नवहिंदुत्ववाद.
दै. लोकसत्ताचे संपादक व थोर विचारवंत कुमार केतकर यांनी नवहिंदुत्ववादावर हे अप्रतिम अग्रलेख लिहीला . येथे टिचकी मारा-अग्रलेख
त्यात ते म्हणतात हिंदु नवमध्यमवर्गाला भारतीय तत्वज्ञान,कला,साहित्य यात फारसा रस नाही .त्यांचा ओढा तिरुपती,सिद्धीविनायक,स्वामी नारायण मंदीर यांच्याकडे आणि अनेक बाबा,गुरू आणि बापू यांच्याकडे आहे.
खरोखरच हा अग्रलेख सर्वांनी वाचावा यात लिहीलेले १००% सत्य आहे.या अग्रलेखाकडे समाजशास्रिय दृष्टीकोनातुन बघावे ही विनंती.
आपला
कॉ.विकि
वाचने
14172
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
अग्रलेख आणि समाजशास्त्र
समाजसुधारणा करणे
In reply to समाजसुधारणा करणे by विकि
का बरे ?
समाजभेद
- उच्चवर्णीय
- मध्यमवर्गीय
- १९६० ते १९८५ च्या दरम्यान अमेरिकेत गेलेले भारतीय
- १९८५ नंतरची अमेरिकेत गेलेली कॉम्यूटर जनरेशन
- सिद्धीविनायक, स्वामीनारायण, बाबा, गुरू, बापू (थोडक्यात कुठलाही हिंदू संप्रदायात) जाणारे
- ओबीसी - बीसी -आदीवासी वर्गातील लोकं
म्हणजे थोडक्यात जे जे कोणी स्वतःला ज्या कुठल्याही श्रद्धेने हिंदू समजत असतील असे सर्वजण हे केतकरांच्या दृष्टीने नवहिंदूत्ववादी आणि म्हणजे समाजविघातक आहेत. हे असले भडक आणि समाजभेदी लिहीण्याला "अप्रतिम" केवळ वर म्हणल्याप्रमाणे समर्था (सोनीया) घरचे... अथवा कम्यूनिस्टविचारांनी एकांगी झालेलाच म्हणू शकेल. केतकर मानभावीपणे वर म्हणतात की , "बीसी -ओबीसी वर्गाला हिंदूत्ववादी राजकारण जवळचे का वाटू लागले हाही तसा सखोल अभ्यासाचा विषय आहे" पण तसेच भारतात स्वातंत्र्यानंतर जी काही स्वप्नाळू सद्भावनेतून पण नंतर एकांगी आततायी वृत्ती, समाजवादी आणि कम्यूनिस्ट विचारसरणीने आणली तीचा पराभव का झाला ह्याचा विचार करायला मात्र ते तयार नाहीत. आता राहून राहून हिंदूत्व ह्या शब्दाबद्दल : हा शब्द स्वा. सावरकरांनी कॉईन केला आहे असे त्याचे समर्थक आणि विरोधक म्हणतात. त्यांच्याच एका वाक्यात, "हिंदूत्व हे काही हिंदूधर्म याच्याशी समानार्थक नव्हे किंवा हिंदूधर्म हाही शब्द 'हिंदूइझमशी' शब्दाशी समानार्थक नाही." त्यावरील त्यांचा लेख वेगळ्या चर्चेच्या रूपात नंतर देईन. पण येथे थोडक्यात सांगायचे म्हणजे नवहिंदूत्ववादी असला शब्द तयार करणार्या केतकरांनी आधी हिंदूत्व म्हणजे काय हे सावरकरांच्या शब्दातीलच वाचावे. आणि वाचले असल्यास प्रामाणीकपणे जगासमोर मांडावे. पण असे केले तर केतकर कसले. नैसर्गीक विचारांपेक्षा अनैसर्गीक विचारांनी माणूस हा जास्त चाचपडत बसतो या अर्थीचे येजुर्वेदातील (४०:९) एक गूढ वाक्य आठवले: "अंधतम प्रविशंती ये असंभुती मुपास्ते.." - भावार्थः अज्ञानी लोकं (अज्ञानाच्या) अंधारात चाचपडतच असतात पण जे स्वतःला ज्ञानी समजून वागतात ते त्याहीपेक्षा जास्त अंधकाराच्या गर्तेत राहत असतात. केतकर हे वरील भावार्थासंदर्भात दुसर्या प्रकारातील लोकांमधे गणले जाणारे व्यक्तिमत्व आहे. [बाकी विकीसाहेब आम्ही कधी पासून वाट पहात आहोत पण आपण सर्वप्रकारच्या बेकायदेशीर हिंसेचा, जी हिंदूत्ववाद्यांचीच नाही तर कम्यूनिस्टांची, नक्षलवाद्यांची वगैरे आहे, तीचा अजूनही निषेध करायला तयार नाही आहात, फक्त हिंदूत्ववाद्यांना झोडपताहात! हे काही बरोबर वाटत नाही. अर्थात याचा सरळ अर्थ "हिंसा" समजायची वेळ आली की कम्यूनिस्टांचे वर्तन हे आपल्याजोगी अहींसक आहे. मग ते नक्षलवाद्यांनी केलेले खून असोत अथवा पश्चिम बंगाल मधील एसईझेड ची नंदीग्रामसारखी प्रकरणे आणि त्यात कम्यूनिस्ट सरकारचे "गरीब मुसलमानांच्या" विरूद्धचे वर्तन असोत. आपणास माहीत असेलच की नंदीग्राम मधील अत्याचार हे मुसलमान शेतकर्यांवर अधीक झालेत - त्यांची संख्या जास्त असल्याने. विचार करा हेच जर सेना-भाजपच्या राज्यात झाले असते तर केतकरांनी , मेडीयाने आणि आपल्यासारख्या लोकांनी किती उगाळले असते ते...]In reply to समाजभेद by विकास
विकास साहेब
In reply to विकास साहेब by विकि
न पटणारे उत्तर
In reply to समाजभेद by विकास
सावरकरांचे हिंदुत्व
In reply to सावरकरांचे हिंदुत्व by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सावरकरांचे हिंदुत्व - मूळ लेख
In reply to सावरकरांचे हिंदुत्व - मूळ लेख by विकास
समग्र सावरकर
In reply to समग्र सावरकर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्कीट
In reply to समग्र सावरकर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
समग्र मोदी
In reply to समग्र मोदी by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)
आपण
In reply to आपण by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
महोदय, असे
अजून एक नवहिंदूत्ववादी
वाचला
असहमत...
नंदीग्राम - मार्क्सवाद म्हणला की चिडीचूप
In reply to नंदीग्राम - मार्क्सवाद म्हणला की चिडीचूप by विकास
मोदींसारख