राशिभविष्य

या वर्षी मिपाच्या दिवाळी अंकात काही नवी भर घालावी असा विचार बरेच दिवस करत होतो.जे इतर दिवाळी अंकात नसेल असे ते मिपाच्या दिवाळी अंकात असावे असे नेहेमी वाटते. हाच विचार पुढे नेत या निष्कर्षावर पोहचलो की दृकश्राव्य स्वरुपात जर काही करता आले तर ते करावे. एका संध्याकाळी किसनरावांचा फोन आला " काका,अरुण म्हात्र्यांच्या काही कविता ध्वनीमुद्रीत करून द्याला का ? " मी अरुणला विचारलं त्यानी पण होकार दिला. चिन्मय मांडलेकरच्या मुलाखतीची तयारी केली .

ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे होस्टेज रेस्क्यू

. .  ******************************************************************* ही कथा आहे अपहरण झालेल्या एका विमानाची.. दोनशे छप्पन्न प्रवाशांची.. बारा विमान कर्मचार्‍यांची.. दहा दहशतवाद्यांची.. दोनशे ऐंशी इस्रायली जवानांची.. हजारो युगांडन सैनीकांची.. जगातल्या प्रत्येक देशाची, त्यांच्या पंतप्रधानांची, त्यांच्या प्रजेची..

'ट्वेल्व्ह अँग्री मेन' आणि ’मॅनेजरियल ग्रिड’ .....

. . 'ट्वेल्व्ह अँग्री मेन' हा चित्रपट आजवर इतक्या वेळा बघून झालाय की आता किती वेळा पाहिलाय हेसुद्धा आठवत नाही. त्यानंतर कधीतरी एक-दोन वेळा 'एक रुका हुआ फैसला'सुद्धा पाहून झाला. आवडलासुद्धा.... पण का कोण जाणे, हिंदी आवृत्ती तितकीशी भावली नव्हती. परवा एक सन्मित्र श्री. अतुल ठाकुर यांची फेसबुकवरील या संदर्भातील पोस्ट वाचली.

तू नि मी

. . तू समईतील मंद ज्योत, मी सभोवतीचा फडफड वारा अविरत तू तेजस्वी तेवता श्रान्त उभा मी मिणमिणणारा बाभळीतला काटा मी अन काट्यातील तू ग़ुल गोजिरा वळवळतो मी सुरवंटासम पतंग दंग तू भिरभिरणारा नवी पालवी तू वासंतिक सुकून अंति मी ओघळणारा धूर कोंडता मी वणव्याचा तू गंध मृदेचा दरवळणारा लपाछपीची तू श्रावणसर मी आषाढी कोसळणारा ग्रीष्म तप्त मी तहानलेला वर्षेतील तू हिरवपसारा लाटेसम मी उसळी घेतो स्थिरावता तू शांत

प्रत्यक्षात आलेले स्वप्न!!

. . गेल्या वर्षी १५ किंवा १६ फेब्रुवारीला वर्धनचा फोन आला. आवाजात अधीरता ओसंडून जात होती. ”आत्या, स्काईपवर ये ना. तुला एक न्यूज द्यायचीय.” गेला महिनाभर नेटचा घोळ चालू होता. रस्त्याचे काम सुरू होते नि एम.टी.एन.एल.च्या वायर्स उघड्या झाल्याने वाय फाय बंद. स्मार्टफोनही नव्हता. त्यामुळे आता स्काईपवर येणे शक्य नाही असे त्याला सांगितल्यावर तो हिरमुसलाच. “अरे, मला तुझी रिअॅक्शन बघायचीय.

शेअरडे बाप-लेक

. . रंगरावने शेअर्सच्या उलाढालीत फार मोठी खोट खाल्ली होती. नशिबाने त्याची सासुरवाडी फारच गब्बर व भक्कम असल्यामुळे त्याला काही तसं फारसं कमी पडत नव्हतं. पण जेव्हा त्याचा एकुलता एक पोरगा गजा शेअर्सचा व्यवसाय निवडणार म्हणू लागला, तेव्हा रंगरावाची बायको चांगलीच हडबडली. तिच्या दृष्टीने हे भिकेचे डोहाळेच होते जणू. तिने एक सायकियाट्रिस्टच गाठले. त्यांना सगळी पार्श्वभूमी समजावून दिली.

मिपाकरांची मनकी बात अर्थात मिपाकर फर्माईश.

. . फार पूर्वी रेडिओ सिलोन 'बिनाका गीतमाला' हा एक लोकप्रिय कार्यक्रम सादर करीत असे. त्यामध्ये लोकांच्या पसंतीची गाणी त्यांना मिळालेल्या गुणपसंतीने क्रमवार वाजवीत असत आणि त्यात एक गाणे सरताज गीत म्हणून शेवटी वाजवले जात असे. त्याची वार्षिक मानांकन पद्धतही होतीच. आमचा स्वतःचा असा काही रेडिओ नाही आणि तसेही आम्ही स्वतःच एक रेडीओ झालो आहोत.

जनरल टोप्टिगिन

. aaa जनरल टोप्टिगिन (रशियन लोककथेचा भावानुवाद क्र. 2) मूळ लेखक निकोलाई नेकरासोव गोष्ट परत एकदा रशियेतली बरं का मंडळी, खूप खूप जुनी. म्हणजे जेव्हा झार मालक रशियावर राज्य करत तेव्हाची. रशियात त्या वेळी प्रवासी अन मालवाहतूक करायला त्रोइका नावाची घसरगाडी वापरत असत अन ह्या त्रोइकाच्या गाडीवानाला म्हणत 'यामशिकी'.
Subscribe to दिवाळी अंक २०१५