काहींनी तर मारहाण देखिल करत असल्याची माहिती दिली. मात्र याच देवाच्या दर्शनाला आलेले मुख्यमंत्री, कलाकार वगैरेंची मात्र उत्तम बडदास्त ठेवली जात असल्याचे दाखविले. काय खरे काय खोटे ते बाप्पाच जाणे.
मात्र या प्रकाराने एकुणच देवा धर्माच्या बाजारीकरणचा उबग आला. तिरुपती बालाजी, शिर्डीचे श्री साईबाबा, दादरचा श्री सिद्धिविनायक... एक देव यातुन सुटला नाही. सर्वसामान्य भक्त रांगेत तिष्ठत तासनतास उभे असताना केवळ पैसा, प्रसिद्धी वा अधिकाराच्या जोरावर अग्रक्रमाने दर्शन घेणे व ते घेतले जाऊ देणे हे खरोखरच किळसवाणे आहे. अशा देव-धर्म दलालांमुळे लोकांचा व एकंदरीतच समाजाचा देवावरील विश्वास उडाला तर त्यात नवल ते काय? पैसे घऊन कागद पटकन हलविणारा अंमलदार आणि पैसे देऊन वा अधिकार/ नाव-लौकिक वापरुन देवाचे दर्शन यात सर्वसामान्य माणसाला साधर्म्य भासल्यास गैर ते काय? माझ्या अंगी तासनतास रांगेत उभे राहुन दर्शन घेण्याईतका भक्तिभाव नसला तरी भक्त रांगेत उभे असताना पुढे जाऊन वेगळ्या मार्गाने दर्शन घेण्याईतका मुर्दाडपणाही नाही.
एकिकडे लोकशाहीच्या गप्पा माराच्या आणि दुसरीकडे राजेशाही वा सरंजामशाही भोग भोगायचे! लोकशाहीत राष्ट्राला आणि देवळातल्या देवाला सगळे समान! मग असा भेदभाव का? लाखो वारकरी शेकडो मैल तंगडतोड करून पांडुरंगाच्या दर्शनाला आसुसलेले असताना मंत्री संत्री राजरोस त्यांना बाजुला सारून हक्काने मनसोक्त पूजा करणार! हा कुठला न्याय?
जर हा बाजार बंद करायचा असेल तर या देवस्थानांना रांगा लावणे बंद करा आणि आपला देव आपल्या मनात पूजा.
मला लहानपणी वाचलेली 'खुलभर दुधाची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प राजाने केला व सक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचा हुकुम सोडला. सार्या गावाने सगळे दूध ओतले तरी गाभारा भरेना. अखेर एक म्हातारी आली. तिने राजाचा हुकुम बाजुला सारून आपल्या घरच्या वासराना, लेकराना दूध पिऊ दिले आणि उरलेले खुलभर दूध ती देवळात घेऊन आली. तिने आपला गडु देवावर ओतताच गाभारा ओसंडुन वाहु लागला.
हेच म्हणतो
In reply to हेच म्हणतो by आजानुकर्ण
देवळे
In reply to देवळे by आजानुकर्ण
+१
+१
सर्वसाक्ष
हं बाजार आहे हेच खरं!
साक्षिदेवा,
In reply to साक्षिदेवा, by विसोबा खेचर
पटले
In reply to पटले by भास्कर केन्डे
+१
तात्या जिंदाबाद!!!!
खुलभर पाण्याची कहाणी
लालबागचा राजा....
In reply to लालबागचा राजा.... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to लालबागचा राजा.... by प्रभाकर पेठकर
लालबागचा राजा....
In reply to लालबागचा राजा.... by प्रभाकर पेठकर
सहमत
In reply to लालबागचा राजा.... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to लालबागचा राजा.... by प्रभाकर पेठकर
त्यामुळे
In reply to त्यामुळे by विसोबा खेचर
शीर्षक
In reply to शीर्षक by प्रभाकर पेठकर
हे वाक्य
In reply to हे वाक्य by विसोबा खेचर
भ्रष्टाचार...
In reply to भ्रष्टाचार... by प्रभाकर पेठकर
त्यामुळे
In reply to त्यामुळे by विसोबा खेचर
तोंड बंद करणे....
In reply to लालबागचा राजा.... by प्रभाकर पेठकर
सहमत आहे
तात्यांशी
गर्दी..
समाज प्रबोधनाची आवश्यकता
In reply to समाज प्रबोधनाची आवश्यकता by सुनील
अंधश्रद्धा....
लालबागचा राजा
नवा बिजनेस सेक्टर
..
आज
In reply to आज by विसोबा खेचर
नेटकी वेबसाईट
In reply to नेटकी वेबसाईट by ऋषिकेश
एक वेबसाईट
विषयांतर
In reply to विषयांतर by मिसंदीप
पण त्याच
हा बाजार बंद करा...
In reply to हा बाजार बंद करा... by संजय अभ्यंकर
नागपाड्या
भक्ति, उत्सव आणि बाजार.
In reply to भक्ति, उत्सव आणि बाजार. by सर्वसाक्षी
वा...
In reply to भक्ति, उत्सव आणि बाजार. by सर्वसाक्षी
व्यवहार आणि समाजवाद
In reply to व्यवहार आणि समाजवाद by सुनील
फरक
In reply to फरक by सर्वसाक्षी
ज्या
In reply to ज्या by विसोबा खेचर
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by सर्वसाक्षी
जनहीत
शक्यतोवर बाजार बंद करू नये
मस्त
हे कसे?
In reply to हे कसे? by सर्वसाक्षी
समजले नाही
In reply to समजले नाही by धनंजय
सुसंगत आहे
In reply to सुसंगत आहे by सर्वसाक्षी
साक्षिदेव
In reply to सुसंगत आहे by सर्वसाक्षी
साक्षिदेव
In reply to सुसंगत आहे by सर्वसाक्षी
ठीक आहे - चोरीच्या मालाचा बाजार थांबवा
वरील
मला नाही
अत्यंत वाईट प्रकार
In reply to अत्यंत वाईट प्रकार by धोंडोपंत
त्या
विरोध
In reply to विरोध by सर्वसाक्षी
मात्र
विजय असो
अर्रे हे काय?