Skip to main content

"कॉन्व्हेण्ट" मुलांच्या पालकांवर कारवाई करा .. - भालचंद्र नेमाडे बडबडले !

लेखक हेमन्त वाघे यांनी शनिवार, 15/08/2015 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
भालचंद्र नेमाडे या व्यक्तीबद्दल कधीही फारसा आदर नवता. आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर म्हतार् चळ लागलेला दिसतो हे पहा त्यांची मुक्ताफळे http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/punished-those... ‘कॉन्व्हेण्ट’ मुलांच्या पालकांवर कारवाई करा Maharashtra Times| Aug 14, 2015, 03.49 AM IST इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतल्याने आपल्या पाल्याचे भवितव्य घडते, ही पालकांची अंधश्रद्धा आहे. उलट पालक आपल्या पाल्याचे भविष्य बिघडवत असून, कॉन्व्हेण्ट शाळांच्या 'कत्तलखान्या'तील घोकंपट्टीमुळे ते आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत. याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना कॉन्व्हेण्ट शाळेत घालणाऱ्या पालकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईत व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राने कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता सभागृहात 'समकालीन साहित्य आणि समाज' या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. देशी भाषांची जननी संस्कृत नाही 'देशात एक हजार ६५७ भाषा आहेत, मात्र, यापैकी एकाही भाषेची जननी ही संस्कृत भाषा नाही. उलट भारतीय भाषांमधून संस्कृत भाषेचा जन्म झाला. मात्र, संस्कृत भाषेला भारतीय भाषांची जननी असल्याचे काही प्रस्थापित भाषांमधून ​बिंबवले जात असले, तरी संस्कृत भाषा ही कधीही भारतीय मूळ भाषांची जननी नव्हती,' असे ठाम वक्तव्य डॉ. नेमाडे यांनी यावेळी केले. मराठी भाषेच्या साहित्याचा उगम हा इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात झाला. त्या काळात जैन मराठी व्याकरणकारांनी मराठी भाषा पुढे आणली. परंतु, त्यांचा इतिहास हिंदूंकडून पुसला गेल्यानेच मराठीचा उगम बाराव्या शतकात झाल्याचे सांगण्यात येते. ही बाब इतिहासाला धरून नसल्याचेही नेमाडेंनी यावेळी स्पष्ट केले. साहित्याचे समाजीकरण आणि विस्तारीकण होणे ही काळाची गरज असून, समकालीन साहित्य आणि समाज या दोन्ही परस्पर पूरक बाबी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ---------------------- आपले मत काय ? बाय द वे यांना कॉन्व्हेण्ट शाळा अपेक्षित आहेत कि सर्व इंग्लिश माध्यमाच्या शाळा ? यांना त्यातला फरक तरी माहित आहे ना ? सध्याच्या अनेक चांगल्या शाळा जसे कि जमनाबाई , मानेकजी , रायन , DPS , पोदार या कॉन्व्हेण्ट नाहीत. आणि माझी मुलगी इंग्लिश शाळेत शिकते कारण मला ते आवयाषक वाटते. भले मराठी माध्यमातून अनेक महान लोक निघाले असतील .. पण मी जेवा मराठी माध्यमातून आलेले DJ , VJ , इंग्लिश लेखक ( मराठी लेखनात पैसा मिळत नाही - जातो !) , सुपर मोडेल ( मधुताई साप्रेंचा अपवाद वगळता - आणि अनेकजणी तीचापेक्षा मोठ्या हत्या) कोण विचारतो - तेवा मला कोणीच समाधानकारक उत्तर देत नाही ..

वाचने 17950
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by अजया

ओह आख झो...सॉरी..अच्छा अच्छा असे म्हणायचे आहे मला. (माझं मराठी फक्त इंग्रजाळलेलं नाही, जर्मनाळलेलं पण आहे ;) )

मी आपलं शिस्तीत डांगेंना प्रतिसाद दिला, खालचा गोंधळ वाचलाच नाही. हा तर पॉपकॉर्नवाला धागा हय!!

दिमागकी बत्ती जल गई अब पिराजीकी! ये वर आता पाॅपकाॅेर्न घेऊन.माझ्यातले देणार नाही;)

आमाला बी पॉपकॉर्न घेऊन बसावे लागणार! एका लिमिट पर्यंत संयत बोलायचा यत्न केला आता अजुन खाली नाही जाऊ शकत लेवल! तस्मात् आम्ही ही पॉपकॉर्न

लेखाचे शीर्षक चुकले आहे. शीर्षकात "भालचंद्र नेमाडे बडबडले" या शब्दांऐवजी "भालचंद्र नेमाडे बरळले" किंवा "भालचंद्र नेमाडे पचकले" असे शब्द हवे होते. अवांतर - निव्वळ चित्र बघून भालचंद्र नेमाडे व श्याम मनोहर हे वेगवेगळे ओळखता येतील का कोणाला?

नेमाडे आणि काही इतर तथाकथित पुरोगामी आणि निधर्मांधांची मुक्ताफळे - नेमाडे बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले शिवाजीमहाराजांचे चित्रण इतिहासाला धरून नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये. बाबासाहेबांच्या निष्ठेविषयी अजिबात शंका घेतायेणार नाही. त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. मात्र,शिवाजी महाराजांबद्दलची आमच्या मनात असलेली प्रतिमा वेगळी आहे. बाबासाहेबांचे लेखन माझ्या आकलनामध्ये बसत नाही, असेही नेमाडे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घरोघरी पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या वादाने आता राजकीय क्षेत्रापलीकडे उडी घेतली आहे. पुरंदरे यांना जाहीर झालेला हा पुरस्कार रद्द करावा, अशी मागणी करणारे एक निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले असून त्यावर माजी साहित्य संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे, स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या विद्या बाळ, ‘अंनिस’च्या मुक्ता दाभोलकर, मेधा पानसरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. पुरंदरे यांना हा पुरस्कार दिल्यास त्यांच्या विकृत लेखनास राजमान्यता मिळाल्यासारखे होईल, अशी भीती राज्यातील फुले-आंबेडकर-शाहूंचे विचार मानणाऱ्या वर्गास वाटत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे ‘तथाकथित इतिहास संशोधक’ असून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तसेच बहुजन स्त्रियांबद्दल अत्यंत अवमानकारक लिखाण त्यांनी केले आहे, कोणतेही समकालीन पुरावे नसताना त्यांनी केलेले लेखन कट्टरवादाला खतपाणी घालणारे असून शिवरायांसारख्या युगपुरुषाची प्रतिमा ठरावीक समाजासाठी मर्यादित करून मलीन करणारे आहे, असा आरोपही या नामवंतांनी निवेदनात केला आहे. मी बाबासाहेब पुरंदर्‍यांचे शिवचरीत्र अनेकवेळा वाचलेले आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तसेच बहुजन स्त्रियांबद्दल अवमानकारक असा एकही शब्द नाही. असल्यास दाखवून द्यावा.

In reply to by श्रीगुरुजी

ते निवेदन त्या सह्या करणार्‍यांनी वाचले आहे का अशीच शंका येते. त्यात बर्‍याचश्या पेपर्स मधे मूळ निवेदन्/पत्रक कोणते व नेमाडी ,कोतापल्ले इत्यादींचे मत कोणते हेच कळत नाही, इतके मिक्स केले आहे.

मुलं इंग्रजी माध्यमात शिकली तर यांना भविष्यात वाचकवर्ग कसा मिळणार ? - परश्या (भाई)

In reply to by ऋतुराज चित्रे

उच्च न्यायालयाचा निर्णय निस्संशय वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे तेंव्हा तो कायद्याच्या निकषावर टिकणार नाही.सर्वोच्च न्यायालयात त्यावर स्टे नक्कीच मिळेल. मला माझ्या मुलाला कोणत्या शाळेत घालायचे आहे ते न्यायालय ठरवू शकत नाही( आज्ञार्थ असू शकत नाही) फार तर सुचवू शकेल( विध्यर्थ) आणि त्यासाठी माझ्या पगारातून पैसे कापू शकत नाही. फार तर मला फी चा परतावा मिळणार नाही असे म्हणू शकेल. न्यायालयीन अतिक्रमणाचे हे उत्तम उदाहरण आहे. (judicial overreach). न्यायालयात न्याय मिळत नाही निकाल मिळतो याचेही हे उत्तम उदाहरण.

गोपाळ गणेश आगरकर हे पण इंग्रजीतून शिकले होते>> त्यावेळी जबरदस्तीने, नाईलाजाने इंग्रजी शाळेतूनच शिकावं लागत होतं . इंग्रज सरकार मातृभूमितून शिक्षण देणाऱ्या शाळांना परवानगी देत नवतं . कारण त्यांना स्वस्तात ,मातीमोल किमतीत त्यांच्यासाठी राबणारे मजूर निर्माण करायचे होते . मुद्दा इंग्रजी शाळेचा नसून कॉन्वेंट शाळेचा आहे हे परत परत सांगून सुधा मुद्दा लक्षात आला नसेल तर धन्य आहात .अध्यात्मात फार पुढे गेलेल्या एका व्यक्तीचं आत्मचरित्र मध्ये वाचनात आलं होतं .त्यांचं स्वतःच शिक्षण कॉन्वेंट मध्ये झालं होतं . त्यांनी कॉन्वेंट मध्ये वेगवेगळ्या धर्मांबद्दल काय गलिछ शिकवलं जातं हे वाचून चीड आली होती