एक आगळा Lesbian विवाह सोहळा !
सर्वप्रथम या सुंदर फ़ोटोग्राफ़्स वर एक नजर टाका !
http://www.stephgrantphotography.com/blog/shannon-seema-indian-lesbian-wedding-los-angeles-ca
काही दिवसांपुर्वीच शॅनॉन आणि सीमा या दोन स्त्रियांमधील हा सुंदर लेस्बीयन विवाहसोहळा लॉसएंजल्स या अमेरीकेतील शहरात थाटामाटात संपन्न झाला. हा एका अर्थाने क्रांतीकारी विवाह म्हणावा लागेल. कारण हा नेहमीसारखा एक स्त्रि व एक पुरुष यांच्यातील विवाह नव्हता. तर एका स्त्रि ने केलेला दुसरया स्त्रि बरोबर चा विवाह होता. हा अनेक अर्थांनी वेगळा असा विवाहसोहळा म्हणता येईल याची कारणे अशी की
एक तर हा विवाह अतिशय मोकळेपणाने संपन्न झाला. असे समलैंगिक विवाह क्वचितच इतक्या निर्भयतेने संपन्न होतात. याच्या अगदी नेहमीच्या विवाहासारख्या पत्रिका छापण्यात आल्यात. अनेक प्रतिष्ठीत लोकांना आमंत्रणे पाठविण्यात आली. आणि मोठ्या संख्येने अगदी प्रतिष्ठीत लोकांनी या विवाहाला हजेरी लावली. आणि आपला पाठींबा एक प्रकारे जाहीर केला. असे विवाह सामान्यत: छुपेपणाने होतात त्या पार्श्वभुमीवर यातील आयोजकांचा मोकळेपणा आणि हजेरी लावणारयांचा देखील मोकळेपणा विशेष असाच होता.
दुसरी एक खासियत म्हणजे हा विवाह अगदी व्यवस्थित असा विधीवत पार पाडण्यात आला. दोन्ही वधुंनी अग्निला साक्षी मानुन छान वैदिक पध्दतीने सात फ़ेरे वगैरे घेतले. मेंदी ,मेकअप, वधुला भावांनी डोली त बसवुन आणणे आदी सर्व अगदी साग्रसंगीत करण्यात आलं. आणि त्याच बरोबर ख्रिश्चन पध्दतीने देखील विवाहाचे विधी पाळण्यात आले. एक वधु ख्रिश्चन आणि एक हिंदु असे असुनही कुठेच काहीच अडचण आली नाही. दोन्ही कडचे हिंदु आणि ख्रिश्चन पाहुणे या विवाहात सामील झाल्याने दोन्ही धर्माच्या लोकांना एकमेकांच्या विधीची छान माहीती करुन घेता आली व परंपरेतील वैविध्या चा आनंद ही लुटता आला.
यात विशेष म्हणजे या हिंदु मुलीचे भाउ आई आणि वडिल यांचा या विवाहाला पाठिंबा च नव्हे तर तो धुमधडाक्यात आणि अतिशय शानदार पध्दतीने करावा असे मत होते आणि तसा त्यांनी तो करुनही दाखविला. याचे फ़ोटोग्राफ़्स एका प्रसिध्द फ़ोटोग्राफ़र स्टेफ़ ग्राफ़ हीने काढलेले असुन ते ओपनली सर्वत्र प्रसिध्द देखील केलेले आहेत.फ़ोटोग्राफ़्स पण अतिशय सुंदर जमुन आलेले आहेत. असाच सपोर्ट दुसरया मुलीच्या घरच्यांचा ही होता.हे सर्वात विशेष ! यात सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी ज्या सुंदर उमदेपणाने व माणुसकीने प्रेमाने आपापल्या मुलींच्या लैंगिकतेचा जो बिनशर्त स्वीकार केला. व त्यांच्या आनंदातच आपला आनंद मानुन अगदी पुर्ण सपोर्ट देउन त्यांना आपले आयुष्य आपले स्वातंत्र्य जपु दिले ही आहे.
हे सर्व करतांना त्यांनी बुरसटलेल्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव पडु दिला नाही. प्रत्येक व्यक्तीला माणुस म्हणुन आपल्या लैंगिकतेची निवड करावयाचा हक्क आहे व त्याचा सम्मान केला पाहीजे ही जाणीव या पालकांनी दाखविली हे महत्वाचे आहे.हा बदल सुखावह आहे. शाल्मली पालेकर ( अमोल पालेकरांची पहील्या पत्नीपासुन झालेली मुलगी) ही देखील ओपनली लेस्बीयन आहे. तिच्या आईला जेव्हा हे प्रथम कळले. तेव्हा तिला चित्रा पालेकरांना थोडा धक्का स्वाभाविकपणे बसला. परंतु नंतर त्यांनी ही आपल्या मुलीला समजावुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तिच्याकडुन या विषयावरची पुस्तके मागविली आणि लेस्बीयन म्हणजे नक्की काय असते त्यांची जीवनशैली काय असते हे समजुन घेतले. आणि आज त्या ठामपणे तिच्या पाठीशी उभ्या आहेत. आज त्यांना आपली मुलगी लेस्बीयन आहे या गोष्टीची अजिबात लाज वाटत नाही. इनफ़ॅक्ट घटनेचे जे एक कलम ३७७ समलैंगिकांच्या नैसर्गिक हकांवर गदा आणते त्या विरोधातील लढ्यात त्या समलैंगिकाचे पालक या नात्याने सक्रिय रीत्या उतरल्या आहेत. हा बदल निश्चितच आनंददायी आहे.खालील लिंक बघा.
