काही दिवसांपूर्वी सफदरजंग चा मक़बरा पाहायला गेलो होतो. छान आहे. वीकडे होता. मक़बरा बघायला म्हणून फार कमी लोक आलेले. मला धरून 7. बाकी सगळे कपल्स हिरवळीवर झाडाखाली. मोठा परिसर आहे आणि गर्दी नसते. फारसे कुणी जात नाही.5 रूपयात दिवसभर फूल प्राइवेसी. ऐसी आझादी और कहाँ!
मनात आले की दिल्लीतल्या अशा जागांवर एक अभ्यासपूर्ण लेख लिहावा. म्हणजे स्वस्तात मस्त प्राइवेसी कुठे मिळेल ह्याचे रेडी रेक्नॉर बनेल. मराठी पोरे पोरी दिल्लीला जातील तेव्हा कामी येईल.
पुराना किल्ला गेलो तेव्हा तर शोधून शोधून सांदिकोपरे पाहून ठेवले होते. Occupied! तेव्हा अशी पॉपुलर, overcrowded स्थळे वगळता प्रेमी जीवांना काही अनवट वाटा कळाल्या तर उत्तमच अशी कल्पना होती. सध्याच्या व्यापात हा प्रकल्प तडीस नेणे कठीणच आहे म्हणा. पण आमच्या एका व्हाट्सऐप ग्रुपवर या मुद्द्यावर जरा चर्चा झाली तेव्हा. परवा अचानक मढ़ आइलैंड च्या बातमीमुळे ती चर्चा परत आठवली.
आपल्याकड़े, विशेषतः मोठ्या शहरांत प्राइवेसी ही एक मोठी समस्या आहे. मोठे कुटुंब किंवा लहान घर असेल तर घरांमध्ये जागेअभावी प्राइवेसी मिळत नाही, होटल बुक करावे तर ह्या धाडी पडण्याची शक्यता, बहुतेक पर ऑवर बेसिस वाली होटल्स अवैध असतात. काही काही छुपे कैमरे लावतात असे ऐकिवात आहे. बहुतेक तरुणतरुणी आपले प्रकरण घरी सांगू शकत नाहीत, मग लपतछपत भेटणे वगैरे. एकदंर बरीच कुचंबना होते. तेव्हा मग नाइलाजाने ऐतिहासिक स्थळे, राखीव जंगले, बगीचे वगैरे जागी शक्य तेवढी क्षुधाशांती केली जाते.
सरसकट समस्या नाकरण्यात अर्थ नाही, किंवा संस्कृती बुडते म्हणून कंठशोष करण्यातही अर्थ नाही. शेवटी प्राइवेसीच्या शोधात इकडेतिकडे जाणारे फ़क्त लफडी करणारेच असतात असे नव्हे तर विवाहित जोडप्यांनाही नाइलाज म्हणून हां उपाय करावा लागतो. तर आपल्याकडे जसे सार्वजनिक शौचालय असते तसे सार्वजनिक संभोगालय का असू नये? सध्या असलेल्या अवैध होटल्सना एक वैध, नियमबद्ध स्वरूप देता येईल. खात्रीने प्राइवेसी मिळेल. ह्या इमारती ख़ास कपल्ससाठीच असणार. हफ्तावसूली, धाडी यांपासून मुक्ती मिळेल. इथे वेश्या व्यवसाय चालू नये यासाठी संबंधित कायदे उभारून त्यावर आणि इतर संभाव्य समस्यांवर तोडगा काढता येईल.
भारताचे शहरीकरण वाढत जाणार आहे. पुरेशी प्राइवेसी लाभेल अशा जागा कमी कमी होत जातील. वन रूम किचन किंवा एका खोलीत संसार करणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. तेव्हा वरवर पाहता विचित्र वाटणारी ही संकल्पना तेवढी विचित्र वाटणार नाही. बगीचे किंवा ऐतिहासिक स्थळांमध्ये पोरांसोबत,कुटुंबासोबत फिरताना अवघडल्यासारखे वाटणार नाही. ओंगळवाणी दृश्ये दिसणे कमी होईल. आडवाटेला खासगी जागा शोधण्यातले धोके(लूटमार, बलात्कार,कधी कधी खून) वगैर कमी होतील. सामाजिक स्वास्थ्याकरिता भविष्यात सार्वजनिक संभोगालये सुद्धा आवश्यक ठरतील असे वाटते.
1. मिपाकरांचे काय मत आहे?
2. संभाव्य अडचणी काय असू शकतात?
3. इतिहासात अशी उदाहरणे आहेत का? (इथे वेश्यागृहांची उदाहरणे नकोत.)
4. आणि मोठा प्रश्न, हे शक्य आहे का? ह्याला किती विरोध होणार. विरोध होणार हे नक्की, पण तीव्रता किती असणार?
5. धाडी टाकून पोलिसांचे हफ्ता वसुलण्याचे धंदे बंद पडतील असे वाटते काय? की तिथेही कायद्यात पळवाट शोधतील?
वाचने
29412
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
यात वाय फाय अॅडवा..
In reply to +१ य्प by द-बाहुबली
वाचतोय.
सार्वजनिक शौचालय असते तसे
नैसर्गिक गोष्टी आणि शरीराचे
In reply to सार्वजनिक शौचालय असते तसे by तुडतुडी
वा वा वा! हिंदूंच्या प्रत्येक
In reply to नैसर्गिक गोष्टी आणि शरीराचे by उगा काहितरीच
कामवासनेवर नियंत्रण हा भारतीय
In reply to वा वा वा! हिंदूंच्या प्रत्येक by संदीप डांगे
आता तुम्ही जैन, बुद्धापर्यंत
In reply to कामवासनेवर नियंत्रण हा भारतीय by उगा काहितरीच
गैरसमज दूर करण्याच्या तुमच्या
In reply to आता तुम्ही जैन, बुद्धापर्यंत by संदीप डांगे
पुरातन हिंदू ते सद्यस्थितीतले
In reply to गैरसमज दूर करण्याच्या तुमच्या by उगा काहितरीच
पुरातन हिंदू ते सद्यस्थितीतले
In reply to पुरातन हिंदू ते सद्यस्थितीतले by संदीप डांगे
धन्यवाद
जीभेचे चोचले पुरवतो तर
@सार्वजनिक संभोगालये ,
एका कॉमन समस्येला वाचा
सार्वजनिक संभोगालयात
मुलगी सज्ञान असेल तर
In reply to सार्वजनिक संभोगालयात by डायवर
फसवणूक.
In reply to मुलगी सज्ञान असेल तर by कहर
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
In reply to फसवणूक. by द-बाहुबली
प्रतिसादाबद्दल दोघांचे
In reply to लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार by संदीप डांगे
बरोबर.. अगदी बंडल कायदा आहे
In reply to प्रतिसादाबद्दल दोघांचे by कहर
जर सज्ञान मुलगी आई वडिलांच्या
In reply to प्रतिसादाबद्दल दोघांचे by कहर
बरोबर! कृपया ही बाजू देखील
In reply to जर सज्ञान मुलगी आई वडिलांच्या by द-बाहुबली
सज्ञान चा अर्थच योग्य अयोग्य
In reply to जर सज्ञान मुलगी आई वडिलांच्या by द-बाहुबली
कहर आहे.
In reply to सज्ञान चा अर्थच योग्य अयोग्य by कहर
ब्बरोब्बर बक्षीजी!
In reply to कहर आहे. by द-बाहुबली
इट्स बॅक्षी, बॉमकेस बॅक्षी ;)
In reply to ब्बरोब्बर बक्षीजी! by जडभरत
साॅरी प्यारेजी!!! ;););)
In reply to इट्स बॅक्षी, बॉमकेस बॅक्षी ;) by प्यारे१
:D :D
In reply to साॅरी प्यारेजी!!! ;););) by जडभरत
सज्ञान व्यक्तीसोबत बलात्कार
In reply to कहर आहे. by द-बाहुबली
मी सज्ञान लोकांनी केलेला
In reply to कहर आहे. by द-बाहुबली
मी सज्ञान लोकांनी केलेला
In reply to कहर आहे. by द-बाहुबली
मी सज्ञान लोकांनी केलेला
In reply to कहर आहे. by द-बाहुबली
चुकून सज्ञान लोकांनी केलेला
In reply to मी सज्ञान लोकांनी केलेला by कहर
बडे दिलवाले
जाता जाता
In reply to बडे दिलवाले by नमकिन
मला पण हा एक जालीय विनोदच
In reply to जाता जाता by सुबोध खरे
डबलसीट नामक सध्या नुकत्याच
विनोदच