✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रावण

व
विजुभाऊ यांनी
Mon, 06/13/2011 - 23:45  ·  लेख
लेख
१) रामायणातील लढाई संपवायची रावणाला इच्छा होती . त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता. पण एक प्रश्न पडल्यामुले समेट होऊ शकला नाही. माफी कुठल्या तोंडाने मागायची? २) रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे. कारण पुढच्या बाकावर रावण बसला की कोनालाच फळ्यावर लिहीलेले दिसायचे नाही ३)रावणाचे डोके दुखू लागले. त्याला डॉक्टरानी झेन्डू बाम दिला. थोड्यावेळाने रावण परत आला. डॉक्टर कोणते डोके दुखतेय तेच कळत नाहिय्ये . ४) कुठलीही गोष्ट रावणाला सांगितली की ती षटकर्णी आपोआपच व्हायची. ५) लहानपणी रावण कंटाळला की कान गोष्टी खेळायचा. ६) रावण आला की सलुनमधल्या सगळ्या खुर्च्या बीझी व्हायच्या. ७) रावन एकाच वेळेस टोटल बाल्ड , गझनी , लीओनार्दी काप्री , तेरेनाम ,अमिताभ बच्चन , रीवर्स स्विन्ग , क्र्यू कट , सोल्जर्स कट या सगळ्या हेअर स्टाईल्स वापरायचा. डिस्क्लेमर : हा धागा पूर्ण टाईमपास म्हणून काढलेला आहे. धाग्यात लिहीलेली मते ही लेखकाची असतील असेच नाही.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21568 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

एकदम चान चान... डिस्क्लेमर:

शेखर
Tue, 06/14/2011 - 00:50 नवीन
एकदम चान चान... डिस्क्लेमर: हा प्रतिसाद पूर्ण टाईमपास म्हणून दिलेला आहे. प्रतिसादात लिहीलेली मते ही प्रतिसादकाची असतील असेच नाही.
  • Log in or register to post comments

इतकचं नाही..

वाटाड्या...
Tue, 06/14/2011 - 02:17 नवीन
तर रावण १०-१० टोप्यापण घालायचा.....अदलुन बदलुन ..:) शिवाय एकाच वेळेला १० प्रकारच्या दारु आणि मुखशुद्धी पावडरी पण खायचा !! :)) लहानपणी म्हणे रावणाच्या आईला त्याच्या नक्की कुठल्या तोंडात भडकावुन द्यायची हा प्रश्न असायचा... शिवाय रावण ज्या गल्लीत जायचा त्या गल्लीतील ट्रॅफिक दुसरीकडे वळवायला लागायची म्हणुन त्याला कोणीच बाहेर न्यायचे नाहीत. - वानर वाट्या...
  • Log in or register to post comments

"रावणाला दहा तोंडांएवजी दहा

शैलेन्द्र
Tue, 06/14/2011 - 10:18 नवीन
"रावणाला दहा तोंडांएवजी दहा पार्श्वभाग असते तर?" त्याला कमोडऐवजी बाथटब वापरायला लागला असता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

शैलेन्द्र

चिंतामणी
Tue, 06/14/2011 - 11:37 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

त्रिवार वंदन...

सोत्रि
Wed, 06/15/2011 - 12:20 नवीन
__/\__ __/\__ __/\__ म्हणजे गोगोल ह्यांचा प्रतिसाद खंग्री, आणि त्या प्रतिसादावरचा हा प्रतिसाद महाखंग्री :) - (एक् मुखी आणि एक XX) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

(विचार करन्याची अजिब्बत इच्छा

नरेशकुमार
Tue, 06/14/2011 - 05:25 नवीन
(विचार करन्याची अजिब्बत इच्छा नसतानाही बळजबरी) विचार करायला लावनारी पोस्ट. . . . मला वाटले की रा-वन बद्द्ल काही असेल. पन पदरी सॉरी खिशात निराशा पडली. . . . बरं ते जाउंदे, रावन अल्प्संख्यांक होता का ?
  • Log in or register to post comments

रावण

राजेश घासकडवी
Tue, 06/14/2011 - 07:07 नवीन
लोक एका डोळ्याने तिरळे असतात, रावण अठरा डोळ्यांनी तिरळा होता. कुठच्याही साध्या म्युझिकसिस्टिमवर गाणं लावलं तरी रावणाला ते डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड ऐकू यायचं. रावणाच्या क्रिकेटच्या टीमचं हडल खूपच मोठ्ठं व्हायचं. रावण टाइमपास हिंदी सिनेमे बघत नसे, कारण डोकं बाजूला ठेवणं म्हणजे त्याच्या दृष्टीने खूप कटकट होती. रावणाने गांधीवादाचा प्रयत्न सोडून दिला कारण एका गालावर थोबाडीत मारली दर त्याला एकोणीस गाल पुढे करायला लागत.
  • Log in or register to post comments

खपलो !

धर्मराजमुटके
Sat, 08/17/2013 - 16:35 नवीन
खपलो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

रावण कधीच कुशीवर झोपू शकायचा

श्रीरंग
Tue, 06/14/2011 - 08:00 नवीन
रावण कधीच कुशीवर झोपू शकायचा नाही. :( रावणाला कधीच टी शर्ट घालता आला नाही. :(
  • Log in or register to post comments

पायातुन घालायचा तो ...

शैलेन्द्र
Tue, 06/14/2011 - 10:01 नवीन
पायातुन घालायचा तो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

मंदोदरीने रावणाला "ए.ऐक ना.एक

विजुभाऊ
Mon, 07/25/2011 - 15:05 नवीन
मंदोदरीने रावणाला "ए.ऐक ना.एक माणूस की नाही बाब्बा होण्णार आहे" असे कोणत्या कानात सांगितले असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

मोस्ट प्रोबॅबली, उजवीकडुन /

वपाडाव
Mon, 07/25/2011 - 18:40 नवीन
मोस्ट प्रोबॅबली, उजवीकडुन / डावीकडुन विसाव्या कानाला !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मंदोदरीचा मनस्ताप..

योगप्रभू
Tue, 06/14/2011 - 09:09 नवीन
रावण महालात आला, की मंदोदरीला नसता ताप व्हायचा. एकतर त्याच्या दहाही तोंडांना घाण वास यायचा. बोलताना दहाही तोंडातून थुंकी उडायची. दहा तोंडांची बडबड असह्य व्हायची रावण लाडात आला, की 'दहाचा पाढा' कधी संपतो, असे तिला वाटायचे. चार तोंडे असलेल्या ब्रह्मदेवांची पत्नी सरस्वती कशी आनंदात वीणा वाजवत बसलेली असते, याचे मंदोदरीला नेहमी कुतुहल वाटे. एकदा तिने तसे विचारलेसुद्धा. त्यावर सरस्वती म्हणाली, 'अगं आमच्या यांना पुस्तक वाचायचा नाद आहे. जेव्हा बघावं तेव्हा कसली तरी जडजड पुस्तकं वाचत बसतात. चांगलं आहे ते. मला कटकट नाही. म्हणून तर वीणावादनाचा छंद जोपासता आला.'
  • Log in or register to post comments

ब्रह्मदेवांची पत्नी सरस्वती

टारझन
Tue, 06/14/2011 - 10:09 नवीन
ब्रह्मदेवांची पत्नी सरस्वती कशी आनंदात वीणा वाजवत बसलेली असते
ब्रम्हा हे सोलो सेक्शुअल(चुभुद्याघ्या) असुन सेल्फ रीप्रोडक्टिव्ह होते . त्यातुन त्यांनी विष्वाची निर्मीती केली शिवाय सरस्वती ची ही केली . त्यामुळे सरवस्ती त्यांचं कन्यारत्न होतं . अधिक प्रकाश जाणकार टाकतील .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

दोन्ही होती. नंतर ब्रह्माने

मृत्युन्जय
Tue, 06/14/2011 - 10:27 नवीन
दोन्ही होती. नंतर ब्रह्माने सरस्वतीशी लग्न केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

क्कांय ??

सूड
Tue, 06/14/2011 - 16:50 नवीन
क्कांय ?? जरा बैजवार सांगता काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

पण एकदा बिनबाईचं सगळं जमतय

JAGOMOHANPYARE
Tue, 06/14/2011 - 16:52 नवीन
पण एकदा बिनबाईचं सगळं जमतय म्हटल्यावर पुन्हा लग्नाला बाई कशाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

=)) =)) =)) लै भारी!

Nile
Sun, 06/19/2011 - 00:09 नवीन
=)) =)) =)) लै भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

चारही दिशाना तोंडे होती

विजुभाऊ
Tue, 06/14/2011 - 15:38 नवीन
चारही दिशाना तोंडे होती म्हनून ब्रम्हदेवाला राग आला म्हणून तोंड फिरवुन बसता यायचे नाही. शंका : ब्रम्हदेव झोपत कसा असेल. सरळ /उजव्या डाव्या कुशीवर की पालथा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

