Skip to main content

सार्वजनिक संभोगालये

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 10/08/2015 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी सफदरजंग चा मक़बरा पाहायला गेलो होतो. छान आहे. वीकडे होता. मक़बरा बघायला म्हणून फार कमी लोक आलेले. मला धरून 7. बाकी सगळे कपल्स हिरवळीवर झाडाखाली. मोठा परिसर आहे आणि गर्दी नसते. फारसे कुणी जात नाही.5 रूपयात दिवसभर फूल प्राइवेसी. ऐसी आझादी और कहाँ! मनात आले की दिल्लीतल्या अशा जागांवर एक अभ्यासपूर्ण लेख लिहावा. म्हणजे स्वस्तात मस्त प्राइवेसी कुठे मिळेल ह्याचे रेडी रेक्नॉर बनेल. मराठी पोरे पोरी दिल्लीला जातील तेव्हा कामी येईल. पुराना किल्ला गेलो तेव्हा तर शोधून शोधून सांदिकोपरे पाहून ठेवले होते. Occupied! तेव्हा अशी पॉपुलर, overcrowded स्थळे वगळता प्रेमी जीवांना काही अनवट वाटा कळाल्या तर उत्तमच अशी कल्पना होती. सध्याच्या व्यापात हा प्रकल्प तडीस नेणे कठीणच आहे म्हणा. पण आमच्या एका व्हाट्सऐप ग्रुपवर या मुद्द्यावर जरा चर्चा झाली तेव्हा. परवा अचानक मढ़ आइलैंड च्या बातमीमुळे ती चर्चा परत आठवली. आपल्याकड़े, विशेषतः मोठ्या शहरांत प्राइवेसी ही एक मोठी समस्या आहे. मोठे कुटुंब किंवा लहान घर असेल तर घरांमध्ये जागेअभावी प्राइवेसी मिळत नाही, होटल बुक करावे तर ह्या धाडी पडण्याची शक्यता, बहुतेक पर ऑवर बेसिस वाली होटल्स अवैध असतात. काही काही छुपे कैमरे लावतात असे ऐकिवात आहे. बहुतेक तरुणतरुणी आपले प्रकरण घरी सांगू शकत नाहीत, मग लपतछपत भेटणे वगैरे. एकदंर बरीच कुचंबना होते. तेव्हा मग नाइलाजाने ऐतिहासिक स्थळे, राखीव जंगले, बगीचे वगैरे जागी शक्य तेवढी क्षुधाशांती केली जाते. सरसकट समस्या नाकरण्यात अर्थ नाही, किंवा संस्कृती बुडते म्हणून कंठशोष करण्यातही अर्थ नाही. शेवटी प्राइवेसीच्या शोधात इकडेतिकडे जाणारे फ़क्त लफडी करणारेच असतात असे नव्हे तर विवाहित जोडप्यांनाही नाइलाज म्हणून हां उपाय करावा लागतो. तर आपल्याकडे जसे सार्वजनिक शौचालय असते तसे सार्वजनिक संभोगालय का असू नये? सध्या असलेल्या अवैध होटल्सना एक वैध, नियमबद्ध स्वरूप देता येईल. खात्रीने प्राइवेसी मिळेल. ह्या इमारती ख़ास कपल्ससाठीच असणार. हफ्तावसूली, धाडी यांपासून मुक्ती मिळेल. इथे वेश्या व्यवसाय चालू नये यासाठी संबंधित कायदे उभारून त्यावर आणि इतर संभाव्य समस्यांवर तोडगा काढता येईल. भारताचे शहरीकरण वाढत जाणार आहे. पुरेशी प्राइवेसी लाभेल अशा जागा कमी कमी होत जातील. वन रूम किचन किंवा एका खोलीत संसार करणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. तेव्हा वरवर पाहता विचित्र वाटणारी ही संकल्पना तेवढी विचित्र वाटणार नाही. बगीचे किंवा ऐतिहासिक स्थळांमध्ये पोरांसोबत,कुटुंबासोबत फिरताना अवघडल्यासारखे वाटणार नाही. ओंगळवाणी दृश्ये दिसणे कमी होईल. आडवाटेला खासगी जागा शोधण्यातले धोके(लूटमार, बलात्कार,कधी कधी खून) वगैर कमी होतील. सामाजिक स्वास्थ्याकरिता भविष्यात सार्वजनिक संभोगालये सुद्धा आवश्यक ठरतील असे वाटते. 1. मिपाकरांचे काय मत आहे? 2. संभाव्य अडचणी काय असू शकतात? 3. इतिहासात अशी उदाहरणे आहेत का? (इथे वेश्यागृहांची उदाहरणे नकोत.) 4. आणि मोठा प्रश्न, हे शक्य आहे का? ह्याला किती विरोध होणार. विरोध होणार हे नक्की, पण तीव्रता किती असणार? 5. धाडी टाकून पोलिसांचे हफ्ता वसुलण्याचे धंदे बंद पडतील असे वाटते काय? की तिथेही कायद्यात पळवाट शोधतील?

