Skip to main content

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

लेखक सुहास झेले यांनी शुक्रवार, 23/11/2012 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!

वाचने 448129
प्रतिक्रिया 716

प्रतिक्रिया

In reply to by Gayatri Muley

अ‍ॅप्लीकेशन म्यानेजरमधे फाईल म्यानेजर असं दिसतं का ? तिथे फोन मेमरी आणि तुम्ही टाकलेले एसडी कार्ड दिसतं का ? जर दिसत नसेल तर त्याचा अर्थ एसडी कार्ड व्यवस्थित बसलेलं नसावं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अ‍ॅप्लीकेशन मॅनेजरमधे गेल्यानंतर मला downloaded apps, running apps, all apps, इतकेच पर्याय दिसतात... अन् मेमरी कार्ड मधे app जरी नसले तरी फोटो, गाणे आहेत आणि ते मी नेहमीच वापरत असते, त्यामुळे मेमरी कार्ड व्यवस्थित बसलेल आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते...

In reply to by Gayatri Muley

all apps मधे ते फाईल म्यानेजर असतं. पण असो, उद्या आपल्या कंपनीचा फोन पाहतो आणि मग सांगतो. -दिलीप बिरुटे

आपल्या अँड्राइड मोबाईलवरुन फोन मेमरी किंवा मेमरी कार्डवर असलेले फोटो, डॉक्युमेंट्स, एम्पी थ्री, व्हिडियो, आणि काही आपण चुकुन डिलिट केलं असेल तर पुन्हा ते मिळवायचा मार्ग म्हणजे डिस्कडिगर. फोन रुट केलेला असला पाहिजे ही अट हे अप्लिकेशन वापरायला पहिली अट आहे. काल मोबाईल ग्यालरीतून काही कचरा डिलिट करण्याच्या नादात मला आवडलेला फोटो टाकला डिलिट करुन मग तो येईपर्यंत जीवाची तगमग सुरु झाली. डिस्कडिगर ने तो फोटो मिळवता आला. आपल्याला सांगावं वाटलं म्हणुन हा प्रपंच. :) -दिलीप बिरुटे

माझ्याकडे Karbonn Taitanium S5 हा फोन आहे. मला फोन रूट मारायचा आहे . मी खूप सारे पर्याय try करून पहिले. परंतु मला हे जमत नाहिये. मी computer(windows 7) च्या मदतीने रूटचा प्रयत्न केला . पण संगणकात फोनचे USB Driver install होत नाहीये . याबाबतीत कुणी मदत करू शकता का ? रूट करण्याची प्रोसेस स्टेप्स wise समजावले तर अधिक चांगले . THANX IN ADVANCE

In reply to by आ युष्कामी

http://forum.xda-developers.com/apps/framaroot/root-framaroot-one-click… यादुव्या वरुन एकेक फर्मरुतअप्लिकेश् न टाकुन पाहा ! नवीन व्हर्जन पासून सुरुवात करा.एकच अप्लिकेशन मोबाइल मधे टाकल्यावर ते ओपन करा त्यात बोरोमीर किंवा बराहीर असे पर्याय दिसतात पैकी एकावर क्लिक केल्यावर सक्सेस असा मेसेज येतो नंतर फोन बंद करा आणि पुन्हा चालु करा फोन मधे सुपर सु हे अप्लिकेशन आपोआप येते ते आले असले तर आपला फोन रूट झाला असे समजा फोन रूट १००% होतो झाला नाही तर पुन्हा इथे विचारा मदत नक्की करतो. -दिलीप बिरुटे

