Skip to main content

टोस्ट...Tea Rusk...

लेखक दिपाली पाटिल यांनी शुक्रवार, 25/09/2009 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्यः ४ कप मैदा (मैदा+गव्हाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ, मी गव्हाचे पीठ घेतलेय...) २ टीस्पून यीस्ट १/२ कप + २ टेस्पून साखर १.५ कप कोमट दुध १ टेस्पून मीठ १/४ कप बटर किंवा तुप (याचं प्रमाण जेव्हढं जास्त तेव्हढा खुसखुशीतपणा वाढेल...) कुटलेली दालचीनी, जायफळ आले बारिक तुकडे करुन कृती: १) एका वाडग्यात २ टेस्पून साखर + २ टीस्पून यीस्ट मिसळुन घ्यावे. २) साखर्+यीस्ट मध्ये १/२ कप कोमट दुध घालावे आणि ५-७ मिनीटे बाजुला ठेवुन द्यावे. ३) १ कप दुध + १/४ कप बटर +१/२ कप साखर एकत्र करुन गॅसवर अगदी कोमट तापवावे...अगदी बटर वितळेपर्यंतच, जास्त गरम करु नये. ४) आता मैदा + यीस्टचे मिश्रण + वरिल दुध+तुप्+साखरेचे मिश्रण + आले+ दालचीनी-जायफळ एकत्र करुन ५-१० मिनीटे मळुन घेणे. ५) १ १/२ तास उबदार ठिकाणी पीठ फुगायला ठेवा...जवळजवळ दुप्पट फुगुन येइल. ६) हाताने ४-५ पंच मारुन पीठ परत अर्धा-एक मिनीट मळा. ७) २ बेकिंग ट्रे ला ग्रीस करुन ठेवा ८) आता त्याचे ४ भाग करुन त्या गोळ्यांना जाड लाटुन घ्या आणि लांब-लांब गुंडाळी करुन वरुन पाण्याचा हात फिरवून बेकिंग शीट किंवा कुकी शीटवर ठेवा. ९) आता अजुन ४५ मिनीटे उबदार जागी ठेवुन द्या. १०) ३५० फॅ.वर २५-३० मिनीटे बेक करा... ११) आता या ब्रेड्सना ४-५ तास थंड होऊ द्या आणि नंतर अंदाजे १/२ इंच जाड चकत्या कापुन घ्या... १२) आता या चकत्यांना कुकी शीटवर ठेवून २८० फॅ. वर ३० मि. बेक करा...अधनं-मधनं बघत रहावं लागतं... १३) हलक्या तपकीरी रंगावर कडक झाले की हे टोस्ट झाले समजावे... टीपा: बाहेरच्या इतकं छान लागणार नाही बहुधा...गव्हाच्या पीठापेक्षा मैद्याचे जास्त छान लागतात. बटर,साखर-मीठाचे प्रमाण जरुरीप्रमाणे बदलावे.... आवडीनुसार तीळ, खसखस, मनुका ही घालु शकता..

वाचने 14251
प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

आहाहा... शेवटचा फोटु तर यकदम मस्त... :) (मस्का खारी आणि बटर प्रेमी) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

पाय कुठे आहेत तुझे??

In reply to by लवंगी

असेच म्हणतो.. अवांतरः चहाचा पण फोटु टाकला असता तर अजुन मजा आली असती....

In reply to by शेखर

चहाचा पण फोटु टाकला असता तर अजुन मजा आली असती....
आणि पाककृती पण :-D फोटो झक्कासच दिसतायत..कृतीही असणारच !! (चहातून पार्ले-जी बिस्किटं बुडाबुडाके खाणारा) शाहरुख

In reply to by शाहरुख

फोटो झक्कासच दिसतायत..कृतीही असणारच !! म्हणजे?? दिपाली :)

In reply to by दिपाली पाटिल

म्हणजे??
हा प्रश्न विचारलाय की आत्मविश्वास दाखवलाय ? :-) जर आत्मविश्वास दाखवत असाल तर, वेल..यु डिझर्व इट :-) जर प्रश्न असेल तर, मी (हा पदार्थ स्वतः करणार नसल्याने) कृती न वाचता फक्त फोटो बघून प्रतिक्रिया दिली होती.

In reply to by लवंगी

पाय काय विचारत आहात.... हात कुठे आहेत विचारा... बांधून ठेऊ म्हणत आहे =)) हे देवी ! का का आमच्या जीवावर उठली आहेस तु :D * आज पासून .. आता पासून दिपाली तै.. ब्लॅक लिस्टेड X( *** राज दरबार.....

दिपाली, धन्य आहे तुझी.

मस्त छान. फोटो बघूनच छान वाटले. आता रेसिपी वाचते. चकली http://chakali.blogspot.com

तुला दंडवत गं बाई!!!! तुझा चरणकमळांचा फोटो काढून लाव इथे.. रोज दर्शन घेऊन तरी स्वयंपाक नीट येतो का करायला ते बघते. :) तुझ्यात पेशन्स सॉल्लिड आहेत बाई!! मस्त पाकृ...! नक्की करेन असं म्हणत नाही.. कारण ब्रेड झाल्यावर ४-५ तास थांबून ते पुन्हा बेक करणं माझ्याकडून नाही होणार.. त्यापेक्षा तू भेटे पर्यंत विकत आणूनच खाईन. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजु...खरंतर ४-५ तास ठेवायचा असतो पण २०-२५ मिनीटेपण पुरे होतात..फक्त चटका लागू नये एव्हढे थंड होऊ द्यावे... :) दिपाली :)

In reply to by विसोबा खेचर

असेच म्हणते. मस्तच दिसतायत. तुम्हाला नक्की काय करता येत नाही? म्हणजे अशाच फक्त पाककृती द्याव्यात म्हणते. नाहीतर काय शामत आहे?

स्वयंपाकाची अतोनात आवड बॉ तुम्हाला दिपालीतै!! :-) आता चियाबाटा, फोकेशिया असे वेगवेगळे ब्रेड येउ द्या.

In reply to by सहज

जेवणाच्या वेळेसही टोस्ट खावेसे वाटले ... शेवटचा फोटो खूप मस्त आला आहे. वेगवेगळ्या ब्रेड्सच्या रेसिपीजपण येऊ द्यात ना ... अदिती

वा वा वा !! टोमॅटो सुप कुठाय ? च्या पेक्षा टोमॅटो सुप मधे ब्रेड भारी लागतो ;) -(ब्रेडप्रेमी) टारोबा बटर

In reply to by टारझन

अरे टारझना हा तो ब्रेड नाहीये... हा चहात बुडवुन खायचा टोस्ट आहे... दिपाली :)

In reply to by दिपाली पाटिल

अगं तेच असतं ते ... ब्रेड तापवला की झाला टोस्ट आणि सुप मधे टाकायचा असल्यावर त्याला ब्रेड स्क्रम्स का काय तरी म्हणतात ह्हुच्चब्रु लोक .. बाकी भावणा समजा हो दिपाली तै :) -( चहाप्रेमी) टारोबा गिरनार

In reply to by टारझन

तु म्हणजे अशक्य आहेस... सुपात टाकतात ते ब्रेड्क्रम्स नसतात रे..क्रुटॉन्स म्हणतात त्यांना ...गरिब लोकंही तेच म्हणतात. :D दिपाली :)

हा धागा उघडल्याचा खरा पश्चात्ताप मला उद्या सकाळी चहा घेताना होणार आहे. :''( :''( (टोस्टेड)चतुरंग

In reply to by चतुरंग

ओ प्रांजी कोई गल नही ऑय ... पार्ले-जी असतीलंच ना ? -(नको आता कसला प्रेमी नको .. देवदास करेल तात्या) भित्तर

In reply to by टारझन

कुठे हे टी रस्क आणि कुठे ती पारले जी? (कुठे इंद्राचा ऐरावत चालीवर..) ;) (चहात पडलेला पार्लेजीचा लगदा चमच्याने खाणारा)चतुरंग

[( --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

चहा तयार आहे.. टोस्ट द्या बघु लवकर. :)

In reply to by दिपक

टोस्ट ऑलरेडी तयार आहे रे ... :) घे की हात वर करून :) -नेत्रदिपक

In reply to by टारझन

धन्यवाद रे टाऱ्या. :)

In reply to by दिपक

ह तर ब्रेड-टोस्ट आणि मार्मालेड आहे... :) दिपाली :)

सुंदर, सोपी, उपयुक्त पाककृती आणि जीभखेचक छायाचित्र. गव्हाच्या पीठाचे, कमी साखर आणि बटरचे टोस्ट कधीतरी करावे म्हणतो. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

झकास....जास्त शब्दच नाहीत.. --प्रभो

मस्तच... छायाचित्र देखिल मस्तच दिसतायत.

#o परत चूक केलीच.

In reply to by श्रावण मोडक

आहो घाबरू नका .. अनवाँटेड सेवेंटी टू च्या जाहिरातींचा भडीमार चालू असतो टिव्ही वर हल्ली !! - श्रावणातला मोदक

In reply to by टारझन

श्रावणातला मोदक तुझ्या सह्यांचं एक संकलन करून टाक पटकन. ;)

करुन बघायला हरकत नाही...शेवटचा फोटो तर एकदम मस्त!!!! पण खुप patience ठेवावा लागेल रेसिपी करताना.... :(

आताच मस्त चहाचा कप घेऊन बसली आहे...आणि टोस्टच्या रेसिपी आणि फोटोवर समाधान मानावे लागत आहे :(

झकास दिसत आहेत टोस्ट.. स्वाती

काय बोलु ??.. बस ,मार डाला सू हा स...

काय? टोस्ट घरी करता येतात? धागे काढून टाकण्यपेक्षा ह्या दिपाली ची मिपावरची मेबरशिप काढून घ्या बर. रोजच्या रोज असा वात आणलाय! नुसती पाकृ द्यावी आणि गप्प बसावे. ते नाही हिच . ती त्यात फोटो टाकते. स्वतः काम करतेच किचन मधे आणि सर्वांना कामाला लावते. :)) मीनल.

खर तर आश्चर्य आहे. मला तरी वाटत होते हे पदार्थ फक्त बेकरीतच मिळतात.बाकी दिपाली तै चैन आहे तुमच्या फॅमिलीची .भारतात आला तर बोलवा एकदा जेवायला.सहसा पुर्ण दिवस जेवणाचा कार्यक्रम ठेवा. म्हणजे बर्‍यापैकी पदार्थ चाखता येतील. वेताळ

आजकाल दिपालीमॅडमनं सगळ्यांना जळवण्याचा विडा उचललेला दिसतो.;) टोस्टचे फोटू व कॄती आवडली. छान, मस्त असे शब्द संपले आहेत. रेवती

हो याला टोस म्हणतात नां.... दिपाली :)

दिपाली, खरेच खूप टेम्पटींग आहेत टोस्ट. करायला आळस आहे पण कोणी दिले करून तर तयारी आहे खायची. :)

वाचनकर्ते आणि प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद...दिपाली :)