Skip to main content

वीर शिवाजी - कलर्स

लेखक सचिन यांनी मंगळवार, 22/11/2011 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज चॅनेल सर्फिंग करता करता एक धक्कादायक अनुभव आला. मिपावाचकांना याविषयी सांगणे आवश्यक वाटले, किंबहुना सर्वांच्या नजरेस आणून द्यावेसे वाटले म्हणून........... कलर्स चॅनेलवर "वीर शिवाजी" नावाची एक मालिका चालू आहे.रोज ८.३० ते ९.०० सायंकाळी. महाराजांच्या बद्दल आजपर्यंत कधीही वाचण्यात / ऐकण्यात न आलेल्या अशा अतर्क्य घटना त्यात दाखविल्या आहेत. माझ्या मते शिवचरित्राला अक्षरशः विटंबित करण्यात आले आहे. या चॅनेल द्वारे ही मालिका जगभरात प्रसारित होत असणार... उदाहरणादाखल : (१) मियां रहीम नावाच्या कुठल्याश्या खानाच्या गोटातील एक बाई शिवाजी राजांना मारायचा कट करते आहे. महाराज दिवाळी साजरी करीत असताना ही त्यांच्या आसनाखाली टोपली भरून फटाके ठेवते, म्हणजे इतर कोणी फटाके लावले की त्या टोपलीचा मोठा स्फोट होईल....आणि फटाक्याच्या दारूची लाईन तिथपासून समोर लावल्या जाणार्‍या अनार पर्यंत असते (म्हणजे एखाद्या सिनेमात पेट्रोल काडी टाकून पेटवतात आनि त्याची लाईन जळत जाऊन पुढची गाडी वा घर जळते ...तसे टेक्निक !). हा खानही तिथे पाहुणा म्हणून आलेला असतो. मग एकदा राजे, तर एकदा खान त्या आसनवर बसतात .. नेमके स्फोटाच्या वेळी कोण बसलेले असणार्...हा टिपिकल क्लायमॅक्स्...शेवटी खान बसलेला असताना ती दारू पेटत जाते...आणि तीच बाई घागरभर पाणी ओतून पुढचा अनर्थ टाळते. (आणि महाराजांची शाबासकी मिळवते) (२) हीच बाई सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई वगैरेंमधे अनेक गैरसमज - भांडणेही लावत असते (सास बहू स्टाईल) (३) जिजाबाईंची व्यक्तिरेखासुद्धा सास बहू स्टाईल आहे. त्या आपल्या सुनांना "करम जली" वगैरे म्हणताना दाखवल्या आहेत. (४) शिवाजी अजून "बाल शिवाजी" आहे ... पण जिजाऊ एकदम वयस्कर आहेत... मी आजपर्यंत दोनच भाग पाहिले. एका क्षणाचाही आपण सर्वांना माहीत असलेल्या शिवचरित्राशी ताळमेळ लागत नाही. अत्यंत "डिस्टॉर्टेड" असे सारे काही दाखवले आहे.....पुढचा भाग पहायची इच्छा आणि धाडसही झाले नाही. अशा मालिकांना मान्यता कशी काय मिळू शकते ? आपल्या सर्वांना मिळून काही करता येईल काय ?

वाचने 6660
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

संभाजी ब्रिगेडला काँटेक्ट करा.... पण त्यापुर्वी हि मालिका कोण्या विशिष्ट जातिच्या लोकांनी तयार केली नाहि आणि मालिकेचा भांडारकर इंस्टिट्युटशी संबंध नाहि हे बघुन घ्या. अर्धवटराव

ह्या मालिकेत अत्यंत अतर्क्य आणि विनोदी प्रसंग दाखवले आहेत. इथेच लिहितो सविस्तर थोड्या वेळाने.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

ह्या मालिकेत अत्यंत अतर्क्य आणि विनोदी प्रसंग दाखवले आहेत सहमत...शिवाजी आणि सोयराबै यान्ची भेटही अशीच फिल्मी पद्धतीने दाखविण्यात आलेली आहे.... एका कुठ्ल्याश्या "मेल्या"त की बाजारात सोयरा आपल्या मयतरीनीबरोबर हिन्डत असताना एका जोतिषाला हात दाखवून भविष्य विचारते.. तेव्हा तो एक ज्योतिषी तिला सान्गतो, की" तुझं लग्न राजघराण्यातच्च होणार आहे.. आणि तुला पुढे "महाराणी" वगैरे बनण्याचे चान्सेस आहेत.." इ. इ. ते भविष्य ऐकून झाल्यावर सोयरा त्या (भटुरड्या ) ज्योतिषाला पैसे / दक्षिणा/ मुद्रा न देताच तिच्या मयतरेनीबरोबर पळ्ळ काढते... आणि तिच्या मागे तो जोतिषी "मेरी दक्षिणा... मेरी दक्षिणा.." करत येतो... इकडे शिवाजी आणि त्यान्चे सहकारी शत्रूला चुकवत असताना बाजारात वाट शोधत असतात.. आणि शिवाजी - सोयरा एकमेकांना येऊन धडकतात...आणि धडकल्याबद्दल एकमेकान्ना थोडेफार "कर्सिन्ग" करतात... ("नीट चालता येत नाही का" वैग्रे) :) आणि मग काही एपिसोडनन्तर त्यान्चे एकमेकान्बरोबर लग्न ठरत असताना.. दोघान्चेही एक्स्प्रेशन वेगवेगळे असतात... :)

In reply to by मृगनयनी

अशा प्रकारे इथेच लिहिण्याच्या विमे काकांच्या प्रयत्नांना बूच मारण्यात आलेले आहे याची विमे काकांनी नोंद घ्यावी ही विनंती. ;-)

In reply to by प्रास

इथेच म्हणजे याच धाग्यावर हो. सविस्तर प्रतिसादासाठी उठसुठ जागा अडवून ठेवायला मी काय इंटया आहे काय? ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सविस्तर प्रतिसादासाठी उठसुठ जागा अडवून ठेवायला मी काय इंटया आहे काय?
नाही ना, तुम्ही इंट्या नसल्यानेच तिथे लिहाल अशी अपेक्षा होती. त्याने जागा अडवून अजून कधी सविस्तर प्रतिसादच लिहिलेला नाही. तो फक्त अतिक्रमण करतो. बूच मारलं गेल्याची नोंद केली, इतकंच.
इथेच म्हणजे याच धाग्यावर हो
वाट बघत आहे..... :-) :-)

कलर्स या चॅनेलचे वैशिष्ठ्य आहे की कोणतीही मालिका सास बहू स्टाईलमधे नेऊन दाखवू शकतात. इमॅजिनवरची चंद्रगुप्त त्याच लाईनवर चाललेली आहे. त्यात धनानंदासारखा सम्राट एखाद्या मनोरुग्णासारखा दाखविला आहे. ;)

>>अशा मालिकांना मान्यता कशी काय मिळू शकते ? फिक्शन कंटेंट म्हणून मान्यता मिळण्यास काहीही हरक्त नसावी. >>आपल्या सर्वांना मिळून काही करता येईल काय ? हो. दोन उपाय आहेत. एक म्हणजे टिपिकल "अश्या लोकांना अनुल्लेखाने मारलेले बरे" असे म्हणत हातावर हात ठेवून बसणे आणि दुसरा म्हणजे इथे तक्रार नोंदवणे.

ह्म्म... असे असेल तर हे लगेच थांबायला हवे ! लहान मुलांच्या मनावर गोष्टी पटकन बिंबवल्या जातात ! त्यामुळे चुकीच्या गोष्टी लक्षात राहण्याची शक्यता आहे ! तसेही हिंदुस्थानात सध्या विविध चॅनॅलसे पेव फुटले आहे,आणि येणार्‍या काळात त्यात भरच पडेल... हल्लीच एका वाहिनीवर (बहुतेक बिग बॉस प्राईम) The Jerry Springer Show लागतो ! त्यात बायकांच्या मारामार्‍या,लफडी,अनैतिक संबंध या गोष्टी अगदी चवीने चघळुन सांगितल्या जातात ! अमेरिकन जग किती घाणेरड्या पातळीवर आहे हे त्या मालिकेतुन लगेच कळले, मी मुद्दामुन त्याचे २-४ भाग पाहिले आणि त्यातल्या बिभित्स प्रकाराने थक्क झालो ! असे कार्यक्रम हिंदुस्थानात नक्की काय मनोरंजन देत आहेत हा गहन प्रश्न मनात आला ! विकृत आणि विकॄती...यक्क्क ! असे चॅनेल्स आणि कार्यक्रम यावर लगेच बंदी आणली पाहिजे.

In reply to by मदनबाण

Emotional Atyachaar नावाचा प्रकार बहुदा U TV Bindas वर लागतो. आमच्यासारख्या जुनाट आणि बुरसटलेल्या लोकांना इतरेजन तो चवीचवीने का पाहतात असे वाटू लागते. आम्हा अल्पसंख्य व अल्पबळ असणार्‍यांचा टीव्हीवर ताबा नसल्याने बघावे लागतेच, इलाज नाही.

In reply to by मन१

आम्हा अल्पसंख्य व अल्पबळ असणार्‍यांचा टीव्हीवर ताबा नसल्याने बघावे लागतेच, इलाज नाही. सहम्त आहे. फक्त आम्ही टीव्ही चालू असलेल्या खोलीत न बसण्याचे स्वातंत्र्य उपभोगू शकतो इतकाच काय तो आनंद.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हो. पण आमच्या येथील कुटील माणसे ताटे व आख्खे भोजन,स्वयंपाक व खाद्यपदार्थ घेउन टीव्हीसमोरच बसतात. आणि आम्ही एकाच मंत्रिमंडळात असलेले मुखर्जी-चिदंबरम किंवा पतंगराव्-अजितदादा किंवा चॅपेल्-गांगुली जेवढ्या आनंदाने एकमेकांसोबत रहात असतील, तेव्हढ्याच आनंदाने सोबत बसून भोजन घेतो.

ह्या सगळ्यामागे संघाचा हात आहे, किंवा मग हा सगळा बामणी कावा आहे. बाकी ह्या मालिकेत रामदास, दादोजी कोंडदेव, जिवा महाला, वाघ्या कुत्रा असल्या गोष्टी दाखवत असतील तर आम्हाला लगेच कळवा. मग बघतो एकेकाला !

अगदी सहमत! अनेक प्रसंग असे आहेत कि जे आपण कधीच ऐकलेले नाहीत.जिजाऊ ह्या खंबीर वाटत नाहीत. अगदी असेच झाशी कि राणी ह्या मध्येही झाल होत.तिथेहि काही काळ झाशीची राणी आज कोणते दागिने घालू,सासूची कट कारस्थान, त्याला तोडीस तोड टोमणे ,प्रतिउत्तर देण्यात बिझी दाखवली होती.

आपल्या सर्वांना मिळून काही करता येईल काय
सहसा असल्या कामांमध्ये राजकिय पक्षांना जाम इंटरेस्ट असतो. तेव्हा संभाजी ब्रिगेडला वगैरे हे सांगून पहावे. दरम्यान ह्या मालिका बनवणार्‍यांची जात वगैरे पाहून काही निष्कर्ष काढता येतील का हेही पाहता येईल.

त्यावरूनचं अनुमानः १. गेल्या कित्येक दिवसांपासून ती दासी 'रंभा' डोळे मोठे करून, मान वेळावून टिपिकल मालिका स्टाईलने शिवरायांना जीवे मारायचा प्रयत्न करतेय. आणि प्रत्येक जीवावरच्या प्रसंगातून ते लीलया बाहेर पडताहेत. २. अजून दादोजींना दाखवलं नाहीय. ३. बहुतेक जिजाऊ खाष्ट साबा नाहीयत.कुटुंबात आणखी कोणीतरी पांढरी साडी घालणारी म्हातारी आहे, जी सतत सुनेवर आणि नातसुनांवर करवादत असते. असो.. जे काही दाखवलं जात आहे, तो नक्कीच आपला इतिहास नाही हे मात्र खरं

In reply to by मस्त कलंदर

अनुमान क्र. १ वरून असं अनुअनुमान निघतं की जुन्या ष्टोर्‍यांमध्ये नवीन फिल्मी प्रकार घुसडून ट्यार्पी वाढवायचा प्रयत्न आहे. ते चालतं. जर मी साधा प्रश्न उपस्थित केला की त्याकाळी अंगरक्षक नव्हते का? नसल्यास आजकालचा बॉडीगर्ड चालेल का? त्यावेळी मात्र मी चूक ठर्णार!;) घ्या पुपे, ष्टोरीच्या प्रोजेक्टात नवीन भर घातलिये.

ही मालिका केकताबाईंचीच आहे का? नाही, टिपिकल माजघरी कावे आणि हावभाव वगैरे दिसतंय म्हणून म्हणलं. हल्ली संभाजी ब्रिगेडची वाचा बसलीए असं दिसतंय्य. किंवा येत्या निवडणूकांच्या तयारीसाठी इतर कामात गुंतवलेलं दिसतंय बोलावत्या धन्यांनी. नाहीतर धिंगाणा घालायचा एव्हढा 'गोल्डनचान्स' कसा काय बुवा नजरेआड झाला? अन्या दातारानं दिलेली लिंक उत्तम आहे. त्यावर काही काम केले जाईल अथवा नाही ते ठाऊक नाही, पण जास्तीत जास्त लोकांनी जर अशा तक्रारी नोंदवल्या तर निदान काहीतरी हालचाल करणं त्यांना भाग पडेल. (अमुलाग्र बदल होईल वगैरे वेडा आशावाद मुळीच नाही. पण निदान काहीतरी...) मला वाटतं सुरुवात म्हणून शक्य तितक्या जास्तीत जास्त लोकांनी हा धागा आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवावा, ज्यायोगे आयबीएफ ची लिंकही सगळ्यांपर्यत पोहोचेल्.आणि सर्वांना आवाहन केलं जावं, की तिथे तक्रारींचा पाऊस पडला जावा.

In reply to by धमाल मुलगा

माजघरी कावे हा हा हा.... :) बाकी विशेष अ‍ॅक्शन होत नसण्याचं कारण असंही असेल की कलर्सच्या ऑफिसला फार काचा नसतील.

In reply to by धमाल मुलगा

आयबीएफ वर या आधी मी एकदा तक्रार नोंदवली होती. आजच तीची पोच मिळाली म्हणून तक्रार कधी केली होती याची तारीख पाहिली. १५ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर इतका वेळ फक्त पोच द्यायला लागला तर प्रत्यक्ष कारवाई सरकारी वेळेप्रमाणेच होणारसं दिसतेय!!

एकदा टिव्हीवर मॅच बघत असताना एक सरदार मित्र येउन "अबे मॅच क्या देख रहा है? रोडीज् लगा भेंचोत, मस्त गाली-गलोच होता है!" असं म्हणाला होता! :)

आता टिव्हीवरच्या मालिका बघून इतिहास शिकण्याचे दिवस इतिहासजमा झालेले आहेत. पूर्वी चाणक्य, भारत एक खोज मध्ये होते तसे. त्यामुळे मालिका अशा आहेत म्हणून इतिहासातही असेच झाले असे समजणारे आता कोणी नसावेत. मागे झाशीची राणी मालिकेत ही असाच प्रकार चालू होता. आता बहुतेक ती मराठी मध्ये डब होउन झी मराठी वर लागते. मालिका दाखवणारे 'यातील पात्रे आणि प्रसंग इतिहासातील असले तरी सगळे तसेच नाही' अशा अर्थाची पाटी दाखवून आपले हात मोकळे करून घेतात त्यामुळे तक्रारीचा उपयोग किती होईल कोणास ठाउक. हा पण भावना दुखावल्या म्हणून काहीतरी करायचे असेल तर गोष्ट वेगळी. मग ब्रिगेड आहेच. - ओंकार.

In reply to by मी_ओंकार

असहमत. इमॅजिनवर दाखवली जाणारी चंद्रगुप्त मालिका पाहून तसं घडलं असेल असं वाटणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

या मालिकेनं एक गोष्ट सिद्ध केली की फक्त राजकारणीच (स्वार्थासाठी) इतिहास बदलतात असे नाही तर मनोरंजनवालेही बदलू शकतात (तुम्ही बदलता तर आम्ही का नाही?). तसाही इतिहास बदलायला काढलेलाच आहे त्यामुळे थोडाफार हात त्यांनी धूवून घेतला तर ब्रिगेडला काही वाटायला नको. त्याप्रमाणे त्यांनी मौन राखले आहे त्याचे कौतुक करायचे तर ते राहिलं बाजूला....... हीच मालिका आपण सुरु केली असती तर शिवाजीऐवजी महाराज हा शब्द वापरावा लागला असता. त्याबद्दल अजून दंगाधोपा कसा झाला नाही याचेच आश्चर्य वाटत आहे.

In reply to by रेवती

पर्‍या कुठे आहेस रे? इतिहास बदलायला काढलाय आपल्या इतिहास पुनर्लेखन प्रोजेक्टचे काय झाले? सांग पाहू लवकर.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पर्‍या कुठे आहेस रे? इतिहास बदलायला काढलाय आपल्या इतिहास पुनर्लेखन प्रोजेक्टचे काय झाले? सांग पाहू लवकर.
आहे रे इकडेच आहे. साहेबांनी सध्या दुसरी कामे मागे लावून दिली आहेत. सभा वैग्रे आटोपल्या आणि आचारसंहिता लागली की घेतो बघ मग एकेकाला पट्ट्यात ;)