In reply to by आ युष्कामी

आपण बरोबर अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल केलं आहे. आपल्या मोबाईल मधे आपण टाकलेलें फार्मरुट चालत नाही, त्यातल्या Boromir केल्यावर वरचा येरर आला आहे येऊ द्या अजिबात घाबरु नका. :) मी दिलेल्या लिंकवरुनच दुसरे अप्लीकेशन व्हर्जन टाका. Framaroot-1.9.3.apk इन्स्टॉल केल्यावर Boromir Faramir Barahir असे पर्याय दिसतील. त्यातल्या Barahir वर क्लीक करा. सक्सेसचा मेसेज येईल. फोन बंद करुन चालू करा. आणि मेसेज आल्यावर गुगल प्लेवरुन सुपर सु हे अप्लीकेशन टाकून घ्या. फोन रुट झालेला असेल. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

framaroot मधील दोन्ही exploit try करून पहिले पण रूट होत नाहीये. screenshots सुद्धा काढलेत पण डकवण्याबद्दल माहित नाही. मी इथे फक्त वाचनमात्रच असतो

आधी ही माहिती कुणी दिली असेल तर पुनरुक्तीबद्दल क्षमस्व! अँड्रॉईड फोनचं रुपांतर वाय फाय हॉट स्पॉट मध्ये करणं आणि त्यावरून लॅपटॉप वापरणं हे प्रवासात बर्‍यापैकी उपयोगी पडू शकतं. मी यासाठी फॉक्स-फाय हे अ‍ॅप वापरतो. Continuous connectivity मिळतेच असं नाही, बरेचदा ५-१० मिनिटांनंतर इंटरेनेट अ‍ॅक्सेस बंद होतो, पण लगेचच परत सुरू करता येतो. पण थोड्याच वेळ लॅपटॉप चालू करून एखादी-दुसरी फाईल इमेल वरून डाऊनलोड करणं वा पाठवणं यासाठी १० मिनिटं पुरतात. मला विमानतळांसारख्या ठिकाणी - जिथे अन्यथा १० मिनिटांसाठी तासभराचे पैसे भरावे लागतात- ही सोय उपयोगी पडलेली आहे.

Clean Master च्या अ‍ॅप मॅनेजरचा वापर करुन डेटा कार्डवर अ‍ॅप ट्रान्सफर करता येतात की... यासाठी अ‍ॅप मॅनेजरचा मुव्ह हा ऑप्शन पहावा. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Lasya :- Anoushka Shankar

टिम व्हिवर वापरतोय. डेस्क्टॉपचा डेटा टॅब वर आणि टॅबचा डेस्क्टॉपर इंटरनेटवरून ट्रान्स्फर करण्यासाठी उपयोगी वाटतयं. (अर्थात त्याचं डेस्कटॉप व्हर्जन डेस्कटॉपवर इन्स्टॉल असलं पाहिजे). सध्या तरी घरच्या घरीच वायफायवर डेटा ट्रान्स्फर करतोय. पण घरचा डेस्कटॉप ऑन असेल तर जगात कुठूनही डेटा ट्रान्स्फरच काय पण डेस्कटॉपचा रिमोट अ‍ॅक्सेसही घेता येतो.

In reply to by वामन देशमुख

श्यामसिंगच्या मोबाईलवर "मोशन्स अ‍ॅन्ड जेस्चर्स" मध्ये "पाम मोशन" असा ऑप्शन आहे. स्क्रीनवर हाताचा तळवा फिरवला की, स्क्रीनशॉट सेव्ह होतो. अ‍ॅपसुद्धा असेल.

In reply to by वामन देशमुख

व्ह्यालुम कमी करण्याचं आणि मोबाइल स्विच ऑफ़ करण्याचं बटन असे दोन्ही एकाच वेळी दाबा मोबाइल स्क्रीन शॉट घेतला जातो !!! -दिलीप बिरुटे

कार्टूनिस्ट प्राण आपल्यात नाहीत... आज सकाळी त्यांचे निधन झाले...:( :( त्यांनी अजरामर केलेली कार्टून्स (चाचा चौधरी, बिल्लू, पिंकी) Android App वर उपलब्ध आहेत - Pocket Toons

