लेखकसानिकास्वप्निलयांनी सोमवार, 05/09/2011 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य घाटले:
एका नारळाचे घट्ट् दुध
एक वाटीभर चिरलेला गुळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टेस्पून तांदुळपिठी कोरडीच भाजून
१/२ टीस्पून जायफळपूड
१ टीस्पून वेलचीपूड
पाकृ:
मंद गॅसवर भांडयात नारळाचे दुध घालून ढवळावे.
त्यात चिरलेला गुळ घालून एकत्र गुळ विरघळेपर्यंत ढवळावे.
गुळ विरघळला की त्यात कोरडी भाजलेली तांदुळपिठी घालून एकत्र करणे.
घट्ट्सर झाले की त्यात वेलचीपूड व जायफळपूड घालणे.
साहित्य घावनः
२ वाटया तांदुळपिठी
दुध लागेल तसे
चवीपुरतं मीठ
पाकृ:
तांदुळपिठीत लागेल तसे दुध घालणे व मीठ घालणे व सरसरीत भिजवावे.
नॉन-स्टीक तवा तापवून , थोडे तेल सोडून डावाने घावन घालावे.
झाकून शिजवणे, झाले की घडी घालून काढणे.
गरमा-गरम घाटल्यासोबत घावने सर्व्ह करावेत.
आज गौरींच्या जेवणाच्या दिवशी आमच्याकडे पुरणपोळी असते. ती केलिये.
पुढच्या विकांताला घावन घाटल्याचा घाट घालते.
मी हा पदार्थ एकदाच खाल्लाय पण फोटू पाहून मस्त वाटलं!
हो असेच समजा...कारण तो बिचारा आता वापरण्याच्या लायकीचा राहीलेला नाही ओ...तुटला बिचारा (तरी मी त्याला दृष्ट लागू नये म्हणून तीट लावत असे)...म्हणून त्याला आठवण म्हणून जपून ठेवला आहे :)
प्रतिसाद्कर्त्यांनी फक्त तो हे सर्वनाम वापरून नक्की कोण याचा निर्णय वाचकावर सोडलेला आहे. त्यामुळे रूपकांना एक लवचिकता येते. हे या पाकृमधील प्रतिसादांचे एक मोठं शक्तीस्थान आहे.
प्रतिक्रिया
सध्या मोदक चापतोय.. घावन
मस्तय गं.... मला ते घाटले
मस्तच
छान
आज गौरींच्या जेवणाच्या दिवशी
घावणे एकदम सही
मस्त
हा हा हा
In reply to मस्त by प्रचेतस
अरेरेरे.... खुप वाईट झालं...
In reply to हा हा हा by सानिकास्वप्निल
अरेरेरे.... खुप वाईट झालं...
In reply to हा हा हा by सानिकास्वप्निल
हो ना माझ्यापेक्षा
In reply to अरेरेरे.... खुप वाईट झालं... by Mrunalini
प्रतिसाद्कर्त्यांनी फक्त तो
In reply to हो ना माझ्यापेक्षा by सानिकास्वप्निल
अप्रतिम फोटो
वाह वाह... मस्त
मालवणात घावन अन नारळाची चटणी
मस्तच...
मस्त !
मस्तं
सगळ्यांना धन्यवाद
नारळाचे दूध सोडून बाकी सगळे
का गं? क्यानमधे मिळते ना! ते
In reply to नारळाचे दूध सोडून बाकी सगळे by कवितानागेश
हो हो
In reply to का गं? क्यानमधे मिळते ना! ते by रेवती
अहाहा! नुसतं नैवेद्याचे ताट
व्वा !!