नमस्कार मंडळी,
आजच कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी झाली त्याचे निकाल पुढीलप्रमाणे:
एकूण जागा: २२४ (मतदान २२३ जागी झाले)
कॉंग्रेस: १२१
भाजप: ४०
जनता दल(धर्मनिरपेक्ष): ४०
कर्नाटक जनता पक्ष: ६
बी.एस.आर कॉंग्रेस : ३
महाराष्ट्र एकीकरण समिती: २
समाजवादी पक्ष: १
अपक्ष आणि इतर: १०
कर्नाटकात २००८ पासून भाजपचे सरकार होते.पक्षाने राज्यात पाच वर्षात बी.एस.येडियुराप्पा, डी.व्ही.सदानंद गौडा आणि जगदिश शेट्टर हे तीन मुख्यमंत्री दिले. मुळात पाच वर्षे सत्तेत असल्यामुळे असलेला प्रस्थापितविरोधी कल, येडियुराप्पांचा भ्रष्ट कारभार,सत्तेत राहण्यासाठी वाटेल ते मार्ग अवलंबणे (रेड्डी बंधूंसारख्या भ्रष्ट तत्वांची मदत घेणे, ऑपरेशन लोटस अंतर्गत विरोधी पक्षांचे आमदार फोडणे इत्यादी) तसेच नंतरच्या काळात स्वत: येडियुराप्पांचे पक्ष सोडून जाणे या कारणांमुळे भाजपचा राज्यात पराभव होणे अगदीच अनपेक्षित नव्हते.या निकालांचा आढावा घेणे हा या लेखाचा उद्देश आहे.
सर्वप्रथम हे स्पष्ट केले पाहिजे की कर्नाटक राज्यातील मतदार विधानसभा निवडणुकांमध्ये सामान्यपणे देशात जे वातावरण असेल त्याच्या विरोधात कौल देतात.१९७७ मध्ये देशभरात इंदिरा गांधींच्या कॉंग्रेस पक्षाचा धुव्वा उडाला.पण वर्षभराने झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींच्या पक्षाला २२४ पैकी १५९ जागा मिळाल्या. १९८० च्या दशकात केंद्रात कॉंग्रेस पक्षाची स्थिर सरकारे होती.पण कर्नाटकात मात्र रामकृष्ण हेगडेंच्या जनता पक्षाचे सरकार होते.१९८९ मध्ये देशभरात राजीव गांधींच्या कॉंग्रेसचा पराभव होत होता पण कर्नाटकात मात्र पक्षाला २२४ पैकी १७८ जागा मिळून घवघवीत यश मिळाले.१९९४ च्या निवडणुकीत कर्नाटकात कौल देशातील वातावरणाला मिळताजुळता आला.पुढे १९९९ मध्ये वाजपेयींची लाट असताना राज्यात मात्र कॉंग्रेसने आरामात विजय मिळविला.२००४ मध्ये एन.डी.ए चा देशात पराभव झाला पण कर्नाटकात मात्र भाजप-जनता दल संयुक्त युती सर्वात मोठा गट ठरली.२००८ मध्ये राज्यात भाजपचा विजय झाला पण २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला.आता २०१३ मध्ये कॉंग्रेस पक्षाचा विजय झाला आहे.या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला मिळालेला विजय फारसा शुभशकुनी नक्कीच नाही :)
राज्यातील निकालांवरून असे दिसते की भाजपचा २० वर्षातील सर्वात मोठा पराभव या निवडणुकांमध्ये झाला आहे.यापूर्वी भाजपने राज्यात ४० जागा हे चित्र १९९४ मध्ये बघितले होते.पण त्यापूर्वीच्या १९८९ च्या निवडणुकांमध्ये पक्षाला अवघ्या ४ जागा मिळाल्या होत्या त्या तुलनेत ४० जागा हे मोठे यश मानले गेले होते.पण यावेळी मात्र मागच्या निवडणुकांमधील ११० जागांच्या तुलनेत ४० जागा म्हणजे जोरदार आपटी भाजपने खाल्ली आहे.तसे असले तरी भाजपने काही "क्लस्टर्स" मध्ये विजय मिळविला आहे.उदाहरणार्थ चिकोडी, बेळगाव,उडुपी-चिकमागळूर, बंगलोर उत्तर आणि बंगलोर दक्षिण लोकसभा मतदारसंघात हे "क्लस्टर्स" आहेत. तसेच जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाने विशेषत: राज्याच्या दक्षिण भागात म्हैसूर, मंड्या, हसन, चामराजनगर आणि बंगलोर ग्रामीण लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील "क्लस्टर्स" मध्ये यश मिळविले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या निवडणुकांप्रमाणेच मतदान झाल्यास जनता दल (धर्मनिरपेक्ष) ला ६ आणि भाजपला ५ जागा मिळण्यात फारशी अडचण येऊ नये. तसेच स्वत: येडियुराप्पा किंवा त्यांचा पुत्र बी.एस.राघवेन्द्र यांनी निवडणुक लढविल्यास शिमोगा लोकसभा मतदारसंघातून कर्नाटक जनता पक्षाला विजय मिळविणे अवघड जाऊ नये.म्हणजे २०१४ मध्ये राज्यातून २८ पैकी कॉंग्रेसला १६, जनता दल (ध) ला ६, भाजपला ५ तर कजपला १ असे चित्र उभे राहू शकेल.अर्थात लोकसभा निवडणुकांमधील मुद्दे वेगळे असतात आणि प्रभावशाली उमेदवार एखाद्या पक्षाने दिल्यास निकालात फरक पडू शकतो.तरीही सांगायचा मुद्दा हा की २२४ पैकी १२१ म्हणजे चांगल्यापैकी यश कॉंग्रेस पक्षाने मिळविले असले तरी लोकसभेत ते तितक्या प्रमाणावर परावर्तित झालेले दिसायची शक्यता जरा कमी आहे.याचे कारण म्हणजे भाजप,जनता दल (ध) आणि कजपने "क्लस्टर्स" मध्ये विजय मिळविले आहेत.
मी गेल्या २५ वर्षांपासून राजकारण फॉलो करत आहे. या निवडणुक निकालांची १९९४ च्या निकालांशी तुलना केल्यास दोन निकालांमध्ये कमालीचे साम्य आढळते.१९९४ मध्येही कॉंग्रेस पक्षाने निवडणुकीला सामोरे जाताना त्यापूर्वीच्या ५ वर्षात तीन मुख्यमंत्री (विरेन्द्र पाटिल,एस.बंगाराप्पा आणि विरप्पा मोईली) दिले होते तर यावेळी भाजपने तसे केले होते.१९९४ मध्ये कॉंग्रेस पक्षाला डोकेदुखी निर्माण करणारा पक्ष होता एस.बंगाराप्पांचा "कर्नाटक कॉंग्रेस पक्ष" तर २०१३ मध्ये भाजपला डोकेदुखी निर्माण करणारा पक्ष होता "कर्नाटक जनता पक्ष". हे दोन माजी मुख्यमंत्री त्यांच्या मुळच्या पक्षातून बाहेर पडून आपल्या मुळातल्या पक्षांच्या मुळावर उठले होते. हे दोन्ही माजी मुख्यमंत्री शिमोगा जिल्ह्यातील तर दोघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होते.१९९४ मध्ये सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा पराभव होऊन तो ३५ जागांनिशी तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला तर २०१३ मध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव होऊन तो ४० जागांनिशी जवळपास तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. १९९४ मध्ये जिंकला मुख्य विरोधी पक्ष जनता दल ११५ जागा घेऊन तर २०१३ मध्ये जिंकला मुख्य विरोधी पक्ष कॉंग्रेस १२१ जागा घेऊन. १९९४ आणि २०१३ या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यापूर्वी कनिष्ठ विरोधी पक्ष असलेल्या पक्षांनी सत्ताधारी पक्षाला मागे टाकत दुसरे स्थान पटकाविले. १९९४ मध्ये भाजपला ४० तर २०१३ मध्ये जनता दल (ध) ला ही ४० जागा मिळाल्या.१९९४ मध्ये बंगाराप्पांच्या कर्नाटक कॉंग्रेस पक्षाला १० तर २०१३ मध्ये येडियुराप्पांच्या कर्नाटक जनता पक्षाला ६ जागा मिळाल्या. या निकालांचे स्वरूप १९९४ आणि २०१३ मध्ये जवळपास सारखेच आहे. डिसेंबर १९९४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर मे १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील २८ लोकसभेच्या जागांपैकी १६ जागा जनता दलाला, ६ भाजपला, ५ कॉंग्रेसला तर १ जागा कर्नाटक कॉंग्रेस पक्षाला (बंगाराप्पांची शिमोगा) मिळाली होती. त्याच धर्तीवर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये २८ पैकी १६ जागा कॉंग्रेसला, ६ जागा जनता दल (ध) ला, ५ जागा भाजपला तर १ जागा कर्नाटक जनता पक्षाला मिळणार का याचे उत्तर काळच देईल.
दुसरे म्हणजे २००९ मध्ये सत्तेत परत आल्यानंतर कॉंग्रेस-युपीए ला मोठ्या राज्यांमध्ये केवळ महाराष्ट्रात निसटता विजय मिळाला होता.बाकी हरियाणा आणि आसाम या मध्यम आकाराच्या राज्यांमध्ये पक्षाला विजय मिळाला होता.पण उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि गुजरात या मोठ्या राज्यांमधे पक्षाचा पराभवच झाला होता.केरळमध्ये तर अगदी काठावरचे बहुमत मिळाले होते.या पार्श्वभूमीवर कर्नाटकातला निर्भेळ विजय हा मोठ्या राज्यात पक्षाला बऱ्याच काळानंतर मिळालेला विजय आहे आणि त्याचे महत्व कॉंग्रेस पक्षाला नक्कीच वाटणार.कॉंग्रेस पक्षाला मिळालेल्या या विजयाबद्दल पक्षाचे अभिनंदन.
पण हा विजय तसा फार अनपेक्षित नाही.त्यातून जवळपास दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून युपीए सरकार अडचणीत येत आहे. हा विजय म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या यशाची नांदी वगैरे कल्पना कोणी करून घेणार नाही ही अपेक्षा.
वाचने
38390
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर. भाजप च zआलेल कॉंग्रेसी
माहितीपूर्ण लेख
प्रतिसाद
In reply to माहितीपूर्ण लेख by राजेश घासकडवी
क्या बात है । आपल्या
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
>>> ४. महाराष्ट्र: १९८०,१९९५
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
धन्यवाद
In reply to >>> ४. महाराष्ट्र: १९८०,१९९५ by श्रीगुरुजी
सखोल आकडेवारीबद्दल धन्यवाद.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
मला वाटतं की हे मतदारांवर
In reply to सखोल आकडेवारीबद्दल धन्यवाद. by राजेश घासकडवी
सर्वप्रथम हे स्पष्ट केले
In reply to माहितीपूर्ण लेख by राजेश घासकडवी
कोरिलेशन
In reply to सर्वप्रथम हे स्पष्ट केले by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोरिलेशन
In reply to कोरिलेशन by क्लिंटन
लोकसभेचा निकाल अन कर्नाटक
In reply to कोरिलेशन by ३_१४ विक्षिप्त अदिती
२७२ आणि २८ चे कनेक्शन लावू
In reply to लोकसभेचा निकाल अन कर्नाटक by बॅटमॅन
हा प्रतिसाद जरा मेथडॉलॉजीशी
In reply to २७२ आणि २८ चे कनेक्शन लावू by ३_१४ विक्षिप्त अदिती
परत एकदा कोरिलेशन
In reply to कोरिलेशन by ३_१४ विक्षिप्त अदिती
मतदार म्हणजे हाडामासांची
In reply to परत एकदा कोरिलेशन by क्लिंटन
आत्तापर्यंत असं दिसलं आहे
In reply to मतदार म्हणजे हाडामासांची by ३_१४ विक्षिप्त अदिती
रोमन लिपी मध्ये लिही की सरळ
In reply to आत्तापर्यंत असं दिसलं आहे by बॅटमॅन
नको नको मध्ये त्याच
In reply to रोमन लिपी मध्ये लिही की सरळ by प्यारे१
लोकसभा खासदारांचं वितरण पॉसॉन
In reply to कोरिलेशन by क्लिंटन
क्लिंटनशी सहमत
In reply to माहितीपूर्ण लेख by राजेश घासकडवी
पण यावेळेस विधानसभा निवडणूक
In reply to क्लिंटनशी सहमत by ऋषिकेश
जेव्हा असे वर्षाचे अंतर होते
In reply to पण यावेळेस विधानसभा निवडणूक by पिंपातला उंदीर
सुंदर
लिंगायत
In reply to सुंदर by चिरोटा
+
In reply to सुंदर by चिरोटा
>>> मोदींनी तीन सभा घेतल्या
In reply to + by नितिन थत्ते
तरी पण
In reply to >>> मोदींनी तीन सभा घेतल्या by श्रीगुरुजी
मोदींचा प्रचार
In reply to >>> मोदींनी तीन सभा घेतल्या by श्रीगुरुजी
यावरून आठवले
In reply to मोदींचा प्रचार by क्लिंटन
सहमत आहे
In reply to मोदींचा प्रचार by क्लिंटन
प्रभावी विश्लेषण
हम्म्म्म्म्म्म्म्म
खूप छान
मनमोहन सिंहांचे विधान
In reply to खूप छान by खेडूत
>>> ज्या प्रकारे मामोसिंगानी
In reply to मनमोहन सिंहांचे विधान by क्लिंटन
+१००
In reply to >>> ज्या प्रकारे मामोसिंगानी by श्रीगुरुजी
मला ह्यातलं काहीही कळत नाही..
>>>> मी गेल्या २५ वर्षांपासून
तुमचा लेख खूपच अभ्यासू आहे.
राज्यपातळीवरील कल
In reply to तुमचा लेख खूपच अभ्यासू आहे. by श्रीगुरुजी
लोकसभा निवडणुकीला अजुन एक
In reply to राज्यपातळीवरील कल by क्लिंटन
शक्य आहे
In reply to लोकसभा निवडणुकीला अजुन एक by पिंपातला उंदीर
तुमची ह्या विषयातील आकडेवारी
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी
In reply to तुमची ह्या विषयातील आकडेवारी by बंडा मामा
काही प्रमाणात बंडा मामा
In reply to तुमची ह्या विषयातील आकडेवारी by बंडा मामा
गणित
In reply to काही प्रमाणात बंडा मामा by पिंपातला उंदीर
म्हणूनच टक्के सोडून गणितातील
In reply to गणित by क्लिंटन
* इथे ज्याप्रकारे टक्केवारी
In reply to म्हणूनच टक्के सोडून गणितातील by बंडा मामा
सब्जेक्टिव्हिटी
In reply to म्हणूनच टक्के सोडून गणितातील by बंडा मामा
चांगला लेख आहे
कर्नाटक विधानसभा निवडणुक
लेख आवडला
In reply to कर्नाटक विधानसभा निवडणुक by श्रीगुरुजी
असे वाटते...
In reply to कर्नाटक विधानसभा निवडणुक by श्रीगुरुजी
+१
In reply to असे वाटते... by विकास
माहितीपूर्ण लेख
+१
In reply to माहितीपूर्ण लेख by विकास
दर
सहमत. दर ५ वर्षानी सत्ताधारी
In reply to दर by चिरोटा
+१
In reply to सहमत. दर ५ वर्षानी सत्ताधारी by पिंपातला उंदीर
कुणीतरी म्ह्टलेय...
In reply to +१ by चिरोटा
कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय
भारतातील निवडणुक पध्दत
In reply to कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय by श्रीगुरुजी
>>> म्हणजे काँग्रेसचा पराभव
In reply to भारतातील निवडणुक पध्दत by क्लिंटन
प्रमोद महाजन
In reply to >>> म्हणजे काँग्रेसचा पराभव by श्रीगुरुजी
२०१४ चा लोकसभेचा निकाल काहीही
In reply to प्रमोद महाजन by क्लिंटन
हा तर आपल्या लोकशाहीवरचा काळा डाग..
In reply to भारतातील निवडणुक पध्दत by क्लिंटन
फ्रान्स
In reply to हा तर आपल्या लोकशाहीवरचा काळा डाग.. by चौकटराजा
आमचं मॉडेल.
In reply to फ्रान्स by क्लिंटन
>>> ही स्थिती म्हणजे आपल्या
In reply to हा तर आपल्या लोकशाहीवरचा काळा डाग.. by चौकटराजा
मुळात कुठलीही घटना आणि कायदा
In reply to >>> ही स्थिती म्हणजे आपल्या by श्रीगुरुजी
काहि गोष्टी अध्याहृत
In reply to >>> ही स्थिती म्हणजे आपल्या by श्रीगुरुजी
तंतोतंत
In reply to कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय by श्रीगुरुजी
हा हा
In reply to तंतोतंत by श्रावण मोडक
असू द्या हो मोडक साहेब. कुणी
In reply to तंतोतंत by श्रावण मोडक
कर्नाटकातील विजय हा
धन्यवाद
उत्तम लेख
राज्यातून लोकसभेचे निकाल कसे लागतील?
अजून एक मुद्दा
In reply to राज्यातून लोकसभेचे निकाल कसे लागतील? by क्लिंटन
आणखी एक अधिक realistic शक्यता
In reply to राज्यातून लोकसभेचे निकाल कसे लागतील? by क्लिंटन
>>> तर राज्यातून भाजपला ७,
In reply to आणखी एक अधिक realistic शक्यता by क्लिंटन
क्लिंटनशेठ धन्स.
नेहमीप्रमाणेच मस्त लेख आणि
बहुतेक
In reply to नेहमीप्रमाणेच मस्त लेख आणि by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
माझीही काही मते -
+१
In reply to माझीही काही मते - by जयंत कुलकर्णी
सूचना आवडल्या.
In reply to +१ by श्रीरंग_जोशी
अवांतर ३ राहिले.
In reply to सूचना आवडल्या. by नितिन थत्ते
धन्यवाद
In reply to सूचना आवडल्या. by नितिन थत्ते
फूलप्रूफ
In reply to सूचना आवडल्या. by नितिन थत्ते
+१
In reply to फूलप्रूफ by सुनील
कॉलिंग थत्तेचाचा
In reply to सूचना आवडल्या. by नितिन थत्ते
हा कॉंग्रेस चा दणदणीत
In reply to कॉलिंग थत्तेचाचा by पुण्याचे वटवाघूळ
-१
In reply to माझीही काही मते - by जयंत कुलकर्णी
कर्नाटकात झालेले पानिपत पाहून
क्लिंटन यांनी दिलेल्या
भारताची का
In reply to क्लिंटन यांनी दिलेल्या by नितिन थत्ते
आपले विश्लेषण आवडले.
नवीन कल