कोणताही अँड्राईड फोन रुट करण्यासाठी व्हीरुट हे संगणकावर उतरवून घेणारं अ‍ॅप्लीकेशन वापरा. आपल्या फोन सेटींग मधे जाऊन डेव्हलपर ऑप्शन मधे युएसबी डबींग वर क्लीक करा. मग कॉड लावून संगणकाला जोडा व्ही रुट अ‍ॅप्लीकशन सुरु करा. एक दोनदा फोन रिस्टार्ट झाल्यावर आपला फोन रुट झालेला असेल. फोन रुट झाला की नै हे तपासण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील रुट चेकर हे अ‍ॅप्लीकेशन वापरा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रुट करणं आता अधिकाधिक सोप होत चाललयं. धाग्याच्या सुरुवातीला वाटलेली "रुट करण्यातली थ्रील" कमी होईल काय? टॅब जूना झाला की करेन म्हणतो.

ट्युबमेट युट्युबवरील व्हिडियो डाऊनलोड करण्यासाठी एक बेष्ट अ‍ॅप्लीकेशन. व्हिडियो चे एम्पी थ्री मधे कन्व्हर्ट करता येते. -दिलीप बिरुटे

In reply to by सुहास झेले

ट्युबमेट फार पूर्वी पासुन वापरतो आहे, व्हॉट्सअ‍ॅपवर सर्क्युलेट करण्यासाठी. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

Black Market गूगल प्ले स्टोअर सारखं अप्लिकेशन पेड़ अप्लिकेशन फुकट मिळतात

अप्लीकेशन बरोबर काही पॉप सारख्या जाहिराती अडवण्यासाठी कोणतं अप्लिकेशन आहे का ? अ‍ॅडब्लॉक प्लस टाकुन पाहिलं. अ‍ॅड आवरत नै ये त्या अप्लीकेशनला ! हेल्प मी. -दिलीप बिरुटे

वाट्सअ‍ॅप प्ल्स माझ्या कीटकॅट व्हर्जन असलेल्या मोबाईलवर टाकायचे आहे पण Application not installed. an existing package by the same name with a conflicting signature is already installed.'' असा संदेश सारखा दिसतो. मी पूर्वीचे वाट्सअ‍ॅप काढून व्यवस्थित च्याटचा ब्याकपही घेऊन इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला पण मला अजूनही वाट्सॅप प्ल्स इन्स्टॉल करता आलेले नाही. माझा प्रश्न आहे, मोबाईल सिस्टीम मधे असलेले व्हेरीफाय सिग्नेचर कसे डिसेबल करावे किंवा सिष्टीमला ऑलरेडी जी वाट्सअ‍ॅपची फाईल दिसते आहे, ते कशी काढावी. काही मदत करा प्लीज. गुगलुन गुगलुन मी वैतागलो आहे. -दिलीप बिरुटे

काय राव काय नवे प्रयोग चालु आहेत की नै. मी Xposed Installer मोबाईल मधे टाकले आणि त्याच्या विविध मोड्युल्सशी खेळुन पाहिले. मी यातले फाँटर हे मोड्युल टाकून वेगवेगळे फॉंट आणि त्या फाँटला वेगवेगळे रंग दिले मजा आली. ही मजा थोड्याच वेळ टीकली. कारण मला पुन्हा इनबिल्ट फाँटच बरा असे वाटल्यामुळे फाँट रंगकाम पूर्ववत केले आणि फाँट तेवढा बदलला. बाकी, Xposed Installerचे प्रयोग काळजीपूर्वक आणि आपापल्या जवाबदर्‍यावर करावेत. फोन कोमात गेला तर मी जवाबदार राहणार नै. :) -दिलीप बिरुटे

फाईल एक्सप्लोर इंस्टाल करून आधीचा वॉटस्प फोल्डर डिलीट करा आणि नंतर वॉटस्प प्लस इंस्टाल करा , शक्यातो वाट्सॅॅप प्लस इंस्टाल करताना 3जी वापरा किंवा WIFI वापरा वाट्साप प्लस 32 ची लिंक खाली पेस्टात आहे http://www.mediafire.com/download/u5zhm2giaejjr9t/Whatsapp%2B6.32C-Rahi…

In reply to by देव मासा

रूट फ़ाइल एक्सप्लोरने मी वाट्सप फ़ाइल उडवली प्रॉपर पूर्वीचे अनइंस्टॉल केले तरी तोच मेसेज एरर येतोय :(

In reply to by देव मासा

पण वरीजनल वाट्सपवाल्यांनी प्लस वाल्यांना ब्यान केलं. सुरुवातीला १२ तास आणि नंतर चोवीस तास त्यामुळे आता वाट्सपप्लस जवळ जवळ बंद झालंय. मी वापरतो तो भाग वेगळा. कारण वाट्सप प्लस वाल्यांनी त्यांच्या संकेतथळावर आम्ही आता अशा भानगडीत पडणार नै असं म्हटलं आहे. संस्थळ बंद होण्यापूर्वी मी वाट्सप प्लस reborn आणि saavan अ‍ॅप साठवून ठेवलं आहे, कोणास हवे असल्यास अजिबात मिळणार नै. :) -दिलीप बिरुटे

ट्रॅफलाईन हे अ‍ॅप ट्रॅफलाईन.कॉम या संस्थळाच्या कंपनीने गूगल प्ले वर उपलब्ध केलेले आहे. आज पुणे-मुंबई एक्स्प्रेसवे ट्रॅफिक लोणावळ्यापाशी का अडला आहे आणि किती वेळ (किती अंतरापर्यंत) अडलेला राहील हे शोधण्यासाठी आंतर्जालावर हुडकत असतांना ट्रॅफलाईन.कॉम सापडलं. त्यांच्या नंबरवर फोन (9223 111 000) केला असता ट्रॅफिक अमृतांजन पुलापासून पुढे सुरळीत आहे हे कळलं. माहिती देणारा तरूण ती तत्परतेने आणि उत्साहाने देत होता. अ‍ॅप मी अजून वापरून पाहिलं नाही, पण ट्रॅफिकची (विशेषतः मुंबईतल्या) सद्यस्थिती व्यवस्थित कळते, आपल्यालाही congestion / accident प्रत्यक्ष फोटो वा टेक्स्ट द्वारे 'रिपोर्ट' करता येतं, असं दिसतं. काही अप्रिय अनुभव आला तर याच धाग्यात कळवेन, पण तोपर्यंत एका उपयोगी अ‍ॅपची माहिती द्यावीशी वाटली.

In reply to by बहुगुणी

त्यांचे ट्विटर हँडल अल्टीमेट आहे... त्यावर फारच तत्पर माहिती मिळते (मुंबईची तरी :)). त्यातूनच ते अ‍ॅप सिंक करत असावेत. नक्की वापरून बघेन :)

रिकव्हरी फाईल (CWM इमेज) मिळविण्यासाठीचं एखादं सॉफ्टवेअर आहे का माहिती कोणाला ? -दिलीप बिरुटे

मोटो जी साठी आताच अ‍ॅन्ड्रॉइड लॉलिपॉप ५.०.२ OTA अपग्रेड मिळालं. फोन स्मूथ वाटतोय. मात्र अगदी किंचित स्लो वाटतोय. इंटरफेस मधे बराच फरक झालाय.