http://www.indianexpress.com/news/-read-books-to-understand-daughter-s-sexuality-/748270/
आजपर्यंत ही लोक केवळ अल्प्संख्य आहे म्हणुन यांना विकृत ठरविण्यापासुन ते माणुसकीचे साधे हक्क ही नाकारण्यात आलेले आहेत. खर तर आज ही हे सर्व सुरु आहे. या लैंगिकतेला अनैसर्गिक ठरविण्याचा प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.अर्थात यातील बरेच दावे पोकळ सिद्ध झालेले आहे
या विवाहाची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही मुली या सुशिक्षीत आहेत. स्वत:चे स्वतंत्र विचार असणारया आणि करीयर असणारया आहेत.दोघांची कुटुंबेही सुसंकृत आहेत.आणि वयाने ही इनफ़ मोठ्या आहेत. आणि सर्वात शेवटी या मुलींच्या बॉडी लॅंग्वेज कडे नीट बघा काय निर्भय आणि दुरदुरपर्यंत कुठेही अपराध गंड अथवा लज्जा यांच्या चेहरयावर दिसत नाही.
दिसतोय फ़फ़्त जबरदस्त आत्मविश्वास आणि एकमेकांवरील निखळ अनिर्बंध प्रेम !
त्यांच्या प्रेमाला सलाम ! त्यांच्या हिंमती ला सलाम !
प्रतिक्रिया
दोन स्त्रीयांमधले (किंवा
१०० % सहमत
पत्रिका जुळली वाटते
पत्रिका आणि ३६ गुण पण जुळले
छान !! आता त्यांच्या आनंददायी
.
वर आणि वधु
छान आहे.....पुढे काय काय होते
अगम्य आहे...
हा निसर्गाचा चमत्कार मानावा
कायच्या काय उदाहरण आहे ….
होउ शकतं ना
**
धन्यवाद, एक अप्रतिम
यप्प... बेस्ट एकदम :)
चान चान!
हे सगळं चांगलय हो पण अजून वेळ
होऊ दे खर्च!! लग्न आहे घरचं..
बाकी सगळं ठीक.
थिंक अगेन..
तुम्ही सुद्धा.
अर्धवट राव अगोदर पुर्ण माहीती घ्या !
१-विधवा स्त्रिचे शरीर संबंधातुन संतती, संगोपन, याला सामाजीक मान्यता. हि ती सुधारणा.ज्या देशात या समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता आहे त्या कायद्यात सर्व प्रकारच्या प्रोव्हिजन्स केलेल्याच असतात. त्यात अशा जोडप्यांनी क्रुत्रीम पध्दतीने गर्भधारणा करणे, अशा संतती ला कायदेशीर मान्यता, सामाजिक हक्क इत्यादी आनुषंगिक सर्व बाबींचा उहापोह झालेलाच असतो.मुळात कायदा जेव्हा मान्यता देतो तेव्हाच हे सर्व विचार चिंतन करुनच आनुषंगिक प्रोव्हिजन्स आलेल्याच असतात. प्रस्तुत विवाह जेथे झालेला आहे तेथे तो पुर्णपणे कायदेशीर आहे. व तसाच जगात सर्वत्र व भारतात होईल तेव्हा मग लेस्बीयन्स वर अन्याय होणार नाहीत. आणि ही सर्व लढाई कायदा लागु करण्यासाठीची च आहे.असेल ना.
फोटो मस्त विषय जबरदस्त
मला पडलेले काही प्रश्न
ए विद्युत, वाहिनी नसतंय रे
थ्री फेज !!
ह्या शेनान वाहिनी तर फेमेल
सहमत आहे.
फोटो आवडले. लेस्बियन तर
लग्न
बरोबर आहे.
जोरदार पाठींबा आहे.
मला अत्यंत बेसीक प्रश्न पडलाय...
इतरांच्या लग्नात किती मिरवणार
इन्शुरन्स (मिनेपोलीस मध्ये
सॅक्रीड
मला 'फ्रेंड्स' या मालिकेत
>>वधुला भावांनी डोली त बसवुन
प्रेम् असलेल्या भिन्नलिंगी
भिन्नलिंगी विवाहसंबंध हे
शेम टू शेम मत
वा!
+१
जोवर तुम्ही अश्या लोकांच्या
बाकी असे विवाह थाटमाटात का
भिन्न लिंगी विवाहांचा जगभर
लहान मुलांना वृत्तपत्रातल्या
व्हॉट अ परफ़ेक्ट आरग्युमेंट !
हे खरं तर सर्वसाधारण भिन्नलिंगी विवाहांनाही लागू पडतं की. ज्यांच्या मनात भिन्नलिंगी भावना नसतात त्यांच्यावर इतका काळ हे 'वास्तव' लादलं जायचंच.हॅट्स ऑफ़ टु यु !!!नवदांपत्याचे अभिनंदन
Pagination