Skip to main content

दिवाळी अंक २०२३ - माहेरच्या वाटेवरून... - सुनील दौलत खोडके

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

सखे... तू माहेरच्या वाटेवरून जात असताना तुझ्या मनाच्या फुलदाणीत फुलारल्यात माहेरच्या कित्येक आठवणी अन् तू अनुभवली सुखाची शिरशिरी. रानाच्या रानवाटेवरील गाठाळलेल्या चिंचेच्या झाडाची तू अंगावर पांघरूण घेतलेली गारगर्द सावली. नितळशार पाण्यात स्व:चं न्याहळलेलं सावळं प्रतिबिंब. उन सावलीचा मनमोहक खेळ. शेवाळल्या गवताळ...

दिवाळी अंक २०२३ - सहा ऋतूंचे सहा सोहळे

लेखक मी-दिपाली यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली मेघावली नभी पुनरपि आली... पुनरपि म्हणजे कितवी वेळ असेल ही? अनादि, अनंत काळाचा एक छोटासा अंश असेल ती! तरीही त्या प्रत्येक वेळी सृष्टी ज्या स्थित्यंतरातून गेली असेल, ते स्थित्यंतर म्हणजे ऋतू! ‛दिवसामागुनी दिवस चालले, ऋतूमागुनी ऋतू..’ गदिमांनी लिहिलेल्या या गीताला स्वरसाज चढवताना बाबूजींनी मोठी...

दिवाळी अंक २०२३ - नितांत सुंदर 'फेवा लेक' आणि परिसर - पोखरा, नेपाळ

लेखक टर्मीनेटर यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

काळ बदलला तसे पर्यटनाचे स्वरूपही बदलले. 'ज्ञानार्जन, हवापालट, देवदर्शनासाठी धार्मिक स्थळांना दिल्या जाणाऱ्या भेटी किंवा विविध भौगोलिक प्रदेशांतील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केलेला प्रवास' अशी काही दशकांपूर्वीपर्यंत असलेली पर्यटनाची साधी सरळ व्याख्या आता कालबाह्य झाली असून रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीपासून दूर...

दिवाळी अंक २०२३ - गोष्ट एका मोहम्मदवाडीची

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

गोष्ट एका मोहम्मदवाडीची शारदीय नवरात्रातील एक पहाट. चहाचा कप घेऊन गच्चीवर बसलो होतो. अंधार होता, पण शेजारील विठ्ठल मंदिराला जाग आली होती.. कुणी गावगंधर्व आपली भाव, भक्ती पणाला लावून गदिमा रचित, संत गोरा कुंभार चित्रपटातील प्रसाद सावकार यांचे अजरामर गीत गात होता. 'ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला थवा वैष्णवांचा दारी...

दिवाळी अंक २०२३ - एक अनाकलनीय कळ मनात उठते आहे

लेखक संतोष तादंळे यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

एक अनाकलनीय कळ मनात उठते आहे स्वतःशी बोलायचीही भीती वाटते आहे कोणते चांदणे हरवले या आकाशाचे निळ्या डोळ्यातले आकाश फाटते आहे माझ्या तुझ्यात नवीन काहीच नव्हते हे कोणते अंतर नव्याने भेटते आहे कालपर्यंत धो धो कोसळले होते सर्वत्र आज हे पाणी डोळ्यात का साठते आहे धनदांडग्यांनी लुटले म्हणून निराश नाही गरीबीला गरिबी का लुटते...

दिवाळी अंक २०२३ - कोणी कुणाला किती आवडावे

लेखक चांदणे संदीप यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

कोणी कुणाला किती आवडावे काही तुला अन् मलाही न ठावे करून बहाणे, दोघे धडपडतो कशाही निमित्ताने बोलू बघतो दिवसा मोरपिशी मौजा लुटाव्या रात्रीने पुन्हा विरह घेऊन यावे घराच्या बाहेर दारापुढे जराशी तुझ्या उतावीळ येरझारा मघाशी पाहून, हलके हाक देशील, वाटे पुन्हा तू नेहमीचे संकोचून जावे मग कधी तू व्यस्त होऊन जाते इथे अवघे माझे...

दिवाळी अंक २०२३ - कोकण भटकंती

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

प्रथमतः सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! नमस्कार मंडळी 'भटकंती' ही या वर्षी मिपा दिवाळी अंकाची थीम असणार, हे वाचले आणि लगेच लेख टंकायला घेतला. दर वर्षी सहसा माझी कोकणात फेरी होतेच. दर वेळेस मी एका अनामिक ओढीने कोकणात जातो आणि काहीतरी नवेच गवसते. बऱ्याचदा ही फेरी कुलदैवताला जाण्याच्या निमित्ताने होते....

दिवाळी अंक २०२३ - काकणं

लेखक उमेश तुपे यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

आभाळ भरून आलं होतं. सूर्य क्षितिजावर टेकला होता. तांबूस रंगाची पुसटशी छटा अजूनही सूर्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. वाऱ्याचा वेग हळूहळू कमी झाला, तशी झाडांची सळसळ थांबली. एकाकी अंधारून आलं. पाखरं चिडीचूप झाली. परतीच्या वाटेवर असलेली जनावरं पांदीने नदीत उतरली. तोच एक वीज स्मशानातल्या पिंपळामागे लख्खपणे कडाडली....

दिवाळी अंक २०२३ - माझे मित्र

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपाच्या प्रवास विशेषांकानिमित्त मी 'घर ते हापिस बसचा स्टॉप या माझ्या प्रवासादरम्यान मला भेटलेल्या वल्लींची तुम्हाला ओळख करून देणार आहे. रोज साधारण सकाळी पावणेसात ते सातच्या दरम्यान मी हापिसात जाण्याकरता घर सोडतो. या वेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. त्यामुळे रोज दिसणारे चेहरे आता ओळखीचे झाले आहेत. त्यातल्या बऱ्याच...

दिवाळी अंक २०२३ - संपादकीय

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मिपाकर सुजनहो! यंदाचा प्रवास/पर्यटन/भटकंती ह्या विषयास वाहिलेला मिसळपाव दिवाळी अंक २०२३ सर्व रसिक वाचकांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद होत आहे. पिढ्या बदलल्या, वाचकांच्या अभिरूचीला नवे धुमारे फुटले, नवनवीन तंत्रज्ञान आणि माध्यमांचा विळखा पडला तरीही मराठी माणसाच्या मनात दिवाळी अंकाचे स्थान अबाधित आहे. वृत्तपत्र ,...