Skip to main content

एक आगळा Lesbian विवाह सोहळा !

लेखक मारवा यांनी बुधवार, 20/11/2013 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम या सुंदर फ़ोटोग्राफ़्स वर एक नजर टाका ! http://www.stephgrantphotography.com/blog/shannon-seema-indian-lesbian-… काही दिवसांपुर्वीच शॅनॉन आणि सीमा या दोन स्त्रियांमधील हा सुंदर लेस्बीयन विवाहसोहळा लॉसएंजल्स या अमेरीकेतील शहरात थाटामाटात संपन्न झाला. हा एका अर्थाने क्रांतीकारी विवाह म्हणावा लागेल. कारण हा नेहमीसारखा एक स्त्रि व एक पुरुष यांच्यातील विवाह नव्हता. तर एका स्त्रि ने केलेला दुसरया स्त्रि बरोबर चा विवाह होता. हा अनेक अर्थांनी वेगळा असा विवाहसोहळा म्हणता येईल याची कारणे अशी की एक तर हा विवाह अतिशय मोकळेपणाने संपन्न झाला. असे समलैंगिक विवाह क्वचितच इतक्या निर्भयतेने संपन्न होतात. याच्या अगदी नेहमीच्या विवाहासारख्या पत्रिका छापण्यात आल्यात. अनेक प्रतिष्ठीत लोकांना आमंत्रणे पाठविण्यात आली. आणि मोठ्या संख्येने अगदी प्रतिष्ठीत लोकांनी या विवाहाला हजेरी लावली. आणि आपला पाठींबा एक प्रकारे जाहीर केला. असे विवाह सामान्यत: छुपेपणाने होतात त्या पार्श्वभुमीवर यातील आयोजकांचा मोकळेपणा आणि हजेरी लावणारयांचा देखील मोकळेपणा विशेष असाच होता. दुसरी एक खासियत म्हणजे हा विवाह अगदी व्यवस्थित असा विधीवत पार पाडण्यात आला. दोन्ही वधुंनी अग्निला साक्षी मानुन छान वैदिक पध्दतीने सात फ़ेरे वगैरे घेतले. मेंदी ,मेकअप, वधुला भावांनी डोली त बसवुन आणणे आदी सर्व अगदी साग्रसंगीत करण्यात आलं. आणि त्याच बरोबर ख्रिश्चन पध्दतीने देखील विवाहाचे विधी पाळण्यात आले. एक वधु ख्रिश्चन आणि एक हिंदु असे असुनही कुठेच काहीच अडचण आली नाही. दोन्ही कडचे हिंदु आणि ख्रिश्चन पाहुणे या विवाहात सामील झाल्याने दोन्ही धर्माच्या लोकांना एकमेकांच्या विधीची छान माहीती करुन घेता आली व परंपरेतील वैविध्या चा आनंद ही लुटता आला. यात विशेष म्हणजे या हिंदु मुलीचे भाउ आई आणि वडिल यांचा या विवाहाला पाठिंबा च नव्हे तर तो धुमधडाक्यात आणि अतिशय शानदार पध्दतीने करावा असे मत होते आणि तसा त्यांनी तो करुनही दाखविला. याचे फ़ोटोग्राफ़्स एका प्रसिध्द फ़ोटोग्राफ़र स्टेफ़ ग्राफ़ हीने काढलेले असुन ते ओपनली सर्वत्र प्रसिध्द देखील केलेले आहेत.फ़ोटोग्राफ़्स पण अतिशय सुंदर जमुन आलेले आहेत. असाच सपोर्ट दुसरया मुलीच्या घरच्यांचा ही होता.हे सर्वात विशेष ! यात सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी ज्या सुंदर उमदेपणाने व माणुसकीने प्रेमाने आपापल्या मुलींच्या लैंगिकतेचा जो बिनशर्त स्वीकार केला. व त्यांच्या आनंदातच आपला आनंद मानुन अगदी पुर्ण सपोर्ट देउन त्यांना आपले आयुष्य आपले स्वातंत्र्य जपु दिले ही आहे. हे सर्व करतांना त्यांनी बुरसटलेल्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव पडु दिला नाही. प्रत्येक व्यक्तीला माणुस म्हणुन आपल्या लैंगिकतेची निवड करावयाचा हक्क आहे व त्याचा सम्मान केला पाहीजे ही जाणीव या पालकांनी दाखविली हे महत्वाचे आहे.हा बदल सुखावह आहे. शाल्मली पालेकर ( अमोल पालेकरांची पहील्या पत्नीपासुन झालेली मुलगी) ही देखील ओपनली लेस्बीयन आहे. तिच्या आईला जेव्हा हे प्रथम कळले. तेव्हा तिला चित्रा पालेकरांना थोडा धक्का स्वाभाविकपणे बसला. परंतु नंतर त्यांनी ही आपल्या मुलीला समजावुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तिच्याकडुन या विषयावरची पुस्तके मागविली आणि लेस्बीयन म्हणजे नक्की काय असते त्यांची जीवनशैली काय असते हे समजुन घेतले. आणि आज त्या ठामपणे तिच्या पाठीशी उभ्या आहेत. आज त्यांना आपली मुलगी लेस्बीयन आहे या गोष्टीची अजिबात लाज वाटत नाही. इनफ़ॅक्ट घटनेचे जे एक कलम ३७७ समलैंगिकांच्या नैसर्गिक हकांवर गदा आणते त्या विरोधातील लढ्यात त्या समलैंगिकाचे पालक या नात्याने सक्रिय रीत्या उतरल्या आहेत. हा बदल निश्चितच आनंददायी आहे.खालील लिंक बघा. http://www.indianexpress.com/news/-read-books-to-understand-daughter-s-… आजपर्यंत ही लोक केवळ अल्प्संख्य आहे म्हणुन यांना विकृत ठरविण्यापासुन ते माणुसकीचे साधे हक्क ही नाकारण्यात आलेले आहेत. खर तर आज ही हे सर्व सुरु आहे. या लैंगिकतेला अनैसर्गिक ठरविण्याचा प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.अर्थात यातील बरेच दावे पोकळ सिद्ध झालेले आहे या विवाहाची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही मुली या सुशिक्षीत आहेत. स्वत:चे स्वतंत्र विचार असणारया आणि करीयर असणारया आहेत.दोघांची कुटुंबेही सुसंकृत आहेत.आणि वयाने ही इनफ़ मोठ्या आहेत. आणि सर्वात शेवटी या मुलींच्या बॉडी लॅंग्वेज कडे नीट बघा काय निर्भय आणि दुरदुरपर्यंत कुठेही अपराध गंड अथवा लज्जा यांच्या चेहरयावर दिसत नाही. दिसतोय फ़फ़्त जबरदस्त आत्मविश्वास आणि एकमेकांवरील निखळ अनिर्बंध प्रेम ! त्यांच्या प्रेमाला सलाम ! त्यांच्या हिंमती ला सलाम !

वाचने 32595
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

बेट्या
हा कोण? बाकी, जे आहे ते त्याची या केसमध्ये चिकित्सा करण्यात अर्थ नाही असे मला वाटते.

In reply to by पैसा

चांगला मुद्दा आहे. आपण लग्नात उच्चारल्या जाणाऱ्या प्रत्येक मंत्राचा अर्थ भटजींना विचारू शकतो. लग्न थोडे लांबेल एवढेच. मी तर म्हणेन सर्व मंत्र संस्कृत मध्ये असल्यामुळे बऱ्याच लोकांना कळत नाहीत. सर्व लग्न विधी शुद्ध मराठीत भाषांतर करायला काय हरकत आहे

In reply to by बॅटमॅन

"विवाहसंस्थेचा इतिहास" पाहिलात तर हेटेरोसेक्शुअल लग्नातले मंत्र म्हणतानाही जीभ अडखळते
उदाहरणार्थ ? एखादा मंत्र ??

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉपी आत्ता माझ्याकडे नाही. घरी गेलो की मंत्र उद्धृत करतो. जेवढे आठवते त्यानुसार अग्रभोगाच्या संकल्पनेशी राजवाड्यांनी काही मंत्रांचा संबंध जोडलेला आहे. ते एक आहेच, शिवाय प्रजननावर दिलेला भर हाही आजच्या काळात टीकार्ह आहेच ;)

In reply to by पैसा

वर आणि वधू यांच्यासाठीच हे विवाहविधी असले तरी स्थलकालाप्रमाणे मंत्र बदलतात त्याप्रमाणे बदलत्या काळानुसार विधींमधे असा काही बदल हीसुद्धा एक गरज वाटू शकते असेही म्हणता येईल ना? शेवटी मानणे-न मानणे हाच भाग येतो असे एकूणात दिसतेय...

In reply to by पैसा

"तर अर्थ समजून न घेता केवळ उपचार म्हणून हिंदू पद्धतीने लग्न करणे हा आहे." पण कशावरून अर्थ समजून न घेता त्यांनी सर्व विधि केले असतील ? कदाचित संततिसंदर्भातील मंत्र वगळून विधि पार पडला असेल असे समजण्यास वाव का नसावा ? आणि त्यांना पुढे मूल दत्तक घ्यायचे असेल तर ? असेही विवाह पाहिले / ऐकले आहेत जे हिन्दू पध्दतीने झाले आहेत आणि ज्यात जोडप्यांनी मूल नको असे आधीच ठरवलेले होते

In reply to by पक्या

मग त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले म्हणूनही काही बिघडत नव्हते. मात्र हिंदू विवाहविधी हे वर आणि वधू यांच्यासाठी आहेत. इथे त्या अर्थाच्या मंत्रांचे काही प्रयोजनच नाही! म्हणजे हिंदू पद्धतीचे लग्न या शब्दांनाच इथे काही अर्थ नाही.
आजच्या घटकेला विवाहविधीचे मंत्र तो वर आणि ती वधू असेच आहेत. उद्या कोणाला आवश्यकता वाटल्यास त्यात पाहिजे तसे बदल करावेत. नंतर काही काळाने ते रूढी म्हणून चालून जातील. पण आज तरी त्या मंत्रांना अशा विवाहासंदर्भात काही अर्थ नाही. निदान या केसमधे किंवा अशा प्रकारच्या दुसर्‍या कोणत्या केसमधे विवाहविधीचे मंत्र नव्याने लिहिल्याचे वाचले नाही. कोणी लिहिल्यास स्वागतच आहे. रूढी आणि परंपरा या काळाबरोबर हळूहळू बदलत असतात.
असेही विवाह पाहिले / ऐकले आहेत जे हिन्दू पध्दतीने झाले आहेत आणि ज्यात जोडप्यांनी मूल नको असे आधीच ठरवलेले होते
त्या लोकांनीही केवळ हिंदू पद्धतीचा उपचार पाळला असेच म्हणेन. आतिवास यांनी म्हटल्याप्रमाणे लोक एका रूढीतून सुटण्यासाठी दुसर्‍या रूढीचा आधार कशाला घेतात हे कोडंच आहे!