वाचने 29412
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

कल्पना काही वाईट नाही, स्वरुप कसं असेल सांगता येत नाही. -दिलीप बिरुटे

सार्वजनिक शौचालय असते तसे सार्वजनिक संभोगालय का असू नये>> शाब्बास . हेच राहिलं होतं . नैसर्गिक गोष्टी आणि शरीराचे चोचले पुरवणार्या अनैतिक गोष्टी ह्यांच्यातला फरक पण कळेनासा झालाय

In reply to by तुडतुडी

नैसर्गिक गोष्टी आणि शरीराचे चोचले पुरवणार्या अनैतिक गोष्टी ह्यांच्यातला फरक पण कळेनासा झालाय
या वाक्याचा तीव्र शब्दांत निषेध ! कामासारख्या अत्यावश्यक क्रियेला फक्त शरीराचे चोचले कसे काय म्हणू शकतात लोक ? ताई/भाऊ थोडे स्पष्ट बोलतोय राग मानू नका ! पण कामाशिवाय तुमचा , माझा जन्म तरी झाला असता काय ? माझ्या दृष्टीने काम ही अतिशय पवित्र क्रिया आहे. (त्यामुळेच बहुधा आपल्या प्राचीन मंदिरात तशा मुर्त्या वगैरे आहेत.) पण मधल्या काळात मुस्लीम राज्यकर्ते व त्यांची पडदा पद्धत , स्त्रीयांना दूय्यम मानन्याची वृत्ती यामुळे व रानटी पणा मुळे आपली पण दृष्टी कामाकडे एक टाबू म्हणूनच पाहू लागली, जगाला कामशास्त्र शिकवीणार्या देशातच कामाकडे एका कुत्सीत नजरेने पाहाण्यात येते आहे , यापेक्षा दुर्दैव ते काय !

In reply to by उगा काहितरीच

वा वा वा! हिंदूंच्या प्रत्येक प्रश्न/समस्यांचे मूळ मुस्लिमांमधेच आहे असे ठाम विश्वास आहे काही लोकांचा. बंधो, जरा अपनेही गिरेबान में झांक कर देखो. स्त्री नरकाचे द्वार आहे, कामवासना मोक्षापासून भरकटवणार्‍या असतात. असल्या अफलातून कल्पना आपल्याच हिंदूलोकांनी पसरवलेल्या आहेत. मी वरच सांगितलेलं की कामवासनेवर नियंत्रण हा भारतीय समाजाच्या मते सर्वोच्च सद्गुण आहे. कामक्रिडेबद्दल घृणा पसरवण्याचे पवित्र कार्य आपल्या सो कॉल्ड साधुसंतांनी केलंय. हिंदू समाज नेहमीच सर्वसंगपरित्याग करणार्‍यांना आदर्श मानत आलाय. त्यातूनच असले विचार उपजले आहेत. इथे मुस्लिमांचा आणि त्यांच्या संस्कृतीचा काहीही संबंध नाहीये.

In reply to by संदीप डांगे

कामवासनेवर नियंत्रण हा भारतीय समाजाच्या मते सर्वोच्च सद्गुण आहे. कामक्रिडेबद्दल घृणा पसरवण्याचे पवित्र कार्य आपल्या सो कॉल्ड साधुसंतांनी केलंय. हिंदू समाज नेहमीच सर्वसंगपरित्याग करणार्‍यांना आदर्श मानत आलाय.
हे अलिकडच्या काळातील जैन, बुद्ध ही लाट आल्यानंतर . त्याअगोदर काम हे जीवनाचा अविभाज्य अंग होते. व सर्वसंगपरीत्यागला ग्लॅमर तर अशोकाच्या काळानंतरच आले. त्याआधी ऋषीपण संसार करत असत. (काही थोडे जे सर्वसंगपरीत्याग करीत ते समाजात रहातच नव्हते ) -‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ' अशा संस्कृतीचा आदर असलेला