तुम्हाला माहित आहे का कि काही साध्या गोष्टी वापरून तुम्ही online shopping वर बरेच पैसे वाचवू शकता? १. किमतीची तुलना करून : एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या साईट वर वेगळी असते. त्यांची तुलना केल्यावर तुम्हाला सर्वात कमी किंमत माहित पडू शकते. २. फ्लिपकार्त आणि अमेझॉन रोज त्यांच्या वस्तूंच्या किमती बदलतात. तुम्ही त्या रोज चेक केल्या तर तुम्हाला नक्कीच किमतीमधील फरक दिसून येईल. आम्ही या गोष्टी पहिल्या आणि यासाठीच आम्ही एक नवीन मोबाईल app बनवले आहे, ज्याचा नाव आहे buckasur. या app वर तुम्ही वस्तू शोधा आणि तुमच्या आवडत्या वस्तूंच्या यादीत टाका. जेव्हा वस्तूची किंमत कमी होईल तेव्हा हे app तुम्हाला सांगेल. तुम्ही हे app इथे डाऊनलोड करू शकता. https://play.google.com/store/apps/details?id=com.buckasur आमचे आतापर्यंत अनुभव तुम्ही इथे वाचू शकता. http://buckasur.com/blog/ आतापर्यंत अनेकांना याचा फायदा झाला आहे आणि होत आहे. मी हे ऍप सध्या डायपरच्या किमती चेक कन्यासा वापरतो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जास्त मोठी स्क्रीन म्हणजे जास्त मोठी इमेज , जास्त मोठे फाँन्ट डाउनलोड होणार ना ! व्हिडीओ प्ले होताना पण जास्त मोठा दिसणार तेवढे पिक्सेल जास्त डाउनलोड होणार ! नुकत्याच आलेल्या नानॅमॅटीक माईटोनिक टेकनॉलॉजीने शोधले आहे

मला फक्त इतकेच विचारायचे होते कि स्क्रीन साईज वाढल्याने डेटा कंझ्मशन जास्त होते का? आधी मी नोकियाचा क्वार्टी फोनवरुन नेट वापरायचो 1GB /month पुरायचे. आता मी नवीन फोन घेतला आहे, ज्याचा स्क्रीन पाच इंची आहे व साधे मिपा पेज ओपन केले तरी 200,300kb data कंझ्युम होतोय ,पुर्वीच्या फोनवर 20,30KBत मिपा फ्रंट पेज लोड व्हायचे. नक्की काय प्रॉब्लेम आहे? कि मोठा फोन जास्त डेटा असा प्रकार आहे.

In reply to by ग्रेटथिंकर

तुमच्या वेब ब्राऊजरवरसुद्धा अवलंबून असतं हे. ऑपेरा मिनी वापरा, सगळ्यात कमी डाटा कन्झ्युम होतो यावर.

