Skip to main content

केस सरळ करावे की नाही?

लेखक रमणरमा यांनी बुधवार, 24/11/2010 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
हेअर स्ट्रीटनिंग हा कुरल्या केसाना सरळ करण्याचा उपाय किती परिणामकारक असतो.. त्याने काही दुष्परिणाम होतात का..मी नेटवर बरीच माहिती वाचली पण मन द्विधा अवस्थेत आहे.. कुरल्या केसांचा जाम वैताग आला आहे आणि आता काहीतरी वेगळे करायचे आहे केसांचे.. सरळ करणे हा उपाय सुचवायचा नसल्यास कुरल्या केसांची काळजी कशी घ्यावी ते सुचवा. आपल्यापैकी कुणी केले असल्यास तुमचे अनुभव पण सांगा.

वाचने 21628
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

देवाने जे न्याचरलि दिलय ...त्यात कहितरि तथ्य असावे ... माझे स्वत:चे केस बिल्डिन्गच्या प्लानच्या काग्दान सारखे आहेत. कितिदहि सरळ केले तरि त्यान्चि आपलि सुरळी होतेच. त्यामुळे वैताग आला कि मी हेअर श्टाइल बदलतो... :)