In reply to by उगा काहितरीच

आता तुम्ही जैन, बुद्धापर्यंत पोचले का...? बरं बरं. थोड्यावेळाने अजून मागे जाल... नाही? असो. ऋषी हे साधु, संत, सन्यासी ह्याच कॅटेगीरीत येतात हा हिंदू संस्कृतीबद्दल प्रचंड माहिती असल्याचा गैरसमज असलेल्या हिंदूंचा एक फार मोठा गैरसमज आहे महाराजा...

In reply to by संदीप डांगे

गैरसमज दूर करण्याच्या तुमच्या प्रयत्नासाठी आभार ! मे बी तुम्ही म्हणताय तसा माझा गैरसमज होत असेल कदाचित ! पण मला एवढेच म्हणायचे होते कि पुरातन हिंदू संस्कृतीला काम हा विषय त्याज्य नव्हता . मधल्या काळात (जैन, बुद्ध व त्यानंतर मुस्लीम ) हा विषय असा तिरस्करणीय झाला . (मांसाहारी अन्नाबद्दलही तेच. असो तो वेगळा विषय असल्या कारणामुळे येथे चर्चा करणे योग्य नाही)

In reply to by उगा काहितरीच

पुरातन हिंदू ते सद्यस्थितीतले हिंदू यांच्या काम ह्या विषयीच्या बदलणार्‍या मताला इतरधर्मीय विचार कारणीभूत आहेत हा विचित्र दावा काही पटला नाही बुवा! कारण बौद्ध, जैन यांची धर्मतत्त्वे ही मूळ हिंदू विचारपद्धतीतूनच आली आहेत असा कर्मठ हिंदूंचा दावा असतो. मुस्लिम धर्मातही कामवासना ह्या वाईट आहेत, त्यांचा त्याग करणेच इष्ट असं काही आहे असं दिसत नाही (संदर्भः चार-चार विवाह. असंख्य पोरांची पैदास). आपल्या धर्मातल्या चुकीच्या चालीरितींचे खापर दुसर्‍या धर्मावर फोडणे व भारतातल्या स्त्रियांच्या स्थानाचा आणि कामक्रिडेच्या स्थानाचा बादरायण संबंध जोडणे विस्मयकारक आहे इतकेच.

In reply to by संदीप डांगे

पुरातन हिंदू ते सद्यस्थितीतले हिंदू यांच्या काम ह्या विषयीच्या बदलणार्‍या मताला इतरधर्मीय विचार कारणीभूत आहेत हा विचित्र दावा काही पटला नाही बुवा!
हिंदू संस्कृती ही प्रवाही आहे. त्यामुळे नवीन धर्मातील काही गोष्टी अंगीकारण्यात आल्या त्यात नवल नाही. शिवाय धाकदपटशहा ही होताच . त्यामुळे काही चांगल्या/वाईट गोष्टी अंगीकारण्यात आल्या .
कारण बौद्ध, जैन यांची धर्मतत्त्वे ही मूळ हिंदू विचारपद्धतीतूनच आली आहेत असा कर्मठ हिंदूंचा दावा असतो.
माझ्या एका लेखात उल्लेख आला होता कि universal set व sub set मधे समानता असणारच की !
मुस्लिम धर्मातही कामवासना ह्या वाईट आहेत, त्यांचा त्याग करणेच इष्ट असं काही आहे असं दिसत नाही (संदर्भः चार-चार विवाह. असंख्य पोरांची पैदास).
मुस्लीम धर्माबद्दल माझा जास्त अभ्यास नाही आहे त्यामुळे बोलू इच्छित नाही , माफी असावी .
आपल्या धर्मातल्या चुकीच्या चालीरितींचे खापर दुसर्‍या धर्मावर फोडणे व भारतातल्या स्त्रियांच्या स्थानाचा आणि कामक्रिडेच्या स्थानाचा बादरायण संबंध जोडणे विस्मयकारक आहे इतकेच.
मला कालखंडाबद्दल बोलायचे होते.स्त्रियांच्या स्थानाचा व कामक्रिडेच्या स्थानाचा काय संबंध लावला मी ? (रच्याकने यापुढचा माझा प्रतिसाद रात्री मिळेल )

हां धागा इथे टाकताना उथळपणाकडे तर सरकणार नाही ना अशी भीती होती, पण वर उत्तम चर्चा झाली आहे. अनेक मुद्दे आले आहेत. अनेकांनी ही एक समस्या आहे हे मान्य केले आहे आणि संयतपणे या संकल्पनेवर चर्चाही केली आहे. मिपावरून संपूर्ण भारतीय जनतेचा कौल घेणे बरोबर होणार नाही, पण आपल्या विचारांत हळूहळू का होईना, पण बदल होत आहेत. आपण थेट शॉक्ड न होता त्यावर चर्चा करतोय हे दृश्य सुखावह आहे. मला वाटते भारतात शहरीकरण आणि जागेची, प्राइवेट स्पेस ची कमी जाणवू लागेल तेव्हा वर प्रतिसादात आल्याप्रमाणे लवर्स पार्क किंवा जापान्यांसारखे लव होटल्स ही येतील आणि त्यांना अगदीच तीव्र विरोढ होणारही नाही कदाचित. समाजाच्या मानसिकतेमध्ये हळूहळू बदला होत राहील. धर्म अर्थ आणि मोक्षाच्या मागे उर फूटेस्तोवर धावताना काम कड़े ही लक्ष द्यायला पाहिजे हे लक्षात येईलच कधीतरी. वर तुडतुड़ी ह्यांनी शरीराचे चोचले हा शब्द वापरला आहे. आपण जीभेचे चोचले पुरवतो तर शरीराचे चोचले का पुरवू नये? त्यात काय वाईट नेमके? रोजरोज आंघोळ करणे, केस विंचरणे, हलकेच पण नटणे हे पण शरीराचे चोचले पुरवणे आहे ना? काम ही पण शरीराची एक गरज असेल तर ती भागवणे ह्याला चोचले पुरवणे कसे म्हणावे? त्यात अनैसर्गिक काय आहे?आणि वर डॉ खरे आणि अजून कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ह्यांचा वापर विवाहित जोडपीच कदाचित जास्त करतील,कारण त्यांना खरेच प्राइवेट स्पेस मिळत नाही. तर हे नैसर्गिक नव्हे का? (नेट च्या समस्येमुळे मला फ़क्त रात्री उशीरा किंवा पहाटे मिपावर येणे शक्य होते(वारंवार पेज लोड करावा लागतो), त्यामुळे चर्चेत भाग घेता आला नाही. तरी सबकु थैक्यू वेरी मच.)

जीभेचे चोचले पुरवतो तर शरीराचे चोचले का पुरवू नये? >>> जीभेचे चोचले प्रमाणाबाहेर पुरवणं धोक्याचं तसाच शरीराचे चोचले पुरवणंहि . काम ही पण शरीराची एक गरज असेल तर ती भागवणे ह्याला चोचले पुरवणे कसे म्हणावे?>> काम ही पण शरीराची एक गरज आहे ह्याच्याची सहमत आहे . म्हणून तर लग्न व्यवस्था आहे . लग्न काय फक्त वंश वाढवा , म्हातारपणाची काठी मिळावी एवढ्याच हेतूने केलेलं असतं का ? शरीराची गरज पुरवणं हा एक मोठा हेतू असतो ना त्यात . विवाहित जोडप्यांना प्रायव्हेट स्पेस मिळत नाही हा बिनबुडाचा युक्तिवाद आहे . किती विवाहित जोडप्यांना पुरेशी प्रायव्हसी नसते ? तशी नसेल तर लोक लग्नच करणार नाहीत . लपून छपून करणाऱ्यात अविवाहित आणि व्यभिचार करणारे असतात . ह्यांचा वापर विवाहित जोडपीच कदाचित जास्त करतील>>> गैरसमज आहे .

@सार्वजनिक संभोगालये , वाचायला विचित्र वाटत आहे.. पण एकंदर सगळा विचार केल्यावर अश्या गोष्टींची आवश्यकता आहे.. हे पटतय.

एका कॉमन समस्येला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद. फक्तं यात एकच धोका आहे - अशा जागा हा ब्लॅकमेलर्सचा अड्डा बनण्याची शक्यता आहे. समोरच्या पानटपरीवर किंवा हॉटेलमध्ये कॅमेरा घेऊन बसायचं आणि तिथून बाहेर पडणार्‍यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करायचं.

