✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उच्च दर्जाचे हेल्मेट ची सक्ती, असावी/नसावी ?

प
पगला गजोधर यांनी
गुरुवार, 11/27/2014 - 20:14  ·  लेख
लेख
आजचा फिल ह्यूजचा मृत्यूदिवस हा क्रिकेटसाठी अतिशय दु:खद दिवस आहे. मिपाकरांतर्फे मी, 'ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो' अशी प्रार्थना करतो. सामन्यादरम्यान बाऊन्सर डोक्यावर आदळल्याने जखमी झालेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्युज याचे आज सकाळी निधन झाले. अवघ्या २५ वर्षांचा ह्युज शेफिल्ड शिल्ड सामन्यादरम्यान मंगळवारी बाऊन्सर लागून व तो बेशुद्ध पडला. त्याच्यावर सेंट व्हिन्सेंट इस्पितळात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर तो कोमात गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र आज त्याचे निधन झाल्याने ही झुंज अपयशी ठरली. दरम्यान ह्युजने सामन्यादरम्यान घातलेले हेल्मेट जुने तसेच हलक्या दर्जाचे होते, असे हेल्मेट बनविणारी कंपनी ‘मासुरी’ने स्पष्ट केले असून, त्यामुळे क्रिकेटमध्ये सुरक्षेच्या उपायासाठी, आता मैदानातील सर्वच खेळाडूंना (फलंदाज + जवळचे सर्वच क्षेत्ररक्षक यांना), त्यांची इच्छा वा नसो, त्यांनी 'उच्च दर्जाचे हेल्मेट ची सक्ती', ICC ने करावी का ? किंवा सक्ती करू नये व खेळाडूंना तो निर्णय घेऊ द्यावा ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13685 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

आजच वाचलो..

बाबा पाटील
गुरुवार, 11/27/2014 - 20:34 नवीन
दुपारी नेट मध्ये सराव करताना,एक बाउन्सर बॅटच्या हँडलची कड घेवुन हेल्मेटच्या जाळीवर एवुन आदळला,नशिब चांगले होते.एक क्षण डोळ्यापुढे दोन्ही लेकी आल्या होत्या.सो सेफ्टी फस्ट्,साला शरीराचे ओरिजनल स्पेअर पार्ट कुठल्या दुकानात मिळत नाहीत हो.
  • Log in or register to post comments

हा प्रश्र "रमण लांबा" केस पासूनच आहे.

मुक्त विहारि
गुरुवार, 11/27/2014 - 20:41 नवीन
असो, आपल्याला काय? मुळात आम्ही त्या स्वार्थी खेळापासूनच दूरच आहोत.तेच बरे.
  • Log in or register to post comments

रमण लांबाला क्षेत्ररक्षण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/28/2014 - 08:06 नवीन
रमण लांबाला क्षेत्ररक्षण करतांना चेंडू लागला तो ज्या जागेवर क्षेत्ररक्षण करत होता तिथे त्याने हेलमेट घालायला हवं होतं त्याची बेफिकिरी तिथे आडवी आली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

@त्यामुळे क्रिकेटमध्ये

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/27/2014 - 21:01 नवीन
@त्यामुळे क्रिकेटमध्ये सुरक्षेच्या उपायासाठी, आता मैदानातील सर्वच खेळाडूंना (फलंदाज + जवळचे सर्वच क्षेत्ररक्षक यांना), त्यांची इच्छा वा नसो, त्यांनी 'उच्च दर्जाचे हेल्मेट ची सक्ती', ICC ने करावी का ? किंवा सक्ती करू नये व खेळाडूंना तो निर्णय घेऊ द्यावा ?>>> ??????? „सदर विषया वरील चर्चा इथे का आणि कशाला????
  • Log in or register to post comments

अरेरे ! मला वाटलं परत

खटपट्या
गुरुवार, 11/27/2014 - 23:45 नवीन
अरेरे ! मला वाटलं परत पुण्याच्या हेल्मेट सक्तीवर धागा निघाला की काय ?
  • Log in or register to post comments

सह्मत

स्वीत स्वाति
Fri, 11/28/2014 - 11:24 नवीन
अगदी ! मलाही तसेच वाटले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अहो, तेच आहे हो.. नीट पहा परत