In reply to by पैसा

आजच्या घटकेला विवाहविधीचे मंत्र तो वर आणि ती वधू असेच आहेत.
नाही हो, हिंदू विवाहपद्धतीतली सात फेऱ्यातली सात वचनं फारच जनरल आहेत. ती कुठच्याही विवाहांसाठी चांगलीच आहेत. आपल्या परंपरा कशा समृद्ध आहेत, आणि सर्वव्यापी आहेत हे सांगण्याऐवजी त्या कोत्या आहेत असं का म्हणणं हे विचारजंतीच नाही का? या वेबसाइटनुसार पहिलं वचन - एक जण म्हणतो मी तुझी आणि मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी घेईन. दुसरी व्यक्ती म्हणते मी तुझ्या घराची काळजी घेईन. (हे वचन तर आता कालबाह्यच झालेलं आहे, कारण दोघेही बऱ्याच वेळा नोकऱ्या करतात.) दुसरं वचन - पहिली व्यक्ती म्हणते तू मला आधार दे. दुसरी व्यक्ती म्हणते ठीक आहे, तू मला प्रेम आणि लक्ष दे. तिसरं वचन - जोडीने ते दोघे शहाणपण आणि समृद्धी मागतात. एकमेकांशी निष्ठा मागतात. चौथं वचन - त्यातली एक व्यक्ती दुसरीला मांगल्य, पावित्र्य आणल्याबद्दल धन्यवाद देते. दुसरी व्यक्ती पहिलीला आनंद देण्याची शपथ घेते. जोडीने ते मोठ्यांचा मान राखण्याची शपथ घेतात. पाचवं वचन - जगाचं भलं होवो, आपली मुलं चांगली होवोत, आपल्या नातेवाईकांचं भलं होवो इत्यादी इत्यादी. सहावं वचन - एक व्यक्ती म्हणते मी तुझं भलं करेन, दुसरी व्यक्ती म्हणते मी तुला चांगल्या कार्यात साथ देईन. सातवं वचन - दोघे एकमेकांना म्हणतात की आपलं नातं दीर्घकाळ टिको, आणि निष्ठा आणि सामंजस्य राहो. आपल्या जीवनात प्रेम राहो, आणि याच जन्मापुरतं नाही, तर पुढचे जन्मही टिकून राहो. ही वचनं इतकी सुंदर आहेत, की तो आणि ती किंवा ती आणि ती किंवा तो आणि तो यांनी एकमेकांना दिली तरी काहीही फरक पडत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

समलिंगी विवाहाबद्दल विचार करताना पहिल्या पावलावरच ठेचकाळलो! >>>तुझी आणि मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी तुझी ठीक आहे पण 'मुलांची'- ही कुठून आणणार नि कशी आणणार? दुसर्‍याची दत्तक घ्या नि सांभाळा? काळजी घ्या? का? एकमेकांची काळजी घेऊ शकतील मे बी पण ह्यात पुन्हा अगदी समान पातळीवर दोघे असू शकतात का? कधीनाकधी एक 'नरा'च्या नि दुसरा 'मादी'च्या स्वरुपात असेलच की. मग आकर्षण समलिंगी कसं? काय लॉजिक असतंय कुणाला माहिती. असो! त्या गावाला जाण्याची इच्छा नाही.

In reply to by प्यारे१

अहो भाऊ नर-मादी काय करताय, भावनाओं को समझो. सातही वचनांचा रोख आपलं नातं, आणि त्यातून निर्माण होणारी नवीन नाती सुंदर करू, आपण एकमेकांवर प्रेम करू, एकमेकांचं भलं करू असा आहे. हे उदात्त विचार अंगीकारून नवीन नात्यासाठी वापरायचा की 'त्यात एक स्त्री- एक पुरुष नाहीत' असा फुटकळ तांत्रिक मुद्दा काढायचा?

In reply to by पैसा

दुसऱ्या एका वेबसाइटवर मला हे भाषांतर सापडलं. Seven Vows In Hindu Wedding The bride and the groom take the first step of the seven vows to pledge that they would provide a prospered living for the household or the family that they would look after and avoid those that might hinder their healthy living. During the second step of the seven pheras, the bride and the groom promise that they would develop their physical, mental and spiritual powers in order to lead a lifestyle that would be healthy. During the third vow, the couple promises to earn a living and increase by righteous and proper means, so that their materialistic wealth increases manifold. While taking the fourth vow, the married couple pledges to acquire knowledge, happiness and harmony by mutual love, respect, understanding and faith. The fifth vow is taken to have expand their heredity by having children, for whom, they will be responsible. They also pray to be blessed with healthy, honest and brave children. While taking the sixth step around the sacred fire, the bride and the groom pray for self-control of the mind, body and soul and longevity of their marital relationship. When the bride and the groom take the seventh and the last vow, they promise that they would be true and loyal to each other and would remain companions and best of friends for the lifetime.

एक रुढी मोडताना इतर रुढींच्या बंधनात अडकायची (थाटामाटात, विधीपूर्वक विवाह) माणसांना किती हौस असते ते पाहून गंमत वाटली. मानवी स्वभाव हे एक कोडं आहे हे पुन्हा एकदा पटलं!

ते रुढी ला मजा म्हणुन एन्जॉय करीत आहेत. नाहीतरी सात फ़ेरयामध्ये समलैंगिकांनी परस्परांसाठी काय वचने द्यावी घ्यावी याचा थोडी उल्लेख आहे. ते मुळात धर्मसंमत च नाही तर काय. आणी दुसरा हेतु हा की त्याविषयी चे गैरसमज दुर करुन त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा तो एक स्तुत्य प्रयत्न आहे.म्हणुन लपुन छपुन न करता त्यांनी टीपिकल हेट्रो मॅरेज सारखी मौजमजा करुन केलेल ते एक सरळ सेलीब्रेशन आहे.जस आपला काही संबंध नसतांना ही आपण गरबा अथवा भांगडा चा लग्नात समावेश करुन धमाल करतो तस. आणि त्या निमीत्ताने त्या खिश्चन लोकांना ही आपल्या इकडल्या परंपरा ची माहीती होते .

लेस्बियन किंवा गे अथवा होमो मुळात सेक्सची गरज म्हणुनच जवळ येतात.त्यातुन त्याच्या मध्ये जवळिक होत असावी. त्यामुळे लग्नानंतर त्याचा सेक्स कायदेशिर होत असावा इतकेच्. विवाह ही एक मानसिक गरज आहे हे पन्नाशी नंतर ठिक आहे.परंतु तरुन तरुणी फक्त मानसिक स्वाथ्य लाभावे म्हणुन लग्न करत असतील असे वाटत नाही.

In reply to by वेताळ

मग भिन्नलिंगी विवाह काय मानसिक गरज म्हणूनच करतात काय? तिथे सेक्स करावासा वाटत नसता तर इतकी लोकसंख्या वाढली असती का =))

In reply to by मालोजीराव

अन हा जुना काळ लै जुनाही नव्हता, सत्तरेक वर्षांपूर्वीपर्यंतचे तरी कन्फर्म माहिती आहेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

जुन्या काळी लग्न पत्रिकेत 'शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे' असे लिहित असत
+ १ असा मजकूर असलेली जुनी पत्रिका मी पाहिली आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

येस! ही पत्रिका मी स्वतः पाहिली नसली तरी तशा मजकुराचे उल्लेख लै पाहिले आहेत. खाली निनाद यांनी तशी पत्रिका स्वतः पाहिल्याचेही लिहिले आहे. जरा शोधाशोध केली तर अशी पत्रिका मलाही सापडेल कुठेतरी असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

माझ्या कडे आहे.. माझ्या आई बाबांचीच बहुदा... मी जाऊन मग आईला ती रीतसर दाखवुन हा काय प्रकार आहे हेही विचारलं होतं.. आई नी एका नजरेतुनच "गप बस.. नाही तर थोबाड फोडीन" असा दम दिला..!!

In reply to by पिलीयन रायडर

हम्म, असे प्रसंग अनुभवले आहेत. दम दिला नसला तरी "तुला कशाला पाहिजे" इ.इ. ऐकलेलं आहेच. अर्थात तेव्हा राग येत असला तरी आज ओके वाटतं, समजा जे कळायचं ते सगळं कळालंही त्या वयात तरी नक्की फायदा काय जोपर्यंत प्रत्यक्ष काही होत नै तोपर्यंत? जरा समज येईपर्यंत तो सगळा एक खेळ वाटायचीच शक्यता जास्त.

In reply to by वेताळ

अमान्य. कुठल्याही लग्नामागची भूमिका केवळ आता ठोकायला मिळणार अशी असेल तर त्या व्यक्ती विकृत आहेत असे समजावे. लग्न केवळ शरीराची गरज नाही. त्यासाठी लग्न करायची खरेच गरजही नाही. लग्न एक मानसिक गरज आहे. प्रेम ही देखल अशारीर पातळीवरची मानसिक गरज आहे. संभोग हा प्रेमाचा केवळ एक भाग झाला किंवा एक पुढची पायरी झाली.

In reply to by मृत्युन्जय

बरंचसं आदर्शवादी. योग्य देखील. मात्र वास्तव बहुतांश वेगळं आहे. वय झालं म्हणून बरेच सुशिक्षित लग्न करतात. मात्र सुसंस्कारित असतीलच असं नाही. प्रेमाच्या अभिव्यक्ती म्हणून संभोग वगैरेचा विचार होईल अशी बर्‍याचदा पोच/झेपच नसते. कधी पोच असून देखील तशी परिस्थिती नसते.

In reply to by मृत्युन्जय

लग्न ही मानसिक गरज आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर लग्न केल्याने कोणते मानसिक समाधान मिळते त्यावर लिहा ना राव. काय सकृत आनि काय विकृत ह्याची चिरफाड नंतर करुया.मानसिक गरजेसाठी लग्न करण्याची देखिल काय गरज आहे?अहो भाउ भारतात लग्नाशिवाय सेक्स मान्य नाही म्हणुन लग्न करावे लागते.आमच्या समाजात लग्नाशिवाय सेक्स ग्राह्य धरला जात नाही. तुमच्या समाजाविषयी माहिती नाही म्हणुन विचारतो आहे.