सार्वजनिक संभोगालयात प्रवेशासाठी दोघांनाही प्रौढ असल्याचा म्हणजे वयाचा पुरावा द्यावा लागेल. याची सरकार दफ्तरी कायमस्वरूपी नोंद राहील. आपल्या देशात " प्राइवेसीचा अधिकार " घटनेने दिलेला नाही. म्हणजे माहितीच्या अधिकारामुळे हे सर्व उघड होणार. जर दोघेही अविवाहित असतील आणि भविष्यात पुढे दुसर्याच व्यक्तीशी या प्रकारांची कल्पना 'न' देता विवाह झाला तर तो संसार जास्त काळ टिकणार नाही. जर दोहोंपैकी एक विवाहित अन एक अविवाहित असेल किंवा दोघेही विवाहित असून एकमेकांचे नवरा बायको नसतील तरीपण संसार टिकणार नाही आणि विवाह बाह्य सम्बधाच्या केसेस होतील . हे टाळण्यासाठी मग आज जसे जमीन खरेदी करण्यापूर्वी वकिलांकडून सर्च रिपोर्ट काढतात अगदी तसेच भावी जोडीदाराबद्दलचे सर्च रिपोर्ट खाजगी गुप्तहेरांकडून काढण्यात येतील. आजपण वर उल्लेख केलेले प्रकार समाजात चालतात पण लपून छपून. सा. सं. मुळे हे प्रकार अगदीच खुले होतील आणि आधीच मेटाकुटीला आलेली लग्न संस्था कोलमडून पडेल, असे वाटते. किंवा असे काही घडू शकते याचा अंदाज आधीच असल्यामुळे तिकडे कोणी फिरकणार नाही अन हि संकल्पनाच फोल जाईल. दुसरे असे कि " लग्नाच्या आमिषाखाली बलात्कार " हा प्रकार सर्रास सा. सं.मध्ये घडताना दिसेल. फसवून किंवा काहीतरी आमिष दाखवून मुली आणणे अन नंतर अत्याचाराची केस झालीच तर ती एक प्रौढ होती व स्वमर्जीने आली होती हे तिथल्या कर्मचार्यांच्या साक्षी पुराव्यांसकट न्यायालयात सिध्द होताना दिसेल.

In reply to by डायवर

मुलगी सज्ञान असेल तर लग्नाच्या अमिषाखाली बलात्कार हा नक्की काय प्रकार असतो आणि त्या मागचे logic काय कोणी सांगेल का ?

In reply to by कहर

एखादी मुलगी पटवायची. तिला तुच माझी प्रियतमा म्हणायचे. लवकरच लग्न करु असे अश्वासन देउन विश्वास संपादन करुन जवळीक साधायची. मग शरीसुखाला नकार देणे उमलत्या नात्यातील अविश्वास ठरेल असे भासवुन अप्रत्यक्ष दडपण अथवा भावी नवराच आहे काय फरक पडतो म्हणुन परस्पर-सहमतीने शरीर संबंध निर्माण करायचे नंतर काहीतरी कारण सांगुन तुझ्याशी लग्न करणे शक्य नाही म्हणून मोकळे व्हायचे म्हणजे लग्नाच्या अमिषाखाली बलात्कार होय. अर्थात असा पुढाकार स्त्रिने घेतला तर तो पुरुषावर बलात्कार ठरावा असा कयास आहे... जाण्कारांच्या प्रतिक्षेत.

In reply to by द-बाहुबली

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ही भारतीय दंड संहितेतले एक जुने कलम आहे. प्रेमविवाहात घरून पळून जाणार्‍या मुलींच्या पालकांचे हे एक आवडते कलम होते. एवढ्यातच माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्या कालबाह्य कलमाला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे स्मरते. सज्ञान व सक्षम स्त्रीला असा दावा दाखल करता येणार नाही असे न्यायालयाच्या निकालात म्हटले होते. उलटी केस झाल्याचे ऐकिवात नाही. भारतीय कायदे स्त्री-धार्जिणे असल्याने अशी काही केस पोलिस दाखलच करत नाहीत. असो. सज्ञान असो व अज्ञान. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ही केसच मुळात कुठे स्टँड करू शकत नाही. तरी इतकी वर्षे यासंबंधी खटले चालू होते हे विशेष.

