संडे स्पेशल ( दाल पकवान)
Taxonomy upgrade extras
दाल पकवान हा एक सिंधी लोकांचा खाण्याचा प्रकार आहे.
साहित्य:
दाल साठी:
२५० ग्रॅम हरभरा डाळ
१ टी.स्पून जीरा
६-७ हिरव्या मिरच्या (मधे चिरलेल्या)
१ चिमुट तिखट
१/२ च.हळ्द
३ वाट्या पाणी
३-४ टे.स्पून तेल
मीठ चवीनुसार
२ टे.स्पून. कोथिंबीर चिरलेली
चिमुट्भर आमचुर पावडर
पकवान साठी:
३००ग्रॅम मैदा
१/२ ती.स्पून जीरा
३टे.स्पून तेल
तळण्यासाठी तेल
मीठ चवीनुसार
१.प्रथम डाल धुवून २ तास भिजवून ठेवावी.
२.प्रेशरकुकर मध्ये ३ टे.स्पून तेल घालून जीरे, हिरव्या मिरच्या घालून फ्राय करावे.
३.पाणी न काढता भिजवलेली डाळ, हळद आणि मीठ घालून डाळ बोटचेपी होईपर्यंत शिजवावी ( साधारण १०/१५ मिनिटे)
पकवासाठी: १.मैदा चाळून त्यात जीरा, तेल आणि मीठ घालून पाण्याने मळावे. जास्त घट्ट पण नाही जास्त सैल पण नाही असे पीठ मळावे.
२.त्याचे छोटे छोटे गोळे करून चपाती सारखे लाटावे. जास्त जाड नाही जास्त पातळ नाही. त्यावर फोर्क ने टोचे मारावेत म्हणजे ते तळल्यावर पुरी सारखे
फुगणार नाहीत.
३.कढईत तेल घेऊन ते तापले की त्यात वरील तयार केलेली चपाती टाकावी व मंद आचेवर दोन्ही बाजूने तळावी.
आणि दाल बरोबर सर्व्ह करावी.
दाल सर्व्ह करताना: त्यात थोडे तिखट. आमचुर पावडर, कोथिंबीर आणि थोडे गरम तेल घालून द्यावी.
सोबत आंब्याचे लोणचे द्यावे.
वाचने
13155
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
अरे वा..
In reply to अरे वा.. by प्राजु
सहमत..
ओ.के.
In reply to ओ.के. by स्वाती राजेश
हे मात्र काहीतरीच!
हरभरा / चणा डाळ
In reply to हरभरा / चणा डाळ by सुनील
चणा डाळ
In reply to चणा डाळ by पिवळा डांबिस
डांबिसकाका,