In reply to by वेताळ

प्यारेचा प्रतिसाद वाचल्यावर ते " विकृत " वगैरे थोडे जास्त होते हे मान्य. ती विकृती आपण अमान्य ठरवुयात. पण लग्नाचा संबंध केवळ संभोगाशी आहे हे विधान अगदीच चुकीचे आहे. आनंद काय मिळतो हा प्रश्न विनोदात विचारणे वेगळे. पण लग्नातुन कुठलाही आनंद मिळत नसेल तर माणसाने लग्न करुच नये. समलिंगी आणि भिन्नलिंगी दोन्हीही. यात मग sexual orientation चा मुद्दाच आणु नये. मुळात या केसमध्ये दोन्ही समलिंगी व्यक्ती शारिरीक पातळीवर आधीपासुनच एकरुप झाले असावेत असे गृहीत धरुयात. ज्या समाजात ते राहत आहेत तिथेही समलिंगी संबंध अगदीच कॉमन नसले तरीही एक "अहो पापम" प्रकातातले कृत्यही मानले जात नाही. लिव्ह इन तिथे सर्वमान्य आहे. असे असताही त्या दोघींना जर लग्न करावेसे वाटले असेल तर ते नक्कीच शारिरीक गरजेसाठी असु शकत नाही. मग तो दोन मनांच्या मिलनांचाच मामला असु शकतो. शारिरिक गरजा तर काय अश्याही पुर्ण होउ शकतातच की. तुम्ही विवाहसंस्थेच्याच विरोधात असाल तरची गोष्ट वेगळी. मग त्यावर वेगळ्या पातळीवर चर्चा करुयात. ता.क.: ते विकृती वगैरे वाचुनही न भडकता प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभार.

In reply to by वेताळ

आमच्या समाजात लग्नाशिवाय सेक्स ग्राह्य धरला जात नाही. तुमच्या समाजाविषयी माहिती नाही म्हणुन विचारतो आहे. हे विधान अप्रस्तुत वाटले. आपण दोघेही एकाच समाजात राहतो.

In reply to by मृत्युन्जय

परंतु समाजात लग्न हे शरिरसंबधाला कायदेशिर मंजुरी देण्याकरिताच केले जाते हे माझे मत आहे आणि राहिल तुम्हाला दुखवण्याचा कोणताहीहेतु नाही.

आनंदाची बातमी , या दोन जीवांचे , या संस्थळावर...माफ करा ...प्रगल्भ संस्थळावर, प्रतिसादांमधुन पुन्रमिलन झाले आहे ;) ;)

हे सर्व करतांना त्यांनी बुरसटलेल्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव पडु दिला नाही.
अजून कांही शतकांनंतर, पुन्हा एकदा, स्त्री-पुरुष संबंध प्रस्थापित व्हायला लागले तर आजच्या ह्या पुढारलेल्या(?) लेस्बियन आणि होमो संबंधांच्या विचारसरणीला 'बुरसटलेली विचारसरणी' असे संबोधावे का?

In reply to by मारवा

तुमची समलैंगिक विवाहा विषयी नेमकी भुमिका काय आहे ?
समलैंगिक विवाह स्विकारण्याची अजुन माझी मानसिक तयारी नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

पुन्हा एकदा, स्त्री-पुरुष संबंध प्रस्थापित व्हायला लागले तर
मग आता काय १००% सगळे विवाह समलिंगी होत आहेत काय? जे नैसर्गिकरीत्या समलिंगी आहेत त्यांनी ते जाहीर केले तर काय सगळा समाज समलिंगी होईल अशी भीती वाटते का तुम्हाला? काय राव चेष्टा करता का? तुम्ही समलिंगी नाही म्हणून दुसऱ्यांनाही व्हायला परवानगी नाही का? का या पृथ्वीतलावर फक्त एकाच प्रकारची, एकाच लैंगिकतेची, एकाच धर्माची, एकाच भाषेची, एकाच देशाची लोकं राहू शकतात का? जे अल्पसंख्य आहेत त्यांना जगण्याचा, प्रेम करण्याचा, लग्न करण्याचा, मुलं वाढवण्याचा हक्क नाही का? का तुमच्यासारख्या 'सरळ' किंवा 'नॉर्मल' लोकांनी मक्तेदारी घेऊन ठेवलीये सगळ्या हक्कांची?

In reply to by विवेक वाघमारे

मग आता काय १००% सगळे विवाह समलिंगी होत आहेत काय?
असं मी कुठे म्हंटलय? तुम्हाला तसं आजूबाजूला दिसतं आहे का?
जे नैसर्गिकरीत्या समलिंगी आहेत त्यांनी ते जाहीर केले तर काय सगळा समाज समलिंगी होईल अशी भीती वाटते का तुम्हाला?
उद्या जर सगळ्या समाजाने खरोखरंच समलिंगी व्हायचे ठरविले तर तो समाज प्रभाकर पेठकरला काय वाटते ह्याचा विचार करणार आहे का?
काय राव चेष्टा करता का?
होय. आवडली नाही का?
तुम्ही समलिंगी नाही म्हणून दुसऱ्यांनाही व्हायला परवानगी नाही का?
असं मी कुठे म्हंटलय? व्हा नं तुम्ही समलिंगी. कोण अडवणार आहे तुम्हाला?
का या पृथ्वीतलावर फक्त एकाच प्रकारची, एकाच लैंगिकतेची, एकाच धर्माची, एकाच भाषेची, एकाच देशाची लोकं राहू शकतात का?
जरी मी तसं म्हंटलं तरी तसं घडण्याची सुतराम शक्यता आहे का?
जे अल्पसंख्य आहेत त्यांना जगण्याचा, प्रेम करण्याचा, लग्न करण्याचा, मुलं वाढवण्याचा हक्क नाही का?
भारतात तरी अल्पसंख्यांकांना इतरांपेक्षा जास्त अधिकार आहेत आणि ते त्याचा सुखनैव उपभोग घेत आहेत.
का तुमच्यासारख्या 'सरळ' किंवा 'नॉर्मल' लोकांनी मक्तेदारी घेऊन ठेवलीये सगळ्या हक्कांची?
असं मी कुठे म्हंटलय? बाकी तुम्ही दिलेले 'सरळ' आणि 'नॉर्मल' असण्याचे प्रशस्तीपत्र मी फ्रेम करून भिंतीवर टांगून ठेवतो. तुमच्या प्रशस्तीपत्रकामुळे निदान इतरांना तरी समजेल की मी 'सरळ' आणि 'नॉर्मल' आहे. धन्यवाद. माझ्या दिड ओळीच्या प्रतिसादातून तुम्हाला बरेSSSSSSSSSच कांही वाचता आले त्यामुळे मला आनंदच झाला आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