माझा HTC Desire -x फोन आहे. दोन वर्ष झाली फोनला ,कधि फॉर्मेट करायची गरज भासलि नाही. टेंपल रन कैंडी क्रश, तीन पत्ती ,सबवे सर्फर या सारखे गेमस गेल्या दोन वर्षात या फोन वर तासन तास खेळलो आहे, अगदी प्रमनाच्या बाहेर, नंतर रॉउटर wifi वापरु लागलो ६-७ महीने झाले, अचानक एक दिवस माझा wifi चालन बंद झाल. wifi चालुच होईना , फोनच्य सेटिंग्स मध्ये जिथे आपल Wifi बटन असत तिथे फ़क्त wifi turning on अस दाखवात असे ,पण wifi चालुच होत नसे, शेवटी गुगल वर या प्रॉब्लम वर शोध घेतला , तिथ समजल अंनेक लोकांना वेग वेगळ्या कंपन्यांच्या वेग वेगळ्या मॉडल्स वर हा प्रॉब्लम येतो , आणि त्या वर फैक्टरी रिसेट हा शेवटचा इलाज आहे , आनी तो करूनही प्रॉब्लम काही लोकांचा दुर होत नाही ,म्हणजे काहीनचे पुन्हा चालु होतात काहींचे नाही, मी बराच शोध घेऊन फैक्टरी रिसेट सोडून आणखी काही इलाज आहे का पाहिले , त्यात आमुक आमुक कोड डायल करा त्याने wifi चालु होइल असे एक दोन फोरम वर वाचायला मिळाले, तो इलाजहि करुन पाहिला , उपयोग झाला नाही, शेवटी फोन फैक्टरी रिसेट केला ,म्हंटले आता चालु होईल पण फुस्सsss ,पुन्हा तेच wifi turning on पुन्हा दोन तीन दिवसानि फैक्टरी रिसेट केला फोन, तरी तेच wifi turning on सहज एक दिवस गुगुल प्ले स्टोर वर wifi साठी काही टूल्स आहेत का शोधले . दोन तीन सापडले, त्यातले FXR Wifi Fixer एप डाउनलोड करुण ओपन केले. एपच्या वारच एक टिप लिहली होती. हे एप सगळेच wifi प्रोब्लेम्स फिक्स करेल आसा दावा करत नाही अथवा त्याची शास्वतीही देत नाही, आणि खाली Fix WiFi बटन होते, देवाचे नाव घेऊन बटन दाबले , दोन तीन वेळा स्कैन होताना जसे दाखवतात तशी प्रोसेस दाखवली , आणि टुनकन माझा wifi ऑन झाला ,सिगनल आला. दोन तीन महीने विन तक्ररार wifi सुरळीत चालले , पुन्हा दोन तीन महिन्याने तोच प्रॉब्लम पुन्हा उगवला ,या वेळी फोन वाइच गरम होत असे, या वेळी या रोगावर इलाज माहीत असल्याने निशचिंत होतो. पुन्हा ते FXR WiFi Fixer उघडले आणि बटन दाबुन प्रोसेस चालु केलि, पण प्रोसेस पुरणच होइना डीलिटीनग वायफ़ाई प्रोफाइल वर प्रोसेस अडकून राहत असे , दोन तीन वेळा करुण पाहिले उपयोग झाला नाही, महन्टले एप अपडेट झाला असेल पण प्ले स्टोर वर तोच जुना एप होता, तरी सुद्धा जुना एप अनइंस्टॉल करुण नव्याने इंस्टॉल केला , परिणाम शून्य ,फोन पुन्हा रिसेट केला पुन्हा एप वापरून पाहिले तरी तेच wifi turning on शेवटी नाइलाजने ठाण्यात इटर्निटी मॉल मधे HTC फोनच्या सर्विस सेंटर मध्ये गेलो. ते म्हणाले फोनचे सॉफ्टवेर पुन्हा नव्याने आपडेट करावे लागेल ( तसा मी वेळो वेळी आपडेट करत होतो ) त्या साठी ५६० रूपये खर्च येईल , आणि फोन दुरुस्त नाही झाला तर काही चार्जेस द्यावे लागणार नाहीत ,आणि १ तासचा वेळ लागेल , मी तयार झालो त्यानी फोन एक तासानी अपडेट करुन wifi चालतो का तपासन्यास सांगितले , मी चेक केला चालत न्हवता , त्यावर ते म्हणाले कदाचित हार्डवेर प्रॉब्लम असावा , तो दूर करायला १२०० रुपये लागतील आणि विस-पंचवीस दीवसांचा अवधि लागेल.मी नंतर येतो सांगुन बाहेर पडलो , मॉलच्या तळ मजल्यावर अनेक मोबाइल फोन दुरुस्त करनारी दुकाने होती ,आणि त्या दुकानांच्या बाहेर एका तासात कुठलाही फोन दुरुस्त करुन देणार अशी फलक लागले होते, त्यातल्याच कमी लुटेल आशय दिसनार्य एका माणसाच्या दुकानात शिरलो , त्याने ८५० रूपये खर्च सांगितला आणि एक तासाचा अवधि लागेल संगीतले , फोनचा हार्डवेर प्रॉब्लम आसवा असे त्याने सांगितले, मी घसा-घास करुण पहिली पण एक रुपया कमी घ्यायला तो तयार न्हावत ,मी ठीक आहे म्हणत फोन त्याच्या स्वाधीन केला .आणि तिथच वाट पाहात बसलो,तो फोन घेऊन दुकानातल्या पोट माळ्या वर गेला . तो ४० पेक्षा कमी मिनिटांत खाली आला, wifi चालु झाले होते, शिवाय माझे जे वोल्यूम बटन चालत न्हावते तेही आता चालत होते. नेमका काय प्रॉब्लम झाला होता विचारल्या वर त्याने हार्डवेर प्रॉब्लम झाला होता एवढेच सांगितले , मी पेमेंट करुण फोन घेतला. आता माझ्या शंका माझ्या फोनला नक्की काय झाल असेल? HTC सर्विस सेंटर वाल्यनि माझा फोन निट तपासला असेल की काम जास्त आहे म्हणुन तसाच एक तासाने परत केला असेल? नक्की हार्डवेअर प्रॉब्लम झाला असेल का? अणि तस झाले असेल तर तो इतक्या कमी वेळात दुरुस्त करता येऊ शकतो का? तसा आता माझा फोन पुर्वी जसा होत असे तसा गरम होत नाही ८५० रुपये जास्तच दिले , पण मला वाटले होते सर्विस सेंटर वल्लयना जमले नाही याला काय जमनार तरी बघू या विचाराने मी गेलो. wifi turning on प्रॉब्लम कशा मुळे येत असावा?

In reply to by देव मासा

वायफायचं चिन्ह येत होत का ? म्हणजे वायफायच्या चिन्हाला क्लिकुन राहिल्यावर पुढे काही प्रोसेस होत होती का ? -दिलीप बिरुटे

पीसी सुट कोणता चांगला अँड्रॉइडला ? वंडरशेअर हल्ली चालत नाही माझं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

USB Debugging ऑफ करा आणि मोबाईल रिस्टार्ट करा. मोबाईल सुरू झाल्यावर USB Debugging परत ऑन करा आणि मग वंडरशेअरने कनेक्ट करून बघा.

In reply to by नांदेडीअन

विंडोज सात ला चालत नै असं वाटतंय. कारण मॅक असेल तरच सपोर्ट करतं असं एका प्रश्नाच्या उत्तरात गुगलवर कळलं. तुमच्याकडे संगणकावर कोणती ओएस आहे ? मी वाय फायवरुन ट्राय करतो पण त्यालाही लै वेळ घेतंय. -दिलीप बिरुटे

In reply to by नांदेडीअन

माझ्याकडे असलेलं जुनं व्हर्जन वापरत होतो त्यामुळे हा रोग आला होता. आता नवं व्हर्जन डाऊनलोडून टाकलं. लै फ्यासिलिट्या आहेत आत्ताच्या व्हर्जनमधे. हे व्हर्जन तितकं स्मुथ नाही पण आता जमलंय. थ्यांक्स. :) अजून काही नवी खटपट. -दिलीप्ल बिरुटे

मोटो जी वर अ‍ॅन्ड्रॉइड लॉलिपॉप ५.०.२ OTA अपग्रेड घेतल्यापासून माझा पण फोन स्लो झाला आहे . बर्याच वेळा hang पण होतो आहे . kitkat अ‍ॅन्ड्रॉइडच बर होत अस वाटून राहिलंय राव

In reply to by पिंपातला उंदीर

developer options मधून Background Process Limit २ किंवा ३ सेट करून बघा. असे केल्यानंतर काही प्रॉब्लेम येत असतील, उदा. काही ऍप अचानक क्लोज होणे, तर Background Process Limit परत Standard वर सेट करा. गरज नसेल तर Animations सुद्धा बंद करून टाका सगळे.

