डोनटस्

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
14 Dec 2011 - 10:46 pm

डोनटस् खुप प्रकारचे असतात काही डीप फ्राय केले जातात तर काही ओव्हनमध्ये बेक केले जातात. बेक केलेले डोनटस् ना केक डोनटस् असे देखील म्हटले जाते व ते यीस्ट फ्री असतात.
साहित्यः
१ कप मैदा
१/२ कप साखर
१ टेस्पून बेकिंग पावडर
१ अंडे (रुम टेम्परेचर ला असलेले)
१/२ कप दुध
१/२ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
४ टेस्पून तेल
.

सजावटीसाठी चॉक्लेट सॉस आणी स्प्रिंक्लस.

चॉक्लेट सॉस बनवण्यासाठी: १/२ कप दुधात १ टेस्पून बटर मिक्स करुन मायक्रोव्हेवमध्ये १० सेकंद गरम करणे.
१ कप पिठीसाखरेत २ टेस्पून कोको पावडर व वरील दुध-बटर चे मिश्रण ३ टेस्पून घालून एकत्र करणे.

.

पाकृ:

प्रथम मैदा व बेकिंग पावडर एकत्र ३ वेळा चाळून घेणे.

.

त्यात साखर नीट मिसळावी. आता त्यात अंड , दुध व व्हॅनिला एसेन्स घालून ईलेक्ट्रिक बीटर ने एक मिनिट मिश्रण फेटून घेणे. एक ही गुठळी राहता कामा नये. (ईलेक्ट्रिक बीटर नसल्यास वायर व्हिस्क चा वापर करावा, तो ही नसल्यास काट्याचा वापर करावा )

.

आता त्यात तेल घालून परत एक मिनिट मिश्रण फेटून घेणे.

.

मी येथे डोनट-मेकरचा वापर केला आहे , तुम्ही डोनट-पॅन (केकची भांडी मिळतात तसा हा पॅन ही मिळतो) वापरु शकता.

डोनट-मेकर वापरत असाल तर तो आधी प्री-हीट करुन घ्या व त्याला थोडे तेलाने ग्रीज करा व त्यात मिश्रण ओता. ३-५ मिनीटात डोनटस् तयार होतात. जर का डोनट-पॅन वापरणार असाल तर ओव्हन प्री-हीट करुन घ्या व हे मिश्रण पॅनमध्ये ओतून २०० डिग्री सें वर ७-८ मिनीटे बेक करा.

.

तयार डोनटस् असे दिसतात. हे मिनी डोनटस् आहेत.

.

तयार डोनटस् ना चॉक्लेट सॉसमध्ये एका बाजूने बुडवून कुलिंग रॅकवर ठेवणे. कुलिंग रॅकच्या खाली एक ताट ठेवावे जेणेकरुन ओघळणारे चॉक्लेटचे थेंब त्यात पडतील.

.

त्यावर स्प्रिंक्लस घालून सजावट करणे. थोड्यावेळ असेच ठेवावे सेट होण्याकरता.

.

मस्त ताज्या डोनटस् चा आनंद लुटा चहा, कॉफी किंवा दुधाबरोबर. नुसतेही खायला छान लागतात :)

.

प्रतिक्रिया

रश्मि दाते's picture

14 Dec 2011 - 11:28 pm | रश्मि दाते

करुन पाहिन लवकरच

पक पक पक's picture

15 Dec 2011 - 8:58 am | पक पक पक

आमच्या पोटावर पाय.. ? जहिर निषेध.......

बेकरि संघटना.

पियुशा's picture

15 Dec 2011 - 9:39 am | पियुशा

मस्त ,यम्मी दिसत आहेत :)

निवेदिता-ताई's picture

15 Dec 2011 - 10:04 pm | निवेदिता-ताई

करुन पाहिन लवकरच

इतके कष्ट घेणे काही जमणार नाही. एक वेळ ते ही करु वाटल्यास पण इतर साहित्याची जुळवाजुळव करण्यापेक्षा दुकानातले आणुन खाणे स्वस्त पडेल. ;)

पण तुमच्या मेहनतीला दाद देतो. :)
एकदम फक्कड झालेले दिसतायत डोनट्स.

