महाभारतातील व्यक्तिचित्रे-४ महारथी कर्ण
महारथी कर्ण
महाभारत कोणामुळे घडले ? बरेच जण द्रौपदीचे नाव घेतील पण तो मान जातो कर्णाकडेच. उत्तुंग प्रतिभेच्या भगवान व्यासांनी प्रथम आपल्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण व कर्ण यांची व्यक्तिचित्रे उभी केली, त्यांचे गुणावगुण ठरविले व मगच महाभारताची रचना केली. पाच सज्जन पांडव व शंभर दुर्जन कौरव यांच्यातील भांडणाकरिता महाभारताची गरज नव्हती ; जय नावाचा इतिहास त्याला पुरेसा होता. श्रीकृष्ण निर्माण करतांना त्यांनी कृष्णाला दैवी गुण दिले पण द्रौपदीला वस्त्रे पुरवणे, विश्वरूपदर्शन , जयद्रथवध व मृत अभिमन्युपुत्राला जिवित करणे एवढे सोडले तर महाभारतात कृष्ण दैवी चमत्कार दाखवत नाही. तो शूर आहे, अस्त्रज्ञ आहे, नीतीनिपुण आहे, धार्मिक आहे,,, पण सर्वात जास्त महत्वाचे तो फार "लवचिक" आहे. इथे सत्याचा विजय होण्यासाठी कपटाचा वापर करावा लागतो हे त्याला उत्तम माहीत आहे व तसे करण्याचा सल्ला तो देतोही. भीष्म, कर्ण जशी टोकाची भुमिका घेतात तशी घेणे त्याला मंजूर नाही. त्याचे लक्ष "अंतिम साध्या" कडे असते. जरासंधाशी सतरा वेळा युद्ध करूनही तो संपत नाही म्हटल्यावर लोकसंहार टाळण्यासाठी त्याने द्वारकेची वाट धरली व पुढे भीमाकडून द्वंदयुद्धात जरासंधाला मारवले. कर्णाचे रेखाचित्र उभे करतांना व्यासांनी हात सैल सोडला. भरपूर सद्गुण दिले, तसेच दुर्गुणही, अगदी टोकाचे. बरे हे करतांना नियतीचे फासे असे टाकले की तुम्ही त्याच्याकडे नायक म्हणून बघू शकता, खलनायक म्हणूनही !
कौंतेय कर्ण वाढला राधेय म्हणून. अंतापर्यंत तो सूतपुत्र म्हणूनच ओळखला गेला. त्याची खरी ओळख त्याच्या आईला झाली तेव्हा उशीर झाला होता. रूढीचे चटके त्याला लहानपणापासूनच बसले असावेत. असावेत असे म्हणावयाचे कारण तसा उल्लेख महाभारतात सापडत नाही. सूत हे ब्राह्मण-क्षत्रियांएवढे उच्च वर्णाचे नव्हते तरी फार खालचे असेही नव्हते व आर्थिक दृष्ट्या कर्णाचे दिवस कष्टप्रद नक्कीच नसावेत. त्याचे युद्धकलेचे शिक्षण इतर सर्वसामान्य मुलांसारखेच झाले व त्याने आपल्या नैसर्गिक गुणांनी व अपार कष्टाने त्यात प्राविण्य मिळवले. पण ते इतरांच्या नजरेस आलेले दिसत नाही. शिष्यांच्या गुणप्रदर्शनाच्या कार्यक्रमात त्याने आपले कौशल्य दाखविले व अर्जुनाला आव्हान दिले तेव्हा त्याला कोणीही ओळखत नाही. ( कुंती ओळखते ते आपला मुलगा म्हणून, चमकदार योद्धा महणून नव्हे)
शक्य आहे की त्याने या क्षणासाठी ते इतरांपासून मुद्दाम दडवून ठेवले होते. कर्णाने अर्जुनाला आव्हान दिल्यावर तो योग्य द्वंद्वी आहे की नाही हा मुद्दा निघतो. दुर्योधन कर्णाला अंग देशाचा राजा घोषित करतो व दोघांची आमरण गाढ मैत्री होते. अर्जुन-कर्ण यांचे युद्ध सुरू होणार तेव्हड्यात अधिरथ सूत तेथे येतो व कर्ण त्याला बाप म्हणून अभिवादन करतो. तो सूतपुत्र आहे हे कळल्यावर युद्ध होतच नाही. हा एक नियतीचा खेळ. जरा वेळ टळली असती तर कर्ण मेलाच असता कारण त्यावेळी अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र होते, कर्णाकडे नव्हते. आता आपण प्रथम त्याचे गुणावगुण पाहू.
तो तेजस्वी, स्वकीयांवर प्रेम करणारा, परकीयांचा नाश करणारा, बुद्धिवान,बलवान, कर्तृत्ववान व सुंदर होता. तो जन्मजात कवचकुंडले घेऊनच आला.तो महान अस्त्रसंपन्न होता. त्याच्याकडे ब्रह्मास्त्र, भार्गवास्त्र, परशुरामाने दिलेले माहेश्वर धनुष्य होते. असामान्य शौर्य, अलौकिक दानप्रियता, सहनशीलता, समयज्ञता, दूरदर्शीपणा, गूणग्राहकता हे त्याचे इतर काही गुण.
त्याचे अवगुणही पराकोटीचे होते. आत्मकेंद्रियता, अहंकार, अमर्याद महत्वाकांक्षा, भांडखोरपणा, मत्सर, विशेषत: अर्जुनाचा व त्यामुळे अर्जुनाच्या गुणग्राहक लोकांबद्दल,( भीष्म, द्रोण,कृप, अश्वत्थामा इ.) तिटकारा हे त्याचे महत्वाचे दोष. स्वत:बद्दल सारखे प्रौढीने बोलणे हे त्याच्या पाचवीला पुजले होते. यामुळे इतरांची समजुत घालत बसणे हे दुर्योधनाचे एक कामच होऊन बसले होते ! या दोषांचा परिपाक म्हणजे त्याच्या मनाचा हलकेपणा. द्युताच्या वेळी हा नीचपणा त्याला नराधम म्हणावे या टोकाला पोचला . हे गुणदोष पुढील माहित्तीत स्पष्ट होतीलच.
अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र आहे, ते आपल्याकडे नाही व त्यामुळे तो आपल्यापेक्षा वरचढच राहणार हे ध्यानात घेऊन
कर्णाने द्रोणांकडे जाऊन ते शिकवावयाची विनंती केली. त्याच वेळी अर्जुनाचा पराभव करण्यासाठी ते पाहिजे हेही सांगितले. द्रोणांनी त्याची इच्छा कळल्यावर त्याला ते देण्याचे नाकारले. कारण मात्र दिले की मी फक्त क्षत्रिय व ब्राह्मणालाच ते देतो. भडकलेल्या कर्णाने आता थेट परशुरामांकडेच जावयाचे ठरविले. मात्र इथेही आपली जात आडवी येऊ नये म्हणून त्याने परशुरामांना सांगितले की मी भार्गवगोत्री ब्राह्मण आहे.त्याची सेवावृत्ती, अपार गुरुनिष्ठा, कष्ट करावयाची तयारी पाहून परशुराम प्रसन्न झाले. त्यांनी कर्णाला सर्व अस्त्रे व आपले माहेश्वर धनुष्यही दिले. याच काळात धनुर्विद्येचा सराव करत असतांना कर्णाच्या हातून एका ब्राह्मणाच्या गाईची हत्या झाली. ब्राह्मणाने त्याला शाप दिला की " ज्याच्याशी तू स्पर्धा करत आहेस, त्याच्याशी युद्ध करत असतांना तुझ्या रथाचे चाक पृथ्वी गिळून टाकील व तुझा शत्रु तुझ्या अडचणीचा फायदा घेऊन तुझा शिरच्छेद करील ". एवढ्याने कर्णाचे दुर्दैव संपले नाही. एके दिवशी तो व परशुराम हिंडत असतांना राम थकून जाऊन कर्णाच्या मांडीवर डोके ठेऊन झोपले. तेव्हढ्यात एका किड्याने कर्णाच्या मांडीला दंश केला. गुरुजींची झोप मोडू नये म्हणून कर्णाने किडा हाकलला नाही. किड्याने कर्णाच्या मांडीला भोक पाडले व त्यातून रक्त वाहू लागले. तरीही अपार वेदना सहन करित कर्ण स्तब्धच राहिला. रक्त वहात वहात परशुरामांपर्यंत पोचले व ते जागे झाले. झाला प्रकार पाहून त्यांना संशय आला. ते म्हणाले " ब्राह्मण इतक्या वेदना सहन करणे शक्य नाही, तू कोण आहेस ?" कर्ण म्हणाला " मी सूतपुत्र आहे. पण वेद देणारा गुरु बापच असतो. तुम्ही मला धनुर्वेद दिला म्हणून तुम्ही माझे पिताच आहात. म्हणून मी तुम्हाला मी भार्गवगोत्री ब्राह्मण असल्याचे सांगितले. " परशुराम रागावले पण कर्णाच्या असीम गुरुनिष्ठेने प्रसन्नही झाले. ते म्हणाले " कपटाने मिळवलेले ब्रह्मास्त्र मरणघटकेपर्यंत जवळ राहणे शक्य नाही. तेव्हा अंतिम काळी तू ते विसरशील. पण तोवर तुला त्याचा उपयोग करता येईल." शापित अस्त्रे घेऊन कर्ण परतला.
कलिंग राजाच्या मुलीच्या स्वयंवारात कर्णाने दुर्योधनाकरिता जमलेल्या राजांचा पराभव केला. त्या वेळी त्याने मल्लयुद्धात सम्राट जरासंधाचा पराभव केला. सर्व भारतात कर्णाचे नाव गाजवावयास हा एक विजय पुरेसा होता. राजसूय यज्ञाच्या वेळी भीमाला त्याने करभार देऊन बचाव केला. तो तसे न करता तर यादवांसमवेत भारतातील सर्व राजे युधिष्ठिराबरोबर त्याच्याशी लढावयास आले असते . तो भांडण न उकरता समयसुचकता दाखवितो. तसेच दुर्योधनासाठी केलेया दिग्विजयाच्या वेळी तो यादवांशी सामोपचाराने वागतो. नच तर त्याच वेळी पांडवांवरील अन्यायाने रागावलेल्या यादवांनी त्याला नाहिसे केले असते. ही त्याची राजकीय सुजाणता.
कर्ण आणि अर्जुन
कादंबर्या वाचून अशी समजुत होण्याची शक्यता आहे की कर्ण अर्जुनापेक्षा जास्त शूर होता व केवळ कृष्णाच्या सहाय्याने अर्जुनाने कपटाने कर्णाला मारले. साफ चूक. अर्जुन एकाही युद्धात हरलेला नाही.( भगवान शंकरांबरोबरचे युद्ध सोडा, तो एक रडीचा डाव होता. आता तुम्ही टाकलेले प्रत्येक शस्त्र, अस्त्र समोरचा गिळूनच टाकू लागला तर त्याला काय युद्ध म्हणावयाचे ? तरीही अर्जुन धनुष्यही उरले नाही तेव्हा नि:शस्त्र युद्ध, मल्लयुद्ध करू लागला.) कृष्ण नसतांनाही आणि कर्णाकडे कवचकुंडले असतांनाही अर्जुनाने कर्णाला दोन्दा हरवले आहे.
आता आपण कर्णाने लढलेली युद्धे पाहू. शिकावू काळात द्रुपदाबरोबरची लढाई. कौरवांबरोबर कर्णालाही पळून जावे लागले. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी ब्राह्मण वेषातील अर्जुनाबरोबर झालेली लढाई. कर्णाला माघार घ्यावी लागते. घोषयात्रेच्यावेळी चित्रसेन गंधर्वा बरोबर झालेली लढाई. चित्रसेनाच्या दैविक अस्त्रांपुढे कर्णाची मानुष अस्त्रे टिकाव धरू शकली नाहीत.( असे दिसते की एकाच अस्त्राचा प्रभाव सारखा नसावा. नाही तर अर्जुन सर्व अस्त्रे पृथ्वीवर माहीत झाली असतांना परत तीच शिकण्यासाठी स्वर्गात गेला नसता.माणसाकडून शिकले ते मानुष अस्त्र, देवाकडून शिकले की तेच दैविक अस्त्र. दैविक अस्त्र जास्त पावरबाज !) कर्ण पळून जातो. गोग्रहणाच्यावेळी अर्जुनाशी झालेली लढाई. कर्णाला तीन वेळा माघार घ्यावी लागते. शेवटी संमोहन अस्त्रामुळे बेशुद्ध झाल्यावर उत्तर त्याचेही वस्त्र काढून नेतो. शेवटच्या युद्धात कर्ण एकूण सात दिवस लढतो. तेवढ्यात तो सात्यकी, भीम, अभिमन्यु एवढ्यांबरोबरच्या लढायांमध्ये हरतो, इन्द्राने दिलेली वासवी शक्ति नसती तर तो घटोत्कचाबरोबरच्या लढाईत हरल्यातच जमा होता. दु:शासन वधाच्या वेळी भीम सर्वांना आव्हान देतो की "या दुष्टाला मारून मी त्याचे रक्त पिणार आहे, शक्य असेल तर याला वाचवा !" कर्ण समोर होता पण तो भीमाला आवरू शकला नाही.तीच गोष्ट जयद्रथवधाच्या वेळी घडली. अर्जुनाने कर्णाला सांगितले " मी नसतांना तुम्ही सर्वांनी अभिमन्यूला मारलेत. कर्णा, आज तुझ्यासमोर मी तुझ्या पुत्राला ठार मारणार आहे, शक्य असेल तर त्याला वाचव." कर्ण आपल्या पुत्राला वाचवू शकला नाही. यावरून कर्णाच्या शौर्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. वर दोन उदाहरणे दिली आहेत. तो अर्जुनाच्या बरोबरीचा योद्धा आहे अशी कबूली त्याव्या दोन कट्टर विरोधकांनी दिली आहे. श्रीकृष्ण व भीष्म यांनी. तेव्हा त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. त्याने भीम, युधिष्ठिर, नकुल व सहदेव यांना जिंकून जिवंत सोडून दिले आहे. घटोत्कचासारख्या केवळ अजिंक्य राक्षसाला तोच मारू शकला. त्याचे व अर्जुनाचे युद्ध म्हणजे इन्द्र-वृत्राचेच युद्ध असे कृष्ण म्हणतो. या सगळ्याचा अर्थ लावणे थोडे अवघडच वाटते. व्यासांनी गणपतीला कोडी घातली, तसेच वाचकांना घातलेले हे एक कोडे.
दानशूरता
जसा "रामबाण", जशी " भीष्मप्रतिज्ञा " तशी कर्णासारखी " दानशूरता " ! भारतीय इतिहासात दान देणे हा एक रक्तात रुजलेला भाग आहे. सर्वस्व देणारे राजे कितीतरी सापडतील. परशुरामांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून ती कश्यपाला दान दिली. आणि मग कश्यपाने जेव्हा सांगितले " आता फूट, माझ्या पृथ्वीवर तुला जागा नाही "
तेव्हा निमुटपणे समुद्राला हटवून आपल्या आश्रमापुरती जागा मिळवली. पण नाव झाले ते एका कर्णाचेच.
सकाळी सूर्याची आराधना करतांना येणार्या याचकाने काहीही मागितले तरी ते देण्याची कर्णाची प्रतिज्ञा. इन्द्राने याचा फायदा घ्यावयाचे ठरवून त्याची कवचकुंडले मागावयाचे ठरविले. सूर्याला याचा पत्ता लागल्यावर
त्याने रात्री कर्णाच्या स्वप्नात येऊन त्याची कल्पना दिली व इन्द्राला हाकलून दे असे सांगितले. कवचकुंडले दिल्यावर आपल्या जीवाला धोका आहे हे माहीत असूनही कर्ण सूर्याला सांगतो की "मरण पत्करले, पण मी वचन मोडले ही अपकीर्ती मला मान्य नाही ". शेवटी मिनतवारीने कर्णाने कबूल केले की मी इन्द्राकडे अमोघ शक्ती मागेन. प्राणाची पर्वा न करता दिलेले हे दान एकमेव.
आत्मप्रौढी व भांडकुदळपणा
पहिल्यापासून पराकाष्टेची आत्मकेंद्रियता हा कर्णाचा मोठा दुर्गुण दिसून येतो. त्यामुळे आत्मप्रौढी वाढली. तो कायमच मी किती श्रेष्ठ, अर्जुनाला मी एकटाच संपवून टाकतो, अशा वल्गना करीत असतो. त्यामुळे दुर्योधनाला व सामान्य सैनिकांना तो खरेच तसे करून दाखवेल अशी खात्री वाटत होती. प्रत्यक्षात तसे जरी घडून आले नाही तरी त्याच्या वल्गना चालूच असत. भीष्म-द्रोण-कृप यांना त्याची कल्पना असल्याने ते नेहमीच त्याचा फुगा फोडत. कर्ण त्यांचावर तोंडसुख घेई व दुर्योधनाला निस्तारत बसावयाची पाळी येई. ऐन युद्धाच्यावेळी अशा प्रसंगी अश्वत्थामा इतका भडकला की तो कर्णाला मारावयासच निघाला होता ! भीष्मांनी त्याला अर्धरथी ठरवल्यावर त्याने भीष्म मरेपर्यंत मी लढणारच नाही असे सांगितले व कौरवांचे नुकसानच केले.
समयसुचितपणा
भीष्मपतनानंतर सर्व सैनिक कर्णाला सेनापति हो म्हणत होते व दुर्योधनाचीही तशीच इच्छा होती. पण बरोबरीच्या इतर राजांना ते पटणार नाही व ते मनापासून युद्ध करणार नाहीत याची जाणिव असल्याने कर्णाने द्रोणांना सेनापति करावयास सांगितले. तो म्हणतो " सर्व समान राजांपैकी एकाला सेनापती केले तर असंतोष निर्माण होईल. त्या ऐवजी सर्वांचे गुरु असलेल्या द्रोणाचार्यांना सेनापती करा." नेहमी द्रोणांचा अधिक्षेप करणार्या कर्णाने यावेळी योग्य राजकीय खेळी केली.
गुणग्राहकता
भीष्मपतनानंतर कर्ण त्यांना वंदन करावयास गेला व ढसाढसा रडत त्याने शोक व्यक्त केला. अखेरीस त्याने युधिष्ठिराची धर्मप्रियता व अर्जुनाचे युद्धकौशल्यही मान्य केले आहे.
मित्रप्रेम
युद्धाच्या आधी श्रीकृष्णाने त्याला एकांतात तो कुंतीचा पुत्र आहे व तो राज्याचा अधिकारी असून तो सिंहासनावर बसेल व पांडव त्याची सेवा करतील असे सांगितले. पण कर्णाने त्याला स्पष्ट नकार दिला. दुर्योधना्ला सोडून सम्राट होणे त्याने नाकारले. कुंतीला तो म्हणतो, " मला लहानपणीच मारून टाकले असतेस तर बरे झाले असते. आता फार उशीर झाला आहे. " तरीही आईला शेवटी वचन देतो की धर्म, भी, नकुल व सहदेव यांनी मी मारणार नाही, तुझे पाच पुत्र जिवंत राहतील."
मनाचा हीनपणा
द्युतप्रसंगी तो इतका नीचपणे वागतो की चांडाळचौकडीत सर्वात हीन कोण हे ठरवणे कठीण जावे.
दु:शासनाच्या अधमपणाला प्रत्येक वेळी त्याचीच फूस आहे. बटकीशी बोलतांनाही शरम वाटावी असे उद्गार तो काढतो. केवळ या एका प्रसंगामुळे त्याचा करूण शेवटही कमीच झाला असे म्हणावे लागते. "वनात पांडव
असतांना तेरा वर्षे कशास थांबावयाचे ? आताच जाऊन कृष्णाला कळावयाच्या आधीच ते असहाय्य आहेत तोवर त्यांचा निकाल लावून टाकू " असा मनाचा हलकेपणा तो दाखवितो.
कर्णाबद्दल शोक व्यक्त करणार्या युधिष्टिराला नारद काय सांगतात ते पाहून इथे थांबू . " राजा, शोक आवर. तुझा भाऊ दुर्दैवी होता. कोणा एका व्यक्तीला (कुंतीला) दोष देण्यात अर्थ नाही. सर्व क्षत्रियांना युद्धात मृत्यु येऊन स्वर्ग मिळावा म्हणूनच दैवाने त्याची योजना केली होती."
शेवटचा अर्जुनावरचा लेख लिहून आपण महाभारतावरील लेखमाला थांबवू.
शरद
याद्या
34004
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
असं नका करु
डआकाटा
परस्परविरोधी विधानं बरीच
लेखमाला एवढ्यात थांबवू नका
लेखमाला एवढ्यात थांबवू नका
In reply to लेखमाला एवढ्यात थांबवू नका by श्रीरंग
आता आपण कर्णाने लढलेली युद्धे
आयला, मग आजचं राजकारण
In reply to आता आपण कर्णाने लढलेली युद्धे by मृत्युन्जय
हे एकुण काय वाचुन अशी भावना
In reply to आयला, मग आजचं राजकारण by ५० फक्त
यात कर्ण होता हेच मान्य नाही.
In reply to आता आपण कर्णाने लढलेली युद्धे by मृत्युन्जय
मित्रा तु लोकांना पॉपकॉर्न
In reply to यात कर्ण होता हेच मान्य नाही. by प्रचेतस
to afflict the hostile ranks
In reply to यात कर्ण होता हेच मान्य नाही. by प्रचेतस
तर थोडक्यात सांगायचे तर त्या युद्धात ज्या लोकांनी भाग घेतला त्यात कर्ण नावाचा एक राजपुत्र होता आणि राधेचा मुलगा राजपुत्र नसल्यामुळे त्या युद्धात तो हारला असे म्हणताच येणार नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे भीष्म आणि द्रोण आयुष्यभर कर्णाला त्याचे दोष दाखवत खिजवत राहिले. त्यात त्यांनी चित्रसेन गंधर्वाकडुन झालेला पराभव त्याला प्रत्येक वेळेस आठवुन दिला. एकदाही त्यांनी द्रुपदाकडुन तो हारला हे सांगितले नाही.
महाभारतात इतर सर्वत्र कर्ण कधी कधी हारला हे सर्व पात्रे सांगत राहतात. द्रुपदाकडुन हारल्याचे मात्र कुठलेच उदाहरण नाही
दिग्विजयादरम्यान कर्णाने द्रुपद, द्रुष्टद्युम्न, सत्यजित, शिखडी, उत्तमौजा, युधामन्यु इत्यादी सर्व महारथी, अतिरथी असताना द्रुपदाला हरवले. तेव्हा तो एकटा होता. मग इतर लोक मदतीला असताना तो द्रुपदाकडुन इतका सहजी कसा हरेल?जियो...
In reply to to afflict the hostile ranks by मृत्युन्जय
हॅहॅहॅ. बरेच खोदकाम केलेस की
In reply to to afflict the hostile ranks by मृत्युन्जय
पण मुळात व्यास 'व्यासांनी मग
In reply to हॅहॅहॅ. बरेच खोदकाम केलेस की by प्रचेतस
_/\_ आवरा हो ५०. मरतोय मी
In reply to पण मुळात व्यास 'व्यासांनी मग by ५० फक्त
लढ बाप्पु.
In reply to to afflict the hostile ranks by मृत्युन्जय
हेही तसेच, ही लुटुपुटीची लढाई
In reply to यात कर्ण होता हेच मान्य नाही. by प्रचेतस
दोघे मित्र होते त्यामुळे ते
In reply to हेही तसेच, ही लुटुपुटीची लढाई by मृत्युन्जय
हे वाचः 'O Dhananjaya,
In reply to दोघे मित्र होते त्यामुळे ते by प्रचेतस
खी खी खी. हे अमृत म्हणजे एकदम
In reply to हे वाचः 'O Dhananjaya, by मृत्युन्जय
अभिमन्यू वधाच्या वेळी हाच
In reply to यात कर्ण होता हेच मान्य नाही. by प्रचेतस
असेल असेल. पण अभिमन्यु वधाचा
In reply to अभिमन्यू वधाच्या वेळी हाच by मृत्युन्जय
म्हणजे जो कर्ण अभिमन्यू
In reply to असेल असेल. पण अभिमन्यु वधाचा by प्रचेतस
अर्रे कर्णासमोर भीमाने
In reply to म्हणजे जो कर्ण अभिमन्यू by मृत्युन्जय
मला वाटते इथे नंबर महत्वाचा.
In reply to अर्रे कर्णासमोर भीमाने by प्रचेतस
पदातींकडे शत्रे असुन काय
In reply to म्हणजे जो कर्ण अभिमन्यू by मृत्युन्जय
अर्जुनाकडे त्याचे उत्तर
In reply to यात कर्ण होता हेच मान्य नाही. by प्रचेतस
आता आठवला हा प्रसंग. च्यायला
In reply to अर्जुनाकडे त्याचे उत्तर by मृत्युन्जय
व्यासांनी गणपतीला कोडी घातली,
जेते इतिहास लिहितात
उत्तम व्यक्तीचित्र
पात्रांची वये ?
अंमळ गल्लत होते आहे का ?
दुर्दैवाने तसे नाही आहे.
In reply to अंमळ गल्लत होते आहे का ? by परिकथेतील राजकुमार
नाह !
In reply to दुर्दैवाने तसे नाही आहे. by मृत्युन्जय
एक अजुन गोष्ट भीष्मांनी
In reply to अंमळ गल्लत होते आहे का ? by परिकथेतील राजकुमार
सनसनि
हम लगातार आपतक इस बारें मे
In reply to सनसनि by स्पा
छे छे !
In reply to हम लगातार आपतक इस बारें मे by गवि
ह्य ह्य.. पण मग "सबसे व्हेज"
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
मेलो
In reply to ह्य ह्य.. पण मग "सबसे व्हेज" by गवि
ओ क्यामेरामन तुमारा वायर देवो
In reply to सनसनि by स्पा
ओ ५० फक्त. जास्त गडबड करु नका
In reply to ओ क्यामेरामन तुमारा वायर देवो by ५० फक्त
अजेय
ऑ ?
In reply to अजेय by अशोक पतिल
अजेय नाही विजय
In reply to अजेय by अशोक पतिल
महाभारतात एकूण किती पात्रे आहेत ?
महाभारतात तर हजारो असतील. अशी
In reply to महाभारतात एकूण किती पात्रे आहेत ? by चित्रगुप्त
हा हा हा हा
In reply to महाभारतात एकूण किती पात्रे आहेत ? by चित्रगुप्त
मला कुणा व्यक्तीबद्दल काहीही म्हणायच नाही पण मुळात
बुद्ध आणी महावीरांनी ते
In reply to मला कुणा व्यक्तीबद्दल काहीही म्हणायच नाही पण मुळात by संजय क्षीरसागर
भारत आणि इतर असा प्रश्न नाहीये, `माणूस' ही सेंट्रल थीम आहे
हे विचार तुम्हाला जेथून
In reply to भारत आणि इतर असा प्रश्न नाहीये, `माणूस' ही सेंट्रल थीम आहे by संजय क्षीरसागर
यशवंत, दुसरा काय करतो हा प्रश्न गौण आहे
In reply to हे विचार तुम्हाला जेथून by यकु
>>>>आपण काय करतो हे
In reply to यशवंत, दुसरा काय करतो हा प्रश्न गौण आहे by संजय क्षीरसागर
कुणी तुमचा गळा पकडला
In reply to >>>>आपण काय करतो हे by यकु
एक सिंपल अंडरस्टँडिंग आहे, जे युद्धशून्य स्थितीतच शक्य आहे
In reply to >>>>आपण काय करतो हे by यकु
>>>एक सिंपल अंडरस्टँडिंग आहे,
In reply to एक सिंपल अंडरस्टँडिंग आहे, जे युद्धशून्य स्थितीतच शक्य आहे by संजय क्षीरसागर
>जी गोष्ट सध्या नाहीच
In reply to >>>एक सिंपल अंडरस्टँडिंग आहे, by यकु
>>>तिच्याबद्दल कशाला कसल्या
In reply to >जी गोष्ट सध्या नाहीच by संजय क्षीरसागर
`युद्धप्रवण प्रवृती' जी आता, या क्षणी मनात आहे
In reply to >>>तिच्याबद्दल कशाला कसल्या by यकु
संजय यांचं म्हणणं पटतंय आणि
In reply to `युद्धप्रवण प्रवृती' जी आता, या क्षणी मनात आहे by संजय क्षीरसागर
गवि,
In reply to संजय यांचं म्हणणं पटतंय आणि by गवि
संजय यांचं म्हणणं पटतंय आणि
In reply to संजय यांचं म्हणणं पटतंय आणि by गवि
हॅ हॅ हॅ.. यक्कू तू रे मेल्या
In reply to संजय यांचं म्हणणं पटतंय आणि by यकु
प्रतिसाद खाली दिला आहे
In reply to संजय यांचं म्हणणं पटतंय आणि by यकु
>>>युद्धप्रवण प्रवृती' जी
In reply to `युद्धप्रवण प्रवृती' जी आता, या क्षणी मनात आहे by संजय क्षीरसागर
द्विरुक्ती प्रकाटाआ
In reply to एक सिंपल अंडरस्टँडिंग आहे, जे युद्धशून्य स्थितीतच शक्य आहे by संजय क्षीरसागर
>>>प्रॅक्टीकली माणुस ही
In reply to हे विचार तुम्हाला जेथून by यकु
उपप्रतिसाद नॅरो होऊन वाचायला आणि लिहायला त्रासदायक
युद्ध हे सामुहिक द्वंद्व आहे
In reply to उपप्रतिसाद नॅरो होऊन वाचायला आणि लिहायला त्रासदायक by संजय क्षीरसागर
>युद्ध हा पॉवर गेम आहे आणि
In reply to युद्ध हे सामुहिक द्वंद्व आहे by गवि
>>>>निदान त्यांना युद्धकथेत
>मुळात युद्धाच्या समर्थनार्थ भूमिका घेऊन मी चर्चा करीत नाहीये
>>>>तुम्ही युद्धाचं समर्थन
आता सगळं एकदम सोपं झालं!
In reply to >>>>तुम्ही युद्धाचं समर्थन by यकु
उत्तरच नसलेल्या प्रश्नांना
In reply to आता सगळं एकदम सोपं झालं! by संजय क्षीरसागर
>उत्तरच नसलेल्या प्रश्नांना खरोखर सार्थक, प्रॅक्टीकल उत्तर नाही
अग आई ग! मुळ विषय सोडुन चर्चा
कृष्णाचं राजकारण भलतंच लवचिक
यशवंत,
इन्द्राने कवच का मागितले