Skip to main content

आताची परीक्षापध्दती - योग्य की अयोग्य?

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 26/01/2013 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारच्या नवीन धोरणांनुसार शिक्षण पध्दतीत्त अमुलाग्र बदल करण्यात येत आहेत. सतत नवीन प्रयोग चालू आहेत. परीक्षांचे स्वरूप बदलले आहे.आठ्वीपर्यंत ओपन बूक टेस्ट आणि नववीला एकदम दिल्ली बोर्डाचा अभ्यासक्रम!! सर्वंकश मूल्यमापन करताना, विद्यार्थ्याच्या दप्तराचे ओझे कमी केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मी माझ्या मुलाचे दप्तर उचलू शकत नाही, तो कसे उचलतो देव जाणे. नवीन धोरणानुसार अभ्यासाच्या बरोबरीने उपक्रम, प्रकल्प, ग्रुह्पाठ, वर्गपाठ अशा प्रकारे प्रत्येक विषयाचे लिखाण पूर्ण करताना मुलगा कारकुनी तरी उत्तम करील यात शंका नाही. दप्तराचे ओझे उचलून उचलून हमालीची पण सवय झालीच आहे!! माझ्या माहितीतील एका डॉक्टरबाईने आपल्या मुलीचे वर्गकाम पूर्ण करण्यासाठी महीना पाच हजार रूपये देऊन कारकून ठेवला आहे!! ट्क्केवारीतून येणारे नैराश्य टाळण्यासाठी श्रेणी पध्दत सुरू झाली आहे. ज्यामध्ये दहा ते पंधरा पाठांसाठी फक्त तीस गुण आणि अभ्यास तीस गुणांसाठीही शंभर मार्कांचाच!! उरलेले वीस गुण पूर्णपणे शिक्षकांच्या हातात आहेत जे आज तरी शिक्षकांवर अवलंबून आहेत. बेस्ट फाईव्ह मुळे खेळाचे चार ट्क्के धरून मुले एकशे चार ट्क्के सुध्दा मिळवत आहेत. त्यामुळे रत्नागिरीसारख्या छोट्या शहरात सुध्दा अ‍ॅड्मिशन ९५% ना सायन्स साठी बंद!! टक्केवारीच्या या प्रवाहात आपल्या मुलाला बाजूला ठेवले तर त्याच्या प्रवेशाच्या वेळी पैशांची जमापुंजी संपवणे आले. जे नैराश्य टाळण्यासाठी श्रेणीपध्द्त सुरू झाली, ती प्रवेशाच्या वेळी ग्राह्य धरली जात नाही. रत्नागिरीजवळ्च्या एका गावातील सहावीत शिकणाय्रा मुलाने बाबांनी मॅच बघायला पाठवले नाही म्हणून आत्महत्या केली!! या नैराश्याला उपाय काय? या सर्व प्रयोगांमुळे वाचन कराण्यासाठी मुलांजवळ वेळ्च उरत नाही. मुळात जास्त प्रमाण इंग्रजी माध्यमातून शिकणाय्रांचे, त्यात वाचन करायला वेळच नाही, मग मराठीतील शब्द मुलांना कळणार कसे? शिकवणाय्रा शिक्षकांपैकी दहा ट्क्के सन्माननीय अपवाद वगळले तर सगळी बोंबच आहे. या सर्वांमधून जाणारी ही पिढी पुढील आयुष्यातील आव्हाने समर्थपणे पेलू शकेल? ही परीक्षा पध्द्त आपल्याला योग्य वाटते? कदाचीत काही गोष्टी मला माहीत नसतीलही, जाणकारांनी प्रकाश टाकायला हरकत नाही. यापूर्वी यावर धागा येऊन गेला असेल तर त्याची लिंक द्यावी.

वाचने 28708
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by चौकटराजा

तुमच्या वयाबद्दल ऐकलंय त्यावरून ही मुलगी २५-२८ वयाची असेल ना! ती खरोखर खास दिसतेय! तिला एवढ्या गोष्टी शिकवल्यात आणि स्वतःच्या पायावर उभी केलीत त्याबद्दल तुमचं खरोखर कौतुक वाटलं. तुम्हाला त्रास होणार नसेल तर तिला वाढवतानाचे अनुभव इथे शेअर कराल का?

In reply to by रेवती

आणि मुलीच्या संगोपनावर एक लेख टाकायची कृपा करा. अत्यंत महत्त्वाच काम होईल ते.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसे नाहीत म्हणून रस्त्यावर आलेल्यांच्या तुलनेत पैसा आहे पण जीव रमत नाही असेच लाखो लोक आहेत. - थोडीफार पुलंच्या नारायण हरितात्या एका बाजुला आणि रावसाहेब दुस-या बाजुला अशी तुलना जाणवुन गेली.

In reply to by संजय क्षीरसागर

सध्या दुवादान अजून जमत नाहीये, कुणी त्याबद्दल मार्गदर्शन करून माझा "दुवा" घेईल का?

In reply to by बाळकराम

लेखनचौकटीच्या वरच्या पर्यायातला डावीकडून पाचवा पर्याय निवडा (इन्सर्ट लिंक) त्यात लिंक पेस्ट करा. `लिंक टेक्स्ट'मधे `दुवा' असा शब्द (इतरत्र टाइप करून) पेस्ट करा आणि ओके क्लिक करा. झालं काम.

In reply to by संजय क्षीरसागर

सं.म.ला लिंक देऊन आपला प्रतिसाद त्यापुरता मर्यादित करण्यास कळवावे आणि आमचा दुवा घ्यावा.

schooling did not come in way of my education हे मार्क ट्वेन यांचे दुसरे प्रसिद्ध वाक्य आहे. रस्त्यावर मारुती किंवा दुर्गा देवीचे खडूने चित्र काढणारा चित्रकार काय कमी दर्जाचा असतो ? (आमचा कुत्रा गाढव वाटतो आणि उंदीर काढला तर डुक्कर वाटते.) हे त्याला संधी न मिळाल्याने तो बिचारा चांगला चित्रकार असूनही लोकांनी फेकलेले पैसे उचलून जगात असतो. पण जीवशास्त्रात गुण मिळाल्याने डॉक्टर झाल्यावर आपली चित्रकला काय दर्जाची आहे हे आम्हाला कोणी विचारत नाही. कितीही शिव्या घातल्या तरी पुस्तकी शिक्षणाचे महत्त्व सहजासहजी कमी होणार नाही हे सत्य आहे आपल्या मुलास चरितार्थापुरते पैसे मिळवता येतील इतके पुस्तकी शिक्षण घेणे आवश्यक आहे. एक तर सुंदर मुलीशी लग्न करा किंवा आपल्या बायकोला सुंदर माना हा सुखी जीवनाचा पाया आहे. पैसा महत्वाचा नाही हे म्हणणे दांभिकपणाचे आहे. money is like sixth sense but without it the other five senses dont work श्री चेतन भगत यांनी पुरेसा पैसा कमावल्यावर मग लेखन कार्यास हात लावला. आपल्या मुलास वय वर्षे ३०(किंवा ३५)पर्यंत पोसण्याची ताकद असेल तर तुला हस्तकला आवडते तर त्यात करियर कर म्हणून सांगता येईल. १२० कोटी लोकसंख्येच्या देशात rat race नाही तर insect race च म्हणायला पाहिजे.आपल्या शिक्षण पद्दतीत बरयाच चुका त्रुटी आहेत पण एका वर्गात १०० मुले बसवल्यावर त्यांची तोंडी परीक्षा कोण आणि कशी घेणार? त्यात objectivity कशी आणणार? वर शिक्षक कोण होतो? ज्याला दुसरे काही मिळत नाही तो.याला साधा उपाय काय? डॉक्टर सौ विजय वाड या प्रसिद्ध शिक्षण तज्ञ यांनी एकदा सरकारकडे एक निवेदन दिले कि दहावीला इतके उच्च दर्जाचे गणित ठेवून तुम्ही काय सध्या करीत आहात? खेड्यातील मुलीला या गणिताचा काय फायदा?मुळात तिच्या पालकांना तिच्या शिक्षणावरील खर्च परवडत नाही. एकदा गणितात नापास झाल्यावर तिला शाळेतून काढून टाकले जाते आणि आयुष्य भर दहावी नापास हा शिक्का मिरवत ती जगते. त्यापेक्षा आरोग्य आणि गृहविज्ञान हे विषय त्यांना ऐच्छिक म्हणून गणिता ऐवजी दिल्यास त्यांना दहावी पास होऊन सन्मानाने जगत येईल वर सुमाता होता येईल आणि कुटुंबाला वर येण्यात मदत होईल. पण आपण जागतिकीकरण करत करता अगतिकीकरण करीत आहोत हे कल्याण कारी राज्यातील शिक्षण तज्ञ आणि सम्राटाना केंव्हा कळेल ते परमेश्वरच जाणे.

In reply to by सुबोध खरे

पुस्तकी शिक्षण घेणे आवश्यक आहे
छंद आणि चरितार्थ एक करणं हा आनंद आहे, इतकाच माझा मुद्दा आहे!

आयुष्यात एकच काहितरी उद्योग करता येइल असं का ग्रुहित धरतायत सगळे? 'पॅशन' असेल तर आवडणारी, आणि गरज असणरी, अशी प्रत्येक गोष्ट करता येइल.

In reply to by कवितानागेश

पॅशन,प्रो पॅशन आणि पॅशन प्लस असे विविध प्रकार जवळ बाळगणारे लोक आयुष्यभर एकच धंदा करताना पाहिले आहेत. फारच कमी खर्चिक गाडी आहे ती.

In reply to by ५० फक्त

माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान डॉक्टर भावाने जेव्हा बाबांकडे "हीरो होंडा"चीच बाईक मागितली तेव्हा मी माझी पॅशन प्लस त्याला देऊन माझ्यासाठी नवी पॅशन प्रो घेतली. ;) बाकी "आकाशं पतितं तोयं यथा गच्छती सागरं" या न्यायाने हल्ली इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हील, मेकॅनिकल इतकंच काय अगदी मायनिंग मधून इंजिनीयरींग केलेले सारे आयटीत (किंवा ऐटीत) जातात. याबद्दल शिक्षण तज्ञांचे काय मत आहे?

In reply to by चौकटराजा

फारच कमी ईंजिनीयरींगचे विद्यार्थी हे ज्ञानार्थी असतात. त्यांना फक्त इंजिनीयरींगच्या "डीग्रीशी" मतलब असतो.

In reply to by धन्या

इतरांचे माहीत नाही पण काही लोक ठरवून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगलाच प्रवेश का घेतात हा प्रश्न मला नेहमीच पडतो कारण त्यापैकी एकालाही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगसंबंधीत काम करताना मी पाहिले नाही. सगळे मा.त्.मध्येच ;-).