गेली कित्येक वर्षे जालावर शुद्ध मराठीची सेवा करणारे संकेतस्थळ 'मनोगत' आज बंद पडलेले आहे. याबाबत कुठलिही पूर्वसुचना सदस्यांना दिली गेली नव्हती. तसेही गेले काही महिने ज्या प्रकारे मनोगत चालत होते त्यानुसार असे काही घडू शकते याची जाणिव होतीच.
सन्माननिय मिपाकरांना याबाबत काही माहिती असल्यास येथे त्यावर प्रकाश टाकावा.
'मनोगत' चे पुनुरूज्जीवन व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना!!
वाचने
11888
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरंच की!
अरेच्चा. खरंच की!
काल-परवाच चक्कर मारली तेव्हा ठीक ठाक वाटत होते!
असो, या विषयावर तात्याचे विचार वाचायला आवडतील!
श्रादेनफ्रॉईड
In reply to खरंच की! by सुनील
नको!
'मनोगत' काहीही कारणांमुळे बंद पडले असेल तरे ते दु:खद आहे. त्याचे सध्याचे बंद असणे तात्पुरते आहे असे मानतो.
+१
In reply to श्रादेनफ्रॉईड by प्रदीप
+१, हेच म्हणतो.
- छोटा डॉन
तांत्रिक गुंता असावा.
मनोगत काही तांत्रिक कारणांनी बंद असावं असं वाटतं मनोगतावर वावरणारे अधिक माहिती देतील . कविता वाचायला (मला कोणी पाहात तर नसेल ना असे समजून) चक्कर टाकायचो तेवढेच. अधिक काही माहिती नाही. अशात तर चक्कर टाकायलाही वेळ नव्हता.
आमचे कवी मित्र केशवसुमार यांच्याकडे मनोगताबद्दल चौकशी करुन पाहतो. ;)
>>> 'मनोगत' चे पुनुरूज्जीवन व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना!!
हम्म.....
-दिलीप बिरुटे
शुद्ध लेखनाची फार मस्त सोय
शुद्ध लेखनाची फार मस्त सोय होति..
शुद्ध कसे लिहिणार???????????
खरयं, आत्ताच दोन चुका झाल्यात
In reply to शुद्ध लेखनाची फार मस्त सोय by अविनाशकुलकर्णी
शुद्ध लेखनाची फार मस्त सोय होति..(होती)
शुद्ध कसे लिहिणार? (लिहीणार)
हम्म
'मारुती कांबळेचे काय झाले?' हा प्रश्न उगा आठवला.
असो...
आता शुद्धलेखनचिकित्सा अजुन कुठे मिळण्याची सोय आहे काय ह्यावरती जाणकारांनी प्रकाश टाकून उपकृत करावे.
सोल्यूशन..
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
मी ५० पैसे प्रतिशब्द या दराने शुद्धीकरण करुन देण्यास तयार आहे. व्हिसा, मास्टर,पेपाल वगैरे ऑप्शन्स असतील.
मेगाबायटी प्रतिसादांना सवलत मिळेल.
मी ५० पैसे प्रतिशब्द या दराने
In reply to सोल्यूशन.. by गवि
एकदम ३ सदस्य डोळ्यासमोर चमकले.
बाकी दरात थोडीफार सवलत देत असल्यास, 'मचाक'च्या पुढील सर्व लेखन शुद्धीकरणाचे काम तुम्हास देऊ म्हणतो. अर्थात कामात गुप्तता पाळावी लागेल, तसेच लेखन पूर्वप्रसिद्ध होऊ नये ह्याची देखील दक्षता घ्यावी लागेल.
परा
In reply to मी ५० पैसे प्रतिशब्द या दराने by परिकथेतील राजकुमार
मी फुकट करतो रे. (याला म्हणतात स्पर्धात्मक अर्थव्यवस्था! तुम्ही सवलतीत देताय तर आम्ही फुकट देतो.)
;)
बाझवला !!
In reply to परा by रमताराम
=)) =))
ओ ररा..
In reply to परा by रमताराम
हॅं हॅं.. तुमचे फुकट करण्याचे ठरत असले तर ठीक आहे पण सांभाळा हो.. काहीतरी अन्य गुप्त लाभ असतीलच.. हॅं हॅं हॅं ..
हॅ हॅ हॅ
In reply to ओ ररा.. by गवि
गुप्त लाभांची अशी 'जाहीर' चर्चा कशाला.
मी अजुन वापरली नाही पण 'मी
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
मी अजुन वापरली नाही पण 'मी मराठी'वरही शुद्धलेखन चिकित्सकाची सोय आहे. :)
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो
अरेरेरेरे
In reply to ईश्वर मृतात्म्यास शांती देवो by राजघराणं
एकदम श्रद्धांजली? अहो रिन्यूअलचा गोंधळ झाला असेल काहीतरी. ऑनलाईन पेमेंटची गफलत होऊ शकते कधी कधी, त्यातून काहीतरी गडबड झाली असण्याची शक्यता आहे.
बाकी मनोगतावर बहुतेक जुन्या जालकरांची पहिली पावले पडली असल्याने (तात्यांच्या भाषेत सांगायचे तर) ते 'पहिले प्रेम'. फक्त ते लिखाणच नव्हे तर प्रतिसादही अप्रूवलखेरिज प्रकाशित करणार नाही वगैरे प्रकरण आले नि सगळं बिनसलं. असो. ही तात्पुरती स्थिती असो नि त्याचे पुनरागमन होवो अशी सदिच्छा.
अवघड विषय ..
In reply to अरेरेरेरे by रमताराम
कुठे कुठे काय काय बिनसले ..स्कोर सेटल केले गेले.. इत्यादी इत्यादी !!
हा विषय निघाला तर धागा १०० सहज मारेल
चालायचेच.
चालायचेच.
अहो बंद पडलंय म्हणून बोम्ब तर
In reply to चालायचेच. by नाना चेंगट
अहो बंद पडलंय म्हणून बोम्ब तर तुमचं निराळंच????
अहो बंद पडलेलं आहे ते! चालायचं कसं????
- हातवारे करत प्यारक सराफ ;)
आय्ला हा नाना मधेच कुठून
In reply to चालायचेच. by नाना चेंगट
आय्ला हा नाना मधेच कुठून उगवला?
चालू आहे
मनोगत व्यवस्थित चालत आहे. बाकी वरील प्रदीप यांच्या प्रतिसादाशी सहमत.
येस!
In reply to चालू आहे by विकास
थँक्स!
उत्तम! आनंद झाला.
चला, पाहुण्यांना स्टॅण्डवर सोडून या बरं लवकर! :p :p :p :p
गुण नाही तर वाण* लागायचा उगाच ;-)
* हे मूळ वाण नाही तर गुण आहे असं पिल्लू सोडू नये! यापूर्वी एका ग्रंथपाल अबलेशी वाणच लागतं, गुण अपेक्षित नाही - असा खडाजंगी वाद झालेला आहे. पण त्यांनी डायरेक पुस्तकच काढून दाखवल्यानं आम्ही तटीत ठरल्याप्रमाणं मिशी ठेवत नाहीच!
पण हे वाणच आहे यावर आम्ही ठाम आहोत.
अहो..
मिपावरती नुसती चर्चा चालु झाली आहे म्हणल्याबरोब्बर देशापुढे प्रॉब्लेम देखील चुटकीत सोडवले जातात. मनोगताचे काय कौतुक ? ते चालू होणारच होते.
आनंद आहे!!
मनोगत पुन्हा सुरू झाले आहे.
तीन वर्षांपूर्वी बजबजपुरी असेच बंद पडले होते ते आजवर सुरू झाले नाही.
हम्म....
मनोगत पुन्हा चालू हट्ट तिच्याआयला. मिपाकर मनोगतींनी एवढा प्रेमाने धागा काढला होता किमान आठेक दिवस तरी दु:खात ठेवायला पाहिजे होते असे वाटले. असो,
या बातमीने दोनच लोकांना मोठा आनंद झाला असेल एक आमचे रावसाहेब आणि दुसरे केशवसुमार. :)
असो, नमोगताला शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
अर्र् र्र र्र
झालं का चालू? बंदच बरं होतं. नाहीतरी ते हल्ली फक्त "कामथे काका" नावाचं अतिफालतू कथानकच छापत होतं फक्त...
"मागे ऊभा मंगेश, पुढे ऊभा
In reply to अर्र् र्र र्र by रामपुरी
"मागे ऊभा मंगेश, पुढे ऊभा मंगेश" च्या धर्तीवर कधीही तिकडे जा कामठेकाका (भाग अमुक अमुक) दिसत असे.
हम्म्म्म
In reply to अर्र् र्र र्र by रामपुरी
असो...
पण मनोगतावरचे लिखाण हे मिपापेक्षा नक्कीच सकस असते.