In reply to by संदीप डांगे

प्रतिसादाबद्दल दोघांचे धन्यवाद … मी तेच म्हणत होतो कि यात logic काय ? जर सज्ञान मुलगी आई वडिलांच्या संमती शिवाय विवाह करू शकते तर (हे)हि करू शकेल…मग बलात्काराचा काय संबंध

In reply to by कहर

जर सज्ञान मुलगी आई वडिलांच्या संमती शिवाय विवाह करू शकते तर (हे)हि करू शकेल…मग बलात्काराचा काय संबंध
मुलगी सज्ञान आहे हे वास्तव आहेच, पण ज्याच्याशी शरीर संबंध ठेवले तो भामटा निघाला केवळ शरीरसंबंध निर्माणकरण्यापुरते त्याने नाते निर्माण करायचे आमिष दाखवले व नंतर हात झटकले तर तर त्याची / तिची ती कृती बलात्कारच ठरते.
प्रेमविवाहात घरून पळून जाणार्‍या मुलींच्या पालकांचे हे एक आवडते कलम होते.
असणारच. पण स्त्रियांची लैंगीक फसवणूक करणारे कमी नाहीत.

In reply to by द-बाहुबली

बरोबर! कृपया ही बाजू देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. विकसनशील देशात स्त्रिया अजून पुरेशा जागरूक नाहीत तिथे ही फसवणूक सहज शक्य आहे.

In reply to by द-बाहुबली

सज्ञान चा अर्थच योग्य अयोग्य कृतींची जाण असणारी असा होतो. एखाद्या दुकानदाराने स्वतः एखाद्या लहानग्याला चोकलेट दिले तर नंतर त्याला चोरी केली म्हणले तर पटते का ? (इथे दुकानदार सज्ञान समजावा )

In reply to by कहर

ठीक आहे आपण म्हणत आहात तर यापुढे या जगात कोणत्याही सज्ञान व्यक्तिबाबत घडणार्‍या कोणत्याची गुन्हा गुन्हा धरु नये अशी मागणी करुया. त्यांच्याबाबत एखादा गुन्हा घडुच कसा शकतो ? कारण सज्ञानचा अर्थच योग्य अयोग्य कृतींची जाण असणारी व्यक्ती असा होतो. त्यांच्याबाबत मिसहॅप होउच कशी शकेल ? त्यामुळे यापुढे तुरंगांचीही गरज नाही... कारण सज्ञा व्यक्ती तुरुंगात जातीलच कशा ? मुळात सज्ञान व्यक्तळागुन्हा करतीलच कशा सज्ञानचा अर्थच योग्य अयोग्य कृतींची जाण असणारी व्यक्ती असा होतो ? यापुढे फक्त बालसुधारगृहे तेवडी चालु राहुदे अज्ञानी जिवांसाठी. कहर आहे.

In reply to by द-बाहुबली

ब्बरोब्बर बक्षीजी! विकसनशील देशात स्त्री पुरुषाच्या हातातील खेळण्यासारखी असू शकते. ही वस्तुस्थिती नाकारणे बरोबर नाही. अवांतर: आपल्या नात्यातील स्त्री गुन्ह्यास बळी पडली तर खूप कांगावा होतो. पण जेव्हा असे पुरुष स्वतः एका स्त्रीवर अन्याय करतात तेव्हा? कायद्याचा खीस पाडून पुरुषच कसा बरोबर हे सिद्ध केले जाते.

