Skip to main content

दिवाळी अंक २०१५

पॉन सॅक्रिफाईस

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 28/10/2015 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
. . रॉबर्ट जेम्स फिशर.. तोच तो बॉबी फिशर! बुद्धिबळाची थोडीशीदेखील आवड असलेल्या प्रत्येकाला माहीत असलेले नाव.

स्वागत दीपावलीचे...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 26/10/2015 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
. . a सांज ती तेजाळलेली हासली लाजून वदली डोंगराच्या पायथ्याशी उजळला अंधार आहे चंद्र सजला चांदण्याने मुग्ध सारी रात्र झाली छेडलेला राग कोमल धुंद तो गंधार आहे मेघतोरण बांधलेले, स्वागता आकाश नटले नभधरेच्या संगमाचा आगळा शृंगार आहे वृक्षगर्भी दाटलेले ओज ओसंडून न्हाले या धरेने अन नभाने गायला मल्हार आहे देखणी ती

धनी

लेखक अविनाश कुलकर्णी यांनी सोमवार, 26/10/2015 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
. . ................................ कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली सखे काय सांगू. कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली घेता मिठीत त्याने,आग अंगास लावली अधराने अधरावर प्रेम कविता कोरली सुटले भान पदराचे, गळून पडली चोळी कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली ना डोळ्यास डोळा.

लावणी माझं जग आहे... सुरेखा पुणेकर.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 25/10/2015 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
. . महाराष्ट्राची एक प्रसिद्ध लोककला - लावणी. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून लावणीला एक प्रतिष्ठा देणार्‍या, 'कारभारी दमानं', 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा', 'दूर व्हा ना, सोडा जाऊ द्या', 'इचार काय हाय तुमचा' या आणि अशा कितीतरी लावण्या अतिशय सुंदर सादर करणार्‍या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या नुकत्याच औरंगाबाद जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावी नटरंगी नार या कार्यक्रमासाठी आल्या होत्या.

मुक्ता

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 25/10/2015 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
. . मी मुक्ता चित्रे. सर्वसाधारण मुली असतात, तशीच मीसुद्धा एक. शाळेत बर्‍यापैकी हुशार होते. आमचे आई-वडील दोघेही तालुक्याच्या गावी शाळेत शिक्षक होते. वडील मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आणि आई पर्यवेक्षिका म्हणून. आम्ही श्रीमंत नसलो, तरीही कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. स्वतःचे तीन खोल्यांचे घर आहे. आईवडिलांनी कधी फाजील लाड केले नाहीत, परंतु काही कमीही पडू दिले नाही.

उशिरा

लेखक आतिवास यांनी शनिवार, 24/10/2015 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
. . . . चौकातला दिवा लाल झाला, गाड्या थांबल्या. रस्ता ओलांडून फटाफट ते सगळे रस्त्याच्या बाजूला ठरलेल्या जागी आले. मनातली काळजी, शंका, उत्सुकता इतरांना कळू नये याची सगळ्यांची धडपड चालू होती. पण कदाचित जगण्याचा तितकासा अनुभव पाठीशी नसल्याने असेल, भावना लपवण्याच्या धडपडीत त्यांचे चेहरे जास्त बोलत होते. “आले का समदे?” नंदाने विचारलं.

काही कविता

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 24/10/2015 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
. . "मुग्धा" उपमा विशेषण तुला पुरेना नाव साजीरे ओठी ठरेना कसे सुटावे क्लिष्ट कोडे आई-बाबा, आजी-आजोबांनाही कळेना! लखलख चमचम नभांगणातील | नक्षत्राचा तारा तू | माणिक-मोती, नीलम पाचू | अव्वल रत्ना हिरा तू || तू परी तू मंदाकिनी | निलाक्षी सुनयना तू | तू पल्लवी तू गोजिरी | सुहासिनी सुवदना तू || सकवार सोनाली तू | हळुवार हसरी स्मिता तू | तू रूपाली तू रातराणी | सुमना तू प्राजक्ता तू || तू मधुरा तू क

मालवणी समुपदेश आणि शेजारचा बायो [मनमोहन रोगे]

लेखक दिवाळी अंक यांनी बुधवार, 21/10/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
. . जवळची होकाल कुरडी भासता, कारण तेच्या डोळ्यातला कुसाळ दिसता लांबची होकाल चोकट गमता, कारण तेनी सोसलेला मुसळ म्हायत नसता लांब आसतत तेव्हा सगळेच सगे-सोयरे मदत करूची येळ इल्यार कुणी कुणाचे नायरे म्हणूनच म्हणतात दुरून डोंगर साजरे पण डोंगरात घुसल्यार दिसतत सगळे काजरे हातातल्या काकणाक कित्या होयो आरसो? म्हागडो गॉगल लावल्यान तरी डोळ्यान तिरसो टिचभर तवशात हातभर

प्ले इट अगेन

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 18/10/2015 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
. . . . . Image (चित्रः प्रतिमा खडके) त्याच्यासाठी ते सगळंच नवीन होतं. ते लोक, ती जागा, तो माहोल आणि सगळंच. या नवीनतेची ओळख करून घ्यायला कुठपासून सुरुवात करू, या संभ्रमात तो तिथे बसला होता. संजय. कोकणातल्या एका छोट्याशा गावातला तो एक हुशार मुलगा होता.