Skip to main content

रावण

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 13/06/2011 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
१) रामायणातील लढाई संपवायची रावणाला इच्छा होती . त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता. पण एक प्रश्न पडल्यामुले समेट होऊ शकला नाही. माफी कुठल्या तोंडाने मागायची? २) रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे. कारण पुढच्या बाकावर रावण बसला की कोनालाच फळ्यावर लिहीलेले दिसायचे नाही ३)रावणाचे डोके दुखू लागले. त्याला डॉक्टरानी झेन्डू बाम दिला. थोड्यावेळाने रावण परत आला. डॉक्टर कोणते डोके दुखतेय तेच कळत नाहिय्ये . ४) कुठलीही गोष्ट रावणाला सांगितली की ती षटकर्णी आपोआपच व्हायची. ५) लहानपणी रावण कंटाळला की कान गोष्टी खेळायचा. ६) रावण आला की सलुनमधल्या सगळ्या खुर्च्या बीझी व्हायच्या. ७) रावन एकाच वेळेस टोटल बाल्ड , गझनी , लीओनार्दी काप्री , तेरेनाम ,अमिताभ बच्चन , रीवर्स स्विन्ग , क्र्यू कट , सोल्जर्स कट या सगळ्या हेअर स्टाईल्स वापरायचा. डिस्क्लेमर : हा धागा पूर्ण टाईमपास म्हणून काढलेला आहे. धाग्यात लिहीलेली मते ही लेखकाची असतील असेच नाही.

वाचने 21907
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by नरेशकुमार

त्या मंदोदरी रॉय मधे लोकांना काय दिसतं कुणास ठाऊक ? टमाट्याचा क्रॉससेक्शन कुठली ;) त्यापेक्ष्या त्या अबु हजामाची सुन पळवुन आणने वर्थ आहे ;) - टारेशा नोकिया

In reply to by टारझन

त्यापेक्ष्या त्या अबु हजामाची सुन पळवुन आणने वर्थ आहे
टार्‍याच्या कार्यास सुयश चिंततो व लागेल ती मदत देण्याचे कबुल करतो. लष्करे परोबा

In reply to by इरसाल

दोघानाही नउच आहेत की दहावे काय ईमर्जनसि म्हणुन राखुन ठेवले काय?

यापेक्ष्या त्या अबु हजामाची सुन पळवुन आणने वर्थ आहे अरेरे .काय हे अध्ध्ध्ध्ध्पत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्न्न्न्न्न्न्न कोण्या भल्या माणसाने कल्याणच्या सुभेदाराची सून साडी चोळी खण नारळ देवून पर्त पाठवलीहोती म्हणे. बहुतेक इथले मावळे पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करताहेत. तुम्ही लाख सुना पळवून आणाल .तुमचे थोरले आबासाहेब तुमच्यावर नजर ठेवून आहेत हे लक्ष्यात असू द्या.

In reply to by विजुभाऊ

कोण्या भल्या माणसाने कल्याणच्या सुभेदाराची सून साडी चोळी खण नारळ देवून पर्त पाठवलीहोती म्हणे.
कमॉन अं विजुभाउ ... आम्ही साडीचोळी अन खण नारळ देऊन परत नाही पाठवणार .. यापेक्षाही छाण छाण नजराणे देऊ :)

In reply to by टारझन

नजार्‍यांशिवाय नजराणे कुठले द्यायला तुमी (आमी)... तिथं व्हर्जिनल (बिर्जे) अडला होता जंगलात काटकर म्होरं, तुमची काय कथा महाराज.... भारी समर्थ

कमॉन अं विजुभाउ ... सून सायबा सून कुणाची ही सून तिलाच इच्यार की कुटं हुती म्हनून सून सून सून सून

>> मंदोदरीची ऐश होती हं पण Smile १०-१० व्हेरियेशन्स मग वटपौर्णिमेचं काय ?

In reply to by नर्मदेतला गोटा

** मंदोदरीला वटपौर्णिमेच्या दिवशी फेर्‍या मारुन चकरा यायच्या..... ** अंगाईगीत गाताना रावणाच्या आईसोबत ९ दासी आजुबाजुला बसुन रावणाचे डोके मांडीवर ठेउन थोपटत असत.... ** रे-बॅन कंपनीने रावणासाठी गॉगल बनवण्याकरिता वर्ल्ड बँकेकडुन कर्ज घेतल्याचे ऐकिवात आहे..... ** रावणाला वाईड बॉल टाकण्याचे रेकॉर्ड श्रीसंतच्या नावावर आहे.....

रावणाच्या खेळायच्या पत्त्यामधे १० जोकर होते, आणी प्रतेक जोकराला १० तोंड होती.

@ रावणाच्या मोबाईल ला दहा ब्ल्यू टूथ होते @ दात घासताना रावणाला दहा ब्रश काठीला प्यारलल बांधावे लागायचे. @रावणाचा भांग पाडताना दहा मिनी ड्राफ्टर प्यारलल काम करायचे @ रावण शाळेत शीर्शासन कधीच पडायचा नाही @ रावणाला त्याच्या सरानी "डोक्यावर पडलास का?" असे कधीच विचारले नाही. @ रावणाला परीक्षा हॉल मध्ये एकटाच बसवायचे. तो एकाच वेळेस प्रत्येक प्रश्नाचा स्वतंत्र विचार करु शकायचा

In reply to by विजुभाऊ

अरे वा... इजुभाऊ परत एकदा रावण रावण खेळायला लागले वाट्ट ! मागच्या जन्मी तुमच्या जिगरी दोस्त होता वाट्ट ! ;) असो... आता सगळे इतके रावणावर प्रेम दाखवत आहेत,तर मी म्हणतो... मागे कशाला रहावे ? जरासा चावटपणा करुन घेतोच ! ;) रावणाला दहा डोकी आणि २० डोळे असले; तरी सुंदर स्त्रीया पाहिल्यावर त्याच्या एका *जागी फार ताण यायचा ! ;) (*हॄदयावर... आले लगेच सगळे इथे काय लिहलं आहे ते वाचायला !)

१)रावणाने ग्राहक मंचात जावुन नये म्हणून जिलेट ने प्रेस्टो ची जहिरात बदलली. अगोदर ती एक ब्लेड करे काम दस दिन. अशी होती. ती बदलून जिलेट ने नंतर ती एक ब्लेड दस शेव अशी केली. २)रावण विमानात बसल्यावर दहाही सीट्स ऑक्युपाय व्हायच्या. दहा ही तोंडाना खिडकीला नाक लावून बसण्यासाठी मारामारी करावी लागायची. ३)रावण डोके दुखू लागले की अ‍ॅनासीन ची अख्खी स्ट्रीप संपवायचा. ४)रावणाला स्पॉन्ड्युलायटीस झाला होता. ५)तो स्टाफ पैकी कोणालाच डोक्यावर चढवून ठेवायचा नाही. ६)रावणाला हिन्दी फिल्म मध्ये इर्शाद हशमी सारखा रोल हवा होता. चुंबन दृष्यातच सगळी फिल्म सम्पायची म्हणून रोल मिळाला नाही

मिसळ्पाव .कॉम तर्फे रावणाला मरणोत्तर भारतरत्न देण्याची शिफारस संपादक मंड्ळाने सरकारकडे करावी अशी विनंती करतो.

रावणामधे मध्यप्रदेशच्या दहा मंत्र्यांकडून एका झटक्यात राजीनामा घ्यायची क्षमता होती.

रावण लंकेचा नागरीक होता. त्याला भारतरत्न कसे देणार? फार तर निशान ए पाकिस्तान देता येईल. ते इतर देशांच्या नागरीकाना देता येते.

अरे वा... इजुभाऊ परत एकदा रावण रावण खेळायला लागले वाट्ट ! मागच्या जन्मी तुमच्या जिगरी दोस्त होता वाट्ट ! smiley असो... [बाकी १९९० चं भारतरत्न अ-भारतीय डॉ. नेल्सन मंडेलांना दिलं होतं, तेंव्हा लंका-रहिवासी रावणालाही चान्स आहे ;-)]

श्रीलंकेच्या संस्कृतीत रावणाचे स्थान काय असेल? देव की दानव? की त्यांना माहितीच नसेल की भारतात एक व्हिलन लंकेतला म्हणून इतकी वर्ष ओळखला जातोय!!! :-)

नशीब रावण स्त्री नव्हता ...नाहीतर किलकिलाटाने बिच्चार्‍या मंदोदरीचा जीव गेला असता =))

In reply to by प्रसाद गोडबोले

आता तो रावण जर स्त्री असता तर मंदोदरी कशाला आली असती त्याच्या आयुष्यात. आणि समजा आलीच असती तर तिला दहा तोंडांच्या आपल्या या मैतरणीची कंपनीच नसती का मिळाली!!

आजचा सवाल वर निखिल वागळे बरोबर रावण एकटाच(?) बोलायचा. नि तरी निखिल त्याला 'मी तुमच्याकडं नक्की परत येतो आत्ता मला ट्राय च्या नियमानुसार कम्पल्सरी ब्रेक घ्यावा लागणार आहे ब्रेकपूर्वी प्रश्न पहा असं म्हणायचा.... ;)

रावानाबद्दाल हे असल लिहिलेल थिक अहे. पन ब्रह्म देवन बद्दल ? हिन्दु धर्मा बद्दल साध्या साध्या गोश्ति माहित नसनअरे मुसल्मान , ख्रिस्चान का होत नहित ? सरवस्ती त्यान्चि मानस पुत्रि होति. त्यान्च्या पत्निचा नाव सवित्रि. मूर्खा मुलिशि कोनि लग्न कर्त का?

म्हैस काका/ताई मौशी ब्रम्हदेवाच्या या गुणापायीच त्याचे कोठे मंदीर बांधत नाहीत. (अपवाद:पुश्कर) त्याला बेटीचो* असेही म्हंटले जाते. हिंदु धर्माबद्दल एवढ्या साध्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील असे वाटते

विजुभाऊ ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्यांची पूजा करत नाही ह्या मागे वेगळी गोस्त आहे. त्याचा कारण सरस्वतीशी लग्न हे नाहीये. ब्रह्मदेव , गाय आणि केतकी ची फुले अश्या तिघांना ह्या गोष्टीत शाप मिळालाय. आणि विष्णूंना आशीर्वाद मिळाला कि तुम्ही प्रत्येक अवतारात पूजनीय असाल. सांगा बारा हि कोणती गोष्ट आहे.? माहित आहे न तुम्हाला बेसिक गोष्टी.