सरकारच्या नवीन धोरणांनुसार शिक्षण पध्दतीत्त अमुलाग्र बदल करण्यात येत आहेत. सतत नवीन प्रयोग चालू आहेत. परीक्षांचे स्वरूप बदलले आहे.आठ्वीपर्यंत ओपन बूक टेस्ट आणि नववीला एकदम दिल्ली बोर्डाचा अभ्यासक्रम!! सर्वंकश मूल्यमापन करताना, विद्यार्थ्याच्या दप्तराचे ओझे कमी केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मी माझ्या मुलाचे दप्तर उचलू शकत नाही, तो कसे उचलतो देव जाणे. नवीन धोरणानुसार अभ्यासाच्या बरोबरीने उपक्रम, प्रकल्प, ग्रुह्पाठ, वर्गपाठ अशा प्रकारे प्रत्येक विषयाचे लिखाण पूर्ण करताना मुलगा कारकुनी तरी उत्तम करील यात शंका नाही. दप्तराचे ओझे उचलून उचलून हमालीची पण सवय झालीच आहे!! माझ्या माहितीतील एका डॉक्टरबाईने आपल्या मुलीचे वर्गकाम पूर्ण करण्यासाठी महीना पाच हजार रूपये देऊन कारकून ठेवला आहे!!
ट्क्केवारीतून येणारे नैराश्य टाळण्यासाठी श्रेणी पध्दत सुरू झाली आहे. ज्यामध्ये दहा ते पंधरा पाठांसाठी फक्त तीस गुण आणि अभ्यास तीस गुणांसाठीही शंभर मार्कांचाच!! उरलेले वीस गुण पूर्णपणे शिक्षकांच्या हातात आहेत जे आज तरी शिक्षकांवर अवलंबून आहेत. बेस्ट फाईव्ह मुळे खेळाचे चार ट्क्के धरून मुले एकशे चार ट्क्के सुध्दा मिळवत आहेत. त्यामुळे रत्नागिरीसारख्या छोट्या शहरात सुध्दा अॅड्मिशन ९५% ना सायन्स साठी बंद!!
टक्केवारीच्या या प्रवाहात आपल्या मुलाला बाजूला ठेवले तर त्याच्या प्रवेशाच्या वेळी पैशांची जमापुंजी संपवणे आले. जे नैराश्य टाळण्यासाठी श्रेणीपध्द्त सुरू झाली, ती प्रवेशाच्या वेळी ग्राह्य धरली जात नाही. रत्नागिरीजवळ्च्या एका गावातील सहावीत शिकणाय्रा मुलाने बाबांनी मॅच बघायला पाठवले नाही म्हणून आत्महत्या केली!! या नैराश्याला उपाय काय?
या सर्व प्रयोगांमुळे वाचन कराण्यासाठी मुलांजवळ वेळ्च उरत नाही. मुळात जास्त प्रमाण इंग्रजी माध्यमातून शिकणाय्रांचे, त्यात वाचन करायला वेळच नाही, मग मराठीतील शब्द मुलांना कळणार कसे?
शिकवणाय्रा शिक्षकांपैकी दहा ट्क्के सन्माननीय अपवाद वगळले तर सगळी बोंबच आहे.
या सर्वांमधून जाणारी ही पिढी पुढील आयुष्यातील आव्हाने समर्थपणे पेलू शकेल? ही परीक्षा पध्द्त आपल्याला योग्य वाटते? कदाचीत काही गोष्टी मला माहीत नसतीलही, जाणकारांनी प्रकाश टाकायला हरकत नाही. यापूर्वी यावर धागा येऊन गेला असेल तर त्याची लिंक द्यावी.
वाचने
28708
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
चौरा, तुमचं फार कौतुक वाटलं.
In reply to एक सांगायला हरकत नाही ... by चौकटराजा
आपले अभिनंदन चौरा. फार मोठी
In reply to एक सांगायला हरकत नाही ... by चौकटराजा
चौरा, साष्टांग प्राणिपात स्विकारा!
In reply to आपले अभिनंदन चौरा. फार मोठी by रेवती
__/\__
In reply to एक सांगायला हरकत नाही ... by चौकटराजा
पैसे नाहीत म्हणून रस्त्यावर
In reply to पहिला प्रॅक्टीकल प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
हा हा!!
In reply to श्री बाळकराम यांनी १८३५ चा आक्खा खलिताच पेस्ट केला आहे by संजय क्षीरसागर
आपलं मत मांडायला दुव्याची लिंक देणं पुरेसं आहे
In reply to हा हा!! by बाळकराम
कृपया `उजवीकडून पाचवा' असं वाचावं
In reply to आपलं मत मांडायला दुव्याची लिंक देणं पुरेसं आहे by संजय क्षीरसागर
धन्यवाद संजयजी!
In reply to कृपया `उजवीकडून पाचवा' असं वाचावं by संजय क्षीरसागर
वाचनीय काथ्या
शिक्षण पद्धती
आपल्या मुलास चरितार्थापुरते पैसे मिळवता येतील इतके
In reply to शिक्षण पद्धती by सुबोध खरे
आयुष्यात एकच काहितरी उद्योग
पॅशन,प्रो पॅशन आणि पॅशन प्लस
In reply to आयुष्यात एकच काहितरी उद्योग by कवितानागेश
सहमत आहे...
In reply to पॅशन,प्रो पॅशन आणि पॅशन प्लस by ५० फक्त
आय टी त गेल्यावर ...
In reply to सहमत आहे... by धन्या
शक्यता कमी आहे...
In reply to आय टी त गेल्यावर ... by चौकटराजा
+१
In reply to सहमत आहे... by धन्या