तर काय सगळा समाज समलिंगी होईल अशी भीती वाटते का तुम्हाला?
सगळे होमो किंवा लेस्बी झाले तर काही काळात समाजच संपेल!* IN LOVE*

मुळात नैतिकता आणि नैसर्गिकता यात घोळ झाला की हे प्रश्न निर्माण होतात. घडते ती कृती असते. त्या-त्या व्यक्तीच्या (स्थळ-काळ-व्यक्ती सापेक्ष) नैतिकतेच्या कल्पनांनी हे ठरतं की त्याला तुम्ही प्रकृती म्हणता की विकृती. शेवटी प्रत्येक कृती ही 'नैसर्गिक' असतेच!

In reply to by पैसा

होय आणि माणूस व निसर्ग असा भेद मान्य नसलेल्यांनी नैतिक व नैसर्गिक असा भेद केलेला पाहून नैतिकता नैसर्गिक नाही असा निष्कर्ष निघेल की काय असे वाटते. :-)

मोझेसच्या दहा आज्ञांमधली आठवी म्हटते मनुष्याने मनुष्याशी अथवा प्राण्यांशी अनैसर्गिक शरीरसंबंध करायचा नाही .याचा अर्थ ही गोष्ट दोन हजार वर्षांपासूनच आहे .भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांत प्रचलित होती (सुका मेवा खाण्याचा परिणाम असावा )

In reply to by कंजूस

ही गोष्ट फार पुर्वीपासुन आहे राजे. कित्येक शिल्पांमध्ये घोडा आणि इतर प्राण्यांबरोबर संभोग करणारे स्त्री पुरुष सापडतील भारतात. पुरुषांमधले समलिंगी संबंध तर फारच जुने. अगदी पुराणे खोदुन काढली तर काही संदर्भे देखील मिळतील. पण त्याविषयी (खासकरुन पुराणांविषयी) चर्चा करणे इथे अप्रस्तुत ठरेल त्यामुळे लिहित नाही.

दोन हजार वर्षांपुर्वी बॅन झाली. त्या आधी होती. समाज मान्य होती असे म्हणा कंजुसराव. समलैंगिकता हा विषय प्राचीन ग्रीक समाजात सर्व मान्य होता. (ख्रिश्चनोत्तर समाजात नव्हता). ग्रीक देव झ्युस याचे इरा नावाच्या देवतेशी लग्न झालेले असताना त्याने त्याच्या सेवकाशी समलैंगिक संबंध ठेवले होते. हे इराला समजल्यावर ती त्या सेवकाच्या मागे लागली (म्हणजे सूड घ्यायला मागे लागली) म्हणून झ्युसने त्याला पक्षाचे स्वरूप देऊन सदैव आपल्या जवळ ठेवले. प्राचीन ग्रीसच्या काही भागात तर पुरुषी समलैगिकता मान्य नसेल तर समाजाच्या प्रमुख प्रवाहात मिसळता येत नसे... ग्रीस मध्येच लेसवोस (ग्रीक उच्चार) (Lesbos) नावाचे बेट आहे. तेथूनच लेस्बियन हा शब्द आला आहे. त्याच बेटावरची साफ्फो (ख्रिस्तपूर्व ७०० वर्षे) ही कवयत्री समलैंगिक होती असे म्हणतात.

In reply to by निनाद

तुम्हाला अजुन माहीत आहे का प्लॅटो हा महान तत्ववेत्ता साफ़ो ला टेन्थ म्युझ म्हणत असे ? आणि जीच्या कवितांचा अभ्यास करण (इतर ९ क्लासिकल पोएट्स बरोबर ) हा त्याकाळी स्वत:ला सुशिक्षीत सिध्द करण्यासाठी साठी चा एक महत्वाचा निकष होता.साफ़ो ने केलेल्या या कविता बघा यांचा इंग्रजी अनुवाद ही त्यांच सौंदर्य दाखवुन देतो मुळ भाषेत काय काव्यानंद मिळत असेल ? वानगीदाखल या काही कवितांचा इंग्रजी अनुवाद देतो तो बघावा ! आणि साफ़ो चे विकीपेडीया चे पेज येथे आहे. http://en.wikipedia.org/wiki/Sappho [१] I shall be ever maiden, If thou be not my lover, And no man shall possess me Henceforth and forever. But thou alone shalt gather This fragile flower of beauty,-- To crush and keep the fragrance Like a holy incense. Thou only shalt remember This love of mine, or hallow The coming years with gladness, Calm and pride and passion. [२] With your head thrown backward In my arm's safe hollow, And your face all rosy With the mounting fervor; While the grave eyes greaten With the wise new wonder, Swimming in a love-mist Like the haze of autumn; From that throat, the throbbing Nightingale's for pleading, Wayward, soft, and welling Inarticulate love-notes, Come the words that bubble Up through broken laughter, Sweeter than spring-water, "Gods, I am so happy!" [३] Love shakes my soul, like a mountain wind Falling upon the trees, When they are swayed and whitened and bowed As the great gusts will. I know why Daphne sped through the grove When the bright god came by, And shut herself in the laurel's heart For her silent doom. Love fills my heart, like my lover's breath Filling the hollow flute, Till the magic wood awakes and cries With remembrance and joy. Ah, timid Syrinx, do I not know Thy tremor of sweet fear? For a beautiful and imperious player 15 Is the lord of life. [४] When I pass thy door at night I a benediction breathe: "Ye who have the sleeping world In your care, "Guard the linen sweet and cool, 5 Where a lovely golden head With its dreams of mortal bliss Slumbers now!" [५] Softer than the hill-fog to the forest Are the loving hands of my dear lover, When she sleeps beside me in the starlight And her beauty drenches me with rest. As the quiet mist enfolds the beech-trees, Even as she dreams her arms enfold me, Half awaking with a hundred kisses On the scarlet lily of her mouth. [६] Soul of sorrow, why this weeping? What immortal grief hath touched thee With the poignancy of sadness,-- Testament of tears? Have the high gods deigned to show thee Destiny, and disillusion Fills thy heart at all things human, Fleeting and desired? Nay, the gods themselves are fettered By one law which links together Truth and nobleness and beauty, Man and stars and sea. And they only shall find freedom Who with courage rise and follow Where love leads beyond all peril, 6 Wise beyond all words. [७] It never can be mine To sit in the door in the sun And watch the world go by, A pageant and a dream; For I was born for love, 6 And fashioned for desire, Beauty, passion, and joy, And sorrow and unrest; And with all things of earth Eternally must go, Daring the perilous bourn Of joyance and of death, A strain of song by night, A shadow on the hill, A hint of odorous grass, A murmur of the sea. [८] My lover smiled, "O friend, ask not The journey's end, nor whence we are. That whistling boy who minds his goats So idly in the grey ravine, "The brown-backed rower drenched with spray, The lemon-seller in the street, And the young girl who keeps her first Wild love-tryst at the rising moon,-- "Lo, these are wiser than the wise. And not for all our questioning Shall we discover more than joy, Nor find a better thing than love! "Let pass the banners and the spears, The hate, the battle, and the greed; For greater than all gifts is peace, And strength is in the tranquil mind." आपल्या भर्तुहरी च्या श्रुंगार-शतक सारख साफ़ो च ही शंभर कवितेच कलेक्शन आहे त्यातील काही कविता वर दिलेल्या आहेत.

In reply to by मारवा

याच साफोचे स्वातंत्र्य मात्र या पुढारलेल्या ग्रीक समाजाने मान्य केले नाही. तिची लैंगिकता किंवा त्यावरची काव्य मांडणी ही तिच्यावर झालेल्या अन्यायातून आली असावी. तिचे प्रेम हे स्त्री व पुरुष दोघांवरही होते असे काव्यात दिसते. पण या काव्यात शारीर वर्णने नाहीत. किंवा तसे पुरावे सापडलेले नाहीत त्यामुळे काही इतिहासकार तिला तिला लेस्बियन मानत नाहीत. तिचे फॉन नावाच्या व्यक्तीवर प्रेम होते 'तो' मिळाला नाही म्हणून तिने आत्महत्या केली असाही एक प्रवाद आहे. पण प्राचीन ग्रीक मध्ये फॉन हा प्रेमाचा देवही मानला जातो. त्यामुळे ती शक्यताही पूर्णपणे मान्य होत नाही. तिला काहीकाळ लेस्वोस वरून सिसिलीला हद्दपार करण्यात आले होते. शेवटी तिने या सर्वाला कंटाळून आत्महत्या केली असाही प्रवाद आहे. असो, साफो लेस्बियन होती की नाही हे बाजूला ठेऊन तिच्या काव्याचा आनंद घेता आला म्हणजे पुरे... :)

मुख्य म्हणजे यात अनैसर्गिक काय वाटत तेच मला समजलेल नाही. निसर्गतःच जर स्वलीन्गी आकर्षण असेल तर ते अनैसर्गिक कसं ? अन कोणी कोणाशी लग्न करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. असो. दोघींना शुभेच्छा. अवांतर: काही लोकांच्या मानसिकतेचा अंदाज येउन त्यांच्यापासून लांब राहण्यास काही प्रतिसादांची मदत झाली

जर पुरुषाने स्त्रीशीच लग्न करावे ही कल्पना बुरसटलेली, प्रतिगामी, मागासलेली असेल. आणि कुणीही कुणाशीही लग्न करावे अशी कल्पना मूळ धरत असेल तर बहुपत्नित्व बेकायदेशीर का? कायद्याने सज्ञान य पुरुष आणि क्ष स्त्रिया (य : एक, दोन, तीन, चार इत्यादि कितीही, क्ष: एक, दोन, तीन, चार इत्यादि कितीही ) एकमेकांशी लग्न करु शकले पाहिजेत. लग्न हे दोघांचेच असले पाहिजे हीही कल्पना हळूहळू केराच्या टोपलीत टाकावी आणि जास्त खुल्या दिलाने विचार करुन कुणीही, कुणाशीही, कितीही लोकांशी लग्न करु शकले पाहिजे. त्याहून पुढचे पाऊल म्हणजे ह्या लग्न बंधनात केवळ मनुष्य प्राणीच असणे हेही मागास, जुनाट, प्रतिगामी आहे. त्यामुळे ह्या पवित्र लग्नबंधनात प्राणीसृष्टीही यावी म्हणजे कसे सगळे बंधमुक्त होईल.

In reply to by हुप्प्या

हुप्प्याजी, तसे नव्हे. स्त्री पुरुष विवाह तर ठीक आहेतच पण त्याचप्रमाणे समलिंगी विवाहही तेवढेच नैसर्गिक समजले जातायत त्याबद्दल चालले आहे सगळे! यात बहुपत्नित्व कुठे आले? अगदी समलिंगी विवाहातही बहुपत्नीत्व्/पतित्व (जे काय असेल ते) नकोच! बाकी शक्यता काय कितीही असू शकतातच.

In reply to by रेवती

बहुपत्नीत्व, बहुपतीत्व हे निसर्गातही आढळते. तेव्हा त्याला नैसर्गिक म्हणायला प्रत्यवाय नसावा. जुन्या काळात हिंदू, ख्रिस्ती समाजात, आणि आजही मुस्लिम समाजात बहुपत्नित्व आहे. आणि समजा एक पुरुष आणि काही स्त्रिया ज्या कायद्याने सज्ञान आहेत अशा लग्नबंधनात जाणून बुजून अडकून घेत आहेत तर कायद्याची ना का असावी? जर पुरुषाने स्त्रीशीच लग्न करावे ह्या कल्पनेला आपण सुरुंग लावू शकतो तर एका पुरुषाने एकाच व्यक्तीशी लग्न करावे ह्या कल्पनेला का नाही लावू शकत? य व्यक्तीला क्ष व्यक्तीच्या वैवाहिक संकल्पना पटत नसतील म्हणून क्ष ला तसे करण्याचा हक्कच नसावा असे का?

In reply to by हुप्प्या

बहुपत्नित्वाने मोठाच घोळ होतो असे मला वाटते. पुरुषांसाठी हा तिढा निस्तरता आला नाही तरी एकवेळ चालेल (जर तो मनुष्य कामानिमित्ताने घराबाहेर राहणे , प्रवास यामध्ये असेल तर). हाच मनुष्य चार बायकांबरोबर एका घरात राहतोय हे चित्र जरी डोळ्यासमोर आले तरी मोठा प्रश्न लक्षात येईल. एकंदरीतच नवरा बायको, जोडीदार, किंवा जवळचे नाते यात पझेसिव्हनेस असतोच. म्हणूनतर जो राडा होतो, कायदेशीर अडचणी, याशिवाय आणखी अनेक मुद्दे आहेत. हे टाळावे म्हणून नेहमीचे लग्न असो नाहीतर समलिंगी विवाह असोत त्यात बहुपत्नित्व/ बहुपतित्व नको असे वाटते. हां, आता एका जोडीदाराबरोबर पटले नाही तर कायदेशीररित्या वेगळे झाल्यावर दुसरा विवाह करणे, त्या जोडीदाराशी पटले नाही तर तिसरा जोडीदार निवडणे, नंतर चौथा याला कोणाची हरकत असणार नाही पण अशा मनुष्यप्राण्याचे आयुष्य म्हणजे काय असेल? (बाकीही बरेच मुद्दे आहेत पण जाऊदे!)

ह्म्म... व्यक्ति सापेक्ष पहयचे ठरवले तर ते गैर वाटु नये.जर एखाद्या स्त्रीला पुरुषा ऐवजी स्त्रीच आवडत असेल तर तीच्या नैसर्गिक इच्छा तशाच असाव्यात असे मानण्यास चूक ठरु नये. हेच पुरुषां विषयी देखील म्हणता येइल. त्यांच्यासाठी ज्या भावना नैसर्गिक आहेत त्या समाजासाठी विकॄत असु शकतील.समाजाच्या दॄष्टीने ही गोष्ट स्वीकार्यह ठरेलच की नाही हे सांगता आणि ठरवता येणे कठीण. जाता जाता :- हिंदुस्थानात मला वाटतं दक्षिणेत हिजड्यांचे एक मंदिर आहे {या मंदिराचा आणि बहुतेक महाभारतातील कथेचे काही तरी संबंध आहे म्हणे},जिथे बहुधा वर्षातुन एकदा देशातल्या सर्व भागातुन हिजडे एकत्र येतात आणि त्यांच्या आवडत्या सहचार्‍या बरोबर लग्न करतात.हिजडे असले तरी काय झाल त्यांना देखील "मन" आहेच की ! मुनुष्य प्राण्याच्या ह्या भूतलावरील आयुष्यास भोग हे आहेच ! मग समलिंगी असो वा विषयलिंगी.

नैर्सगिकतेचा आणि नैतिकतेचा काय संबंध.. लोक बर्‍याचदा हे दोन शब्द समानार्थी असल्यासारखे का वापरतात? उ.दा.: एखाद्या विवाहीत पुरुषाचे सुंदर स्त्रीकडे आकर्षित होणे हे नैर्सगिक असेल पण नैतिक असेलच असे नाही. तसेच लग्न होईपर्यंत ब्रह्मचर्य सांभाळणे नैतिक असेल पण नैर्सगिक खचितच नाही.

पण एक शंका येते: भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत जाऊन श्वेतवर्णीयांशीच का लग्न करतात, कृष्णवर्णीयांशी का नाही? किंवा पूर्वेकडच्या आशियायी लोकांशी का नाही? एक अजून एक उदाहरण: रिशी आणि डॅन चे लग्न