सुहास झेले's picture

15 Dec 2011 - 12:36 pm | सुहास झेले

ह्येच म्हणतो....

नेहमी डोनटस् खाताना विचार यायचा मनात, की साला हे बनतात तरी कसे... आज उत्तर मिळाले ;)

धम्माल पाककृती.... _/\_

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2011 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा

नेहमी प्रमाणेच सॉल्लीड..हॅट्स ऑफ

कौशी's picture

15 Dec 2011 - 12:35 am | कौशी

लवकरच करून बघेल.

कुंदन's picture

15 Dec 2011 - 12:51 am | कुंदन

मस्तच दिसतायत.....
फारच कॅलरीज असतील ना ह्यात?

बाई.. तू सरळ डंकीन डोनट्स ला चॅलेंज का नाही करत??
धन्य आहेस तू! ____/\____

स्वाती२'s picture

15 Dec 2011 - 1:07 am | स्वाती२

मस्त दिसतायत!

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2011 - 2:11 am | प्रभाकर पेठकर

डॉक्टर नाही म्हणताहेत.....

सन्जोप राव's picture

15 Dec 2011 - 7:19 am | सन्जोप राव

'जिन चीजोंसे जिंदगी जिंदगी लगती है, डॉक्टर साले उन्ही चीजोंको मना कर देते है" - अशोककुमार (शौकीन)
खायला मनाई आहे, बघायला तर नाही ;-)

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2011 - 8:16 am | प्रभाकर पेठकर

मनाई असलेल्या कित्येक गोष्टींकडे नुसते 'बघण्यावरच' समाधान मानून आहे.

प्यारे१'s picture

15 Dec 2011 - 9:40 am | प्यारे१

सुप्पर लाईक करण्यात आलेले आहे. ;)

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2011 - 9:43 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. प्यारे१.

मन१'s picture

15 Dec 2011 - 12:52 pm | मन१

भन्नाट वाक्य आहे.
बादवे काका, एखादी गोष्टी "कमी" खायला सांगितली आहे की "बंद" करायला सांगितली आहे?
"कमी" खा असा सल्ला असेल तर कुठलाही चविष्ट पदार्थ थोडास्सा घेउन हळूहळू चघळत चघलत खात त्याची आधिकाधिक मजा घ्यायची असा एक पर्याय असू शकतो. आमचे एक काका असेच गोड चालत नाही म्हणून चमचाभर श्रीखंड जेवणभर पुरवून खाताना पाहिलेत. ते त्यातही खुश आहेत. बघा काही उपयोग झाला तर.

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2011 - 2:09 pm | प्रभाकर पेठकर

'गोड' गोष्टींबाबत संयम हवा. अन्यथा, 'हृदया'वर ताण पडून हृदय विकारास आमंत्रण दिल्यासारखे होईल असे साखरेबाबत डॉक्टरांचे आणि अन्य 'गोड' गोष्टींबाबत सौं.चे म्हणणे आहे.
अजून तरी संयम बाळगला आहे. (हे सहज कळावे).

सन्जोप राव's picture

16 Dec 2011 - 7:26 am | सन्जोप राव

मोह? मोहात वाईट काय असतं रे शाम, आपलं... प्रभाकर? - काकाजी आठवा आणि अधूनमधून का होईना मोहाला बळी पडा. बायको, डॉक्टर हे लोक.. जाऊ दे फार तीव्र शब्द वापरणार होतो. त्यांच्याकडे एका मर्यादेपलीकडे लक्ष देऊ नये... :-)

इंटरनेटस्नेही's picture

15 Dec 2011 - 9:34 am | इंटरनेटस्नेही

ऑसम! सानिका ताई खरंच डंकिन डोनट्स ला चॅलेज करतील असे दिसतायत डोनट्स!
सादर प्रणाम ____/\____

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2011 - 9:56 am | प्रभाकर पेठकर

एकदा डॉक्टरांचा सल्ला धुडकाऊन बंडखोरी करावी म्हणतो. पाकृ आणि विशेषतः शेवटचे छायाचित्र एवढे नजरबंद करणारे आहे की 'अचपळ मन माझे नावरे आवरीता'. अभिनंदन.

sneharani's picture

15 Dec 2011 - 9:57 am | sneharani

झकास दिसताहेत!

