Skip to main content

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

लेखक सुहास झेले यांनी शुक्रवार, 23/11/2012 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!

वाचने 448367
प्रतिक्रिया 716

प्रतिक्रिया

हाच धागा असावा, नवीन एप्लीकेशन साठी मी इथेच येत असतो , इतर लोक पण येत असावे

एवढे महाग फोन चोरीला वा हरवले कि खूप वाईट वाटते । ते हुडकून काढण्यासाठी अथवा डाटा पुसून काढण्यासाठी aaps आहेत क। जेणेकरून डाटा कुणालाही मिळणार नहि.

In reply to by nandan

मी Where is My Droid हे अ‍ॅप वापरलं आहे. इतरही बरेच play.google.com वर उपलब्ध आहेत, उदाहरणार्थ phone finder हे एक.

काल XOLO A500S घेतला . Android 4.2.2 हाये . आत्ता त्यात . True Caller , Flash Light , WhatsApp, Temple Run 2 , App Lock , UC Browser , Misalpav , Clean Master, MX Player, या गोष्टी आहेत . अजून काही apps गरजेच्या असल्या तर सुचवा मंडळी . धागा पूर्ण वाचलाय . CM Security आहे चांगलं ? इतरही apps सुचवा राव

राव साहेब News Hunt , इन्स्टोल करा, मराठीत नेमक्या तेवढ्याच बातम्या फ्लाश करणारे उत्तम aaplication आहे,

Take a look at "MoboMarket" - https://play.google.com/store/apps/details?id=com.dragon.android.moboma… नोकिया सारख्या Android काही मोबाइल्स मधे प्ले स्टोर नाहियेत त्यासाठी मोबोमार्केट चांगला पर्याय.. तसेच बरेचसे apps गुगल पाॅलिसी नुसार प्लेस्टोर मधे नाहियेत जसे फ्लॅपिबर्ड , युट्युब डाउनलोडर सारखे apps मोबोमार्केट मधे उपलब्ध आहेत...

आय फोन साठी जसे स्केच बाय ५३ अपलिकेशन आहे , तसेच एखादे अ‍ॅन्ड्रॉईडसाठी अपलिकेशन आहे का ? अर्थात मोफत *mail1* *WRITE* *MAIL*

फेसबूक मेसेंजर ने फ़ेसबूक टू फ़ेसबूक कनेक्ट असणा-यांना मोबाईलवरुन फ़ूकट कॉल करता येतो हे आपल्याला माहिती असेल तरी माहिती डकवून ठेवतो. बाकी, माझ्या मोबाईल मधे घुसण्याचा समुद्राच्या लाटेला मोह आवरला नाही. मोबाईल जरा अशक्त झाला आहे. :( -दिलीप बिरुटे

NewsHunt हे अ‍ॅप माहित असेलच, पण ह्यांच्या ई-बुक सेक्शनमध्ये तुम्हाला ऐतेहासिक, जुनी मराठी पुस्तके मात्रशुल्क १ रुपया देऊन डाउनलोड करता येतात. ही पुस्तके तुम्ही ऑफलाईनदेखील वाचू शकता.

In reply to by सुहास झेले

मी इमोर्टल्स ऑफ़ मेलुहा मराठीत ज्याची क़ीमत 300 आहे फक्त एक रुपायला विकत घेतले. आणि त्यांचा बुक रिडर्चा नाईट मोड़ इतका मस्त आहे. भारीच प्रकार.

Election watch reporter नावाचं अप्लिकेशन आलंय. आपल्या मतदार संघात उमेदवार काही गैरप्रकार करत असेल तर आपल्याला निवडणुक आयोगाला कळवता येणार आहे. चलो कुछ करके देखे :) -दिलीप बिरुटे

In reply to by जोशी 'ले'

आमच्या उपयोगाचा नाही... तुम्हाला मिळाला का? अजून एक चांगले App - Maharashtra Govt. Resolutions This is the Official Mobile application released by Directorate of Information Technology (DIT), Government of Maharashtra to access Government Resolutions (GR)

निवडणुकीचा मौसम... त्यात अजून एका जबरदस्त App ची माहिती मिळाली आज. Myneta Disseminator - Compare background information of candidates contesting election and make an informed choice. Share information with your friends on Facebook, SMS, and Email with a single click and help them to make an informed choice as well. See criminal, financial and educational information of your MP and MLA (Indian politicians). . . .

सुहास झेले आपण वर सांगितलेला Myneta Disseminator एप डाउनलोड केला , चांगला आहे , आमचा इथला उमेदवार ठाण्यातला १०वि पास आहे हे समझले , मागच्या वेळचा याच पक्षाचा उमेदवार ५वि पास होता हे देखील समजले . परंतु आमचा मतदार संघ नेमका कुठून कुठ पर्यंत पसरला आहे हे समजायला त्यात काही मार्ग नाही .

हार्टब्लीड चा फटका अ‍ॅन्ड्रॉइड फोनला सुद्धा बसला आहे आणि यांचे इन्फेक्शन चेक करण्यासाठी गुगल स्टोअर अ‍ॅप्स उपलब्ध झाले आहेत. या संबंधी माहिती आणि दुवे खाली देतो आहे, दुवे :- Android devices and apps affected by Heartbleed: Check if your smartphone is vulnerable Heartbleed Bug Impacts Mobile Devices अ‍ॅप्स :- Heartbleed Detector Bluebox Heartbleed Scanner

मोबिक्विक हे हि मस्त app आहे. झटपट प्रिपेड रिचार्ज करन्यासाठि.... मोबाइल,डाटा कार्ड इ.

डोट्स नावाची पण मस्त गेम आहे...

आज एक वेगळे महत्वाचे अ‍ॅप देत आहे. हे अ‍ॅप विशेषतःस्त्रीयांच्या सुरक्षतेसाठी बनवण्यात आले आहे. या अ‍ॅपचे नाव आहे Fightback या अ‍ॅपच्या संकेतस्थळाचा पत्ता :- http://www.fightbackmobile.com/welcome गुगल प्ले चा पत्ता :- Fightback तुम्हाला माहित असलेले असे आणि इतर सिक्युरिटी अ‍ॅप्स इथे जरुर शेअर करा.

In reply to by मदनबाण

बी सेफ हे अ‍ॅप माझ्या कुटुंबियांच्या फोनवर आहे: वापरायची वेळ सुदैवाने आलेली नाही, पण यातील बरेचसे फंक्शन्स उपयोगी वाटले, उदाहरणार्थः Share locations to find each other, ask friends to walk you home with Follow Me’s live GPS trace, or help friends stay safer by walking them home from wherever you are, Use Timer Mode to program an automatic alarm that will trigger if you have not checked in in time, Use I’m Here to tell selected people where you are right now

फ्रीडम नावाचं एक अ‍ॅप्लीकेशन आहे, कृपया मोबाईल मधे बिल्कूल टाकू नका. गुगल प्लेष्टोअर ब्लॉक होतं. जीमेलने कुठेच मोबाईलवर रजिष्ट्रेशन करता येत नाही. -दिलीप बिरुटे

अँड्राइड मागे पडलं की नवं काही येणं बंद झालं ? नवीन काहीच प्रतिसाद दिसला नाही. -दिलीप बिरुटे

सॅमसंग नोट २ साठी एखादं जीपीएस अ‍ॅप कोणाच्या माहितीत आहे का? रस्ते क्रमांक (स्ट्रीट नंबर) आणि घर क्रमांक (हाऊस नंबर) पातळी पर्यंत अचूकता असावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

सिजिक व टॉमटॉम दोघेही उपलब्ध आहेत. फ्री अ‍ॅप नाही मात्र. काही दिवसापूर्वी सिजिकने इंट्रोडक्टरी ऑफर म्हणून इंडिया मॅप्स फ्री दिलेले होते. ती ऑफर संपली आता.

सध्या Emoji प्रकरण समजवुन घेतो आहे... हे Emoji काय आहे ? तर :- How to Enable Emoji on Android कालच यासाठी GO Keyboard (Emoji Free) इनस्टॉल केला आहे,डिफॉल्ट की-बोर्ड पेक्षा जास्त चांगला वाटला. गुगल प्ले चा दुवा :- GO Keyboard (Emoji Free) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Tum Hi Ho... Aashiqui 2

हे डे (Hay Day) नावाचा गेम टाकलाय मोबाईलमध्ये डाऊनलोड करतानाचा ६० एमबी गेले. *cray2* फेसबूकवरचा फार्मव्हिले मी खेळलो नाहीये, पण हा गेम एकुणात त्याच धर्तीवरचा वाटतो. प्रचंड अ‍ॅडिक्टेड आणि सतत खेळायला आवडत राहणारा आहे. फक्त एकच आहे की, हा गेम टाकण्याआधी तुमचा मोबाईल १ जीबी रॅमवाला आहे कि नाही याची खात्री करून घ्या.

वॉटसअ‍ॅप वर डायरेक्ट मराठी टाईप करायला कोणता की बोर्ड आहे का ?

In reply to by इरसाल

अतिशय छान app आहे, मराठी बरोबरच हिंदी, संस्कृत, तसेच अगदी तमिळ, तेलगु ( अर्थात येत असेल तर ) टाइप करू शकतो...

In reply to by इरसाल

हे ऐप वापरून पाहिलेत काय त्यात हिन्गीभाषा उतरवून घेतली तर मराठीतून टायपिंग फार सोईचे आहे. वारंवार आपण वापरलेले शब्द समोर आणून आपली सोय होते. मात्र ते इन्सि्क्रिप्ट कळपटावर चालते. वापरून पहा ...

वरती किसना ने गेम दिला असला कारणाने, मलाही काही सुचवावे वाटतात. १} Jewels Star २} Traffic Racer ३} Vector वरील ३ ही खेळ वेगवेगळे आहेत, या पैकी Vector काल-परवाच टाकला आहे,अजुन भरपुर खेळुन पहावयाचा आहे.Jewels भरपुर खेळलो आहे, खेळतो आहे आणि Traffic Racer मधे आत्ता पर्यंत ५०.९९ किमी अंतर पार करुन झाले आहे,या अंतराच्या पुढे जाणे अजुन जम्या नय. आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

@ निनाद Google Hindi Input वापरुन बघ. मस्त आहे... मला हे बिरुटे सरांनी सांगितले होते. खुप आधी मी हे इन्स्टॉल केले होते... नंतर काढुन टाकले होते, पण आता परत वापरतोय. जरी हे हिंदी संपोर्ट अ‍ॅप असले तरी मराठी झटपट लिहता येते. Minglish Marathi +Eng Keyboard :- हे अ‍ॅप फार पूर्वी गविंनी मला सांगितले होते... ते बहुतेक हेच अ‍ॅप त्यावेळी वापरत होते,आत्ता माहित नाही. पण मला हे ठीक-ठाक वाटले होते. वरील दोघांची तुलना केल्यास Google Hindi Input अधिक सोप्पे आणि भराभर लिहण्यासाठी जास्त उपयोगी वाटते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ७ समुंदर पार... :- विश्वात्मा

आत्ताच एक नविन अ‍ॅप इन्स्टॉल केले आहे ! Mantras and Stotras in Marathi काय काय आहे यात ? {गणपती स्तोत्र,पसायदान,दत्त बावनी,श्री सुक्त्,श्री एकनाथ हरिपाठ,श्री एकनाथी भागवत्,ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा,मनाचे श्लोक्,दासबोध्,समश्लोकी भगवद्गीता,संत बहिणाबाइचे अभंग. आणि बरेच काही. :) तुम्हाला हे अ‍ॅप आवडले तर नक्की सांगा... :) मदनबाण..... आत्ताची बदलेली सही :- Tune Maari Entriyaan... :- GUNDAY

In reply to by सुहास झेले

मित्रानेच डेव्हलप केलेलं आहे सह्ही... त्यांना कळव की अ‍ॅप खरेच सुंदर आणि उपयोगी आहे. :) आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !

लॅपटॉपवरील इंटरनेट कनेक्शन अँड्रॉईड फोनमधून (वायरलेस पद्धतीने) कसे अ‍ॅक्सेस करता येईल? कृपया जाणकारांनी ज्ञान द्यावे ही विनंती.

In reply to by श्रीगुरुजी

लॅपटॉपवर वापरत असलेले कनेक्शन वायरलेस असेल, तर ते आरामात शक्य आहे. वायर्ड कनेक्शन असे शेअर करणे, माझ्या माहितीत तरी शक्य नाही...

In reply to by श्रीगुरुजी

लॅपटॉपवरील इंटरनेट कनेक्शन अँड्रॉईड फोनमधून (वायरलेस पद्धतीने) कसे अ‍ॅक्सेस करता येईल? मला वाटतं हे करता येते, ते कसं हे खालच्या व्हिडीयोत पहा { जरी या व्हिडीयोत लॅपटॉप टु लॅपटॉप शेअरींग दाखवले असले तरी नेटवर्क शेअरींग पद्धतीने मोबाइलवर देखील नेट कनेक्टीव्हीटी मिळवता येइल असे वाटते.} तुमच्या लॅपटॉप मधे विंडोज ७ ही ओएस आहे हे गॄहीत धरले आहे. प्रयत्न करुन पहा, आणि जमल्यास कळवा म्हणजे इतरांनाही याचा फायदा होइल. :) आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !

In reply to by मदनबाण

माझ्याकडे विंडोज ७.० आहे. वरील चित्रफीत पाहून प्रयत्न केला. अजून जमले नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करतो. माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

आजचे काही अ‍ॅप्स - १. ऑफलाईन रीडिंगसाठी उपयुक्त असे - पॉकेट अ‍ॅप. तुम्ही वाचत असलेल्या बातम्या, माहिती, व्हिडीओ नंतर बघण्यासाठी उपयुक्त आणि तेसुद्धा कुठल्याही जाहिरातीविना. जरूर वापरून बघा... २. मोबाईलसाठी जबरदस्त प्रोक्सी अ‍ॅप - सायबर घोस्ट

In reply to by अत्रुप्त आत्मा

हे काही महत्वाचे फायदे - ऑफिसमध्ये वापरण्यास उपयुक्त ;-) • Protects your privacy online • We will change your IP every time you connect, so that nobody can detect you. • Allows unlimited anonymous and secure web browsing • Protects passwords and other sensitive information from hackers and criminal data hunters in public networks, e.g. for safe online banking transactions • Free proxy to access content you love • Bypasses web-blocking by government and business oriented censors • Bypasses country locks by website operators, employers, university or school and allows easy access to censored content • Bypasses service barriers such as VoIP through your provider • THIS APP RESPECTS YOUR PRIVACY; no appropriation of personal information, no access to contacts or other sensitive data • Unlimited bandwidth, unlimited traffic volume - even for free users • No backdoors for intelligence services, no logs!

माझा सॅमसंग gts 6312 हॅंडसेट आहे, पुष्कळ प्रयत्‍न करून सुद्धा app memory card मधे टाकता येत नाहीयेत, त्यामुळे नवीन app घ्यायला अडचणी येत आहेत ( memory फूल असल्याने )

In reply to by Gayatri Muley

सेंटींग मधे जावून स्टोअरेज मधे जावून डिफॉल्ट मेमरी एस डी कार्ड सलेक्ट केले नसेल तर फोन मेमरी गच्च भरुन जाणार. फोन सेटींग मधे जावून तुम्ही जर स्टोअरेजचा फोटा डकवला तर आम्ही नक्की मदत करु. असा फोटो टाका. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सॉरी, मला सध्या तरी फोटो नाही टाकता येणार पण माझ्या मोबाईल मधे हा पर्याय उपलब्ध नाहीये, मी स्टोरेज मेमरी मधे गेल्यानंतर मला युवर फोन मेमरी, अवेलेबल मेमरी, आदी पर्याय दिसतात, पण तुम्ही दाखवल्याप्रमाणे वरील डेफोल्ट राईट डिस्क- फोन मेमरी/ एस. डी. कार्ड हे पर्याय दिसत नाहीत.