हाडक्या
Fri, 11/28/2014 - 16:31 नवीन
अहो, तेच आहे हो.. नीट पहा परत.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीत स्वाति

चौकटराजा १++

पगला गजोधर
Fri, 07/22/2016 - 13:33 नवीन
खड्यांची सक्ती करा.. चौकटराजा - Fri, 22/07/2016 - 13:02 सरकारने एखाद्या रस्त्यावर इतकया इतक्या मापाचे इतके इतके खड्डे असलेच पाहिजेत असेच टेण्डर काढावे. रोज चार पाच म्रुत्यू झाले की सक्ती न करताच सर्व हेल्मेट घालायला लागतील. अशीच सोय आयुर्विमा, गाडीचा विमा, घराचा विमा, टीव्हीचा विमा, पासपोर्टचा विमा, रेशनकार्ड , क्रेडिट कार्ड , आधार कार्ड चोरीला जाण्याची शक्यता, मधुमेह बी पी होण्याची शक्यता , मूल न होण्याची शक्यता , आगीचा विमा, परदेश प्रवासात विमान रद्द होण्याचा विमा अशी दोन उत्तरे असलेल्या सर्वा॑ची भिति समाजाला घालावी. सर्वीस सेक्टर फोफावून मजबूत सर्वीस टेक्स सरकारला मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

मुळात कोणत्याही हेल्मेटची

कंजूस
Fri, 11/28/2014 - 00:50 नवीन
मुळात कोणत्याही हेल्मेटची रचना तांत्रिक अंगाने पाहिल्यास असं दिसेल की वरून एखादी वस्तू पडल्यास तो आघात आतल्या कापडी पट्ट्यांवर पसरवला आणि झेलला जातो परंतू क्रिकेट या खेळात आघात डाव्या उजव्या कानशिलाकडून होतो त्यामुळे तसले वेगळे हेल्मेट बनवायला हवे.
  • Log in or register to post comments

करेक्ट.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/28/2014 - 08:15 नवीन
कानशिलाच्या बाजूने जी जाळी असते तिथे जाळी रुंद आणि मागे मानेपर्यन्त पाहिजे. तोंडावर येणारा चेंडू हुक मारतांना, किंवा ऑन साइड आडव्या ब्याटीने मारतांना तो फटका जर चेंडुवरुन नजर हटली तर थेट कानाशिलावर चेंडू येण्याची शक्यता असतेच असते. खाली हनुवटीवर मी अनेकांच्या हनुवटी फुटलेल्या पाहिल्या आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

या निमित्ताने क्रिकेट

कंजूस
Fri, 11/28/2014 - 08:34 नवीन
या निमित्ताने क्रिकेट कोचिंगवरही(कराटे वगैरेसध्दा) चर्चा होणे गरजेचे आहे.वेगळा धागा वगैरे.
  • Log in or register to post comments

बोलिंगचे नियम बदला!

सुनील
Fri, 11/28/2014 - 08:47 नवीन
पण मी काय म्हणतो, जर अंडरआर्म बोलिंग करायचा नियम केला तर सुंठीवाचूनच खोकला जाईल की! त्यातून कुणाला ओवरआर्म बोलिंग करायचीच असली तर, बॉल बॅट्समनपर्यंत पोहोचेतोवर किमान दोन टप्पे पडले पाहिजेत, असा उपनियम करता येईल!
  • Log in or register to post comments

आधी प्रत्येक मिपाकराला

जेपी
Fri, 11/28/2014 - 09:46 नवीन
आधी प्रत्येक मिपाकराला हेल्मेट सक्ती करायला पायजे. *wink* भले दुचाकी चालवत नसो किंवा क्रिकेट खेळत नसो. मंजे भलतेच डोक्यावर पडल्या सारखे केच्याके धागे काढाणार नाहीत. *dash1*
  • Log in or register to post comments

(No subject)

टवाळ कार्टा
Fri, 11/28/2014 - 10:36 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

अरे

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 11/28/2014 - 11:08 नवीन
गजोधरा, अरे त्यांचे ते बघून घेतील. मी म्हणेन की ह्यापुढे रबरी चेम्डूच वापरावा.
  • Log in or register to post comments

चिंध्यांचा चेंडू त्याहुन बरा

अजया
Fri, 11/28/2014 - 11:22 नवीन
चिंध्यांचा चेंडू त्याहुन बरा की ^_~ हेल्मेट नको,सक्ती नको अाणि धागाही =))
  • Log in or register to post comments

हॅ...

चौकटराजा
Fri, 11/28/2014 - 12:21 नवीन
शेवरीच्या कापसाचा चेंडू हवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

नुकत्या

तिमा
Fri, 11/28/2014 - 11:23 नवीन
नुकत्या चालायला लागलेल्या बाळांनाही हेल्मेटसक्ती केली पाहिजे. त्यामुळे कितीतरी टेंगळे व खोका पडायच्या वाचतील.
  • Log in or register to post comments

पुन्यातल्या

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 11/28/2014 - 13:20 नवीन
पुण्यातल्या बाळांनाही ? कारण 'सरकारने आमचे प्रबोधन करावे, आम्हाला टेंगूळ आले तर सरकारचे काय नुकसान होते?आमचे आई-वडिल बघुन घेतील. अन्यथा आम्ही सुप्रिम कोर्टात जाऊ" असे म्हणतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

ठ्ठो माईसाहेब १, पुणेकर ०.

बॅटमॅन
Fri, 11/28/2014 - 16:42 नवीन
ठ्ठो =)) माईसाहेब १, पुणेकर ०.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब या प्रतिसादानंतर

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/28/2014 - 20:12 नवीन
माईसाहेब, या प्रतिसादानंतर तुम्ही पुण्यात पायी फिरतानाही हेल्मेट घालून फिरावे असा सल्ला देत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब ही तुमची सिक्सर अगदी

खटपट्या
Sat, 11/29/2014 - 01:01 नवीन
माईसाहेब ही तुमची सिक्सर अगदी मैदानाच्या बाहेर गेली आहे. पुण्यातली बाळं..... :) अजुन हसतोय ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माई,माई _/\_

अजया
Fri, 11/28/2014 - 17:06 नवीन
माई,माई _/\_ =))
  • Log in or register to post comments

असावी

विनायक प्रभू
Fri, 11/28/2014 - 18:03 नवीन
हेल्मेट कसे घालावे ह्याचे प्रशिक्षणाची सक्ती असावी.
  • Log in or register to post comments

हे बाकी खरं हो !!

सूड
Fri, 11/28/2014 - 18:50 नवीन
हे बाकी खरं हो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

नक्कीच. पण त्या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/28/2014 - 20:17 नवीन
नक्कीच. पण त्या प्रशिक्षणाअगोदर सगळ्या शरिराचा CT किंवा MRI scan करून मेंदूची जागा नक्की करावी. म्हणजे हेल्मेट शरीराच्या कुठल्या भागावर आणि कसे घालावे हे शिक्षण देणे शक्य होईल. :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

पुण्यातल्या लोकांना मग नी

काळा पहाड
Sat, 11/29/2014 - 14:19 नवीन
पुण्यातल्या लोकांना मग नी पॅडची सक्ती करावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

खरतर पुण्यातील तीन पैकी एका

माझीही शॅम्पेन
Sat, 11/29/2014 - 11:05 नवीन
खरतर पुण्यातील तीन पैकी एका लठ्ठ बाळासाठी वेगळ्या प्रतीची हेल्मेट हवीत के नकोत ह्या साठी वेगळा धागा काढावा... . . . अवांतर :- कोणचही मृत्यू हा वाईटच पण मृत्यू कसा येतो ह्या पेक्षा कोणाला येतो ह्यावर TRP ठरते काय , भारतात रोज हेल्मेट न घातल्यानी किवा रेल वे रुळ ओलांडताना कितीतरी ज़ण नाहक मरत असतात !
  • Log in or register to post comments

आता अंपायरला पिंजऱ्यात

कंजूस
Sun, 11/30/2014 - 20:20 नवीन
आता अंपायरला पिंजऱ्यात ठेवायचे का ?
  • Log in or register to post comments

कशाला हेल्मेट आणी कशाला

यसवायजी
Sun, 11/30/2014 - 22:47 नवीन
कशाला हेल्मेट आणी कशाला पिंजरे?? मी तर म्हणतो, त्यापेक्षा व्हर्च्युअल क्रिकेट खेळवा. किंवा सिम्युलेटरवर. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा