रॉयटर्स वृत्तसंस्थेचा अलिकडील एका लेख अस्वस्थ करणारा आहे. लेखातील निदान बरोबर असेल, तर भारताची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे असे दिसते.
मूळ लेखाचा दुवा येथे देतो. व थोडक्यात त्यातील मुद्दे मांडतो.
http://www.reuters.com/article/2011/12/05/us-economy-india-funding-idUS…
कमीकमी होणारे उत्पादन, व हाताबाहेर जाणारी महागाई ह्यांमुळे भारताच्या आर्थिक परिस्थितीवर ताण आहेतच. (गेल्या वर्षांत अनेकदा आक्रमकपणे इंटरेस्ट रेट्स वाढवूनही महागाई कमी होण्याची लक्षणे नाहीत). ह्या कारणांमुळे तसेच विशेषतः युरोपातील आर्थिक पडझडींमुळे भारतात स्टॉक्स व बाँड्समधे गुंतवणूक करणारे परदेशी गुंतवणूकदार वेगाने गुंतवणूक कमी करीत आहेत. ह्यामुळे रूपयावर ताण येवून तो खाली जात आहे. (गेल्या चार महिन्यात १६ % अधोगति).
आपले करंट अकाउंट डेफिसिट, अकौंटिंगच्या ह्या वर्षाच्या (एप्रिल २०११ - मार्च २०१२), दुसर्या तिमाहीत, पहिल्या तिमहीच्या तिप्पटीने वाढले (सुमारे १४ बिलीयन यू. एस. डॉ.). सर्व वर्षभरात ते सुमारे ५४ बिलीयन डॉ. होईल असा अंदाज आहे.
लेखांत म्हटले आहे की रूपयाची पिछेहाट थांबवण्यात रिझर्व बँकेस 'इकडे आड, तिकडे विहीर' अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. एका टोकास काहीच मध्यस्थी न केल्यास रूपया घसरत रहील. दुसर्या टोकास आक्रमकपणे मध्यस्थी केली तरी ती महागात पडेल. आपल्याकडे सध्या सुमारे ३०० बिलीयन डॉ. ची परदेशी चलनाची गंगाजळी आहे खरी, पण करन्ट अकाउंट डेफिसिट व नजीकच्या काळांत मॅच्युअर होणार्या कर्जरोख्यांच्या परतफेडी, ह्यांत जी रक्कम खर्ची पडेल त्यानंतर जेमतेम २० बिलीयन डॉ. इतकीच परकीय चलनाची गंगाजळी शिल्लक राहील.
तसेच आक्रमकपणे परकीय चलन विकत घेण्याच्या प्रयत्नात रूपयाचे बाजारातील चलन कमी होईल, त्याचे परिणाम बँकांच्या गंगाजळींवर व त्यानंतर सर्वच व्यवहारांत (कंपन्यांना कर्जे मिळणे इ.) दिसू लागतील.
तेव्हा ह्यातून रिझर्व बॅंकेस एक मार्ग सुचवला आहे तो बॅंकांचे कॅपिटल रेशो कमी करण्याची परवानगी देणे, हा. तो कितपत परिणामकारक असेल, ह्याविषयी लेखात काही म्हटलेले नाही.
नजीकच्या भविष्यात रूपया अगदी ५५ च्याही खाली जाईल, असे सर्वसाधारणपणे म्हटले जात आहे.
मी अर्थशास्त्रज्ञ नाही, तेव्हा ह्यावर त्या क्षेत्रातील जाणकारांनी प्रकाश टाकावा, अशी विनंति करतो. माहितीपूर्ण, अभ्यास्पूर्ण चर्चा अपेक्षित आहे. लेखात काही ठोस माहिती दिलेली आहे, काही गृहितके आहेत, त्या अनुषंगाने, व आपल्याकडील माहितीवरून, ह्याविषयी चर्चा व्हावी. कॉन्स्पिरसी थेयरी मांडायची असली तरी ती साधार असावी.
वाचने
42997
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लिंटन, अतिशय धन्यवाद हा
In reply to थत्तेचाचा आणि श्रामो by क्लिंटन
>>(मतांच्या राजकारणासाठी) वीज
In reply to थत्तेचाचा आणि श्रामो by क्लिंटन
distribution franchisee
In reply to >>(मतांच्या राजकारणासाठी) वीज by नितिन थत्ते
पुर्वपिठीका !!
In reply to >>(मतांच्या राजकारणासाठी) वीज by नितिन थत्ते
चांगली माहिती आणि उपचर्चा...
In reply to वीज वितरण कंपन्यांचा तोटा by क्लिंटन
विषय
In reply to चांगली माहिती आणि उपचर्चा... by विकास
+१
In reply to विषय by श्रावण मोडक
सफरचंद-संत्रे
In reply to +१ by नितिन थत्ते
नाही
In reply to सफरचंद-संत्रे by विकास
फरक
In reply to नाही by श्रावण मोडक
आणखी एक
In reply to फरक by विकास
वर आपल्या प्रतिसादात
In reply to फरक by विकास
चला चाचा
In reply to वर आपल्या प्रतिसादात by नितिन थत्ते
राजकारणाचाच
In reply to वर आपल्या प्रतिसादात by नितिन थत्ते
रुपया घसरला त्याच्या अनेक
आँ
In reply to रुपया घसरला त्याच्या अनेक by अविनाशकुलकर्णी
ते पैसे राहिले असतील का
In reply to आँ by नितिन थत्ते
करंट अकाउंट डेफिसिट,मुळे वाट