In reply to by द-बाहुबली

सज्ञान व्यक्तीसोबत बलात्कार आणि लग्नाचे वचन देऊन केलेला संमतीसंभोग यात आपण गल्लत करत आहात ब्योमकेसबाबू. मुलींना फूस लावून पळवणे हे ही एक लोकप्रिय कलम आहे पालकांचे. पण त्यातही जर पोलिसांसमोर जर मुलीने माता-पित्यांसोबत जायचे नसून ह्या मुलासोबतच जायचे आहे असा कबुली जबाब दिला तर पोलिस काहीच करू शकत नाहीत. लग्न झालेले असो वा नसो. सज्ञान म्हणजे अठरा वर्षे पूर्ण व्यक्ती स्वत:च्या मर्जीने कुणासोबतही जाऊ राहू शकते. त्यास कोणीच आडकाठी करू शकत नाही. (मुलगी अल्पवयीन असल्यास प्रकरण वेगळे) आता लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ही केसच स्टँड होत नाहीयेना ह्या संदर्भात. ओळखीतली एक केस आहे अगदी अशीच. मुलगी आठ दिवस आजोळी गेली. रिक्षावाल्या पोराने पटवली. नवव्या दिवशी घरून पळून गेली. दहाव्या दिवशी आर्यसमाजमंदिरात लग्न केले. बाराव्या दिवशी स्वतः पोलिसात दाखल झाले आणि मुलीने पालकांसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. तीन महिने मुलगी सो कॉल्ड नवर्‍यासोबत राहिली. चौथ्या महिन्यात चूक उमगून परत आली घरी. मुलगा नालायकच होता. पण कायदा काहीच करू शकला नाही. कारण मुलगी २१ वर्षे वयाची सज्ञान होती. तीला तीचे पूर्ण अधिकार होते. लग्नाचे आमिष दाखवून शारिरिक-मानसिक गैरफायदा घेता येतो. बलात्कार ही व्याख्याच मुळात वेगळी आहे. शारिरिक भोग म्हणजेच बलात्कार असा अर्थ लावून तत्कालिन कायदा मो़कळा झाला. यात आधी शरिराचे आमिष दाखवून नंतर लग्नासाठी मागे लागली असेही आरोप मुलीवर करता येतात पण कायदा स्त्री-धार्जिणा असल्याने असे घडत नाही. सज्ञान व्यक्ती गुन्हा करत नाही असे कुणीच म्हटले नाही. दोन सज्ञान व्यक्तिंमधला शारिरिक संबंध जर परस्परसंमतीने झाला असेल तर तो बलात्कार ठरत नाही असे म्हणायचे आहे. आपले इप्सित साध्य होत नाही असे समजल्यावर मागाहून बलात्कार केला असा कांगावा करता येत नाही. न्यायालयानेही ह्याच गोष्टीवर बोट ठेवून निर्णय दिला आहे. अगदी २५ वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शहरी स्त्रीयांनीही असे खटले दाखल केले आहेत. यात त्यांना संबंध ठेवतांना लग्नाचे आमिष हे फसवे आहे हे ओळखता येत नव्हते असे मानणे म्हणजे अगदी.... असो.

In reply to by द-बाहुबली

मी सज्ञान लोकांनी केलेला गुन्हा किंवा त्यासाठी होणारी शिक्षा याबद्दल बोलतच नाहि. मी म्हणतोय ज्या गोष्टीचा आनंद दोघांनी मिळून घेतला त्यात नंतर अचानक एकटाच दोषी कसा ठरू शकतो सज्ञान झाल्यावर पळून जाउन लग्न केल्यास त्यावर कोणते कलम लावावे ?तो गुन्हा का समजू नये हेही स्पष्ट करा. समजा "जे" झाले ते दोघांच्या संमतीने झाले आणि नंतर अशा गुन्हाच्या नावाखाली मुलांना blackmail करण्यात आले तर ?

In reply to by द-बाहुबली

मी सज्ञान लोकांनी केलेला गुन्हा किंवा त्यासाठी होणारी शिक्षा याबद्दल बोलतच नाहि. मी म्हणतोय ज्या गोष्टीचा आनंद दोघांनी मिळून घेतला त्यात नंतर अचानक एकटाच दोषी कसा ठरू शकतो सज्ञान झाल्यावर पळून जाउन लग्न केल्यास त्यावर कोणते कलम लावावे ?तो गुन्हा का समजू नये हेही स्पष्ट करा. समजा "जे" झाले ते दोघांच्या संमतीने झाले आणि नंतर अशा गुन्हाच्या नावाखाली मुलांना blackmail करण्यात आले तर ? विकसनशील देशात मुलांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणाऱ्या मुली फसवेगिरी करण्यातही मागे नाहीत. शरीराचा फायदा नोकरीत बढतीसाठी करून नंतर प्रकरण उघडकीस आल्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवले हा कांगावा अगदी सहज करता येण्यासारखा आहे.