काही अॅप उदाहरणार्थ रेल्वे ,बातम्या यांचेमधील माहिती त्यासंबधी असलेल्या अधिकृत वेबसाइटवरूनच आणत असतील तर ती वेबपेजिज बुकमार्क करून ठेवली तर काम सोपे नाही का होणार?आपल्याला अमुक एक पेपरच्याच बातम्या अमुकेक विषयासाठी हव्या असतात त्यात खिचडी कशाला?ते पेजच बुकमार्क करून उघडायचे.

WhatsApp voice calling feature is now available to all users of the app's Android version. The app had begun rolling out this month to some users and they could pass it on to others by making a WhatsApp call during time-limited invite windows. However, the feature has been activated on Tuesday for several users who didn't receive invites. To get this feature on your Android smartphone, all you need to do is download the latest version of WhatsApp from its website. The feature has appeared on WhatsApp version 2.12.5 in some smartphones, but most people will need the latest 2.12.19 version to get WhatsApp calling. The update has already started being pushed to Google Play as well, so just sit tight until it rolls out in your region or download the apk from the company site. When the feature is activated on your smartphone, you will notice a new three-tab layout featuring Calls, Chats and Contacts. You can head to the Calls tab, tap the phone icon, and pick a contact to make your first WhatsApp call. While the feature is available to Android users now, those on other platforms continue to wait. WhatsApp confirmed that the feature would be rolled out to iPhone users soon. There's no word yet about the feature when the feature will be available on other platforms. Until then, Android users with WhatsApp calls enabled won't be able to call WhatsApp users on other platforms. These people won't appear in the list of contacts that Android users can call. The long-awaited feature is finally available on one platform, and there's no more waiting for invite windows to open again. NEWSWhatsApp Voice Calling Now Available to All Android Users, No Activation Required

In reply to by आयुर्हित

अनुवाद करा की जरा. वाट्सप कॉलींगला जरा आवाज घुमल्यासारखा वाटतो. आणि त्यावर बोलण्याचा अजून येईना बघा. :) -दिलीप बिरुटे

In reply to by बॅटमॅन

बघु काय म्हणता ते. :) बाकी आता त्या वाट्सपच्या नवनव्या फिचर्सचा आता कंटाळा आला. सदस्यांनी आत्तापर्यंत ग्रुप मधे किती मेसेजेस टाकले त्याची संख्या आता दिसते, काय उपयोग त्याचा. वाट्सप धड बंद करता येईना आणि चालुही ठेवता येईना. वाजलं की पाहावंच लागतं. :( -दिलीप बिरुटे

इंटर्नल स्टोरेज ५०३ एमबी, ४१ एमबी फ्री फोन स्टोरेज २ जीबी ३०७ एमबी अॅव्हेलेबल फोनमध्ये एसडी कार्ड नाही. तरीही कोणतेच अॅप्लीकेशन डाउनलोड करता येत नाहीए. व्हाॅट्स अप अपग्रेड करता न अाल्यावर जुने व्हर्जन काढून टाकले, तरी स्पेस शिल्लक नाही अशी एरर येत अाहे. दुकानदाराने व्हायरस शिरला असेल असे सांगितले अाहे. हा व्हायरस मुळे अालेला प्राॅब्लेम असू शकेल काय? तसेच जर अॅंटी व्हायरस घ्यायचा झाला तर कोणता घ्यावा? एखादे अाॅनलाइन स्कॅनिंग करणारी साइट वगैरे अाहे काय? धन्यवाद. - स्वधर्म

In reply to by स्वधर्म

मला वाटतं फोनची मेमरी (इंटरनल स्टो) कमी आहे त्यामुळे तुमच्या हातात फार काही शिल्लक नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद, पण फाॅर्मॅट मारणे, हा माझा लास्ट अाॅप्शन असेल. सगळे काॅंटॅक्ट्स, अकाउंट्स वगैेेरे जाणार ना? सिंक केले नाहीत बर्याच दिवसात, बराचसा डेटा फोनमध्येच अाहे. - स्वधर्म