रोगप्रतिबंधात्मक उपाय ३
रोगप्रतिबंधात्मक उपाय १; २
अंतिम परिणाम (ध्येय) मनात समोर ठेवून सुरवात करा (BEGIN WITH THE END IN MIND)या स्टीफन कोवे यांच्या सांगण्यावरून आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे असे वाटते? आयुष्य कसे असावे? या आयुष्याचा शेवट कुठे होऊ शकतो? कसा होऊ शकतो? केव्हा होऊ शकतो? याचा विचार करून मगच त्यानुसारच आपण योग्य अशी सुरवात करावी. थोडक्यात काय तर उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करूनच आज घडवावा. अर्थात असे या क्षणी ठरवण्यासाठी लागणारे योग्य मानसिक वय, आरोग्यवान काया, सक्षम व सुसंस्कृत बुद्धी व समाजसुधारक व संस्कृतीप्रधान व्यापक हेतू डोळ्यासमोर असणे ह्या सर्व गोष्टी मुलभूत गरजेचे आहे!
पण असे ध्येय ठरवण्यापूर्वी पण एक अंदाज घेता यावा म्हणून काही तथ्ये आपणासमोर मांडतोय, पटतंय का बघा!
आपल्या बऱ्याच धार्मिक ग्रंथात लिहिल्याप्रमाणे अनेकांनी या जगात सुखी संसार करून, नातू/पणतूसोबत हसत खेळत जगत, चारी पुरुषार्थ पूर्ण करत आनंदाने जीवन जगले आहे. उदा:
श्रीमद्भागवद्पुराणम: एकादश स्कंध, अध्याय:६ श्लोक:२५
यदुवंशेऽवतीर्णस्य भवत: पुरुषोत्तम ।
शरच्छ्तं व्यतीयाय पंचविशाधिकं प्रभो ॥
अर्थात
(ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णाला उद्देशून म्हणतात) पुरुषोत्तम सर्व शक्तिमान प्रभो! आपल्याला यदुवंशात अवतार धारण करून एकशेपंचवीस वसंत ऋतू व्यतीत केले आहेत.
श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील बालकाण्डाचा पहिला सर्ग श्लोक ९७
(या सर्गाच्या सहाव्या श्लोकापासून नारदऋषिंनी रामचरित्र सांगण्यास सुरुवात केली. आता ह्यापुढे त्रिकालज्ञ नारदमुनि पुढील वर्षांचे भविष्य वर्तवीत आहेत असे पुढील श्लोकांवरून अनुमान करावे लागेल)
दशवर्षसहस्राणि दशवर्षशतानि च ।
रामो राज्यमुपासित्वा ब्रह्मलोकं प्रयास्यति ॥
अर्थात
अशा रीतीने अकरा हजार वर्षे राज्य करून श्रीराम ब्रह्मलोकास गमन करतील.
(कृपया लक्षात घ्यावे, रामायणकाळी असलेली कालगणना ही वेगळ्या पद्धतीची असल्याने व त्याप्रमाणे प्रभृरामांनी वयाच्या किमान ७०वर्षापर्यंत राज्य केले असावे, असा अंदाज आहे)
The Bible Society of India प्रकाशित
पवित्र शास्त्र या ग्रंथातील "उत्पत्ती" या जुन्या करारातील
५:५ आदम एकंदर ९३० वर्षे जगला; मग तो मरण पावला,
९:२९ नोहा एकंदर ९५० वर्षे जगला; मग तो मरण पावला
११:३२ तेरहाचे वय २०५ वर्षाचे होवून तो हरण येथे मरण पावला
२५:७ अब्राहामाच्या आयुष्याची वर्षे १७५ होती.
३५:२८,२९ इसाहाकाचे वय १८० वर्षाचे होवून, त्याचे प्राणोत्क्रमण झाले
४७:२८ याकोबाचे (इस्रायलचे) वय १४७ वर्षाचे झाले
५०:२६ योसेफ ११० वर्षाचा होऊन मृत्यू पावला.
ज्योतिषशास्त्रात पूर्वापार चालत असलेली "विंशोत्तरी दशा पध्दती" चे जनक महर्षी पराशर ऋषींनी मनुष्याचे आदर्श आयुर्मान हे १२० वर्षाचे आहे हे मानूनच तयार केली गेली आहे, जी आजही उपयुक्त आहे.
आजच्या घडीला पाहिले तरी १०० वर्षाच्या पुढे जगणारे भाग्यवान माणसेही आहेत.
उदाहरणादाखल गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार गेल्या महिन्यापर्यंत जिवंत असणारी Misao Okawa ह्या वयाच्या ११७वर्षे जगल्या.
श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३ श्लोक २१
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥
भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात, 'सामान्य लोक समाजातील श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात त्याचे अनुसरण करतात'.