चिंतामणी's picture

15 Dec 2011 - 10:26 am | चिंतामणी

नेहमी नेहमी वेगळे काय लिहीणार. :~ :-~ :puzzled:

कॉलींग ५०फक्त.

एव्ह्ढे चमचे दिसत आहेत. जिवघेणे फोटो आहेत. आणि प्रतीसाद नाही अजून???

सोत्रि's picture

15 Dec 2011 - 11:29 am | सोत्रि

कॉलींग ५०फक्त.....कॉलींग ५०फक्त.....

- (चमचाप्रेमी) सोकाजी

५० फक्त's picture

15 Dec 2011 - 10:27 pm | ५० फक्त

अरे काय करु, ते फोटो पाहुन काही लिहायची इच्छाच होत नाही, आणि एवढे दिवस प्रत्यक्ष चमचे त्रास द्यायचे तर आता तो चमच्याचा ठसा देखील टोचतो आहे.

यापुढे अशा धाग्यांवर प्रत्येक प्रतिसादाला माझ्या आयडिवरुन +१ ऑटोमॅटिक टाकलं जाईल याची सोय करावी मिपानं अजुन काय लिहिणार.

सविता००१'s picture

15 Dec 2011 - 11:13 am | सविता००१

त्रास देते आहेस. किती सुंदर केले आहेस डोनट्स. मस्त. आता दे इकडे पाठवून. तेही ताबडतोबः;)

प्यारे१'s picture

15 Dec 2011 - 11:16 am | प्यारे१

हम्म्म
चमचे.... :|
(दातावर दात, तोंड जास्त न उघडता भरत जाधव स्टाईल)
बास्किन रॉब्बिन्सचे डुनट्स आठवले.
वर गणपाने त्राग्याने म्हटले आहे काय? असं डिसमूड नाय करायचं रे गणपा...
( बाकी ही पाककृती अंडं न घालता कशी करता ये ईल? ;) )
सगळे शब्द नीट लिहा रे बायकांनो. नीट लिहा.
च्यायला ते डुनट घश्याखाली उतरायचं नाही.

वर गणपाने त्राग्याने म्हटले आहे काय? असं डिसमूड नाय करायचं रे गणपा...

नाय रे भौ... त्रागा कसला.
उलट कौतुकच केलयकी सानिकातैंच्या मेहनतीच. :)

सोत्रि's picture

15 Dec 2011 - 11:33 am | सोत्रि

मी गोड खात नाही, त्यामुळे धागा उघडणार नव्हतो.
पण सानिकातैच्या चमच्यांचा मी फॅन असल्यामुळे चमच्यांचे दर्शन होइल ह्या आशेने धागा उघडला.
मस्त चमच्यांचे दर्शन तर झालेच पण शेवटच्या फोटोतली सजावट/कलाकुसर बघुन धन्य झालो.

- (खाण्याबरोबर, खाण्यातली सजावटही खुप आवडणारा) सोकाजी

धनुअमिता's picture

15 Dec 2011 - 12:10 pm | धनुअमिता

सानिका ताई खुप छान आहे पाककृती. पण ह्यात अंडे नाही घातले तर चालेल का?

स्वाती दिनेश's picture

15 Dec 2011 - 12:24 pm | स्वाती दिनेश

डोनटस मस्त दिसत आहेत,
स्वाती

जाई.'s picture

15 Dec 2011 - 12:27 pm | जाई.

डोनटस मस्त दिसतायेत

तोंडाला पाणी सुटले आहे.

जुकॉचे दिवस आठवले.
कॉलेजच्या बाहेर पाच रुपयात सहा डोनट मिळायचे (हम्बर्गर सारखे दिसणारे) मधोमध चीर पाडून लोण्याची सुरी फिरवलेली असायची. उम्म्म्मम.............. जबरदस्त.
ही पाकृ पाहून ती चव आताच जिभेवर रेंगाळायला लागली असे वाटतेय

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Dec 2011 - 2:18 pm | llपुण्याचे पेशवेll

अंडं असल्याने भटास डोनट्स वर्ज्य.

चिंतामणी's picture

15 Dec 2011 - 5:32 pm | चिंतामणी

बाजीराव पेशव्यांचा आदर्श ठेवा. (तसे जमणे अवघड आहे हे माहित आहे.)

अंडी व्हेजमधेच मोडतात.

हे वाचा.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Dec 2011 - 10:57 am | llपुण्याचे पेशवेll

लिहीणारे येड*व्यासारखे काहीही लिहीतील आम्ही ऐकायचे काय. आमच्या संस्कृतीने अंडी भटास वर्ज्य - अब्राम्हण्यम् असे सांगितले आहे. त्यामुळे सदर लेखाने काहीही फरक पडलेला नाही.
बाय दे कोंबड्यांच्या मेन्स्ट्र्युअल सायकल चे फलित खाण्यात काहीही रस नाही.

आणि बाजीराव पेशव्यांचा आदर्श ठेवायचाच तर पराक्रमाचा पहीले ठेवावा अभक्ष्यभक्षणाचा आणि बाया ठेवण्याचा नंतर ठेऊ. न ठेवला तर उत्तम. कसें?

चिगो's picture

15 Dec 2011 - 2:30 pm | चिगो

मस्तच आहेत.. पण मेहनतीचे काम दिसतेय.
(मॅड ओव्हर डोनट्स) चिगो..

उदय के'सागर's picture

15 Dec 2011 - 2:37 pm | उदय के'सागर

तोंडाला पुर आला आहे. --^--

असेच सिनेमन भुरभुरलेले डोनट्स फ्फाफ्फार अवडतात

Mrunalini's picture

15 Dec 2011 - 5:24 pm | Mrunalini

मस्तच गं.... सही... एकदम यम्मी दिसतायत. मला ते डोनट्स तळुन करतात माहित होत, पण असं डोनट मेकर मी कुठे बघितल नाहि अजुन इथे.. मस्तय एकदम... ह्यात मग बहुतेक आपण मेदुवडा पण करु शकु... ट्राय करुन बघ.. :)

सानिकास्वप्निल's picture

15 Dec 2011 - 6:26 pm | सानिकास्वप्निल

अगं हो मी ही असाच विचार करतेय त्यात मेदुवडा बनवून बघायचा म्हणजे ऑईल फ्री ही होईल ;)
इकडे सहज उपल्बध आहे डोनट मेकर :)

अन्या दातार's picture

15 Dec 2011 - 6:35 pm | अन्या दातार

त्या स्मायलीज चुकीच्या ठिकाणी लिहिल्या गेल्या असं वाटतंय.

अगं हो मी ही असाच विचार करतेय त्यात मेदुवडा बनवून बघायचा म्हणजे ऑईल फ्री ही होईल :)
इकडे सहज उपल्बध आहे डोनट मेकर ;)

असे अपेक्षित आहे काय तुम्हाला??? ;)

सानिकास्वप्निल's picture

15 Dec 2011 - 6:43 pm | सानिकास्वप्निल

नाही मुद्दामच लिहिल्या आहेत तशा
अगं हो मी ही असाच विचार करतेय त्यात मेदुवडा बनवून बघायचा म्हणजे ऑईल फ्री ही होईल
;)

असे म्हणायचे आहे

स्मिता.'s picture

15 Dec 2011 - 6:58 pm | स्मिता.

तू एक तरी पदार्थ घरी न करता दुकानातून आणून खा ना. का बिचार्‍या दुकानं आणि हॉटेलं चालवणार्‍यांच्या पोटावर पाय देतेस? ;)
बाकी छोटु-छोटु डोनट्स आवडले हे वेगळं सांगायची गरज नसावी.

रेवती's picture

16 Dec 2011 - 7:19 am | रेवती

मस्तच!
कॅटरिना कैफ पाकृ.

मृत्युन्जय's picture

16 Dec 2011 - 12:06 pm | मृत्युन्जय

धागा वाचताक्षणी ठरवले होते की धाग्यावर येउन कमेंटची पिंक सोडावी की आमच्या इथल्या पीटर डोनट्स मध्ये छान डोनट्स मिळतात पण साले हे फोटो बघुन तसेही म्हणवेना.

तुम्ही एक काम करा एक बेकरी टाकाच आता. :)

स्वातीविशु's picture

16 Dec 2011 - 5:33 pm | स्वातीविशु

डोनट्स फारच यम्मी......... :-) :smile: