मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( मुंबईत जुहूबिचवर छटमोहोत्सावाला ५००००० जणांची उपस्थिती ! )

पगला गजोधर · · काथ्याकूट
* सर्वप्रथम डॉ. इ. ए. साहेबांची माफी मागतो ** आमची प्रेर्ना नुकत्याच(काही महिन्यांच्यापूर्वी) झालेल्या, उत्तर-भारतीयांचा महत्त्वाचा सण असलेल्या छट पूजेसाठी मुंबईतील समुद्र किनारे गर्दीने फुलले होते. कार्तिक शुक्लषष्ठीच्या मावळत्या सूर्याला अर्ध्य देण्यासाठी लाखो भक्तांनी मुंबईच्या किनाऱ्यावर गर्दी केली होती. सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व उन्नती व्हावी आणि नैसर्गिक संकटापासून मुक्ती मिळावी या उद्देशाने उत्तर भारतीय समाजाच्या वतीने छटपुजा करण्याची प्रथा आहे. एकट्या जुहू बिचवर पाच लाखांवर भाविक जमले होते. अक्सा, पवई, गिरगाव, आणि वांद्रयातही भाविकांनी पुजा केली होती. **** निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ***ने पुन्हा उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याची कवायत सुरू केली आहे. त्यासाठी मुंबई भा**चे अध्यक्ष व रा*- **रे यांचे 'मित्र' अशी ओळख असलेले आमदार *** *** यांनी मुंबईभर छटपूजेचे बॅनर झळकवले होते. या कार्यक्रमाला अनेक नामांकीत व्यक्तींची उपस्थिती होती. समारंभाची काही क्षणचित्रे... Celebrities puja crowd sunset

वाचने 5352 वाचनखूण प्रतिक्रिया 20

कैलासवासी सोन्याबापु 17/08/2015 - 11:10
छठ दिवाळी नंतर आठवडा भरात असते , काही महीने आधी म्हणजे तुमचा रेफेरेंस मागच्या दिवाळी चा आहे काय?

माईसाहेब कुरसूंदीकर 17/08/2015 - 12:16
अन्य राज्यांमध्ये मराठी रहिवाशांनी त्यांच्या सणाला अशी मोठी गर्दी करुन भक्ती (अन्य राज्याप्रती) दाखवत सोहळा केला तर कितपत स्वीकारला जाईल? ..उपस्थितांपैकी कितींजण थालिपीठ्,मिसळपाव खात असावेत? कवि.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पगला गजोधर 17/08/2015 - 12:25
माइ, या गोष्टी मुम्बैतिल नागरिकांमुळे शक्य होतात. या मोहोत्सवामध्ये सुरुवातीला स्थानिक राजकीय मेम्बर/मेम्ब्रान्ची भाषणे होतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पगला गजोधर 17/08/2015 - 13:10
या धाग्याच्या निमित्ताने, आपल्या लेखावर (अमेरिकेत स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाला ३८,००० जणांची उपस्थिती !) जिथे हर्ष व्यक्त केला, त्यांची प्रतिक्रिया इथे (या धाग्यावर) कशी असेल हे जाणून घ्यायची मला उत्सुकता, म्हणून हा प्रपंच…….

चलत मुसाफिर 17/08/2015 - 13:14
छट पूजा हा एक हिंदू सण असून हिंदू समाजाने तो एकत्रितपणे साजरा करणे अपेक्षित आहे. बिहारी हिंदू बांधवांची या प्रसंगी मोठी उपस्थिती असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. किंबहुना मुंबईत या सोहळ्याला एक दिमाखदार व शालीन असा मराठी रंग का चढू नये, हा एकच प्रश्न मला पडतो. मराठी हिंदूंनी हा सण आपलासा करून सामूहिकरीत्या साजरा करावा.

In reply to by चलत मुसाफिर

जडभरत 17/08/2015 - 14:05
हं जर आपण रोजच सूर्याला अर्घ्य देतो तर हा सण आपलासा करणेस काय हरकत आहे. त्या निमित्ताने होणारी राजकीय साठमारी तरी थांबेल.आपले आर्य पूर्वज त्या मानाने खरेच ग्रेट. अनेक परकीय देवता व सण त्यांनी खुल्या दिलाने स्वीकारले.

कैलासवासी सोन्याबापु 17/08/2015 - 13:21
मुसाफिर, तसे केल्यास राजकीय पोळ्या कश्या भाजल्या जातील?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मास्टरमाईन्ड 18/08/2015 - 20:38
खरोखरच मार्मिक आणि बव्हंशी खरी प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर 17/08/2015 - 14:57
आज गिरगाव चौपाटी येथील पूजा पाहिली. फार मजा आली. सगळ्यात सुरवातीला जी पूजा पाहिली ती पाहुन मन प्रफुल्लित झाले माझे तरी. ज्यांचे आधार कार्ड्स बॅकलॉगमधे अडकले आहेत असे लोक ह्या रॅलीमध्ये होते. आणि 'हमे क्या चाहिये? आधार कार्ड!!! अशा आरोळ्या देत चालले होते!!! बाकी फोटो टाकते नंतर. बिलियन स्पायडर

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नाव आडनाव 17/08/2015 - 15:09
:) माईसाहेब, आज ईनोदी परतिसाद? (आता म्हणू नका तो प्रतिसाद माझा नाही. माझा आयडी हॅक झाला होता :) )

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सिद्धार्थ ४ 18/08/2015 - 01:42
ह्या आमच्या माई नाहीत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 18/08/2015 - 20:46
माईसाहेब, नानासाहेबांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व समृद्धी लाभो यासाठी तुम्ही वटपौर्णिमा, हरतालिका, छठ पूजा, कडवा चौथ इ. व्रतवैकल्ये, उपासतापास करता का नाही? कडवा चौथच्या रात्री चाळणीतून चंद्र बघून मग त्याच चाळणीतून नानासाहेबांना बघता ना?

बोका-ए-आझम 18/08/2015 - 01:10
असं गाणं गात ते (तुमचे हे) गिरगाव चौपाटीजवळच्या रस्त्यावरून फिरताना दिसले मला. परवाचीच गोष्ट!