मिपावरती आजकाल इंग्रजी लेखांचे आणि गोष्टींचे भाषांतर आणि हिंदी गाण्यांच्या केलेल्या मराठी चिंध्या, ह्यापेक्षा वेगळे काही नसतेच. नुसती कंपूबाजी आणि बालीश आणि भिकारड्या धाग्यांचे पण वारेमपा कौतुक हेच चालू असते. उद्या इथे एखाद्याने कोर्या कागदावरती 'शी' असे लिहून त्याचा स्क्रीनशॉट कलादालनात लावला तरी त्याला अवर्णनीय, हातात कला आहे असले प्रतिसाद मिळाले तरी आश्चर्य वाटायला नको. शिंगे मोडून वासरांमध्ये शिरलेल्या इथल्या काका लोकांविषयी तर न बोललेलेच बरे.
उद्या, मिपा म्हणजे 'पुरुषांची मंगळागौर' असे कोणी म्हणले नाही म्हणजे मिळवले.
वरील प्रतिसाद हा कुठल्याही इतर प्रतिसादाचे विडंबन वाटल्यास अथवा दुसर्या एखाद्या समुद्रातील लेखनाचे मराठीकरण वाटल्यास तो निव्वळ योगायोग आहे.
बर झाल आता शुद्ध लिहिता येईल
बर झाल आता शुद्ध लिहिता येईल
.
मिपावर शुद्धीचिकित्सक उपलब्ध करावा अशी मागणी करत आहे. पर्याशी काही बाबतीत सहमती दर्शवत आहे.
सहमत
In reply to . by आदिजोशी
मिपावर शूची सुविधा उपलब्ध होई पर्यंत मनोगत वर मजकूर टंकून तिथला शूची वापरून ते येथे डकवण्याची कॢप्ती मी वापरतो.
>>>>मिपावर शूची सुविधा उपलब्ध
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
>>>>मिपावर शूची सुविधा उपलब्ध होई पर्यंत
पण आपापल्या घरी / कार्यालयात करत जा ना. इथं कशाला? ;)
सीरियसली हे खरंच समजलेलं नाही! शुचीव्यवस्था कसली ब्वा?
त्यांना शू ची व्यवस्था
In reply to >>>>मिपावर शूची सुविधा उपलब्ध by प्यारे१
त्यांना शू ची व्यवस्था म्हणायचे असावे ;)
शूची = शुद्ध चिकित्सक
In reply to >>>>मिपावर शूची सुविधा उपलब्ध by प्यारे१
जसा पूर्वी मुद्राराक्षसाचा विनोद घडायचा तसा हा लघुरूपाचा घडलाय!!
आहे आहे मिपावर
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
शूची आल रेडी आहे पण थोडा फरक आहे शुची असा.
> एखाद्याने कोर्या कागदावरती
> एखाद्याने कोर्या कागदावरती 'शी' असे लिहून त्याचा स्क्रीनशॉट कलादालनात लावला तरी त्याला अवर्णनीय, हातात कला आहे असले प्रतिसाद मिळाले तरी आश्चर्य वाटायला नको
त्यालाच आम्ही सकाळची कामे म्हणतो
विशेषतः आधीच्या प्रतिसादातील एखाद्या वाक्यातील शब्द पकडून भेंड्या खेळल्यासारखे प्रतिसाद टाकले जातात त्याला तोड नाही. धाग्यांचेही धागे काढले जातात.
चालायचच लोक्सनाही जिन्दगीमधला वैताग काढायला काही जागा हवी ना !
मी ६ वर्षापुर्वीच मनोगतवर
मी ६ वर्षापुर्वीच मनोगतवर रजिस्ट्रेशन केलेले. सुरुवातीला चांगले वाटले पण प्रतिक्रिया वगैरे खुप कमी असायच्या त्यामुळे कोणी आपले लेखन वाचते की नाही हाच प्रश्न पडायचा त्यामुळे तिथे जाणेही कमी झाले. मधे मधे चक्कर मारली तरी इतरांच्या लिखाणाचीही तिच गत. पण शुद्धलेखनाची जी सोय होती ती अजुन मला इतर ठिकाणी कुठे मिळाली नाही. बाहेर द्यायच्या लिखाणासाठी मी मनोगतवरच शुद्धलेखन तपासायचे. ती खुपच चांगली सोय होती.
+१
In reply to मी ६ वर्षापुर्वीच मनोगतवर by जागु
सहमत. लोकांनी प्रतिक्रिया दिल्याच पाहिजेत. आपले प्रतिक्रियेपेक्षा धागेच जास्त असतात म्हणून काय झालं? :)
अजुन जीव आहे!!
अजुन जीव आहे!!
जीवात जीव आला.
In reply to अजुन जीव आहे!! by शिल्पा ब
मनोगत पूर्ववत झाल्यामुळे माझ्यासकट बऱ्याच जणांच्या जीवात जीव आला.
=)) =))
In reply to जीवात जीव आला. by श्रीरंग_जोशी
च्यायला !
कसलं अश्लील वाक्य हो हे.
अश्लील??
मा. पराशेठ - हे वाक्य अश्लील कसे काय असू शकते हे कृपया या बालकास समजावून सांगावे.
मिपा जर महाविद्यालय असेल तर मनोगत हे माझ्यासाठी प्राथमिक शाळेसारखे आहे. ते बंद पडणे हे क्लेशदायक आहे.
यावर सुनील पाल चे एक वाक्य आठवते - "भावनाओ को समझो, बाडी में क्या रख्खा हैं?".
खरय " जीवात जीव येणे" यात
In reply to अश्लील?? by श्रीरंग_जोशी
खरय " जीवात जीव येणे" यात अश्लील काय आहे? ;)
हो ना. अगदीच नैसर्गिक आणी गोड
In reply to खरय " जीवात जीव येणे" यात by मृत्युन्जय
हो ना. अगदीच नैसर्गिक आणी गोड बातमी आहे.
उगाच असल्या प्रतिसादांनी लेखकाला घाबरवू नका. पोटात गोळा यायचा त्यांच्या.
मा. पराशेठ - हे वाक्य अश्लील
In reply to अश्लील?? by श्रीरंग_जोशी
महाविद्यालयात आल्या आल्या लगेच डिग्री कशी मिळणार जोशी साहेब ? जरा सगळी लेक्चर्स अटेंड करत चला, अभ्यास वाढवा मग आपोआप काही गोष्टी लक्षात येत जातील.
असो...
बाकी काय घेणार, कॉम्प्लॅन का व्हिस्की ?
@मृत्युंजय :- काड्या सारु नको बे हलकट ! हाच का तुझा धर्म ?
एकदम कुठे व्हिस्की? आधी बियर
In reply to मा. पराशेठ - हे वाक्य अश्लील by परिकथेतील राजकुमार
एकदम कुठे व्हिस्की? आधी बियर मारु दे अर्धी बाटली....
अपेयपान?
In reply to एकदम कुठे व्हिस्की? आधी बियर by नाना चेंगट
यावरून आमची वाहिनी - सह्याद्री वाहिनी वरील एक जाहिरात आठवली.
संसाराचा नाश करी दारू,
बाटलीस स्पर्श नका करू...
खाल्ली माती ?
In reply to अपेयपान? by श्रीरंग_जोशी
ह्यासाठी फक्त आणि फक्त मिपावरती शिक्षण घेत चला, म्हणजे असे चुकीचे शिक्षण मिळणार नाही.
खरे वाक्य असे आहे :-
संसारा उद्ध्वस्त करी दारू,
तेंव्हा संसारच नका करू...
पर्या
In reply to मा. पराशेठ - हे वाक्य अश्लील by परिकथेतील राजकुमार
नको त्या वयात लोकांना नको त्या गोष्टी शिकवत जाऊ नकोस रे.
काय नाय हो जोशी, तुमचं मनोगत चालुंद्या, ह्या पर्याकडे लक्ष देऊ नका.
नान्या अरे
In reply to पर्या by Nile
मी त्यांना दूधातून काय घेणार असे विचारत होतो.
त्यांचे वय 'नको ते' आहे हे तुला रे कसे माहिती निळ्या ?
प्रश्न पहा
In reply to नान्या अरे by परिकथेतील राजकुमार
शिंच्या प्रश्न पहा.. आम्ही शितावरून भात ओळखतो तसे प्रश्नावरून वयही ओळखतो, काय समजलांस!
अहिंसा परमो धर्मः. नविन
In reply to मा. पराशेठ - हे वाक्य अश्लील by परिकथेतील राजकुमार
अहिंसा परमो धर्मः. नविन आयडींची अशी हिंसा नका हो करु.
अहिंसा परमो धर्मः. आपल्याच
In reply to अहिंसा परमो धर्मः. नविन by मृत्युन्जय
अहिंसा परमो धर्मः. आपल्याच नविन आयडींची अशी हिंसा नका हो करु. खरं तर तुम्हाला असं म्हणायचं होतं ना.
काळजी नसावी.
In reply to अहिंसा परमो धर्मः. आपल्याच by ५० फक्त
नव्या सदस्यांना अशी तालीम मिळणे हि भाग्याची गोष्ट आहे.