Skip to main content

डोनटस्

Published on बुधवार, 14/12/2011
डोनटस् खुप प्रकारचे असतात काही डीप फ्राय केले जातात तर काही ओव्हनमध्ये बेक केले जातात. बेक केलेले डोनटस् ना केक डोनटस् असे देखील म्हटले जाते व ते यीस्ट फ्री असतात. साहित्यः १ कप मैदा १/२ कप साखर १ टेस्पून बेकिंग पावडर १ अंडे (रुम टेम्परेचर ला असलेले) १/२ कप दुध १/२ टीस्पून व्हॅनिला एसेन्स ४ टेस्पून तेल . सजावटीसाठी चॉक्लेट सॉस आणी स्प्रिंक्लस. चॉक्लेट सॉस बनवण्यासाठी: १/२ कप दुधात १ टेस्पून बटर मिक्स करुन मायक्रोव्हेवमध्ये १० सेकंद गरम करणे. १ कप पिठीसाखरेत २ टेस्पून कोको पावडर व वरील दुध-बटर चे मिश्रण ३ टेस्पून घालून एकत्र करणे. . पाकृ: प्रथम मैदा व बेकिंग पावडर एकत्र ३ वेळा चाळून घेणे. . त्यात साखर नीट मिसळावी. आता त्यात अंड , दुध व व्हॅनिला एसेन्स घालून ईलेक्ट्रिक बीटर ने एक मिनिट मिश्रण फेटून घेणे. एक ही गुठळी राहता कामा नये. (ईलेक्ट्रिक बीटर नसल्यास वायर व्हिस्क चा वापर करावा, तो ही नसल्यास काट्याचा वापर करावा ) . आता त्यात तेल घालून परत एक मिनिट मिश्रण फेटून घेणे. . मी येथे डोनट-मेकरचा वापर केला आहे , तुम्ही डोनट-पॅन (केकची भांडी मिळतात तसा हा पॅन ही मिळतो) वापरु शकता. डोनट-मेकर वापरत असाल तर तो आधी प्री-हीट करुन घ्या व त्याला थोडे तेलाने ग्रीज करा व त्यात मिश्रण ओता. ३-५ मिनीटात डोनटस् तयार होतात. जर का डोनट-पॅन वापरणार असाल तर ओव्हन प्री-हीट करुन घ्या व हे मिश्रण पॅनमध्ये ओतून २०० डिग्री सें वर ७-८ मिनीटे बेक करा. . तयार डोनटस् असे दिसतात. हे मिनी डोनटस् आहेत. . तयार डोनटस् ना चॉक्लेट सॉसमध्ये एका बाजूने बुडवून कुलिंग रॅकवर ठेवणे. कुलिंग रॅकच्या खाली एक ताट ठेवावे जेणेकरुन ओघळणारे चॉक्लेटचे थेंब त्यात पडतील. . त्यावर स्प्रिंक्लस घालून सजावट करणे. थोड्यावेळ असेच ठेवावे सेट होण्याकरता. . मस्त ताज्या डोनटस् चा आनंद लुटा चहा, कॉफी किंवा दुधाबरोबर. नुसतेही खायला छान लागतात :) .

याद्या 22350
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

करुन पाहिन लवकरच

In reply to by रश्मि दाते

करुन पाहिन लवकरच

इतके कष्ट घेणे काही जमणार नाही. एक वेळ ते ही करु वाटल्यास पण इतर साहित्याची जुळवाजुळव करण्यापेक्षा दुकानातले आणुन खाणे स्वस्त पडेल. ;) पण तुमच्या मेहनतीला दाद देतो. :) एकदम फक्कड झालेले दिसतायत डोनट्स.

In reply to by गणपा

ह्येच म्हणतो.... नेहमी डोनटस् खाताना विचार यायचा मनात, की साला हे बनतात तरी कसे... आज उत्तर मिळाले ;) धम्माल पाककृती.... _/\_

मस्तच दिसतायत..... फारच कॅलरीज असतील ना ह्यात?

डॉक्टर नाही म्हणताहेत.....

In reply to by प्रभाकर पेठकर

'जिन चीजोंसे जिंदगी जिंदगी लगती है, डॉक्टर साले उन्ही चीजोंको मना कर देते है" - अशोककुमार (शौकीन) खायला मनाई आहे, बघायला तर नाही ;-)

In reply to by सन्जोप राव

मनाई असलेल्या कित्येक गोष्टींकडे नुसते 'बघण्यावरच' समाधान मानून आहे.

In reply to by प्यारे१

भन्नाट वाक्य आहे. बादवे काका, एखादी गोष्टी "कमी" खायला सांगितली आहे की "बंद" करायला सांगितली आहे? "कमी" खा असा सल्ला असेल तर कुठलाही चविष्ट पदार्थ थोडास्सा घेउन हळूहळू चघळत चघलत खात त्याची आधिकाधिक मजा घ्यायची असा एक पर्याय असू शकतो. आमचे एक काका असेच गोड चालत नाही म्हणून चमचाभर श्रीखंड जेवणभर पुरवून खाताना पाहिलेत. ते त्यातही खुश आहेत. बघा काही उपयोग झाला तर.

In reply to by मन१

'गोड' गोष्टींबाबत संयम हवा. अन्यथा, 'हृदया'वर ताण पडून हृदय विकारास आमंत्रण दिल्यासारखे होईल असे साखरेबाबत डॉक्टरांचे आणि अन्य 'गोड' गोष्टींबाबत सौं.चे म्हणणे आहे. अजून तरी संयम बाळगला आहे. (हे सहज कळावे).

In reply to by प्रभाकर पेठकर

मोह? मोहात वाईट काय असतं रे शाम, आपलं... प्रभाकर? - काकाजी आठवा आणि अधूनमधून का होईना मोहाला बळी पडा. बायको, डॉक्टर हे लोक.. जाऊ दे फार तीव्र शब्द वापरणार होतो. त्यांच्याकडे एका मर्यादेपलीकडे लक्ष देऊ नये... :-)

ऑसम! सानिका ताई खरंच डंकिन डोनट्स ला चॅलेज करतील असे दिसतायत डोनट्स! सादर प्रणाम ____/\____

एकदा डॉक्टरांचा सल्ला धुडकाऊन बंडखोरी करावी म्हणतो. पाकृ आणि विशेषतः शेवटचे छायाचित्र एवढे नजरबंद करणारे आहे की 'अचपळ मन माझे नावरे आवरीता'. अभिनंदन.

झकास दिसताहेत!

नेहमी नेहमी वेगळे काय लिहीणार. :~ :-~ :puzzled: कॉलींग ५०फक्त. एव्ह्ढे चमचे दिसत आहेत. जिवघेणे फोटो आहेत. आणि प्रतीसाद नाही अजून???

In reply to by चिंतामणी

कॉलींग ५०फक्त.....कॉलींग ५०फक्त..... - (चमचाप्रेमी) सोकाजी

In reply to by सोत्रि

अरे काय करु, ते फोटो पाहुन काही लिहायची इच्छाच होत नाही, आणि एवढे दिवस प्रत्यक्ष चमचे त्रास द्यायचे तर आता तो चमच्याचा ठसा देखील टोचतो आहे. यापुढे अशा धाग्यांवर प्रत्येक प्रतिसादाला माझ्या आयडिवरुन +१ ऑटोमॅटिक टाकलं जाईल याची सोय करावी मिपानं अजुन काय लिहिणार.

त्रास देते आहेस. किती सुंदर केले आहेस डोनट्स. मस्त. आता दे इकडे पाठवून. तेही ताबडतोबः;)

हम्म्म चमचे.... :| (दातावर दात, तोंड जास्त न उघडता भरत जाधव स्टाईल) बास्किन रॉब्बिन्सचे डुनट्स आठवले. वर गणपाने त्राग्याने म्हटले आहे काय? असं डिसमूड नाय करायचं रे गणपा... ( बाकी ही पाककृती अंडं न घालता कशी करता ये ईल? ;) ) सगळे शब्द नीट लिहा रे बायकांनो. नीट लिहा. च्यायला ते डुनट घश्याखाली उतरायचं नाही.

In reply to by प्यारे१

वर गणपाने त्राग्याने म्हटले आहे काय? असं डिसमूड नाय करायचं रे गणपा...
नाय रे भौ... त्रागा कसला. उलट कौतुकच केलयकी सानिकातैंच्या मेहनतीच. :)

मी गोड खात नाही, त्यामुळे धागा उघडणार नव्हतो. पण सानिकातैच्या चमच्यांचा मी फॅन असल्यामुळे चमच्यांचे दर्शन होइल ह्या आशेने धागा उघडला. मस्त चमच्यांचे दर्शन तर झालेच पण शेवटच्या फोटोतली सजावट/कलाकुसर बघुन धन्य झालो. - (खाण्याबरोबर, खाण्यातली सजावटही खुप आवडणारा) सोकाजी

डोनटस मस्त दिसत आहेत, स्वाती

जुकॉचे दिवस आठवले. कॉलेजच्या बाहेर पाच रुपयात सहा डोनट मिळायचे (हम्बर्गर सारखे दिसणारे) मधोमध चीर पाडून लोण्याची सुरी फिरवलेली असायची. उम्म्म्मम.............. जबरदस्त. ही पाकृ पाहून ती चव आताच जिभेवर रेंगाळायला लागली असे वाटतेय

In reply to by चिंतामणी

लिहीणारे येड*व्यासारखे काहीही लिहीतील आम्ही ऐकायचे काय. आमच्या संस्कृतीने अंडी भटास वर्ज्य - अब्राम्हण्यम् असे सांगितले आहे. त्यामुळे सदर लेखाने काहीही फरक पडलेला नाही. बाय दे कोंबड्यांच्या मेन्स्ट्र्युअल सायकल चे फलित खाण्यात काहीही रस नाही. आणि बाजीराव पेशव्यांचा आदर्श ठेवायचाच तर पराक्रमाचा पहीले ठेवावा अभक्ष्यभक्षणाचा आणि बाया ठेवण्याचा नंतर ठेऊ. न ठेवला तर उत्तम. कसें?

मस्तच आहेत.. पण मेहनतीचे काम दिसतेय. (मॅड ओव्हर डोनट्स) चिगो..

तोंडाला पुर आला आहे. --^-- असेच सिनेमन भुरभुरलेले डोनट्स फ्फाफ्फार अवडतात

मस्तच गं.... सही... एकदम यम्मी दिसतायत. मला ते डोनट्स तळुन करतात माहित होत, पण असं डोनट मेकर मी कुठे बघितल नाहि अजुन इथे.. मस्तय एकदम... ह्यात मग बहुतेक आपण मेदुवडा पण करु शकु... ट्राय करुन बघ.. :)

In reply to by Mrunalini

अगं हो मी ही असाच विचार करतेय त्यात मेदुवडा बनवून बघायचा म्हणजे ऑईल फ्री ही होईल ;) इकडे सहज उपल्बध आहे डोनट मेकर :)

In reply to by सानिकास्वप्निल

त्या स्मायलीज चुकीच्या ठिकाणी लिहिल्या गेल्या असं वाटतंय.
अगं हो मी ही असाच विचार करतेय त्यात मेदुवडा बनवून बघायचा म्हणजे ऑईल फ्री ही होईल :) इकडे सहज उपल्बध आहे डोनट मेकर ;)
असे अपेक्षित आहे काय तुम्हाला??? ;)

In reply to by अन्या दातार

नाही मुद्दामच लिहिल्या आहेत तशा अगं हो मी ही असाच विचार करतेय त्यात मेदुवडा बनवून बघायचा म्हणजे ऑईल फ्री ही होईल ;) असे म्हणायचे आहे

तू एक तरी पदार्थ घरी न करता दुकानातून आणून खा ना. का बिचार्‍या दुकानं आणि हॉटेलं चालवणार्‍यांच्या पोटावर पाय देतेस? ;) बाकी छोटु-छोटु डोनट्स आवडले हे वेगळं सांगायची गरज नसावी.

धागा वाचताक्षणी ठरवले होते की धाग्यावर येउन कमेंटची पिंक सोडावी की आमच्या इथल्या पीटर डोनट्स मध्ये छान डोनट्स मिळतात पण साले हे फोटो बघुन तसेही म्हणवेना. तुम्ही एक काम करा एक बेकरी टाकाच आता. :)