वाहव्वा

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/14/2011 - 09:29 नवीन
१)रावणासाठी कोणत्याच कंपनीला हेड फोन विकसित करता आला नाही. २)तसेच रावणाला लहानपणी मऊ-मास-भात भरवायला १०आया लागायच्या. ३)एकदा एनाकोंडानी रावणाला गिळायचा प्रयत्न केला,पण तोच मुंडक्यावर पडला. ४)शिवाय रावणानी ब्रम्हदेवाकडे,अनेक ईतर कारणास्तव शरिराचे अवयवही वाढवुन मागितले होते,पण त्याचा चालु पसारा पाहुन ब्रम्हदेवाने ही मागणी फेटाळली....
  • Log in or register to post comments

अजुन एक,

शानबा५१२
Tue, 06/14/2011 - 09:58 नवीन
रावण एका तोडांने पान खायचा व सर्व तोंडे लाल व्ह्यायची.करण ती ईंटरकनेक्टेड होती अशी माहीती एका गाईडने सांगितली होती.
  • Log in or register to post comments

डिस्क्लेमर :

गेंडा
Tue, 06/14/2011 - 09:58 नवीन
छाण छाण. मग लिहीलेच कशाला??
  • Log in or register to post comments

रावण दहा सिगारेटचे एक पाकिट

अभिज्ञ
Tue, 06/14/2011 - 10:19 नवीन
रावण दहा सिगारेटचे एक पाकिट एकदम संपवत असे. रावण सलून मध्ये गेला कि न्हाव्याला त्याचे काम दिवसभर पुरत असे. एका डेंटिस्टने तर रावणाला सिरॅमिकच्या कवळ्या बसवून एका दिवसात नवीन "रिट्झ" घेतल्याचे ऐकिवात आहे. :) आणि सर्वात महत्वाचे रावण हा "पायाळु" होता. ;) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

रावण हा "पायाळु"

मृत्युन्जय
Tue, 06/14/2011 - 10:30 नवीन
रावण हा "पायाळु" होता. _/\__/\__/\__/\__/\_
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Tue, 06/14/2011 - 10:45 नवीन
५) लहानपणी रावण कंटाळला की कान गोष्टी खेळायचा. - हे खास आवडले अमोल
  • Log in or register to post comments

रावनाने मिपावर सदस्यत्व

नरेशकुमार
Tue, 06/14/2011 - 11:09 नवीन
रावनाने मिपावर सदस्यत्व घेतले, त्याने एक लेख लिव्हला आनि त्यानेच खंडीभर प्रतिक्रियांचा पाउस पाडला. . . रावनाला १० नाही तर १०० तोंडे होती. असे ऐकुन आहे. कोनि खुलासा करेल काय ?
  • Log in or register to post comments

बकवास धागा.......... टाईमपास

मनराव
Tue, 06/14/2011 - 11:13 नवीन
बकवास धागा.......... टाईमपास साठी दुसरे कितीतरी विषय आहेत एवढेच म्हणेण.......
  • Log in or register to post comments

मग

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 06/14/2011 - 11:36 नवीन
सुचवा की राव!! नाहीतर याची मजा घ्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

पास पोर्ट फोटो

शाहिर
Tue, 06/14/2011 - 12:14 नवीन
रावणाचा पास पोर्ट साइज फोटो म्हणजे लेण्डस्केप असायचा
  • Log in or register to post comments

तुम्हाला पॅनारोमा असे म्हणायचे आहे आहे का?

महेश_कुलकर्णी
Tue, 06/14/2011 - 15:14 नवीन
तुम्हाला पॅनारोमा असे म्हणायचे आहे आहे का? महेश कुलकर्णी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

एस्क्युज मी ! मंदोदरी

सुहास..
Tue, 06/14/2011 - 12:31 नवीन
एस्क्युज मी ! मंदोदरी कपाळावर दहा कूंकवाचे ठिपके लावीत होती का ?
  • Log in or register to post comments

मंदोदरी कपाळावर दहा कूंकवाचे

मृत्युन्जय
Tue, 06/14/2011 - 12:44 नवीन
मंदोदरी कपाळावर दहा कूंकवाचे ठिपके लावीत होती का कुंकवाचा धनी एकच होता की राव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मला वाटत पांचाली ( द्रोपदी )

खबो जाप
Mon, 08/12/2013 - 12:51 नवीन
मला वाटत पांचाली ( द्रोपदी ) लावायची ५ पांडवांसाठी ५ कूंकवाचे ठिपके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

लॉजिकल कन्क्लुजन

प्रसाद गोडबोले
Wed, 08/14/2013 - 18:01 नवीन
म्हणजे कपाळावर लावण्यात येणारे कुंकवाचे ठिपके हे शिरगणतीवर अवलंबुन नसावे ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

.

नर्मदेतला गोटा
Tue, 06/14/2011 - 13:32 नवीन
एवढा अभिषेक केला तरी रावण फ्लॉप का झाला आता गप्प का ?
  • Log in or register to post comments

रावण जन्माच्या आघी

जय - गणेश
Tue, 06/14/2011 - 13:43 नवीन
रावण जन्माच्या आघी त्या च्या घरी, अली बाबा आणी चाळीस चोर हा चित्रपट ब्ररे झाला लावला नाही.
  • Log in or register to post comments

समूह गीत

शाहिर
Tue, 06/14/2011 - 14:18 नवीन
रावण एकटाच समूह गीत म्हणायचा
  • Log in or register to post comments

व्वा व्वा...वाहव्वा

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/14/2011 - 15:18 नवीन
ग्रेट ग्रेट ग्रेट...शाहिर...लगे रहो...मुळ पद गाताना उरलेली ९तोंड दुसय्रांना धरुन ठेवावी लागत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

कसं काय? तोंडं १० असली तरी

JAGOMOHANPYARE
Tue, 06/14/2011 - 16:55 नवीन
कसं काय? तोंडं १० असली तरी गळा आणि स्वरयंत्र एकच होते ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

मस्त. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/15/2011 - 13:43 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

रावण औट झाला की त्याची

विजुभाऊ
Tue, 06/14/2011 - 14:30 नवीन
रावण औट झाला की त्याची क्रीकेट ची व्हायची. त्याची विकेट घेणाराला एका डावात संपुर्ण संघ गारद केल्याचे समाधान मिळायचे रावण विकेट किपिंग करायचा तेंव्हा ३ स्लीप दोन गली आणि चार लेग स्लीप ही ठरलेली फिल्ड अ‍ॅरेन्जमेन्ट असायची .
  • Log in or register to post comments

१. रावण एकटाच लंकन आयडॉल

५० फक्त
Tue, 06/14/2011 - 15:17 नवीन
१. रावण एकटाच लंकन आयडॉल मध्ये भाग घ्यायचा आणि महाफायनलचा महाविजेता व्हायचा. २. होळीला रावण एकटाच दहा वेगवेगळ्या स्टाईल्नं बोंबलायचा.
  • Log in or register to post comments

रावणामुळे दशमान पद्धतीचा वापर

विजुभाऊ
Tue, 06/14/2011 - 15:32 नवीन
रावणामुळे दशमान पद्धतीचा वापर वाढला.( तो केळी सुद्धा डझना ऐवजी दहाच घ्यायचा )
  • Log in or register to post comments

म्हणुनच

अनिरुद्ध प
Mon, 08/12/2013 - 12:35 नवीन
बहुतेक कौरवान्पासुन पुढे शतमान पद्ध्तिचा वापर वाढला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

रावणाच्या लग्नात मंदोदरीच्या

विजुभाऊ
Tue, 06/14/2011 - 15:33 नवीन
रावणाच्या लग्नात मंदोदरीच्या वडिलानी २० हारांची ऑर्डर नोंदवली होती.
  • Log in or register to post comments

हारांची ऑर्डर नोंदवली

टारझन
Tue, 06/14/2011 - 16:05 नवीन
हारांची ऑर्डर नोंदवली होती.
दिल हारा रे ... दिल हारा रे ओ दिल हारा रे दिल हारा .. दिल हारा रे ... दिल हारा रे ओ दिल हारा रे दिल हारा .. दिल हारा रे ... दिल हारा रे ओ दिल हारा रे दिल हारा .. दिल हारा रे ... दिल हारा रे ओ दिल हारा रे दिल हारा .. - दिलहारा फर्नांडो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

दोनच हार पुरे

स्मिता.
Tue, 06/14/2011 - 22:27 नवीन
२० हारांची काय बरं गरज? रावणाला १० डोकी असली तर मान एकच होती ना :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

१० मेंदू

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 06/14/2011 - 16:22 नवीन
रावणाला १० मेंदू होते कां? असतील तर प्रत्येक मेंदू स्वतंत्र होता कां? स्वतंत्र असतील तर त्यात समन्वय कसा होत असेल? त्याचे सगळे मेंदू एकदम काम करत असतील कां? विचार करतांना नक्की कोणता मेंदू वापरायचा हे ठरविण्यात त्याचा किती वेळ जात असेल?
  • Log in or register to post comments

अरे वा

आनंदयात्री
Tue, 06/14/2011 - 19:52 नवीन
अरे वा .. म्हणजे रावणाला पॅरॅलल कॉम्प्युटिंगचा जनक म्हणता येईल. बरे झाले अजुन एका पेटंटसाठी आता भांडता येईल. कॉलिंग सर्किट, कॉलिंग सर्किट ! !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

मल्टी कोअर प्रोसेसर ची आयडीया

खटपट्या
Sat, 08/17/2013 - 03:28 नवीन
मल्टी कोअर प्रोसेसर ची आयडीया रावणापासुन घेतल्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा