Skip to main content

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - बुद्धीभेद करणारी एक भयानक संस्था?

लेखक आंसमा शख्स यांनी शुक्रवार, 24/06/2011 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विषयी अनेक प्रकारची भीती प्रसारमाध्यमात ऐकू येते. हे संस्था उजव्या विचारसरणीची आहे वगैरे. आज राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बुद्धीभेद करणारी एक भयानक संस्था आहे असे म्हणतात. युवा नेते राहुल गांधी हे तर या संस्थेला देशविघातक शक्तीच म्हणतात. समाजाच्या एका भागात या संस्थी विषयी नक्कीच भीती आहे. मला माझ्या काही मित्रांनी या सम्स्थेच्या कारवायांबद्दल टोकाची मते मांडली. त्यात कदाचित अफवाही असतील. त्यामुळे मी अजूनच गोंधळून गेलो आहे. मिपावासियांना या संस्थेविषयी काय वाटते हे समजून घेण्यासाठी हा काथ्याकूट मांडतो आहे. १. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस ही एक राष्ट्रविघातक संस्था आहे का? २. ही एक अतिरेकी संस्था आहे? ३. इतक्या भयंकर संस्थेवर बंदी का घातली जात नाही? ४. कोणते काम ही संस्था करते? काही काम खरच करते का? ५. तुम्हाला या संस्थे विषयी काय वाटते?

वाचने 20515
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

सदर धागा कर्ता खोड्साळ आहे ...असे दिसुन येते ...धागा लिहिताना दुसर्यान्ची मते लिहिलि आहेत ..म्हणजे नन्तर "तो मि नव्हेच" असे सान्गायचे.. आणि "राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती" य वरुन त्यन्ची बौद्धिक कुवत ध्यानी येते .... १. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस ही एक राष्ट्रविघातक संस्था आहे नाही उत्तर नाही २. ही एक अतिरेकी संस्था आहे? उत्तर नाही ३. इतक्या भयंकर संस्थेवर बंदी का घातली जात नाही? उत्तर ती भयन्कर नाही .. म्हणुन बन्दी नाही..आणि तुम्ही चर्चा होण्या अगोदर भयंकर का ठरवली?? दिग्विजय सिंग च्या सान्गण्यावरुन ?? ४. कोणते काम ही संस्था करते? काही काम खरच करते का? उत्तर हो ..त्या विषयी वरती लिहिले आहेच ५. तुम्हाला या संस्थे विषयी काय वाटते? उत्तर आदर . तरी त्यानी काही उत्तर द्यावी अशी अपेक्ष करतो.. १. हा धागा लिहिण्या पूर्वी आपण काय ग्रुह्पाठ केलात?? २. गुगल वर सन्घा विशयी शोधलेत का? ३. सन्घाच्या एखाद्या स्वन्य सेवकाला भेटुन काय चलते ते विचारलेत का? ४. टोकाची मते मान्डणार्या तुमच्या मित्रा ल तुम्ही स्पष्टीकरण विचारलेत का ?? बाबा ..तुझी अशी मते का आहेत ?? करण काय ? ५. तुमचे स्वताचे मत काय आहे ?? धागा कर्ता असल्याने य प्रश्नान्ची उत्तरे द्यवी ..ही विनन्ती .. ( मि.पा. वर नवीन आहे अशुद्ध लेखना बद्दल माफी असावी)

In reply to by शाहिर

अवांतरः
मि.पा. वर नवीन आहे अशुद्ध लेखना बद्दल माफी असावी
हे म्हणजे फारच झाले!! अहो, मि पा वर सूद लिवायचे असतया, तसच तर लिवले हाय तुम्ही माफी बिफी काय? कै च्या कै बगा तुमचपन!!

In reply to by शाहिर

मि.पा. वर नवीन आहे अशुद्ध लेखना बद्दल माफी असावी
शुद्धलेखनाची काळजी करु नका :) लिहित रहा. भावना शब्दात उतरणे महत्वाचे. बाकी शुद्धलेखनाची काळजी झेपेल तेवढी नक्कीच घ्यावी. शुद्धलेखनाच्या नावानी अती गळे काढणार्‍यांची रवानगी मात्र आम्ही पल्ल्याडच्या बुद्धीला गंज चढलेल्या हुच्चभ्रुंच्या अभयारण्यात करतो.

In reply to by शाहिर

१. हा धागा लिहिण्या पूर्वी आपण काय ग्रुह्पाठ केलात?? हा धागाच माहिती मिळवण्यासाठी काढला आहे. २. गुगल वर सन्घा विशयी शोधलेत का? नाही जमले नाही वेळ मिळेल तसे शोधेन. येथे काही दुवे मिळाले आहेत. त्यातून चांगली माहिती कळली. ३. सन्घाच्या एखाद्या स्वन्य सेवकाला भेटुन काय चलते ते विचारलेत का? ते वर गगनविहारी यांनी सांगितलेच आहे! आता अजून कशाला विचारायचे? ४. टोकाची मते मान्डणार्या तुमच्या मित्रा ल तुम्ही स्पष्टीकरण विचारलेत का ?? बाबा ..तुझी अशी मते का आहेत ?? करण काय ? ते वर गगनविहारी यांनी सांगितलेच आहे! ५. तुमचे स्वताचे मत काय आहे ?? मी माझे मत अजून बनवतो आहे. वाचन करत आहे. बनल्यावर ते येथे नक्की देईन.

In reply to by आंसमा शख्स

का हो सारख आपलं गविंचा प्रतिसाद (सोयिस्कर पणे) दाखवताय??? शाखे बद्दल चांगलं लिहिलेले पण प्रतिसाद आहेत ना... तुम्हाला अजिबात समजुन घ्यायच नाहिये की ही संस्था नक्कि काय करते.. तुमचा काही गोन्धळ पण उडाला नाहिये.. ...आणि जगाचा इतका कळवळा असेल तर, मुस्लिम दहशतवादी संघट्ना आणि अतिरेकी ह्या बद्दल पण जाग्रुती करा.. इतर धर्मच्या वाइट संघटना दिसतात, स्वतःच्या मात्र दिसत नाहीत... लव्ह जिहाद आणि अजुन कसले कसले प्रकार वाचयला मिळाले... ह तुमचा जिहाद तर नव्हे... हिन्दु संस्थाना टारगेट करायचा?

In reply to by पिलीयन रायडर

हम्म...आता यांचा आय डी मुस्लीम नावाचा आहे पण त्यामागचा माणूस कोण आणि असे लेख लिहिण्यामागचा उद्देश काय हे कसे समजणार? कदाचित संघाविषयी गैरसमज पसरवणे किंवा मुस्लीम समाजाविषयी आडवाटेने वैरभाग जागृत ठेवणे किंवा फक्त हमरीतुमरीची गंमत पाहणे किंवा अजून काहीहि असू शकतो.

In reply to by शिल्पा ब

शक्यता तर खुप काही असु शकतात.. चांगल्या आणि वाईट.... मी त्यातली एक पकडली... जी मला सर्वात जास्त "शक्य" वाट्ली... आपल्याला काय माहीती की काय खरं काय खोटं असं म्हणुन आपण प्रतिसाद देणं तर नाही न थांबवु शकत... आणि बुरख्या आडुन केलेल्या गोष्टी कितीही चांगल्या हेतुने केल्या तरी त्या मान्य होण्या सारख्या नसतात.. जर ह्या माणसाचा उद्देश चांगला असेल तर तसं कुणाला तरी वाटलं असतं.. धार्मिक बाबतित बोलताना संतुलीत बोलल पाहिजे.. पण तसं काही ह्या माणसाच्या लिखाणात दिसत नाही... आणि तसही उत्तर कुठे देणारेत हे महाशय...

In reply to by पिलीयन रायडर

हाच प्रतिसाद दुसर्‍या धाग्यावरही दिला आहे. इथेही देणे आवश्यक वाटते. ...... तुम्ही वारंवार आरेसेस विषयी काही निगेटिव्ह बाजू दाखवणार्‍या प्रतिसादांचा उल्लेख तुमच्या लिखाणाच्या समर्थनार्थ सर्टिफिकेटसारखा करताय. (उदा, मी, विजुभाऊ वगैरे यांचे प्रतिसाद..) असे अनेक प्रतिसादांत दिसले म्हणून एक मुद्दा नम्रपणे स्पष्ट करु इच्छितो. हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक संस्थेविषयीसुद्धा आपली मते परखडपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आणि मोकळीक आहे. देवालाही हिंदू मनुष्य विठू, विठ्या असे एकेरीत संबोधू शकतो. अशा बॅकग्राउंडमुळे मी मोकळेपणाने आरेसेसच्या चांगल्या कामासोबतच एका विशिष्ट शाखेत दिसलेले निरिक्षण सांगितले. ते चूकच आहे. आणि ते सर्वत्र तसेच असेल असेही माझे म्हणणे नाही हे मी स्पष्ट केले. त्यासोबत त्या संस्थेची उजळ बाजूही दाखवली. पण हे सर्व लिहिण्याचा उद्देश तुम्ही सांगितलेल्या संघटनेला पाठिंबा किंवा मुस्लिमांनी एकत्र येण्याचे समर्थन वगैरे मुळीच नाही हे स्पष्ट करतो. मी आरेसेसची मला वाटलेली उणी बाजू दाखवली (तीही चांगल्यासोबत..आणि आधी चांगली बाजू दाखवून मगच.. ) याचा अर्थ आपल्या लिखाणातील विचारांचे समर्थन त्यामुळे होऊ शकत नाही. पुन्हा विनंतीपूर्वक लिहितो, भडकावण्याचे काम कोणीच करु नये.. कोणीच म्हणजे कोणीच.

In reply to by गवि

पुन्हा विनंतीपूर्वक लिहितो, भडकावण्याचे काम कोणीच करु नये.. कोणीच म्हणजे कोणीच. आँ...ऑशॉ कॉय कॉरॉयचॉ गडे!!! आम्ही नाही ज्जा!!!

In reply to by गवि

तुम्ह।ला नाहि..मला लेखकाला प्रश्न विचारायचा आहे... तुमचे अनुभव एका शाखे पुरते आहेत.. आणि तसं तुम्ही आधिच स्पष्ट केलेलं असताना, हा माणुस तुमचे नाव घेउन तुम्हाला स्वतःच्या बाजुला ओढत आहे असं वाट्लं... आणि तुमचं तेवढ्च लिहिलेल तुमचं मत म्हणुन वापरतोय...

In reply to by गणपा

आमच्या कंपनीने लोकांच्या 'पोटाला चालना देणारी कमर्शियल टाकली आहे. त्याचंबी कौतुक करा ना.. :)

In reply to by नितिन थत्ते

दोन दिवसापूर्वी ख्रिश्चन संथेच्या नावाने हे महोदय ओरडत होते.. आता आर एस एस वर आले...
उद्या बी.जे.एस वर येतील, या महोदयांचा काहीएक भरवसा नाहिये... यांना आजच घडी डिटर्जंट केक भेट द्यावा ही सं.मं. विनंती....

In reply to by नितिन थत्ते

मला वाटतयं ते काँग्रेस (थ) चे सभासद* असावेत! ;) *सध्या कुठल्याही काँग्रेसमध्ये कार्यकर्ते असतात का ते माहीत नाही. ;)

In reply to by वपाडाव

फक्त काँग्रेसमध्येच कार्यकर्ते* असतात. समाजवाद्यांमध्ये फक्त नेतेच असतात. शिवसेनेत सैनिक असतात. संघात स्वयंसेवक असतात. कम्युनिस्टांत कॉम्रेड असतात. सिव्हिल सोसायटीत शहाणे असतात. तेव्हा विकास यांना प्रश्न का पडला हे कळले नाही. *हा बिका शेख यांच्यावर आरोप नाही.

In reply to by नितिन थत्ते

हाहाहा!!! गुड वन! :ड बाकी, मी खरोखरीचाच समतोल असल्यामुळे घाबरू नका! ;)

In reply to by नितिन थत्ते

मस्त! यावरून एक जुने (आणि येथे कदाचीत आधी सांगितलेले) आठवले. ते पण एका कॉग्रेसच्याच व्यक्तीने केले होते (मला वाटते बाळासाहेब भारदे): भारतीय राजकारण म्हणजे, काँग्रेसवाल्यांच्या खुर्चा, जनसंघाच्या पुजा अर्चा, समाजवाद्यांच्या चर्चा आणि कम्युनिस्टांचा मोर्चा!

तेव्हा नुकतेच वर्ग ३ री पास होऊन ४ थ्या वर्गात गेलो होतो उन्हाळ्याचे सुट्टिचे दिवस हक्काचे खेळण्या- बागडण्याचे अशातच आमच्या ग्रुप मधिल एकाला त्याच्या वर्ग मित्रा करवी शाखेत येण्याचे निमंत्रण आले सर्वांनी (ग्रुप) प्रवेश घेण्याचे ठरवीले, सुरुवातीला त्या मित्रा कडून शाखेत 'खेळ' शिकवतात एवढीच माहिती मिळाली होती अन ती पुरेशी होती आम्हिहि उत्साहाने आप आपल्या घरी परवानगी मागायला गेलो, अन तिथेच हिरमोड झाला आमचे परम पुज्य पिताश्री जाम कावले, कारण तेव्हा संघानेच कट रचून गांधी हत्या केली असा आरोप होता अन त्यामुळे त्यावर बंदि सुध्दा आली होती तिथे जाउन तू सुध्दा तेच करणार आहेस काय? (नथुराम गोडसे हा सुध्दा स्वयंसेवक होता,तिथल्या सभासदांना स्वयंसेवक म्हटले जाते,) त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर तेव्हा माझ्याकडे न्हवते आणी असते तरी मला ते देता आले नसते, बाबांचा धाकच तसा होता, मि हिरमुसलो त्यांच्या समोर रडूहि शकत न्हवतो, मि आई जवळ जाऊन रडू लागलो, आमचे मित्र दुसर्‍याच दिवसा पासून नियमीत जाऊ लागले, मलाहि जायची खुप ईच्छा होती मित्रांनी माझी अडचण शाखेतील शिक्षकांना सांगितली श्री.महेंद्र फाळके हे त्यावेळी त्या शाखेवर प्रमुख म्हणून होते,ते आमच्या घरी आले अन माझ्या बाबांबरोबर बोलले, त्यानी त्यांची संघाची भुमिका वडीलांसमोर मांडली,पण वडिल कन्विन्स झाले नाहित, शेवटी आईने मध्यस्थी केली अन माझा मुलगा फक्त खेळ , व्यायाम या गोष्टि करेल या उपर संघाचे कोणतेहि संघकार्य करणार नाहि या अटिवर मला परवानगी देण्यात आली, झाले मग दुसर्‍या दिवसा पासून आम्हि दररोज शाखेत जाऊ लागलो, आमची दुपारची शाळा सायं.५:०० ला सुटायची मग सायं.०६:०० वाजता शाखेत जायचो, सायं.०६:०० ते ० ७:०० हि अधिकृत वेळ असली तरी वर प्रतिसादात सांगीतल्या प्रमाणे या एक तासाच्या शाखेत व्यायाम, सुर्यनमस्कार, सांघिक खेळ व्हायचे. नंतर एक शिवाजीची किंवा पृथ्वीराज चौहान, झाशीची राणी इत्यादींच्या कथा व्हायच्या कधी कधी कविता,गाणी,भेंड्या हे सगळे ०९:०० ते १०:०० वाजे पर्यन्त चालू असायचे,शाखा बंद होउच नये असे वाटायचे. हळू हळू शाखेत रुळत गेलो. शाखा ज्या मैदानावर भरायची ते रस्त्या लगत असल्यामुळे येणारे जाणारे कौतुक अन कुतुहलाने आमच्याकडे पाहत असत हे संघात असलेल्या शिस्तीमुळे, जसे लोक कौतुक करायचे तसे काहि चिडवायचे देखील संघ दक्ष अन पोरिंवर लक्ष यामुळे खुप राग यायचा यामुळे आम्हि काहि लोकांशी मारा मार्‍याहि केल्या आहेत, सुरुवातीला आम्हि घरच्या कपड्यांवरच जायचो मग आम्हाला गणवेश खाकी चड्डि = रु .२५/-, शाळेचा पाढरा शर्ट होताच, चामड्याचा कमर पट्टा रु=१५/- आणी काळी टोपी रु.०५/- , दंड रु.०८/- ( दंड = जी बांबूची भरीव काठि असते तीला म्हणतात) हे सर्व आम्हि आमच्या खाउसाठीच्या पैशातून घेतले होते पैकी हा दंड आजही माझ्या कडे आहे, इकडे अधुन मधुन बाबांचा विरोध चालूच असायचा, त्यामुळे साहित्य मित्राच्या घरि ठेवून,घरी खेळायला जातो असे सांगून मी पसार व्हायचा, यात आईची साथ होतीच. ते दिवसच वेगळे होते,जात म्हणजे काय हे ही कळत न्हवते तेव्हा, संघात जात-पात पाळली जात नाहि हे इथे प्रामाणीकपणे कबूल करावे लागेल, आमच्यात जसे ब्राह्मण होते तसे दलित बांधवहि होते एकुणच अठरापगड जाती आणी त्यातहि आमच्याच ग्रुप मधले गुजराथी अन भय्येहि होते म्हणजे मराठी-अमराठी असा प्रांतवाद/भाषावाद न्हवता. शाखेतली येऊरच्या जंगलातली बरीचशी शिबिरे आजहि आठवतात, तिथे आम्हि टेन्ट बांधून राहत असू, शिबिरातहि जे शाखेत होते तेच शिकवले जात असे, सकाळी ०५ वाजता उठावे लागत असे त्यात मानवीमनोरे , दंड चालवणे, संचालन अशा गोष्टी होत्या, शिबिरात एक दिवस अचानक २०-२५ च्या जमावाने हल्ला केला, कुठे कुठे आग लावली आम्हि सगळेच अचानक झालेल्या या हल्ल्याने बिथरलो होतो,काहि जण घाबरुन रडू लागले तेव्हा आम्हि ७ वित होतो, ४-५ हजार लोक असतील त्या शिबिरात आमचे शिक्षक लोक दंड घेऊन त्यांचाशी दोन हात करत होते, मी आणी माझा एक मित्र कुठून पळता येतेय का, हे पाहू लागलो पण थोड्याच वेळात अनाउन्स करण्यात आले की हे सर्व प्रिप्लान आहे, हा सरावासाठीचा एक भाग आहे,म्हणजे हे प्रात्यक्षिक होते, अचानक जर हल्ला झाला तर त्यास कसे सामोरे जायचे यासाठि होते ते... (हि ०६ डिसेंबर अगोदरची ट्रायल होती का ? असेहि वाटते) असे कळल्यावर जे जे घाबरले होते रडले होते त्यांना मग जाम पिडले आम्ही हहपुवा झाली त्यादिवशी.. महेंद्रशिक्षक आणी त्यांचे मोठे भाऊ रविंद्रशिक्षक याना आम्हि अनुक्रमे छोटेशिक्षक,मोठेशिक्षक असे म्हणत असू, महेंद्रशिक्षक सर्वांचा लाड करायचे आस्थेने अभ्यासा विषयी चौकशी करायचे,तर रविंद्रशिक्षक हे फार कडक होते ते फारसे बोलत नसत, काहि दिवसांनी महेंद्र शिक्षकांनी मला आमच्या गटाचे गट प्रमुखहि केले होते असे आम्हि शाखेत घडत होतो.. असेच एक दिवस महेंद्र शिक्षकांनी आपल्या स्वयंसेवकांना अयोध्येला मंदिर बांधायचे आहे असे सांगीतले पण हे मंदिर मस्जिद पाडून बांधण्यात येणार आहे हे सांगायचे टाळले, आम्हि सुध्दा जाण्याचा मानस व्यक्त केला पण तिथे फक्त निवडक स्वयंसेवकांना जायची अनुमती मिळालीए असे सांगीतले.नक्कि काय चाललेय इतका विचार करण्याचे ते वय न्हवते, फक्त आपल्या रामाचे मंदिर बांधायचे एवढेच काय ते समजत होते, आम्हाला फक्त त्यांची मदत म्हणून त्यांच्यासाठी शिधा उपलब्ध करुन द्यावा त्यात कोरडा शिधा तांदुळ वगैरे आणी भाकरी-चटणी जमल्यास पैसेहि द्यावे असे आदेश देण्यात आले होते, पैकी मि स्वतः १ कि.तांदूळ आणी रु.२० त्यावेळी दिले आहेत, अर्थात हे घरी माहित न्हवते, आणी तो दिवस म्हणजे ०६ डिसेंबर १९९२ उजाडला तो मस्जिदचा ढाचा पाडूनच, त्यानंतर उसळलेल्या दंगलीत किती निरपराध जीव गेले किती नुकसान झाले हे आता पुन्हा उजळणी करायला नको, ग्रुप मधला कुणिच यावर बोलायला तयार न्हवता आम्हाला अप्रत्यक्षरित्या नजर कैदेत घरिच बसावे लागत होते, मला तर बाबांसमोर जायची त्यांच्याशी नजर मिळवायलाहि लाज वाटू लागली होती पण ते यावर जास्त काहि बोलले नाहि फक्त मोठ्यांचं ऐकावं इतकच म्हणाले, त्यानंतर मैदानावर मुलांची संख्याहि रोडावली तसे महेंद्रशिक्षकहि यायचे बंद झाले, त्या दिवसा पासून आमची शाखा जी बंद झाली ती आजतागायत बंदच, या प्रकरणाची चौकशी केलेल्या लिबरहान आयोगाने स्पष्ट म्हणले आहे की यात आरएसएसचा 'हात' होता, म्हणायचे काय आम्हि स्वतः त्या पापात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहभागी झालो होतो. हा मनातला 'सल' अन संघाविषयी निर्माण झालेली मनातली कटूता कधिच पुसली जाणार नाहि कधिच नाहि, आजहि महेंद्रशिक्षक रस्त्यात भेटले तर त्यांना मी शिक्षक म्हणूनच हाक मारतो, आता ते हि शाखा सोडून संसाराला लागले आहेत, शाखेत एक धिरज नावाचे शिक्षक हि कविता फार छान म्हणायचे, जी मलाही फार आवडते मातृभुमी गान से गूंजता रहे गगन, स्नेहनील से सदा फुलते रहे चमन !! अवांतरः
@तिथे शिकवताना खचितच मुस्लिमांचा उल्लेख जनरलाईझ्ड वाईट तर्‍हेने केला जायचा @फक्त त्यांची एक अतिशय प्रामाणिक सचोटीची शिस्तबद्ध बाजूही आहे हे सांगायचे होते.
या ओळींशी सहमत आहे अती अवांतरः वरिल प्रतिसादात व्यक्त केलेले मुद्दे / काहि माहिती कुणाला ओळखीची असल्यास कृपया व्यनी द्वारे संपर्क साधावा एखादा जुना मित्र भेटू शकतो, असो प्रतिसाद बराच मोठा झाला आहे नेहमी प्रमाणेच पण हे सगळे बारिक तपशील आणी मुद्दे द्यावे लागले यासाठी की नाहितर इथे आमचे चाहते हित-चिंतक आहेतच आम्हाला द्वेष्टे समजून थयथयाट करायला. जाता जाता : मिपा वरिल नेहमी तेलात डोळे घालून असणार्‍या सन्माननीय 'पहारेकर्‍यांना' नम्र विनंती माझा हा प्रतिसाद स्कॅनर खाली घालून एकदा पहावा म्हणजे मी कुठून काय उचलले आहे ते शोधून निदान काहि वेळ तरी हसता येईल. हि प्रार्थना शेवटि व्हायची, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते.... ।। भारत माता की जय ।।

टाईमपासकरता आर एस एस कशाला पाजे राखी मल्लिका असे अनेक टोपिक हायती की

सर्व माहितीबद्दल धन्यवाद. उत्तम माहिती दिलीत. भारतावर प्रेम करणारी कोणतीही संस्था माझ्या आदरास पात्र असेल यात संशय नाही. संस्थांमध्ये खूप प्रकारचे लोक असतात. प्रत्येकाचा अजेंडा वेगळा असतो. म्हणून ती संस्थाच तशी असते असे नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे. दिग्गीराजा हे समतोल व्यक्ती आहेत हे मुस्लीम समाजात मान्य आहे. त्यावर इतका गदारोळ का हे समजले नाही. वर माझ्यावरही अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांचे खंडन कसे करावे हे मला समजत नाही. सर्व प्रश्नांना उत्तरे देणेही मला शक्य झाले नाही, या बद्दल क्षमस्व. मात्र मी प्रयत्न करेन. लव्ह जिहाद विषयी लिहिण्याचे मनात आहे. खुदाच्या कृपेने ते लवकरच होईल अशी आशा आहे.

In reply to by आंसमा शख्स

आपण माझ्या प्रश्नाची उत्तरे देने टाळले आहे ... तुम्हाला एका जाला वरील किन्वा कोनत्याही चर्चे मधे पाळायचे साधे नियम माहीत नाहि असे दिसते .. आपण चर्चा सुरु केलि तर त्या मधे लोकानी सह्भागी होउन दिलेल्या प्रतिसदाना उत्तर द्यावे .. एवढी सधी अक्कल तुम्हला नाही .. आणि दिग्गीराजा हे समतोल व्यक्ती आहेत हे मुस्लीम समाजात मान्य आहे एखादी व्यक्ती सम्तोल आहे कि नाहि हे विचारा वरुन ठरते ..एका विशिष्ठ समाजा च्या मान्यतेने नाही ..(हिन्दु असो वा मुस्लिम)

In reply to by आंसमा शख्स

लव्ह जिहाद विषयी लिहिण्याआधी त्याबद्दल तुमचे मत काय आहे ते कृपया त्या लेखात स्पष्ट करावे, पु.ले.शु.

अजातशत्रू यांचे वय ठाऊक नाही परंतु त्यांचा मोठ्ठा प्रतिसाद टाईम-वार्प (Time Warp) मध्ये घडला असल्याने तो मनावर घेऊ नये.

In reply to by नितिन थत्ते

गयी म्हैस पानी मै ! :) बाकि तुम्हि मनावर घेउन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद..!!

+१

+ १ कशासाठी ? कदाचित धागा कर्त्याला ए टी के टी बसू नये ह्या साठी ग्रेस देवून पुढे ढकलायचा प्रयत्न म्हणावा ?

अजातशत्रु ४८ साली गांधीहत्या झाली तेव्हापासून अयोध्या ९२ पर्यंत तूमी बाल होता आणि बापाची परवानगी घेत व्हता का ओ -- थत्तेकाका, हे आहेत आपटे काका

In reply to by नर्मदेतला गोटा

४८ साली गांधीहत्या झाली तेव्हापासून अयोध्या ९२ पर्यंत तूमी बाल होता आणि बापाची परवानगी घेत व्हता का ओ
अयोध्या ९२ ला आम्ही वडिलांची परवानगी घेण्या इतपत तरी बाल होतोच. त्या प्रतिसादात मी वाक्यरचना निट न केल्यामुळे सर्वांचा गोंधळ उडाला आहे ती माझी चुक मी मान्य करतो क्षमा असावी ते सुधारुन पुन्हा लिहीत आहे. पुर्व प्रकाशीत - आमचे परम पुज्य पिताश्री जाम कावले, कारण तेव्हा संघानेच कट रचून गांधी हत्या केली असा आरोप होता अन त्यामुळे त्यावर बंदि सुध्दा आली होती तिथे जाउन तू सुध्दा तेच करणार आहेस काय? (नथुराम गोडसे हा सुध्दा स्वयंसेवक होता,तिथल्या सभासदांना स्वयंसेवक म्हटले जाते,) त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर तेव्हा माझ्याकडे न्हवते आणी असते तरी मला ते देता आले नसते, सुधारीत - आमचे परम पुज्य पिताश्री जाम कावले, कारण पुर्वी संघानेच कट रचून गांधी हत्या केली असा आरोप होता अन त्यामुळे त्यावर त्यावेळी बंदि सुध्दा आली होती अशा संघटनेत जाऊन पुढे तू सुध्दा तेच करणार आहेस काय? म्हणजे पुढील काळात संघ देशातील इतर नेत्यांचे विचार पटले नाहीत तर असेच कट रचून खून पाडेल, असे बाबांना वाटत होते यामुळेच त्यांनी परवानगी नाकारली होती, (नथुराम गोडसे हा सुध्दा स्वयंसेवक होता,तिथल्या सभासदांना स्वयंसेवक म्हटले जाते,) त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर तेव्हा माझ्याकडे न्हवते आणी असते तरी मला ते देता आले नसते, नर्मदेतला गोटा/ आणि इतर आता बघा बरे, आता बरोबर आहे न.? यामुळे गांधी हत्येचा अन् माझा काही संबंध नाही, अवांतरः नर्मदेतला गोटा तुम्हाला तुमच्या 'बापाची' अशी कधी परवानगी घ्यावी लागली व्हती का, ओ ?

माझ्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक प्रखर देशभक्त व भ्रष्टाकारमुक्त संघटना आहे. कांहींशी जुनाट (आणि खूपशी बोजड) भाषा वापरल्यामुळे संघाला सवंग लोकप्रियता कधीच लाभली नाहीं. जिथे-जिथे नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तिथे-तिथे धोतराचा दुहेरी काच्या (ज्याला कानडीत 'गंडगच्ची=पुरुषी काच्या' म्हणतात) मारून ही मंडळी समाजसेवेला लागतात. मोरवी धरण फुटल्यावर, आंध्रप्रदेशात वादळी पुराने हाहाकार माजविल्यावर सरकारी यंत्रणा तिथे पोचायच्या आधी या संघटनेचे कार्यकर्ते तिथे पोचले होते. १९६५च्या युद्धात सैन्यामागे रसद पुरवायला व इतर non-combat operations मध्ये मदत करायलाही स्वयंसेवकांचे पथक दिवस-रात्र कार्यरत होते हे मी वाचलेले आहे. श्री रणजित चितळे याबद्दल जास्त तपशीलवार व नेमकी माहिती देऊ शकतील. कुठल्याही सत्तास्थानाबद्दल लोभ न धरता ही संघटना कार्य करते. माझ्या मते अशा खोडसाळ (वैयक्तिक मत) धाग्यांना "अनुल्लेखाने मारणे" हेच उत्तम! (हा माझा प्रतिसाद पहिला व शेवटचा)

In reply to by सुधीर काळे

माझ्या मते अशा खोडसाळ (वैयक्तिक मत) धाग्यांना "अनुल्लेखाने मारणे" हेच उत्तम! (हा माझा प्रतिसाद पहिला व शेवटचा) बरोबर आहे तुमचे म्हणणे. पण एव्हढे वाईट दर्जाचे लिखाण वाचून एखादी प्रतिक्रीया येणे अपरीहार्य आहे.

उदा. आज राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती राष्ट्रीय नेते???????? स्वतःच्या राज्यात कॉंग्रेसचे सरकार आणु शकत नाहीत आणि हे म्हणे राष्ट्रीय नेते. ह्यांची वक्तव्ये वाचून असे दिसते की ह्यांच्या मेंदुचा तोल ढळलेला आहे तरही ह्याना समतोल व्यक्ती म्हणणे म्हणजे मोठा विनोद आहे. युवा नेते राहुल गांधी ह्यांनी बिहारमधे (म्हणे) मोठी आघाडी घेतली होती प्रचारात. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर तोफ डागली होती त्या प्रचारा दरम्यान. सेकंडक्लासने मुंबई पर्यन्त प्रवास करायची नाटके केली. पण बिहारी जनतेने फक्त चार आमदार निवडुन देउन त्यांना जागा दाखविली.

संपादनाची सुवीधा येथे दिसत नाही. कृपया संपादक हा धागा काढून टाकतील काय? धन्यवाद!