Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २

लेखक किणकिनाट यांनी शुक्रवार, 28/08/2015 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
धाग्याच्या आधीच्या भागात प्रतिसाद शंभरहून जास्त झाल्याने नवीन भाग सुरु करत आहोत - आधीचा भाग वाचनमात्र करतो आहोत. यापुढील चर्चा इथे चालू रहावी. संपादक मंडळ.
ईतकी वर्ष आपल्या पहिल्यावहिल्या केबलला चिकटून राहिल्यावर आता डिश टि.वी. घ्यायचे म्हणतो. आम्हाला दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) लागणार आहेत. टाटा स्काय का ईतर कुठला सेवा पुरवठेदार चांगला? दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) साठी मासिक शुल्क दुपटिऐवजी एक आणि अर्ध्यापेक्क्षा थोडे कमी द्यायचे पॅकेज कोणि देत का? सेवा , दर्जा कोणाचा चांगला आहे. माहितगार मि.पा. कर मदत करा. महिती आणि सल्ला द्या ही विनंती.

वाचने 58885
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

काही वर्षापुर्वी ई टीव्ही मराठीवर एक मालीका होती,'तीन तेरा पिंपळपान'नावाची.मजा यायची पहायला. पण आता ती तु नळीवर सापडत नाही.खुप वेळा शोधले पण नाही सापडली. कुणाला आठवते का ती मालीका?आणि तिची लिंक देऊ शकेल का कोणी?

In reply to by टवाळ कार्टा

निळा जादू 'रोशन' होताना पाहण्यात आहे, काय सांगावे त्याची "ती" असू शकेल... काळी जादू! (टीप: हि वर्ण द्वेषी प्रतिक्रिया नाही!! )

सध्या तुळेला साडेसातीचा शेवटचा चरण सुरू आहे म्हणतात पण नक्की कधी संपतेय साडेसाती कुणी सांगु शकेल काय?

कधी सुखद वाटले बंध ,हे रक्ताचे संबंध धागा धागा जुळवीत जाता आनंदा ये भरते किती भुमिका करते

In reply to by उपयोजक

अरे वा...तुमच्याकडे आहे का ही कविता? लिंक असेल तर देता येइल का? कारण आपण दिलेले शब्द मी परत सर्च केले तरी फक्त एवढ्याच ओळी (आपण ज्या अगोदर दिल्या होत्या त्या) मिळत होत्या... आगाउ धन्यवाद!

. १) परवा कट्यारच्या मूळ नाटकातील खॉंसाहेबांच्या दोन शिष्यांची पात्रे ज्या पद्धतीने रंगवली आहेत, त्याबद्दल कोणीतरी लिहिलेले वाचले. मागे नाटक पाहताना मलाही त्या दोघांचे सुरूवातीचे विदुषकी व नंतरचे खुनशी चाळे खटकले होते. ही दोन्ही पात्रे दुर्लक्ष न करता यावीत, इतकी इरिटेटिंग आहेत. दारव्हेकरांनी ही इतकी सैल जागा नाटकात का सोडली असावी? शिवाय माझ्या मते खॉंसाहेबांचे पात्रही योग्य पायावर उभे राहिलेले दिसत नाही. संगीतनाटकात संवाद केवळ कथा पुढे नेण्यासाठीच असावेत हे मान्य, पण येथे तो भाग फारच ढिसाळपणे येतो. एकंदरीत या नाटकाची कथा न पाहता ते नाटक केवळ गाण्यांसाठी पहावे की ऐकावे असे होते. तर मग दारव्हेकरांचे नाटककार म्हणून एवढे कौतुक का केले जाते? की हा सांभाळून घेण्याचा प्रकार आहे? समिक्षकांनी गाण्यांव्यतिरिक्त या नाटकाची काही शक्तिस्थळे आहेत का हे सांगितल्यास हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल. २) केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका/नगरपालिका यांच्या निवडप्रक्रियेत शैक्षणिक वा तर पात्रतेत काय फरक असतो का? तीच गोष्ट शाळा-कॉलेजांची, पण तो मुद्दा नाही. सरकारी भरतीमध्ये जर शैक्षणिक पात्रतेप्रमाणे फरक असतो, तर वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना त्यात काही फरक असतो का? केंद्र व राज्य पातळीवर दोन्ही सरकारांचा बराचसा खर्च कर्मचा-यांच्या पगारावरच होतो, तर मग शेतक-यांचे हित कसे जपले जाईल असे प्रश्न विचारले जात आहेत म्हणून विचारतो. या कर्मचा-यांच्या वेतनश्रेण्या वेगळ्या असतील, पण सर्वांना तेवढीच (टक्केवारीप्रमाणे) वेतनवाढ लागू होते का? त्यानंतर हेच लोण अगदी खासगी शाळा/कॉलेजांमधील शिक्षकांपर्यंत कसे पोहोचते? ३) पेशव्यांच्या आयांची व बायकांची कटकारस्थाने या विषयावर काही पुस्तक किंवा संशोधनग्रंथ आहे काय? सोयराबाईंनी संभाजीचा छळ करून किंवा अन्य कारणांनी शिवाजीराजांना मनस्ताप दिला यावरून परस्परविरोधी मते आहेत. आता मस्तानीच्या निमित्ताने शनिवारवाड्यातल्या बायकांकडून महापराक्रमी बाजीरावाचाही मानसिक छळ झाला याबद्दल बोलले जात आहे. त्याव्यतिरिक्त केवळ धमानंदीबाईंबद्दलच ऐकले जाते. या पार्श्वभूमीवर अशा संशोधनाची आवश्यकता आहे. अर्थात हे संशोधन अगदी बाळाजी विश्वनाथापासून ते पेशवाई बुडेपर्यंतच्या काळासाठी असावे. ४) फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद हे आपल्या २६ जानेवारीच्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून येणार आहेत असे कळले. आता त्यावरून इसिसचे लक्ष भारताकडे जाईल या शक्यतेवरून वाद निर्माण करून मोदींना दोष दिला जाईल. म्हणजे वाद निर्माण करण्याचा हेतु हा. थोडी वाट पहा. ५) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, मग म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांना कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही. तेव्हा वैचारिक दारूगोळा तयार ठेवा. शिव्या वगैरे न देता. ६) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ गांडीची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। आजच्या काळात डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे? तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली दएणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात. अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे. ७) कलर्स वाहिनीवर राम कदम यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम दाखवत आहेत. भयानक. कार्यक्रमातील प्रसंगांचे संवाद लिहिणारी धन्य व्यक्ती कोण आणि गाण्यावरील नृत्यांच्या स्टेप्स बसवणारी व्यक्ती कोण याचा शोध घेऊन त्यांचे राम कदमांवरील कार्यक्रमाची पुरेपूर वाट लावल्याबद्दल अभिनंदन करायला हवे. ८) इन्व्हर्टर सायनुसॉयडल वेव्हचा नसेल, स्क्वेअर वेव्हचा असेल, तर त्या इन्वर्टरवर चालणारा पंखा आवाज का करतो? आता थोडी जरी 'लिहिण्याची' कुवत असती, तर हाच मुद्दा पुढील संवादांने मांडता आला नसता का? “काय पांडबा कसला इचार करतुयास?” “आरं, इंटर कुटला घ्याचा इचार करतुया शिवा.” “अरं त्यात कशापाइ इचार कराचा, त्या आप्पानं लावलाय की येक इंटर. सस्त न मस्त. तवा कशापायी इचार करतुया?” “आरं, त्ये आप्पाकडचं बेनं लाईटी नसल्या की पंक्याचा गुरू-गुरू असा आवाज करतंय. त्येची म्हातारी लय घाबरतीया तसल्या आवाजानं. त्या आप्पाला येडं बनवलया इंटर इकणा-यानी." "आता हिबी भानगड हाय व्हय, ते बग ते इंजिनियर साहेब चालल्याती. त्यांस्नी इचारू." दहा सेकंदांनी...... “काय पांडबा, काय शिवा, काय चाललंय?” “इंजिनियरसाहेब, ह्यो पांडबा इंटर घ्याचा म्हंतोय. पण त्या आप्पाकडच्या इंटरवर लाईटी नसली की त्येचा पंका लई आवाज करतुया म्हनं.” “हा हा. अरे शिवा, इंटर नव्हे इन्व्हर्टर. आणि तो जर स्क्वेअर वेव्हचा असेल तर मग वीज नसेल तर पंखा आवाज करतो. पण त्याने जर सायनुसॉयडल आउटपुटचा इन्व्हर्टर लावला असता तर मग तसा आवाज येत नाही. “आस्स व्हय, त्ये कायबी आपल्याला कळ्ळं न्हाय, पर त्यो दुस-या परकारचा इंटर असला की पंका आवाज कसा काय करत नाय?” “अं, अं, तेच तर येथे विचारलय की. कोणी सांगितलं की मग तुला सांगतो पांडबा.”

जुने कपडे कुणाला द्यावेत? मध्ये कुठेतरी एका संस्थेची माहिती वाचली होती. ते जुने कपडे, वस्तु घेऊन पुढे गरजु लोकांना त्याचे वाटप करत असत. पुण्यात ठराविक दिवशी त्यांची मीटींग होते असंही काहीसं वाचल्म होतं. पुण्यातल्या अशा एखाद्या संस्थेची माहिती आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

संस्थेचं नाव विसरलो. त्यांना फोन केला तर घरी येऊन घेऊन जातात. लहानांचे - मोठ्यांचे सगळ्यांचे कपडे देऊ शकता. त्यांच्या ऑफिस मधे जाऊन पण देऊ शकता. ऑफिस ब्रेमन सर्कल पासून सांगवीकडे येतांना (जेव्हढं मला आठवतंय पुलाच्या आधी ऊजवीकडे एका दुकानात) आहे. फोन केल्यावर ते सांगतीलंच.

In reply to by नाव आडनाव

फोन लावला. राँग नंबर निघाला. :( ह्या निमित्ताने शोधता शोधता हा ही एक ग्रुप सापडला आहे:- JAGRITI CLOTHES COLLECTION DRIVE पण इथे फोन केला असता ते नेहमीच असे कपडे घेत नाहीत असं कळालं. त्यांनी मध्यंतरी एक कॅम्प केला होता. त्याचे हे पेज आहे.

In reply to by पिलीयन रायडर

ओह... नंबर बदलला वाटतंय. मी फोन केला होता आत्ता. संपादक, जर शक्य असेल तर माझा प्रतिसाद काढून टाकता येइल का? चुकिचा नंबर ठेवायला नको. मी शनिवारी / रविवारी त्या भागात गेलो तर नवा नंबर आणि संस्थेचं नाव अपडेट करतो इथे.

In reply to by आदूबाळ

हो.. बहुदा केसरीवाड्यात त्यांची मीटींग व्हायची. कुठेतरी अगदी पेठांमधलाच पत्ता होता. एकंदरीत अशा संस्थाना कपडे देण्याचा अनुभव कसा आहे? कुणी कधी कपडे दिले आहेत का? मला फक्त दिलेल्या गोष्टींचा सदुपयोगच व्हावा इतकीच इच्छा आहे. नाव आडनाव धन्यवाद! लगेच फोन करते.

In reply to by आदूबाळ

सहज म्हणुन लोक बिरादरी प्रकल्पाची साईट पाहिली. ते ही अशा वतु घेतात असं लिहीलय आणि पुण्या मुंबईतले संपर्क दिले आहेत. पैकी पुण्यातल्या व्यक्तिने सांगितले की इथुन कपडे नेणे अवघड जात असल्याने सध्या ते काही घेत नाहीयेत, पण त्यांनी सुद्धा केसरीवाड्यातल्या कलेक्शन सेंटरचा नंबर दिलाय. स्नेहालय केसरी वाडा सचिन - ९०११०३३०११ वेळ - गुरुवार आणि रविवार - सकाळी ११-२ सर्व प्रकारचे कपडे, खेळणे घेतात. पुढे ह्या वतु २५ वेगवेगळ्या संस्थांना जातात. मी ह्या रविवारी जाण्याचा विचार करत आहे. अनुभव सांगेन.

जुने कपडे - केसरीवाड्यापर्यंत काही जाणे झाले नाही. तेव्हा वॉचमन, सफाईवाला, कामवाल्यामावशी.. अशा लोकांनाच कपडे वाटुन टाकले. खेळणी तेवढी आहेत. ती आजुबाजुलाच लहानमुलं बघणार आणी देऊन टाकणार. पुढचा प्रश्नः- पुण्यात चांगले फर्निचर कुठे मिळेल / चांगला सुतार कुणाला ठाऊक आहे का? १. एकबोटेसारखे नामवंत शोरुम्स - उत्तम डिझाईन्स पण महाग २. पेपरफ्राय - व्हरायटी आणि किफायतशीर , पण डायरेक्ट घरात आल्यावरच कळणार की प्रॉडक्ट कसे आहे. नाही आवडले तर परत पाठवा. पैसे परत मिळवा. ह्यात बराच वेळ जाण्याची शक्यता. ३. सुतार - हवे तसे घडवुन घेता येते पण मग एकदा घरात आले की ह्या मंडळींना बाहेर काढणे अवघड. शिवाय जसे ट्रेन्डी / एथनिक डिझाईन्स एकबोटे किंवा पेपरफ्राय सारख्या तत्सम साईट्स वर दिसतात तसे घडवुन घेता येतात का ते माहित नाही. (मला घराचा कोपरा न कोपरा लाकडाने मढवुन "इंटिरियर" करयाचे नाहीये. आवश्यक तेवढ्या गोष्टी करुन घ्यायच्या आहेत किंवा तयार आणायच्या आहेत. उत्तम लाकुड आणि अ‍ॅण्टीक/ वेगळे डिझाईन हे निष्कर्ष आहेत)

In reply to by पिलीयन रायडर

पेपरफ्राय वरच्या प्रॉडक्ट बद्दल मला पण माहीती हवी होती. कोणाला काही अनुभव आहे का?

In reply to by प्रसाद१९७१

पपर फ्रायवरुन मित्राने डबल बेड मागवला. तेच डिझाईन गोदरेज ईंटेरिओचे पाह्यले. ते २० के च्या वर जात होते डिस्कांऊट पकडून. पेपरफ्राय वर ११७०० ला मिळाला. सीओडी पण दिली. सोलापूरात फ्री डिलीव्हरी दिली ५ दिवसात. पीसेस मध्ये आला. पुण्यात असेल तर इन्स्टॉलेशन फ्री मिळते म्हणे. कंपनीच्या पोरीने संगितले लोकल कारागीराकडून करुन घ्या. बिल मेल करा. तेवढी अमाऊंट पेबॅक पण झाली. (आम्ही आमचा कारागीर लावून ८०० चे बिल पाठवले. ६०० सँक्शन झाले ;) ) क्वालिटी एक नंबर आहे. फिनेश ईंटरनॅशनल लेवल चे आहे. बेडवर मेड इन मलेशियाचा स्टॅम्प आहे. ऑलोव्हर बेस्ट प्रॉडक्ट अन बेस्ट सर्विस वाटली. व्हरायटी पण भारीपैकी आहे गोदरेज ईंटेरिओपेक्षा. अर्बन लॅडर ज्यादाच महाग आहे.

In reply to by प्रसाद१९७१

माझ्या मैत्रिणीने एक मोठा वॉर्डरोब, बेड आणि शु रॅक मागवले. तिन्ही उत्तम आहेत. एकदा एका प्रॉड्क्ट मध्ये काही तरी मायनर प्रॉब्लेम होता तर त्यांनी परत नेला आणि नवीन आणुन दिला. आता तर म्हणे त्यांची सर्व्हिसही चांगली झाली आहे. आधी थोडेसे प्रॉब्लेम होते ट्रान्सपोर्ट मध्ये ज्यामुळे तुटलेले फर्निचर यायचे. मग ते परत पाठवा वगैरे भानगडी. काहीतरी मागवुन पहावे असे वाटत आहे खरे..

In reply to by पिलीयन रायडर

पेपरफ्रायच्या किचन ट्रॉली (आणि बाकी किचन मधलं फर्निचर) आहेत का? कोणी ट्रॉलीचं काम त्यांच्याकडून केलंय का? त्यांच्या साईट वर काही दिसलं नाही. माझ्या घरी करायचंय, पण इथे लिहिलंय तसं पेपरफ्राय ची क्वालिटी चांगली आहे आणि किंमत गोदरेज पेक्षा कमी आहे, तर पेपरफ्राय चा ऑप्शन चांगला आहे.

In reply to by नाव आडनाव

किचन ट्रॉली आहेत पण कमी आहेत. इतर ओप्शन चेक करा. गोदरेजचे रेट जास्त आहेत पण चीज एक नंबर असते. ते आरएन्डी वर केलेले पैसे काढतात. थोड्या दिवसात त्याच्या कॉप्या लोकल मार्केटला येतात. गोदरेजचे फिनीश अन ऑपरेशन स्मूथ आहे प्रचंड. ते मात्र कॉप्यात मिळत नाही. इंटेरिओचे आता घेऊ नका. सध्या लग्नसराईचा पीक पिरिअड असतो त्यांचा. ऑफर नसतात. जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये फुल्ल ऑफर येतात. क्लीअरन्स सेल असतात. अगदी निम्म्या किमतीपर्यंत मिळू शकतात. मी स्वतः माझे कम्प्युटर टेबल असेच ऑफर मधून उचलले. लै परफेक्ट आहे. t

अहो साहेब तुम्ही http://www.pepperfry.com/ या साईटवर जा. भरपुर पर्याय आहेत तिथे. मी आपला पत्ता , फोन क्रमांक देवुन स्वत:ला नोंदणी करुन घेतयावर लगेच एक संदेश आलाय की तुम्हाला रु. १०,००० चे कुपन प्राप्त झाले आहे. आत हे खरे खोटे देव जाणे.

आमच्या घरच्या आंब्याला मोहोर आलाय. डिसेंबरात मोहोर येतो काय? तसेच झाडाला अर्धशिशि झाल्यागत एकाच बाजूने मोहोर आलाय. असे का होते ते कुणाला काय म्हाइत है का?

एका माहितीतल्या कुटुंबातील लहान मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले आहे . अशा कुठल्या सामाजिक संस्था आहेत ज्या खर्चामध्ये मदत करु शकतात .

In reply to by सिरुसेरि

परळच्या जेरबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये बहुतेक लहान मुलांच्या शस्त्रक्रिया रास्त किंमतीत केल्या जातात, आणि त्यांच्या (वाडिया ट्रस्टच्या) आर्थिक मदतीचाही लाभ घेता येतो. यकृताच्या दुखण्यासाठी शस्त्रक्रिया असेल तर या संस्थेद्वारा मदत मिळेल. अन्यत्र आर्थिक मदत बहुतेक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेद्वारा मिळेल.

टिव्ही मधील सेटिंग्स मेनुमध्ये अनेक पर्याय दिलेले असतात . त्यांच्या योग्य व्हॅल्युज काय असाव्यात ? जसे की - कलर शार्पनेस , कॉन्ट्रास्ट , बॅकलाईट , ब्राईटनेस . ऑडिओ - ट्रिबलम, ब्रास , पीसीम , ऑटो , स्टिरीओ

शाळेत असताना तिरंगी झेंड्याचे एक गीत पाठ केले होते.आता त्यातील काही ओळी आठवतात्,पण सुरुवात आठवत नाही...... ये चौबीसो अरे चक्र के हम को सिखलाते सावधान चौबीसो घंटे हम में है बल भरते येवढेच आठवते. कोणाला आठवते का पुर्ण गाणे?

स्काउट गाइड झंडा गीत भारत स्काउट गाइड, झंडा ऊँचा सदा रहेगा | ऊँचा सदा रहेगा, झंडा ऊँचा सदा रहेगा | नीला रंग गगन सा विस्तृत भ्रात भाव फैलाता | त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओ की याद दिलाता | और चक्र कहता है प्रतिपल, आगे कदम बढ़ेगा | ऊँचा सदा रहेगा, झंडा ऊँचा सदा रहेगा | भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा | ये चौबीसो अरे चक्र के हम से प्रतिपल कहते | सावधान चौबीसों घंटे हम मे है बल भरते | | तत्पर सदा रहे सेवा मे जीवन सफल बनेगा | ऊँचा० हर हित रक्षा मे हम जीवन हँस- हँस दे दे अपना | इस झंडे पर मर मिटने का है सुखदायी सपना | | सेवा का पथ दर्शक झंडा घर- घर मे फहरेगा ऊँचा० भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा | |

१. अमेरिकेत मातीचा गणपती बनवायचा असेल तर माती कुठे मिळेल? मायबोलीवर मागे कधीतरी ह्यावर चर्चा आणि गणपतीचे फोटो पाहिले होते पण आता सापडत नाहीत. कुणी अमेरिकेत गणपती घरीच करतं का? २. एखाद्या व्यक्तिची ओपन हार्ट सर्जरी झाली असेल, वय - ५५, डायबेटीस असेल तर मेडिकल इन्शुरन्स होत नाही का? (हार्ट सर्जरी व्हॉल्व्ह बदलण्यासाठी झाली होती. व्हॉल्व्हचे आयुस्।य १०-१२ वर्ष सांगितले होते. सर्जरी होऊन ७ वर्ष झाली.)

In reply to by पिलीयन रायडर

एक हौशी सहकारी कागदाच्या लगद्याचा गणपती (eco friendly papier mache) करतो. अति-सुंदर वगैरे नसलेला गणपती चालणार असेल तर विचारेन.

मंडळी , मी गोरेगाव मुम्बई येथे राहतो. ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहकुटुंब ३ दिवसांची सहल काढू म्हणतो. बेसिकली , आराम करणे आणि चांगले सामिष (मासळीचे) भोजन करणे असा कार्यक्रम असेल. जवळपास काही टुरिस्ट स्पॉट असेल तर ठीक... किंवा समुद्र किनारा असेल तर उत्तमच. वडिलांचे वय (७५) लक्षात घेता बोरिवली ते डहाणू या मध्ये एखादा रिसॉर्ट शोधत आहे. कारण फार जास्त प्रवास करू इच्छित नाही. एखादा चांगला (फॅमिली साठी) रिसॉर्ट कोणी सुचवू शकेल का? धन्यवाद.

गाणी शोधण्यात मदत हवी आहे. १. छान पालखी सजवा न माझ्या राजाला मिरवा ह्या गाण्याची चाल असलेलं मूळ मराठी गाणं कोणतं ? "डोंगर", "सपान" असे शब्द त्या गाण्यात आहेत. २. अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं ह्या गाण्याची चाल असलेलं मूळ गुजराती गाणं कोणतं? सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ऐकलं होतं आणि तेंव्हा खूप आवडलं होतं, पण आता नेमके शब्द आठवत नाहीत. रच्याक, आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे हे सुमन कल्याणपुरांचे सुमधुर गीत मला परवापर्यंत माहित नव्हतं.