In reply to by द-बाहुबली

मी सज्ञान लोकांनी केलेला गुन्हा किंवा त्यासाठी होणारी शिक्षा याबद्दल बोलतच नाहि. मी म्हणतोय ज्या गोष्टीचा आनंद दोघांनी मिळून घेतला त्यात नंतर अचानक एकटाच दोषी कसा ठरू शकतो सज्ञान झाल्यावर पळून जाउन लग्न केल्यास त्यावर कोणते कलम लावावे ?तो गुन्हा का समजू नये हेही स्पष्ट करा. समजा "जे" झाले ते दोघांच्या संमतीने झाले आणि नंतर अशा गुन्हाच्या नावाखाली मुलांना blackmail करण्यात आले तर ? विकसनशील देशात मुलांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणाऱ्या मुली फसवेगिरी करण्यातही मागे नाहीत. शरीराचा फायदा नोकरीत बढतीसाठी करून नंतर प्रकरण उघडकीस आल्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवले हा कांगावा अगदी सहज करता येण्यासारखा आहे.

विशेष लक्षवेधी " विषय "सुख मिळवून देण्यासाठी " आहेरे" वर्गातील सुज्ञ मिपा/नेटकरी आपले "सेकंड होम" या प्राथमिक गरजेसाठी उपलब्ध करुन देतील व मनाचा मोठेपणा दाखवतील आणि पुण्य जोडतील अशी खात्री बाळगतो. राहुन राहुन एक इरसाल नमुना आठवतोय, सांगावा की नको ? माहित असेल बहुतेकांना, असो- ऐका- एका स्त्रीरोगतज्ञ/लैंगिक विषय तज्ञ व वयस्कर डॅा. कडे एक प्रेमी युगुल आपली समस्या घेऊन जाते की आम्हाला मार्गदर्शन करा, तुमच्या तज्ञ निगरानीखाली. प्रथम डॅा तयार होतो (मनात पहिला लाडू फुटला) -१ तासच्या १ "सेशन"चे रु•१०००/-, युगुल झटक्यात तयार, (मनात दुसरा लाडू फुटला) १ तासाने युगुल रु•१०००/- देऊन तसेच पुढच्या आठवड्यातील डॅा. भेटीची आगाऊ नोंदणी करुन आनंदात निरोप घेतात. असे ५ "सेशन" महिन्यात पार पडल्यावर डॅा. सांगतात की तुमची समस्या निराकरण झाले असे दिसत आहे व तुमचा आत्मविश्वास वाढलाय आणि पुढे जमेल सरावाने, अडचण आली तर मी आहेच मार्गदर्शन करायला. तरीही युगुलाच्या आग्रहाखातर अजून १ महिना मार्गदर्शक होतो. का? उत्तर - संपूर्ण धागा सविस्तार वाचणा-यांना सहज सापडेल.

In reply to by नमकिन

जाता जाता १००० रुपयात एक तास मार्गदर्शनासाठी स्त्रीरोगतज्ञ/लैंगिक विषय तज्ञ व वयस्कर डॅा मिळणार नाही तर बाबा कमाल खान बंगाली मिळेल तो सुद्धा झोपडपट्टीत.शिवाय पुढे तुम्हाला ब्लैक मेल पण "फुकट" होईल. तेंव्हा पुढील कथा हा विनोद म्हणून ठीक आहे

डबलसीट नामक सध्या नुकत्याच आलेल्या मराठी पिच्चरमध्ये नवविवाहितांच्या प्रायव्हसीचा इश्श्यू खूप उत्तमरीत्या दाखवलेला आहे. पूर्ण पिच्चर एक नंबर बघण्यासारखा आहे, अवश्य बघा. लैच आवडला. मुक्ता बर्वेला मराठीची कंगना राणावत म्हणावे असे वाटले.

डॅा नमूना विनोदच. सेकंड होम ला "फुल सर्विस अपार्टमेंट" करुन या 'सत्कामाला' उपलब्ध करुन देणेबाबत "नो" प्रतिक्रिया? किस्सा होता संभोगालय विषयावर जिथे १च्या जागी ५ रु वाचले तर खरेपणाची शक्यता वाढेल का? ( श्री. खरे नव्हे)! एकंदरित शिवकालीन लग्नपत्रिकेत "शरिरसंबंध करण्याचे योजिले" असा उल्लेख वाचलेला स्मरतो. "डबलसीट"वाल्यांची तरी सोय होईल, तरी विषय सोडवणेस आपल्या परीने सहाय्य करतीलंच सुहृदय जन. लोभ असावा!