त्याप्रमाणे आपण ह्या सर्व लोकांच्या काही चांगल्या सवयी जर आत्मसात केल्या तर आपल्याही आयुष्याची दोरी बळकट होऊ शकेल व आपण सारे एक साथ म्हणू शकू या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
वाचन
8902
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
मी.... आता वाचीन सवडीनी
In reply to मी.... आता वाचीन सवडीनी by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी....
In reply to मी.... by जेपी
=))
In reply to मी.... by जेपी
तुम्हाला
माझ्या छोट्याशा मेंदुला नाही
In reply to माझ्या छोट्याशा मेंदुला नाही by त्रिवेणी
मग,
In reply to मग, by सस्नेह
मग कवटी पण वाढवायला पाहिजे
In reply to मग कवटी पण वाढवायला पाहिजे by काळा पहाड
पण माणसाचा मेंदू अधिकाधिक
In reply to पण माणसाचा मेंदू अधिकाधिक by डॉ सुहास म्हात्रे
त्यांच्या 'वळ्या' (सरफेस
ते सगळं खरंय.. पण ह्यात
In reply to ते सगळं खरंय.. पण ह्यात by पिलीयन रायडर
+१
In reply to ते सगळं खरंय.. पण ह्यात by पिलीयन रायडर
@ सगळं खरंय.. पण ह्यात
In reply to @ सगळं खरंय.. पण ह्यात by अत्रुप्त आत्मा
तुम्ही व्यनि करा. तुम्हाला
दुर्धर रोग दिसतोय. एवढे उपाय
बोजड माहितीच्या वजनाने अवघड
काहिही काय लिहिता हो?
जिलबीप्रतिबंधक उपाय - एक आणि शेवटचा!
आयुष्यालेखमालेचे ध्येय काय असावे असे वाटते?आयुष्यलेखमालाकसेकशीअसावेअसावी? याआयुष्यालेखमालेचा शेवट कुठे होऊ शकतो? कसा होऊ शकतो? केव्हा होऊ शकतो? याचा विचार करून मगच त्यानुसारच आपण योग्य अशी सुरवात करावी. थोडक्यात काय तरउद्याच्या उज्ज्वल भवितव्याचामिपाकरांच्या अभिप्रायाचा विचार करूनच आज जिलबीघडवावापाडावी. अर्थात असे या क्षणी ठरवण्यासाठी लागणारे योग्य मानसिक वय,आरोग्यवान काया,सक्षमव सुसंस्कृतबुद्धी वसमाजसुधारक व संस्कृतीप्रधानसमाज-तापहीन व्यापक हेतू डोळ्यासमोर असणे ह्या सर्व गोष्टी मुलभूत गरजेचे आहे!In reply to जिलबीप्रतिबंधक उपाय - एक आणि शेवटचा! by एस
+१००
सबगोलंकारी
जिलबीप्रतिबंधक लस मिपासाठी
In reply to जिलबीप्रतिबंधक लस मिपासाठी by अजया
लस??? दॅट इज़ सोऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ
In reply to जिलबीप्रतिबंधक लस मिपासाठी by अजया
रेसिपी आणि फोटो व्यनि करा.
In reply to रेसिपी आणि फोटो व्यनि करा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला बिगर अंड्याची हवी...
In reply to रेसिपी आणि फोटो व्यनि करा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
वैदिक कृती
In reply to रेसिपी आणि फोटो व्यनि करा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक
In reply to एक by नाखु
निरागस =)) =)) =)) =)) =))
In reply to निरागस =)) =)) =)) =)) =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
अंड की अंडं?
In reply to अंड की अंडं? by काळा पहाड
अंड चुकुन पडलं टिंब ;)
In reply to अंड चुकुन पडलं टिंब ;) by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to अंड चुकुन पडलं टिंब ;) by कॅप्टन जॅक स्पॅरो
खरा उच्चार अंडं आहे. अंड शब्द
In reply to खरा उच्चार अंडं आहे. अंड शब्द by काळा पहाड
जौन दे ओ. मुद्दा कळला ना बस्स
अत्यंत अभ्यासपुर्ण लेख !
In reply to अत्यंत अभ्यासपुर्ण लेख ! by प्रसाद गोडबोले
@राहुल गांधीच मिपावर आलेत काय
रोगप्रतिबंधात्मक उपायः
तीन जिलब्या पडल्या पण अजून
In reply to तीन जिलब्या पडल्या पण अजून by रामपुरी
तेच तर अपेक्षित असतं अश्यांना
In reply to तीन जिलब्या पडल्या पण अजून by रामपुरी
पाकासाठीच्या जिलब्या वेगळ्या.
In reply to तीन जिलब्या पडल्या पण अजून by रामपुरी
पाकव्याप्त प्रांतातले की काय
In reply to पाकव्याप्त प्रांतातले की काय by बॅटमॅन
काय खोटी...आपलं ते हे.. कोटी
ही लेखमाला एक कूट प्रश्न आहे आणि
In reply to ही लेखमाला एक कूट प्रश्न आहे आणि by नाखु
ह्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला
In reply to ही लेखमाला एक कूट प्रश्न आहे आणि by नाखु
:))